Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

बँक अधिकारी असल्याची थाप मारून ऑनलाइन गंडा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

बँक अधिकारी असल्याची थाप मारून ४२ हजार रुपयांचा ऑनलाइन गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. बँक अधिकारी असल्याचे सांगून एटीएम कार्डसंबंधी गोपनीय कोड मिळवून ही फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मनोहर राजाराम गायकवाड (वय ५६, रा. विष्णुनगर) असे फिर्यादीचे नाव आहे. त्यांची मुलगी पल्लवीच्या मोबाइलवर १० जून रोजी एका भामट्याने फोन केला. त्याने बँक अधिकारी असल्याचे सांगितले. एटीएम कार्ड बंद होईल, अशी थाप त्याने मारली. कार्ड बंद होऊ नये म्हणून एटीएम कार्डवरील सोळा अंकी क्रमांक आणि सात अंकी क्रमांक सांगावेत, असे तो म्हणाला. फोनवर बोलणारी व्यक्ती बँक अधिकारी असावी, असे गृहित धरून पल्लवीने भामट्याला माहिती दिली. त्यानंतर त्याने या क्रमांकांचा त्याचा वापर करून फिर्यादीच्या बँक खात्यातून ४२ हजार ०२० रुपयांची ऑनलाईन खरेदी केली. हा प्रकार लक्षात येताच गायकवाड यांनी पोलिसांकडे धाव घेतली. याप्रकरणी अधिक तपास पोलिस निरीक्षक सलीम शेख करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कायम नोकरीच्या आमिषाने फसवणूक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शिक्षण संस्थेत सहशिक्षकपदी कायमस्वरुपी करण्याचे आमीष दाखवून एका तरुणाला ८ लाख रुपयांना गंडा घालणाऱ्या संस्थाचालकाविरुद्ध क्रांतिचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बालचंद्र देवराव देवकाते (वय ४४, रा. ४०१, निर्मल प्रकाश बिल्डिंग, अहिल्यादेवी होळकर चौक, पद्मपुरा) असे संस्था चालकाचे नाव आहे.

सोयगाव तालुक्यातील रामचंद्र रमाजी खिल्लारे (२९, रा. पिंपळा, जामठी) याचे शिक्षण बीएडपर्यंत झालेले आहे. खिल्लारे हे नोकरीच्या शोधात असताना त्यांची गंगापूर तालुक्यातील दायगाव येथील मूळ रहिवासी असलेल्या बालचंद्र देवकाते याच्याशी भेट झाली. खिल्लारे यांची देवकाते यांच्याशी ओळख होती. २०१४मध्ये देवकाते याने आपल्या जोगेश्वरीतील सिद्धी विनायक शिक्षण संस्थेच्या श्री विनायक माध्यमिक विद्यालयात सहशिक्षकाचे पद रिक्त असल्याचे सांगितले. त्यावरून जून २०१४मध्ये खिल्लारे यांनी नोकरीसाठी संस्थेकडे अर्ज सादर केला. त्यानंतर ९ हजार ३०० रुपये वेतनावर देवकाते यांच्या स्वाक्षरीनुसार खिल्लारेंना ३० जून २०१४ रोजी नियुक्तीपत्र देण्यात आले.

खिल्लारे यांनी ४ महिने नोकरी केल्यानंतर देवकातेने त्यांना कायमस्वरुपी नोकरी हवी असल्यास ८ लाख रुपये द्यावे लागतील, अशी मागणी केली. कायम नोकरी लागत असल्याने खिल्लारेंच्या वडिलांनी घरात असलेली काही रक्कम आणि शेतीवर दोन बँकांमधून कर्ज घेऊन ६ लाख ४० हजार रुपये जमा केले. ही रक्कम देवकातेला यांनी दिल्याचे फिर्यादी खिल्लारे यांनी सांगितले. त्यानंतर जुलै २०१४ ते मार्च २०१५ पर्यंत सहशिक्षकाची नोकरी केली. कामाच्या मोबदल्यात पैसे मागितल्यास हजार-पाचशे रुपये दिले जात होते, असेही खिल्लारे यांनी नमूद केले.

दिलेला चेक बाउन्स

खिल्लारे यांनी तालुक्यातील राजेंद्र अहिरे यांच्याकडे आपली कैफियत मांडली होती. अहिरे यांच्यासह रवी काळे हे देवकातेला भेटण्यासाठी औरंगाबादला आले. त्यावेळी देवकाते याने खिल्लारेंच्या नावे चेक देण्याचे टाळले. व्याजासह रक्कम देतो, असे म्हणत अहिरे यांच्या नावे सहा लाख रुपयांचा चेक दिला. हा चेक ११ मार्च २०१५ रोजी वटला नाही. शेवटी खिल्लारे यांनी आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक मधुकर सावंत यांच्याकडे धाव घेतली. त्यांच्या तक्रारीवरून देवकातेविरुद्ध क्रांतिचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणीपुरवठा आज विस्कळित

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

जायकवाडी येथील ५६ एमएलडी योजनेच्या पंपगृहातील पॅनल बोर्डमध्ये शनिवारी सायंकाळी सांयकाळी सहाच्या सुमारास स्पार्किंग होऊन उपसा बंद झाला. स्पार्किंगमुळे केबल व कनेक्टर जळाले आहे, तसेच मुख्य सब स्टेशनमधील डी. ओ. देखील जळाले आहे. या कामाची दुरुस्ती हाती घेण्यात आली आहे. पॅनल बोर्ड आणि केबलचे काम रात्री उशिरापर्यंत चालणार आहे. यामुळे फारोळा आणि नक्षत्रवाडी येथून जुन्या पाणीपुरवठा योजनेचा उपसा बंद झाला आहे. याचा परिणाम म्हणून रविवारी शहरातील पाणीपुरवठा विस्कळित होणार आहे, अशी माहिती औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीतर्फे देण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घरफोडीत ४१ हजार रुपयांचा ऐवज लंपास

$
0
0

नांदेड : सोनटक्के कॉलनीत एक घर फोडून अज्ञात चोरट्यांनी ४१ हजारांचा ऐवज लंपास केला. ‌‌ही घटना शुक्रवारी रात्री घडली. वृत्तपत्र विक्रेते किशनसिंह चव्हाण यांचे बोरगाव रस्त्यावर घर आहे. शुक्रवारी मध्यरात्री चॅनलगेट तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला. सोन्याचे मंगळसूत्र, रोख ७ हजार असा एकूण ४१ हजाराचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी कंधार पोलिस ठाण्यात किशनसिंह चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरूद्ध गुन्हा नोंद झाला आहे. जमादार साखरे पुढील तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बालविवाह रोखण्यात पोलिसांना यश

$
0
0

उस्मानाबाद : वडगाव ‌(सिद्धेश्वर) येथे शुक्रवारी (१२ जून) दुपारी होणारा एका अल्पवयीन मुलीचा विवाह रोखण्यात उस्मानाबाद पोलिसांना यश आले. सदरील विवाहाची खबर मिळताच पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप केल्यामूळे हा विवाह होऊ शकला नाही.पोलिस प्रशासनासह चाईल्ड लाईन, जिल्हा बाल संरक्षण कक्षाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी वधु-वरांसह त्यांच्या पालकांचे समुपदेशन करून संबंध‌ितांना नोटिसा देऊन सोडण्यात आले.

शुक्रवारी दुपारी वडगाव (सि.) येथे एका अल्पवयीन मुलीचा विवाह होत असल्याची खबर जिल्हा पोलिस प्रमुख अभिषेक त्रिमुखे यांना मिळाली. याची तात्काळ दखल घेत त्रिमुखे यांनी उस्मानाबाद शहर पोलिस ठाण्याचे फौजदार डी. एम शेख यांना सदरील बालविवाहस प्रतिबंध करण्याचे आदेश दिले. त्यानंतर फौजदार शेख यांनी आपल्या सहकाऱ्यासह विवाह होण्याअगोदर वडगाव (सि.) गाठले. नववधू होणारी मुलगी अल्पवयीन असल्याचे समोर आल्यानंतर तिच्या पालकांसह वराच्या घरातील मंडळींना उस्मानाबाद शहर पोलिस ठाण्यात आणले. त्यानंतर मुला-मुलींच्या पालकांना अमोल कोवे, भाले यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कन्नडमध्ये अतिवृष्टी; वाहून गेल्याने युवकाचा मृत्यू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी कन्नड

कन्नड तालुक्यातील काही गावांना शुक्रवारी सायंकाळी अतिवृष्टीचा फटका बसला. नदी व नाल्यांना महापुराचे स्वरूप प्राप्त झाले होते. सिरसगावजवळील नाल्याला आलेल्या पुरात युवक दुचाकीसह वाहून गेला.

तालुक्यातील जवळी (खुर्द) येथील भगवान एकनाथ गायके (१९) हा युवक सिरसगावजवळील नाल्याला आलेल्या पुरात दुचाकीसह वाहून गेला. सायंकाळी कन्नड येथून घरी जवळी येथे परत येत असताना चापानेर रस्त्यावरील सिरसगाव जवळील पुलावर पाण्याचा अंदाज न आल्याने दुचाकीसह वाहून गेला. रात्री शोधाशोध केल्यानंतर शनिवारी पहाटे मृतदेह मिळाला. शुक्रवारी रात्री उशिरा तहसीलदार महेश सुधळकर नायब तहसीलदार जी.आर. आदिक, मंडळ अधिकारी बी.एस. पठाण, तलाठी विकास वाघ, डहाके, जंगले आदींनी भेट दिली.या अतिवृष्टीमुळे कन्नड तालुक्यातील चापानेर, चिकलठाण, कन्नड व देवगाव महसूल मंडळात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.

वीज पडल्याने महिलेचा मृत्यू

नांदेड : धर्माबाद तालुक्यातील चोंडी शिवारात वीज पडल्यामुळे महिलेचा मृत्यू झाला तर एकजण जखमी झाला आहे. ही घटना शनिवारी सायंकाळी घडली. सुशिलाबाई माधव धोंडापूरे असे मरण पावलेल्या महिलेचे नाव आहे. माधव इरसिंगा धोंडापूरे हे गंभीर जखमी झाले आहेत. चोंडी येथील शेतकरी माधव धोंडापूरे व त्यांची पत्नी सुशिलाबाई धोंडापूरे हे दोघे शेतामध्ये कचरा वेचण्याचे काम करीत होते. दरम्यान, दुपारी मेघ गर्जनेसह विजेचा कडकडाट सुरु झाला व पाऊसही पडू लागल्यामुळे आसरा घेण्यासाठी हे दोघे शेतातील लिंबाच्या झाडाखाली थांबले होते. त्यावेळी तवीज पडल्यामुळे सुशिला यांचा मृत्यू झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एलगंगा नदी ओसंडून वाहू लागली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, खुलताबाद

जलयुक्त शिवार अभियानातून प्रेरणा घेऊन शासनाचा एक रुपयाही न घेता लोकसहभागातून तालुक्यातील श्रीक्षेत्र वेरूळ येथील एलगंगा नदीच्या रुंदीकरण व खोलीकरणाचे काम करण्यात आले आहे. याठिकाणी झालेल्या पहिल्याच पावसामुळे नदी ओसंडून वाहू लागली आहे. नदीच्या पुनरुज्जीवनाने श्रीक्षेत्र वेरूळचा कायापालट होणार असून ‌परिसरातील दहा हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे. त्यामुळे परिसरातील विहिरींच्या पाणीपातळीत मोठ्याप्रमाणात वाढ होणार आहे.

सांसद आदर्श गाव योजनेत वेरूळ गावाची निवड केल्यानंतर खासदार राजकुमार धूत यांच्या पुढाकाराने एलगंगा नदीच्या पुनरुज्जीवनाचे काम हाती घेण्यात आले होते. जिल्हा परिषद सदस्य शैलेश क्षीरसागर यांनी यापूर्वीच नदीच्या स्वच्छतेची सुरुवात केली होती. म्हैसमाळ येथून उगम पावलेली एलगंगा नदी पुढे गोदावरी नदीत मिळते. एलगंगा मान्सूनच्या मौसमात खळाळून वाहते. म्हैसमाळ येथून वाहत येणारे पावसाचे पाणी मोठया धडाक्याने लेणी क्रमांक २९ जवळील सीता नाहानी या धबधब्याच्या प्रवाहातून वाहते. पुराणात व शिलालेखात वेरूळ या गावाचा उल्लेख 'एलापूर' असा आढळतो. या नावाविषयी अनेक दंतकथा निगडीत आहेत.

जिल्हा परिषदेचे अधिकारी कर्मचारी यांनी ५६ हजार रुपये देऊन नदीच्या पुनरुज्जीवन करण्याच्या कामाला हातभार लावला. बारावे ज्योतिर्लिंग श्री. घृष्णेश्वर मंदिर ट्रस्टने जेसीबी यंत्र उपलब्ध करून दिले. जिल्हा परिषद मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. अभिजीत चौधरी व उपमुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळुंके यांच्या पुढाकाराने महाराष्ट्र ग्रामीण बँकेने पाच लाख रुपये दिले. केअरिंग फ्रेंड्स आणि अॅक्सीस बँक यांनी प्रत्येकी पाच आणि चार लाख रुपये दिले. एलगंगा नदीच्या रुंदीकरणाचे आणि खोलीकरणाचे काम तब्बल सात आठवडे चालले. साडे सहा किलोमीटर लांबीचे नदीचे पात्र रुंद व खोल करण्यात आले. यामध्ये दोन पुरातन विहिरीदेखील आढळल्या. भर उन्हाळ्यात या डोहातून हाताने पाणी घेणे शक्य होते.

जलसंधारण मंत्र्यांनी केले कौतुक

राज्याच्या ग्रामविकासमंत्री तथा जलसंधारणमंत्री पंकजा मुंडे यांनीही एलगंगा नदीच्या रुंदीकरण व खोलीकरणाची पाहणी करून राज्य दुष्काळमुक्त करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उल्कानगरीत ४ तोळ्यांचे मंगळसूत्र पळविले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

भाजीपाल खरेदी करून घराकडे जाणाऱ्या महिलेचे दुचाकीवरून आलेल्या दोघांनी चार तोळे वजनाचे मंगळसूत्र आणि साखळी लंपास केली. सोसायटीच्या आवारात येऊन चोरट्यांनी ही धाडसी चोरी केली. त्यावेळी सुरक्षारक्षक सोसायटीच्या मुख्य गेटवर हजर होता, परंतु त्याला हुलकावणी देत चोरटे पसार झालेत. ही घटना खिवंसरा पार्क परिसरात शनिवारी (१३ जून) सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली. संगिता राजीव रामदलाणी (वय ५०) असे या महिलेचे नाव अाहे. याप्रकरणी जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेच्या माहिती मिळताच पोलिसांनी शहरात नाकाबंदी केली, परंतु सायंकाळी उशिरापर्यंत आरोपींना अटक करण्यात त्यांना यश मिळू शकले नाही.

खिवंसरा पार्क परिसरातील निलगिरी सोसायटी येथे राहणाऱ्या संगीता रामसलामे सकाळी अकरा वाजता भाजीपाल खरेदीसाठी गेल्या होत्या. खरेदी करून त्या सोसायटी आवारातून पायी घरी जात होत्या. त्यावेळी विना क्रमांक असलेल्या दुचाकीवरून आलेल्या दोघां चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील दोन तोळे वजनाचे मंगळसूत्र आणि दोन तोळे वजनाची साखळी हिसकावून नेली. हा प्रकार लक्षात येताच महिलेने ओरडाओरड केली. सोसायटीच्या मुख्य प्रवेशद्वारवर त्यावेळी एक वयस्कर सुरक्षारक्षक तैनात होता. त्यांने हालचाल करेपर्यंत चोरटे दुचाकीवरून पसार झाले. हे चोरटे १८ ते २५ वयोगटातील होते.

घटनेची माहिती मिळताच जवाहरनगर पोलिस स्टेशनचे निरीक्षक शेख सलीम, गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अविनाश आघाव हे पथकासह दाखल झाले. आरोपीच्या शोधासाठी शहरात नाकाबंदीही करण्यात आली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


वीज चोरांविरुद्ध महावितरणची मोहीम

$
0
0

औरंगाबाद : वीज चोरी रोकण्यासाठी फ्लाइंग स्क्वॉड स्थापन करण्याचा निर्णय महावितरणने घेतल्याची माहिती मुख्य अभियंता सतीश चव्हाण यांनी दिली. शहरात प्रथमच अशा स्वरुपाचे पथक स्थापन करण्यात येत आहे.

शहरात अडीच लाख वीज ग्राहक आहेत. काही भागात मोठ्या प्रमाणात वीज चोरी होते. या प्रकारामुळे विजेचा शॉक लागून मृत्यू झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत. झोपडपट्टी आणि शहरालगतच्या परिसरात मोठ्या संख्येने आकडे टाकून वीज चोरी करण्याचे प्रमाण वाढलेले आहे. हे प्रकार रोकण्यासाठी लाइनमन गेले असता त्यांच्या अंगावर धावून जाणे, वाद घालणे असे प्रकार घडतात. या पार्श्वभूमीवर शहरात फ्लाइंग स्क्वॉड निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे. या पथकाचे नेतृत्व उपाधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याकडे असेल.

चोरी पकडल्यास गुन्हे

फ्लाइंग स्क्वॉडसाठी अधिकारी, कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. येत्या सोमवारपासून ही पथके कार्यरत होतील. या पथका वीज चोरी उघड केल्यानंतर संबंधितावर फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे, असेही चव्हाण यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘समांतर’चा पोलिसांनाही ठेंगा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

नगरसेवक आणि नागरिकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करणाऱ्या 'समांतर'च्या अधिकाऱ्यांनी पोलिसांनाही जुमानले नाही. पाणीपुरवठ्याच्या नियोजनाचा अहवाल देण्याची सूचना पोलिसांनी या अधिकाऱ्यांना केली होती, पण पोलिसांना अद्याप अहवाल सादर करण्यात आलेला नाही. पोलिस सोमवारपर्यंत अहवालाची प्रतीक्षा करणार आहेत.

महापालिकेने समांतर जलवाहिनी टाकण्याची योजना आखल्यानंतर सुभाष प्रोजेक्ट मार्केटिंग लिमिटेड या कंपनीबरोबर करार करण्यात आला. या कंपनीने समांतर जलवाहिनीसाठी औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीची स्पेशल पर्पज व्हेइकल म्हणून नियुक्ती केली आहे. १ सप्टेबर २०१४पासून महापालिकेने संपूर्ण शहराची पाणीपुरवठा योजना कंपनीच्या ताब्यात दिली आहे. कंपनीच्या ताब्यात पाणीपुरवठा योजना गेल्यापासून शहरात पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे गेल्या एक ते दीड महिन्यापासून शहरात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केला आहे. आठ-आठ दिवस पाणीपुरवठा होत नसल्यामुळे नागरिक आणि नगरसेवक त्रस्त झाले आहेत. त्यांनी जलकुंभावर आणि औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीच्या कार्यालयासमोर आंदोलने केली. कंपनीच्या मुख्य कार्यालयाला कुलूप ठोकण्यापर्यंत नागरिकांची व नगरसेवकांची मजल गेली. या आंदोलनांमागील गांभीर्य पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी ओळखून पाण्याच्या प्रश्नात लक्ष घालण्याचे ठरविले. त्यानुसार त्यांनी पोलिस निरीक्षकांकडून शहरातील पाणीपुरवठ्या बद्दलचा अहवाल मागविला.

औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीचे कार्यालय सिडको एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीत आहे. या पोलिस स्टेशनचे निरीक्षक श्रीपाद परोपकारी यांच्याकडूनही आयुक्तांनी अहवाल मागवला आहे. परोपकारी यांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून पाणीपुरवठ्याचे नियोजन मागविले आहे. येत्या काळातील रमजान, गणेशोत्सव हे सण लक्षात घेता पाण्यावरून वातावरण बिघडू नये, या उद्देशाने पोलिसांनी कंपनीकडून नियोजन मागविले, परंतु कंपनीच्या अधिकाऱ्यांनी अद्याप ते दिलेले नाही. त्याची सोमवार पर्यंतवाट पाहून त्याची माहिती पोलिस आयुक्तांना दिली जाणार आहे.

आगामी काळातील सण लक्षात घेऊन पाणीपुरवठ्याचे नियोजन औरंगाबाद सिटी वॉटर युटिलीटी कंपनीकडून मागविले आहे. चार दिवसांपूर्वीच कंपनीच्या अधिकाऱ्यांना हे नियोजन देण्याची सूचना केली आहे, पण त्यांनी ते सादर केलेले नाही. सोमवारपर्यंत नियोजनाची वाट पाहण्याचे आम्ही ठरविले आहे.

- श्रीपाद परोपकारी, पोलीस निरीक्षक, सिडको एमआयडीसी स्टेशन

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फेरपरीक्षा २२ जुलैपासून

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

दहावी परीक्षेत नापास झालेल्या विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ नये म्हणून यंदापासून जुलैमध्येच परीक्षा घेतली जाणार आहे. बोर्डाने परीक्षेची तयारी पूर्ण केली आहे. प्रस्तावित वेळापत्रकानुसार २२ जुलै ते ३ ऑगस्ट दरम्यान ही परीक्षा होणार असून त्याचा निकाल २२ ऑगस्ट रोजी निकाल जाहीर केला जाणार आहे. उत्तरपत्रिका तपासणीबाबत ही बदल करण्यात आले असून वेळ वाचविण्यासाठी जिल्हावार कॅम्प लावून उत्तरपत्रिकांची तपासणी केली जाणार आहे. १७ जून रोजी मंडळाच्या होणाऱ्या बैठकीत वेळापत्रकाला अंतिम स्वरुप दिले जाणार आहे.

नापास विद्यार्थ्यांना ऑक्टोबरपर्यंत पुर्नपरीक्षेसाठी थांबावे लागते. त्यामुळे त्यांचे एक वर्षाचे नुकसान होते. या परिस्थितीत विद्यार्थ्यांना आणखी एक संधी मिळावी यासाठी महिन्याभरात फेरपरीक्षा घेतली जाणार आहे. जुलै-ऑगस्टमध्येच ही परीक्षा घेतली जाणार आहे. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने परीक्षेचे वेळापत्रकही निश्चित केल्याची माहिती अधिकारी सूत्रांनी दिली. याबाबत सोमवारपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होते आहे. जुलै-ऑगस्टमध्ये होणारी परीक्षा बारा दिवसांत घेतली जाणार आहे. तर वीस दिवसांत निकाल जाहीर होईल. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार परीक्षा २२ जुलैला सुरू होईल ती ३ ऑगस्टला संपेल. यानंतर २२ ऑगस्टला निकाल जाहीर होईल. फेब्रुवारी-मार्चमध्ये घेण्यात आलेल्या नियमित परीक्षेत १,३४, ३४६ विद्यार्थी तर पुर्नपरीक्षार्थींपैकी ८१,१३९ विद्यार्थी अनुउत्तीर्ण झाले.

उत्तरपत्रिकांसाठी 'कॅम्प'

उत्तरपत्रिका तपासणी कॅम्प लावून एकाच छताखाली केली जाईल. फेब्रुवारी-मार्चमधील परीक्षेत उत्तरपत्रिका मॉडरेटरकडे टपालाने पाठविल्या जातात, हा विलंब कमी कमी करण्यासाठी जिल्ह्यात एकाच ठिकाणी कॅम्प लावून उत्तरपत्रिका तपासल्या जातील. तेथेच मॉडरेटर, पर्यवेक्षक असतील. तेथूनच गुणांची यादी पाठविली जाईल.

औरंगाबाद विभागात ६० केंद्रांवरून होणार परीक्षा

औरंगाबाद विभागाचा निकाल यंदा चांगला लागला आहे. विभागात फेब्रुवारी-मार्च २०१५चा निकाल ९०.५७ एवढा लागला आहे. विभागातून परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांपैकी १५,१४७ विद्यार्थी अनुउत्तीर्ण ठरले. तर यंदा पुर्नपरीक्षार्थींपैकी ५,९६१ विद्यार्थी अनुउत्तीर्ण ठरले. जुलै-ऑगस्टमध्ये होणाऱ्या परीक्षेची विभागीय मंडळांनी तयारी पूर्ण केली आहे. औरंगाबाद विभागात ६० परीक्षा केंद्रावरून ही परीक्षा होईल. ज्या तालुक्यात अनुत्तीर्ण विद्यार्थी संख्या कमी आहे, अशा विद्यार्थ्यांना जवळच्या तालुक्यात केंद्र देण्यात आले असल्याचे विभागीय मंडळाचे अध्यक्ष सुखदेव डेरे यांनी सांगितले.

नियमित शुल्कात अर्ज भरण्याची प्रक्रिया १५ ते २३ जून

प्रस्तावित वेळापत्रक २२ जुलै ते ३ ऑगस्ट

परीक्षा निकाल २२ ऑगस्ट

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मान्सून मराठवाड्यात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मृग नक्षत्रात पूर्व मोसमी सरींनी जोरदार हजेरी लावल्यामुळे मराठवाड्याची भाग्यरेषा असलेल्या जायकवाडी प्रकल्पात पाणी येण्यास शनिवारी सुरुवात झाली. दरम्यान, कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या सीमेवर शुक्रवारी पोचलेल्या मान्सूनच आज मराठवाड्यासह विदर्भाचा काही भागात आगमन झाले.

जायकवाडी प्रकल्पाचे सुमारे ३० टक्के पाणलोट क्षेत्र खुले आहे. हे पाणलोट क्षेत्र औरंगाबाद आणि नगर जिल्ह्यांत आहे. गोल्या आठवड्यापासून या दोन्ही जिल्ह्यांत दमदार पावसाने हजेरी लावली त्यामुळे जायकवाडी प्रकल्पात शनिवारी दुपारपासून पाण्याची आवक सुरू झाली आहे. सायंकाळी नाथसागरात ७ हजार क्युसेस पाणी येत होते. सकाळी प्रकल्पातील पाण्याची पातळी १४९५.२७ फूट होती. ती सायंकाळी १४९५.४० फुटांपर्यंत पोचली. सध्या प्रकल्पात एकुण जलसाठा ७७४.००३ दशलक्ष घनमीटर (उपयुक्त जलसाठा ३५.८९७ दशलक्ष घनमीटर, १.७ टक्के) आहे.

दरम्यान, मान्सूनचा पाऊस आज मराठवाड्यात पोचला. मान्सूनने मराठवाड्यासह विदर्भाचाही काही भाग व्यापला आहे. येत्या चार दिवसांत दमदार पावसाची अपेक्षा आहे. मान्सूनच्या आमगनापूर्वीच मराठवाड्यात वार्षिक सरासरीच्या तुलनेत ७.२१ टक्के (५५.९९ मिली मीटर) पावसाची नोंद आहे. जिल्ह्यात जोरदार पावसाने हजेरी लावली. शनिवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत जिल्ह्यात ४१.६३ मिली मीटर पाऊस पडला. आतापर्यंत जिल्ह्यात १०६.१८ मिली मीटर पाऊस पडल्याची नोंद आहे. त्यापाठोपाठ जालना जिल्ह्यात आतापर्यंत ७५.८७ पाऊस पडला आहे. त्याखालोखाल लातूर ५१.७७, उस्मानाबाद ४७.२८, बीड ४२.६८, हिंगोली ४०.०८ आणि परभणी जिल्ह्यात ३९.७७ मिलिमीटर पाऊस पडला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अनधिकृत शाळांभोवती फास

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सीबीएसई, राज्य शासनाची मान्यता नसताना शहरात अनेक शाळा सुरू आहेत. या शाळांकडे पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी लक्ष वळविले आहे. आता या शाळाचा तपास गुन्हे शाखा करणार आहे. अशा काही शाळांबाबत शिक्षण विभाग आणि पोलिस आयुक्तांकडे तक्रारही आल्या होत्या. काही दिवसापूर्वी जादा शुल्क आकरणीबाबत एका शाळेच्या पालकांनी पोलिस आयुक्तांकडे दाद मागितली होती. यानंतर शाळेने शुल्कही परत केले. यानंतर आता मान्यता नसलेल्या शाळांकडे आयुक्तांची आता नजर आहे.

राज्यात अनधिकृत शाळांचा प्रश्न कायम चर्चेत जातो. औरंगाबादमध्येही अनेक शाळा सीबीएसईची मान्यता असल्याची बतावणी करतात. काही शाळांना तर राज्य शासनाचीही मान्यता नसल्याचे समोर आले आहे. अशा शाळांवर शिक्षण विभागाकडून कोणतीच कारवाई होत नाही. यामुळेच शाळांना अभय मिळतो आहे. यातीच एका शाळेची तक्रार थेट पोलिस आयुक्तांकडे गऱ्हाणे मांडले. आयुक्तांनी पालक, शाळा, शिक्षणाधिकारी यांची बैठक घेतली. यानंतर शाळेला शुल्क परत करण्याच्या सूचना दिल्या. शाळेने शुल्क परत केल्याचे पालकांनी सांगितले. यानंतर पालक संघटना, मनविसेतर्फे अनधिकृत शाळांबाबतही आयुक्तांचे लक्ष वेधत अशा शाळांवर गुन्हे दाखल करण्यात यावे, अशी मागणी निवेदनाद्वारे केली होती. त्याची दखल घेत अशा शाळांचा तपास आता गुन्हे शाखेकडे देण्यात आला आहे.

शाळांना मान्यता नसल्याचे माहिती अधिकारात स्पष्ट

शहरातीन नामवंत असलेल्या तीन बड्या शाळांना शिक्षण विभागाचीच मान्यता नसल्याचे माहिती अधिकारात समोर आले आहे. वैभव मिटकर यांनी माहिती अधिकारात ही माहिती मागितली होती. यात माळीवाडा परिसरातील, दौलताबाद टी पॉइंट, एमआयडीसी चिकलठाणा परिसरातील या शाळा आहेत. मान्यता नसल्यामुळे त्यांना प्रवेश प्रक्रिया राबविता येत नाही. असेही शिक्षणाधिकारी यांनी स्पष्ट केले होते.

शहरातील काही शाळा सीबीएसई, राज्य शासनाची मान्यता नसतानाही असल्याचे भासवत पालकांची फसवणूक करतात. अशा शाळांबाबत शिक्षणाधिकारी वारंवार तक्रारी केल्या, परंतु ते दखल घेत नाहीत.

-वैभव मिटकर, जिल्हाध्यक्ष, मनविसे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्मशानात राहून मिळवले ९१ टक्के

$
0
0

अतुल कुलकर्णी, बीड

बीड शहरातील बिंदुसरा नदी काठावर बार्शी रोडवर स्मशानभूमी आहे. या स्मशानभूमीत राहून मसनजोगी समाजातील पूजा लक्ष्मण घनसरवाड हिने दहावीच्या परीक्षेत ९१ टक्के गुण मिळवले. पुजाला डॉक्टर व्हायचे असून कुठलीही सोयी-सुविधा नसताना तिने मिळवलेले यश अनेकांना प्रेरणा देणारे आहे.

बीडमधील स्मशानभूमीत राहत असलेल्या विद्यार्थिनीने कुठलीही सोय-सुविधा नसताना परीक्षेत यश मिळवले आहे. मसणजोगी समाज हा भटका समाज म्हणून ओळखला जातो. या समाजातील लक्ष्मण घनसरवाड हे बीडच्या बिंदुसरा नदी काठावर असलेल्या नगरपालिकेच्या स्मशानभूमीत सासऱ्यासोबत देखभालीचे काम करतात. त्यांची मुलगी पूजा ही या वर्षी दहावीला राजश्री शाहू कन्या विद्यालय येथे शिकत होती. घरची गरिबीची परिस्थिती असल्याने तिला दहावीचे पुस्तके विकत घेणे शक्य नव्हते. तिची जिद्द आणि अभ्यासातील हुशारी पाहून तिला शाळेतील शिक्षक शिवाजी जगताप यांनी पुस्तके वह्या घेऊन दिल्या. त्यासोबतच तिची मैत्रीण पूजा सोंडगे व तिच्या कुटुंबियांनी ही मदत केली. तिने ही मदत व्यर्थ न जावू देता दहावीच्या परीक्षेत ९१.२० टक्के घेत शाळेत सातवा क्रमांक आला आहे.

त्यासोबतच स्मशानभूमीत राहून तिने दिवस रात्र अभ्यास केला. स्मशानभूमीत अनेकदा जळणाऱ्या प्रेतांच्या प्रकाशात तिचा अभ्यास सुरू असायचा, असे तिचे वडील लक्ष्मण घनसरवाड सांगतात. आमच्या पिढ्यान-पिढ्या स्मशानभूमीत मृतदेह जाळण्याचा उद्योग उदरनिर्वाहासाठी करत आल्या आहेत. आमच्या पुढच्या पिढीने या स्मशानभूमीतून बाहेर पडावे अशी इच्छा होती. त्यामुळे पुजाला शिकवण्याचे ठरवले आणि तीनही त्याच चीज केले, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली.

दरम्यान, दहावीच्या परीक्षेत पूजाने मिळवलेल्या यशामुळे तिचे सर्वस्तरांतून कौतुक केले जात आहे. या यशात तिच्या शाळेतील शिक्षकांचा मोठा वाटा आहे. स्मशानभूमीत राहून तिने मिळवलेले हे यश इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहे.

डॉक्टर होऊन समाजसेवा करणार

या यशामुळे आनंद झाला आहे. कुठलाही क्लास न लावता शाळेत आणि स्मशानभूमीत बसून अभ्यास केला. आलेल्या अडचणीवर मात केली. या स्मशानभूमीतून कुटूंबाला बाहेर काढायचे असेल तर खूप अभ्यास करून चांगले मार्क मिळवावे लागतील याची जाणीव होती. कुठे राहतो यापेक्षा अभ्यास करून जास्त मार्क मिळविण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवले. खूप अभ्यास केल्याने चांगले मार्क पडले आहेत. मला डॉक्टर होऊन समाजाची सेवा करायची आहे, असे पूजा म्हणाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लग्नातील पाय धुणे, पायघड्या घालणे बंद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, फुलंब्री

तिळवण तेली समाजाने लग्न समारंभात पाय धुणे व पायघड्या टाकण्याची प्रथा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय इतर चालीरितींबद्दलही निर्णय घेण्यात आला आहे. येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गोदामात तिळवण तेली समाजाच्या चिंतन मेळावा सोमवारी (१५ जून) घेण्यात आला. हे आयोजन फुलंब्री शाखेतर्फे करण्यात आले होते. या चिंतन मेळाव्यात विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. त्यामध्ये समाज एकत्रीकरण करणे, समाजाच्या समस्या सर्वासमोर मांडून त्यावर निर्णय घेणे, लग्न कार्यात हुंडा देणे-घेणे यावर निर्बंध, मंगल कार्यात पाय धुणे, पायघड्या टाकणे, कुंकू साखरपुड्यात टोपी उपरण न देणे, लग्नकार्यात साडी किंवा कपड्यांचे आहेर न करणे, लग्न वेळेवर लावणे आदी विषयांवर चर्चा करून एकमताने निर्णय घेण्यात आले.

या मेळाव्यास जे. यु. मिटकर, साहेबराव वाकळे, प्रल्हाद कस्बेकर, अशोक माटेकर, रुचीन चौधरी, पद्माकर गवळी, रतन राउत, योगेश मिसाळ, अंबादास सोनवणे, कचरू वेळेणकर, दादा पंडित, त्र्यंबकराव सोनवणे, उत्तम सोनवणे, बाबू पंडित, उमेश राऊत, विष्णू आढाव यांच्यासह समाजबांधवांची मोठ्या संखेने उपस्थिती होती. तिळवण तेली समाजाच्या मेळाव्यात झालेले हे निर्णय समाज सुधारणेच्या दृष्टीने पुढे टाकलेले पाऊल आहे. या निर्णयांमुळे लग्नातील अनावश्यक खर्च कमी होऊन गरीब कुटुंबाना दिलासा मिळणार आहे. त्याचबरोबर मानपानामुळे होणारी भांडणेही थांबणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शेतकऱ्यांना खरीप अनुदानाची प्रतीक्षा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सिल्लोड

राज्य शासनाने जाहीर केलेली खरीप हंगामासाठीचे अनुदान तालुक्यातील १५ हजार ४६ शेतकऱ्यांना अद्याप मिळालेले नाही. त्यामुळे ऐन पेरणीच्या हंगामात शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत.
महसूल व कृषी विभागाने संयुक्त पंचनामे करून अनुदानासाठी तालुक्यातील ७४,१७९ शेतकऱ्यांना पात्र ठरवले. या शेतकऱ्यांच्या याद्या शासनाला पाठवण्यात आल्या. शासनाने पहिल्या व दुसऱ्या टप्प्यात २७ कोटी १७ लाख ४६, ४०० रुपयांचा निधी तहसील कार्यालयाकडे पाठवला. हा निधी ५९, ११३ शेतकऱ्यांना देण्यात आला आहे. परंतु, अजून १५ हजार ४६ शेतकरी अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत. दुष्काळी अनुदानाची रक्कम पेरणीसाठी उपयोगी येईल, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा होती. परंतु, तहसील, बँकेत खेटे मारूनही रक्कम मिळत नसल्याने पेरणीच्या तोंडावर ते आर्थिक अडचणीत आहेत. सरकारला शेतकऱ्यांशी काहीही देणेघेणे नाही, अशी टीका आमदार अब्दुल सत्तार यांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टँकरच्या संख्येत निम्म्याने घट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या औरंगाबाद जिल्ह्यात पाणीटंचाईमुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र मान्सूनपूर्व व मान्सूनच्या पावसामुळे एका फटक्यात जिल्ह्यातील टँकरची संख्या निम्मी झाली आहे. जिल्ह्यात ८ जून रोजी ५५१ टँकर सुरू होते. एका आठवड्यानंतर सोमवारी (१५ जून) २६८ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

जिल्ह्यातील टँकरसंख्या घटली असली, तरी मराठवाड्यातील इतर जिल्ह्यांत टँकरची संख्या अद्याप जैसे थे आहे. सध्या मराठवाड्यामध्ये सोळाशे टँकर सुरू आहेत. दुष्काळी परिस्थितीमुळे गेल्या आठवड्यामध्ये औरंगाबाद जिल्हयातील ४४१ गावे व १८ वाड्यांमधील साडेसात लाख नागरिकांची तहान टँकरद्वारे पाणी पुरवून भागविण्यात येत होती. मात्र विभागाच्या इतर जिल्ह्यांच्या तुलनेमध्ये औरंगाबाद जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस झाल्यामुळे टँकरची संख्या कमी करण्यात आली आहे. जिल्ह्यामध्ये गेल्या पंधरा दिवसांमध्ये सर्वाधिक ११७.९७ मिलीमिटर पावसाची नोंद करण्यात आली. यामध्ये फुलंब्री, पैठण, खुलताबाद, वैजापूर, कन्नड या तालुक्यांमध्ये एकूण पावसाची आकडेवारी शंभर मिलीमिटर पेक्षा अधिक आहे. सर्वाधिक टँकर सुरू असलेल्या पैठण तालुक्यातही एकूण ६१ मिलीमीटर पाऊस झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रिक्षा बंद; पालकांची धावपळ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पोलिस आयुक्तांनी रिक्षातून फक्त पाच विद्यार्थ्यांची वाहतूक करण्याचे बंधन घातल्याने शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या रिक्षाचालकांनी सोमवारी (१५ मे) बंद पुकारला. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत पोहचवण्यासाठी पालकांची धावपळ उडाली.

शहरात विविध शाळांतील विद्यार्थ्यांची वाहतूक चार हजार रिक्षा आणि सुमारे पाचशे चारचाकी वाहनांतून विद्यार्थ्यांची वाहतूक केली जात असते. रिक्षांतून विद्यार्थ्यांना शेळ्या-मेंढ्यासारखे कोंबले जाते. त्यामुळे अपघाताचा धोका असल्याने फक्त पाच विद्यार्थ्यांनाच रिक्षातून घेऊन जावे, असा निर्णय पोलिस आयुक्तांनी जाहीर केला आहे. या विरोधात विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या रिक्षाचालकांनी तीन दिवसांचा बंद पुकारला आहे. या बंदला पहिल्या दिवशी चांगला प्रतिसाद मिळाला. रिक्षा नसल्याने अनेक पालकांना मुलांना शाळेत सोडण्यासाठी धाव घ्यावी लागली. एकमेकांना मदत करण्यासाठी दुचाकींवर चार ते पाच विद्यार्थ्यांना घेऊन जाणारे पालक दिसले. काही रिक्षाचालकांनी मात्र विद्यार्थ्यांची वाहतूक केली. परंतु, रिक्षाचालकांच्या बंदमुळे पहिल्या दिवशी शाळांतील विद्यार्थी संख्या रोडावली असल्याचे दिसले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गोलवाडी फाट्याजवळ अपघातात दोन ठार

$
0
0

औरंगाबादः नगररोडवरील गोलवाडी फाट्याजवळ तिहेरी अपघातात दोनजण ट्रकखाली चिरडून ठार झाले. हा अपघात सोमवारी (१५ जून) सायंकाळी चार वाजता झाला. याप्रकरणी छावणी पोलिस ठाण्यात मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी ट्रकचाल‌काविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विजय राघुजी खरात (वय ४७, रा. एकतानगर, वाळूज) हा दुचाकीस्वार अन्य एकासह वाळूजकडून औरंगाबादला येत होता. गोलवाडी फाट्याजवळ खरात यांच्या दुचाकीची एका अॅक्टिव्हाला ठोस लागून अपघात झाला. यानंतर खरात यांची दुचाकी समोरून येणाऱ्या ट्रकवर आदळली. या अपघातात ट्रकखाली आल्याने खरात यांचा मृत्यू झाला, तर साथीदार गंभीर जखमी झाला. उपचारादरम्यान जखमीचा मृत्यू झाला असून त्याची ओळख उशीरापर्यंत पटू शकली नाही. अपघातानंतर ट्रकचालक पसार झाला. पोलिसांनी ट्रक ताब्यात घेतला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कोर्टात ‘कॅन्सर’चा चेंडू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत २२ जून रोजी दिल्लीत होणाऱ्या बैठकीत राज्याच्या इतर प्रश्नांसोबत राज्यातील पहिल्याच स्वतंत्र शासकीय कॅन्सर हॉस्पिटलच्या दुसऱ्या युनिटची चर्चा होणार आहे. अर्थातच, बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची हजेरी असणार आहे. या पार्श्वभूमीवर हॉस्पिटलच्या विविध प्रश्न-अडीअडचणींचा मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करणार असल्याचे आमदार इम्तियाज जलील यांनी 'महाराष्ट्र टाइम्स'शी बोलताना सांगितले.

शासकीय कॅन्सर हॉस्पिटलची २१ सप्टेंबर २०१२ रोजी स्थापना झाली. तेव्हापासून हॉस्पिटलमध्ये संपूर्ण मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि लगतच्या राज्यांतून मोठ्या प्रमाणावर कर्करुग्ण उपचारासाठी येत आहेत. त्यामुळेच हॉस्पिटलमधील रेडिएशन, शस्त्रक्रियांसह इतर उपचार घेणाऱ्यांची संख्या लक्षणीय वाढली. मात्र, अपुऱ्या यंत्रणेसह तज्ज्ञ मनुष्यबळाअभावी कर्करुग्णांना तब्बल चार ते सहा महिने प्रतीक्षा करावी लागते. हीच स्थिती गेल्या दीड ते दोन वर्षांपासून कायम असल्यानेच हॉस्पिटलच्या दुसऱ्या स्वतंत्र युनिटची मागणी पुढे आली. या संबंधीचा सुमारे ६५ कोटींचा प्रस्ताव मागच्या वर्षी केंद्र सरकारकडे पाठविण्यात आला आहे. अद्याप त्याविषयी काहीही हालचाल झाली नसली तरी पंतप्रधान मोदींसोबत मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत हा प्रश्न मार्गी लागेल, अशी आशा निर्माण झाली आहे.

काय असेल दुसऱ्या युनिटमध्ये?

कॅन्सर हॉस्पिटलच्या दुसऱ्या युनिटमध्ये रेडिएशन देण्यासाठी उपयुक्त असणारे लिनॅक, ब्रेकेथेरपी, कोबाल्ट, एमआरआय आदी उपकरणांचा समावेश असणार आहे. दुसऱ्या युनिटचा प्रकल्प ६५ कोटींचा असून, यामध्ये विविध उपकरणांसह बांधकाम व विद्युतीकरणाचा समावेश असेल. हा प्रस्ताव मागच्या वर्षी केंद्र सरकारकडे पाठविण्यात आल्याचे हॉस्पिटलचे विशेष कार्य अधिकारी डॉ. अरविंद गायकवाड यांनी सांगितले.

पंतप्रधानांसोबत मुख्यमंत्र्यांची राज्याच्या विविध प्रश्नांसंदर्भात २२ जूनला दिल्लीत उच्चस्तरीय बैठक होणार आहेत. या बैठकीत कॅन्सर हॉस्पिटलच्या दुसऱ्या युनिटचा प्रश्न असणार आहे. या संदर्भात महाराष्ट्र सदनाकडून माहिती मागविण्यात आली होती.

- डॉ. भास्कर खैरे, प्रभारी अधिष्ठाता, घाटी

पंतप्रधान मोदींसोबतच्या बैठकीपूर्वीच कॅन्सर हॉस्पिटलचे विविध प्रश्न मुख्यमंत्र्यांसमोर मांडण्यात येणार आहेत. हे प्रश्न कसे सुटतील, यासाठी पूर्ण प्रयत्न केले जातील. तसेच आवश्यक तो पाठपुरावाही करण्यात येणार आहे.

- इम्तियाज जलील, आमदार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images