Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

पंचवीस शेतकऱ्यांच्या आत्महत्या मदतीस अपात्र

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, उस्मानाबाद

उस्मानबाद जिल्ह्यातील ७१ शेतकऱ्यांनी १ जानेवारी २०१५ ते ५ जुलै २०१५ दरम्यान जिल्ह्यात आत्महत्येद्वारे जीवनयात्रा संपविली. यापैकी ३९ शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना शासकीय मदत मिळाली. २५ शेतकरी कुटुंब हे मदतीस अपात्र ठरले आहेत. तर ७ जणांची प्रकरणे शासकीय मदतीसाठी प्रलंबित आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी दिली.

सततचा दुष्काळ, गारपीट, अवकाळी पाऊस आणि कर्जबाजारीपणाला वैतागून या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. राज्य शासनाने शेतकऱ्यांसाठी पॅकेजची घोषणा केल्यानंतरही जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येचे हे सत्र सुरूच आहे. या आत्महत्येमुळे जिल्ह्यातील दुष्काळीस्थिती भयावह असल्याचे चित्र समोर आले आहे.

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना अर्थ सहाय्य करण्यासाठी सासनाने ठरवून दिलेल्या निकषामध्ये जे प्रकरण बसत नाहीत, अशांचीच प्रकरणे अपात्र ठरविली आहेत. १ जानेवारी २०१५ ते ५ जूलै २०१५ दरम्यान जिल्ह्यात ७१ शेतकऱ्यांनी आत्महत्येद्वारे जीवनयात्रा संपविली. यापैकी ३९ शेतकरी कुटुंबे शासकीय मदतीसाठी पात्र ठरली आहेत. तर २५ कुंटूबे मदतीस अपात्र ठरली. तर ७ जणांची प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबित आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी दिली.

सततचा दुष्काळ, गारपीट, अवकाळी पाऊस आणि कर्जबाजारीपणाला वैतागून या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. राज्य शासनाने शेतकऱ्यासाठी पॅकेजची घोषणा केल्यानंतरही जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येचे हे सत्र सुरूच आहे. या आत्महत्येमुळे जिल्ह्यातील दुष्काळ स्थिती भयावह असल्याचे चित्र समोर आले आहे. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना अर्थसहाय्य करण्यासाठी शासनाने ठरवून दिलेल्या निकषामध्ये जे प्रकरण बसत नाहीत, अशांचीच प्रकरणे अपात्र ठरविली आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


विनयभंगप्रकरणी शिक्षकास अटक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, लातूर

पानगाव (ता. रेणापूर) येथील जिल्हा परिषद शाळेतील अल्पवयीन मुलीसोबत अश्लील चाळे करणाऱ्या शिक्षकाला पोलिसांनी अटक केली. हा प्रकार शनिवारी घडला. व्ही. एस. लोकरे (वय ४१) असे अटक करण्यात आलेल्या शिक्षकाचे नाव आहे. लोकरे हे शाळेतील मुलींसोबत गेल्या अनेक दिवसांपासून अश्लील, विकृत चाळे करीत होते. शिक्षकाच्या या त्रासाला मुली कंटाळल्या होत्या. काही मुलींनी शाळेत होत असलेला प्रकार पालकांना सांगितला. एका पालकाने थेट पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानंतर महिला अधिकाऱ्यांनी स्वत: शाळेला भेट देऊन मुलींशी चर्चा केली. तक्रारीची खातरजमा करून घेतल्यानंतर रेणापूर पोलिस ठाण्यात शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक राजकुमार पुजारी करीत आहेत. गुन्हा दाखल झाल्यानंतर रेणापूर पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी शिक्षक लोकरे यांना ताब्यात घेतले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धन्वंतरी पतसंस्थेविरुद्ध अपहराचा गुन्हा दाखल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, वैजापूर

वीज बीलाच्या ८१ लाख ४४ हजार रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी शहरातील धन्वंतरी महिला नागरी सहकारी पतसंस्थेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी याबाबत कमालीची गुप्तता पाळली असून माहिती देण्यास टाळाटाळ केली जात आहे.

वैजापूर शहरातील धन्वंतरी महिला नागरी सहकारी पतसंस्थेकडे महावितरणच्या उपविभाग क्रमांक एक व दोन मधील वीज ग्राहकांचे वीजेचे बील जमा करण्याचे काम होते. परंतु, या पतसंस्थेने एप्रिल २०१४ ते जून २०१५ या कालावधीत ग्राहकाडून जमा झालेले वीज बीलाचे ८१ लाख ४४ हजार रुपये महावितरणकडे जमा केले नाहीत. ही बाब महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर मुंबई येथील अधिकाऱ्यांनी वैजापूर व औरंगाबाद येथे येऊन चौकशी केली. त्यावेळी वैजापूर येथील धन्वंतरी महिला नागरी सहकारी पतसंस्थेने महावितरणच्या खात्यात ब‌िलाची रक्कम भरलीच नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे त्यांनी त्वरित पोलिस ठाणे गाठून पतसंस्थेविरुद्ध रितसर तक्रार दिली. मात्र, पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली.

अखेर, याप्रकरणी महावितरणचे उपकार्यकारी अभियंता हयात खान यांच्या फिर्यादीवरुन गुरुवारी रात्री याप्रकरणी पोलिसांनी पतसंस्थेच्या पदाधिकाऱ्यांविरुद्ध अपहाराचा गुन्हा दाखल केला. याप्रकरणाचा पुढील तपास फौजदार श्रीनिवास भिकाणे करीत आहेत. गुन्हा दाखल होऊनही पोलिसांकडून माहिती देण्यास का टाळाटाळ केली जात होती. या प्रकाराची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इसापूर धरणाचे पाणी कॅनॉलमध्ये सोडावे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नांदेड

गेल्या २० दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने जवळपास सर्वच शेतकऱ्यांची पिके वाळू लागली आहेत. ही परिस्थिती पाहता तातडीने इसापूर धरणाचे पाणी कॅनॉलमध्ये सोडण्यात यावे यासाठी आमदार आष्टीकर व मुंदडा यांनी उर्ध्व पैनगंगा प्रकल्प विभागाच्या अधिकाऱ्यांची (११ जुलै) रोजी बैठक घेतली. याबाबत त्यांनी पाणी सोडण्याच्या सूचना केल्या.

इसापूर धरणाच्या पाण्यावर वसमत, हदगाव - हिमायतनगर तालुक्यातील शेतकऱ्यांचे भवितव्य अवलंबून आहे. या वर्षी जून महिन्याच्या सुरुवातीला पावसाने हजेरी लावली. त्यानंतर शेवटच्या आठवड्यापासून पावसाने आजवर उघडीप दिली. परिणामी उन्हाची तीव्रता वाढली असून, पावसाळ्यात उन्हाळा सदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरलेली पिके उगवली, परंतु, पावसाभावी वाळू लागली आहेत. पाणी असलेले शेतकरी स्प्रिंकलरच्या माध्यमातून पाणी देऊन व कोरडवाहू शेतकरी भांड्याने पाणी टाकून पिकांना जागविण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहेत. परंतु, अल्प प्रमाणात झालेल्या पावसाने नदी, नाले पूर्णतः कोरडे पडल्याने पाणी मिळणे सुद्धा दुरापास्त झाले आहे. त्यामुळे जनावरांच्या पाण्या बरोबर मानवांना पुन्हा पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे बळीराजावर दुबार पेरणीचे संकट उद्भवण्याची शक्यता बळावली आहे.

ही बाब लक्षात घेता पिकांना यावर अवलंबून असलेल्यांना पाणी उपलब्ध व्हावे यासाठी हदगाव-हिमायतनगर तालुक्याचे आमदार नागेश पाटील आष्टीकर आणि वसमतचे आमदार जयप्रकाश मुंदडा यांनी नांदेड येथील ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्प विभाग क्रमांक १ (सिंचन) चे कार्यकारी अभियंता मेश्राम व कर्मचाऱ्यांची शनिवारी बैठक घेतली. त्यासोबतच परिस्थितीची जाणीव करून देत तातडीने कॅनॉलमध्ये पाणी सोडण्याठी संबंधित वरिष्ठांना प्रस्ताव सदर करून पाठपुरावा करा अश्या सूचना केल्या आहेत. यावेळी ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्प विभाग क्रमांक १ चे अभियंता मेश्राम, बाबुराव कदम कोहालीकार, गोपाल सारडा उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘राकाज्’वर होणार कायदेशीर कारवाई

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

हायकोर्टाच्या आदेशानुसार शनिवारी महापालिकेने 'राकाज् लाइफ स्टाइल' क्लबचे सील उघडले. या कार्यवाहीचा पंचनामाही करण्यात आला. दरम्यान, क्लबचे सील उघडले असले तरी आयुक्तांच्या अधिकारात या क्लबवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

'राकाज् लाइफ स्टाइल' क्लबमध्ये हुक्का पार्लर सुरू असल्याची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी कारवाई केली. त्यानंतर महापौर त्र्यंबक तुपे, उपमहापौर प्रमोद राठोड, आयुक्त प्रकाश महाजन यांनी क्लबची पाहणी केली. तेथे पोहण्याच्या तलावाशिवाय करारात नसलेले अनेक उपक्रम सुरू असल्याचे लक्षात आले. त्यामुळे आयुक्तांनी क्लबला सील ठोकण्याचे आदेश दिले. क्लबला सील ठोकण्याच्या कारवाईच्या विरोधात 'राकाज्'ने कोर्टात धाव घेतली आणि कोर्टाच्या आदेशानुसार आज पालिकेचे बीओटी कक्षप्रमुख सिकंदर अली यांनी दुपारी दीडच्या सुमारास पंचनामा करून क्लबचे सील उघडले. 'क्लबला केलेले सील उघडून महापालिकेने मुंबई प्रांतिक महापालिका अधिनियम १९४९च्या कलम ३७८नुसार क्लबवर कायदेशीर कारवाई करावी,' असेही कोर्टाने म्हटले होते. यासंदर्भात 'मटा'ने सिकंदर अली यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, 'कोर्टाच्या आदेशानुसार क्लबचे सील उघडण्यात आले आहे. सील उघडले असले तरी क्लबवर कायदेशीर कारवाई केली जाणारच आहे. कराराचा भंग झाला आहे का, क्लबमध्ये अतिरिक्त जागेचा विनापरवाना वापर करण्यात आला आहे का, याची शहानिशा करून येत्या काळात कारवाई होईल. करार रद्द होण्याची कारवाईही आयुक्तांच्या स्तरावर होऊ शकते. मुंबई प्रांतिक महापालिका कायद्यानुसार आयुक्तांना कारवाई करण्याचे कायदेशीर अधिकार आहेत.'

बंद कारमध्ये चर्चा

क्लबचे सील उघडण्यासाठी सिकंदर अली क्लबच्या परिसरात आले. त्याच वेळी सुनील राकाही त्या ठिकाणी आले. सिकंदर अली आणि राका यांनी सुमारे अर्धातास बंद कारमध्ये चर्चा केली. त्याबाबत उपस्थितांमध्ये चर्चा होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मतदार यादीबाबत ‘परिवर्तन’ आक्रमक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मराठवाडा साहित्य परिषद निवडणुकीच्या मतदार यादीत परस्पर फेरफार करण्यात आले आहेत. २३ मतदारांचा पत्ता बदलला आहे. त्यामुळे निवडणूक अधिकाऱ्यांच्या निःपक्षपातीपणावरच प्रश्नचिन्ह निर्माण होते, अशी भूमिका परिवर्तनवादी आघाडीचे प्रमुख डॉ. वासुदेव मुलाटे यांनी मांडली. याबाबत शनिवारी निवडणूक अधिकारी डॉ. चंद्रदेव कवडे यांना आघाडीच्या उमेदवारांनी निवेदन दिले.

मराठवाडा साहित्य परिषदेच्या निवडणुकीतील गैरप्रकारांबाबत परिवर्तनवादी आघाडीने आक्षेप नोंदविला आहे. निवडणूक अधिकारी डॉ. कवडे यांना डॉ. वासुदेव मुलाटे यांनी फेरबदल व अनियमितता यांची दखल घेण्याबाबत निवेदन दिले. अंतिम मतदार यादीच्या आधारावर मतदारांना आघाडीने माहितीपत्रके आणि आवाहने पाठवली, मात्र साडेतीनशे मतदारांना पाठवलेली पाकिटे परत आली आहेत. मतदारांचा पत्ता चूक असल्यामुळे हा प्रकार घडला. अंतिम यादीत मतदारांसमोर चुकीचे पत्ते लिहिल्याचे स्पष्ट होते, असे मुलाटे यांनी म्हटले आहे. २३ मतदारांचे पत्ते परस्पर बदलले आणि १३ मतदारांची नावे दोनदा आली असून, या मतदारांना अधिक मतपत्रिका पाठवली असण्याची शक्यता आहे. काही मतदारांची नावे आणि पत्ता यात तफावत आहे. पदाधिकाऱ्यांचे नातेवाईक असलेल्या मृत मतदारांची नावे जाणीवपूर्वक यादीत ठेवली असल्याचा आक्षेपही परिवर्तनवादीने घेतला आहे. दरम्यान, दोन जून रोजी अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात आली. या यादीपेक्षा वेगळी यादी निर्वाचन अधिकारी वापरतात. मतदार, उमेदवार आणि निवडणूक प्रक्रियेची ही दिशाभूल आहे, असे निवेदनात म्हटले आहे. या निवेदनावर श्रीकांत उमरीकर, डॉ. सतीश खुल्लोडकर, डॉ. सर्जेराव ठोंबरे, प्रा. जयदेव डोळे, प्रा. अविनाश डोळस, प्रा. रावसाहेब ढवळे, प्रा. विद्या पाटील यांच्यासह सर्व उमेदवारांची नावे आहेत.

बंदोबस्ताची मागणी

मराठवाडा साहित्य परिषदेची निवडणूक सुरक्षित पार पाडणे आव्हानात्मक आहे. कार्यालयात शुक्रवारी झालेल्या गोंधळाची पोलिसांना माहिती दिली असून, बंदोबस्ताची मागणी करणार असल्याचे निवडणूक अधिकारी डॉ. चंद्रदेव कवडे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

२४ टक्के शाळांमध्ये किचन शेडच नाही!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शालेय पोषण आहार योजनेसाठी प्रत्येक शाळेत किचन शेड, स्टोअर रूम आवश्यक आहे, मात्र राज्यात २४ टक्के किचन शेड हे कागदावरच आहेत. अनेक ठिकाणी पोषण आहाराचा दर्जाही सुमार आहे. याबाबत चिंता व्यक्त करून शाळांनी तातडीने शेड उभारावे, विद्यार्थ्यांना दर्जेदार अन्न द्यावे, अशा सूचना शालेय पोषण आहार योजनील आढावा बैठकीत देण्यात आली.

शालेय पोषण आहार योजनेबाबत केंद्रीय पातळीवरील विभागीय बैठक औरंगाबादमध्ये शनिवारपासून सुरू झाली आहे. या बैठकीला राज्याचे शालेय शिक्षण विभागाचे मुख्य सचिव नंदकुमार, एमएचआरडीचे सहसचिव जे. आलम, शालेय पोषण आहार विभागाचे गयाप्रसाद शर्मा, उपसचिव शिवाणी, संचालक महावीर माने यांची प्रमुख उपस्थिती होती. बैठकीत महाराष्ट्रसह गुजरात, मध्य प्रदेश, दीव-दमण, दादरा नगर हवेली, छत्तीसगड, गोवा या राज्यांतील योजनेचा आढावा घेण्यात आला.

योजनेसाठी शाळांमध्ये किचन शेड तयार करण्यात राज्य अद्याप उदासिन असल्याचे मुद्दा समोर आला. महाराष्ट्रातही चित्र वेगळे नसून २४ टक्के शाळांमध्ये किचन शेड पूर्ण नाहीत. त्याचबरोबर निधी वितरण, दर्जायाबाबतही चर्चा करण्यात आली. यावेळी गयाप्रसाद शर्मा म्हणाले, 'योजनेतून विद्यार्थ्यांना चांगले आणि सकस आहार देण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे. किचन शेड उभारून आहारातील धान्य चांगल्या दर्जाचे असावे. स्वच्छतेकडे कटाक्षाने लक्ष द्यावे.'उपसचिव जे. आलम म्हणाले, 'योजनेत काही राज्यांनी केलेले बदल चांगले आहेत. ते इतर राज्यांनी आत्मसात करून राबविले पाहिजेत.' निधीचा विनियोग, योजनेतील खर्चाचा आढावा त्यांनी घेतला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उद्योजकांच्या साथीने चौकांचे सुशोभिकरण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहरातील रस्त्यांची स्थिती आणि त्यांचे सौंदर्य यांचा बाहेरून येणाऱ्या नागरिकांवर प्रभाव पडत असतो. त्यामुळेच, शहरातील प्रमुख दहा चौकांच्या सुशोभिकरणासाठी विकासकांनी पुढाकार घेतला आहे. विशेष म्हणजे या विकासकांना चौकांची देखभाल दुरूस्ती आणि सुशोभिकरणास देण्याची तयारी महापालिकेनेही दाखविली आहे. यामध्ये एक चौक पाच वर्षांसाठी एका विकासकाला दत्तक दिला जाणार आहे.

शहरातील रस्ते आणि चौकांच्या सुशोभीकरणासाठी महापौर त्र्यंबक तुपे यांनी पुढाकार घेतला, त्यांना उपमहापौर प्रमोद राठोड यांनी सहकार्य केले. चौकांच्या देखभाल-दुरूस्ती आणि सुशोभिकरणासाठी महापालिकेकडे पैसा नाही. त्यामुळे विकासकांच्या किंवा व्यावसायिकांच्या मदतीने महापालिकेच्या प्रशासनाने चौकांचे सुशोभिकरण करावे, अशी सूचना या पदाधिकाऱ्यांनी केली. त्यानुसार महापालिकेच्या आवाहनानुसार, दहा चौकांच्या सुशोभिकरणासाठी काही विकासकांनी पुढाकार घेतला. या विकासकांना पाच वर्षांसाठी हे चौक दत्तक देण्याची पालिकेची योजना आहे. शंभर रुपयांच्या बाँड पेपरवर आवश्यक तो करारनामा तयार करून चौक विकासकांच्या ताब्यात दिले जाणार आहेत. चौकाचे सुशोभीकरण केल्याबद्दल विकासकाला चौकाच्या क्षेत्रात केवळ स्वतःच्या संस्थेचे, कंपनीचे नाव ठळकपणे लावता येणार आहे. चौक-वाहतूक बेटांसाठी लागणारे पाणी व विजेच्या खर्चाची जबाबदारी त्या-त्या विकासकावर असेल. चौक सुशोभिकरणाच्या फाइलवर कार्यकारी अभियंता, शहर अभियंता यांच्या स्वाक्षऱ्या झाल्या आहेत. आयुक्तांची स्वाक्षरी झाल्यावर करार करून चौक दत्तक दिले जाणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


औरंगाबाद-हैदराबाद विमान २६ जुलैपासून

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

औरंगाबादहून हैदराबादला जाणारे पहिले विमान २६ जुलै रोजी उड्डाण घेणार आहे. या विमानसेवेमुळे तिरुपती बालाजीच्या दर्शनाला जाणाऱ्या, तसेच शिर्डीला साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची सोय होणार आहे. तसेच दक्षिण भारतातील काही शहरांशी मराठवाडा विभाग जोडला जाणार आहे.

औरंगाबाद-हैदराबाद विमान सेवा सुरू करण्याची अनेक वर्षांची मागणी होत होती. टर्बो मेगा एअरवेज कंपनीने १२ जुलैपासून विमानसेवेचा विस्तार करण्याची घोषणा केली होती. औरंगाबाद-हैदराबाद हे विमान २६ जुलैला पहिले उड्डाण घेईल. या विमानात ७२ प्रवासी बसण्याची सुविधा आहे. हैदराबाहून दुपारी १२ वाजून ५० मिनिटांनी हे विमान औरंगाबाद विमानतळावर लँड होईल. त्यानंतर १ वाजून १५ मिनिटांनी हे विमान हैदराबादला रवाना होणार आहे, अशी माहिती टर्बो मेगा एअरवेजच्या सूत्रांनी विमानतळ प्राधिकरणाला दिली आहे.

बुकिंग लवकरच

औरंगाबाद-हैदराबाद विमान सेवा सुरू होणार हे स्पष्ट झाले असले, तरी या विमानाचे आरक्षण कसे राहणार याची घोषणा करण्यात आलेली नाही. काही दिवसात बुकिंगचे चित्र स्पष्ट होईल. या सेवेचे तिकीट दर कमीत कमी ठेवण्यात येणार असल्याने तिकिटाची किंमत अंतिम करण्यात आलेली नाही. मात्र, औरंगाबाद, हुबळी व मंगळुरू या मार्गासाठी कमीत कमी दर १४९९ रुपये राहणार असण्याची शक्यता कंपनीच्या सूत्रांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भूजल पातळीत लक्षणीय घट

$
0
0

मोतीचंद बेदमुथा, उस्मानाबाद

उस्मानाबाद जिल्ह्यावर होणारी वरूण राजाची अवकृपा, अत्यल्प पाऊस, दुष्काळ, अवर्षणस्थिती व पाण्याचा होणारा बेसुमार उपसा यामुळे उस्मानाबाद जिल्ह्यात भूजल पातळीत (भूगर्भातील जलपातळीत) प्रचंड घट झाली आहे. जिल्ह्यातील ७३७ पैकी १०५ गावांवर निर्जळीचे संकट ओढावले आहे. त्यामुळे प्रशासनाकडून ही गावे 'रेड झोन' म्हणून घोषित करण्यात आली आहेत.

उस्मानबाद जिल्ह्यातील ७३७ पैकी १०५ गावातील सद्याची पाण्याची स्थिती भयावह असून ही गावे 'निर्जल' झाल्यातच जमा आहेत. याशिवाय येथील पाण्यात 'प्लोराईड' आढळत असल्याने नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे ही गावे जिल्हा प्रशासनाने 'रेड झोन' म्हणून घोषित केली असून, तसा प्रस्तावही शासनाकडे सादर केला आहे. या रेड झोन यादीत प्रामुख्याने उस्मानाबाद व कळंब तालुक्यातील गावांचा समावेश आहे. या १०५ गावातील नागरिकांना पाण्यासाठी टँकरवर अवलंबून रहाण्याची पाळी आली आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात गेल्या तीन-चार वर्षांपासून दुष्काळाच्या कचाट्यात सापडलेला आहे. जिल्ह्याची सरासरीच्या निम्माही पाऊस होत नाही अशी या जिल्ह्याची स्थिती झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील जलसाठ्यात वाढ होण्याऐवजी दिवसेंदिवस घट होत चालली आहे. जिल्ह्यातील बहुतांश प्रकल्प कोरडे पडले आहेत. विंधन विहिरींना ७०० फुट खोलवरही मुबलक पाणी लागेनासे झाले आहे. विंधन विहीरी, कुपनलिका व विहरीचे पाणी गायब झाले आहे. 'आडात नाही तर पोहऱ्यात कोठून येणार' अशी स्थिती निर्माण झाली आहे.

भूजल सर्वेक्षण विभागाकडून करण्यात आलेल्या मोजमापानुसार जिल्ह्यातील भूजल पातळीही २०१० मध्ये ९.८४ मीटरने घटली होती. ती आता दिवसंदिवस घटत जाऊन २०१५ च्या भरपावसाळ्यात ११.५० मीटरने घटली आहे.

जिल्ह्यात सध्या भर पावसाळ्यातही १०० गावे व एक वाडी येथे १४९ टँकरद्वारे पाणी पुरवठा चालू आहे. तर पाणी पुरवण्यासाठी म्हणून ८२४ विंधन विहिरीचे अधिग्रहण करण्यात आले आहे. अधिग्रहण करण्यात आलेल्या विहीर व कुपनलिकेचे पाणीही सध्या आटले असून, पाणी पुरवठ्यासाठी प्रशासनाला अन्य पर्याय शोधावे लागत आहेत.

जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या प्रकल्पात मिळून केवळ २.५ टक्के इतकाच उपयुक्त जलसाठा शिल्लक आहे. जिल्ह्यातील भूगर्भातील पाणी पातळीत होत असलेली सततची घट पाहता शेतकऱ्यांनी पाण्याचा होणारा बेसुमार उपसा थांबविणे गरजेचे आहे. जलशिवार योजनेच्या माध्यमातून जलसाठे वाढविण्यावर लक्ष देणे गरजेचे आहे. याशिवाय पिकपेरा पद्धतीत बदल करणे गरजेचे आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी अल्प पाण्यावर येणारी पिके घेणे अपेक्षित आहे. यंदाच्या वर्षी जिल्ह्यातील उस बागायतदार शेतकऱ्यांनी पाण्याची स्थिती लक्षात घेवून सुमारे २० हजार हेक्टरवर उसाची लागवड केली नसल्याचेही प्रशासनाकडून सांगण्यात आले असून, याचे अनुकरण अन्य शेतकऱ्यांनी करणे गरजेचे आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यात यावर्षी समाधानकारक पाऊस नसल्यास पाणी पातळी आणखीन खोलवर जाईल. त्यामुळे पाण्याचा वापर काटकसरीने करणे गरजेचे आहे. प्रशासन टँकरची व्यवस्था करेल. परंतु, पाणी कोठून आणायचे असाही प्रश्न शासनापुढे उभा राहील बेसुमार पाणी उपसाच उस्मानाबादला वाळवंट होण्यापासून वाचवू शकेल.

- डॉ. प्रशांत नारनवरे, जिल्हाधिकारी,उस्मानाबाद

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फेरभरण न केल्यास गंभीर परिणाम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

बोअर घेण्याच्या स्पर्धेमुळे भूगर्भातील पाणी कमी होऊ लागले आहे. पाण्याचे फेरभरण न केल्यास आपल्याला येत्या काळात मोठी किंमत मोजावी लागेल, असा इशारा देवगिरी महाविद्यालयाच्या भूशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. अशोक तेजनकर यांनी दिला.

देवगिरी महाविद्यालयाच्या सभागृहात 'महाराष्ट्र टाइम्स'तर्फे 'रेन वॉटर हार्वेस्टिंग' या विषयावर सेमिनारचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. त्यांनी रेन वॉटर हार्वेस्टिंगबाबत स्लाइट शो दाखविला. प्रा. डॉ. तेजनकर म्हणाले, 'प्रत्येक जबाबदारी सरकारवर टाकून चालणार नाही. पाण्यासंदर्भात असा विचार फार महत्त्वाचा आहे. पाण्याचे नियोजन न केल्यास टंचाईला सामोरे जावे लागते. आपल्याकडे ५५० ते ६०० मिलीमीटर पाऊस पडतो. त्या पाण्याचे नियोजन करणे गरजेचे आहे. पाण्याची मागणी वाढली आणि उपलब्धता कमी झाली आहे. औरंगाबादमधील ३० टक्के नागरिक भूजलाचा वापर करतात. त्यामुळे घरोघरी बोअर दिसतात. औरंगाबादचा ७० टक्के भूस्तर फेरभरणासाठी योग्य आहे, पण गेल्या ४० वर्षांपासून भूगर्भातील पाण्याचा उपसाच सुरू आहे. फेरभरण मात्र त्या प्रमाणात केले जात नाही. त्याची मोठी किंमत येत्या काळात मोजावी लागणार आहे.'

सातारा परिसरात एका कुटुंबाचा एका महिन्याचा पाण्याचा खर्च अडीच ते तीन हजार रुपये आहे. वेतनातील सुमारे २५ ते ३० टक्के रक्कम पाण्यावर पाण्यावर खर्च करावी लागते. एवढे मोठे पाण्याचे संकट औरंगाबादवर आले आहे याचे भान आपण ठेवले पाहिजे. पाण्याचे संकट टाळण्यासाठी रेन वॉटर हार्वेस्टिंग आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले.

दोन हजार चौरस फुटांचे घर असल्यास १ लाख ४० हजार लिटर पाणी आपण जिरवू शकतो. एक हजार चौरस फुटांचे घर असेल तर ७० ते ८० हजार लिटर पाणी आपण जिरवू शकतो, हे पाणी तीन-चार महिने पुरू शकते. पाणी वाहून जाणार नाही याची काळजी घ्या, घराच्या बाजूला मोकळ्या जागेवर पाणी साठवा, साठवलेले पाणी जमिनीमध्ये मुरते त्यातून भूगर्भातील पाण्याची पातळी वाढण्यास मदत होते असे डॉ. तेजनकर यांनी स्पष्ट केले. भाषणानंतर उपस्थितांनी विविध प्रश्न विचारले. 'मटा'चे सिनीअर असिस्टंट एडिटर प्रमोद माने यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.

महापालिकेच्या हद्दीत १४६ विहिरी

महापालिकेच्या हद्दीत १४६ विहिरी आहेत. त्यापैकी ९० विहिरींना चांगले पाणी आहे. फक्त २६ विहिरींचेच पाणी पिण्यासाठी वापरले जाते. ७५ विहिरींचे पाणी शेती, उद्यानांना वापरले जाते. ५१ विहिरींचा वापर कचरा टाकण्यासाठी केला जातो. चांगल्या असलेल्या विहिरींतील गाळ उपसल्यास एका विहिरीतून दिवसाला दीड लाख लिटर पाणी मिळेल, असे डॉ. अशोक तेजनकर यांनी सांगितले.

रेन वॉटर हार्वेस्टिंगची पद्धत

५ बाय ५ बाय ५ फूट आकाराचा खड्डा करा. त्याच्या तळाला मोठे दगड टाका, त्यावर गिट्टीचा थर, त्यानंतर वाळूचा थर द्या. प्लबंरच्या मदतीने फिल्टर बसवून घ्या. या सर्व कामासाठी पाच ते दहा हजार रुपये खर्च अपेक्षित आहे.

पालिकेने पुढाकार घ्यावा

जलसाक्षरतेसाठी महापालिकेने पुढाकार घेतला पाहिजे. महापालिका शहरामध्ये जलसाक्षरतेसंदर्भात वर्षातून तीन-चार कार्यक्रम होऊ शकतील. औरंगाबाद शहर बशीच्या आकाराचे आहे. पाच ते सात लाख लोकांना पुरेल एवढे पाणी आपण साठवू शकतो. महापालिकेने त्याचा विचार करून कृतीकार्यक्रम राबवला पाहिजे, असे प्रा. डॉ. अशोक तेजनकर यांनी सांगितले.

सामाजिक भान ठेवून पाण्यासंदर्भात विचार करावा लागणार आहे. रेन वॉटर हार्वेस्टिंगबाबत 'मटा'ने घेतलेल्या कार्यक्रमाप्रमाणे कार्यक्रम विविध ठिकाणी झाले पाहिजेत. त्यातून जनजागृती होईल व लोकांना पाण्याचे महत्त्व लक्षात येईल.

- संदीप मोरे

भूगर्भातील पाणी पातळी कमी होत आहे, ही चिंतेची बाब आहे. पाणी पातळी वाढली पाहिजे, त्यासाठी महापालिकेने पुढाकार घ्यावा. पाणी वापराचे नियोजन करण्याची वेळ आता आली आहे.

- अविनाश बाचनवार

आजच्या कार्यक्रमातून प्रेरणा मिळाली. रेन वॉटर हार्वेस्टिंगचा प्रयोग आम्ही आदिनाथनगरमध्ये करू. वाया जाणारे पाणी आडवू शकतो हे या कार्यक्रमातून लक्षात आले. अशा उपक्रमात नागरिकांनी पुढाकार घेतला पाहीजे.

- स्वाती कुलकर्णी

रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या संदर्भात 'मटा'ने सेमिनार घेऊन आम्हाला मार्गदर्शन केले. अशाच प्रकारचे कार्यक्रम ग्रामीण भागात व्हावेत, शिबिरांचे आयोजन झाले तर, त्याचा नागरिकांना अधिक लाभ होईल.

- स्वप्नील चौधरी

पाण्याचे महत्त्व आणि रेन वॉटर हार्वेस्टिंग याची पूर्ण माहिती या कार्यक्रमातून मिळाली. भूगर्भातील पाण्याची पातळी वाढवण्यासाठी मुळात आपलीच मानसिकता निर्माण झाली पाहिजे. पाणी साठवण्यासाठी आपण काय करतो हे महत्त्वाचे आहे.

- शालिनी बुंदे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोषण आहारावर आता नियंत्रण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शालेय पोषण आहार योजनेतील गैरप्रकार रोखण्यासाठी आणि थेट देखरेखीसाठी 'इंटरअॅक्टिव्ह व्हॉइस रिस्पाॅन्स सिस्टिम' (आयव्हीआरएस) वापरण्यात येणार आहे. या सिस्टिमच्या माध्यमातून शाळेत खिचडी शिजली की नाही, किती विद्यार्थ्यांनी खिचडीचा स्वाद घेतला, यांवर थेट देखरेख ठेवणे शक्य होणार आहे.

विशेष म्हणजे प्रत्येक शाळेचा अहवाल रोज वेबसाइटवर उपलब्ध करून दिला जाणार आहे. केंद्र शासनातर्फे शालेय पोषण आहार योजना राबविण्यात येते. या योजनेत गैरप्रकार केले जातात. त्याचबरोबर काही त्रुटीही आढळतात.

शालेय पोषण आहाराचा थेट लाभ प्रत्येक विद्यार्थ्याला घेता यावा, यातील त्रुटी दूर व्हाव्यात आणि थेट देखरेख ठेवता यावी यासाठी केंद्रशासनातर्फे ही योजना 'इंरअॅक्टिव्ह व्हॉइस रिस्पाॅन्स सिस्टिम'शी जोडण्यात येणार आहे. त्यात मागणी नोंदविण्यापासून ते मालाच्या नोंदी घेणे, हिशेब ठेवणे आदींचा आढावा रोज घेणे शक्य होणार आहे.

अशी असेल सिस्टिम...

'इंरअॅक्टिव्ह व्हॉइस रिस्पाॅन्स सिस्टिम'मध्ये प्रत्येक शाळेला किती विद्यार्थी उपस्थित होते, खिचडी शिजविली की नाही, नसल्यास कारण काय, विद्यार्थ्यांनी योजनेतून आहार घेतला का, किती विद्यार्थ्यांनी घेतला, आदी नोंदी रोज मोबाइलवर एसएमएसद्वारे कळवाव्या लागतील. हा डेटा राज्यवार विभागणी करून थेट वेबसाइटवर उपलब्ध केला जाईल. त्यासाठी प्रत्येक शाळेतील एका शिक्षकाकडे ही जबाबदारी असेल. त्यांची नावे कळविण्याबाबत शिक्षणाधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत.

पोषण आहार योजनेत पारदर्शकता आणण्यासाठी केंद्र स्तरावरून प्रयत्न केले जात आहेत. आयसीटीच्या माध्यमातून देखरेख ठेवण्यावर आमचा भर आहे. थेट देखरेख शक्य होईल.

- गयाप्रसाद शर्मा, केंद्रीय मुख्य सचिव, शालेय पोषण आहार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मराठवाडा दुष्काळाच्या छायेत

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद

गेल्या तीन आठवड्यांपासून पावसाने पाठ फिरविल्यामुळे मराठवाड्यावरील दुष्काळाचे संकट गहिरे झाले आहे. येत्या आठवड्यात ही दडी कायम राहिल्यास खरिपाच्या पिकासाठी शेतकऱ्यांनी केलेली अब्जावधीची गुंतवणूक धोक्यात येणार आहे. कापूस, सोयाबीन, कडधान्ये या प्रमुख पिकांसह भाजी-पाला आणि मोठी गुंतवणूक असलेले अद्रकाचे पीकही धोक्यात आहे. या परिस्थितीत मराठवाड्याची संपूर्ण अर्थव्यवस्था धोक्यात आली आहे.

मराठवाड्यात यावर्षी मृग नक्षत्राच्या मुहूर्तावर पावसाला सुरुवात झाली. जूनच्या पहिल्या पंधरवाड्यात पडलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना खरिपाच्या पेरण्या करणे शक्य झाले. २० जूनपर्यंत मराठवाड्यात १०४.२ मिमी पाऊस पडला होता. हे प्रमाण १०७ टक्के आणि वार्षिक सरासरीनुसार १३.४ टक्के होते. त्यानंतर पावसने दडी मारली. तीन आठवड्यात विभागात केवळ १९.२ मिलिमीटर पाऊस झाला.

गेल्या तीन वर्षांपासून दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या मराठवाड्यात यावर्षी पावसाचे दमदार आगमन शेतकऱ्यांना सुखावणारे होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी जूनमध्ये पेरण्यांची कामे उरकली. त्यानंतर मोठी तूट झाल्याने खरिपासाठी करण्यात आलेली अब्जावधी रुपयांची गुंतवणूक धोक्यात आली आहे.

मराठवाड्यात येत्या पाच दिवसांत तुरळक स्वरुपाच्या पावसाचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) व्यक्त केला आहे. औरंगाबाद परिसरात येत्या दीड महिन्यात मोठ्या पावसाची चिन्हे नसल्याचे अंदाज 'अॅक्युवेदर वेबसाइट'ने म्हटले आहे. पावसाअभावी गहू, डाळी, हरभरा, शेंगदाणे यांच्या दरात तीन ते पाच टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे, अशी माहिती किराणा व्यापारी लक्ष्मीकांत दरख यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोषी अधिकाऱ्यांना सहआरोपी करा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी,जालना

जालन्यात घडलेल्या बलात्कार प्रकरणाचा सर्वस्तरातून तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे. पोलिसांच्या निष्काळजीपणामुळे पीडित मुलीला दुसऱ्यांदा अत्याचाराला सामोरे जावे लागले. त्यामुळे याप्रकरणात दोषी असलेल्या पोलिस अधिकाऱ्यानांही सहआरोपी करा अशा संतप्त प्रतिक्रया सामाजीक क्षेत्रात कार्य करणाऱ्या महिलांनी 'मटा'शी बोलताना व्यक्त केल्या.

अल्पवयीन मुलीचे संरक्षण करण्यात पोलिस सपशेल अपयशी ठरले आहेत. महिलेचे शील हीच तिची सर्वात मोठी संपत्ती आहे. त्यामुळे जालन्यात घडलेल्या या घटनेमुळे येथील पोलिसांवरचा विश्वास उडाला आहे. महिलांना स्वरक्षणार्थ शस्त्र परवाने देण्यात यावे, अशी संतप्त प्रतिक्रिया मानवी हक्क अभियानच्या राज्य सचिव अॅड. कल्पना त्रिभुवन यांनी व्यक्त केली.

विविध पक्षाच्या पुढाऱ्यांनी या घटनेबद्दल मात्र, मौन बाळगले आहे. सर्वच पक्षांच्या पुढाऱ्यांनी महिलांच्या प्रश्नाबाबत संवेदनशील होऊन एकत्र आले पाहिजे. त्यामुळे प्रशासनावर त्यांचे वचक निर्माण होईल आणि अश्या प्रकारच्या घटनांना आळा बसेल. जिल्ह्यातील नेतेमंडळींनी महिलांच्या प्रश्नाशी काहीच देणे-घेणे नसल्यासारखे वागत आहेत. ही मोठी शोकांतिका आहे. पुढाऱ्यांनी महिलांच्या प्रश्नाची दखल घेतली नाही, तर आगामी निवडणुकीत महिला मतदार देखील त्यांची दखल घेणार नाही, असे मत राष्ट्रमाता इंदिरा गांधी महाविद्यालयाच्या प्राचर्या डॉ. सुनंदा तिडके यांनी व्यक्त केले.

याबाबत बोलताना प्रसिद्ध लेखिका रेखा बैजल म्हणाल्या,' ही घटना अतिशय घृणास्पद आहे. पहिल्यांदा घटना घडली त्यावेळेसच जर पोलिसांनी तात्काळ कठोर कारवाई केली असती तर पुढील अनर्थ टळला असता. ज्या प्रकारे एखाद्या वाघाची शिकार करायची असेल तर त्याला शेळीचा बळी दिला जातो. तश्याच प्रकारे पोलिसांनी या नराधमांना पकडण्यासाठी पीडित मुलीचा बळी दिला. हा प्रकार किळसवाणा असून पोलिसांच्या मानवी संवेदना हरवल्याचे यावरून दिसून येते.'

आरोपींना भर चौकात फाशी द्या

जालन्यातील ही घटना संतपाजनक आहे. कोर्टात वर्षानुवर्षे खटले प्रलंबित राहतात. फास्ट ट्रॅक कोर्टाचा पण म्हणावा तसा फायदा होत नाही. आजपर्यंत एकाही ब्लात्काऱ्याला कठोर अशी शिक्षा झालेली नाही. त्यामुळे त्याला कायद्याची भीतिच वाटत नाही. अशा घटनेतील दोषींना भर चौकात फाशी दिली पाहिजे. त्यामुळे यापुढे कोणी अशी हिम्मत करणार नाही. पोलिस महानिरीक्षकांनी या प्रकरणाची गंभीरतेने दखल घेतलेली आहे. या घटनेमुळे पीडित मुलीला मोठा धक्का बसलेला आहे. त्यामुळे तिला समाजाने नैतिक आधार देण्याची गरज असल्याची प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्त्या अनया अग्रवाल यांनी व्यक्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एकनाथ कारखान्याच्या कामगारांचा संप सुरूच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पैठण

पगारावरून संत एकनाथचे कामगार व सचिन घायाळ कंपनीमध्ये आरोप-प्रत्यारोपाचे सत्र सुरूच असून रविवारी सातव्या दिवशीही कामगार व कंपनीमध्ये कोणताही तोडगा न निघाल्याने कामगारांचा संप सुरूच होता. दोन महिन्याचे पगार न मिळाल्याने सोमवारपासून संत एकनाथ साखर कारखान्याच्या कामगारांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे.

कामगाराच्या म्हणण्यानुसार सचिन घायाळ कंपनीने कामगारांचा दोन महिन्याचा पगार थकवला आहे. तर दुसरीकडे सचिन घायाळ कंपनीनुसार कामगारांचा केवळ जून महिन्याचा पगार थकित असून १५ जुलैपर्यंत आम्ही कामगारांचे पगार देणार आहोत. मात्र, गेल्या एक वर्षाच्या कालावधीत आम्ही कारखान्यात कामगारांमध्ये शिस्त आणण्याचा व कारखान्यात सुरू असलेले गैरकारभार पूर्णपणे बंद केला आहे. त्यामुळे कारखान्यातील काही कामचुकार कामगार व कामगार संघटनांचे काही नेते हेतुपुरस्सरपणे कामगारांना हाताशी धरून आम्हाला वेठीस धरण्याचा प्रयत्न करत असल्याचे कंपनीप्रमुख सचिन घायाळ यांनी सांगितले.

यापूर्वी, कामगारांचे पन्नास ते साठ महिन्यांचे पगार थकले तेव्हा व काही कामगारांनी कंपनीमधील भंगार विकला तेव्हा या कामगारांनी संप केला नाही असा सवालही घायाळ यांनी उपस्थित केला. कारखान्याचा करार पूर्ण होताच आम्हाला कारखान्यातील मोलासीस विकण्याची परवानगी मिळेल व आम्ही कारखान्यातील एकही कामगाराचे पगार थकवणार नसल्याचेही त्यांनी सांगितले. सचिन घायाळ कंपनीने अठरा वर्षांसाठी भागीदारी तत्वावर कारखाना चालविण्यासाठी घेतला आहे. पहिल्याच वर्षी पगार थकवून व कार्माचाऱ्यांना अश्याप्रकारे वागणूक दिल्यास कारखाना कसा चालेल असा प्रश्न कामगार नेते सुभाष आढाव यांनी उपस्थित केला. दरम्यान, संपाच्या सातव्या दिवशी कामगार व सचिन घायाळ यांच्यात कोणतीच बोलणी न झाल्याने सातव्या दिवशीही संत एकनाथ सहकारी कारखाना बंद होता.

कारखान्याच्या स्थानेपासून आजपर्यंत कारखाना आहे त्याच परिस्थितीत आहे. मला या कारखान्यात नवनवीन सुधारणा करून कामगार, शेतकरी व तालुक्याचा विकास करायचा आहे. कामगारांनी कोणाच्याही भूलथापेला बळी न पडता कामावर रुजू व्हावे.

- सचिन घायाळ, कंपनीप्रमुख

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


ड्रायपोर्टमुळे चित्र बदलणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, जालना

ड्रायपोर्ट हा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय व्यापार आणि उद्योगजगतेचा राजमार्ग होणारा महाप्रकल्प आहे. त्यामुळे जालन्याचे चित्र संपूर्ण बदलून जाईल असे मत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष तथा उद्योगपती राम भोगले यांनी व्यक्त केले.

जालन्यात देवगिरी नागरी सहकारी बँकेच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या 'ड्रायपोर्ट : व्यवसाय संधी' या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. जालन्यात ड्रायपोर्ट हा प्रकल्प म्हणजे पोर्ट ऑफ चेंज या शब्दांत भोगले यांनी त्यांच्या भाषणाचा प्रारंभ केला. समुद्र मार्गे वाहतुकीची बंदरांची व्यवस्था असल्यानेच तीन शहरे, मुंबई, चेन्नई आणि कोलकत्ता ही विकसित झाली. ज्या ठिकाणाहून व्यापार, उद्योग प्रारंभ होतो. त्या परिसरात उद्योगाच्या सर्व संधी निर्माण होतात. ड्रायपोर्ट हा एक आपल्या देशात शिरण्याचा आणि बाहेर जाण्याचा दरवाजा आहे. त्यातूनच आपला माल देशाबाहेर पाठवणे आणि परदेशातून आयात करणे सहजपणे शक्य होईल, असे त्यांनी सांगितले.

भोगले म्हणाले, 'दिल्ली नोयडा औद्योगिक वसाहतीतील बाराशे किलोमीटर अंतरावरील कंटेनर रेल्वेच्या मालवाहतूकीतून जेएनपीटीमध्ये केवळ बारा हजार रुपयात येतो. आज जालन्यातील स्थानिक कंटेनर जेएनपीटीमध्ये रोडवरुन पाठवण्यास तीस हजार रुपये लागतात. जालन्यात ड्रायपोर्टमार्फत ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट या प्रमाणात मोठ्यारितीने कमी होईल. जालना ते जेएनपीटी असा सरळ केवळ मालवाहतूकीसाठी थेट रेल्वे ट्रॅक उभारण्यात येणार आहे. प्रत्येक महिन्याला जालन्याहून किमान तीन हजार आणि औरंगाबादहून चार हजार प्रत्येकी वीस टनाचे कंटेनरची हमखास वाहतूक निश्चितच आहे.'

इंडस्ट्रीअल पार्टमध्ये प्रोसेसिंग युनिट, आयात निर्यात करणारे मोठ्या प्रमाणावर व्यवसाय निर्माण होतील. अद्यावत विदेशी तंत्रज्ञान स्वदेशी करून स्वीकारण्याची आणि गुंतवणूक करण्याची येथील उद्योगपतींची क्षमता प्रचंड आहे. त्यामुळे ड्रायपोर्टचा सर्वोच्च फायदा जालनेकरांना मिळणार आहे. अंतरराष्ट्रीयस्तरावर संबंध निर्माण झाले की फिनिश गुडसची आयात व बाहेरून कच्चा माल आणून येथे जोडणीचे मोठे उद्योग सुरू होतील, असे भोगले म्हणाले.

ड्रायपोर्टच्या उभारणीनंतर औरंगाबाद-जालना हे एक जुळे शहर होईल असे डॉ. बद्रीनारायन बारवाले म्हणाले. रितेश मिश्रा यांनी ड्रायपोर्ट प्रकल्पाची माहिती दिली. समीर अग्रवाल यांनी मनोगत व्यक्त केले. संयोजक देवगिरी बॅकचे उपाध्यक्ष सुनील रायठ्ठठा यांनी प्रस्ताविक स्वागत केले. शाखाधिकारी विजय कुलकर्णी यांनी आभार मानले. याप्रसंगी पंडीत घुगे, जयंत अभ्यंकर, संभाजीराव मुळे, आशिष गर्दे आदी मान्यवर उपस्थित होते.

निर्यातीसाठी मोठी संधी

मोसंबी, डाळींब, अंजिर, सीताफळ, चिकू या फळे, भाजीपाला यांची प्रोसेसिंग युनिट उभारून त्याच्या निर्यातीची मोठी संधी उपलब्ध होणार आहे. मात्र, निर्यातक्षम दर्जा सांभाळण्याचे प्रशिक्षण शेतकऱ्यांना इंडस्ट्रीजने दिले पाहिजे. औरंगाबाद येथे एअर कारगो उभारण्यात येणार आहे. त्यामुळे या दोन्ही ठिकाणाहून या मालांची निर्यात आणि आयात सहज शक्य होईल, असेही भोगले यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

झेडपीच्या अनास्थेमुळे तीन दिंड्यांना एक टँकर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

आषाढी वारीसाठी जिल्ह्यातून जाणाऱ्या दिंड्यांना जिल्हा परिषदेतर्फे यावर्षी तीन दिंड्यांना मिळून एक टँकर देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्ह्यातील दिंड्यांना दरवर्षीप्रमाणे टँकर देण्याकडे पदाधिकाऱ्यांचेही दुर्लक्ष झाल्याने वारकऱ्यांचे हाल होणार आहेत.

जिल्ह्यातीन आषाढी वारीसाठी जिल्ह्यातून यावर्षी १९ दिंड्या पंढरपूरला मार्गस्थ झाल्या आहेत. जिल्हा परिषदेच्या उपकरातून दिंड्यांना वैद्यकीय सुविधा व पाणी पुरविले जाते. ही प्रक्रिया दरवर्षीची असल्याने आरोग्य व पाणीपुरवठा विभागातून पाच लाख रुपयांची तरतूद केली जाते. ही रक्कम कमी पडत असल्याने आरोग्य विभागाने ठेवलेला दहा लाख रुपयांचा प्रस्ताव २४ जूनच्या सभेत मंजूर झाला नाही. त्यातच तीन लाखांपेक्षा अधिकची रक्कम असलेले प्रस्ताव ई-टेंडरिंग पद्धतीने मंजूर करण्याचे आदेश दिले असल्याने प्रक्रिया मंजुरीसाठी वीस दिवस लागतात. जिल्हा परिषदेच्या ढिसाळ कारभारामुळे हे प्रस्ताव १० दिवसांपूर्वी आले.

यातून मार्ग काढण्यासाठी आरटीओकडून गाड्यांचे दर मागवून त्यानुसार गाड्या निश्चित केल्या. पण तरतूद फक्त पाच लाख रुपयांचीच असल्याने १९ टँकर देणे शक्य नसल्याने तीन दिंड्यांमागे एक टँकर, असे सूत्र निश्चित केले आहे. दरम्यान, शिक्षण सभापती विनोद तांबे यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी वस्तुस्थिती माहीत नसल्याचे सांगितले. योग्य निर्णय घेण्यासाठी आग्रह धरला जाईल, असे त्यांनी सांगितले.

वाकी येथील दिंडीला मिळाले नाही पाणी

जिल्ह्यातील दिंड्यांचा मार्ग वेगवेगळा असून त्यांच्यापर्यंत पाण्याचे टँकर कसे पोहोचणार असा प्रश्न आहे. कन्नड तालुक्यातील वाकी येथून निघालेली दिंडी शनिवारी सायंकाळी खुलताबादला पोहोचली. तिला टँकरचे पाणी मिळाले नाही. इतर दिंड्यांचाही हाच अनुभव आहे. जिल्हा परिषद पदाधिकारी व अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे हा प्रकार पहिल्यांदाच घडत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिल्लोड तालुक्यातील १७ खडी केंद्रांना सील

$
0
0

म. टा. प्रतनिधी, सिल्लोड

जिल्हाधिकारी वीरेंद्र सिंह यांच्या आदेशानुसार तहसील प्रशासनाने सिल्लोड तालुक्यातील विविध १७ खडी केंद्र व खदानींना तालुका प्रशासनाने सील लावले आहे. महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या परवानगीशिवाय खडी केंद्र व खदानी सुरू करू नयेत, असे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश आहेत.

महसूल प्रशासनाने अब्दुल गफार, शेख शकील (मंगरूळ), अशोक चव्हाण (लिहाखेडी), अनिसखाँ पठाण, वंदना राकडे, पंढरीनाथ राकडे (कासोद),सिंधुबाई चौधरी, भागाबाई दुधे, अमोल पाटील (रजाळवाडी),राजेंद्र बोधेकर (डोंगरगाव),अभय वाघ, शेख रिझवान (पालोद),अनिल राठोड (पळशी),गंगाधर शेजुळ (बाळापूर व तळणी),शेख जावेद (केऱ्हाळा),विष्णू जांभूळकर (वडाळा) यांच्या खडी केंद्रांना सील लावण्यात आले आहे.

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने अचानक झालेल्या या कारवाईमुळे खडी केंद्र चालकांचे धाबे दणाणले आहे. गौणखनिजाची थकबाकी असून नियम भंग करून डोंगर खोदले जात आहेत. त्यामुळे ही कारवाई करण्यात आली.

ही कारवाई प्रशिक्षणार्थी तहसीलदार डॉ. संतोष डोईफोडे, मंडळ अधिकारी कमल मनोहरे, मारुती धोंडकर, तलाठी रवींद्र कुलकर्णी, ललित पाटील, अभिजीत शर्मा, अप्पासाहेब गोराडे, सूरज गिरी यांच्या पथकाने केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कामगारांचे घराचे स्वप्न भंगणार?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, वाळूज

सिडकोची कोणतीही परवानगी न घेता वडगाव कोल्हाटी ग्रामपंचायत हद्दीत टाकण्यात आलेले ११७ लेआऊट व त्यातील ४,८४३ प्लॉटच्या नोंदी बेकायदेशीर ठरवण्यात आल्या आहेत. विभागीय आयुक्तांनी हा निर्णय घेऊन सरपंच छाया कारले यांचे पद रद्द केले असून तत्कालीन तीन ग्रामसेवकांच्या बडतर्फीचे आदेश दिले आहेत. या निर्णयामुळे प्लॉट खरेदी केलेल्यांच्या पोटात गोळा उठला आहे.

वडगाव कोल्हाटीच्या सरपंच छाया कारले यांनी स्वतःच्या अधिकाराचा गैरवापर करून ग्रामपंचायत हद्दीत नोटरी, एन-४५ असलेल्या मिळकतींची ग्रामपंचायतीच्या नमुना नंबर ८ मध्ये नोंद घेतल्याची तक्रार जिल्हा परिषद सदस्य अनिल चोरडिया यांनी पंचायत समितीकडे केली होती. या प्रकरणात ग्रामपंचायतीने कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा आरोप करीत त्यांनी जिल्हा परिषद सर्वसाधारण सभा व स्थायी समितीत चौकशीची मागणी केली होती. यावर विभागीय आयुक्त डॉ. दांगट यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या चौकशीत ११७ लेआऊटमध्ये तब्बल ४,८४३ प्लॉटची नोंद नमुना नंबर ८ मध्ये घेण्यात आल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान, वाळूज एमआयडीसीत रोंजदारीवर काम करणार्या कामगारांनी घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी हे प्लॉट खरेदी केले आहेत. ग्रामपंचायतीमधील नोंदी बेकायदा ठरल्याने प्लॉटधारकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. प्लॉटधारकांनी संबंधित प्लॉटिंग मालकास सर्व रक्कम दिली आहे. नमुना नंबर ८ मध्ये नोंद होत असल्याने अनेकांही हे व्यवहार केले होते. दरम्यान, जिल्हा परिषद सदस्य अनिल चोरडिया यांनी जिल्हा परिषद व सिडकोने पुढाकार घेऊन प्लॉट कायम करावेत, अशी मागणी केली आहे.

सरपंचपद रद्द

वडगाव कोल्हाटी ग्रामपंचायतीत नमुना ८ वर नोंदी घेताना सिडको प्रशासनाची परवनागी घेतली नसल्याचे उघड झाले. या नोंदी बेकायदेशीर ठरवून सरपंच छाया कारले यांचे पद काढून घेणे, तत्कालीन ग्रामसेवक जी. पी. धनवई, एम. बी. ढाकणे व एस. बी. शेवंते यांच्यावर शिस्तभंग केल्याप्रकरणी कारवाईची आदेश देण्यात आले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गंडवण्याचा प्रयत्न फसला

$
0
0

म.टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महाराष्ट्र बँकेची बनावट कागदपत्रे तयार करून एका सिमेंट व्यापाऱ्याला गंडा घालण्याचा तरुणाचा प्रयत्न फसला. बँकेने दिलेल्या तक्रारीवरून या संशयित आरोपीविरूद्ध मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सिडको एन-३ येथील महाराष्ट्र बँकेच्या शाखेचे सतिशचंद्र शर्मा यांनी या प्रकरणी तक्रार दिली आहे. अभिजित धारूरकर (रा. अल्हाद अपार्टमेंट, ज्योतीनगर) याने महाराष्ट्र बँकचे बनावट शिक्के, सही व कागदपत्रे तयार केली. ही कागदपत्रे त्याने ‌एका सिमेंटच्या व्यापाऱ्याला दाखवत आपल्याला लोन मंजूर झाले असून सिमेंटचा माल देण्याची गळ घातली. मात्र, व्यापाऱ्याला संशय आल्याने यासबंधी त्यांनी बँकेला माहिती दिली. बँकेने खातरजमा केली असता ही कागदपत्रे बनावट असल्याचे उघड झाले. या प्रकरणी संशयित आरोपी अभिजित धारूरकर याच्याविरुद्ध फसवणूक, बनावट कागदपत्रे तयार करणे आदी कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तरुणाची आत्महत्या

हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करणाऱ्या तरुणाने गळफास घेत आत्महत्या केल्याचा प्रकार टीव्ही सेंटर भागात रविवारी सकाळी उघडकीस आला. या प्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. गणेश मारुती खरात (वय २२ रा. मूळ कावडगाव) हा गेल्या ‌आठ दिवसापासून टीव्ही सेंटर भागातील एका हॉटेलमध्ये कामाला होता. हॉटेल मालकाने दिलेल्या खोलीमध्ये तो मित्रासोबत रहात होता. रविवारी रात्री त्याने स्कार्फने छताला गळफास घेत आत्महत्या केली. रविवारी सकाळी हा प्रकार उघड झाला. त्याच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नसून आर्थिक संकटामुळे त्याने आत्महत्या केली असल्याची शक्यता सिडको पोलिसांनी व्यक्त केली. गणेशचा मृतदेह गावाकडे अंत्यसंस्कारासाठी नेण्याकरीता देखील त्याच्या कुटुंबियांकडे पैसे नव्हते. काही पोलिस कर्मचाऱ्यांनी या कामी पुढाकार घेत त्यांना मदत केली.

जयभवानीनगरात चारचाकी वाहन जाळले

माथेफिरुने जयभवानीनगरात एक चारचाकी वाहन जाळले. शनिवारी पहाटे ही उघडकीस आली. दोन महिन्यापूर्वी याच भागात एकाच दिवशी आठ वाहने जाळण्यात आली होती. त्याप्रकरणी एका टोळीला अटक करून त्यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. बांधकाम कंत्राटदार शिवनाथ किसन पातकळ जयभवानीनगरात गल्ली नंबर चारमध्ये आपल्या कुंटुंबासह राहतात. त्यांच्याकडे काही बिगारी लोक कामाला असल्याने त्यांची रोज ने आण करण्यासाठी त्यांनी टाटा जीप (एमएच-२३ -४३८०) घेतलेली आ हे. दरम्यान, घरासमोर पार्क केलेली ही जीप अज्ञात माथेफिरुने पेटवून दिल्याचे मध्यरात्री कळाले. हा प्रकार लक्षात येताच फिर्यादीने आग विझविण्याचा प्रयत्न केला. तसेच मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात घटनेची माहिती दिली. याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून आरोपीचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images