Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

महावितरणच्या पथकाने पकडले १४ वीज चोर

$
0
0

औरंगाबाद : महावितरण कंपनीच्या शेंदूरवादा येथील पथकाने गुरूवारी गंगापूर तालुक्यात वीज चोरीविरुद्ध मोहीम राबविली. या मोहिमेत चौदा आकडे बहाद्दर पथकाच्या जाळ्यात सापडले. त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली.

या विशेष मोहिमेत कोंडापूर, झांजर्डी, तांदूळवाडी आदी ठिकाणी छापे टाकण्यात आले. यामध्ये घरगुती वापरासाठी वीज चोरी करणाऱ्या बारा जणांना, तर कृषीपंपासाठी आकडा टाकून वीज चोरी करणाऱ्या दोघांना पकडण्यात आले. या घरगुती वापरासाठी विज चोरणाऱ्या मध्ये गोविंदबापू सोनवणे, सखाराम गावंडे, लक्ष्मण राऊत, अंकुश राऊत, भाऊराव वीर, जग्गनाथ राऊत, रावसाहेब खंडागळे, शेख मुश्ताक शेख फत्तू, नंदू खंडागळे, हरीभाऊ खाजेकर, कडुबा खंडागळे, बाळासाहेब खंडागळे यांचा समावेश आहे. तसेच कृषीपंपासाठी वीजचोरी करणाऱ्यामध्ये रुपचंद बाबुराव विधाते व सुरेश कल्याण विधाते यांचा समावेश आहे. यापैकी रूपचंद विधाते यांनी त्यांच्या दंडाची साडेसात हजार रुपयांची रक्कम त्वरित जमा केली. भारतीय विद्युत कायद्यानुसार दंड आकारण्यात येणार असून दंड भरला नाही, तर गुन्हे दाखल करण्यात येणार आहे. एकूण ३४ हजार ६९० रुपयाची वीजचोरी करण्यात आली आहे. त्यापोटी दंडासह ३७ हजार रुपये वसूल करण्यात येणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


चार्लींमुळे गुन्ह्यांना चाप

$
0
0

म.टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांच्या संकल्पनेतून तयार करण्यात आलेल्या चार्ली पथकाच्या सतर्कतेने होऊ घातलेले तीन संभाव्य गुन्हे टळले आहेत. दुचाकीचोरांसह चार अल्पवयीनांच्या पाकिटमार टोळीला ताब्यात घेण्यात यश आले आहे. चार्ली पथकातील कर्मचाऱ्यांना रोख साडेचौदा हजार रुपयांचे पारितोषिक देऊन एका कार्यक्रमात गौरविण्यात आले.

घटना पहिली - २८ जून : शहरातून स्कुटी (एमएच २३ आर २८९३) चोरीस गेल्याची घटना घडली होती. क्रांतिचौक हद्दीतील चार्ली क्रमांक चार व पाचच्या पथकाने या स्कुटीचा शोध सुरू केला. क्रांतिचौक उड्डाणपुलाखाली चोरट्यांनी ही दुचाकी सोडून पलायन केले होते. ती ताब्यात घेऊन क्रांतिचौक पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आली.

घटना दुसरी - ५ जुलै : चार्ली क्रमांक ३२ चे कर्मचारी कॅनाॅट प्लेस भागात गस्त घालीत होते. यावेळी विनाक्रमांकाच्या स्कूटीवर दोन तरुण संशयास्पद जाताना दिसून आले. चौकशी केली तेव्हा ही दुचाकी चोरीची असल्याचे‌ निष्पन्न झाले. संशयित आरोपी मोहमद सईद मोमीन व सय्यद हमीद सय्यद हबीब या दोघांना ताब्यात घेत चार्ली पथकाने सिडको पोलिसांच्या ताब्यात दिले.

घटना तिसरी - १३ जुलै : शहागंज परिसरात चार्ली क्रमांक ३ व ४ चे पथक गस्त घालत होते. यावेळी बारा ते पंधरा वयोगटातील चार मुली गर्दीमध्ये पर्स चोरी करण्यासाठी संशयास्पदरित्या फिरताना त्यांना आढळून आल्या. त्यांना ताब्यात घेत सिटीचौक पोलिस ठाण्यातील मुस्कान पथकाच्या स्वाधीन करण्यात आले होते.

या तिन्ही घटनांमध्ये चार्ली पथकाचे कर्मचारी, के. जी. पाटील, आर. एस. शिंदे, कुंदन आवारे, वाय. डी. गोबाडे, महिला कर्मचारी आर. एस. पवार, एस. पी. मुरकुटे, ए. एस. खटे, एच.ए. पठाण, जे. व्ही. काकडे तसेच ए. व्ही. पवार यांनी उल्लेखनीय काम‌गिरी बजावली. त्यांच्या कामाबद्दल पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी त्यांचा रोख साडेचौदा हजार रुपये देऊन सत्कार केला. यावेळी पोलिस उपायुक्त वसंत परदेशी, संदीप आटोळे, एसीपी बाबाराव मुसळे, पोलिस निरीक्षक अविनाश आघाव यांची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मंगळसूत्र चोरांच्या टोळी मोक्का कोठडीत

$
0
0

औरंगाबाद : मंगळसूत्र हिसकावणाऱ्या टोळीने संघटित गुन्हेगारी केल्यामुळे त्यांच्यावर मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात आली. त्या टोळीला मोक्काचे प्रभारी न्यायाधीश यू. एल. तेलगावकर यांच्यासमोर हजर करण्यात आले असता, त्यांना २७ जुलैपर्यंत कोठडीचे आदेश सोमवारी दिले.

ज्योतीनगर येथील मंगलाबाई लक्ष्मणराव देशमुख यांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून पळ काढणाऱ्या टोळीचा म्होरक्या शेख इमरानला गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले होते. त्या पथकाने शेख इमरान उर्फ सुलतान यांची चौकशी केली असता, त्याने सादातनगरचा शेख शहेजाद शेख शमीम, विजय नगरातील शेख जावेद शेख मकसुद उर्फ टिपू, गारखेड्यातील शेख इरफान शेख लाला यांच्यासोबत मंगळसूत्र हिसकावण्याबरोबर अन्य गुन्ह्यांची कबुली दिली. या टोळीविरुद्ध शहरातील विविध पोलिस ठाण्यांत खुनाचा प्रयत्न, खून, लुटमार करणे, दरोडा टाकणे यासारखे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. टोळीला हर्सूल कारागृहातून ताब्यात घेण्यात आले असून, त्यांना सोमवारी मोक्काचे प्रभारी न्यायाधिश यू. एल. तेलगावकर यांच्यासमोर हजर करण्यात आले असता, मोक्काचे विशेष लोकअभियोक्ता राजेंद्र मुगदिया यांनी, टोळीने गंभीर स्वरुपाचे गुन्हे केले असून, संघटित गुन्हे केल्यामुळे त्या पैशातून मालमत्ता घेतली आहे का, याची चौकशी करायची आहे, त्यांच्या बँक खात्याची तपासणी करावायची आहे, मंगळसूत्र हिसकविल्यानंतर ते कोणाला विक्री केले, त्यातून मिळालेल्या पैशाची कुठे विल्हेवाट लावली, याचा तपास करायचा असल्याने पोलिस कोठडी द्यावी, अशी मागणी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दीड लाखाचा ऐवज पंधरा मिनिटांत लंपास

$
0
0

म.टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

एन-४ भागात चोरट्यांनी दिवसाढवळ्या घरफोडी करूत दीड लाखांचा ऐवज लंपास केला. सोमवारी दुपारी सव्वाबारा ते साडेबारा वाजेच्या दरम्यान हा प्रकार घडला. याप्रकरणी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संदीप श्रीराम जाधव (वय ३८ रा. चैतन्य अपार्टमेंट, सेक्टर क्रमांक २३-२४, एन-४, सिडको) हे खाजगी कंपनीमध्ये नोकरीला आहेत. जाधव यांची पत्नी शेंद्रा येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षिका आहे. सोमवारी सकाळी दोघे पतीपत्नी नोकरीसाठी घराबाहेर पडले होते. त्यांची दोन लहान मुले शाळेत गेली होती. तर त्यांची आई एकटीच घरी होती. दुपारी सव्वाबारा वाजता त्यांच्या आई मुलांना शाळेतून आणण्यासाठी घराला कुलूप लावून बाहेर पडल्या. अवघ्या पंधरा मिनिटांत त्या घरी परतल्या. या दरम्यान चोरट्यानी त्यांच्या घराचे कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश केला. कपाटातील सोन्याचे दागिने चोरून चोरटा लंपास झाला. जाधव यांच्या आई घरी परतल्यानंतर हा प्रकार लक्षात आला. चोरट्यांनी या घटनेत गंठण, लॉकेट, दोन मंगळसूत्र, सोनसाखळी, कानातले व अंगठ्या आदी ऐवज चोरून नेला. याप्रकरणी संदीप जाधव यांच्या तक्रारीवरून पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पाळत ठेवून कृत्य

चोरट्यांना जाधव यांच्या कुंटुबातील सदस्यांबाबत माहिती असल्याशी शंका पोलिसांना आहे. सव्वाबारा वाजता जाधव यांच्या आई घराबाहेर पडताच काही मिनीटात चोरट्यांनी घर फोडले. यावरून पाळत ठेवून हे कृत्य केल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. या अनुषंगाने पोलिसांचा तपास सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गृह खरेदीसाठी आले सुगीचे दिवस

$
0
0

धनंजय कुलकर्णी, औरंगाबाद

शहर परिसरात सुमारे १५० हून अधिक गृहप्रकल्प सुरू आहेत. यात सुमारे १,५०० हून अधिक घरे असून, हा काळ सध्या गृह खरेदीसाठी अनुकूल असल्याचे मानले जात आहे. या वर्षअखेरपर्यंत ८०० कुटुंब स्वतःच्या घरात राहायला जातील, असा अंदाज आहे.

रिअल इस्टेट मध्ये सध्या तेजी नाही आणि मंदीही नाही. बिल्डरांच्या दृष्टीने सध्या यथातथाच असणारा काळ ग्राहकांसाठी अनुकूल आहे. सध्या वन, टू बीएचके घरांमध्ये गुंतवणूक करण्याकडेही कल वाढला आहे. विभागलेली कुटुंबे आणि टू बीएचकेच्या प्रचंड वाढलेल्या किमतींमुळे वन बीएचकेला मागणी वाढत आहे. आता शहरातही वन बीएचके उपलब्ध होत आहेत. त्याचे प्रमाण जवळपास २० टक्के आहे. मात्र, जास्तीत जास्त बिल्डरांनी उपनगरात वन बीएचकेचा पर्याय ठेवला आहे. शहरात मात्र टू आणि थ्री बीएचके बांधकामच अधिक होत असल्याचे क्रेडाईचे सचिव विकास चौधरी यांनी सांगितले. शहरात २००५ पर्यंत वन रूम किचन फ्लॅट बांधले जात. मात्र, त्यानंतर अशा फ्लॅटना मागणी कमी होती व ती कमीकमी होत आहे. सध्या लॅव्हिश टू-‌बीएचके घरांकडे उच्च मध्यमवर्गीय व मध्यमवर्गीयांचा कल आहे. तर वन बीएचकेकडे निम्न मध्यमवर्गीयांचा कल आहे. औरंगाबाद उपनगरात सुरू असलेल्या गृहप्रकल्पातील निम्मी बुकिंग संपली आहे. या भागात स्वस्तात घरे मिळण्याचा पर्याय उपलब्ध आहे.

शहराच्या बाहेर विविध

भागात १५० हून अधिक गृहप्रकल्प सुरू आहेत. यात हजारो घरे उपलब्ध होतील. यात वन-टू बीएचके घरांना अधिक मागणी आहे. नव्या घराची स्वप्ने पाहू इच्छिणारे व गुंतवणूक करू इच्छिणारे या दोघांसाठी हा काळ अनुकूल आहे.

- विकास चौधरी, सचिव, क्रेडाई औरंगाबाद

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोहायला गेलेल्या तरुणाचा मृत्यू

$
0
0

औरंगाबाद : टाऊन हॉल परिसरात तलावामध्ये पोहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा गाळात अडकल्याने मृत्यू झाला. मंगळवारी दुपारी तीन वाजता हा प्रकार घडला. आकाश विठ्ठल पगारे (वय २२ रा. जयभीमनगर, टाऊन हॉल) हा तरुण मंगळवारी दुपारी घरापासून काही अंतरावर असलेल्या छोट्या तलावामध्ये पोहण्यासाठी गेला होता. यावेळी पोहत असताना तो गाळात अडकला. त्याचा आरडाओरडा ऐकून नागरिकांनी तलावाच्या दिशेने धाव घेतली, मात्र तोपर्यंत आकाश पाण्यात बुडाला होता. त्याला घाटी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उद्योगांना पाणीकपातीचा फटका

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

जायकवाडी धरणात पाणीसाठा घटत चालल्याने जिल्हा प्रशासनाने गेल्या सोमवारपासून पाणीपुरवठ्यात दहा टक्के कपात जाहीर केली आहे. याचा फटका बिअर निर्मिती करणाऱ्या उद्योगांना मोठ्या प्रमाणावर बसला आहे. लवकर पाऊस पडला नाही तर आणखी पाणीकपात होण्याची शक्यता आहे. सध्याच्या कपातीमुळे उत्पादनात घट होण्याचीही शक्यता आहे.

औरंगाबाद जिल्ह्यात यंदा पावसाने दडी मारली आहे. जायकवाडी धरणाच्या वरच्या बाजूला नाशिक व नगरमध्येही पाऊस नाही. परिणामी धरणातील पाणीसाठा घटला आहे. परिस्थिती दिवसेंदिवस चिंताजनक होत असल्याचे पाहून जिल्हाधिकारी वीरेंद्र सिंह यांनी नागरी आणि औद्योगिक पाणीपुरवठ्यात दहा टक्के कपात केली. उद्योगांची पाणीकपात झाल्याने बिअर उत्पादित करणाऱ्या कंपन्यांना सर्वाधिक फटका बसला आहे. वाळूज, चिकलठाणा आणि शेंद्रा औद्योगिक वसाहतीमध्ये पाणी कच्चा माल म्हणून लागणारे नऊ उद्योग आहेत. या उद्योगांना दररोज पाच एमएलडी पाणी लागते. त्यात दहा टक्के कपात झाल्याने साहजिकच उत्पादनावर विपरित परिणाम होणार आहे. दोन वर्षांपूर्वी अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. त्यावेळी २० टक्क्यांपर्यंत कपात करावी लागली होती. मात्र, तो काळ मे महिन्याचा होता. आता भर पावसाळ्यात ही परिस्थिती निर्माण झाल्याने उद्योगांची अडचण वाढली आहे. पुढच्या दोन आठवड्यात समाधानकारक पाऊस झाला नाही तर आणखी कपात होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

पाण्यावर अवलंबून असलेले उद्योग

वाळूज - मिलेनिअम, स्कोल ब्रेव्हरिज, फोस्टर, इंडो युरोपियन, औरंगाबाद ब्रेव्हरिज, कार्ल बर्ग्ज

चिकलठाणा व शेंद्रा - बीडीए, महाराष्ट्र डिस्टलरीज, अवनी इंडस्ट्रिज.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एमबीएच्या १५ हजार जागा रिक्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

एमबीए आणि एमएमएस अभ्यासक्रमासाठीची प्रवेशाची अंतिम फेरी मंगळवारपासून (२१ जुलै) सुरू झाली. नामांकित कॉलेजामध्ये प्रवेशाचा कट ऑफ वाढला असला तरी रिक्त जागांचा आकडा पंधरा हजरांपेक्षा अधिक आहे. बुधवारी प्रवेशाचा शेवटचा दिवस अाहे. पहिल्या दिवशी सायंकाळपर्यंत ७५९ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले.

इंजिनीअरिंग, पॉलिटेक्निक अभ्यासक्रमांच्या रांगेत आता व्यवस्थापनशास्त्र अभ्यासक्रमांच्या कॉलेजांचाही क्रमांक लागला आहे. एमबीए आणि एमएमएस अभ्यासक्रमाची समुपदेशन फेरी २१ जुलैपासून सुरू झाली. दोन दिवस चालणाऱ्या फेरीत ११ हजार ४८६ विद्यार्थी पात्र आहेत. राज्यात सहा ठिकाणी ही फेरी आयोजित करण्यात आली आहे. पहिल्या दिवशी सायंकाळी राज्यात केवळ ७५९ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले. राज्यात ३५० कॉलेजांमध्ये ४२ हजार प्रवेश क्षमता आहे. यापैकी समुपदेशन फेरीत मंगळवारी सायंकाळपर्यंत १५ हजार २७६ जागांवर प्रवेश रिक्त होते. औरंगाबादमध्ये देवगिरी अभियांत्रिकी व व्यवस्थापनशास्त्र कॉलेज येथे केंद्र आहे. २१ व २२ जुलै असे दोन दिवस ही प्रक्रिया राहिल.

नामांकित कॉलेजांचा कट ऑफ वाढला

राज्यातील नामांकित कॉलेजमध्ये प्रवेशाचा कट ऑफ वाढला आहे. गेल्यावर्षी नामांकित कॉलेजांमध्ये ८६ पॉइंटला शेवटचा प्रवेश झाला, यंदा ९३पर्यंत कट ऑफ गेला. रिक्त जागांचा आकडा मोठा असला तरी नामांकीत कॉलेजांमध्ये प्रवेशासाठी इच्छुकांची मोठी आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘SBI’ने ५००० रुपये भरपाई द्यावी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

बचत खात्यामध्ये रक्कम नसली तरी 'एफडी'मध्ये पुरेशी रक्कम असूनही चेक बाऊन्स झाल्यामुळे जिल्हा ग्राहक मंचात धाव घेतली असता मंचाने याचिका फेटाळली. मात्र, त्याविरोधात राज्य ग्राहक मंचाच्या औरंगाबाद खंडपीठाने अपील दाखल करून घेतले आणि मानहानीपोटी पाच हजार रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश राज्य मंचाने 'स्टेट बँक ऑफ इंडिया'च्या क्रांतिचौक शाखेला दिले.

शहरातील अरिहंतनगर परिसरातील सुनील मदनलाल काला यांचे 'एसबीआय'मध्ये बचतखाते आहे. त्यांचे बँकेमध्ये ६ लाख ८७ हजार २०८ रुपये व ६ लाख ९३ हजार ३९३ रुपयांचे दोन 'एफडी' असताना, त्यांनी बाजार समितीला २३ जानेवारी २०१२ रोजी एसबीआय बँकेचा १३,९०० रुपयांचा धनादेश दिला. मात्र, खात्यामध्ये पुरेशी रक्कम नसल्याचे कारण देत चेक बाऊन्स झाला आणि १०० रुपयांचा दंड आकारण्यात आला. या विरोधात काला यांनी जिल्हा ग्राहक मंचात तक्रार दाखल केली, पण त्यांचा तक्रार अर्ज फेटाळण्यात आला. त्याविरोधात त्यांनी राज्य ग्राहक मंचाच्या औरंगाबाद खंडपीठात अपील केले असता, त्यांचे अपील दाखल करुन घेतले. या अपीलात नुकसान भरपाई म्हणून पाच लाख रुपये, मानसिक त्रासापोटी दोन लाख रुपये व कॉस्ट म्हणून दहा हजार रुपये देण्याची विनंती करण्यात आली. दोन्ही बाजूंच्या युक्तिवादानंतर खंडपीठाचे पीठासिन अधिकारी एस. एम. शेंबोले व सदस्य उमा बोरा यांनी 'एसबीआय'ला पाच हजार रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश नुकतेच दिले. तक्रारकर्त्याच्या वतीने अॅड. राजेंद्र मुगदिया, तर बँकेच्या वतीने अॅड. पी. बी. पैठणकर यांनी बाजू मांडली.

बँकेने केला नियम मान्य

धनादेश दिला असताना, बचतखात्यामध्ये पुरेशी रक्कम नसली तरी 'एफडी'मधून रक्कम दिली (मोड पेयमेंट) जाऊ शकते, हा बँकेचाच नियम असून त्यामुळे 'चेक बाऊन्स' होऊ शकत नाही, अशी बाजू तक्रारकर्त्यांच्या वतीने मांडण्यात आली. सुनावणीवेळी बँकेने हा नियम व चूकही मान्य केली. तसेच १०० रुपयांच्या दंडाची रक्कम खात्यामध्ये वर्ग करण्यात आल्याचे बँकेच्या वतीने सुनावणीवेळी नमूद केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कॅन्सरवरील संशोधनात औरंगाबादची पताका

$
0
0

निखिल निरखी, औरंगाबाद

सर्जरी, रेडिएशन व किमोथेरपीपर्यंत सीमित असलेल्या कॅन्सरच्या उपचारांना 'इम्युनोथेरपी'च्या अत्युच्च व शाश्वत उपचारांनी बळ मिळणार असून, लवकरच ही उपचार पद्धती जगभर विस्तारण्याच्या मार्गावर आहे. अमेरिकेत जन्म पावलेली ही उपचार पद्धती भारतासह जगामध्ये येऊ घातली आहे आणि या अतिविशेष तंत्राच्या निमिर्तीमध्ये देशातील मोजक्याच कंपन्यांमध्ये समावेश होतो औरंगाबादेतील संशोधकाच्या गुजरातमधील कंपनीचा. व्यक्तिपरत्वे तंतोतंत औषधोपचार करण्याचे निराळे तंत्रही याच संशोधकाने विकसित केले आहे आणि हा संशोधक म्हणजे विनोद कुबेरकर.

औरंगाबादचे कुबेरकर यांनी दिल्ली आयआयटीमधून 'बायोटेक्नॉलॉजी'मध्ये एम.टेक., 'आयआयएम'मधून एमबीए केले असून, अमेरिकेच्या कोलोरॅडो विद्यापीठातून केमिकल इंजिनिअरिंगमध्ये पीएचडीही मिळविली आहे. नामांकित कंपन्यांमध्ये शास्त्रज्ञ पदापासून डायरेक्टरपदापर्यंत अनेक उच्च पातळ्यांवर औषध निर्मिती क्षेत्रात मोठे योगदान दिल्यानंतर त्यांनी २०१२मध्ये 'वेस्टर्न रेंज फार्मास्युटिकल्स' ही कंपनी अहमदाबादमध्ये स्थापन केली. 'इम्युनोथेरपी'सारख्या वेगळ्या क्षेत्रात संशोधनात्मक काम सुरू केल्यानंतर केंद्र सरकारकडून त्यांना आतापर्यंत दोनदा 'ग्रँट' मिळाल्या. त्यातूनच गुजरातच्या आणंद येथील व्हेटर्नरी कॉलेजशी संशोधनात्मक करार झाला असून, पाळीव कुत्र्यांवर प्रयोग होत आहेत आणि त्याचे उत्तम रिझर्ल्टस समोर येत आहेत. अल्प प्रमाणात कर्करोगींवरही त्याचा उपयोग झाला असून, त्याचेही चांगले परिणाम दिसून आले आहेत. अहमदाबादचे शासकीय कर्करुग्णालय व मुंबईच्या 'टाटा'शीदेखील करार होण्याच्या मार्गावर आहे. लवकरच कंपनीचे तंत्र कर्करुग्णांच्या सेवेत येणार असल्याचा विश्वास कुबेरकर यांना आहे.

सगळा खेळ पांढऱ्या पेशींचा

इम्युनोथेरपीमध्ये कर्करुग्णाच्या शरीरातून पांढऱ्या पेशी काढून त्यांचे प्रमाण अधिकाधिक वाढवणे, कर्करोगाच्या पेशींशी लढण्यासाठी पांढऱ्या पेशींना सक्रिय करणे व प्रक्रिया करून पुन्हा त्याच कर्करुग्णाच्या शरीरात सोडल्या जातात. यामुळे रुग्णाच्या शरीरातील पांढऱ्या पेशी कर्करोगाच्या पेशींशी लढण्यासाठी सर्वार्थाने समर्थ होतात आणि हाच या उपचार पद्धतीचा हेतू आहे. याचे कुठलेही दुष्परिणाम नाही; तसेच बायोप्सीद्वारे ट्युमरचा अंश काढून रुग्णाला नेमकी कुठली, किती प्रमाणातील व तीव्रतेची औषधी जास्त प्रभावी ठरेल याचा निष्कर्ष प्रयोगशाळेतून काढला जातो. त्याचा सल्ला डॉक्टरांना देऊन त्यानुसार दिलेल्या उपचारांची परिणामकारकता खूप जास्त दिसून आली आहे. हे वेगळे तंत्रदेखील आम्ही विकसित केल्याचे त्यांनी सांगितले.

खर्चात ५६ लाखांची कपात

सर्जरी, किमोथेरपी, रेडिएशनसह इम्युनोथेरपी उपचाराचा अतिशय प्रभावी परिणाम दिसून येतोच; शिवाय कर्करुग्ण वाचणाऱ्यांची संख्या व आयुर्मानामध्ये लक्षणीय वाढ होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. अमेरिकेत इम्युनोथेरपीसाठी ६० लाख ते एक कोटी रुपयांपर्यंत खर्च येतो. हा खर्च केवळ ३ ते ५ लाखांपर्यंत आणण्याचे प्रमुख ध्येय असल्याचे कुबेरकर सांगतात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पैठणला गढूळ पाणीपुरवठा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पैठण

गेल्या पंधरा दिवसांपासून शहराला गढूळ व दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. परिणामी पिण्यासाठी नागरिक शुद्ध पाण्याचे जार विकत घेत आहेत. नगरपालिकेकडून जलशुद्धीकरण केंद्राची योग्य निगा राखली जात नसल्याने गढूळ व दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा होत असल्याची माहिती समोर आली आहे.

पैठण शहराला जायकवाडी धरणातून पाणीपुरवठा होत असल्याने पाणीटंचाई जाणवत नाही. त्यामुळे शहरातील नागरिक पाण्याविषयी जागरूक नसतात. मात्र, पंधरा दिवसांपासून नगरपालिकेकडून गढूळ पाणीपुरवठा करण्यात येत आहे. गेल्या दोन ते दिवसात गढूळ पाण्याला घाण वास येत आहे. नळाला दररोज मुबलक पाणी येत असले तरी ते पिण्यासाठी नागरिक धजावत नाहीत. त्यामुळे अनेक जण पिण्यासाठी पाण्याचे जार विकत घेत आहेत. पाणी विकत घेण्याची ऐपत नसलेले नागरिक नाईलाजाने अशुद्ध, गढूळ व दुर्गंधीयुक्त पाणी पित आहेत.

नगरपालिकेचे पाणीपुरवठा विभागप्रमुख मुकुंद महाजन यांच्याकडे विचारणा केली असता, जायकवाडी धरणाची पाणीपातळी घटली आहे, सोसाट्याच्या वाऱ्यामुळे पाण्याच्या लाटा निर्माण होऊन पाणी गढूळ होत असल्याचा दावा केला. शहराला जायकवाडी धरणातून उत्तर जायकवाडी येथील जलशुद्धीकरण केंद्रातून पाणी शुद्ध केल्यानंतर पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे धरणाची पाणीपातळी कमी झाल्याने गढूळ पाणी येत असेल, तर नागरिकांना देण्याआधी ते शुद्ध केले जाते. ही शुद्धीकरण योग्य होत नाही का, अशी शंका घेण्यास वाव आहे.

प्राप्त माहितीनुसार, पाणी शुद्ध करण्यासाठी आलम, ब्लिचिंग पावडर व तुरटीचा उपयोग केला जातो. त्याचप्रमाणे जलशुद्धीकरण केंद्रातील विशेष वाळू वेळोवेळी बदलावी लागते. मात्र, अनेक वर्षांपासून जलशुद्धीकरण केंद्रातील वाळू बदलली नसल्याने केंद्राची क्षमता कमी झाली आहे. काही दिवसापासून आलम, ब्लिचिंग पावडर व तुरटी कमी वापरली जात असल्याने गढूळ व दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा होत असल्याची माहिती मिळाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बलात्कार करणाऱ्या तिघांना अटक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पैठण

अपंग तरुणीवर सामुहिक बलात्कार करणाऱ्या चौघांपैकी तीन संशयीत आरोपींना पैठण पोलिसांनी मंगळवारी रात्री अटक केली. तिघा संशयित आरोपींना पैठण न्यायालयाने २९ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. एक आरोपी पसार आहे.

मोबाइल फोनवरून ओळख झाल्याचा फायदा घेऊन अकोला जिल्ह्यातील मुर्तीजापूर तालुक्यातील एका एका पंचवीस वर्षीय अपंग युवतीवर सोमवारी चार जणांनी पैठण येथे आळीपाळीने बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल आहे. ही तरुणी चौघांना नीट ओळखतही नव्हती. तिला चौघांपैकी दोघांचे फक्त पहिले नाव माहीत होते. त्यामुळे बलात्काऱ्यांना पकडणे पोलिसांसमोर आव्हान होते.

पोलिसांनी संशयीत आरोपी असलम ज्या फोनवरून या पीडित मुलीशी बोलत होता, त्या मोबाइल नंबरचे सिमकार्ड कोणाच्या नावावर आहे याचा शोध घेतला. हे कार्ड तालुक्यातील केकत जळगाव येथील अलीम शेख इब्राहीम याच्या नावावर असल्याची पोलिसांना माहिती मिळाली. गावात जाऊन माहिती घेतल्यानंतर अलिम शेख सध्या शेवगाव तालुक्यातील दहिफळ येथे राहत असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी मंगळवारी रात्री दोन वाजता त्याला दहिफळ येथून अटक केली.

अलीम इब्राहिमकडे चौकशी केल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली असल्याची माहिती पोलिसांनी दिली. अलीमसोबत त्याचे साथिदार शेख असलम (वय २०), योगेश मधुकर खर्चे (वय ३५, दोघेही रा. दहिफळ, ता. शेवगाव) यांनाही पोलिसांनी अटक केली आहे. पोलिस निरीक्षक सी. पी. काकडे याच्या मार्गदर्शानाखाली हेडकॉन्स्टेबल शेख मेहराज, किरण गोरे, विक्रम जाधव, योगेश कमान, भागचंद कमान यांनी ही कारवाई केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिक्षक समितीचे झेडपीसमोर आंदोलन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

जिल्हा परिषद शिक्षकांचे विविध प्रलंबित प्रश्न न सोडविल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने बुधवारी जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन केले. जिल्हा व पंचायत समिती स्तरावर शिक्षकांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. प्रशासनाने बैठका घेऊन प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले, पण त्याची अंमलबजावणी झाली नाही. सरल सर्वेक्षण हे स्वतंत्र यंत्रणेकडून करून घेण्यात यावे, सेवा ज्येष्ठतेनुसार शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, पदवीधर शिक्षकाची रिक्त पदे तत्काळ पदोन्नतीने भरण्यात यावी, शासन निर्णयानुसार आपसी व एकतर्फी आंतरजिल्हा बदलीधारकांना एकत्रितरीत्या पदस्थापना संमतीपत्र देण्यात यावे, अंशदायी पेन्शन योजना शिक्षकांची कपात रक्कम व शासन हिस्सा व्याजासहित संबंधित शिक्षकांच्या खाती जमा करून हिशेब देण्यात यावा आदी मागण्या मांडण्यात आल्या. या मागण्या जर सुटल्या नाहीत, तर आणखी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा समितीने दिला आहे. आंदोलनात के. सी. गाडेकर, सुषमा राऊतमारे, बाजीराव ताठे, दिलीप ढाकणे, विष्णू भंडारे, नितीन नवले, राजेंद्र नवले, संभाजी खंदारे, चंदू लोखंडे यांच्यासह शिक्षक सहभागी झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाऊस परतल्याने शेतकरी सुखावले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कन्नड

कन्नड तालुक्यात मंगळवारपासून पावसाचे पुनरागमन झाले आहे. तालुक्यातील दहा किलोमिटरच्या परिसरात बुधवारी पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे दुबार पेरणीचे संकट टळले आहे. महिनाभराच्या विश्रांतीनंतर पुष्य नक्षत्रात पावसाने दमदार व मध्यम स्वरुपात हजेरी लावली आहे. देवगाव, शिवना-टाकळी, टापरगाव, आठेगाव, जैतापूर, हतनूर, रुईखेडा, शिवराई, निमडोंगरी, घुसूर या परिसरात बुधवारी सायंकाळी पाचच्या सुमारास तासभर दमदार पाऊस पडला. या पावसामुळे मका, कापूस, मुग, उडीद तूर आदी पिंकाना जीवदान मिळाले आहे. परिसरात दुबार पेरणीचे संकट टळले आहे. काही भागात शेतकरी पावसाची मोठ्या आतुरतेने वाट पाहत आहेत.

खुलतबादेत हजेरी

खुलताबादः पावसाने बुधवारी (२२ जुलै) सलग दुसऱ्या दिवशी हजेरी लावल्याने पिकांना जीवदान मिळाले आहे. बुधवारी खुलताबादचा आठवडीबाजार असतो. पावसामुळे आठवडी बाजारात त्रेधातिरपीट उडाली.

पैठणमध्ये पाऊस

पैठणः शहर व परिसरात बुधवारी दुपारी पावसाने सुमारे पंधरा मिनिट हजेरी लावली.

वैजापुरात हुलकवाणी

वैजापूरः तालुक्यात सर्वत्र बुधवारी दुपारी आभाळ भरून आले होते. जोरदार पाऊस येईल, अशी आशा होती. परंतु, थोड्याच वेळात आभाळ विरून गेले व लख्ख ऊन पडले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सरकारी सोनोग्राफी मशीन बंद

$
0
0

चंदन लक्कडहार, पैठण

पैठणच्या ग्रामीण हॉस्पिटलमध्ये (घाटी) सोनोग्राफी मशीन उपलब्ध आहे, मात्र मशीन चालविण्यासाठी तंत्रज्ञ नाही. शिवाय शहरात एकच शासनमान्य खासगी सोनोग्राफी केंद्र सुरू आहे. त्यामुळे येथील गरोदर महिला, पोटाचे विकार असलेल्या रुग्णांना सोनोग्राफीसाठी औरंगाबाद किंवा शेवगावला जावे लागत आहे.

तत्कालीन राज्यमंत्री अनिल पटेल यांच्या हस्ते १० नोव्हेंबर १९९४ रोजी औरंगाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाअंतर्गत (घाटी हॉस्पिटल) येथे ८० खाटांच्या ग्रामीण आरोग्य प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. हे हॉस्पिटल दहा एकर ३३ गुंठे एवढ्या विस्तीर्ण जागेवर आहे. पण जेवढ्या मोठ्या जागेवर रुग्णालय बांधण्यात आलेले आहे, तेवढ्या सुविधा या शासकीय हॉस्पिटलमध्ये कधीच देण्यात आलेल्या नाहीत.

शासनातर्फे येथील हॉस्पिटलमध्ये सोनोग्राफी मशीन उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. पण मशीन मिळाल्यापासून तिचा वापर सुरू झालेला नाही. हे मशीन एका खोलील अद्यापही सिलबंद अवस्थेत आहे. त्यामुळे या हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या गरोदर महिलांना खाजगी सोनोग्राफी सेंटरवर सोनोग्राफीसाठी जावे लागत आहे. विशेष म्हणजे, पोटाचे विकार असणारा एखादा रुग्ण या शासकीय हॉस्पिटलमध्ये आल्यास त्याला सोनोग्राफी मशीन बंद असल्याचे कारण पुढे करून उपचार न करता परत पाठविण्यात येते. यामुळे सध्या पोटाचे विकार असणाऱ्या गरीब रुग्णांना खाजगी दवाखान्यात उपचार घ्यावे लागत आहेत.

शहरात केवळ एकच खासगी सोनोग्राफी सेंटर सुरू आहे. त्यामुळे संपूर्ण तालुक्याचा भार एकाच सोनोग्राफी सेंटरवर येतो. येथे सोनोग्राफीकरिता गर्भवती महिलांना दोन-दोन दिवस वाट पाहावी लागते. त्यामुळे बहुतांश महिला व पोटाचे विकार असणारे रुग्ण सोनोग्राफी करण्यासाठी औरंगाबाद किंवा शेजारील शेवगाव येथे जातात. मशीन चालविण्यासाठी तंत्रज्ञ नसल्याचा फटका संपूर्ण तालुक्याला बसत आहे.

डिजिटल एक्स रे मशीनची गरज

त्याच प्रमाणे सध्या रुग्णालयात उपलब्ध असलेली एक्स रे मशीन खूप जुनी झाली आहे. त्यामुळे या मशीनवर काढलेले एक्सरे स्पष्ट दिसत नसल्याची रुग्णांची तक्रार आहे. जुन्या एक्सरे मशीन ठिकाणी नवीन डिजिटल मशीन उपलब्ध करून देण्याचीही नागरिकांची जुनी मागणी आहे.

तज्ज्ञाअभावी सोनोग्राफी मशीन बंद आहे. तज्ज्ञ डॉक्टर मिळावेत यासाठी आम्ही शासनाकडे प्रस्ताव पाठवला आहे. आरोग्य प्रशिक्षण केंद्रात जवळपास ९० टक्के औषधींचा साठा आहे.

- डॉ. पी. एल. गट्टानी, प्रपाठक

डॉक्टरांनी मला दोन वेळा सोनोग्राफी करण्याचा सल्ला दिला. सहाशे रुपये याप्रमाणे दोन वेळा खाजगी सेंटरवर सोनोग्राफी केली. शासकीय हॉस्पिटलमध्ये सोनोग्राफीची सुविधा उपलब्ध करून दिल्यास आर्थिक भुर्दंड बसणार नाही.

- पूजा बुंदिले, पैठण

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


घरभाडे भत्ता सुरू ठेवण्याची मागणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मुख्यालयी न राहणाऱ्या माध्यमिक शिक्षकांचे घरभाडे बंद करावेत, असे पत्र जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना काढले होते. हा निर्णय नियमबाह्य असून, घरभाडे बंद करू नये, अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेने केली आहे.

शिक्षक सेनेने मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना यासंदर्भात पत्र दिले आहे. त्या म्हटले आहे की, राज्य सरकारने ५ फेब्रुवारी १९९० रोजी घरभाड्यासंदर्भात एक शासननिर्णय जारी केला होता. त्यानुसार राज्यातील शिक्षक व सर्व शासकीय कर्मचाऱ्यांसाठी मुख्यालयाबाबत स्पष्ट निर्देश दिले आहेत. मुख्यालयी सरकारी निवासस्थाने उपलब्ध असतील तर, ती वापरणाऱ्या कर्मचाऱ्यांना घरभाडे भत्ता देऊ नये, असे स्पष्टपणे म्हटले आहे. याबाबत स्पष्ट सूचना असताना जिल्हा परिषदेने ४ जुलै रोजी स्वतंत्र पत्र काढून घरभाडे बंद करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

यामुळे माध्यमिक शिक्षकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. जुन्या शासननिर्णयांचा अभ्यास करून घरभाडे बंद करण्यासंदर्भात योग्य निर्णय घ्यावा, भत्ता बंद करू नये, अशी मागणी प्रभाकर पवार, दीपक पवार, संतोष आढाव, लक्ष्मण ठुबे, सदानंद माडेवार, सोमनाथ जगदाळे, अरविंद आडे आदींनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोरड्या बोअरवर सात कोटी वाया

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांमध्ये नव्याने हातपंप घेण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात सात कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला. पण भूजलपातळीचा विचार न करता बोअर घेतल्याने तेथे पाणी लागले नाही. बोअरचा उपयोग न झाल्याने त्या गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा करावा लागला.

मराठवाड्याच्या आठ जिल्ह्यांमध्ये नवीन बोअर घेण्यासाठी ७ कोटी १० लाख रुपये, तर यापूर्वी घेण्यात आलेल्या बोअरच्या दुरुस्तीसाठी १ कोटी ५५ लाख रुपये खर्च करण्यात आला. जमिनीत पाणी नसतांना पाण्याचा शोध घेण्यासाठी प्रशासनाने हा कोट्यवधींचा खर्च केला आहे. या बोअरचे पुनर्भरण करण्याबाबत कोणतेही नियोजन करण्यात आलेले नाही. मिळालेल्या माहितीनुसार, ३० जूनअखेर आठही जिल्ह्यांमध्ये १५३२ बोअरसाठी ७ कोटी १० लाख रुपये खर्च करण्यात आले असून यामध्ये सर्वाधिक ६४१ नवीन बोअर बीड जिल्ह्यात घेण्यात आले. औरंगाबाद जिल्ह्यात २३२ तर लातूर जिल्ह्यामध्ये २४७ बोअर घेण्यात आले.

सतत तीन वर्षांपासून मराठवाड्यात अत्यल्प पाऊस पडत आहे. त्यामुळे भूजल पातळी सर्व जिल्ह्यात कमी झाली आहे. या परिस्थितीत तहानलेल्या गावांना पाणी पुरविण्यासाठी प्रशासनाने नवीन बोअर घेण्याचा निर्णय घेतला असला तरी त्याचा उपयोग झालेला नाही. परिणामी त्या गावांना टँकरनेच पाणीपुरवठा करावा लागला.

दुरुस्तीसाठीही दीड कोटी

विभागातील बोअर दुरुस्तीसाठी एक कोटी ५५ लाख ५८ हजार रुपयांचा खर्च करण्यात आला. त्यापैकी सर्वाधिक ९८ लाख ३० हजार रुपये नांदेड जिल्ह्यात, ४२ लाख ३२ हजार रुपये परभणी जिल्ह्यात खर्च झाले. जालना जिल्ह्यात ७ लाख २४ हजार, तर लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यात अनुक्रमे ३ लाख ५० हजार व ४ लाख २२ हजार रुपये खर्च झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पंढरपुरातील वाद प्रकरणी दोन्ही गटांवर गुन्हे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी वाळूज

पंढरपूर येथील ग्रामपंचायत निवडणूकीतील उमेदवारी अर्जवार आक्षेप घेतल्याच्या कारणावरून मंगळवारी (२१ जुलै) सायंकाळी सहा वाजेच्या दरम्यान दोन गटात वाद झाला. दोन्ही गटांनी एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल केले आहेत.

ग्रामपंचायत निवडणूक उमेदवारी अर्जाची छाननी मंगळवारी करण्यात आली. छाननीमध्ये अर्जावर आक्षेप घेतल्याच्या कारणावरून दोन गटात वाद झाले होते. त्याचे पडसाद सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास पंढरपूर येथील जामा मशीद परिसरात उमटले. पंढरपूर येथील सरपंच मेहबूब बुढन चौधरी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार मस्तान शहा, रोशनशहाचे वडिल, नुजर शहा, नुजराबी शहा, हुसेन यासीन पटेल यांच्यासह १० ते १५ जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. नुरजाबी मस्तन शहा यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार हसन बुढन चौधरी, सोहेल चौधरी, आदीम चौधरी, अमीर कुरेशी, शहबाज बिलाल अमीर कुरेशी यांच्यासह ३० ते ४० जणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भिरभिरणारी फुलपाखरे अस्तंगत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहरात विदेशी शोभीवंत झाडांची वाढती संख्या आणि हद्दपार झालेल्या भारतीय पद्धतीच्या बागा फुलपाखरांच्या मुळावर उठल्या आहेत. फळे आणि फुलांनी बहरलेल्या झाडांचे प्रमाण कमी झाल्यामुळे फुलपाखरांची संख्या ७५ टक्के घटली आहे. पारंपरिक झाडांचे संवर्धन केले तरच निसर्गसृष्टीतील महत्त्वाच्या घटकाचे संगोपन होईल, असे अभ्यासकांनी सांगितले.

औरंगाबाद शहरात ४६ प्रकारची फुलपाखरे आढळतात. उद्याने आणि घरासमोरील फुलझाडांभोवती भिरभिरणारी मनमोहक फुलपाखरे प्रत्येकासाठी आनंददायी असतात, मात्र आठ वर्षांपासून फुलपाखरांची संख्या झपाट्याने घटत आहे. फुलपाखरांचे थवे निव्वळ दुर्मीळ झाले आहेत. शहरीकरणात झाडांची संख्या कमी असून घराच्या कंपाउंडमध्ये विदेशी शोभीवंत झाडे लावण्याचे प्रमाण वाढले आहे. फर्न, रॅचिस, कॅक्टस, लिली अशा झाडांनी अंगण व्यापले आहे. काही विदेशी झाडांना फळे व फुले येत नाहीत. त्यामुळे फुलांचा रस हा मुख्य आहार असलेल्या फुलपाखरांचा अन्न पुरवठा खंडीत झाला आहे. फुलांचा रस, गवताचा रस, चिखल व पिकलेली फळे फुलपाखरांना पोषक रस पुरवतात; तसेच परागीभवन क्रियेत फुलपाखरांचे महत्त्वाचे स्थान आहे. 'फुलझाडांची संख्या घटल्याने फुलपाखरांचे अस्तित्व संपुष्टात आले आहे. शेतात पिकांवर रासायनिक खते व किटकनाशकांचा बेसुमार वापरही फुलपाखरांसाठी धोकादायक ठरत आहे,' असे पक्षीमित्र डॉ. किशोर पाठक यांनी सांगितले. तीन ते चार आठवडे आयुष्य असलेले

फुलपाखरू निसर्गातील सुंदर ठेवा आहे. शिवाय सरडे, पाली व पक्ष्यांसाठी फुलपाखरू हे मुख्य खाद्य आहे. त्यामुळे इतर प्राण्यांच्या संख्येवरही परिणाम जाणवत आहे. या परिस्थितीत देशी झाडे व फुलझाडांवरच फुलपाखरे टिकण्याची शक्यता आहे. त्यामुळे झेंडू, सदाफुली, सोनचाफा, कण्हेरी, पारिजातक, जास्वंद या फुलझाडांसह साग, बेहडा, बेल, वड, पिंपळ, उंबर, करंज, चिंच, बहावा, पळस, बोर, लिंबू, कडीपत्ता या झाडांचे संवर्धन करणे गरजेचे ठरले आहे.

बागा हद्दपार

शहरात भारतीय पद्धतीच्या उद्यानांचे स्वरूप बदलत आहे. 'जापनीज गार्डन'च्या धर्तीवर महत्त्वाचे बदल झाले आहेत. बागांमध्ये फुलझाडे अपवादानेच दिसतात. शिवाय पूर्वी घराभोवती कण्हेरी, पारिजातक किंवा सदाफुलीची लागवड केली जात होती. आता विदेशी झाडांनी जागा व्यापल्याने फुलपाखरांचे अस्तित्व धोक्यात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुलीवर अत्याचार करणाऱ्यास कोठडी

$
0
0

औरंगाबादः अल्पवयीन मुलीस लग्न करण्याचे आमीष दाखवून पळवून नेऊन तिच्यावर बलात्कार करणाऱ्या २२ वर्षीय तरुणास एमआयडीसी पोलिसांनी पुणे येथून अटक केली. त्याला बुधवारी जिल्हा व सत्र न्यायधीश आर. आर. काकाणी यांच्यासमोर हजर केले असता त्यांनी आरोपीला दोन दिवसांच्या पोलिस कोठडीचे आदेश दिले. चिकलठाणा येथील अल्पवयीन मुलगी लग्न समारंभासाठी बदनापूर तालुक्यातील वाल्हा या गावी गेली. लग्नामध्ये विठ्ठल काळे याच्यासोबत तिची ओळख झाली. दोघे लग्न करण्याचे ठरवून ७ जून रोजी चिकलठाणा येथून पळून गेले. विठ्ठलने मुलीस शिर्डी, नाशिक, पुणे येथे नेले. पुण्यात तो भाड्याच्या खोलीत राहायचा. दरम्यान, विठ्ठलने मुलीस पळवून नेल्याची तक्रार मुलीच्या वडिलांनी दिली. कोर्टात अल्पवयीन मुलीने आई-वडिलांकडे जाण्यास नकार दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images