Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

‘निर्भया’नंतर तक्रारींत तिप्पट वाढ

$
0
0

निखिल निरखी, औरंगाबाद

'निर्भयाच्या बलिदानानंतर २०१३ मध्ये कायद्यात आमुलाग्र बदल झाला. एखाद्या मुलीचा केवळ पाठलाग करणे देखील आता अजामीनपात्र गुन्हा ठरला आहे. अगदी टोमणा मारणाऱ्यांविरुद्ध महिला आता दाद मागू शकते. त्यामुळेच तक्रारी दाखल करणाऱ्या महिलांचे प्रमाण किमान तिपटीने वाढले आहे', असे मत अतिरिक्त सरकारी वकील अर्चना गोंधळेकर यांनी नोंदविले.

'निर्भया'नंतर कायद्यामध्ये नेमके कोणते प्रमुख बदल झाले?

'निर्भया'च्या बलिदानानंतर अनेक आणि अतिशय सूक्ष्म पातळ्यांवर जाऊन कायद्यामध्ये बदल झाले आहेत. सगळ्यात महत्वाचा बदल झाला तो बलात्काराच्या व्याख्येत. फौजदारी कायदे (सुधारणा) अधिनियम २०१३ (बलात्कार व लैंगिक छळास प्रतिबंध कायदा) या अंतर्गत कलम ३५४ अ, ब, क व ड अन्वये अनेक प्रकारचे थेट गुन्हे दाखल करण्याची महत्वाची सोय केली. युवती-महिलेवर अॅसिड फेकणे किंवा अॅसिड फेकण्याचा प्रयत्न करणे, महिलेचे कुठलेही खासगी कृत्य बघणे किंवा केवळ पाठलाग करणे हादेखील अजामीनपात्र गुन्हा नोंदविण्याची सोय झाली. त्यामुळे महाविद्यालयांमध्ये मुलींचा केवळ पाठलाग केला तरी अशा मुलींसाठी कायद्याने संरक्षण दिले आहे. त्याचवेळी ग्रामीण भागात शौच्चासाठी गेलेल्या महिलेकडे बघितले तरी तो विनयभंग ठरणार आहे आणि अजामीनपात्र गुन्हा नोंदविता येईल. महत्वाचे म्हणजे बलात्काराच्या गुन्ह्यामध्ये सात वर्षांपेक्षा कमी शिक्षा नसणार आणि आजीवन कारावासापर्यंत शिक्षा वाढविण्यात आली आहे. केवळ पीडितेने बलात्कार झाल्याची साक्ष दिली, तरी बलात्काराचा गुन्हा नोंदविला जाणार आहे, जात आहे आणि ज्याच्याविरुद्ध साक्ष दिली त्याला तो स्वतः आरोपी नसल्याचे सिद्ध करावे लागणार आहे. २०१३ पूर्वी साक्षी-पुराव्यानंतरच बलात्काराचा गुन्हा दाखल होत होता. अजून एक उल्लेखनीय बाब म्हणजे बलात्कार करणाऱ्यामध्ये एकापेक्षा जास्त आरोपी असले तरी तो आता 'गँगरेप' म्हणून गुन्हा दाखल होत आहे.

पोलिसांनी एफआयआर नोंदविला नाही तर...?

याच वरील कायद्यामध्ये १६६, १६६ अ व १६६ ब नुसार लोकसेवकांना व अगदी डॉक्टरांनाही कायद्याच्या कक्षेत आणले आहे; म्हणजेच बलात्कार किंवा विनयभंगाची दखलपात्र तक्रार पोलिसांनी दाखल करून घेतली नाही, एफआयआर नोंदविला नाही तर त्या संबंधित पोलिसावरही गुन्हा नोंदविला जाऊ शकतो. तसेच एकदा बलात्कार झाल्यानंतर पुन्हा पीडितेवर जबरदस्ती करणारा डॉक्टर असला तरी त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्याची सोय या कायद्यात आहे.

कौटुंबिक हिंसाचार कायद्याची व्याप्ती कशी आहे?

कौटुंबिक हिंसाचाराच्या संरक्षणाचा कायदा २००५ नुसार टोमणे मारणाऱ्याविरुद्धही दाद मागता येते. पती अथवा सासरकडील मंडळींकडून तीन खोल्यांच्या राहत्या घरांमध्ये अन्याय होत असल्यास स्वतःच्या खोलीमध्ये सासरकडील मंडळींना प्रवेश करण्यास मनाई करता येते. असा मनाई हुकूम मिळविणे आता शक्य झाले आहे. तसेच महिलेला पोटगीचा अधिकार आहेच; शिवाय स्वतः कमावू न शकणाऱ्या महिलांना नवऱ्याने पोसलेच पाहिजे, असेही कायदा म्हणतो. आता पित्याच्या प्रॉपर्टीमध्ये महिलांना अगदी समसमान वाटा मिळण्याचा मार्ग मोकळा आहे. अगदी अनुकंपा तत्वावरील नोकरीसाठीही हा हक्क महिलांना मिळाला आहे. याबरोबरच 'कामाच्या ठिकाणी लैंगिक छळवणूक (प्रतिबंध, मनाई व निराकरण अधिनियम २००३) कायद्यानुसार घरातील मोलकरणीपासून ते विद्यापीठाच्या शिक्षिकेपर्यंत सर्वांनाच संरक्षण मिळाले आहे. कुठलीही लैंगिक शेरेबाजी करणाऱ्याविरुद्ध आता गुन्हा दाखल होऊ शकतो. अजून वेधक बाब म्हणजे 'हिंदू दत्तकग्रहण व भरणपोषण कायदा १९५४'अंतर्गत परित्यक्त्या, विधवा किंवा कुमारिकेला मुलगा व मुलीला दत्त घेता येते. मात्र एकट्या पुरुषाला मुलगी दत्तक घेता येत नाही.

कायदे महिलांच्या बाजूंनी असताना प्रश्न येतो कुठे?

भारतीय कायद्यामध्ये स्त्री-पुरुष असा भेदाभेद कुठेही नाही आणि सातत्याने बदलत्या सामाजिक स्थितीचा विचार करून कायद्यामध्ये सातत्याने बदल झालेत. 'निर्भया'नंतर तर काद्यामध्ये 'ग्राऊंड रिअॅलिटी'चा अतिशय बारकाईने विचार केल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे कायदे पुरेपूर झाले असले तरी अधिकाधिक समाजाभिमुख होण्याची खरी गरज आहे. लोकांना प्राथमिक स्तरावरील 'मेडिकल'ची माहिती असते, पॅरासिटामोल कधी घ्यायची, याची माहिती असते; मात्र प्राथमिक व महत्वाच्या कायद्यांची माहिती नसते. खरे तर आजच्या युगात धर्मग्रंथ वाचले नाही तरी एकवेळ चालेल, पण महत्त्वाच्या कायद्यांची व हक्कांची माहिती असणे आवश्यक आहे. अर्थात, स्वतःहून तक्रारींसाठी पुढे येणाऱ्यांचे प्रमाण किमान तिपटीने वाढले आहे आणि हे सकारात्मक लक्षण म्हटले पाहिजे. त्याचवेळी कायद्याचा दुरुपयोग होऊ नये म्हणून पुरुषांनीही कायदे जाणून घेणे खूप गरजेचे आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


एकाधिकारशाही आता चालणार नाही

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पोलिस ठाण्यातील विविध पदांवर वर्षानुवर्षे काम करणाऱ्या दावेदारांच्या पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी दुसऱ्या पदावर बदल्या केल्या आहेत. कोणत्याही पदावर कायम काम करणे ही मोनोपली चालणार नसल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

पोलिस प्रशासनात काम करताना पोलिस निरीक्षकाचा रायटर, बारनिशी, ड्यूटी सहायक; तसेच गोपनीय शाखेमध्ये काम करणे हे महत्त्वाची पद असल्याचे कर्मचाऱ्यांमध्ये मानल्या जाते. वर्षानुवर्षे अनेक कर्मचारी या पदावर काम करताना दिसून येतात. यांचे पोलिस ठाणे बदलले तरी ही मंडळी याच पदावर काम करीत असल्याचे पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांच्या निदर्शनास आले होते. यासंदर्भात त्यांनी पदभार घेताच एका बैठकीमध्ये हे बदल करण्याचे संकेत दिले होते. या पार्श्वभूमीवर त्यांनी नुकतेच या शाखांमधील बदल करण्याचे आदेश दिले आहेत. नवीन कर्मचाऱ्यांची यादी तयार करण्यात आली असून आतापर्यंत त्यांनी केलेल्या नोकरीचा अहवाल पाहून त्यांची निवड या शाखांमध्ये करण्यात आली आहे. जुन्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या पदावरून हटवून नविन कर्मचाऱ्यांची या ठिकाणी नियुक्ती करण्याचे आदेश त्यांनी सबंधित पोलिस निरीक्षकांना दिले आहेत.

पोलिस दलात काम करताना कोणत्याही एकाच पदावर नेहमीसाठी करता येत नाही. पोलिस दलातील सर्व प्रकारचे काम कर्मचाऱ्याला येणे अपेक्षित आहे. कोणत्याही पदासाठी पोलिस दलात एकाधिकारशाही चालत नाही.

- अमितेशकुमार, पोलिस आयुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोंढा नाका उड्डाणपुलावर अपघात; दाम्पत्य जखमी

$
0
0

औरंगाबादः मोंढानाका उड्डाणपुलाचे उदघाटन होण्यापूर्वीच पुलावर अपघाताची घटना बुधवारी सायंकाळी सात वाजता घडली. भरधाव वेगाने जाणाऱ्या कारने स्कुटीला पाठीमागून धडक दिल्याने पतीपत्नी जखमी झाले. जखमींना खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

विपूल पांडे (वय ४०) व प्रिया पांडे (वय ३५ रा. मोंढानाका) अशी जखमींची नावे आहेत. स्कुटीवर आकाशवाणी चौकाकडून हे दोघे उड्डाणपुलावरून अमरप्रीत चौकाकडे येत होते. यावेळी पाठीमागून आलेल्या कारने त्यांच्या स्क‌ुटीला धडक दिली. अपघातात पांडे दांपत्य जखमी झाले. धडक देणारी कार शासकीय अधिकारी आशिष पवार यांची असल्याची माहिती सूत्रांनी दिली. कारचालकाला जवाहरनगर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. रात्री उशीरापर्यंत गुन्ह्याची नोंद करण्यात आली नव्हती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दारूचे उत्पादन बंद करण्यासाठी याचिका

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद

महाराष्ट्रातील दारूचे उत्पादन बंद करावे अशी विनंती करणारी याचिका मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठात करण्यात आली आहे. दुष्काळी परिस्थितीत पाण्याची टंचाई असताना मद्यनिर्मिती कारखान्यांना ९० टीएमसी पाणी लागत असल्याचा आक्षेप याचिकेत घेण्यात आला आहे. याप्रकरणी न्या. संजय गंगापूरवाला व न्या. व्ही.के. जाधव यांनी राज्य शासनाला माहिती घेण्याचे निर्देश दिले आहेत.

शिर्डी येथील सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी ही जनहित याचिका केली आहे. राज्यात २००८ पासून दुष्काळ आहे. अवर्षणाचा फटकाही शेतकऱ्यांना आणि नागरिकांना बसला आहे. एकीकडे धरणातील साठा कमी होत आहे. पावसाअभावी धरणे कोरडी पडली आहेत. असे असताना दारू उत्पादन करणाऱ्या कारखान्यांना मात्र नियमित पाणीपुरवठा केला जात आहे. सरकारने दुष्काळी उपाययोजनांसाठी एक हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. राज्यातील ९० लाखांहून अधिक शेतकरी अस्मानी संकंटाने हवालदिल झालेला आहे. त्यामुळे दारू उत्पादकांना देण्यात येणारे पाणी बंद करण्याची विनंती याचिकेत करण्यात आली आहे. याचिकाकर्त्याच्या वतीने सतीश तळेकर यांनी बाजू मांडत आहेत. त्यांना प्रज्ञा तळेकर, उमाकांत आवटे, अजिंक्य काळे हे सहकार्य करत आहेत. दारू उत्पादकांचा पाणी पुरवठा बंद करावा, चांगल्या व उच्च प्रतिची दारू विक्रीचीच परवानगी असावी, बनावट दारू विक्री प्रकरणाची माहिती घेऊन कारवाई करावी अशी विनंतीही याचिकेत करण्यात आली आहे.

लिटरभर बियरसाठी २९८ लिटर पाणी

पाणी पुरवठा विभागाच्या आकडेवारीनुसार राज्यातील लघु, मध्यम साठवण प्रकल्पात ४१ टक्के पाणी साठा आहे. एक लिटर बियरसाठी २९८ लिटर तर एक लिटर वाईनसाठी ८७० लिटर पाणी लागते. राज्यात ३६८ कोटी ५४ लाख ६६ हजार ५१३ लिटर दारूचे उत्पादन होते. त्यापोटी सरकारी आकडेवारीनुसार ६० टीएमसी पाणी लागते, पण ३० टीएमसी पाणी बेकायदेशीररित्या वापरले जाते. एकूण ९० टीएमसी पाणी दारू निर्मितीवर वाया जात असल्याचा आक्षेप याचिकेत घेण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोन सभागृहे बेकायदा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

गारखेडा भागातील स्नेहवर्धिनी कॉलनीतील दोन सामाजिक सभागृहांना आज बुधवारी महापालिकेच्या मालमत्ता विभागाने सील ठोकले. २००५ मध्ये या सभागृहांचे बांधकाम करण्यात आले होते. तेव्हापासून या सभागृहांचा अनधिकृतपणे वापर केला जात होता, अशी माहिती उपायुक्त अय्युब खान यांनी दिली.

स्नेहवर्धिनी कॉलनीत मोरोपंत पिंगळे सभागृह आहे. या सभागृहावर 'एक्सलंट तायक्वोंन्दो सेल्फ डिफेंस सेंटर'चा फलक होता. नीरज बोरसे आणि लता पवार या ठिकाणी प्रशिक्षण देत होते. त्यांनी महापालिकेकडून परवानगी घेतली नव्हती. त्यामुळे या सभागृहाला सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास पंचनामा करून सील ठोकण्यात आले. याच भागात महापालिकेने टेबल टेनिस हॉल बांधला आहे. या हॉलचे बांधकामही २००५ मध्ये करण्यात आले. याठिकाणी निखील साखरे व अन्य एक व्यक्ती जिमनॅस्टिक व इतर खेळाचे विनापरवानगी प्रशिक्षण देत होता. त्यामुळे या हॉलला देखील सील करण्यात आले. संबंधितांवर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे अय्युब खान यांनी कळवले आहे. ही कारवाई मालमत्ता अधिकारी वसंत निकम, इमारत निरीक्षक सय्यद जमशीद, अरुण केदारे, काझी जहिरोद्दीन यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिक्षण विभागाकडून ११ अनधिकृत शाळा बंद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

जिल्ह्यात ४७ प्राथमिक शाळा अनधिकृत असल्याचे जून महिन्यात झेडपीच्या शिक्षण विभागाने जाहीर केले होते. ही कारवाई इथपर्यंत मर्यादित न ठेवता शिक्षण विभागाने शाळांमध्ये जाऊन थेट ११ अनधिकृत शाळा कायमच्या बंद केल्या. या शाळेतील विद्यार्थ्यांना दुसऱ्या शाळांमध्ये स्थलांतरित करण्यात आले आहे.

शिक्षणाधिकारी नितीन उपासनी यांनी सांगितले, जिल्ह्यातील ४७ शाळांची यादी यापूर्वी आम्ही प्रसिद्ध केली होती. मात्र काही शाळा अजूनही सुरू असल्याचे आम्हाला कळाले होते. मी स्वतः तसेच स्वतंत्र पथके नेमून ११ अनधिकृत शाळा बंद केल्या. त्यात नाथ अकादमी इंग्रजी प्राथमिक शाळा पैठण, राजे शिवाजी इंग्लिश स्कूल निल्लोड, स्वामी विवेकानंद प्राथमिक शाळा गोळेगाव, किडक गुरुकुल इंग्लिश स्कूल, सिल्लोड, हॅपी चाइल्ड इंग्लिश स्कूल वाळूज, स्वामी विश्वकर्मा इंग्लिश स्कूल वसूसायगाव इत्यादी शाळांचा समावेश आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

काळी-पिवळीवरील बंदी कोर्टात कायम

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद

अवैध (काळी-पिवळी ) प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर ५ मेपासून शहरात येण्यावर बंदी घालण्यात आली आहे. ही बंदी मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठात कायम झाली आहे. पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांच्या आदेशाला आव्हान देणारी याचिका मराठवाडा काळी पिवळी अॉटो अॅण्ड जीप ओनर्स संघटनेने मागे घेतली.

अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या काळी-पिवळी वाहनांवर शहरात येण्यास पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी बंदी घातली आहे. हर्सूल टी पॉइंट, चिकलठाणा, नगर नाका व महानुभाव आश्रम चौकापर्यंतच या वाहनांना येण्यास परवानगी देण्यात आली आहे. ५ मेपासून या आदेशाची अंमलबजावणी सुरू करण्यात आली. या निर्णयाविरोधात काळी पिवळी वाहनचालक मालक संघटनेने बंदही पुकारला होता. त्यांच्या संघटनेचे अध्यक्ष मनमोहनसिंग ओबेरॉय यांनी पोलिस आयुक्तांच्या आदेशाला औरंगाबाद खंडपीठात आव्हान दिले होते.

६० दिवसांत आक्षेप, हरकती नोंदविल्यानंतर ३ जून रोजी महाराष्ट्र पोलिस कायदा व मोटार वाहन कायद्यानुसार सहा व नऊ आसनी काळी पिवळी जीपवर निर्बंध घालण्यात आले आहेत, असे शासनातर्फे सहाय्यक सरकारी वकील सुजित कार्लेकर यांनी कोर्टाला सांगितले. घटनेने दिलेल्या हक्कानुसार कोणत्याही व्यक्तीला जगण्यासाठी व्यापार करण्याचा अधिकार आहे हे खरे, पण त्यावर निर्बंध घालण्याचे अधिकारही घटनेने कलम १९ (ग )मध्ये दिलेले आहेत. काळी -पिवळी परवानाधारक जीप चालकांना त्यांच्या मनाप्रमाणे वाटेल त्या ठिकाणी प्रवाशी वाहतूक करण्याचा अधिकार नाही. शहरातील नागरिकांच्या हितार्थ त्यावर निर्बंध घालण्याचे अधिकार पोलिस व परिवहन प्रशासनाला आहेत, असा युक्तिवाद कार्लेकर यांनी केला.

औरंगाबाद शहरातील वाहतुकीची कोंडी, अरुंद रस्ते, वाढत जाणारे अपघात, प्रदूषण, मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन यामुळेच काळी पिवळी वाहनांवर शहरात सकाळी ८ ते रात्री ९ वाजेपर्यंत निर्बंध घालण्यात आल्याचे शपथपत्र प्रादेशिक परिवहन अधिकारी गोविंदराव सैंदाणे यांनी कोर्टात दाखल केले. कोर्ट याचिका फेटाळत आहे, हे लक्षात येताच संघटनेने याचिका मागे घेतली. याचिकाकर्त्याची बाजू अब्दुल अजीज यांनी मांडली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रस्त्यांची कामे रखडवली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

निधीची ओरड करणाऱ्या महापालिकेला शासनाने पैसा दिलेला असतानाही रस्त्यांची कामे टेंडरच्या फेऱ्यात अडकवण्यात आली आहेत. काँक्रिटीकरणाच्या माध्यमातून शहरातील पाच रस्त्यांची कामे केली जाणार आहेत.

रस्त्यांची दूरवस्था लक्षात घेऊन आमदार अतुल सावे यांनी महापालिका निवडणुकीच्या काळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून १० रस्त्यांच्या कामांसाठी सुमारे २५ कोटी रुपये मंजूर करून घेतले. रस्त्यांच्या कामासाठी विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली. त्यामुळे रस्त्यांची कामे पूर्ण करून घेण्याची जबाबदारी विभागीय आयुक्तांवर आली. मात्र, विभागीय आयुक्तांनी महापालिकेच्या माध्यमातूनच रस्त्यांची कामे करून घेण्याचा निर्णय घेतला. महापालिकेने दहा रस्त्यांच्या कामांचे ३७ कोटींचे अंदाजपत्रक तयार केले. एवढी रक्कम उपलब्ध नसल्यामुळे पाचच रस्ते सुधारण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यावर वीस कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. या कामांसाठी महापालिकेने निविदा काढली. १ जुलै या मुदतीत तीन ठेकेदारांनी निविदा भरली. १२ दिवसांनी निविदा उघडण्यात आल्या, पण त्यावर अद्याप काहीच निर्णय झालेला नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गुरूनानक एजन्सीची ९ टक्के जादा दराची निविदा स्वीकारण्याच्या तयारीत प्रशासन आहे. निविदांचा तपशील अद्याप जाहीर करण्यात आलेला नाही. त्यामुळे ही प्रक्रिया रखडण्यामागचा 'अर्थ' आता महापालिकेच्या वर्तुळात लावला जात आहे. विभागीय आयुक्तांनीही या संदर्भात अद्याप दखलघेतलेली नसल्यामुळे नागरिकांचे हाल थांबलेले नाहीत.

यांच्या निविदा दाखल

रस्त्यांच्या कामासाठी एकूण आठ कंत्राटदारांनी निविदा नेल्या. त्यापैकी केवळ चार्निया कन्स्ट्रक्शन कंपनी, गर्ग कन्स्ट्रक्शन कंपनी, गुरूनानक एजन्सी यांनी निविदा दाखल केल्या.

पाच रस्ते

महावीर चौक ते क्रांतिचौक.

सेव्हनहिल्स ते सुतगिरणी चौक.

महालक्ष्मीचौक ते कामगार चौक.

संत तुकोबानगर ते कासलीवाल पॅव्हेलियन.

गजानन महाराज मंदिर चौक ते जयभवानीनगर.

गुरूनानक एजन्सीने नऊ टक्के जादा दराने काम करण्याची तयारी दर्शवली आहे. या एजन्सीला निगोशिएशनसाठी बोलावले आहे. दोन - तीन दिवसांत याबद्दलचा निर्णय घेऊन स्थायी समितीच्या मंजुरीसाठी निविदा पाठवली जाईल.

सखाराम पानझडे, शहर अभियंता

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शुल्कमाफीसाठी अभाविपचा ‘लाँग मार्च’

$
0
0

औरंगाबाद : दुष्काळी परिस्थितीमुळे वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांचे शुल्क माफ करावे, कमवा व शिकवा योजनेत वेतनवाढ करावी; तसेच मागेल त्याला काम द्यावे, नवीन वसतिगृह बांधावे आदी विविध मागण्यांसाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे बुधवारी 'लाँग मार्च' काढून आंदोलन करण्यात आले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीवर वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांनी हा 'लाँग मार्च' काढला. शिवाजी वसतिगृहापासून मोर्चाची सुरुवात झाली. गेल्या तीन वर्षांपासून मराठवाड्यात सतत दुष्काळी परिस्थिती आहे. यंदाही पावसाने दडी मारल्यामुळे दुबार पेरणीची वेळ आली आहे. शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे. वसतिगृहात शिकणारे बहुतांश विद्यार्थी शेतकऱ्यांची मुले आहेत. त्यामुळे या विद्यार्थ्यांना विद्यापीठाने शुल्कमाफी द्यावी; तसेच वसतिगृह शुल्क घेणे तातडीने थांबवावे, या प्रमुख मागणीसह विद्यापीठातील विद्यार्थीसंख्येच्या तुलनेत सध्याची वसतिगृहे कमी पडत आहेत. त्यामुळे नवे वसतिगृह बांधण्याची गरज आहे. सर्व वसतिगृहांमध्ये वॉटर प्युरीफायर बसवण्यात यावे, पिण्याच्या पाण्याची समस्या जाणवत असल्याने पाण्याची साठवणूक क्षमता वाढवण्यात यावी, कमवा व शिका योजनेत वेतनवाढ (१५०० रुपये) करावे, अशा मागण्यांसाठी वसतिगृहातील विद्यार्थी लाँगमार्चमध्ये सहभागी झाले. स्वप्नील बेगडे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने कुलगुरूंची भेट घेतली. त्यानंतर कुलगुरूंनी व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत या संदर्भात निर्णय घेण्यात येईल असे स्पष्ट केले. निखिल आठवले, प्रदीप सोमवंशी, दीपक टोणपे, शिवराज माने, अमोल चंदणे, भारत चव्हाण, आशिष फड आदींनी आंदोलनाचे नेतृत्त्व केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निम्मे वसतिगृह शुल्क माफ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील वसतिगृहामध्ये राहणाऱ्या सर्व विद्यार्थ्याचे ५० टक्के शुल्क माफ करण्याचा; तसेच कमवा व शिका योजनेचा लाभ सर्व गरजू विद्यार्थ्याना देण्याचा महत्वाचा निर्णय व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत बुधवारी घेण्यात आल्याची माहिती कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी दिली.

बैठकीला सदस्य सचिव व कुलसचिव डॉ. गणेश मंझा, बीसीयूडी डॉ. के. व्ही. काळे यांच्यासह एकूण १७ सदस्य उपस्थित होते. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पदवी, पदव्युत्तर विद्यार्थ्यांचे वसतिगृह शुल्क ५० टक्के माफ करण्यास मान्यता देण्यात आली. या योजनेचा लाभ मिळविण्यासाठी विभागातील उपस्थितीचे विभाग प्रमुखांचे पत्र संबंधितास द्यावे लागणार आहे. विद्यापीठातील विविध १२ वसतिगृहांतील १२०० मुले व मुलीना याचा लाभ होईल. विद्यापीठातील सर्व गरजू विद्यार्थ्याना कमवा व शिका योजनेत समाविष्ट करून घेण्यात येईल. सध्या ३५० मुलांना याचा लाभ होतो.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गमावलेला ऐवज मिळणार परत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहरातील विविध भागात झालेल्या चोरी; तसेच अन्य गुन्ह्यांत आपला ऐवज गमावलेल्यांसाठी पोलिस आयुक्तालय एक आनंदाची बातमी घेऊन आले आहे. ५७३ तक्रारदारांना त्यांचा गेलेला ऐवज लवकरच परत मिळणार आहे.

पालकमंत्र्याच्या उपस्थितीमध्ये एका कार्यक्रमात हा ऐवज परत केला जाणार आहे. गुन्हेशाखेतील, पोलिस ठाण्यातील बेवारस वाहनांची देखील विल्हेवाट लावण्यात येणार असल्याची पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिली. शहरातील विविध पोलिस ठाण्यात चोरीय तसेच इतर गुन्ह्यांमध्ये आरोपींकडून हस्तगत करण्यात आलेला ऐवज पडून आहे. कोर्टाच्या आदेशाने सुपूर्तनामा मिळाल्यानंतर हा ऐवज संबधित तक्रारदाराला देण्याची पद्धत आहे. सध्या पोलिसांकडे अशा प्रकारचे ५७३ गुन्हे आहेत.

कोर्टाकडून आतापर्यंत १२५ सुपूर्तनामे पोलिसांना मिळाले आहेत. उर्वरित सुपूर्तनामे मिळवण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत. एकूण २५० सुपूर्तनामे मिळाल्यानंतर एका जाहीर कार्यक्रमात पालकमंत्र्याच्या उपस्थितीमध्ये हा ऐवज सबंधित तक्रारदाराला परत करणार असल्याची माहिती पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिली.

लॉच्या विद्यार्थ्यांची मदत

पोलिसांच्या वतीने सिनीयर सिक्युर‌िटी फेलोशीप उपक्रम राबवण्यात येत आहे. यामध्ये विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा देखील सहभाग आहे. या विद्यार्थ्यांच्या मदतीने कोर्टाकडून सुपूर्तनामे मिळवण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे.

वर्षअखेर पोलिस ठाणी बेवारस वाहन मुक्त

पोलिस ठाण्यांमध्ये असलेली बेवारस वाहने धूळ खात व गंजत पडून आहेत. या बेवारस वाहनांची देखील विल्हेवाट लावण्यात येणार आहे. पंधरा ऑगस्टपर्यंत गुन्हेशाखेतील शंभर दुचाकींचा कोर्टाच्या आदेशाने लिलाव करण्याचे प्रयत्न सुरू आहेत तसेच डिसेंबर अखेरीपर्यंत सर्वच पोलिस ठाण्यातील बेवारस वाहनांचा लिलाव करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कांद्याची पन्नाशी!

$
0
0

म .टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पावसाची दडी, नाशिक-लासलगावातच तेजीत झालेले लिलाव आणि अचानक कमी झालेली आवक यामुळे औरंगाबाद शहरात कांद्याचा वांदा झाला आहे. महागडा कांदा डोळ्यातून पाणी आणू लागला आहे. किरकोळ बाजारात कांद्याने चाळीशी पार केली असून, ठोक बाजारात क्विंटलमागे ३ हजार ४०० ते ३ हजार ६०० रुपयांपर्यंत विकला जात आहे.

औरंगपुरा, पीरबाजार, गजानन महाराज मंदिर परिसर, टी.व्ही.सेंटर आणि मॉलमध्ये किरकोळ कांदा सुमारे ४० ते ५० रुपये किलो दराने विकला जात आहे. हॉटेल व्यावसायिकांवरही त्याचा परिणामा झाला आहे. रोजच्या फोडणीतील कांदा-लसूण-अद्रक महागल्याने गृहिणीची चिंता वाढली आहे. औरंगाबाद कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी (दि. २९) ८० क्विंटल कांद्याची आवक झाली. सोमवारी व मंगळवारी कांद्याची आवक आषाढी एकादशीमुळे निम्म्याने घटली. रविवारी व गुरुवारी माल अधिक येऊनही कांद्याचे दर तेजीत आहेत. लासलगाव, सिन्नर, नाशिक आणि यावल येथून कांद्याची रोज आवक होत असते, परंतू ही आवक गेल्या तीन-चार दिवसांपासून घटली आहे. नाशिक जिल्ह्यात कांद्याचे भाव चार हजार रुपयांवर गेले असून, दिवाळीपर्यंत दर कमी होणार नसल्याचा अंदाज आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यापारी प्रभाकर पवार यांनी सांगितले की, कांद्याला येवला बाजारसमितीत ४ हजार ३००, नाशिक-पिंपळगावला ३ हजार ९०० रुपये क्विंटलमागे भाव मिळाला आहे.

किरकोळ भाव

कांदा - ४० ते ५० रुपये किलो

लसूण - ७० ते १०० रुपये किलो

अद्रक - ५० ते ६० रुपये किलो.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सैन्य भरती आता ऑनलाईनच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पुढील वर्षीपासून सैन्य भरती ऑनलाइन करण्यात येणार आहे. त्यामुळे दलाल, एजंटांच्या माध्यमातून तरूण, बेरोजगारांची फसवणूक होण्यास चाप बसेल. त्याचबरोबर भरतीच्या प्रक्रियेतील पारदर्शकता वाढणार आहे.

भरती प्रक्रियेत १ जुलै २०१५पासून विशेष बदल करण्यात आला आहे. आता ही प्रक्रिया आता ऑनलाइन होणार आहे. त्यासाठी प्रत्येक उमेदवाराला ऑनलाइन नावनोंदणी करावी लागेल. त्यानंतर उमेदवाराला कायमस्वरुपी नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड दिला जाईल. वयोमर्यादा पूर्ण होईपर्यंत हा नोंदणी क्रमांक कायम राहणार आहे. भरती प्रक्रियेत सहभागी होण्याची माहिती उमेदवाराला या क्रमांकाच्या आधारे वेबसाइटवर नोंदविणे बंधनकारक असेल. वेबसाइटवर नोंदविलेल्या माहिती प्रिंट काढून उमेदवाराला भरतीमध्ये सहभागी होता येईल.

नव्या पद्धतीने पहिली भरती मुंबईत होणार आहे. त्यानंतर टप्प्याटप्प्याने ही पद्धती देशभरात राबविली जाणार आहे. सैन्यात भरती होऊ इच्छिणाऱ्या तरुणांना www.joinindianarmy.nic.in या वेबसाइटवर नोंदणी करणे आवश्यक आहे. या नोंदणीसाठी शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र, वैयक्तिक माहिती, रहिवासी दाखला, ई-मेल आयडी आणि स्वत:चा मोबाइल क्रमांक आदींची नोंदणी आवश्यक आहे. वेबसाइटवर नोंदविलेली माहिती पुन्हा तपासावी आणि नंतर 'सेव्ह' करावी. त्यानंतर संबंधित उमेदवाराच्या माहितीची तपासणी केली जाईल. उमेदवार योग्य असल्यास त्याला भरतीसाठी बोलाविले जाईल. माहिती अपूर्ण असल्यास किंवा आवश्यक पात्रता नसल्यास नोंदणी रद्द करण्यात येईल.

ऑनलाइन भरतीची उत्सुकता

राष्ट्रीय स्तरावर ऑनलाइन नोंदणी १ जुलैपासून सुरू झाली. त्याविषयी तरुणांत कुतूहल आहे. पहिल्यात दिवशी सुमारे ५० हजार नागरिकांनी वेबसाइटला भेट दिली. महाराष्ट्रातून दरवर्षी ५६०० तरूण सैन्यामध्ये भरती होतात. भरतीसाठी दोन महिने अगोदर उमेदवार नाव नोंदणी करू शकतात. भरतीच्या १५ दिवसांपूर्वी नोंदणी बंद केली जाणार आहे. उमेरवाराला भरती प्रक्रियेसाठी एक ठराविक तारीख आणि वेळ दिली जाईल. त्यामुळे दलाल, एजंट यांना चाप बसेल, गर्दीही होणार नाही.

औरंगाबादेत झालेली सैन्य भरती सर्वांसाठी खुली आहे, पण यापुढे येथे खुली सैन्य भरती होणार नाही. आता ऑनलाइन भरती होईल. त्यामुळे उमेदवारांची गर्दी होणार नाही.

- ब्रिगेडिअर एन. के. खजुरिया, डेप्युटी डायरेक्टर जनरल रिक्रुटिंग हेडक्वार्टर (महाराष्ट्र, गुजरात व गोवा)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हर्सूल जेलच्या सुरक्षेत वाढ

$
0
0

याकूबचे भाऊ युसूफ व इसा तणावाखाली

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

याकूब मेमनचे दोन भाऊ इसा व युसूफ मेमन हर्सूल कारागृहात २०११ पासून ‌शिक्षा भोगत आहेत. याकूबच्या फाशीच्या पार्श्वभूमीवर हर्सूल कारागृहाच्या अंतर्गत व बाह्य सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.
इसा व युसूफ मेमन यांना चार वर्षांपूर्वी नाशिक कारागृहातून हर्सूल जेलमध्ये आणण्यात आले. मुंबई बाँबस्फोटातील आणखी चार आरोपी हर्सूल जेलमध्ये शिक्षा भोगत आहेत. कैद्यांना रोज वर्तमानपत्र दिली जातात. याकूबला फाशी देणार असल्याचे वृत्त त्याद्वारे त्यांच्यापर्यंत पोचल्याची माहिती सूत्रांनी दिली. ही माहिती समजल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून दोघे मानसिक तणावाखाली आहेत. याकूबला गुरुवारी फाशी देण्याचे निश्चित झाले. त्यामुळे बुधवारी सायंकाळपासून हर्सूल कारागृहातील अंतर्गत सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. या दोघांना स्वतंत्र बरॅकमध्ये ठेवण्यात आले आहे. त्यांच्यावर कारागृह प्रशासनाची करडी नजर आहे. त्याचप्रमाणे कारागृहाच्या बाहेरील बाजूसही मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. चारही बाजुंनी शस्त्रधारी पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

४० हजार जणांनी काढला यूएएन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना 'ईपीएफओ'कडून 'एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंड अँड मिस्लेनियस प्रोव्हिजन्स कायदा, १९५२' अंतर्गत येणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांकडे 'युनिव्हर्सल अकाउंट नंबर (युएएन)' असणे अनिवार्य करण्यात आले आहे. हा १२ अंकी पोर्टेबल नंबर आहे. पीएफच्या औरंगाबाद कार्यालयातून सुमारे १ लाख १ हजार ४२४ जणांनी युएएननंबरसाठी आधार कार्ड नंबर दिले आहेत तर ४० हजार ५६६ जणांनी युएएन नंबर देऊन त्यांचे अकाउंट अॅक्टिव्हेट केले आहे, अशी माहिती आयुक्त सुधीर गणवीर यांनी बुधवारी (२९ जुलै) दिली. कार्यालयांतर्गत मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांचा समावेश आहे. अद्यापही सुमारे २ लाख ५० हजार जणांनी युएएन नंबर काढलेला नाही. तो लवकरात लवकर काढावा, असे आवाहनही पीएफ कार्यालयाकडून करण्यात आले आहे.

शासनाच्या अभियानाच्या माध्यमातून यूएएन क्रमांक कसा सुरू करायचा? त्याचे फायदे काय? याबाबत जनजानगृती सुरू आहे. कामगार आणि आस्थापनांत जनजागृती करण्यासाठी कामगार संघटना आणि आस्थापना व्यवस्थापन प्रतिनिधींना एकत्रित करून माहिती देण्याचा प्रयत्न शासन करत आहे, असेही गणवीर यांनी सांगितले.

फायदा काय?

सर्व कर्मचाऱ्यांना युएएन अावश्यक केल्याने एखाद्या कर्मचाऱ्याला नोकरी बदलल्यानंतरदेखील नव्या कंपनीबरोबर परत एकदा पेन्शन प्रक्रिया सुरू करण्याची गरज पडणार नाही. पहिल्या नोकरीच्या वेळी खात्यात जमा झालेला निधी थेट नव्या खात्यात जमा करता येणार आहे. या योजनेचा बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांना विशेष फायदा होणार आहे. या कामगारांना एक प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या प्रकल्पासाठी स्थलांतर करावे लागते. अशावेळी भविष्यनिर्वाह निधी युएएनमुळे एकाच खात्यात जमा करणे शक्य होणार आहे.

नंबरसाठी काय करावे?

औरंगाबादेत अजून ७० टक्के कंपन्या व कर्मचाऱ्यांनी त्यांचे युएएन नंबर काढलेले नाहीत ते काढण्यासाठी सिडको एन-१ मधील पीएफ ऑफिस कार्यालयात भेटावे, सकाळी ७ ते रात्री १० पर्यंत आधारकार्ड, बँकेचे अकाउंट नंबर आणि पॅन नंबर आणून द्यावेत. युएएनचा वापर करून पीएफ क्लेमसाठी बँक खाते क्रमांक आवश्यक आहे. ज्या सदस्यांकडे युएएन आहे, परंतु त्यांनी बँक खाते क्रमांक दिलेला नाही अशा खातेधारकांना युएएन अॅक्टिवेट करून ऑनलाइन व्यवहार करता येणार आहे. ज्यांनी युएएन नंबर काढला नाही त्यांनी व त्यांच्या कंपन्यांनी पीएफ कार्यालयाशी संपर्क साधावा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पोलिस महासंचालकांना नोटीस

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद

राज्य शासनाच्या विविध विभागांचे बनावट लेटरहेड बनवून नियुक्तीचे पत्र देऊन कोट्यवधी रुपयांना बेरोजगार तरूणांना गंडविण्यात आले. या प्रकरणाचा तपास गुन्हे अन्वेषण विभाग (सीआयडी) अथवा केंद्रीय गुप्तचर विभागामार्फत (सी बीआय) करण्यात यावा अशी विनंती करणाऱ्या याचिकेत मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. संभाजी शिंदे व न्या. ए. आय. एस. चिमा यांनी राज्याच्या पोलिस महासंचालकांसह इतर पाच जणांना नोटीस बजावली आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील बेरोजगार तरूणांसह राज्यातील इतरांना २०१३मध्ये शासकीय नोकरी लावण्याचे अमिष दाखवून शिवाजी डापके, जितेंद्र दौड, युसुफ पठाण व इतर एका आरोपीने कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केला.

बेरोजगार तरुणांच्या पालकाकडून प्रत्येकी पंधरा ते तीस लाख रूपये घेण्यात आले होते. राज्य शासनाचा लोगो असलेल्या बनावट पत्रावर नियुक्त्या प्रदान करण्यात आल्या होत्या. नोकरी न मिळाल्याने अनेक उमेदवारांचे पैसे १३, २६ लाख व दोन कोटी रुपयांच्या धनादेशाद्वारे परत करण्यात आले, परंतु हे धनादेश वटले नव्हते. याविरोधात सिल्लोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर चौघांविरुद्धच भादवि ४२० , ४६८, ४७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. गंडविल्या गेलेल्या उमेदवारांपैकी एक संभाजी डमाळे यांनीदेखील फिर्याद दिली होती, परंतु पोलिसांनी त्यांना साक्षीदार बनविले होते. फिर्यादी प्रभाकर डापके यांनी गुन्हा दाखल केला.

प्रत्येक आरोपीविरूद्ध स्वतंत्र एफआयआर दाखल करावा व गुन्ह्याचा तपास सिल्लोड पोलिसांकडून काढून सीआयडी अथवा सीबीआयमार्फत करावा अशी विनंती याचिकेत करण्यात आली आहे. याचिकाकर्त्यातर्फे अभयसिंह भोसले हे काम पाहत आहेत. शासनातर्फे सहायक सरकारी वकील सुनील काळदाते यांनी बाजू मांडली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोन चिमुकल्यांसह परिस्थितीशी सामना

$
0
0

विजय चौधरी, खुलताबाद

ही कहानी आहे, एका बंदिनीची (नाव बदलले आहे). पहिल्या नवऱ्याने व माहेरच्यांनीही नाकारल्यानंतर आयुष्य सावरण्यासाठी तिने दुसऱ्यावर प्रेम केले. मात्र त्यानेही पाठ फिरवली. आज ती दोघांकडून झालेल्या दोन चिमुकल्या मुलांसह परिस्थितीला खंबीरपणे तोंड देत आहे. राहण्यासाठी घर मिळत नसल्याने ती वेरूळ येथे रस्त्याकडेला दिवस राहत आहे.

खुलताबाद तालुक्यातील ही बंदिनी अवघ्या ३१ वर्षाची आहे. जेमतेम बारावीपर्यंत शिक्षण झालेले; वडिलांची परिस्थिती बेताचीच होती. शाळेतील प्रत्येक स्पर्धेत भाग घेत होती. शाळेतील शिक्षकाच्या मुलीसोबत अभ्यासात कायम स्पर्धा होती. शिक्षक किंवा प्राध्यापक व्हायचे तिचे स्वप्न होते. इयत्ता नववीत असताना राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिरात एक हजार रुपये मिळाले, ते पैसे वडिलांनी घरखर्चासाठी मागितले. पण पुस्तक, वह्यांची गरज असून पैसे देणार नाही, असा बाणा तिने दाखवला. वडिलांनी रागाच्या भरात तिला फुंकणीने मारले. स्त्रिया दुय्यम असतात, हा धडा मिळाला. दहावी परीक्षेत शिक्षकाच्या मुलीसोबत अव्वल स्थान पटकावले. वर्गमैत्रिणींचे वडील, त्या शिक्षकाने आसुयेपोटी 'तुमची मुलगी मोठी झाली, तिच्याकडे लक्ष असू द्या,' असे वडिलांना सांगितले. त्यानंतर तिच्यावर घरच्यांची पाळत सुरू झाली. अगदी सकाळी शौचाला जाण्यापासून ते कॉलेजपर्यंत वडील सोबतच येऊ लागले. बारावीनंतर घराबाहेर पडणे बंद करण्यात आले. वडिलांनी स्थळ पाहून लग्न लावून दिले. वर्ष-सहा महिन्यात सासरी हुंड्यासाठी छळ सुरू झाला. लग्नात फक्त आठ मणी आणले, अशी टिंगल केली जायची. माहेरच्यांनी तेच तुझे घर आहे, असे सांगून साथ सोडली. पोटात बाळ असताना सासरच्यांनी घराबाहेर हाकलून दिले. या अवस्थेत ही बंदिनी वेरूळला आली. मुंबई हायवेवर अज्ञात वाहनाने धडक दिल्यानंतर गंभीर जखमी झाली. तब्बल तीन महिने उपचार मिळाले नाहीत. या काळात एका तरुणाशी ओळख झाली, ओखळीचे रुपांतर प्रेमात झाले. ते दोघे लग्न न करता एकत्र राहू लागले. तिने पहिल्या अपत्याला (मुलगा वय दहा वर्ष) पहिल्या नवऱ्याचे नाव दिले. दुसरी मुलगी झाली, तिला प्रेमीचे नाव लावले आहे. ही मुलगी आता पाच वर्षाची आहे. मात्र, प्रियकराने दुसऱ्या मुलीशी लग्न करून हिला पुन्हा एकटे केले. दोन मुलांचे पालनपोषण, चांगले संस्कार, शिक्षण द्यायचे ही जिद्द तिच्यात आहे. मुलांना शाळेत घातले असून उदरनिर्वाहासाठी शासकीय आरोग्यसेवेत काम करते. बेघरांसाठी घरकूल योजना असूनही तिला घर मिळत नाही. ही महिला वेरूळमध्ये दोन मुलांना घेऊन उघड्यावरच राहत आहे. या परिस्थितीतही तिने जिद्द सोडलेली नाही. मुलांना शिकवून त्यांचे आयुष्य सावरण्यासाठी तिची एकटीची लढाई सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकने रोखल्या सिटी बस

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहरात १५ सिटी बस वाढविण्याचा निर्णय घेतला होता. त्यापैकी ५ बस सेवेत दाखल झाल्या, मात्र नाशिक विभागातून अद्याप १० बस देण्यात आल्या नाहीत. औरंगाबादसाठी बस देण्याचे आदेश महिन्यापूर्वी दिले होते. त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचे चित्र आहे.

नागरिकांच्या सोयीसाठी सिटी बससेवेचा विस्तार करावा, अशा सूचना पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी एसटीच्या अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. त्यानंतर या सेवेत १५ बस वाढविण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला. त्यानुसार ग्रामीण भागासाठी चालविण्यात येत असलेल्या ५ बसची फेरबांधणी करण्यात आली. या बस काही दिवसांपूर्वीच सेवेत आल्या आहेत. त्यामुळे सिटी बसची संख्या आता ४६ झाली.

एसटी महामंडळाने औरंगाबादसाठी तत्काळ १० बस द्याव्यात, असे आदेश नाशिक विभागाला महिन्यापूर्वी दिले होते, मात्र अद्याप या बस शहरात पोचल्या नाहीत. याबाबत नाशिक येथील एसटीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार; औरंगाबाद शहरासाठी १० बस देण्याचे आदेश मिळाले आहेत, मात्र नाशिकमध्ये सध्या सिंहस्थ कुंभमेळा सुरू आहे. त्यामुळे तेथून औरंगाबादसाठी १० बस देणे शक्य नाही. या बस शहर बस सेवेसाठी देण्यात आल्या आहेत. तर महामंडळाने पंधरा नवीन गाड्या शहर बसच्या ताफ्यात वाढविण्याचा निर्णय घेतला होता.

तोटा ५ कोटींवर

औरंगाबाद शहरात गेल्या चार वर्षांपासून सिटी बस सेवा सुरू आहे. या सेवेमुळे एसटी महामंडळाला आतापर्यंत सुमारे पाच कोटींवर तोटा सहन करावा लागला आहे. या बस सेवेवर गेल्या ४ वर्षांत विविध प्रयोग करण्यता आले आहे. यात अनेक मार्गावर शहर बस सेवा सुरू करून काही काळानंतर बंद करण्यात आली. सिटी बसची खात्री नसल्यामुळे नागरिकांनी या सेवेकडे पाठ फिरविल्याचे चित्र आहे. पोलिस आयुक्तांनी शहरातील अवैध वाहतूक बंद केल्यामुळे सिटी बसचा वापर करणाऱ्या नागरिकांची संख्या वाढली असल्याचे एसटीच्या सूत्रांनी सांगितले.

''औरंगाबाद विभागासाठी १० लाल रंगाच्या बस देण्याबाबत सूचना प्राप्त झाली आहे. सध्या नाशिकमध्ये सिंहस्थासाठी विशेष गाड्या देण्यात आल्या आहेत. येत्या आठवडाभरात औरंगाबादसाठी १० बस देण्यात येतील.''

- मिलिंद बंड, प्रादेशिक व्यवस्थापक, नाशिक विभाग.

शहरात ४७ सिटी बसच्या रोज ७५० फेऱ्या

औरंगाबाद शहरात पाच कन्व्हर्जन बस देण्यात आल्या आहेत. आता सिटी बसच्या ताफ्यात ४७ बस झाल्या आहेत. नवीन बस आल्यानंतर मिटमिटा ते बाबा पेट्रोल पंप ते सिडको, वाळूज महानगर, बजाजनगर ते सिडको, ‌औरंगपुरा ते शिवाजीनगर, देवळाई, चिकलठाणा - जय‌भवानीनगर - रोपळेकर - क्रांतिचौकमार्गे औरंगपुरा, हर्सूल टी पाइंट - सिडको - क्रांतिचौक - उस्मानपुरामार्गे रेल्वे स्टेशन या सेवा सुरू करण्यात आल्या आहे. सध्या शहरात सिटीबसच्या रोज ७५० फेऱ्या होत आहेत. पूर्वी सिटी बस सेवेला प्रतिसाद कमी होता. आता त्यात वाढ होत असल्याचेच्या सूत्रांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

किमान वेतनात सरासरी दुपटीने वाढ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

राज्यातील विविध उद्योग, व्यवसायांत काम करणाऱ्या कामगारांच्या किमान वेतनात सरासरी दुप्पट वाढ करण्यात आली आहे. या प्रस्तावाला राज्याच्या किमान वेतन मंडळाने नुकतीच मंजुरी दिली असून, वाढीव किमान वेतन दराची शिफारस राज्य सरकारकडे करण्यात आली आहे.

किमान वेतन सल्लागार मंडळाची आठवी राज्यस्तरीय बैठक नुकतीच मुंबईत झाली. यात कांदे साफ करणारे, निवडून काढणारे कामग यांच्यापासून मद्य उत्पादन, बेकरी कामगार आदींना अत्यंत कमी दराने वेतन देण्यात येत. त्यामुळे किमान वेतनात वाढ वाढ करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. डिसेंबर २०१५पासून वाढीव किमान वेतन दर लागू करावेत, अशी शिफारस मंडळाने राज्य सरकारकडे केली आहे.

मंडळाचे नवे अध्यक्ष सय्यद अली अश्रफ, खासदार आनंदराव आडसूळ, आमदार आनंद गेडाम, निवृत्ती देसाई, शाम म्हात्रे, अॅड. रवींद्र पाटील, कामगार आयुक्त संभाजी व्हनाळकर, सदस्य सुभाष देवकर, बळवंतराव पवार, वसंत जाधव आदी उपस्थित होते. किमान वेतन अधिनियम १९४८अंतर्गत अनुसूचित उद्योगांत किमान वेतन दिले जात नसल्यास याबाबत वेतन सल्लागार मंडळाकडे लेखी तक्रार करावी, असे आवाहन करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोफत अंत्यसंस्कार योजनेला संजीवनी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने सुरू केलेली 'मोफत अंत्यसंस्कार योजना' वाचवण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांनी पुढाकार घेतला आहे. स्वतःच्या विकास निधीतून प्रत्येकी पंचवीस हजार रुपये या योजनेसाठी देण्याची तयारी नगरसेवकांनी केली आहे.

अडीच वर्षांपूर्वी तत्कालीन उपमहापौर संजय जोशी यांच्या कल्पनेतून महापालिकेत मोफत अंत्यसंस्कार योजना सुरू करण्यात आली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनी या योजनेचा शुभारंभ करण्यात आला व योजनेलाही शिवसेनाप्रमुखांचे नाव देण्यात आले. अडीच वर्ष ही योजना सुरळीत चालल्यानंतर अचानक या योजनेत प्रशासकीय अडथळे निर्माण झाले. आर्थिक तरतूद नसल्यामुळे या योजनेने अंतिम घटिका मोजण्यास सुरुवात केली. या योजनेअंतर्गत ज्या व्यक्तीवर अंत्यसंस्कार केले जातात त्या व्यक्तीच्या अंत्यसंस्कारासाठीची लाकडे, गोवऱ्या मोफत पुरवल्या जात होत्या. लाकडे व गोवऱ्यांचे पैसे महापालिका देत होती. हे पैसे स्मशानजोगींच्या माध्यमातून संबंधित व्यापाऱ्यांना दिले जायचे. त्यातून स्मशानजोगींनाही काही रक्कम मिळत होती. एक वर्षापासून या योजनेला आर्थिक तरतूद नाही आणि ६ जून पासून महापालिकेच्या प्रशासनाने ही योजना बंद करून टाकली.

बंद केलेल्या योजनेबद्दल २० जुलै रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत चर्चा झाली, पण त्यावर काहीच निर्णय झाला नाही. त्यामुळे ही योजना वाचवण्यासाठी भाजपच्या नगरसेवकांनी पुढाकार घेण्याचे ठरवले आहे. विकास निधीतून प्रत्येकी पंचेवीस हजार रुपये मोफत अंत्यसंस्कार योजनेसाठी देण्याची तयारी भाजपच्या नगरसेवकांनी केली आहे. महापालिकेत भाजपचे २३ नगरसेवक आहेत. या सर्वांचे प्रत्येकी पंचेवीस हजार रुपये मोफत अंत्यसंस्कार योजनेसाठी द्यावेत, असे पत्र भाजपतर्फे तयार करण्यात आले आहे. हे पत्र आयुक्तांना दिले जाणार आहे.

नागरिकांचा असहकार

मोफत अंत्यसंस्कार योजनेचा लाभ गरिबांनी घ्यावा आणि इतरांनी यथाशक्ती दान द्यावे, असे महापालिकेला अपेक्षित होते. त्यासाठी स्मशानभूमींमध्ये दानपेट्याही ठेवण्यात आल्या होत्या. तथापि, आर्थिकदृष्ट्या सक्षम नागरिकांनीही या योजनेचा मोफत लाभ घेतला. त्यामुळे ही लोकोपयोगी योजना अडचणीत आली.

वर्षाला अडीच कोटींचा खर्च

मोफत अंत्यसंस्कार योजनेसाठी वर्षाला अडीच कोटी रुपयांचा खर्च येत होता. एका मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी तीन ते साडेतीन हजारांचा खर्च अपेक्षित होता. २३ नगरसेवकांनी प्रत्येकी २५ हजार रुपये दिले, तर पाच लाख ७५ हजार रुपये जमा होतील. या रकमेतून एक किंवा दोन स्मशानभूमीत मोफत अंत्यसंस्कार योजना राबवता येईल, असे बोलले जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images