Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

खेळाडू दुर्लक्षाचे धनी

$
0
0

डॉ. उदय डोंगरे, प्रभारी क्रीडा संचालक, डॉ. बा.आं. म.विद्यापीठ.

तरुणांचा देश म्हणून भारताची ओळख आहे. अमेरिका, रशिया, चीन या देशांचे जागतिकस्तरावर प्राबल्य आहे. त्यांचे प्राबल्य क्रीडा क्षेत्रातही जाणवते. याचाच अर्थ जागतिक महासत्तेची वाटचाल ही क्रीडांगणावरून व खेळाडूंच्या मार्फत होऊ शकते, असे म्हटले तर ते वावगे ठरू नये. स्वभावाने चंचल असलेल्या युवा पिढीला शिस्त व योग्य दिशा दाखवण्याचे काम क्रीडांगणावर प्रभावीपणे घडू शकते. गेल्या १५ वर्षांच्या कालावधीत आंतरराष्ट्रीय पातळीवर भारतीय खेळाडूंनी विविध क्रीडा प्रकारांत आपला दबदबा निर्माण केला आहे. ऑलिम्पिक स्पर्धेत एखादे पदक जिंकले तरी समाधान मानणारे आपण आता एकाहून अधिक पदके जिंकताना दिसत आहेत, परंतु हा आकडा भारताच्या लोकसंख्येच्या प्रमाणात व आपण पाहिलेले जागतिक महासत्ता बनण्याचे स्वप्न या तुलनेने समाधानकारक निश्चितच नाही. लंडन ऑलिंपिकमध्ये पदक तालिकेत भारताचे स्थान पहिल्या ५० देशांमध्येही नाही ही अतिशय खेदजनक बाब आहे. यासाठी सामूदायिक प्रयत्न करणे गरजेचे आहे.

सर्वोत्कृष्ट खेळाडू तयार करणे ही प्रक्रिया निरंतर चालणारी आहे आणि तपश्चर्येची आहे. पदक विजेता खेळाडू काही एका दिवसात घडत नाही आणि आंतरराष्ट्रीय, ऑलिम्पिक दर्जाचा तर निश्चितच नाही. ऑलिम्पिकमधील बहुतांश क्रीडा प्रकार भारतात रुजत आहेत. अनेक प्रतिभावंत खेळाडू घडताना दिसतात, परंतु राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत पदक जिंकल्यानंतर व राष्ट्रीय पातळीवर सहभाग घेतल्यानंतर खेळाडूंची गळती होण्याचे प्रमाण अधिक आहे. ही गळती का होते हा निश्चितच संशोधनाचा विषय आहे. चांगल्या कामगिरीनंतर खेळाडू उच्च दर्जाच्या स्पर्धा खेळू लागतो, तस-तशा त्याच्यासमोर अनेक आव्हाने उभी राहातात. त्यात महागडे क्रीडा साहित्य, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचा न पेलावणारा खर्च, उच्च दर्जाच्या सुविधांयुक्त प्रशिक्षण केंद्र, तज्ज्ञ क्रीडा प्रशिक्षकांचा अभाव, प्रायोजकांची उदासिनता या सर्व आव्हानांना खेळाडूंना तोंड द्यावे लागते. शिक्षणाकडे दुर्लक्ष करून मैदानावर अधिक वेळ दिल्यामुळे भविष्यात करिअरचा उद‍्भवणारा यक्ष प्रश्न सर्वाधिक प्रमाणात खेळाडू आणि त्यांच्या पालकांना भेडसावतो. खेळ संपल्यावर पोटा-पाण्याचे काय? या प्रश्नाकडे सर्वजण सोयीस्करपणे दुर्लक्ष करतात.

खेळाची तोंड ओळख, प्राथमिक प्रशिक्षण व त्यासाठी आवश्यक असलेले क्रीडा साहित्य सहजगत्या आपल्याकडे उपलब्ध होते, परंतु खेळाडू त्या खेळात प्रगती करू लागला की त्यास आधुनिक क्रीडा साहित्यांची आवश्यकता भासते आणि बहुतांश खेळांकडे ती नाहीत. तलवारबाजी, रायफल शुटिंग, तिरंदाजी अशा काही खेळांची आधुनिक साधने ही लाखोंच्या घरात आहेत. प्रामुख्याने खेळाडू हे मध्यमवर्गीय असल्याने त्यांना एवढा खर्च निश्चितच परवडत नाही. राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये देखील अशा सुविधा नाहीत. अशा परिस्थितीत खेळाडूंना पुणे, नाशिक, नागपूर, कोल्हापूर, ठाणे या शहरांकडे धाव घ्यावी लागते, परंतु मोठ्या शहरांमध्ये सरावासाठी जाऊन राहणे ही मोठी खर्चिक बाब आहे आणि हा खर्च बहुतांश खेळाडूंच्या आवाक्याबाहेरचा असतो. विभागीय क्रीडा संकुले असलेल्या शहरांमध्ये व त्यातील मोठ्या क्रीडा संकुलांनी आता व्यावसायिकता अंगीकारली आहे. शासनाकडूनही देखभालीसाठी त्यांना निधी मिळत नाही. त्यामुळे सर्रास फी वसुलीचे काम केले जाते. मग वजन कमी करण्यासाठी येणारे हौशी नागरिक व गुणवान खेळाडू यात काहीच फरक केला जात नाही. राष्ट्रीय पदक विजेता खेळाडू असो की आंतरराष्ट्रीय खेळाडू असो, त्यास मोफत सराव करण्याची संधी या संकुलांमध्ये मिळत नाही. शासनाने विविध योजनांच्या माध्यमातून शाळा, महाविद्यालयात, तालुक्यात, जिल्ह्यांमध्ये क्रीडा संकुलाची उभारणी केली आहे, परंतु त्याचा उपयोग हा केंद्रित आहे का, हाच प्रश्न आहे. देखभाल खर्चासाठी अधिक पैसे मोजणाऱ्या हौशी लोकांना प्राधान्य दिले जाते. खेळाडूंना या सर्व ठिकाणी पैसे मोजावेच लागतात. या सर्व क्रीडा संकुलात किती दर्जेदार खेळाडू खेळतात याचा अभ्यास व्हायलाच हवा. पदक विजेत्यांना प्रोत्साहन दिले जायला हवे. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय, ऑलिम्पिक पदक विजेते खेळाडू घडवणे, क्रीडा संस्कृती रुजवणे हा उद्देश या संकुलात सद्यस्थितीत मागे पडताना दिसत आहे.

क्रीडा साहित्य, आधुनिक प्रशिक्षण केंद्र, प्रशिक्षक या अडचणींवर मात करूनही खेळाडू आंतरराष्ट्रीय पातळीवर झेप घेतात. राष्ट्रीय पातळीवर पदके जिंकून भारतीय संघात स्थान मिळवितात. एवढे करूनही त्यांच्या पाठीमागचे शुक्लकाष्ठ काही संपत नाही. विदेशात खेळाडूंवर विशेष लक्ष दिले जाते आणि ते त्या देशांचे बलस्थानही आहे. या गोष्टींपासून भारतीय खेळाडू कोसो दूर आहेत. भारताला ऑलिंपिकमध्ये पदके कमी मिळतात यावर सातत्याने ओरड होताना दिसते, परंतु खेळाडूंना पावलो-पावली अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागते आणि त्यासाठी कोणीही गांभीर्याने प्रयत्न करताना दिसत नाही हिच मोठी शोकांतिका आहे.

'सीएसआर'मधून खेळांसाठी मदत व्हावी

आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी लागणारा खर्च उभा करण्याचे आव्हान खेळाडूंसमोर उभे राहते. निधीसाठी प्रायोजकांचे उंबरठेही खेळाडूंना झिजवावे लागतात. उद्योगांसाठी 'सीएसआर' फंडची योजना आहे. त्या अंतर्गत क्रीडा क्षेत्राच्या वृद्धीसाठी चांगले उपक्रम हाती घेता येऊ शकतात. शासनाचे क्रीडा खाते, उद्योग विभाग, उद्योजक आणि क्रीडा संघटना यांच्यात योग्य समन्वय नसल्याने मोठी निराशा हाती येते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मुंबईकरांनो, मराठवाड्यात जाताना पाणी घेऊन जा!

$
0
0

औरंगाबाद : मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त भागात जाणाऱ्या प्रवाशांनी आपल्यासोबत शक्य तेवढे पाणी घेऊन जावे, असे आवाहन मुंबईतील काही संवेदनशील नागरिकांनी केले आहे. मुंबई विद्यापीठाच्या एनएसएस विभागाकडूनही या उपक्रमाला हातभार लावला जाणार आहे.

मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त भागात पिण्याचे पाणी दुर्मिळ झाले आहे. विशेषत: बीड, लातूर, उस्मानाबाद आणि परभणी जिल्ह्यांच्या ग्रामीण भागात पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई विद्यापीठातील बहि:शाल मंडळाच्या संचालिका मुग्धा कर्णिक यांनी गेल्या वर्षी काही तरुणांनी मांडलेली कल्पना कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांच्या कानावर घातली. मुंबईतून मराठवाड्यात जाणाऱ्या प्रवाशांनी शक्य तेवढे पाणी बाटल्यांमध्ये भरून ते गरजूंपर्यंत पोचवावे, अशी ही कल्पना आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यापीठ फंडातून पदनिर्मितीचा निर्णय रद्द

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

विद्यापीठ फंडातून सात पदे भरण्याचा निर्णय डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ प्रशासनाने मागे घेतला आहे. व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. माहिती अधिकारी, डायरेक्टर ऑफ मीडिया, डॉयरेक्टर ऑफ पब्लिकेशन आदी सात पदांची निर्मिती करण्यास परिषदेनच मंजुरी दिली होती. यावर ओरड होताच पदनिर्मितीचा निर्णय मागे घेण्यात येत असल्याचे प्रशासनाने जाहीर केले.

विद्यार्थ्यांच्या सोयी सुविधांकडे दुर्लक्ष करणाऱ्या प्रशासनाने विद्यापीठ फंडातून पदनिर्मितीचा सपाटा लावला होता. १६ ऑगस्ट रोजी झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत अशाच सात पदे भरण्यास मंजूरी देण्यात आली. वसतिगृह शुल्कमाफी, कमवा व शिका योजनेतील मानधनात वाढ करताना पुरेसा निधी नसल्याची ओरड करणाऱ्या प्रशासनाच्या या निर्णयावर सर्वचस्तरातून ओरड सुरू झाली. अनेक संघटनांनी याबाबत कुलगुरूंना निवेदने सादर करत असे प्रकार थांबविण्याची विनंती केली. पदांमध्ये माहिती अधिकारी, डायरेक्टर ऑफ मीडिया, डॉयरेक्टर ऑफ पब्लिकेशन यासह मुलांचे व मुलींच्या वसतिगृहात प्रत्येकी दोन अधीक्षक नेमण्यात येणार होते. माहिती अधिकारातील प्रकरणांची संख्या वाढली आहे. त्यासाठी माहिती अधिकारी तर माध्यमांना माहिती देण्यासाठी डॉयरेक्टर ऑफ मीडिया असे पद निर्माण केले होते. अखेर पदनिर्मितीचा निर्णय रद्द करण्यात येत असल्याचा निर्णय शनिवार (२९ ऑगस्ट) रोजी झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत घेण्यात आला.

तत्कालिन परीक्षा नियंत्रक डॉ. सुरेश गायकवाड यांच्या मुलाच्या गुणवाढ प्रकरणाबाबत विद्यापीठाने नेमलेल्या संजय निंबाळकर समितीचा अहवाल बैठकीत ठेवण्यात आला. त्याला मंजूरी मिळाली. समितीने दिलेल्या अहवालाबाबत स्पष्टता नसून प्रशासनामध्येही संभ्रमता आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातर्फे दरवर्षी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने आंतरराष्ट्रीय पुरस्कार देण्यात येणार आहे. सामाजिक क्षेत्रात आंतरराष्ट्री पातळीवर काम करणाऱ्या व्यक्तीला हा पुरस्कार दिला जाणार आहे. २५ लाख रुपये रोख, सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरुप असणार आहे.

सुक्या मेव्यावर ताव

दुष्काळाची परिस्थिती सांगत युवक महोत्सव रद्द करण्याची घोषणा प्रशासन, अधिकार मंडळ घेते. त्याचवेळी बैठकीमध्ये प्रशासकीय अधिकारी आणि मंडळ सदस्य मात्र, सुक्या मेव्यावर ताव मारत होते. बैठकीतील सदस्यांसाठी अंजिर, पिस्ता, काजु, बदामच्या प्लेट ठेवण्यात आल्या. यासह खान्यासाठी चॉकलेटही ठेवण्यात आली होती. कर्मचाऱ्यांमध्ये याबाबत चर्चा रंगली होती.

युवक महोत्सव, स्नेहसंमेलन रद्द

मराठवाड्यात दुष्काळजन्य परिस्थिती असल्याने यंदाचा युवक महोत्सव रद्द करण्यात येत असल्याचा निर्णयही घेण्यात आला. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारे व्यासपिठ म्हणून युवक महोत्सवाकडे पाहिले जाते. कॉलेजांमध्ये होणारी स्नेहसंमेलने घेण्यात येऊ नयेत याबाबत कॉलेजांना कळविण्यात येणार असल्याचे प्रशासनातर्फे सांगण्यात आले.

आजच्या बैठकीत पदभरतीचा मुद्दा ठेवण्यात आला होता. पदभरतीला देण्यात आलेली मंजूरी रद्द करत ही प्रक्रिया थांबविण्याचा निर्णय झाला.

- डॉ. बी.ए. चोपडे, कुलगुरू, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाण्याचा फटका साखर कारखान्यांना

$
0
0

म.टा.विशेष प्रतिनिधी,औरंगाबाद

दुष्काळी परिस्थिती मराठवाड्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या डोळ्यांमध्ये पाणी आणणारी आहे. मराठवाड्यातील तब्बल २४ साखर कारखाने बंद असून त्यांना सुरू करण्यासाठी प्रयत्नही होताना दिसत नाही. दुष्काळामुळे साखर कारखाने राज्य सरकारने चालू ठेवावीत अशी मागणी मराठवाड्यातील कारखानदारांनी केली आहे.

राज्य सहकारी बँकेच्या सभागृहात मराठवाड्यातील सहकारी व खासगी साखर कारखानदारांची बैठक झाली. त्यात एकमुखाने राज्य सरकारकडे साकडे घातले आहे. तीन वर्षांपूर्वी मराठवाड्यातील शिल्लक ऊस जनावरांना चारा म्हणून विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली होती. यंदाही तीच वेळ येणार आहे. मराठवाड्यातील तब्बल २४ साखर कारखाने बंद असून त्यांना सुरू करण्यासाठी प्रयत्नही होताना दिसत नाही. औरंगाबाद व नांदेड या दोन विभागात तब्बल २ लाख २४ हजार टन ऊस शेतात उभा आहे. पाण्याअभावी मराठवाड्यातले सर्व कारखाने पूर्ण क्षमतेने चालण्याची शक्यता नाही. त्यातच २४ साखर कारखाने बंद पडल्याचा फटका बसणार तो वेगळाच असेल असे दांडेगावकर यांनी 'मटा'शी बोलतांना सांगितले.

मराठवाड्यातील कारखान्यात १२० लाख साखर गोदामात आहे. आज मराठवाड्यात असलेल्या साखर कारखान्यांतून गेल्या हंगामात १९८ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप झाले आहे. यंदा त्यापेक्षा निम्मे गाळप होण्याची भिती दांडेगावकर यांनी व्यक्त केली. साखर कारखान्याच्या यंदाच्या गळीत हंगामासाठी पूर्वहंगामी आणि अल्पमुदतीचे कर्ज व त्यावरील व्याजास थकहमी देण्यास राज्य सरकारने हमी घेतली नाही. जून व जुलैमध्ये गळीत हंगाम सुरू करण्याआधी कामगारांना कमिशन दिले गेले नाही अशी चर्चा कारखान्याच्या संचालकांनी आजच्या बैठकीत केली.

गेल्या हंगामात २५ सहकारी व २७ खासगी कारखान्यात गळीत झाले होते. पाण्याचा प्रश्न बिकट असल्याचा फटका यंदा चांगलाच बसणार आहे.जायकवाडी धरणात अत्यल्प साठा आहे. मराठवाड्यातील सर्व प्रकल्पांमध्ये केवळ आठ टक्के उपयुक्त जल साठा आहे. उस्मानाबाद, लातूर या मोठे ऊस क्षेत्र असलेल्या जिल्ह्यांत सरासरी २५ टक्के पाऊस झाला. मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात ५० टक्क्यापेक्षा कमी पावसाची नोंद झाली आहे.

साखरेचे दर घटल्याने, कारखान्यांना ऊस उत्पादकांना एफआरपीप्रमाणे रक्कम देता आली नाही. केंद्र व राज्य सरकारने कारखान्यांना अनुदान दिले नाही. त्यामुळे अनेक कारखाने पुढील हंगामात सुरू होणार नाहीत.आता पाऊस कमी असल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत.

- जयप्रकाश दांडेगावकर, उपाध्यक्ष, राज्य साखर संघ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुष्काळामध्ये काँग्रेसच्या दुफळीचा सुकाळ

$
0
0

अरुण समुद्रे, लातूर

मराठवाड्यातील लातूर, उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्यातील पाणी आणि चाराटंचाईमुळे दुष्काळ आहे. त्याचा फायदा परवापर्यंतचे सत्ताधारी आजचे विरोधक म्हणून स्थिरस्थावर होत असलेले दोन्ही काँग्रेसचे नेते घेऊ पाहत आहेत. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी मराठवाड्यातील दुष्काळी भागाला भेट देऊन प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला. या दुष्काळ पाहणी दौऱ्यातून काँग्रेसमधील दुफळीच दिसून आली.

काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी लातूर जिल्ह्यातील दुष्काळी भागाचा दौरा केला. त्यांनतर माजीमंत्री नारायण राणे यांचा दौरा झाला. या दौऱ्यातून वेगळेच राजकारण पहावयास मिळाले. दाखवताना काँग्रेसचे जेष्ठ नेते नारायण राणे यांचा दौरा असे संबोधले गेले. परंतु, त्यांचा दौरा हा प्रदेश काँग्रेसच्या टिळक भवनातून दररोज जे मेल येतात. त्यामध्ये एकही मेल त्यांच्या दौऱ्याची मा‌हिती देणारा आला नव्हता. त्यामुळेच राणे यांनी दौरा करताना मला कोणाला विचारावे लागत नाही असे ठणकावून सांगितले होते. त्यामुळे या दौरा पक्षांकडून होता की वैयक्तीक हे शेवटपर्यंत कळले नाही.

दुष्काळाचे निमित्त करून राणे यांनी प्रदेशाध्यक्ष तथा खासदार अशोक चव्हाण यांच्याच मराठवाड्यातील दुखावलेल्या जिल्ह्यापासून सुरुवात केली आहे. त्याला आमदार अमित देशमुख आणि कंपनीने ही तितकीच मन लावून साथ दिली. राणे यांचे स्वागत, त्यांच्या भेटी, त्यांच्या उपस्थितीत मेळावा हे सारे आमदार अमित देशमुख यांच्या स्टाइलने साजरे करण्यात आले.

राणे लातूरला येण्याच्या एक दिवस अगोदर जिल्हा शहर आणि ग्रामीण काँग्रेसने उड्डाणपुलाच्या खालच्या पार्किंगच्या जागेत धरणे आंदोलन केले होते. त्यासाठी प्रदेश काँग्रेसने चाकुरकर समर्थक आमदार बसवराज पाटील-मुरुमकर यांना लातूरसाठी प्रदेशाचे नेते म्हणून नियुक्त केले होते. धरणे आंदोलनाच्या ठिकाणी जे बॅनर लावले होते. त्यावर फक्त अमित देशमुख यांचा मोठा फोटो होता. मात्र, राणे यांच्या सर्व कार्यक्रमात अमित सोबतच किंवा काकाणभर अधिक स्थान हे नारायण राणे यांना देण्यात आले होते. याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. लातूरच्या पाण्याबद्दल राणे आता काळजी करीत आहेत. लातूरला इमारत बांधून तयार असताना महसूल आयुक्तालय नांदेडला मंजूर करण्याचा निर्णय घेतला त्यावेळी राणे गप्प का बसले ? महसुलमंत्री तेच होते ना ? असा सवाल उपस्थित केला जात आहे. एक मात्र नक्की मीच तुमचा नेता कसा होऊ शकतो हे काहीकाळ सैनिक असलेल्या नारायण राणे यांनी राधाकृष्ण विखे पाटील आणि अशोक चव्हाण यांना दाखवून दिले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘घाबरुन आत्महत्या करू नका’

$
0
0

उस्मानाबादः निसर्गाच्या अवकृपेमुळे दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना आधार देण्याची गरज आहे. राजकीय पक्षांकडून शेतकऱ्यांना खोटी आश्वासने दिली जात आहेत. शेतकऱ्यांनी संकटाला घाबरून आत्महत्या करू नये, असे आवाहन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केले.

उमरगा तालुक्यातील कवठा येथे आयोजित केलेल्या समारंभप्रसंगी ते बोलत होते. कवठा येथील भारत विकास प्रतिष्ठानच्यावतीने यावेळी उस्मानाबाद जिल्ह्यातील २० आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी २१ हजारांचे अर्थसहाय्य मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. त्यासोबतच चार कुटुंबाना गायी भेट देण्यात आल्या.यावेळी खासदार राजू शेट्टी, स्वा‌भिमानी संघटनेचे सदाभाऊ खोत यांची उ‌पस्थिती होती. मराठवाड्यातील वाढत्या आत्महत्यांना निसर्गापेक्षाही जास्त शासन जबाबदार आहे. म्हणून येत्या २ ऑक्टोबरपासून दिल्ली येथील रामलिला मैदानावर शेतकऱ्यांसाठी आंदोलन करणार असल्याची घोषणा अण्णा हजारे यांनी केली. शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी २ ऑक्टोबरपासून दिल्लीत बेमुदत उपोषण करण्याचा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘व्यापारीकरण अन् खासगीकरणात फरक करा’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, लातूर

उच्च शिक्षणासाठी आणि सर्वांना शिक्षणाच्या यशस्वीतेसाठी खासगीकरण करावेच लागणार असले तरी खासगीकरण आणि व्यापारीकरण यात फरक करावा लागेल, असे मत केंद्रीय नियोजन मंडळाचे माजी सदस्य डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी लातूरात व्यक्त केले.

जिल्हा परिषद लातूर आणि शिवाजी महाविद्यालय रेणापूर यांच्यावतीने राष्ट्रीय शिक्षण परिषद २०२० चे आयोजन करण्यात आले होते. परिषदेप्रसंगीच्या बीज भाषणात डॉ. भालचंद्र मुणगेकर हे बोलत होते. परिषदेचे उद्घाटन माजी राज्यपाल शिवराज पाटील-चाकुरकर यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी खासदार डॉ. गोपाळराव पाटील होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा प्रतिभा पाटील-कव्हेकर आणि शिवाजीराव पाटील-कव्हेकर यांनी मनोगत व्यक्त केले.

देश स्वतंत्र्य झाल्यापासून काँग्रेस सरकारने केलेल्या शैक्षणीक विकासाचा आढावा घेताना डॉ. मुणगेकर म्हणाले, 'देशाच्या विकासात जवाहरलाल नेहरू यांचे मोठे योगदान आहे. १९६५ ते २०१५ या काळात शिक्षणावर बजेटच्या फक्त चार टक्केच खर्च केला जातो. ग्रामीण आणि शहरी भागातील शिक्षणातील तफावत वाढत जात आहे. श्रीमंताच्या शाळा चांगल्या आहेत. गरीबाची मुले जिथे शिकतात तिथे सर्वच गोष्टीचा अभाव असल्यामुळे विषमता वाढत जात आहे.'

शिवराज पाटील-चाकुरकर म्हणाले, 'शिक्षणात परीक्षा या झाल्याच पाहिजेत आणि शिक्षण आणि नोकरी हे समीकरण एकदा तोडल्या शिवाय खऱ्या शिक्षणाचा अर्थ समजणार नाही. शिक्षणाची जबाबदारी ही फक्त एकट्या सरकारची असू शकत नाही, ते शक्यही नाही. समाजानेही शिक्षणाची जबाबदारी घेतली पाहिजे. त्याच बरोबर जातीच्या शिक्षण संस्था असता काम नयेत. लग्नासाठी जात विचारली जात नाही, परंतु निवडणुकीत जात विचारली जाते.' यावेळी व्यासपीठावर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष अण्णासाहेब पाटील, सभापती कल्याणराव पाटील, सभापती वेणुताई गायकवाड, सदस्या रेखा तरडे, दत्तात्रय बनसोडे, मुख्यकार्यकारी अधिकारी दिनकर जगदाळे यांची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रवी बापटले यांचे उपोषण मागे

$
0
0

लातूरः ग्रामपंचायतीने घेतलेला सेवालयावरील बहिष्काराचा ठराव रद्द करून सेवालयाच्या बदनामीप्रकरणी प्रा. रवी बापटलेंसह अन्य आठ जणांनी हासेगाव ग्रामपंचायतीसमोर सुरू केलेले आमरण उपोषण औशाचे तहसीलदार दत्ता भारस्कर यांच्या आश्वासनानंतर मागे घेतले.

सेवालयाच्या बदनामीसह व्यक्तीगत चारित्र्यहनन करणारे आरोप हासेगाव येथील काही नागरिकांनी केले होते. त्याचप्रमाणे सेवालयाविरुद्ध हासेगाव ग्रामपंचायतीने सहकार्य न करण्याचा ठराव २००७ मध्ये घेतला होता. हा ठराव मागे घेण्यासह सेवालय व बापटले यांची बदनामी करणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी सेवालयाचे प्रमुख रवी बापटले यांच्यासह आठ जणांनी हासेगाव ग्रामपंचायतीसमोर आमरण उपोषण केले होते.शनिवारी सकाळी औशाचे तहसीलदार दत्ता भारस्कर यांनी सकाळी १० वाजता हासेगाव येथे जाऊन उपोषणार्थींची भेट घेतली. सेवालयाची बदनामी करणाऱ्या १७ जणांविरुद्ध तत्काळ गुन्हे दाखल करण्याचे आदेश पोलिसांना देऊन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यामार्फत चौकशी करण्याचे आश्वासन दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शेतीच्या वादातून भावजयीला पेटविले

$
0
0

जालनाः शेतीच्या वादातून भावजयीच्या अंगावर रॉकेल टाकून पेटवून दिल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला. पत्नीस वाचविण्यास गेलेला भाऊसुद्धा गंभीररित्या जखमी झाला. ही घटना ( सिद्धेश्वर पिंपळगाव ता. घनसावंगी ) येथे घडली असून या माथेफिरुविरुद्ध गोंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

सिद्धेश्वर पिंपळगाव येथील मयत कुशीवर्ता नानासाहेब सातपूते ( वय ६०) ही महिला शुक्रवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घरालगत असलेल्या शेतात काम करत असताना दीर प्रल्हाद किसन सातपूते हा तेथे आला. त्याने जमीन वहिती करण्याच्या कारणावरुन कुशीवर्ता सातपूते या भावजयीच्या अंगावर रॉकेल टाकून तिला पेटवून दिले. गंभीररित्या भाजल्याने कुशीवर्ता यांचा मृत्यू झाला. तर तिला वाचविण्यास गेलेल्या पती नानासाहेब सातपूते हे देखील गंभीररित्या भाजले असून त्यांच्यावर अंबड येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नानासाहेब सातपूते यांच्या जबाबावरुन गोंदी पोलिस ठाण्यात प्रल्हाद सातपूते विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेतकऱ्यांनो, आत्महत्या करू नका

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, जालना

गेल्या चार वर्षांच्या सततच्या दुष्काळ आणि नापिकीमुळे मराठवाड्यातील शेतकरी हवालदिल होऊन आत्महत्या करीत आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे हे सत्र आता थांबले पाहिजे. परिस्थती कितीही बिकट असली तरी शेतकरी बांधवांनो तुम्ही खचून जाऊन आत्महत्या करू नका. येथील शेतकऱ्यांच्या जीवनाची जवाबदारी ही शिवसेनेची असून गरज पडल्यास केव्हाही हाक द्या शिवसेना तुमच्यापाठीशी खंबीरपणे उभी आहे, असे मत राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी व्यक्त केले.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे शिवजलक्रांती योजनेअंतर्गत मोतीगव्हाण (ता. जालना) येथे जलसिंचनच्या कामांसाठी पोकलेन मशिनच्या लोकापर्ण सोहळयात ते बोलत होते. यावेळी शिवसेनेचे सचिव खासदार अनिल देसाई, भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष सूर्यकांत महाडिक, जालन्याचे संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर, उपनेते लक्ष्मणराव वडले, आमदार अर्जुनराव खोतकर, आनंद गोसावी, आमदार शशिकांत खेडेकर, अंबादास दानवे, ए.जे. बोराडे, भास्कर अंबेकर आदिंची व्यासपीठावर उपस्थिती होती.

यावेळी बोलताना कदम पुढे म्हणाले, '८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करणारा शिवसेना हा एकमेव पक्ष आहे. सरकारसोबत सत्तेत असून मंत्रीपदाचा हा लाल दिवा आपल्याला ज्या मराठी माणसांमुळे मिळाला तो सध्या दुष्काळाच्या संकटाशी झुंत देत आहे. आपली सर्व कामे बाजूला ठेवा आणि दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीला लागा, असे आदेश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना दिले आहेत. शिवसेनेतर्फे मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त भागात जलसंधारणाच्या कामासाठी पोकलेन मशिनचा शनिवारी लोकापर्णण करण्यात आला.'

दुष्काळामुळे शेतकऱ्यांच्या जनावरांचेही हाल होत आहेत. असून जेथे किमान २५० जनावरे असतील तिथे चारा छावणी सुरू करण्यासाठी संस्थांना मंजूरी देण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. टँकर सुरू करण्याचे अधिकार संबंधित तहसीलदारांना देण्यात आले आहेत. ज्या गावातून टँकरची मागणी झाली तेथे पाच दिवसात टँकर सुरू न केल्यास तहसीलदाराला निलंबित करण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला.'

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून आमदार अर्जुन खोतकर यांनी मराठवाडयातील दुष्काळाची भीषणता विषद करीत मराठवाडयासाठी स्वतंत्र जलआयुक्तालय स्थापन करण्याची मागणी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुंबईकरांमार्फत पाणी पुरविण्याचा प्रस्ताव

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त भागात जाणाऱ्या प्रवाशांनी आपल्यासोबत शक्य तेवढे पाणी घेऊन जावे, असे आवाहन मुंबईतील काही संवेदनशील नागरिकांनी केले आहे. मुंबई विद्यापीठाच्या एनएसएस विभागाकडूनही या उपक्रमाला हातभार लावला जाणार आहे.

मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त भागात आज पिण्याचे पाणी दुर्मिळ झाले आहे. विशेषत: बीड, लातूर, उस्मानाबाद आणि परभणी जिल्ह्यांच्या ग्रामीण भागात पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. पाणवठे आटले असून, भूजलदेखील खोलवर गेल्यामुळे विहिरी, बोअरवेल कोरड्या पडल्या आहेत. तहानलेल्या लोकांना आजघडीला फक्त पाण्याची गरज आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई विद्यापीठातील बहि:शाल विभागाच्या संचालिका मुग्धा कर्णिक यांनी गतवर्षी काही तरुणांनी मांडलेली कल्पना कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांच्या कानावर घातली. मुंबईतून मराठवाड्यात जाणाऱ्या प्रवाशांनी शक्य तेवढे पाणी बाटल्यांमध्ये भरून ते गरजूंपर्यंत पोचवावे, अशी ही कल्पना आहे.

कुलगुरूंनी राष्ट्रीय सेवा योजनेत (एनएसएस) सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना तसे आवाहन करण्याचा शब्द दिला. मराठवाड्यात जाणारे प्रवासी आणि खासगी वाहनांमधून हे पाणी पोचविले जाईल. मुग्धा कर्णिक यांनी सांगितले की, या उपक्रमाने फार मोठा आधार होईल असे नाही, परंतु किंचित हातभार जरूर लागेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टोल कंत्राटदारावर छावणीत गुन्हा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, मिटमिटा

ट्रकचालकांना त्रास देत असल्याच्या आरोपावरून छावणी परिषदेचे टोल कंत्राटदार व वसुली कर्मचाऱ्यांवर शनिवारी छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांचा ताफा येत असलेल्या रस्त्यांच्या कडेलाच त्यांनी ट्रक उभ्या केल्या होत्या. विविध राज्यातील ट्रकचालकांनी शनिवारी छावणी पोलिस स्टेशनवर थेट मोर्चा काढला. टोल नाक्यावर ६० रुपयांची पावती देऊन ३०० रुपये वसूल करण्यात येत होते. त्याच्याविरुद्ध ट्रकचालक एकत्र झाले. त्यांनी पोलिस स्टेशन गाठून कंत्राटदार व वसुली कर्मचाऱ्यांची तक्रार केली. गुन्हा दाखल होईपर्यंत रस्त्यातील गाड्या हटविणार नाहीत, अशी भूमिका त्यांनी घेतली. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ताफा येणार होता. या पार्श्वभूमीवर पोलिस निरीक्षक चंद्रकात सावळे यांनी गुन्हा नोंदविण्याचे आदेश दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बलात्कार प्रकरणातील दोन आरोपींना कोठडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सुंदरवाडी शिवारात तरुणीवर झालेल्या बलात्कार प्रकरणातील आरोपी शेख तय्यब शेख नईम (३५, रा. सुंदरवाडी), दूध विक्रेत्याला न्यायालयाने ओळख परेडसाठी न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. दरम्यान, त्याच्या अन्य तीन साथीदारांचा शोध सुरू आहे. यामध्ये दोन आरोपी अल्पवयीन असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

सुंदरवाडी शिवारात फेरफटका मारण्यासाठी गेलेल्या तरुणीच्या मित्राला दोघांनी चाकूचा धाक दाखवत मारहाण करून दोघांनी तिच्यावर बलात्कार केला होता. ही घटना गुरुवारी रात्री सव्वाआठच्या सुमारास घडली होती. पोलिसांनी शेख तय्यब याला अटक केली. त्याच्या तीन साथीदारांचा शोध सुरू असून, त्यासाठी चिकलठाणा पोलिस ठाणे आणि स्थानिक गुन्हे शाखेचे प्रत्येकी दोन पथके स्थापन करण्यात आली आहेत. शेख तय्यब हा विवाहित असून, त्याला दोन अपत्य असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

निर्मनुष्य ठिकाणी जाऊ नकाः पोलिस

सुंदरवाडी येथील ज्या ठिकाणी बलात्काराची घटना घडली ते ठिकाण निर्मनुष्य आहे. अशा ठिकाणी जोडप्यांनी जाण्याचे टाळायला हवे. भांगसी माता गडाच्या ठिकाणी देखील अशा प्रकारची घटना गेल्या दीड वर्षांपूर्वी घडली होती. त्यावेळी देखील जोडप्यांच्या मदतीला कोणीही धावून गेले नव्हते. या ठिकाणी देखील एकाने हा प्रकार पाहिला होता. जोडप्यांची आरडा-ओरडही ऐकली होती, पण असे प्रकार नेहमीच घडत असल्याने त्यानेही याकडे दुर्लक्ष केले होते. जोडप्यांनी अशा ठिकाणी जाऊ नये, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मनपा आयुक्तांची सीएमकडे तक्रार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महापालिकेचे आयुक्त प्रकाश महाजन यांच्या विरोधात भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी शनिवारी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे थेट तक्रार करून त्यांच्या बदलीची मागणी केली. बदली न झाल्यास महाजन यांच्यावर अविश्वासाचा ठराव येऊ शकतो, असेही मुख्यमंत्र्यांना सांगण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

मुकुंदवाडी रेल्वे स्टेशन रस्त्यावरील अतिक्रमणांची पोलिस आयुक्तांच्या उपस्थितीत पाहणी करताना आयुक्त महाजन व उपमहापौर प्रमोद राठोड यांच्यात वाद झाला होता. दरम्यान, शनिवारी नगर जिल्ह्यात जाण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सकाळी विमानतळावर आले असता गटनेते भगवान घडमोडे, उपमहापौर राठोड व अन्य पदाधिकाऱ्यांनी फडणवीस यांची भेट घेऊन आयुक्त महाजन यांच्या विरोधात तक्रार केली. आयुक्त महाजन हे महसुलमंत्री एकनाथ खडसे यांच्या निकटचे मानले जातात. त्यांच्या बदलीचे यापूर्वी प्रयत्न केले. परंतु, खडसेंच्या हस्तक्षेपामुळे त्यांची बदली होऊ शकली नाही, असे बोलले जाते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

काल उघडलेली चौकी आज बंद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांच्या अचानक भेटीने पोलिस चौकीचे उघडलेले शटर शनिवारी पुन्हा बंद झाले. मुकुंदवाडी रेल्वे स्टेशनजवळ ही पोलिस चौकी आहे.
मुकुंदवाडी रेल्वे स्टेशन ते जयभवानीनगर या मार्गावरील अतिक्रमणांची परिस्थिती पाहण्यासाठी पोलिस आयुक्तांनी शुक्रवारी अचानक या परिसराची पाहणी केली. पोलिस आयुक्त अचानक आल्यामुळे मुकुंदवाडी पोलिस ठाण्याची धाबे दणाणले. रेल्वे स्टेशनलगतच पोलिसांची एक चौकी आहे. ही चौकी बंदच असते, असे तेथील नागरिकांचे म्हणणे आहे. तक्रारीसाठी मुकुंदवाडी पोलिस ठाणेच गाठावे लागते.

पोलिस आयुक्तांनी पायी चालत अतिक्रमणांची पाहणी करण्यास सुरुवात केली. तेव्हा पोलिसांनी धावपळ करुन चौकी उघडली. शटर उघडून पोलिस चौकी चालू असल्याचा दिखावा निर्माण केला. त्यावेळी चौकीत फक्त एक टेबल लावून ठेवण्यात आलेला होता. कागदपत्रे ठेवण्यासाठी त्या ठिकाणी रॅकही नव्हते; तसेच बसण्यासाठी खुर्च्याही नव्हत्या. पोलिस आयुक्तांच्या नजरेतून ही गोष्ट हुकली नाही. बिकट परिस्थिती लक्षात घेऊन त्यांनी परिसरातील अतिक्रमणे पाहण्याकडे अधिक लक्ष दिले. पोलिस आयुक्तांच्या करारीपणाचा धाक रस्त्याचा कब्जा करुन व्यवसाय करणाऱ्यांनी किती घेतला आहे, याची चुणूक मुकुंदवाडी परिसरात शुक्रवारी दिसून आली. पोलिस आयुक्त येणार हे कळताच मुकुंदवाडी चौकातील हातगाडीवाले आपापल्या हातगाडीसह तेथून पसार झाले. एरवी या रस्त्यावर हातगाडीवाल्यांचे एवढे अतिक्रमण असते की साधे पायी चालणेही अवघड होऊन जाते. पोलिस आयुक्तांच्या अचानक भेटीत पोलिस चौकी सुरु असल्याचा दाखवण्याचा प्रयत्न झाला. शनिवारी ही पोलिस चौकी बंद होती. त्यासमोर नागरिकांनी नेहमीप्रमाणे आपल्या गप्पांचा अड्डा जमवला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दरोडेखोरांच्या टोळीतील एकास २ वर्षे सक्तमजुरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

लोहगाव (ता. पैठण, जि. औरंगाबाद) येथे सशस्त्र दरोडा घालून कारमधून शेळ्या पळविण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन जणांच्या दरोडेखोरांच्या टोळीतील एकाला दोन वर्षे सक्तमजुरी, एक हजार रुपये दंड व दंड न भरल्यास दोन महिने साधी कैद अशी शिक्षा अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश जयंत राजे यांनी सुनावली.

या प्रकरणी राजू भाऊराव रुपेकर (रा. लोहगाव, ता. पैठण) यांनी पैठण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. फिर्यादीत म्हटल्याप्रमाणे, आरोपी व टोळीची सूत्रधार राणी घोडके, दिलीप घोडके व अल्बर्ट ब्रॉन फर्नांडिस (तिघेही रा. मालाड पश्चिम, मुंबई) हे तिघे आरोपी १९ डिसेंबर २०१३ रोजी रात्री कारमधून (एमएच १६ एजे ६७६४) आले व त्यांनी फिर्यादीच्या शेळ्या घेऊन कारमध्ये टाकण्यास सुरुवात केली. त्याला फिर्यादीने विरोध केला असता, त्याच्यावर तिघांनी गंभीर चाकू हल्ला केला व पळून जाण्याच्या मार्गावर असतानाच, फिर्यादीने आरडाओरड केली. त्यामुळे फिर्यादीचा पुतण्या विनोद कचरू रुपेकर धावत आला. त्याच्यावरही दरोडेखोरांनी हल्ला केला, मात्र आरडाओरड केल्यामुळे ग्रामस्थ जागे झाले आणि त्यांनी तिघांना पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. दरम्यान, तिघांना पैठण कोर्टात दाखल केल्यानंतर दरोड्याची सूत्रधार राणी घोडके व दिलीप घोडके यांना जामीन मिळाला. तेव्हापासून दोघेही बेपत्ता आहेत, अल्बर्ट ब्रॉन फर्नांडिस याची केस जिल्हा कोर्टात वर्ग करण्यात आली. याप्रकरणी हेड कॉन्स्टेबल बी. डी. खोजेकर यांनी दोषारोपपत्र दाखल केले. सुनावणीदरम्यान सरकार पक्षाच्या वतीने आठ साक्षीदार तपासण्यात आले व गुन्हा सिद्ध केला. यामध्ये राजू हारूण शेख, डॉ. मगरे, विनोद कचरू रुपेकर यांची साक्ष महत्त्वाची ठरली. दोन्ही बाजूंच्या युक्तिवादानंतर अल्बर्ट ब्रॉन फर्नांडिस याला दोन वर्षे सक्तमजुरी, एक हजार रुपये दंड व दंड न भरल्यास साधी कैद ठोठावण्यात आली.

महिला दरोडेखोरांवर अनेक गुन्हे

दरोडेखोर टोळीची सूत्रधार व आरोपी राणी घोडके; तसेच तिचे साथीदार दिलीप घोडके व अल्बर्ट ब्रॉन फर्नांडिस यांच्यावर नगर जिल्ह्यातील अनेक पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल आहेत. अनेक गंभीर गुन्ह्यांमध्ये ही टोळी 'वॉन्टेड' असून, या टोळीची नगर जिल्ह्यात दहशत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रस्त्यांची ‘ऑन द स्पॉट’ तपासणी

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद

सार्वजनिक बांधकाम विभागाने (पीडब्ल्यूडी) केलेला रस्ता यापुढे एका नवीन तंत्राने तपासला जाणार आहे. झालेल्या रस्त्यावरून एक यंत्र फिरवून त्यात डांबर, खडी आणि निविदेत नमूद केल्याप्रमाणे साहित्य वापरले आहे क नाही, याची शहानिशा केली जाणार आहे. या 'ऑन द स्पॉट' तपासणीमुळे रस्त्याच्या कामातील पाप थांबण्यास मदत मिळणार आहे. 'पीडब्ल्यूडी'कडून दिवाळीपूर्वी हे मशीन खरेदी केले जाणार आहे.

सार्वजनिक बांधकाम खात्याकडून राज्यातील रस्त्यांची डागडुजी, दुरुस्ती केली जाते. यासाठी काढण्यात आलेल्या निविदांमध्ये कामाच्या किमतीसोबत कशा प्रकारचे साहित्य वापरले जावे, कामाचे निकष, मुदत याचा स्पष्ट उल्लेख असतो. रस्ता झाल्यानंतर त्याची तपासणी करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा आजवर अस्तित्वा आलेली नव्हती. कंत्राटदार आणि संबंधित भागाचे अभियंते यांच्या रिपोर्टवरच काम गुणवत्तेप्रमाणे झाले की नाही याचे मोजमाप होत होते.

केंद्र सरकारच्या सार्वजनिक बांधकाम खात्याने राष्ट्रीय महामार्ग; तसेच केंद्राच्या अखत्यारितील रस्त्यांचा दर्जा प्रमाणित ठेवण्यासाठी काही उपाययोजना केल्या गेल्या. आजकाल मोठे रस्ते सिमेंटचे बांधले जात आहेत. त्यात सिमेंट, वाळू तसेच अन्य साहित्याचा दर्जा राखणे आवश्यक असते. रस्त्यांच्या कामासाठी वापरलेले साहित्य तपासण्यासाठी केंद्राने एक यंत्र खरेदी केले आहे. एका मोठ्या कारमध्ये ही यंत्रणा बसविली आहे. त्यात स्क्रिन, संगणक आणि अन्य तपासणी यंत्र बसविण्यात आले आहेत. तयार झालेल्या रस्त्यावरून ही गाडी नेल्यानंतर त्यातील यंत्राद्वारे रस्त्याची घनता, वापरलेले साहित्य निविदेत नोंदविल्याप्रमाणे आहे की नाही, याची सूक्ष्म तपासणी केली जाईल. थोडक्यात रस्त्यांचा दर्जा प्रमाणित राखण्यासाठी या मशीनचा उपयोग होणार आहे. १५ दिवसांपूर्वी या मशीनचे उद््घाटन नागपूर येथे केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झाले. केंद्रानंतर राज्य सरकारही ही मशीन खरेदी करणार आहे. ज्यामुळे रस्त्याच्या कामांमधील गैरप्रकारांना आळा बसणार आहे.

केंद्र सरकारने मशीन खरेदी केलेले आहे. त्याची चाचणी सध्या सुरू आहे. रिझल्ट कसे मिळतात हे पाहून आम्ही राज्यासाठी लवकरच मशीन खरेदी करणार आहोत.

- चंद्रकांत पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मंत्रिमंडळाची २१ ला औरंगाबादेत बैठक?

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद

विविध कारणांनी सहा वर्षांपासून टाळली गेलेली राज्य मंत्रिमंडळाची बैठक २१ सप्टेंबरला होण्याची शक्यता आहे. एरव्ही हैदराबाद मुक्तिसंग्राम दिनाचे औचित्य साधून १७ व १८ सप्टेंबर रोजी बैठक होत होती. मात्र, यंदा १७ सप्टेंबरला गणेशोत्सव सुरु होत असल्याने तीन दिवस उशिराने बैठक होणार आहे.

मराठवाड्याच्या प्रश्नांवर चर्चा करून ते मार्गी लावण्यासाठी मंत्रिमंडळाची बैठक औरंगाबादेत घेतली जाते. (कै.) विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना २००८मध्ये बैठक झाली होती. त्यांनीच हैदराबाद मुक्तिसंग्राम दिनाचे औचित्य साधत ही प्रथा सुरू केली होती. त्या वर्षीच्या बैठकीत अनुशेष दूर करण्यासाठी १,९०० कोटींचे पॅकेज जाहीर झाले होते. मराठवाडा विभागीय कॅन्सर हॉस्पिटलसह काही महत्त्वाचे प्रकल्पही जाहीर झाले होते. त्यानंतर आजवर विविध कारणांनी बैठक रद्द करण्यात आली. २०१४च्या विधानसभा निवडणुकीत आघाडी सरकार पायउतार होऊन भाजप - शिवसेनेची सत्ता आली. मराठवाड्याच्या पदरात पडणारी एकमेव बैठक पुन्हा सुरू होईल की, नाही अशी शंका होती, पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी औरंगाबादेत बैठक घेण्याचे आश्वासन दिले होते.

यंदा मराठवाड्यात दुष्काळ आहे. आठही जिल्ह्यांमध्ये पाण्याचे दुर्भीक्ष्य आहे. जनावरांना चारा नाही. शेतकरी आत्महत्या होत आहेत. राज्य सरकार दुष्काळाकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करत विरोधकांनी रान उठविले आहे. दुष्काळाची पाहणी करण्यासाठी एक सप्टेंबरपासून मुख्यमंत्री मराठवाड्याच्या दौऱ्यावर येत आहेत. आढावा घेतल्यानंतर दुष्काळासाठी स्वतंत्र पॅकेज राज्य सरकारकडून जाहीर होण्याची शक्यता आहे. त्याची घोषणा औरंगाबादेतील मंत्रिमंडळाच्या बैठकीत होण्याची शक्यता आहे.

सहा वर्षांनंतर बैठक

औरंगाबादेत २००८मध्ये मंत्रिमंडळ बैठक झाली होती. त्यानंतर स्वाइन फ्लू, निवडणूक आचारसंहिता, मुंबई बाँबस्फोट यामुळे बैठका रद्द झाल्या. तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी 'मराठवाड्याचे निर्णय मुंबईत घेऊ. त्यासाठी स्वतंत्र बैठकीची आवश्यकता नाही.' असे सांगून बैठका घेतल्या नव्हत्या. त्यामुळे यंदा होणाऱ्या बैठकीस विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रोटेगाव परिसरात बिबट्याचा वावर

$
0
0

वैजापूरः तालुक्यातील रोटेगाव येथे शनिवारी काही गावकऱ्यांनी ऊसाच्या शेतात बिबट्या लपल्याचा दावा केला. बिबट्या बघितल्याची माहिती समजल्याने रोटेगाव परिसरातील गावांमध्ये शनिवारी भितीचे वातावरण होते. याबाबत गावकऱ्यांनी वनविभागाला कळवूनही वेळेत वनअधिकारी हजर न झाल्याने हा बिबट्या निसटला.व्यापारी विनायक व्यवहारे यांची रोटेगाव शिवारातील शेताकडे गेले होते. त्यावेळी औरंगाबाद रस्त्यावर बांधकाम विभाग कार्यालयाच्या मागील बाजुस उड्डाण पुलाच्या पलिकडील शेतात ऊसात बिबट्या असल्याची माहिती त्याने दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मकबऱ्यालगतच्या घरांना नोटीस

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मकबरा परिसरातील सर्वेक्षण क्रमांक ९९-१ व २मधील साडेअठरा एकर जमिनीवर उभारलेल्या २५० घरांना तहसील कार्यालयाने नोटीस बजाविल्या आहेत. न्यायालयाच्या आदेशानुसार ही जमीन माधवराव सोनवणे यांना देण्यात येणार असल्याचे नोटीसमध्ये म्हटले आहे. यामुळे नागरिकांत संभ्रम निर्माण झाला असून, शनिवारी त्रस्त नागरिकांनी शनिवारी पालकमंत्री रामदास कदम यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला.

बीबी का मकबरा परिसरातील वरील दोन सर्वेक्षण क्रमांकातील भूखंड गेल्या काही वर्षांत खरेदी - विक्री केले गेले. सात-बारावर नोंदी करण्यात आल्या आहेत. रजिस्ट्रीचीही करण्यात आल्या आहेत, मात्र या जमिनीबाबत वाद सुरू होता. या जागेचा मालकी हक्क माधवराव माणिकराव सोनवणे यांचा असल्याचा निकाल उच्च न्यायालयाने दिला होता. हायकोर्टाचा निकाल सुप्रीम कोर्टाने कायम केला. या जागेवर रेणुकामाता नगर आणि ताजमहल नगर वसलेले आहेत. या वसाहतींमध्ये २५० घरे आहेत. हे प्रकरण ३४ वर्षांपासून सुरू होते. या प्रकरणात हायकोर्टात दाखल करण्यात आले होते. हायकोर्टाने सोनवणे यांच्या बाजुने निकाल दिला. त्याविरोधात सु्प्रीम कोर्टात दाद मागण्यात आली होती. सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाने दिलेला निकाल कायम ठेवला. त्यावर काहीही कार्यवाही करण्यात आली नाही. त्यामुळे हायकोर्टात अवमान याचिका दाखल करण्यात आली होती. या जागेवर घरे बांधलेल्या नागरिकांनी दोन दिवसांपूर्वी पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांची भेट घेऊन मार्ग काढण्याची विनंती केली होती, पण कोर्टाच्या आदेशानुसार कार्यवाही होईल, असे स्पष्ट करण्यात आले. त्यानंतर जिल्हाधिकारी निधी पांडेय यांच्याकडेही नागरिकांचे शिष्टमंडळ गेले होते, मात्र त्यातूनही काही मार्ग निघाला नाही. सरकार दरबारी दाद मागण्यासाठी शनिवारी दुपारी हे नागरिक पालकमंत्री रामदास कदम यांना भेटण्यासाठी सुभेदारी विश्रामगृहावर जमले होते. पालकमंत्री तिथे आले नाहीत. ते विमानतळावर जाणार असल्याचे समजल्यानंतर शिष्टमंडळ तिकडे रवाना झाले. नागरिकांची तेथे पालमंत्र्यांची भेट होऊ शकली नाही, हे मात्र समजले नाही.

सोमवारी जमीन ताब्यात देणार

या १८ एकर २९ गुंठे जमिनीची मालकी माणिकराव सोनवणे यांच्याकडे होती. त्यांचे वारस माधवराव सोनवणे यांना कोर्टाच्या आदेशानुसार जमिनीचा ताबा देण्यात येणार आहे. भूमी अभिलेख कार्यालयाने जमिनीची मोजणी केली आहे. रविवारपर्यंत (३० ऑगस्ट) आपल्या ताब्यात असलेली जमीन रिकामी करावी, सोमवारी सकाळी आठ वाजता ही जमीन माधवराव सोनवणे यांच्या ताब्यात देण्यात येणार असल्याचे या नोटीसमध्ये म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images