Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

‘सीसीटीव्ही’ कंत्राटाचा वाद हायकोर्टात

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी,औरंगाबाद

शहरातील विविध चौकांत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याच्या कंत्राटाचा वाद मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठात आला आहे. या याचिकेची सुनावणी न्या.रवींद्र बोर्डे व न्या.पी.आर.बोरा यांच्यासमोर गुरुवारी होईल.

राज्याच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी औरंगाबादमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय घोषित केला. औरंगाबाद सुरक्षित शहर प्रकल्प योजनेंतर्गत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची निविदा प्रसिद्ध केली. या निविदा प्रक्रियेत क्रिस्टल इंटीग्रेटेड सर्व्हिसेस प्रायव्हेट कंपनी व हनिवेल ऑंटोमेशन इंडिया लिमिटेड या संस्था पात्र ठरल्या. या योजनेची अंमलबजावणी करण्याचे काम औरंगाबाद महापालिकेकडे आहे. पालिकेने तांत्रिक समितीच्या शिफारसीवरून सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे काम हनिवेल या संस्थेला दिले. याला क्रिस्टलने औरंगाबाद खंडपीठात आव्हान दिले आहे. १४ ऑगस्ट रोजी महसूल प्रबोधनीत हनिवेल व क्रिस्टलने तांत्रिक समितीसमोर प्रात्यक्षिक सादर केले. या समितीत पालिका आयुक्त, पोलिस आयुक्त व जिल्हाधिकारी यांचा समावेश आहे. या समितीने अटी व शर्तीनुसार हनिवेलला ९१ तर क्रिस्टलला ८४ गुण दिले. ही निविदा ७० टक्के तांत्रिक तर ३० टक्के व्यावसायिक होती. तांत्रिक गुणातही हनिवेलला क्रिस्टलपेक्षा जास्त गुण मिळाले.

हनिवेलला ७० तर क्रिस्टलला ६४.६२ गुण मिळाले. आता हनिवेलला दिलेले कंत्राट रद्द करावे, अशी विनंती याचिकेत केली आहे. पालिकेची बाजू अतुल कराड मांडत आहेत. शासनातर्फे अर्चना गोंधळेकर या काम पाहत आहेत.

जास्त दर आकारल्याचा आक्षेप

औरंगाबादमध्ये ३० ठिकाणी ५० सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे कंत्राट हनिवेलला दिले आहे. या संस्थेने जास्त दर आकारला आहे. तरीही या संस्थेला कंत्राट दिल्याचा आक्षेप क्रिस्टलने याचिकेत घेतला आहे. याचिकाकर्ता क्रिस्टलने २ कोटी २ लाख ३० हजार ४६० तर हनिवेलने २ कोटी ३५ लाख ४० हजार ७०६ रुपयांचा दर दिला होता. यातील फरक ३३ लाख रुपयांचा आहे.

या चौकांत सीसीटीव्ही

पोलिस आयुक्तालय, मिल कॉर्नर, मध्यवर्ती बसस्थानक, सिद्धार्थ उद्यान, वरद गणेश, बाबा पेट्रोल, जिल्हा कोर्ट, चुन्नीलाल पेट्रोल पंप, क्रांतिचौक, महर्षी चौक, मोंढा नाका, आकाशवाणी, सेव्हन हिल्स, हायकोर्ट, सिडको बसस्थानक, एपीआय कॉर्नर, जळगाव टी पॉइन्ट, आयकर कार्यालय, पंचवटी हॉटेल, एसएससी बोर्ड, व्हिटस हॉटेल, रेल्वे स्टेशन, महानुभव आश्रम, सिल्लेखाना, पैठण गेट, गुलमंडी, सुपारी हनुमान, सराफा, सिटीचौक, शहागंज.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


भूमाफिया, बिल्डरधार्जिणी कारवाई

$
0
0

औरंगाबादः न्यू पहाडसिंगपुरा भागातील रेणुकामातानगर आणि ताजमहाल कॉलनीतील नागरिकांच्या घरांना टाळे ठोकून त्यांना बेघर करण्याची कारवाई अतिशय निदंनीय आहे. ही कारवाई भूमाफिया आणि बिल्डरांना मदत करणारी असल्याची टीका भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे माजी खासदार नागेंद्रनाथ ओझा यांनी येथे केली.

शहादा येथे होणाऱ्या शेतमजुरांच्या राज्यस्तरीय अधिवेशनासाठी जात असताना त्यांनी शहराला भेट दिली. या भेटीत त्यांनी पहाडसिंगपुरा भागातील पाडापाडी करण्यात आलेल्या नागरिकांशी चर्चा केली. या चर्चेनंतर पत्रकारांशी संवाद साधताना ओझा म्हणाले, 'घरांची कायदेशीर कागदपत्रे असतानाही पाडापाडीची केल्याचे हे देशातील एकमेव उदाहरण ठरू शकेल. अधिकृत घरे असतानाही नागरिकांना बेघर करण्यात आले. महसूल अधिकाऱ्यांनी कोर्टासमोर चुकीची कागदपत्रे सादर करून न्यायालयाचीही दिशाभूल केली आहे. पावसाळा असतानाही नागरिकांना बेघर करण्याची ही कारवाई अमानवीय आहे. प्रशासनाने यात तातडीने हस्तक्षेप करून बेघरांना त्यांच्या घरात राहू द्यावे.' भूमाफिया, बिल्डरांना राजकीय आशीर्वाद मिळत असल्याने बेघरांवर हल्लेही होऊ शकतात. त्यांच्या सुरक्षेचीही काळजी घेतली गेली पाहिजे. बुद्धिजीवींनी या प्रश्नाकडे लक्ष घातले तर प्रशासनावर नक्कीच दबाव वाढेल. नागरिकांच्या घरांची कागदपत्रे पाहिल्यानंतर ही कारवाई चुकीची झाली आहे, असे वाटते असे ओझा यांनी स्पष्ट केले. भाकपचे आमदार आ. जी. मल्लेशा यांनीही, ही कारवाई चुकीची असून, संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर कडक कारवाईची मागणी यावेळी केली. या प्रसंगी डॉ. भालचंद्र कानगो, बुद्धिनाथ बराळ, राम बाहेती, अॅड. अभय टाकसाळ, अश्फाक सलामी यांची प्रमुख उपस्थिती होती.

तीन हजार निवृत्त वेतन द्यावे

दुष्काळ व पावसाअभावी शेतकऱ्यांची अतिशय दयनीय स्थिती आहे. कर्जमाफीबरोबरच त्यांच्या हिताचे निर्णय घेणे आवश्यक आहे. वयाच्या साठीनंतर प्रत्येक शेतकऱ्यास दरमहा तीन हजार पेन्शन देण्यात यावी; तसेच प्रत्येक पाच वर्षांनी यात वाढ करण्यात यावी, अशी आमची मागणी असल्याचे माजी खासदार ओझा यांनी सांगितले. ज्या कुटुंबाकडे शेतजमीन नाही, त्यांना किमान एक एकर जागा देण्यात यावी आणि वन कायद्याचा कठोरपणे अंमलबजावणी केली जावी, अशीही मागणी त्यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आधी घर द्या; मगच मार्किंग

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'घराच्या बदल्यात घर द्या. त्यानंतर मार्किंग करून आमची घरे पाडून टाका,' अशी मागणी करत मुकुंदवाडी रेल्वेस्टेशन परिसरात अतिक्रमण केलेले नागरिक सोमवारी रस्त्यावर उतरले. त्यांनी पालिका पथकावर किरकोळ दगडफेक केली. पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर जनक्षोभ शांत झाला.

शिवाजीनगर ते रामनगर रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम महापालिकेने हाती घेतले आहे. ८० फूट रुंदीच्या या रस्त्यात सुमारे दोनशे घरे बाधित होतात. या घरांवर मार्किंग करून ती पाडून टाकण्याची कारवाई महापालिकेने सुरू केली आहे. या कारवाईच्या भीतीने काही नागरिकांनी स्वतःहूनच आपली घरे पाडून घेण्यास सुरुवात केली. रस्ता रुंदीकरणात ज्या नागरिकांची घरे पाडली जाणार आहेत, त्यांना पर्यायी जागा द्या, अशी मागणी होत आहे. त्या संदर्भात काही नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन पर्यायी जागा मागितली होती. अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांना मुकुंदवाडी रेल्वेस्टेशन परिसरात पाठवून पाहणी करण्याचे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते. त्यानुसार अतिरिक्त जिल्हाधिकारी आज या भागात येणार होते, पण ते येण्यापूर्वीच सकाळी दहा वाजता महापालिकेचे पथक आले. त्यांनी रेल्वेस्टेशनच्या जवळच्या भागात पाडापाडीचे काम सुरू केले. या प्रकारामुळे नागरिक संतापले. त्यांनी पथकातील जेसीबीवर दगडफेक सुरू केली. त्यामुळे पाडापाडीचे काम काही वेळांसाठी थांबविण्यात आले. मुकुंदवाडी पोलिस स्टेशनचे पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी नागरिकांशी चर्चा केली. रेल्वेस्टेशन शेजारी असलेल्या मोकळ्या जागेत नागरिक जमा झाले त्यांनी घोषणाबाजी सुरू केली.

उपमहापौरांचे आश्वासन

उपमहापौर प्रमोद राठोड यांनी सायंकाळी चारच्या सुमारास या परिसराला भेट दिली व नागरिकांशी चर्चा केली. पर्यायी जागा देण्याच्या संदर्भात महापालिकेच्या आगामी सर्वसाधारण सभेमध्ये ठराव घेण्याचे आश्वासन त्यांनी दिले. दरम्यानच्या काळात महापालिकेच्या पथकाने मार्किंगचे काम पूर्ण केले.

वडिलांचे निधन झाले, कुठे जायचे ?

उपमहापौर प्रमोद राठोड आणि महापालिका पथकासमोर मुकुंदवाडी रेल्वेस्टेशन परिसरातील महिलांनी अक्षरशः टाहो फोडला. एक मुलगी म्हणाली, 'दोन महिन्यापूर्वी वडिलांचे निधन झाले. घरात खाण्याचे वांदे आहेत. अशा स्थितीत आम्ही जायचे कुठे? माणुसकीच्या दृष्टीने काहीतरी विचार करा,' अशी विनंती तिने केली. काही महिलांनीही रडतरडत आपली व्यथा मांडली. 'हप्त्याने पैसे भरून प्लॉट बांधला. घर बांधताना आक्षेप का घेतला नाही,' असा सवाल केला.

रस्ता रुंदीकरणासाठी भूसंपादन करण्यापूर्वी पालिकेने आमच्याशी चर्चा करावी. एकत्रित पंचनामे करा, पर्यायी जागा कुठे आणि कशी देणार हे सांगा. कोणत्याही नेत्यावर आमचा विश्वास नाही. त्यामुळे आम्हाला आंधारात ठेवून कोणताही निर्णय घेऊ नका. या संपूर्ण परिसरात गरीब लोक राहतात. त्यांचे हातावर पोट आहे. त्यामुळे घराच्या बदल्यात घर मिळावे.

- मधुकर खिल्लारे, शाखाध्यक्ष, भाकप

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अत्याचार करणाऱ्यांवर कठोर कारवाई हवी

$
0
0

औरंगाबाद : महिला अत्याचाराचे गुन्हे जलदगती न्यायालयात चालवा, आरोपींना कठोर शिक्षा करा, यासह अन्य मागण्यांठी भारिप बहुजन महासंघाच्या महिला आघाडीने सोमवारी मीलकॉर्नर येथे निदर्शने केली. अत्याचार करणारा आरोपी पुन्हा असे कृत्य करण्यास धजावणार नाहीत, अशी कठोर कारवाई करावी, अशी मागणी आघाडीच्या शहराध्यक्ष डॉ. प्रज्ञा साळवे यांनी केली. या आघाडीने पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांना निवेदन दिले. यावेळी चंद्रभागा दाणे, वैशाली चक्रनारायण, कमल भालेराव आदींची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रवाशाचा मृत्यू; कारचालकास कैद

$
0
0

औरंगाबादः अॅपेरिक्षातील प्रवाशाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी आरोपी कारचालक चैनसिंग कंकरवाल याला प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी व्ही. जी. उपाध्ये यांनी तीन महिने साधी कैद व दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

या प्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यामध्ये विलास बाबुराव केदारे (रा. सारा वैभव) यांनी फिर्याद दिली होती. त्यानुसार पंढरपूरकडून येणाऱ्या अपेरिक्षाला (क्र. एमएच-२०, एए ४१०३) हायवे टी पाँर्इंटवर कारचालक (क्र. एमएच-२०, बीसी १९०) आरोपी चैनसिंग आसाराम कंकरवाल (रा. देवगाररंगारी) याने वाहन निष्काळजीपणे चालवून धडक दिली होती. या अपघातात अॅपेरिक्षातील पाच प्रवासी जखमी झाले, तर कृष्णराव उर्फ दादाराव औचरमल हे गंभीर जखमी झाले. उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी देण्यात आलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात केला. एमआयडीसी वाळूज पोलिसांनी प्रकरणाचा तपास करून आरोपीविरूद्ध दोषारोपपत्र दाखल केले. या खटल्याची सुनावणी प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी व्ही. जी. उपाध्ये यांच्या कोर्टात झाली. सुनावणीच्या वेळी सहाय्यक सरकारी वकील डी. आर. काठुळे यांनी ६ साक्षीदार तपासून आरोपीविरूद्ध गुन्हा सिद्ध केला.

विवाहितेचा छळ

औरंगाबादः आसेफिया कॉलनी येथील इरफाना बेगम मिर्झा फारूख बेग (वय २७) या विवाहितेचा सासरच्या मंडळीनी चारित्र्यावर संशय घेत छळ केला. गेल्या दोन वर्षांपासून हा जाच सुरू असून, तीला माहेरून हुंड्याची मागणी करीत घराबाहेर काढण्यात आले. याप्रकरणी इरफाना बेगम यांच्या तक्रारीवरून आरोपी मिर्झा फारूख व सास अजिजा बेगम यांच्याविरुद्ध छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महिलेला कारची धडक

राहीबाई भिमाजी भालेराव (रा. क्रांतीनगर) या शनिवारी मुजीब किराणा स्टोअर्सजवळ झाडाखाली बसल्या होत्या. यावेळी कारने (क्रमांक एमएच २० - ४४३३) त्यांना धडक दिली. या अपघातात दोन्ही पाय जखमी झाले आहेत. त्यांच्या तक्रारीवरून क्रांतिचौक पोलिस ठाण्यात पसार कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सहा जुगाऱ्यांना ठोकल्या बेड्या

$
0
0

औरंगाबाद : जुगार खेळणाऱ्या सहा आरोपींना करमाड पोलिसांनी सोमवारी सायंकाळी अटक केली. त्यांच्याकडून जुगार साहित्यासह १ हजार २३० रुपये जप्त करण्यात आल्याची माहिती करमाड पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक सूर्यकांत कोंकणे यांनी दिली. करमाडमधील न्यू हायस्कूल शाळा परिसरात काही लोक जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्याआधारे सायकांळी पावणे पाचच्या सुमारास पथकाने कारवाई करत जुगार खेळणारे परमेश्वर पठाडे, केशव कुलकर्णी, रामदास गायकवाड यांना अटक केली. तर दुसऱ्या घटनेत रेल्वेस्टेशन परिसरातील एका शेतात जुगार खेळणारे रवींद्र कुलकर्णी, सुभाष भालेराव व संतोष बनसोडे यांना पकडल्याचे पोलिसांनी सांगितले. प्रोबेशनरी पीएसआय विवेक जाधव यांच्यासह पोलिस कर्मचारी प्रविण ठाकरे, ज्ञानेश्वर बेले, श्रीमंत भालेराव यांनी ही कामगिरी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दारुड्याचा धुडगूस

$
0
0

म.टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

उसन्या पैशांच्या वादातून मद्यधुंद तरुणाने मित्रावर खंजीराने प्राणघातक हल्ला केला. यानंतर तो स्वतःच त्याच्याविरूद्ध पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी दाखल झाला. तेथे त्याने ड्युटी अंमलदाराला देखील मारहाण केली. शनिवारी सायंकाळी हा प्रकार क्रांतिचौक पोलिस ठाण्यात घडला. याप्रकरणी आरोपीवर खुनाचा प्रयत्न करणे व शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी दोन वेगवेगळे गुन्हे दाखल झाले आहेत.

राहुलनगर येथील सोमेश चंद्रकांत बनसोडे (वय २३) या तरुणाकडून अशोक श्रावण गायकवाड रा. जयभवानीनगर याने दोन हजार रुपये उसने घेतले होते. शनिवारी सायंकाळी साडेसहा वाजता अशोक रेल्वे स्टेशन भागातील रिक्षा स्टँडपाशी उभा होता. यावेळी दुचाकीवर सोमेश त्या ठिकाणी आला. त्याने अशोकला पैशांची मागणी केली. अशोकने 'आता पैसे नाहीत नंतर देतो' असे सांगितले.

या गोष्टीचा राग आल्याने सोमेशने खंजीर काढून अशोकच्या पोटावर, कानावर, बरगडीवर प्राणघातक वार केले. यात तो गंभीर जखमी झाला. पोलिसांना हा प्रकार कळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत अशोकला घाटी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. याप्रकरणी क्रांतिचौक पोलिस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोसिल निरीक्षक गोवर्धन कोळेकर या प्रकरणी तपास करीत आहे.

मद्यधुंद अवस्थेत ठाण्यात धुडगूस

अशोकवर हल्ला केल्यानंतर रात्री सव्वा आठ वाजेच्या सुमारास सोमेशने मद्यधुंद अवस्थेत क्रांतिचौक पोलिस ठाणे गाठले. या ठिकाणी जमादार गोपाळ सोनवणे ठाणे अंमलदार म्हणून ड्यूटीवर होते. आल्याबरोबर अशोक गायकवाडने मला मारहाण केली असून तक्रार द्यायची असल्याचे सांगत गोंधळ घालण्यास सुरुवात केली. सोनवणे यांना 'तुम्ही पोलिस आहात का कसाई' असे म्हणत त्यांना शिवीगाळ व धक्काबुक्की केली. सोमेशला अटक करण्यात आली असून त्याच्याविरूद्ध जमादार सोनवणे यांच्या तक्रारीवरून शासकीय कामात अडथळा‌ निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘रुसा’ अभियानातून विद्यापीठाला २० कोटी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'रुसा अर्थात राष्ट्रीय उच्च शिक्षण अभियानाअंतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला २० कोटींचा निधी मंजूर झाला आहे. यामुळे पायाभूत सुविधा, प्रयोगशाळा अद्ययावत करण्यास मदत होईल,' अशी माहिती महाविद्यालये व विद्यापीठ विकास मंडळाचे संचालक (बीसीयूडी) डॉ. के. व्ही. काळे यांनी दिली.

शासनाने 'रुसा'साठी विद्यापीठ, कॉलेजांकडून प्रस्ताव मागविले होते. विद्यापीठाने रुसातंर्गत १८५ कोटींचे प्रस्ताव सादर केले. यात पायाभूत सुविधा, प्रयोगशाळा नूतनीकरण, अत्याधुनिक साहित्य, वसतिगृह उभारणी यासह एकाच छताखाली विद्यार्थ्यांना संशोधन शक्य व्हावे या हेतूने 'रिसर्च हब'चा समावेश आहे. राज्यशासनाकडून केंद्राकडे रुसाचे प्रस्ताव गेले होते. राज्यासाठी २५१ कोटींचा निधी मंजूर झाला. यात २० कोटी रुपये डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला मंजूर झाले. विशेष म्हणजे रुसामधून राज्याला पहिल्यांदाच निधी मंजूर झाला आहे.

'रिसर्च हब'ला ३० कोटी मिळणार?

विज्ञान, कला, वाणिज्य शाखेतील पदव्युत्तर विद्यार्थ्यांना एकाच छताखाली संशोधन करता यावे, त्यांच्यातील नवीन संकल्पना समोर याव्यात, या हेतूने 'रिसर्च हब' उभारण्याची तयारी विद्यापीठाने रुसामध्ये दर्शविली. यासह डीएनए बारकोडिंग व जिओ स्पॅटल टेक्नॉलॉजीच्या विस्तारासाठी विद्यापीठाने प्रस्तावात निधीची मागणी केली. त्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला तीस कोटी रुपये मिळण्याची शक्यता आहे.

१७ सप्टेंबर रोजी होणाऱ्या राज्य पातळीवरील बैठकीला सर्व विद्यापीठांचे बीसीयूडी उपस्थित राहणार आहेत. २० कोटी रुपयांचा निधी विविध प्रयोगशाळांचे आधुनिकीकरण, वर्गखोल्यांचे आधुनिकीकरण, पायाभूत सुविधांसाठी मिळाला आहे.

- डॉ. के. व्ही. काळे; बीसीयूडी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शांतता समितीच्या बैठकीमध्ये वादंग

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'अधिकारी आयेंगे-जायेंगे. बिठाअो विनापरवाना गणपती,' अशी मुक्ताफळे उधळत कायदा गुंडाळण्याची भाषा करणाऱ्यांना सोमवारी पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी ठणकावले. 'कोणाची टपरी उशिरापर्यंत चालते, कायदा कोण मोडतो ते पाहतोच,' असा इशारा त्यांनी दिला. तापडिया नाट्यमंदिरात झालेली गणेशोत्सव शांतता समितीची बैठक वादावादीने गाजली.

बैठकीत तारा पान सेंटरचे शरफोद्द‌िनभाई यांनी 'गणपती बसवण्यासाठी परवाना मिळायला वेळ लागत असेल तर, विनापरवाना गणपती बसवा, अधिकारी काय येतील-जातील,' असे वक्तव्य केले. त्यावर अमितेशकुमार संतापले. 'तुम्ही शांतता समितीच्या बैठकीत चुकीचे वक्तव्य करीत आहात. तुम्हाला आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. तारा पान सेंटर रात्री कितीपर्यंत सुरू असते याची आपल्याला माहिती आहे,' असे खडे बोल सुनावले.

आमदार संजय शिरसाट म्हणाले, 'आयुक्त सिंघम असून, ते केबिनमध्ये मारतात असे चित्र बाहेर आहे. जो कोणी चुकीचे वागेल त्याला त्यांची भीती आहे.' तर 'हायकोर्ट किंवा आयुक्तांच्या नावाचा दहशतीसाठी वापर होत आहे,' असा चिमटा आमदार अतुल सावे यांनी काढला. त्याला अमितेशकुमार यांनी उत्तर दिले, 'आम्ही पर्सनल इगोसाठी काम करत नाही. नागरिकांचे प्रश्न सोडवतो. आमचे काही निर्णय चुकत असतील तर, त्याबाबत सांगावे. त्यामध्ये सुधारणा करू,' असे आवाहन केले. 'गणपती विसर्जनादिवशी दारू विक्री सुरू असते. तसे आढळल्यास दुकानाचा परवाना वर्षभर रद्द करू,' असा इशारा अमितेशुकमार यांनी दिला.

सावे संतापले

उत्सव काळातील गैरप्रकारांना कार्यकर्ते जबाबदार नसून, लोकप्रतिनिधी जबाबदार असतात, असे व्यक्तव्य एका व्यक्तीने केले. यावर आमदार सावे संतापले. त्यांनी यावर आक्षेप घेतला. हे वक्तव्य मागे घेण्याची सूचना केली. शेवटी त्या नागरिकाने हे वक्तव्य मागे घेतले.

तक्रारींचा पाऊस

अतिक्रमण मोहीम तात्पुरती थांबवा ः आमदार अतुल सावे आणि संजय शिरसाट.

बकरी ईद याच काळात आहे. कोणत्याही संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जनावरांची वाहतूक करणारी वाहने स्वतः न अडवता पोलिसांना माहिती द्यावीः इम्तियाज जलील, आमदार.

पोलिसांनी कायद्याचा अतिरेक करू नये. गणेश मंडळांनी वर्गणीची शिल्लक रक्कम दुष्काळग्रस्तांना द्यावीः प्रदीप जैस्वाल, माजी आमदार.

गणेश मंडळाच्या स्टेजच्या उभारणीपूर्वी पोलिसांनी पाहणी करावी. नंतर स्टेज काढायची वेळ येणार नाहीः त्र्यंबक तुपे, महापौर.

मिरवणूक मार्गावरील स्वागत मंच शेवटच्या टप्प्यात लावावेः प्रमोद राठोड, उपमहापौर.

गणपती परवान्यासाठी एक खिडकी योजना हवी, उघड्यावरील मांसविक्री बंद कराः नंदू घोडेले, नगरसेवक

दारू दुकाने गणपती विसर्जनाच्या दोन दिवस अगोदर बंद कराः भारती भांडेकर

एनसीसी कॅडेटचा स्वयंसेवक म्हणून समावेश कराः मश्शूभाई.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना १० हजारांची मदत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

जिल्ह्यातील आत्महत्य केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना दहा हजार रुपयांची आर्थिक मदत करण्याचा निर्णय जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी सोमवारी (७ सप्टेंबर) वार्षिक सर्वसाधारण सभेत जाहीर केला. चारा उत्पादनासाठी शेतकऱ्यांना पन्नास टक्के किंमतीत बियाणे, दुष्काळ निधी उभारणीसाठी संचालकांनी पुढाकार घ्यावा, असे निर्णयही यावेळी घेण्यात आले. त्याचबरोबर दूध उत्पादक शेतकऱ्यांना एक कोटी सहा लाख रुपयांचा बोनस संघाने जाहीर करण्यात आला.

पाटीदार भवन येथे संघाची सभा झाली. उपाध्यक्ष नंदलाल काळे, संचालक गोकुळसिंग राजपुत, राजेंद्र पार्थ्रीकर, पुंडलिक काजे, राजेंद्र जैस्वाल, शीलाताई कोळगे, व्यवस्थापकीय संचालक डॉ. प्रदीप पाटील आदी उपस्थित होते. यावेळी दूध संघाचे अध्यक्ष, विधानसभेचे अध्यक्ष बागडे यांनी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दहा हजार रुपये आर्थिक मदत म्हणून देण्यात येईल, असे घोषित केले. शेतकरी अडचणीत आहे. सरकारच्या स्तरावर उपाययोजना सुरू आहेत. या कामात संघही मदतीचा हात देणार, असे त्यांनी सांगितले. यापूर्वी गारपीटग्रस्तांना संघाने २५ लाख रुपयांची मदत केली होती. यंदा दुष्काळ निवारण निधी उभारला जाईल. सर्व संचालक वर्षभराचा भत्ता या निधीत जमा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संवेदनाहीन ‘सेल्फीं’चा नानाला ताप

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबाशी संवाद आहे. कृपया गांभीर्य ठेवा. फोटो, सेल्फीसाठी गर्दी करू नका,' अशी विनंती नाना-मकरंद यांनी वारंवार करूनही बघ्यांनी उच्छाद मांडला. विंगेतील गर्दी हाकलून लावण्यासाठी खुद्द नानाला रुद्रावतार धारण करावा लागला, मात्र मोबाइलमध्ये अभिनेत्यांची छबी टिपण्यासाठी अनेकांनी शेवटपर्यंत स्टेजजवळ गर्दी करीत कार्यक्रमाला गालबोट लावले.

'समाजाच्या कथनी व करणीत खूप अंतर आहे. व्हॉटसअॅपवर शेतकऱ्यांची दुःखी कविता टाकली की कर्तव्य संपते. या कवितेवर दुःखी चेहऱ्याची प्रतिमा टाकून आपलीही जबाबदारी संपते, पण माणसाने माणसाच्या मदतीसाठी तत्पर राहण्याची जबाबदारी आपण विसरलो,' अशा शब्दात मकरंद अनासपुरे यांनी कान टोचले. नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे बांधिलकी जपत शेतकरी कुटुंबांना मदत करीत आहेत, मात्र 'हिरोंना' मोबाइलमध्ये टिपताना बघ्यांच्या गर्दीने सोमवारी कडेलोट केला. कृपया फोटोसेशन करून कार्यक्रमाचे गांभीर्य घालवू नका, अशी कळकळीची विनंती करूनही गर्दी थांबली नाही.

स्टेजवर गर्दी वाढल्याने नाना संतापले. विंगेतील गर्दी हुसकावून लावताना 'आता माझी सिनेमातील इमेज बघा,' असे म्हणत गर्दीत शिरले. अनेकांना हाकलून लावत 'नांदेड-लातूरला असे झाले नाही. मग इथेच का,' असा सवाल त्यांनी केला.

कार्यक्रमाच्या शेवटी गर्दीने स्टेज व्यापले. या गर्दीमुळे लाभार्थी महिलांना स्टेजवर जाणे कठीण झाले. या प्रकारामुळे नाना व मकरंद अखेर निघून गेले. सोशल मीडियाच्या दुष्परिणामाची चुणूक दाखवणारा हा प्रकार संवेदनशील नागरिकांना चुटपूट लावून गेला.

'मला मदत करा...'

यादीत नाव नसलेल्या काही विधवा महिला स्टेजवर आल्या. यादीत नाव नसले तरी आम्हाला मदत करा, अशी विनंती त्यांनी केली. त्यामुळे नवी यादी करून मदत करण्यात येईल, असे राजाभाऊ शेळके यांनी सांगितले. पत्नीच्या उपचारासाठी पैसे नसल्याने हतबल झाल्याची व्यथा मांडत भालेराव नावाच्या व्यक्तीने थेट स्टेजवर कागदपत्रे भिरकावली. 'तुला योग्य ती मदत करू,' असे आश्वासन नानांनी दिले. 'फक्त मदत नको, आत्महत्या कायमस्वरुपी थांबवण्यासाठी काय करणार,' असा प्रश्न विचारून जगन्नाथ निकम या व्यक्तीने गोंधळ घातला, मात्र नाना व मकरंद यांनी सुसंवाद साधत 'आमच्या लोकचळवळीत तुम्ही सहभागी व्हा,' असे निकम यांना सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

...अन् सभागृह निःशब्द झाले

$
0
0

औरंगाबाद : 'माझ्या पतीने मार्च महिन्यात आत्महत्या केली. मला एक मुलगा व एक मुलगी आहे. आम्हाला नीट घर नाही..., शेतीचे उत्पन्न नाही...,' अशी व्यथा सांगताना करंजखेड (ता. कन्नड) येथील कविता सोमनाथ राऊत यांच्या अश्रूंचा बांध फुटला. पुढचे शब्द तोंडातच गोठले... जवळ बसलेले नाना पाटेकर स्तब्ध झाले अन् अवघे सभागृह पाच मिनिटे निःशब्द राहिले. नापिकी, कर्जबाजारीपणा आणि दुष्काळात अत्यंत परवड वाट्याला आलेल्या शेतकरी महिलांच्या वेदना ऐकताना उपस्थितांना अश्रू आवरले नाही.

घरातील कर्ता पुरूष गेल्यानंतर महिला शेतकऱ्यांची परवड झाली आहे. औरंगाबाद-जालना जिल्ह्यातील बहुतांश महिलांना ऐन तारुण्यात वैधव्य आले. सहा महिन्यांची मुलगी असलेली २३ वर्षांची विधवा नाना पाटेकर यांना अस्वस्थ करून गेली. 'या मुलीने आपले आयुष्य कशाच्या बळावर पुढे रेटावे,' असा प्रश्न नानांनी केला. यावेळी तीन महिलांनी प्रातिनिधिक स्वरुपात मनोगत व्यक्त केले. सोलनापूर (ता. पैठण) येथील मंदाकिनी मनोहर खरात यांच्या पतीने आत्महत्या केली. सध्या सासू-सासरे, मुलगा-मुलगी यांचा सांभाळ मंदाकिनी करतात. 'आमच्या घरी तालुक्यातला कोणताच नेता आला नाही. कायमचे उपाय केले तरच शेतकरी आत्महत्या थांबतील,' असे त्यांनी धाडसाने सांगितले. अंभई (ता. सिल्लोड) येथील सरस्वती गणेश रहाटे यांच्यासमोर तीन मुलांचे शिक्षण, घरभाडे, जेमतेम दोन एकर शेती अशी संकटे आहेत. 'नवऱ्याने आत्महत्या करताना विचार केला नाही. आता आंधळी सासू व मुलांसाठी खस्ता खाते,' असे सांगताना सरस्वतीबाईंना अश्रू अनावर झाले.

पती, मुलगा गमावला

बनोटी (ता. सोयगाव) येथील अप्रुुपाबाई इश्वर खैरनार यांची परिस्थिती सर्वात बिकट आहे. दुष्काळाच्या तडाख्यात मुलगा तुषार खैरनार व पती इश्वर खैरनार सापडले. दोघांनी आत्महत्या केल्याने अपरुपाबाई यांच्यावर आभाळभर दुःख कोसळले. या कठीण काळात मोलाची मदत करणारे कुणी नाही.

महिलांना सक्षम करू

आपल्या सणांसाठी चिनी बनावटीच्या वस्तू घेण्यापेक्षा खेड्यातील महिलांनी तयार केलेल्या वस्तू घेऊ. याचे प्रशिक्षण महिलांना देणार आहोत, असे मकरंद अनासपुरे म्हणाले. पणत्या, मेणबत्त्या, ज्यूट बॅग अशा वस्तू घरी तयार करता येतील.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाण्याचा वापर जबाबदारीने करा

$
0
0

मकरंद अनासपुरे, अभिनेता

मराठवाड्यातील दुष्काळाने आपण सर्वजण अस्वस्थ आहोत. शेतकरी कुटुंबाच्या मदतीसाठी ठिकठिकाणी फिरत असताना मी निसर्गाचा लहरीपणा अनुभवत आहे. नापिकीमुळे शेती उध्वस्त झाली. या संकटावर मात करणे कठीण असले तरी प्रत्येकाच्या सहकार्याने वेळ निभावता येईल.

गावाशी नाळ कायम असलेल्या अनेक जागरूक लोकांनी एकत्रित प्रयत्न केल्यास संकटावर मात करू. खेड्यात पैसा दिसणे कठीण असताना शहरात पैशाची वारेमाप उधळपट्टी सुरू आहे. या दुष्काळात दुष्काळग्रस्तांसाठी शहरातील नागरिकांनी अधिक संवेदना ठेवणे आवश्यक वाटते. विशेषतः पाण्याचा जपून वापर केला पाहिजे. कारण खूप शेतकऱ्यांशी बोलताना पाणी आणि वीज याच मुख्य समस्या जाणवल्या. 'पाणी पाहिजे' असे खूप जणांनी सांगितले. त्यामुळे पाण्याचे महत्त्व लक्षात घ्या.

शहरात पाणी वापराबाबत अक्षरशः विकृती दिसते. सार्वजनिक नळाचा वापर केल्यानंतर नळ तसाच चालू ठेवणारे खूप लोक आहेत. या लोकांना पकडून शिक्षा करावी. अजूनही लॉजमध्ये 'दोन बादल्या पाणी खाली जाऊ द्या. तिसरी बादली गरम पाण्याने भरेल' असे सांगतात. तर दोन बादल्या पाणी वाया जाणे ज्या दिवशी थांबेल तेव्हापासून पाण्याची खरी बचत होईल.

आपल्या देशापेक्षा कमी पाऊस पडणारा इस्त्रायल देश पाण्याचा अत्यंत काटेकोर वापर करीत आहे. या देशाचा आदर्श आपण घेतल्यास पाणी टंचाई कधीच निर्माण

होणार नाही. शहरी भागात पाणी वापराबाबत दिवसेंदिवस बेजबाबदार वर्तन दिसत आहे. दात घासताना व दाढी करताना नळ चालू कशाला पाहिजे ? चूळ भरण्यासाठी थोडेसेच पाणी लागते. मग उरलेल्या पाण्याची नासाडी कशासाठी ? या सूचना अत्यंत किरकोळ असल्या तरी सर्वांनी अंमलात आणल्यास कोट्यवधी लिटर पाण्याची बचत होईल. पाण्याचा सदुपयोग हाच दुष्काळावर सर्वोत्तम उपाय आहे.

एवढे कराच !

प्रत्येकाने घरी रेन वॉटर हार्वेस्टिंग करावे.

घरी नळाला तोटी असावी.

सार्वजनिक नळ उघडा ठेवू नका.

पाणी वापरात बेजबाबदार वर्तन टाळा.

पाणी बचतीबाबत प्रत्येकाने जनजागृती करावी.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घर वाऱ्यावर सोडून कसं चालेल?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'पंधरा हजारांचा चेक घेताना कोणत्या मायमाउलीला आनंद वाटेल? सहानुभूती किंवा अनुकंपा म्हणून ही मदत नाही, तर समाजाची जबाबदारी आहे. या निष्पाप मुलांनी अनाथ का व्हावे, असा प्रश्न पडतो. या दुष्काळापेक्षा भयाण दुष्काळात माझा शेतकरी लढला. मग आताच घर वाऱ्यावर सोडून कसे चालेल? शेतकरी भावांनो कृपया आत्महत्या करू नका,' असे भावनिक आवाहन अभिनेते नाना पाटेकर यांनी केले. संत तुकाराम नाट्यगृहात सोमवारी (७ सप्टेंबर) झालेल्या कार्यक्रमात पाटेकर यांनी शेतकरी कुटुंबीयांशी संवाद साधला.

मराठवाड्यात दुष्काळात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या पत्नीला आर्थिक मदत करण्यासाठी अभिनेते नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे यांनी लोकचळवळ हाती घेतली आहे. याअंतर्गत औरंगाबाद-जालना जिल्ह्यातील १३५ विधवा शेतकरी महिलांना प्रत्येकी १५ हजार रुपये, साडी व ब्लँकेटचे वाटप करण्यात आले. शेतकऱ्यांविषयी कृतज्ञता आणि बांधिलकी जपणारा हा कार्यक्रम आदर्श वस्तुपाठ ठरला. यावेळी नाना व मकरंद यांनी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांच्या व्यथा जाणून घेतल्या. संकटात ठामपणे संघर्ष करण्याचे आवाहन नाना यांनी केले.

'गेल्या ६७ वर्षांत सरकारने काय केले, याच्यावर चर्चा किंवा टीका करण्याची ही वेळ नाही. उलट आम्ही जमेल तशी थातुरमातुर मदत करीत आहोत. प्रत्येकाने या क्षणी शक्य आहे ते केले पाहिजे. कारण शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवणे महत्त्वाचे आहे. सरकारने खूप दिले, पण शेतकऱ्यांपर्यंत पोहचताना मध्येच खूप झिरपते. जशी आपली लायकी तसे सरकार मिळते. आपण प्रश्न विचारल्याशिवाय बदल होणार नाही. पावसाळ्याचे तीन महिने वगळता इतर नऊ महिने रोजगार देण्यासाठी प्रयत्न करीत आहोत. या तरुण विधवा आपल्या बहिणी आणि मुले भावंडं आहेत. यांच्या मदतीसाठी मी पुन्हा-पुन्हा येईन, पण अशा कारणासाठी पुन्हा येण्याची वेळ येऊ नये, असे वाटते. तरुण विधवा आणि अनाथ मुलांच्या वेदना मला अस्वस्थ करतात. कुणाही शेतकऱ्याने आत्महत्या करू नये. आम्ही तुमच्यासोबत आहोत याची खात्री बाळगा' असे नाना म्हणाले.

मकरंद अनासपुरे यांनी समाजाला मदतीचे आवाहन केले. 'माणसाचा पाय पडल्यावर जीव वाचवण्यासाठी बेडूक उडी मारतो, दगड मारल्यावर कुत्रे पळते. प्रत्येक प्राणी आपला जीव वाचवतो. मग शेतकऱ्याला आत्महत्या का करावीशी वाटते, याचा समाजाने विचार करावा. तरुणांनी जीव देणे शरमेची गोष्ट आहे. शेतकऱ्यांची काही मुले खूप मोठ्या पदांवर आहेत. तुमची नाळ शेतीशी जुळलेली असेल तर आपल्या भावंडांच्या मदतीसाठी पुढे या. ऑगस्ट महिन्यात ४६ आत्महत्या झाल्या. एवढ्या आत्महत्या असतात का,' असा सवाल मकरंद यांनी केला. या कार्यक्रमाच्या संयोजनासाठी पटकथा-संवाद लेखक अरविंद जगताप, राजाभाऊ शेळके यांनी परिश्रम घेतले. देवगिरी कॉलेजच्या नाट्यशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. प्रा. समाधान इंगळे यांनी सूत्रसंचालन केले.

मदतीचा ओघ

शेतकऱ्यांच्या मदतीसाठी समाजाने पुढाकार घ्यावा, असे आवाहन नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे यांनी केले. या आवाहनाला प्रतिसाद देत मदतीचा ओघ सुरू झाला. शहरातील अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी सात हजार रुपये दिले तर, लहान मुलांनी दहीहंडीतून वाचवलेली रक्कम दिली. बद्रिनाथ खेडकर (३० हजार रुपये), अविनाश चौधरी (५० हजार रुपये), सुभाष पल्लेवार (५ हजार रुपये) यांनी भरीव मदत केली. सातारा परिसरात चंद्रशेखर कणके आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या दोनशे मुलांना मोफत शिक्षण देत आहेत. या मुलांना भावेश सराफ व अविनाश चौधरी आर्थिक मदत करणार आहेत. जुगलकिशोर तापडिया एक लाख शेतकऱ्यांचा विमा काढणार आहेत. कार्यक्रमाच्या शेवटापर्यंत मदतीचा ओघ सुरू राहिला.

विरोधक-सत्ताधाऱ्यांनी एक व्हावे

'दुष्काळी परिस्थितीला तोंड देण्यासाठी सत्ताधारी व विरोधकांनी एकत्र येण्याची गरज आहे. संकट दूर होताच पुन्हा एकमेकांची गचांडी धरू. पूर्वी सत्तेत असलेल्यांनाही संकटाचा सामना करावा लागला असता. म्हणून सत्ताधाऱ्यांवर टीका करण्यापेक्षा एकत्र दौरा करून उपाययोजना करा,' असा सल्ला नाना पाटेकर यांनी दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अब्जावधींचा नफा, तरी बँकांची दुष्काळाकडे पाठ

$
0
0

Dhananjay.Kulkarni@timesgroup.com

औरंगाबादः मराठवाड्यातून अब्जावधी रुपयांचा नफा कमाविणाऱ्या बँकांनी दुष्काळाकडे पाठ फिरविली आहे. शेतकऱ्यांच्या दुःखावर फुंकर घालण्यासाठी सरकार, सिने कलाकार सरसावत असताना औरंगाबादमधील बँकांनी मात्र मदतीसाठी पुढाकार घेतलेला नाही. कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (सीएसआर) फंडातून बँका समाजासाठी काही खर्च करीत आहेत की नाही, असा प्रश्न पडतो.

औरंगाबादमध्ये १४ राष्ट्रीयकृत आणि १० खासगी बँकांच्या ३००हून अधिक शाखा आहेत. या बँकांनी गेल्या आर्थिक वर्षात ४०० कोटी रुपयांहून अधिक नफा कमाविला आहे. नफ्याच्या तुलनेत त्यांनी सामाजिक उत्तरदायित्वासाठी वापरलेला निधी (सीएसआर) फारच कमी आहे. उद्योग, घरबांधणी, पीक आदींसाठी देण्यात येणाऱ्या कर्जातून बँका हा नफा कमावितात. यावर्षी मराठवाड्यात मोठा दुष्काळ पडला आहे. पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. सरकारमार्फत दुष्काळग्रस्तांना मदत करण्यात येत आहे. त्याचबरोबर चित्रपट कलावंतही आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना मदत करण्यासाठी सरसावले आहेत. अशा वेळी अब्जावधींचा नफा कमाविणाऱ्या बँका मात्र दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे आलेल्या नाहीत.

बँक ऑफ महाराष्ट्र, स्टेट बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ हैदराबाद या तीन मोठ्या बँकांनी २०१४-२१०५ या आर्थिक वर्षात सुमारे ३५० कोटी रुपये नफा कमाविला आहे. त्यांनी सामाजिक कार्यात फक्त ५० ते ६० लाख रुपये खर्च केला आहे. हा खर्चही फक्त शाळांना पंखे, वॉटर प्युरिफायर आणि शैक्षणिक साहित्यासाठीच केला आहे. विशेषत: या तीन बँकांतून शेतकरी प्राधान्याने कर्ज घेतात. त्यांच्यासाठी या बँकांनी काहीही केलेले नाही. सर्व बँकांची विभागीय कार्यालये औरंगाबादेत आहेत. औरंगाबादसह, जालना, बीड, उस्मानाबाद, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर या जिल्ह्यांवर विभागीय कार्यालयातून नियंत्रण ठेवले जाते. विभागाच्या कार्यक्षेत्रातील सर्वच जिल्ह्यांत दुष्काळी परिस्थिती आहे. त्याकडे मात्र बँकांनी काणाडोळा केला आहे. यासंदर्भात 'एसबीआय'चे उपमहाव्यस्थापक रवींद्र पाटील म्हणाले, 'सीएसआर फंडातून किती आणि कोणत्या कारणासाठी खर्च करायचा, हे ठरविण्याचा अधिकार हेडऑफिसला आहे. सीएसआरमधून बँक समाजोपयोगी कामे करीत आहे.'

महाराष्ट्र बँकेचे झोनल मॅनेजर विजय कांबळे म्हणाले,'बँक जलयुक्त शिवार योजनेसाठी मदत करीत आहे. हे काम दुष्काळमुक्तीचेच आहे. गंगापूर आणि पैठण येथे नदीपुरुज्जीवनासाठी बँकेने ५ लाख रुपये दिले आहेत.'

अन्य बँकांची स्थिती

सेंट्रल बँक, कॅनरा बँक, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा, अलाहाबाद बँक, आंध्र बँक, कॅथोलिक बँक, कार्पोरेशन बँक, देना बँक, एचडीएफसी, आयसीआयसीआय, फेडरल, इंडियन, कोटक महिंद्रा, जम्मू अँड कश्मिर, महाराष्ट्र ग्रामीण बँक, ओरिएंटल, पंजाब नॅशनल, अॅक्सिस, पंजाब अँड सिंध यांच्यासह छोट्या बँकांचा नफा प्रत्येकी सुमारे २ ते १५ कोटींपर्यंत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


उपासनींची बदली योग्यच

$
0
0

मॅटच्या निर्णय हायकोर्टात कायम

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद

राज्य शासनाने औरंगाबाद जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी नितीन उपासनी यांची बदली २०१४मध्ये येथील शासकीय विद्यानिकेतनचे प्राचार्य म्हणून झाली. या बदलीवर मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने शिक्कामोर्तब करताना उपासनी यांची याचिका फेटाळून लावली.

राज्य शासनाच्या आदेशाविरुद्ध नितीन उपासनी यांनी महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाकडे (मॅट) धाव घेतली. त्यांची याचिका मॅटने फेटाळल्यावर औरंगाबाद खंडपीठात आव्हान दिले. उपासनी यांची झालेली बदली महाराष्ट्र राज्य शासकीय कर्मचारी बदल्यांचे विनियमन अधिनियम २००५च्या कायद्याचा भंग करणारा आहे. शिक्षणाधिकारी म्हणून त्यांनी कार्यकाल पूर्ण केला नाही. ही बदली नियमानुसार झाली नाही. मे-जूनऐवजी ऑगस्टमध्ये बदली करण्यात आली, असा युक्तिवाद उपासनी यांचे वकील अविनाश देशमुख यांनी केला. प्रशासकीय बाबींवर त्यांची बदली झाली आहे. बदली करताना ठिकाण बदलले नाही. उपासनी यांची बदली योग्य आहे व ती कायम करावी, अशी विनंती जिल्हा परिषदेचे वकील श्रीमंत मुंडे यांनी केली. हायकोर्टाने उपासनी यांच्या बदलीवर शिक्कामोर्तब करताना मॅटचा निर्णय कायम ठेवण्याचे आदेश न्या. संभाजी शिंदे व न्या. ए. एम. बदर यांनी दिले.

२०१३ ते २०१४ ः उपासनी यांच्याविरुध्द जि.प. अध्यक्षांसह सदस्य, शिक्षक यांच्या तक्रारी

१२ मार्च २०१४ ः जिल्हा परिषद सीईओ यांचे शालेय शिक्षण विभागाला उपासनी यांची बदली करण्याचे पत्र

१६ ऑगस्ट २०१४ ः उपासनी यांची बदली

११फेब्रुवारी २०१५ ः उपासनी यांची याचिका मॅटने फेटाळली

२ सप्टेंबर २०१५ ः औरंगाबाद खंडपीठाने उपासनी यांची याचिका फेटाळली

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वैजापुरात बँक फोडून २० लाख पळविले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, वैजापूर

औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मार्केट यार्डातील मुख्य शाखेतील तिजोरी गॅस कटरने कापून चोरांनी २० लाख ७ हजार ७७९ रुपयांची रोकड पळवली. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.

बँकेची मार्केट यार्डात मुख्य शाखा आहे. शनिवारी (५ सप्टेंबर) सायंकाळी सहा वाजता कामकाज संपल्यानंतर बँक बंद करण्यात आली. बँकेच्या तिजोरीत बारा लाख रुपये ठेवण्याची मर्यादा आहे, परंतु सायंकाळी साडेपाचपर्यंत जास्त रोकड जमा झाली. ही रक्कम स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये भरणे शक्य नसल्याने तिजोरीतच ठेवले होते. बँकेला रविवारी सुटी होती. शनिवार रात्री ते सोमवारची सकाळ या कालावधीत चोरांनी बँकेच्या उत्तरेकडील खिडकीची लोखंडी जाळी कापून आत प्रवेश केला. त्यानंतर गॅस कटरने तिजोरी कापून २० लाख ७ लाख ७७९ रुपयांची रोकड पळविली. व्यवस्थापक किरण पन्नालाल बाटिया व एका शिपायाला सोमवारी सकाळी दहा वाजता चोरी झाल्याचे लक्षात आली. त्यानंतर पोलिस ठाण्यात फिर्याद देण्यात आली. घटनास्थळी धाव घेतलेल्या पोलिसांनी श्वानपथकाच्या माध्यमातून माग काढण्याचा प्रयत्न केला, परंतु खरेदी विक्री संघाच्या गोदामजवळ श्वान घुटमळले. दरम्यान, या घटनेनंतर बँकेचे महाव्यवस्थापक काटकर व शेतकी विभाग व्यवस्थापक शिंदे यांनी बँकेला भेट दिली. या बँकेला सुरक्षारक्षक नसून, सीसीटीव्ही कॅमेरेही बसविले नाहीत.

एका महिन्यात तिसरी घटना

बँकेची तिजोरी गॅस कटरने फोडून रोकड पळवण्याची जिल्ह्यातील महिन्यातील ही तिसरी घटना आहे. यापूर्वी ५ ऑगस्ट रोजी बँक ऑफ महाराष्ट्रच्या कन्नड तालुक्यातील कालीमठ उपळा शाखेतून १३ लाख ६९ हजार २६२ रुपये चोरण्यात आले. त्यानंतर १७ आॅगस्ट रोजी फुलंब्री तालुक्यातील वडोदबाजार येथील बँक ऑफ महाराष्ट्रच्या तिजोरीतील २० लाख ८४ हजार २३१ रुपयांवर डल्ला मारण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राज्याला पावसाचा आधार

$
0
0

टीम मटा

राज्यात मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रासह सोमवारी पावसाने हजेरी लावली. मराठवाड्यातील दुष्काळी भागांत गेल्या दोन दिवसांपासून दमदार पाऊस सुरू आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस कोसळला. सोमवारी दुपारी वीज अंगावर पडल्याने दोघांचा मृत्यू झाला. उस्मानाबाद जिल्ह्यात तीन दिवसांत सरासरी १०८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. त्यासोबतच बीड, लातूर, जालना, हिंगोली, नांदेड व परभणी जिल्ह्यात श्रावणसरी कोसळल्या. त्यामुळे शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त केले जात आहे.

उस्मानाबाद शहर व परिसरात सोमवारी दुपारी पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे जिल्ह्यात दोन ठिकाणी वीज कोसळून दोघांना प्राण गमवावे लागले. परंडा तालुक्यातील अनाळा शिवारात वीज कोसळून राहुल विश्वंभर जाधव (२४) याचा मृत्यू झाला. सोमवारी दुपारी जनावरे चारत असताना ही घटना घडली. लोहारा तालुक्यातील जेवळी पूर्व तांड्यावर वीज कोसळून कमल धनसिंग राठोड (३०) या महिलेचा मृत्यू झाला. याच वेळी तुळजापूर, लोहारा परिसरातही दमदार पावसाने हजेरी लावली.

दमदार पावसाने कळंब शहर परिसरातून वाहणाऱ्या मांजरा नदीला यंदाच्या पावसाळ्यात पहिल्यांदाच पाणी वाहिले. लातूर जिल्ह्यातील जळकोट तालुका वगळता सर्वत्र हलक्या स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली. रेणापूर, पानगाव परिसरात दुपारी दोन ते अडीचच्या दरम्यान अर्धातास जोरदार पाऊस झाला. निलंगा येथे मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला.

बीड जिल्ह्यात सोमवारी सलग तिसऱ्या दिवशी पावसाने हजेरी लावली. केज, अंबाजोगाई, परळी, धारुर व माजलगाव तालुक्यात जोरदार पाऊस पडला. धारुर तालुक्यातील भोगलवाडी परिसरात जोरदार पाऊस झाल्याने पहिल्यांदाच ओढे-नदीला आला पूर आला. बीड जिल्ह्यात सोमवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत सरासरी ७.८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

मिरज, नगरमध्ये पाऊस

सांगली मिरजेसह कवठेमहांकाळच्या काही भागांत सोमवारी पावसाने पुन्हा हजेरी लावली. मिरजेत दमदार पाऊस झाल्याने शहरवासियांची तारांबळ उडाली. सोमवारी सकाळपर्यंत जिल्ह्यात २४ तासांत एकूण ३५.६ मिलीमीटर तर सरासरी ३.६ मिलीमीटर इतकी पावसाची नोंद झाली आहे. नगर जिल्ह्यात काही ठिकाणी सलग दुसऱ्या दिवशी पावसाने हजेरी लावली. त्याचबरोबर सोलापूर जिल्ह्यातही पाऊस पडल्याची नोंद आहे.

विदर्भातही हजेरी

नागपूरसह विदर्भाला सोमवारी मध्यम सरींचा दिलासा मिळाला. नागपूर शहरात दोन तासांत ३० मि‌लिमीटर पावसाची नोंद करण्यात आली. पावसाचा जोर दोन ते तीन दिवस कायम राहण्याचा अंदाज आहे. वर्धा, यवतमाळ, चंद्रपूरच्या काही भागांतदेखील पावसाची नोंद झाली.

बहुतांश मराठवाडा पावसात भिजला

मराठवाड्यातील ६० तालुक्यात पावसाने हजेरी लावली.

औरंगाबाद जिल्ह्यातील वेरूळ मंडळात ५४ मिली मीटर, हर्सूल मंडळात ५३ आणि चौका मंडळात ५० मिली मीटर पावसाची नोंद झाली.

बीड जिल्ह्यातील हनुमंत पिंपरी मंडळात ५५ मिली मीटर पाऊस पडला.

नांदेड जिल्ह्यातील तामसा मंडळात ६० मिली मीटर पावसाची नोंद झाली.

जालना मंडळात ५५ मिली मीटर पाऊस पडला

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चोरीच्या पैशातून घर खरेदी

$
0
0

म.टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

हैदराबाद बँकेच्या एटीएममधून २३ लाखांची रक्कम लांबवणाऱ्या आरोपीला अटक करण्यात मुकुंदवाडी गुन्हे प्रकटीकरण पथकाला यश आले आहे. हा कंपनीचा माजी कस्टोडीअन आहे. त्याच्या ताब्यातून सात लाख रुपये हस्तगत करण्यात आले आहेत. या चोरीच्या पैशातून त्याने स्वतःचे घर तसेच दहा लाखांची एफडी केली असल्याचे निष्पन्न झाले आहे.

रामनगरजवळील हैदराबाद बँकेच्या एटीएममधून २३ लाखांची रक्कम लंपास करण्यात आल्याचा प्रकार २५ ऑगस्ट रोजी उघडकीस आला होता. याप्रकरणी शनिवारी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हे प्रकटीकरण पथकाच्या वतीने या प्रकरणी तपास सुरू होता. तपासामध्ये सिक्युरिटी ट्रान्स कंपनीचा माजी कर्मचारी किरण पराप्पा वाघमारे (रा. एकनाथनगर) याचा हात असल्याचे निष्पन्न झाले होते. पोलिसांनी ‌वाघमारेला शनिवारीच ताब्यात घेतले होते. त्याची चौकशी केली असता त्याने हा गुन्हा केल्याची कबुली दिली. वाघमारेने १७ एप्रिल २०१५ रोजी नोकरी सोडली होती. कस्टोडीयन म्हणून काम करीत असताना एटीएममध्ये रक्कम जमा करण्याचे काम तो करीत होता. त्यामुळे त्याला या संदर्भातील पासवर्डची माहिती होती. १७ जून रोजी त्याने हैदराबाद बँकेतून २३ लाखाची रक्कम लंपास केली. यानंतर तांत्रिक कारणामुळे एटीएममशीन खराब असल्याने बंदच होते. २५ ऑगस्ट रोजी ऑडीटरच्या तपासणीमध्ये हा प्रकार समोर आला. यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी किरणच्या ताब्यातून सात लाखांची रक्कम जप्त करण्यात आली आहे. ही कारवाई पोलिस निरीक्षक नाथा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार कल्याण शेळके, शेख हारून, राजू बनकर, परशूराम सोनूने, सुनील जाधव, खिल्लारे यांनी यशस्वी केली.

किरणचे लग्न सहा महिन्यापूर्वीच झालेले आहे. लग्नानंतर दोनच महिन्यात त्याने नोकरी सोडली. किरायाच्या घरात तो आईवडील,बहीण, भाऊ व पत्नीसोबत राहत होता. रक्कल लंपास केल्यानंतर त्याने तेरा लाखात एकनाथनगरात स्वतःचे घर खरेदी केले. उर्वरित दहा लाखाची रक्कम पाथरी, जि. परभणी येथील एका बँकेमध्ये चुलत भावाच्या नावावर फिक्स डिपॉझीट केली. या एफडीवर त्याने तीन लाखाचे आणखी कर्ज काढले. ही कर्जाची रक्कम देखील त्याने घराच्या डागडुजीवर खर्च केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भूमाफिया अद्याप मोकाटच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पहाडसिंगपुरा प्रकरणात गुन्हा दाखल केल्यानंतर भूमाफिया राजू तनवाणी व राजू आहुजा यांना अटक करण्यात पोलिसांना अद्याप यश आले नाही. दोघांनी शहराबाहेर पलायन केल्याची माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान, राजू तनवाणी यांच्यावर जमिनीवर अतिक्रमण केल्याप्रकरणी जिन्सी पोलिस ठाण्यात २००८ मध्येही गुन्हा दाखल करण्यात आला होता. हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे.

रेणुकामातानगर व ताजमहल कॉलनी येथे बेकायदा प्लॉटिंग करून त्यांची विक्री केल्याप्रकरणी तनवाणी, आहुजा व मृत संतराम कोरडे यांच्यावर रविवारी रात्री बेगमपुरा पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर आरोपींच्या शोधासाठी आर्थिक गुन्हे शाखेने काहीही प्रयत्न केले नाहीत. त्यामुळे आरोपी पसार झाले. त्यांचा शोध सुरू आर्थिक गुन्हे शाखेतून करण्यात येत आहे. दरम्यान, ६ सप्टेंबर २००८ रोजी जिन्सी पोलिस ठाण्यात रामेश्वर वैष्णव यांच्या तक्रारीवरून भूमाफिया राजू तनवाणी व इतरांविरुद्ध गुन्हा नोंदविला होता. वैष्णव यांची कैलासनगर, स्मशान मारोती मंदिरासमोर (सिटी सर्वेक्षण क्रमांक १२४८७ -२) ‌जमीन आहे. तेथे पत्र्याचे शेड टाकून अतिक्रमण करण्यात आले होते. याप्रकरणी नऊ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. राजू लेखराज तनवाणी यांचा या आरोपीमध्ये समावेश आहे. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. पहाडसिंगपुरा प्रकरणात तनवाणी यांच्यावर गुन्हा दाखल केल्यानंतर वैष्णव यांनी आर्थिक गुन्हे शाखेत येऊन पूर्वीच्या प्रकरणाची माहिती दिली. यासंदर्भात नगरसेवक राजू तनवाणी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, मोबाइल बंद होता.

कारवाईत भेदभाव

आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने गेल्या महिन्यात पंढरपूर येथील एका प्रकरणात भूखंड माफियांना अटक केली होती. त्यावेळी चौकशीनंतर आरोपींना प्रथम ताब्यात घेतले. त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. पहाडसिंगपुरा प्रकरणात मात्र पोलिसांची भूमिका वेगळी असल्याचे दिसून येत आहे. या प्रकरणात प्रथम गुन्हा दाखल केला, मात्र आरोपींना अद्याप पकडण्यात आलेले नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images