Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

बलात्कारप्रकरणी जामीन फेटाळला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

लग्नाचे आमीष दाखवून वीस वर्षीय युवतीवर बलात्कार करणारा व गर्भपात करण्यास करण्यास भाग पाडणारा मुख्य संशयित आरोपी अटकेत आहे. या प्रकरणात त्याच्या भावाचा नियमित जामीन आणि आई व गर्भपात करणाऱ्या डॉक्टरचा अटकपूर्व जामीन विशेष न्यायाधीश यू. एल. तेलगावकर यांनी फेटाळला.

नवजीवन कॉलनी परिसरातील युवतीच्या फिर्यादीनुसार बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अजय मोकळे याने विवाहाचे आमीष दाखवून तिच्यावर २८ डिसेंबर २०१४ रोजी बलात्कार केला. युवतीला दिवस गेल्यानंतर अजयने पुन्हा विवाहाचे आमीष दाखवून गर्भपात करण्यास भाग पाडले. युवतीने गर्भपात केल्यानंतर विवाहास नकार दिल्याने २१ ऑगस्ट २०१५ रोजी बेगमपुरा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अजय, त्याचा भाऊ मुकेश, दोघांची आई लताबाई मोकळे व डॉ. अमोल गाडेकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. सद्यस्थितीत अजय व मुकेश दोघेही न्यायालयीन कोठडीत असून, मुकेश याने नियमित जामिनासाठी केलेला अर्ज फेटाळण्यात आला. तसेच लताबाई मोकळे व डॉ. अमोल गाडेकर यांनी अटकपूर्व जामिनासाठी केलेला अर्जही फेटाळण्यात आला.

न्यायालयीन कोठडी

औरंगाबादः १४३ बगळ्यांच्या मृत्यू आणि ६० पेक्षा जास्त बगळ्यांची अंडी फुटण्यास कारणीभूत ठरलेल्या तिघा संशयित आरोपींना शुक्रवारी न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी जे. व्ही. पेखले-पूरकर यांनी दिले. या प्रकरणातील रेल्वेचा एक कर्मचारी पसार आहे.

याप्रकरणी शेख इद्रीस उर्फ मियाभाई, शेख अब्दुल गनी, मोहम्मद नईम व रेल्वे विभागाचा कर्मचारी के. बापूराव यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. यातील रेल्वेचा कर्मचारी व आरोपी के. बापूराव पसार आहे. १८ सप्टेंबर रोजी पोलिस कोठडीची मुदत संपली.

भरपाई देण्याचे आदेश

औरंगाबादः दुचाकी व कारच्या अपघातातील मृत पोलिस उपनिरीक्षक ओमप्रकाश पोकलवार यांच्या वारसांना कार मालकाने २८ लाख ४ हजार १० रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा मोटार अपघात प्राधिकरणचे अध्यक्ष एस. एम. कोल्हे यांनी दिले.

२९ एप्रिल २००९ रोजी पोलिस उपनिरीक्षक ओमप्रकाश रामचंद्र पोकलवार हे औरंगाबाद-नगर रस्त्यावरून दुचाकीवरून जात असताना भरधाव वेगात येणाऱ्या कारने (एमएच २०, एए १८४२) त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात पोकलवार हे गंभीर जखमी झाले. उपचार सुरू असताना १३ मे २००९ रोजी त्यांचा मृत्यू झाला. पोकलवार यांच्या वारसांनी दावा दाखल केला. सुनावणीदरम्यान प्राधिकरणाने दोन्ही बाजूंच्या युक्तीवादानंतर,मृताच्या वारसास २८ लाख ४ हजार १० रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नगरसेवक, मेहुणा जामिनावर मुक्त

$
0
0

औरंगाबादः छावणी टोलनाक्याच्या कंत्राटदाराला एक लाख रुपयांची लाच मागणारा छावणीचा नगरसेवक संजय गारोल व लाच स्वीकारणाला त्याचा मेहुणा अजय नायडू या दोघांना २५ हजार रुपयांच्या जामिनावर मुक्त करण्याचे आदेश सत्र न्यायाधीश एस. एल. पठाण यांनी शुक्रवारी दिले. दोघांना दर मंगळवारी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात हजेरी लावण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

संंशयित आरोपी नगरसेवक गारोल हा १५ सप्टेंबर रोजी लाच लुचपत विभागासमोर शरण आल्यानंतर त्याला १८ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडीत, तर अजय नायडूला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते. पोलिस कोठडीची मुदत संपल्यामुळे दोघांना कोर्टात हजर करण्यात आले. तपासाच्या दृष्टिने दोघांना लाच लुचपत प्रतिबंधक कार्यालयात हजेरी लावण्याचे आदेश देण्याची विनंती मुख्य सरकारी वकील एस. एम. नवले यांनी कोर्टासमोर केली. ही विनंती ग्राह्य धरून आदेश देण्यात आले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मंगळसूत्र चोरी; आरोपीला कोठडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहरातील ज्योतीनगर भागातून एका महिलेचे मंगळसूत्र पळविण्याच्या संघटित गुन्ह्यातील संशयित आरोपी शेख राजू उर्फ राजू जहागीरदार शेख गुलाब यास विशेष मोक्का न्यायाधीश एस. जी. शेट्टे यांनी न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश शुक्रवारी दिले.

ज्योतीनगर भागातील जिम्नॅशियम हॉलसमोर मॉर्निंग वॉक करणाऱ्या मंगलाबाई लक्ष्मणराव देशमुख यांच्या गळ्यातील मंगळसूत्र काहीजणांनी २५ जून २०१५ रोजी पळविले. याप्रकरणी शेख इमरान सैफुद्दीन उर्फ सुलतान, शेख सेहजाद शेख समीन, शेख जावेद शेख मक्सुद उर्फ टिपू व शेख इरफान शेख लाल यांना अटक करण्यात आली. चौघांनी राजू जहागीरदार याला मंगळसूत्र दिल्याचे निष्पन्न झाल्यानंतर जहागिरदारवर 'मोक्का'अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. त्याला शुक्रवारपर्यंत (१८ सप्टेंबर) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते. त्याला कोर्टात हजर करण्यात आले असता, एक ऑक्टोबर २०१५ पर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

परप्रांतीयांचा शेतकऱ्यांना गंडा

$
0
0

पैसे न देताच टमाट्याने भरलेला ट्रक व्यापाऱ्यांनी पळविला

म.टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

‍शेतकरी अगोदरच दुष्काळामुळे चिंतेत असताना ‌चिकलठाणा परिसरातील शेतकऱ्यांना उत्तरप्रदेशातील व्यापारी भामट्यांनी गंडा घातला आहे. रक्कम न देताच १९ टन टमाट्याचा माल बुधवारी रात्री ट्रकमधून लंपास करण्यात आला. याप्रकरणी चिकलठाणा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उत्तर प्रदेशातील व्यापारी उमेश प्यारेलाल गुप्ता व गब्बर (पूर्ण नाव म‌ाहित नाही.) हे दोन व्यापारी गेल्या एक महिन्यापासून कच्चीघाटी, हिरापूर, महालप्रिंपी, वरूड काजी येथील शेतकऱ्यांकडून माल विकत घेत होते. रविवारी गब्बरचा एक आझाद नावाचा साथीदार चिकलठाणा येथे आला. त्याने पाच ते सहा गावांतील शेतातील टमाट्यांचा माल पाहिला. यानंतर सोमवारी गुप्ता व गब्बर यांनी या शेतकऱ्यांकडून टमाट्याचा १९ टन माल ट्रकमध्ये भरला. साडेतीन लाख रुपये किमतीचे एकूण सातशे कॅरेटमध्ये हा माल होता.

मालाचे पैसे सायंकाळी देतो असे शेतकऱ्यांना सांगण्यात आले, मात्र शेतकऱ्यांनी पैसे तातडीने देण्याची मागणी करीत ट्रक रोखून धरला. हा ट्रक शेतामध्येच उभा करण्यात आला, परंतु रात्रीच्या वेळेस या व्यापाऱ्यांनी मालाने भरलेला हा ट्रक लंपास केला. सकाळी हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी कैलास सुंदरडे याने दिलेल्या तक्रारीवरून चिकलठाणा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दीडशे तस्करांकडून पोलिसांचा पाठलाग

$
0
0

पोलिसांनी काढले जिवघेणे चार तास

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मध्यप्रदेशाच्या जंगलातून चार कट्ट्यासह तस्करांना पकडण्यात आले तेव्हा जवळच असलेल्या त्यांच्या गावातील नागरिकांचा शंभर ते सव्वाशे जणांचा जमाव पोलिस ठाण्यासमोर जमला. पोलिस ठाण्यातील वरिष्ठ अधिकारी जाणीवपूर्वक पसार झाले. जिवघेणे चार तास काढल्यानंतर औरंगाबाद पोलिसांनी युक्तीने आरोपींना वाहनात बसवून बाहेर काढले. मात्र तस्करांच्या साथीदारांनी दुचाकीवर दहा किलोमीटरपर्यंत पाठलाग केला.

दरोडेखोरांच्या टोळीतील शेख आरेफ याला सोबत घेऊन गुन्हेशाखेचे पीएसआय दीपक सरोदे, विकास चौधरी, जावेद शेख, अनिल गायकवाड, मोईस बेग, परमेश्वर म्हस्के आणि सागर पाटील हे पथक सिघाना, (ता. मनवर जि. धार) येथे गेले होते. आरेफने त्याना फोन करून आणखी तीन कट्टे पाहिजे असल्याचे सांगितले. त्यांनी आरेफला सिंघानापासून पाच कि.मी. वरील जंगलात एकट्याला बोलावले. तेथे पोलिसांनी दुपारी दोन वाजता सापळा रचला. पीएसआय सरोदे यांनी स्थानिक मित्रांच्या मदतीने एक दुचाकी उपलब्ध केली होती. आरोपी गावातून निघताच दोन पोलिसांनी त्यांचा पाठलाग सुरू केला. इकडे जंगलात आरेफसोबत सागर पाटील याला देण्यात आले. बाकीचे पथक गुडघ्यापर्यंत वाढलेल्या गवतात जमिनीवर झोपून दबा धरून बसले. भाटिया पितापुत्र तेथे दुचाकीवरून पोहोचले. आरेफसोबत सागरला पाहताच प्रल्हादसिंहने ‌शिवीगाळ करीत पळण्याचा प्रयत्न केला. मात्र सागरने त्यांच्या दुचाकीची चावी काढण्याचा प्रयत्न करताच झटापट सुरू झाली. त्यावेळी पाठलाग करणारे व दबा धरून बसलेल्या पथकाने एकदम झेप घेऊन जकडले. ते गोळीबार करण्याची शक्यता असल्याने त्याच्याकडून कट्टे हस्तगत करण्यात आले.

पोलिस ठाण्यात जमाव

दोघांना पकडल्याचे कळताच पोलिस ठाण्यासमोर १०० ते १२५ चा जमाव जमा झाला. आरोपींना अटक केलीच कशी, असा पोलिसांना देण्यात येत होता. त्या पोलिस ठाण्यातील वरिष्ठ पोलिस अधिकारी आलेच नाहीत, तेथे फक्त पोलिस कर्मचारी होते. त्यांचेही आरोपींना सोडून देण्याचे प्रयत्न सुरू होते. त्यावेळी औरंगाबादच्या पोलिसांनी संयमाने परिस्थिती हाताळत सायंकाळी सहा वाजता पोलिस ठाण्यात नोंद करून आरोपींना बाहेर काढले.

दहा हजाराचे रिवॉर्ड

पोलिस अधीक्षक नवीनचंद्र रेड्डी यांनी या पथकाच्या कामगिरीचे कौतुक केले. स्थानिक गुन्हेशाखेला दहा हजारांचे रिवॉर्ड घोषित केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेल्वे-वन विभागाचे साटेलोटे?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

रेल्वे स्टेशनमधील झाड तोडून शेकडो बगळ्यांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या रेल्वे अधिकाऱ्यांना कारवाईतून सहीसलामत सोडण्याचा प्रयत्न सुरू आहे. वन विभागाने चौकशीसाठी नोटीस बजावूनही रेल्वे अधिकारी बापूराव कर्डिले आले नसल्याने फरार घोषित करण्यात आले. आता रेल्वे व वन अधिकाऱ्यांच्या हातमिळवणीने प्रकरणावर पडदा पडण्याची शक्यता आहे.

रेल्वे स्टेशनच्या पार्किंगमध्ये १६ ऑगस्टला झाडाच्या फांद्या तोडल्यामुळे शेकडो बगळ्यांचा मृत्यू झाला. काही अंडी फुटली. याप्रकरणी वन्यजीव संरक्षण अधिनियमाखाली विनापरवानगी शिकार करणे आणि वन्यजीवाची शिकार करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल झाला होता. या घटनेच्या तपासात रेल्वेचे कमर्शिअल इन्स्पेक्टर बापूराव कर्डिले, शेख गनी शेख अब्दुल रेहमान, शेख इद्रीस शेख इस्माईल आणि मोहंमद नईम मोहंमद खान दोषी आढळले. तपास अधिकारी सहवनसंरक्षक जगदिश येडलावार यांनी कर्डिले यांचा अपवाद वगळता इतर तिघांना अटक केली.

सध्या तिघे न्यायालयीन कोठडीत आहेत, मात्र रेल्वे अधिकारी बापूराव कर्डिले बेपत्ता आहेत. विशेष म्हणजे कर्डिले वन विभागाच्या कार्यालयात येऊनही त्यांना ताब्यात घेण्यात आले नाही. इतर तिघांना ताब्यात घेण्यासाठी नोटीस बजावली होती. कर्डिले यांना केवळ तोंडी आदेश दिले होते. हा प्रकार इतर वन अधिकाऱ्यांसमोर घडला. आरोपींविरुद्ध लावलेली कलमे व कर्डिले यांना सोडण्यासाठी वन अधिकाऱ्यांचा आटापिटा चर्चेचा विषय ठरला आहे.

पोलिस कोठडीतील आरोपींना दोन दिवसांत न्यायालयीन कोठडी मिळाली. त्यामुळे तपासात ठोस पुरावे सादर केले नसल्याबद्दल वरिष्ठ वन अधिकारी नाराज आहेत, पण तपास पथकाचा मनमानीपणा कायम असल्याने प्रकरणावर पडदा पडण्याची शक्यता आहे.

अभय कुणाचे?

बगळ्यांचा बळी गेल्याची घटना घडल्यानंतर रेल्वे विभागाला गांभीर्य लक्षात आले. पार्किंगमध्ये दहा झाडे लावतो, असा प्रस्ताव रेल्वे अधिकाऱ्यांनी वन विभागासमोर ठेवला होता, असे सूत्रांनी सांगितले, पण पक्षीमित्र संघटना व प्रसारमाध्यमांच्या दबावामुळे वन विभागाला कारवाई करावी लागली, पण ही कारवाई वरवरची असून, काही जणांना वाचविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे, अशी वन विभागात चर्चा आहे.

रेल्वेकडून वृक्षारोपण

रेल्वे स्टेशनवरील कडूनिंब आणि चिंचेचे झाड कापल्यानंतर बगळ्याचा मृत्यू झाला. स्टेशन परिसरात पक्ष्यांची संख्या वाढावी याकरिता ५० झाडे लावून संवर्धन करणार असल्याची माहिती देण्यात आली.

पर्यावरणाची हानी करूनही काहीजण निर्धास्त सुटतात. वन विभागाने ठोस कारवाई केली नसल्याने आरोपी मोकाट सुटतील. बगळ्यांच्या प्रकरणातून निसर्गाचा ऱ्हास करणाऱ्यांना संदेश पोहचावा हा उद्देश आहे. आम्ही जनहित याचिका दाखल करणार आहोत.

-रवी चौधरी, प्रयास यूथ फाउंडेशन

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘देवगिरी’त चित्रीकरणावरून खडाजंगी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

देवगिरी किल्ल्याच्या आवारात चित्रपटाचे शुटिंगला परवानगी दिल्यावरून दुर्गप्रेमी संघटना व केंद्रीय पुरातत्त्व विभागात दोन दिवसांपासून खडाजंगी सुरू आहे. नियम डावलून चित्रपटाच्या चमूने अवजड वस्तू व प्राणी थेट किल्ल्यात नेल्याने प्रकरण चिघळले तर, दिल्ली कार्यालयाने चित्रीकरणास तोंडी परवानगी दिली आहे. लेखी परवानगी सोमवारी (२१ सप्टेंबर) प्राप्त होईल, असा खुलासा पुरातत्त्व विभागाने केला.

मध्ययुगीन काळात भारताचा अभ्यास करण्यासाठी आलेल्या ह्यू यन त्संग या चिनी पर्यटकावर चिनी चित्रपट निर्मिती सुरू आहे. या चित्रपटाच्या काही भागाचे चित्रीकरण मुंबई, नालंदा आणि औरंगाबाद परिसरात होणार आहे. दौलताबाद येथील देवगिरी किल्ल्याच्या परिसरात १८ ते २७ सप्टेंबरदरम्यान शुटिंगचे नियोजन आहे, मात्र संबंधित चित्रीकरण नियमबाह्य असून, प्राचीन वास्तूला धोका पोहचू शकतो, असा फोर्ट रिस्टोअर्स ग्रुपने आक्षेप घेतला. याबाबत दुर्गप्रेमी संघटनेने केंद्रीय पुरातत्त्व विभाग व पोलिस ठाण्यात निवेदन दिले. हा गोंधळ वाढल्यामुळे पुरातत्त्व विभागाचे अधीक्षक मदनसिंह चौहान यांना हस्तक्षेप करावा लागला. या चित्रीकरणास परवानगी मिळवण्यासाठी निर्माते अनेक दिवसांपासून औरंगाबाद कार्यालयात प्रयत्न करीत होते. परवानगी मिळाली नसल्याने दिल्ली कार्यालयातून तोंडी परवानगी घेण्यात आली. केवळ २० वस्तू आवारात घेऊन जाण्यास परवानगी होती. प्रत्यक्षात किल्ल्याच्या आवारात जनरेटर, साउंड आणि इतर अवजड वस्तू नेल्या. हत्ती व घोड्यांना शुटिंगसाठी आत आणण्याचा प्रयत्न होता. दुर्गप्रेमींनी प्रयत्न हाणून पाडला.

दरम्यान, भारत-चीन संबंध सुधारण्यासाठी शुटिंगला परवानगी द्यावी, असे पंतप्रधान कार्यालयाचे आदेश आहेत. याबाबतची लेखी परवानगी प्राप्त झाल्यानंतर शुटिंग होईल असे अधीक्षक मदनसिंह चौहान यांनी सांगितले.

सोनू सूद शहरात

शूटिंगसाठी प्रसिद्ध अभिनेता सोनू सूद औरंगाबाद शहरात आला आहे. एका राजाच्या भूमिकेत सोनू झळकणार आहे. त्याला पाहण्यासाठी दौलताबादला चाहत्यांची झुंबड उडाली. जवळपास दोनशे लोकांचा चमू चित्रीकरणात सहभागी आहे.

चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी दिल्ली कार्यालयाने परवानगी दिली आहे. चित्रीकरणावेळी नियमांचा भंग होणार नाही याची दक्षता घेतली जाईल. आवारात सेट उभारण्यास मज्जाव केला आहे.

- मदनसिंह चौहान, अधीक्षक, केंद्रीय पुरातत्त्व विभाग

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निम्मा मराठवाडा झाला टँकरमुक्त

$
0
0

३१० गावे; ८९ वाड्यांची पाण्यासाठी भटकंती थांबली

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

गेल्या आठवड्यात मराठवाड्यात झालेल्या दमदार पावसामुळे ३१० गावे व ८९ वाड्यांची पाण्यासाठी सुरू असलेली भटकंती थांबली आहे. विभागातील ४३२ टँकर बंद करण्यात आले असून, मराठवाड्यातील ७६पैकी ३२ तालुके तूर्त टँकरमुक्त झाले आहेत.

दुष्काळाच्या झळा सहन करत असलेल्या जालना जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये समाधानकारक पाऊस झाला. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व टँकर बंद करण्यात आले आहेत. हिंगोली जिल्ह्यातही दमदार पावसामुळे टँकरसंख्या तीनपर्यंत कमी झाली. परभणी जिल्ह्यात केवळ २५ व औरंगाबाद जिल्ह्यात ८२ टँकर सुरू आहेत. गेल्या आठवड्याभरात मराठवाड्यात चांगला पाऊस झाल्यामुळे टँकरसंख्या झपाट्याने कमी झाली. गेल्या आठवड्यामध्ये मराठवाड्याच्या आठ जिल्ह्यांत ८८७ गावे व ४०७ वाड्यांवर १२४९ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत होता. सध्या मराठवाड्यातील ५७७ गावे व ३१८ वाड्यांना ८१५ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. गेल्या आठवड्याप्रमाणे आताही सर्वाधिक २६१ टँकर बीड जिल्ह्यात सुरू आहेत. त्याखालोखाल औरंगाबाद जिल्ह्यात ८२ टँकरद्वारे पाणी पुरवले जात आहे.

सध्या मराठवाड्यातील ७६ पैकी ३२ तालुक्यांमध्ये टँकरची संख्या शून्य झाली आहे. यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील फुलंब्री, पैठण, कन्नड, सिल्लोड व सोयगाव, जालना जिल्ह्यातील सर्व तालुके, परभणी जिल्ह्यात जिंतूर, हिंगोलीतील हिंगोली, कळमनुरी, सेनगाव, नांदेड ‌मधील अर्धापूर, मुदखेड, भोकर, उमरी, हिमायतनगर, बिलोली, धर्माबाद, माहूर नगरपालिका, किनवट व माहुर तालुक्यात टँकर सुरू नाही. तर बीड जिल्ह्यातील शिरूर कासार, पाटोदा, माजलगाव, त्याचबरोबर पाटोदा, केज, आष्टी, शिरूर व धारूर नगर पालिका क्षेत्रात टँकरसंख्या शून्य झाली आहे. लातूर जिल्ह्यातील शिरूर अनंतपाळ व लातूर महापालिकेला टँकर सुरू नाही. या तालुक्यांमधील ३१० गावे व ८९ वाड्यांमध्ये सुरू असलेले टँकर बंद करण्यात आली आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मनमाड-परभणी डबल ट्रॅकचा सर्व्हे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मनमाड ते परभणी लोहमार्गाच्या दुपदरीकरणाच्या सर्वेक्षणाला रेल्वेने सुरुवात केली आहे. त्याचा अहवाल येत्या रेल्वे अर्थसंकल्पापूर्वी सादर करण्यात येणार आहे, अशी माहिती रेल्वेच्या उच्चपदस्थ सूत्रांनी दिली.

परभणी-मनमाड लोहमार्गावरून सध्या रोज सुमारे ७० रेल्वे धावतात. एकेरी लोहमार्गामुळे नव्या रेल्वे सुरू करता येत नाहीत. त्यामुळे या मार्गाचे दुपदरीकरण करण्याची मागणी मराठवाड्यातून केली जात होती. या कामाच्या सर्वेक्षणाची घोषणा दोन वर्षांपूर्वी करण्यात आली होती. त्यासाठी चाळीस लाख रुपयांचा निधीही देण्यात आला होता, मात्र गेल्या वर्षभरात हे काम सुरू करण्यात आले नव्हते.

रेल्वेची वाढलेली संख्या विचारात घेऊन या मार्गाचे दुपदरीकरण करण्याची गरज रेल्वे बोर्डासमोर मांडण्यात आली होती. यामुळे सर्वेक्षणाच्या कामासाठी निविदा मागविण्यात आल्या होत्या. त्यानंतर, सुमारे दीड महिन्यापूर्वी सर्वेक्षणाचे काम सुरू करण्यात आले आहे, असे या सूत्रांनी सांगितले. येत्या रेल्वे अर्थसंकल्पापूर्वी सर्वेक्षण अहवाल रेल्वे बोर्डाकडे पाठविण्यात येणार आहे. त्यामुळे आगामी अर्थसंकल्पात या कामासाठी आर्थिक तरतूद अपेक्षित आहे. मुदखेड ते परभणी या लोहमार्गाच्या दुपदरीकरणाचे काम यापूर्वीच सुरू करण्यात आले आहे. त्यासाठी सध्या भूसंपादन करण्यात येत आहे. या कामासाठी सुमारे ४०० कोटी रुपये लागणार आहेत.

परभणी ते मनमाड लोहमार्गाच्या दुपदरीकरणाचे सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. येत्या जून २०१६पर्यंत सर्वेक्षणाचा अहवाल सादर करण्यात येईल.

- डॉ. अखिलेशकुमार सिन्हा, विभागीय व्यवस्थापक, रेल्वे विभाग, नांदेड.

लोहमार्ग दुपदरीकरणाच्या सर्वेक्षणाला सुरुवात झाली, ही आनंदाची बाब आहे. मराठवाड्यातील नागरिकांची ही जुनी मागणी लवकर पूर्ण होईल, अशी अपेक्षा आहे.

- ओमप्रकाश वर्मा, अध्यक्ष, मराठवाडा रेल्वे विकास समिती

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गावठी कट्ट्याचे तस्कर जेरबंद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यातून गावठी कट्ट्याची तस्करी करणाऱ्या पिता-पुत्राला ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली. शनिवारी दुपारी ही कारवाई करण्यात आली. या आरोपींच्या ताब्यातून चार गावठी कट्टे जप्त करण्यात आले आहेत. पोलिसांनी बुधवारी पैठण येथे दरोडेखोरांच्या टोळीकडून एक गावठी कट्टा जप्त केला होता. त्यांनी दिलेल्या माहितीवरून ही कारवाई करण्यात आली.

इसारवाडी फाट्याजवळ बुधवारी रात्री पकडलेल्या दरोडेखोरांच्या टोळीतील शेख आरेफ शेख इकबाल या आरोपीकडे गावठी कट्टा सापडला होता. त्याने हा कट्टा मध्य प्रदेशातील सिंघाना, (ता. मनवर, जि. धार) येथून आणल्याची माहिती दिली. त्यावरून पोलिसांनी शनिवारी एक पथक मनवर येथे पाठविले होते. तेथे आरोपी आरेफच्या फोनवरून कट्टा विकणाऱ्यांची संपर्क साधला आणि तीन कट्टे विकत मागितले. त्यावेळी विक्रेत्यांनी त्यांना जंगलात बोलविले. तेथे पोलिसांनी सापळा रचला होता. तेथे दुचाकी आलेल्या दोघांना पकडण्यात आले. आरोपींमध्ये प्रल्हादसिंह गुलजारसिंह भाटिया व अरविंदसिंह प्रल्हादसिंह भाटिया या पिता-पुत्राचा समावेश होता. आरोपीच्या झडतीदरम्यान चार गावठी कट्टे पोलिसांच्या हाती लागले. आरोपींना ताब्यात घेऊन शहरात आणण्यात आले. ही कारवाई पोलिस निरीक्षक कांचनकुमार चाटे, सहायक पोलिस निरीक्षक महेश आंधळे, पीएसआय दीपक सरोदे, जमादार विकास चौधरी, शेख जावेद, अनिल गायकवाड, मोईस बेग, परमेश्वर म्हस्के व सागर पाटील यांनी केली.

घरी बनवितात कट्टे

पकडण्यात आलेले गावठी कट्टे ०.३२ एमएमचे आहेत. आरोपी हे कट्टे आरोपी घरी तयार करत असल्याची माहिती त्यांनी दिली. आरोपी यासाठी लागणारी काडतुसे काळ्या बाजारातून खरेदी करून देत होते. साधारण तीन ते पाच हजार रुपये किमतीचे हे कट्टे राज्यात २० ते २५ हजारात विकण्यात येत होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सद‍्गुरूनगरमध्ये बलात्कार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, वाळूज

रांजणगाव शेणपुंजी येथील सद‍्गुरूनगरमध्ये एका विवाहितेवर रविवारी रात्री अडीच वाजता सामूहिक बलात्कार करण्यात आला. याप्रकरणी नणंद, जाऊ, नातेवाईक व नवऱ्याचे मित्र आदी नऊ जणांविरुद्ध एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रांजणगाव शेणपुंजी येथील सद‍्गुरूनगरमध्ये तीस वर्षाची एक महिला सासरच्यांसोबत न्यायालयीन खटला सुरू असल्याने आईसोबत राहते. तिचे मूळ गाव मंगरूळ ता. शेवगांव जि.नगर हे आहे. तिला पती हरिश्चद्र गावडे यांच्यापासून दोन मुले आहेत. नेहमीप्रमाणे आई व मुलगी रविवारी रात्री घरात झोपल्या होत्या. घरात बाथरूमची सोय नसल्यामुळे तिची आई रात्री बाहेर गेल्याने दरवाजा उघडा होता. ही संधी साधून नवऱ्याचे मित्र व नातेवाईक शंकर मच्छिंद्रनाथ झनझने (रा. उस्मानाबाद), बन्सी नामदेव काटे, शिवाजी काटे, ज्योतीराम बाबा गावडे (रा. बागलवाडी), राजू प्रेमराज कडेल, संजू पेमराज कडेल, गोपला रुपचंद कडेल (रा. सोनई ता. नेवासा जि. नगर) सुवर्णा ज्योतीराम गावडे (जाऊ), रोहिणी दत्तात्रय उबाळे (नणंद) हे नऊ जण रात्री अडीच्या सुमारास घरात शिरले. नणंद व जाऊने महिलेचे हात घट्ट धरून ठेवले. बन्सी नामदेव जाधव याने हातावर सिगारेटचे चटके देऊन कोर्टात दाखल खटल्यातील पुराव्यांची मागणी करून बलात्कार केला. मदतीसाठी हाका मारत असताना ज्योतीराम गावडे याने बळजबरीने तोंडात औषध टाकले, दुसऱ्या एकाने अंगावर रॉकेल ओतले. त्यानंतर आळीपाळीने बलात्कार केल्याची तक्रार एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात नोंदवण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिस हवालदार अशोक थोरात तपास करीत आहेत.

ड्रमच्या किंमतीत वाढ

औरंगाबादः पाणीटंचाईमुळे रविवार बाजारात प्लास्टिकचे ड्रमच्या किंमती २०० ते ३०० रुपयांनी महागल्या आहेत. साधारणतः पावसाळा सुरू झाल्यानंतर ड्रमच्या किंमती कमी होतात. परंतु, यंदा दुष्काळामुळे ड्रमची मागणी वाढली आहे.

पोलिसांनी केले हॉस्पिटलमध्ये दाखल

या महिलेच्या आईने एमआयडीसी वाळूज पोलिसांना ही माहिती कळविल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून बेशुद्धावस्थेतील महिलेला घाटी हॉस्पिटलमध्ये उपचाराकरिता दाखल केले. तिला शुद्ध आल्यानंतर सोमवारी सकाळी नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित आरोपींना पकडण्याकरिता दोन ठिकाणी पोलिस पथक पाठवल्याची माहिती पोलिस निरीक्षक रामेश्वर थोरात यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कांद्याचे दर अद्यापही चढेच, आवक घटली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

कांद्याची किंमत अद्यापही आवाक्यात येत नाही. शहरातील भाजी मंडई व मॉलमध्ये कांद्याचा दर प्रतिकिलो ७० ते ८० रुपये आहे. दरम्यान, कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याची आवाक ४० ते ५० क्विंटलने घटली आहे.

कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये एक आठवड्यापासून रोज ५० ते ७० क्विंटल कांद्याची आवक आहे. 'सध्या लासलगाव आणि नाशिकचा कांदा यावल, सटाणा, नवी मुंबई आणि पुणे बाजारापेठेत अधिक जात आहे. लासलगावमध्ये ४ ते ५ हजार रुपये क्विंटलचा भाव मिळत आहे. शहरात तेथूनच कांदा येत असल्याने दर चढे आहेत,' अशी माहिती कांदा विक्रेते शेख पाशा यांनी दिली. किरकोळ बाजारात कांदा १५ ते २० रुपये प्रतिकिलोने महागला असल्याचे सिडकोतील व्यापारी जर्नादन जाधव यांनी सांगितले. सदानंद पगारे (पीरबाजार परिसर), शांताबाई खोबरे(औरंगपुरा भाजी मंडई) या विक्रेत्यांनही दुजोरा दिला. दरम्यान, शहरातील भाजीपाल्याचे दर स्थिर असले तरी दोन आठवड्यांच्या तुलनेत वाढले आहेत. सध्या भाजीपाल्याची आवक मुबलक असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेल्वे अधिकाऱ्यास हजर व्हावेच लागेल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

रेल्वे स्टेशनच्या पार्किंगमधील बगळ्यांच्या मृत्यूप्रकरणी आरोप असलेले रेल्वे अधिकारी के. बापूराव यांचा शोध सुरू आहे. भूमीगत झालेल्या बापूराव यांना हजर व्हावे लागेल, असा खुलासा वन विभागाने केला आहे. या प्रकरणातील तीन आरोपींना जामीन मिळताच वन विभागाच्या कारवाईबाबत तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. दंडात्मक कारवाईऐवजी शिक्षेसाठी पाठपुरावा करीत असल्याचा दावा सहवनरक्षक जगदीश येडलावार यांनी केला.

रेल्वे स्टेशनच्या पार्किंगमधील झाड तोडल्यानंतर शेकडो बगळ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. वाहनांवर पक्ष्यांची विष्ठा पडते या कारणावरून झाडावर कुऱ्हाड चालवण्यात आली. झाडाच्या फांद्या तोडण्याचे आदेश रेल्वे अधिकाऱ्यांनी दिले. मात्र, प्रत्यक्षस्थळी कुणी नसल्याने लाकूडतोड्यांनी जास्त फांद्या तोडल्या. या प्रकारात बगळ्यांचा जीव गेला. त्यामुळे शिकार करणे व शिकार करण्यास प्रवृत्त केल्याचे गुन्हे दाखल करून वन विभागाने तपास सुरू केला. तब्बल एक महिना टोलवाटोलवी करीत विभागाने अखेर चौघांना दोषी धरले आहे. यापैकी तिघांना अटक करण्यात आली. मात्र, मुख्य दोषी असल्याचा आरोप असलेले रेल्वे अधिकारी बापूराव कर्डिले अजूनही वन अधिकाऱ्यांना सापडले नाही. चौकशीसाठी हजर होण्याबाबत नोटीस बजावूनही बापूराव आले नाही. त्यामुळे लाकडूतोड्यांवर जुजबी कारवाई करून प्रकरण मिटवण्याच्या हालचाली वाढल्याची चर्चा आहे.

याबाबत सहवनरक्षक जगदीश येडलावार यांनी 'मटा'शी बोलताना खुलासा केला. 'कर्डिलेवरील कारवाईसाठी तीन नोटीस बजावल्या आहेत. 'नांदेड येथील रेल्वेच्या मुख्य कार्यालयाला ई-मेल पाठवला आहे. तसेच रेल्वे विभागाचे वरिष्ठ वाणिज्यिक व्यवस्थापक के. मधुसूदन यांना नोटीस पाठवली आहे' असे येडलावार यांनी सांगितले. सध्या बापूराव सुटीवर असण्याची शक्यता आहे. वन विभागाने घरापर्यंत त्यांचा शोध घेतला. पण, ठावठिकाणा लागला नाही. दरम्यान, पर्यावरण व पक्षीमित्र संघटनांनी तपासाबाबत नाराजी व्यक्त केली.

तपासाचे आव्हान

सबळ पुरावे नसल्याने बगळ्यांच्या मृत्यू प्रकरणातील तीन दोषींना जामीन मिळाला आहे. रेल्वे अधिकारी के. बापूराव पसार आहेत. प्रसारमाध्यमे व पर्यावरण संस्थांचा दबाव वाढल्यामुळे वन विभागासमोर तपासाचे आव्हान उभे आहे.

काही अटींवर कायदेशीर तडजोड करणे शक्य असूनही दोषींना कोर्टात घेऊन गेलो. बगळ्यांच्या मृत्यू प्रकरणात कठोर शिक्षा करण्यासाठी प्रयत्नशील आहे. तपासात हलगर्जीपणा झाला नाही.

- जगदीश येडलावार, सहवनरक्षक, वन विभाग

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बॅँकेतील महिलांना शिक्षणासाठी सुटी

$
0
0

Dhananjay.Kulkarni@timesgroup.com

औरंगाबादः देशभरातील दीड लाख आणि मराठवाड्यातील विविध बॅँकांमध्ये काम करणाऱ्या दोन हजार महिलांसाठी एक आनंददायी बातमी. आता बॅँकातील महिला कर्मचाऱ्यांना शिक्षणासाठी दीर्घकालीन (२ वर्षांची) सुटी अर्थात सॅबॅटिकल लिव्ह घेता येईल. या काळात पगार मिळणार नाही, मात्र सेवा कायम राहिल्याचा दिलासा मिळेल.

इंडियन बँक असोसिएशन (बँक व्यवस्थापनांची संघटना) आणि ऑल इंडिया बँक एम्प्लाइ असोसिएशन (बँक कर्मचाऱ्यांची संघटना) यांच्यात झालेल्या करारानुसार महिलांना ही सुटी देण्यात आली. करारानुसार सुमारे ४३ बँकांमधील दीड लाख महिलांना ही सुटी लागू झाली. यात २२ राष्टीयकृत बँक, २१ खासगी बँकांचा समावेश आहे. ही सुटी प्रसुती रजेसोबत घेता येईल. सलग दोन वर्षे किंवा दोन वर्षांत एक वर्ष व सहा-सहा महिन्यांच्या खंडानंतरही ही सुटी घेता येईल.

अंमलबजावणी सुरू

सॅबॅटिकल लिव्हसंबंधी २५ जून २०१५ला करार झाला. त्यात अनेक त्रुटी होत्या. यामुळे कराराची अंमलबजावणी होत नव्हती. आता याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. ऑक्टोबर २०१४ मध्ये स्टेट बॅँक ऑफ इंडियाने आपल्या महिला कर्मचारी वर्गास ही सुटी लागू केली. आता इतर बॅँकातही ही सुटी लागू झाली आहे.

बँकेतील महिलांसाठी ही सुटी दिलासात्मक आहे. याअंतर्गत बँकांत नव्याने रुजू झालेल्या महिलांना शिक्षण तर, आधी लागलेल्या महिलांना विविध कारणांसाठी ही सुटी घेता येऊ शकेल.

- सुनीता गणोरकर, स्टेट बँक ऑफ हैदराबाद

या सुटीबाबत बऱ्याच दिवसांपासून एआयबीईए लढा देत होती. या लढ्याला यश आले. महिला बँक कर्मचारी वर्गास ही सुटी उपयुक्त असेल.

- जगदीश भावठाणकर, जनरल सेक्रेटरी, एआयबीईए

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

कुंभमेळा पर्वणीसाठी सहकार्य म्हणून औरंगाबाद एसटी आगाराने प्रवासी वाहतुकीसाठी चालक-वाहकांना नाशिकला पाठविले. मात्र, झाले भलतेच. या कर्मचाऱ्यांच्या तीन दिवसांच्या जेवणावळीच्या खर्चाचे २ लाख ३५ हजारांचे बिल भरा, असे आदेश एसटी महामंडळाने दिले आहेत. आता हे बिल भरणार कोण, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

नाशिक कुंभमेळ्यासाठी गेलेल्या चालक, वाहक आणि कर्मचाऱ्यांचे चांगलेच हाल झालेत. २९ ऑगस्ट रोजी पहिल्या पर्वणीसाठी नाशिक विभागीय व्यवस्थापक कार्यालयाकडून २०० बसचे नियोजन केले होते. यासाठी २६ ऑगस्ट रोजी औरंगाबादच्या ४५० कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना बोलविण्यात आले. या कर्मचाऱ्यांसाठी नाशिकपासून काही अंतरावर असलेल्या आडगाव येथे तात्पुरते शेड लावून थांबण्याची व्यवस्था केली. नियोजित जागेवर एकच हॉटेल असल्याने, ऐनवेळी हॉटेल चालकाने खाद्य पदार्थाचे दर वाढविले. सोबत आगाऊ रक्कम घेऊन आलेल्या काही चालक आणि वाहकांना जेवणासाठी पैसे उरले नाहीत. यामुळे या जेवणाची व्यवस्था नाशिक विभागाने करावी, अशी मागणी एसटी चालक आणि वाहकांनी सुरू केली. २७ ऑगस्ट रोजी चालक आणि वाहकांनी विरोध करण्यास सुरुवात केली. तेव्हा एसटी विभागाकडून जेवणाबाबत कोणतीही सोय करणार नसल्याची माहिती केंद्र नियंत्रक आर. एन. पाटील यांनी चालक आणि वाहकांना दिली. यानंतरही एसटी कर्मचाऱ्यांनी विरोध सुरू ठेवला. हे आंदोलन रात्री दोनपर्यंत चालले. याची दखल घेत २८ ऑगस्ट रोजी सकाळी नाशिक विभागीय व्यवस्थापक मिलिंद बंड केंद्रावर आले. त्यांनी आधी एसटी चालक आणि वाहकांच्या मागणीला विरोध केला. मात्र, एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनापुढे बंड यांनाही माघार घेतली. अखेर त्यांनीच वाहक आणि चालकांना जेवणासाठी कुपन देण्याचे आदेश दिले. आता २१ दिवसानंतर या कुपनचे बिल औरंगाबाद आगाराने भरावे, असे पत्र विभागीय नियंत्रकांना आले आहे.

काजू, बदाम गेले कुठे?

कुंभमेळ्यात काजू, बदाम मिळतात, अशी अफवा एसटी विभागात होती. यामुळे अनेक एसटी कर्मचाऱ्यांनी महामंडळाकडून मिळणारी आगाऊ रक्कम कमी प्रमाणात घेतली.

रात्रीत कुपन आले कुठून?

प्रशासनाने २८ ऑगस्ट रोजी कुपन वाटले. मग एका रात्रीत कुपन आले कुठून? ते होते तर अगोदरच का दिले नाहीत? असा सवाल कर्मचाऱ्यांनी केला आहे.

ही कार्यालयीन बाब आहे. याबाबत बोलणे संयुक्तिक नाही. जो खुलासा पाठवायचा आहे, तो मी वरिष्ठांकडे पाठविणार आहे. मला काहीही बोलता येणार नाही.

- आर. एन. पाटील, विभागीय नियंत्रक, औरंगाबाद

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


तरुणीला चिडवण्याच्या कारणावरून चाकूहल्ला

$
0
0

विनयभंगाचे गुन्हे दाखल

म.टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

तरुणीला शेजारी राहणाऱ्या कुटुंबीयांनी ‌चिडविल्यावरून दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. सिडकोतील शिवनेरी कॉलनी येथे रविवारी सकाळी अकरा वाजता हा प्रकार घडला. यावेळी तरुणावर चाकूने वार करण्यात आले. या प्रकरणी दोन्ही गटांनी परस्परविरोधात तक्रार केल्याने खुनाचा प्रयत्न व विनयभंगाचा गुन्हा सिडको पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.

वैशाली जगदीश निकम (वय २६) या महिलेच्या शेजारी सिंधुताई सपकाळ यांचे कुटुंब राहते. रविवारी वैशाली निकम यांनी सिंधुताईच्या मुलीला चिडवल्याच्या आरोपावरून दोन्ही कुटुंबात हाणामारी सुरू झाली. यावेळी निकम यांच्यावतीने भांडणात पडलेल्या संजू वेडकर या तरुणावर ‌सिंधुताईचा मुलगा टिनू याने छातीवर चाकूने वार केला. या घटनेत संजू जखमी झाला. याप्रकरणी निकम यांच्या तक्रारीवरून आरोपी सिंधुताई, मनिषा, तेजस्विनी व टिनू सपकाळ विरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. याच प्रकरणात सिंधुताई यांनी वेगळी तक्रार दिली आहे. निकम कुटुंबीयांनी आंबेडकरनगर येथील तीन मुले आणून आपल्या कुटुंबाला मारहाण केली, तसेच आपल्या दोन्ही मुलींचा विनयभंग केल्याचा तक्रारीत उल्लेख आहे. याप्रकरणी वैशाली निकम, जगदीश निकम, वैशालीचा भाऊ, वैशालीची आई व आंबेडकरनगर येथील तीन मुलांविरूद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आरटीओमध्ये बेशिस्त वाहनांवर कारवाई

$
0
0

म.टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

आरटीओ कार्यालयामध्ये बेशिस्तपणे लावण्यात आलेली २५ वाहने सोमवारी उचलून नेण्यात आली. या परिसरात पार्किंग शिवाय अन्यत्र लावल्या जाणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्याचे आदेश नुकतेच आरटीओकडून देण्यात आले होते. त्यानुसार आज ही कारवाई सुरू करण्यात आली.

आरटीओ कार्यालयात सर्वत्र बेशिस्तपणे वाहने उभी केली जात असल्यामुळे येथे विविध कामांसाठी येणाऱ्या नागरिकांना त्याचा मनस्ताप सहन करावा लागत असे. अनेकदा कार्यालयाच्या गेटमध्येच वाहने उभी केल्याने अन्य वाहने आत-बाहेर नेण्यासही जागा रहात नसे. यामुळे अनेकदा येथे वाहतूक कोंडी होत असे. हे प्रकार थांबावेत म्हणून आरटीओ सर्जेराव शेळके यांनी बेशिस्तपणे उभ्या केल्या जाणाऱ्या वाहनांवर कारवाईचे आदेश दिले होते. या कारवाईसाठी सहाय्यक मोटार परिवहन निरीक्षकाचीही नेमणूक करण्यात आली. सोमवारी अनेक गाड्या 'नो पार्किंग' मध्येच उभ्या करण्यात आल्या होत्या. त्यामुळे आरटीओ अधिकाऱ्यांनी वाहतूक शाखेच्या पोलिसांना बोलावून या गाड्या उचलून नेण्याची सूचना केली. त्यानुसार २५ वाहनांवर कारवाई करण्यात आली.

'ती' वाहने तशीच

आरटीओ कार्यालयाच्या परिसरातच अनेक ठिकाणी ड्रायव्हिंग स्कूलच्या गाड्या; तसेच विमा, पीयूसी देणाऱ्यांच्या गाड्या लावण्यात येतात. या चार चाकी वाहनांमुळे पार्किंगमध्ये दुचाकी लावण्यासाठी आलेल्या ग्राहकांना जागा मिळत नाही. याबाबतही आरटीओ शेळके यांनी कारवाईचे आदेश दिले होते. मात्र, अशा बेशिस्तपणे लावलेल्या व्यावसायिक वाहनांवर कोणत्याही प्रकारची कारवाई सोमवारी करण्यात आली नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कुख्यात घरफोड्या सुनील गजाआड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पोलिसांच्या रेकॉर्डवरील कुख्यात घरफोड्या सुनील खरातला गुन्हेशाखेने सोमवारी पीरबाजार परिसरात अटक केली. चोरीचे सोने विकण्याच्या प्रयत्नात असताना त्याला गजाआड करण्यात आले. खरात हा कुख्यात घरफोड्या कल्ल्याच्या टोळीतील सक्रीय सदस्य आहे.

पीरबाजार परिसरात सुनील सुदाम खरात (वय ३६, रा. नागसेननगर, उस्मानपुरा) हा पीरबाजार परिसरात आला असल्याची माहिती गुन्हेशाखेला मिळाली होती. सुनील याचा शोध घेऊन त्याला अटक करण्यात आली. त्याच्या ताब्यातून सोन्याचे मणी पोलिसांनी हस्तगत केले.

मुकुंदवाडी परिसरात केलेल्या घरफोडीतील हा ऐवज असल्याची कबुली सुनीलने दिली. सुनील खरात हा जवाहरनगर पोलिसांना देखील घरफोडीच्या गुन्ह्यात दोन वर्षापासून हवा आहे. त्याला जवाहरनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात येणार आहे. पोलिस निरीक्षक अविनाश आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार शेख हबीब, प्रदीप गोमटे, विश्वास शिंदे, शिवाजी कचरे, विलास सुदंर्डे व संतोष काकडे यांनी ही कामगिरी केली.

कल्ल्याच्या गँगचा सदस्य

उस्मानपुरा, जवाहरनगर व क्रांतिचौक पोलिस ठाणे हद्दीत घरफोडीचे गुन्हे करणारा कुख्यात गुन्हेगार कलीमखान उर्फ कल्ल्याच्या गँगमधील सुनील सक्र‌िय सदस्य आहे. सुनीलवर घरफोडीचे सोळा गुन्हे दाखल आहेत. तसेच झोपडपट्टी दादा कायद्यानुसार स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली होती. काही वर्षापासून तो पसार होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रिक्षाचालकाची हडकोत आत्महत्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पवननगर, एन-९, हडको येथील संतोष सर्जेराव साळवे (वय ३२) या रिक्षाचालकाने दुपारी दोन वाजता घरी कोणी नसताना गळफास घेत आत्महत्या केली. त्याचे कुटुंब खरेदीसाठी बाहेर गेले होते. घरी परल्यानंतर हा प्रकार लक्षात आला. सिडको पोलिसांना ही घटना कळविण्यात आली. पोलिसांनी त्याचा मृतदेह घाटीमध्ये हलविला. याप्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

३४ हजार हेक्टर शेतीचे नुकसान

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

गेल्या गुरुवारी (१७ सप्टेंबर) रोजी औरंगाबाद जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला. या पावसात ३४, ३४९ हेक्टर शेतीचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. महसूल विभागाची पथके तालुकानिहाय पाहणी करून पंचनामे करण्यात येत आहेत. जिल्ह्यातील ९९ गावांना अतिवृष्टीचा फटका बसला आहे. दोन जणांचा पुरात वाहून गेल्याने मृत्यू झाला. १२५ घरे पूर्णपणे पडली. तर १४५२ घरांचे नुकसान झाले आहे.

जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यात सर्वाधिक ६२, फुलंब्रीतील २१, कन्नडमधील दोन आणि औरंगाबाद व सोयगाव तालुक्यातील प्रत्येकी सात गावांना मुसळधार पावसामुळे उद्‌भवलेल्या पुराचा फटका बसला आहे. तालुक्यांमधील नद्यांचे पाणी गावांमध्ये शिरल्याने परिस्थिती गंभीर झाली होती. त्यामुळे औरंगाबाद तालुक्यातील १०३ आणि सिल्लोडमधील २२ घरांची पूर्णपणे पडझड झाली, तर नुकसान झालेल्या घरांची संख्या १४५२ आहे. यात सिल्लोड तालुक्यातील ८५७, औरंगाबाद तालुक्यातील ५२४, पैठणमधील सात, फुलंब्री १३, गंगापूर २०, खुलताबाद ५, कन्नड १, सोयगावमधील २५ घरांचा समावेश आहे. याशिवाय औरंगाबाद तालुक्यातील ११७ लहान व १६ मोठ्या जनावरांचा आणि फुलंब्रीतील ११ मोठ्या मृत्यू जनावरांचा झाला. याशिवाय फुलंब्री तालुक्यातील सहा झोपड्या, व नऊ गोठे, तर औरंगाबाद तालुक्यातील १३ गोठ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

औरंगाबाद, फुलंब्री, कन्न्ड, सिल्लोड तालुक्यांना फटका

पावसामुळे जिल्ह्यातील ३४ हजार ३४९ हेक्टरवरील शेतीपिकांचे नुकसान झाले. यात औरंगाबाद तालुक्यातील ६८७१ हेक्टर, फुलंब्री १३७२ कन्नड ६ हजार, सिल्लोड २०,१०० आणि गंगापूर तालुक्यातील सहा हेक्टरचा समावेश आहे. तर औरंगाबाद तालुक्यातील ३७४ आणि फुलंब्रीतील सात हेक्टर असा एकूण ३८१ हेक्टरवरील फळपिकांचे नुकसान झाले आहे. ९५० हेक्टर जमीन खरडून गेली आहे. याशिवाय सिल्लोडमधील ९०० आणि औरंगाबादेतील ५० हेक्टर जमीन पावसाच्या जोरदार पाण्यामुळे खरडल्या गेली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images