Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

उसाचे पेमेंट रोखले; सहकारमंत्र्यांकडे धाव

$
0
0

पैठण : मागच्या वर्षी शेतकऱ्यांचे उसाचे पैसे थकवणाऱ्या जय भवानी साखर कारखान्यावर व यावर्षी उसाचे मोजमाप करताना काटा मारणाऱ्या साखर कारखान्यावर कारवाई करावी, अशी मागणी अन्नदाता शेतकरी संघटनेने सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली आहे.

बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील जय भवानी सहकारी साखर कारखान्याने मागच्या गळीत हंगामात शेतकऱ्यांना उसाचा ११२० रुपये टन याप्रमाणे पहिला हप्ता दिला. एफआरपी प्रमाणे शेतकऱ्यांना उर्वरित ६०० रुपयाचा दुसरा हप्ता देणे अपेक्षित असताना सहा महिन्यांचा कालावधी लोटल्यावर अजूनही कारखान्याने शेतकऱ्यांना उसाचे पैसे दिले नसल्याचे सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांना अन्नदाता शेतकरी संघटनेच प्रदेशाध्यक्ष जयाजीराव सूर्यवंशी यांनी दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. मागच्या ऊस देणाऱ्या शेतकऱ्यांचे जवळपास आठ ते नऊ कोटी रुपये जय भवानी सहकारी साखर कारखान्याकडे थकलेले आहेत. ही रक्कम त्वरित मिळवून देण्याची मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. तसेच सध्या गळीत हंगाम सुरू असलेले मराठवाडा व नगर जिल्ह्यातील बहुतांशी साखर कारखाने उसाचे मोजमाप करताना वजनात घोळ करत आहेत. दोषी साखर कारखान्यांवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘स्वच्छ महाराष्ट्र’ला खीळ !

$
0
0

नगरपालिका हद्दीतील सव्वालाख कुटुंब जातात उघड्यावर

Ramchandra.Vaybhat@timesgroup.com

स्वच्छतागृहे व शौचालयांची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र शासनाकडून 'स्वच्छ भारत अभियान' सुरू करण्यात आल्यानंतर राज्य शासनानेही स्वच्छ महाराष्ट्र अभियान राबवण्याचा निर्णय घेतला, मात्र या अभियानाला मराठवाड्यात निधी उपलब्ध असूनही खीळ बसली. यामुळे नगरपालिका क्षेत्रातील तब्बल १ लाख ३६ हजार कुटुंबे अद्यापही उघड्यावर जात आहेत.

मार्च २०१५मध्ये झालेल्या सर्व्हेक्षणानुसार मराठवाड्यातील ५३ नगरपालिका क्षेत्रातील १ लाख ३६ हजार कुटुंब उघड्यावर शौचास जात असल्याचे निदर्शनास आले. शौचालये बांधण्यासाठी शासनाकडून प्रत्येक कुटुंबाला १२ हजार रुपये याप्रमाणे सुमारे ५० लाख रुपयांचा निधी नगरपालिकांकडे देण्यात आला आहे. मात्र आतापर्यंत मराठवाड्यातील ५३ नगरपालिकांमध्ये केवळ ३६ हजार ८३० लाभार्थ्यांचे अर्ज मंजूर करण्यात आले. त्यापैकी केवळ २ हजार ७५१ शौचालयाच्या बांधकामाला सुरुवात झाली असून, केवळ ९७ शौचालये बांधले असल्याचे आकडे शासनदप्तरी आहेत. देशातील सर्व शहरांमधील नागरिकांना स्वच्छ पर्यावरण व चांगले आरोग्य मिळावे, यासाठी केंद्र शासनाने स्वच्छ भारत अभियान देशामध्ये राबविणे सुरू केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वच्छ, सुंदर व पर्यावरणयुक्त देशाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी राज्यात मोठ्या प्रमाणावर हे अभियान राबविण्यास सुरुवात झाली असली तरी मराठवाड्यात या अभियानाला प्रशासनाकडूनच प्रतिसाद मिळत नाही. नगरपालिका हद्दीतील लाभार्थ्यांचा अर्ज मंजूर झाल्यानंतरही शौचालय बांधण्यासाठी पैसेच मिळत नसल्याने मराठवाड्यात अभियान रेंगाळत आहे. पाच वर्षांत भारत हा स्वच्छ देश म्हणून ओळखला जावा, यासाठी केंद्राने राबविलेली योजना महत्त्वपूर्ण आहे. ही योजना यशस्वी होण्यासाठी राज्याच्या इतर भागांमध्ये हागणदारीमुक्त नगरपालिकांच्या घोषणा होत असतांना मराठवाड्यात मात्र या कामाला अद्यापही वेग आला नाही.

अर्ज मंजूर झाल्यानंतरही काम कासवगतीने

स्वच्छ महाराष्ट्रसाठी मराठवाड्याला शासनाकडून ५० हजार शौचालयांसाठी प्राथमिक स्तरावर ४५ कोटी रुपयांचा निधी प्राप्त आहे. लाभार्थ्यांकडून अर्ज भरून घेतल्यानंतर, स्थळपाहणी केल्यानंतर टप्प्याटप्प्याने निधी देण्याचा नियम आहे. पण नगरपालिकांकडे निधी उपलब्ध असतानाही काम कासवगतीने होत आहे. ५३ नगरपालिकांमध्ये आतापर्यंत ३६ हजार ८३० अर्ज मंजूर असताना निधीअभावी शौचालय बांधकाम सुरू केल्याची संख्या केवळ २ हजार ७५१ आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महावितरणच्या कर्मचाऱ्याला मारहाण

$
0
0

औरंगाबाद : लाईट कट केल्याचा राग आल्याने वीज ग्राहकांनी महावितरणच्या कर्मचाऱ्याला मारहाण केली. चिकलठाणा येथील महावितरणच्या कार्यालयात शनिवारी दुपारी हा प्रकार घडला. या प्रकरणी सिडको एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नारायण उत्तमराव खरात (वय २७ रा. बजाजनगर) हा तरुण महावितरणाचे लाईट बिल वसुलीचे काम करतो. चिकलठाणा एमआयडीसी भागातील काही ग्राहकांचे बील थकल्याने त्यांचे विद्युत कनेक्शन कट करण्यात आले होते. शनिवारी खरात महावितरणच्या कार्यालयात काम करीत होते. यावेळी महेंद्र केशरीसिंग बायस हा त्या ठिकाणी आला. लाईट कशी काय कट केली, अशी विचारणा करीत त्याने कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करीत मारहाण केली. सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी आरोपी महेंद्रविरुद्ध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खून प्रकरणाची माहिती देणाऱ्यास लाखाचे पारितोषिक

$
0
0

औरंगाबाद : हडको एन-९ येथील डॉ. चित्रा डकरे यांच्या खुनाला पाच दिवस उलटल्यानंतरही पोलिसांना या गुन्ह्याच्या तपासाची दिशा गवसलेली नाही. पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी या खून प्रकरणाची माहिती देणाऱ्यास एक लाखाचे पारितोषिक देण्याचे घोषित केले आहे तसेच माहिती सांगणाऱ्याचे नाव गुप्त ठेवण्यात येणार असल्याची माहिती एका पत्रकाद्वारे दिली.

एन-९ परिसरातील विमलज्योती हौसिंग गृहनिर्माण संस्था येथील दुसऱ्या मजल्यावर फ्लॅटमध्ये एकट्या असलेल्या डॉ. चित्रा डकरे यांचा गळा चिरून निर्घृण खून करण्यात आला होता. बुधवारी सकाळी साडेनऊ ते अकरा वाजेच्या दरम्यान हा प्रकार घडला होता. या घटनेत मारेकऱ्याने चोरीचा बनाव केला असला तरी काहीच ऐवज चोरीस गेलेला नाही. या खुनाचे कारण समोर आले नसल्याने पोलिस देखील याबाबत संभ्रमावस्थेत आहेत. या गुन्ह्याच्या तपासासाठी विविध पथके नेमण्यात आली आहेत. रेकॉर्डवरील गुन्हेगारांची देखील या संदर्भात दररोज चौकशी करण्यात येत आहे. डॉ. डकरे यांच्या मूळगावी ‌अमरावती येथे देखील एक पथक तपासासाठी पाठविण्यात आले आहे. हा गुन्हा लवकर उघडकीस यावा या हेतूने पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी उपयुक्त माहिती देणाऱ्यास एक लाख रुपये रोख व प्रशस्तीपत्र असे पारितोषिक जाहीर केले आहे. तसेच त्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येणार आहे. ज्यांना या संदर्भात माहिती असेल त्यांनी मोबाइल व्हॉटसअप क्रमांक ८३९००२२२२२ व ७७४१०२२२२२ यावर माहिती कळविण्याचे आवाहन केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विश्वासघातकी नोकराला बेडया

$
0
0

म.टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

रंगाच्या दुकानातून मालकाचा विश्वासघात करीत रंगाच्या बकेट चोरून त्याची विक्री करणाऱ्या नोकराला गुन्हेशाखेने अटक केली आहे. दुकानात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामुळे हा प्रकार उघड झाला आहे.

रमेश पवार यांचे पुंडलिकनगर रोडवर रमेश ट्रेडर्स नावाने हार्डवेअर व रंग विक्रीचे दुकान आहे. गेल्या काही दिवसांत त्यांच्या दुकानातून रंगाच्या नऊ बकेट चोरी गेल्या होत्या. पवार यांना संशय आल्याने त्यांनी सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. यामध्ये त्यांचा नोकर कल्याण पांडुरंग चौधरी (वय २२ रा. पुंडलिकनगर) याने हा प्रकार केल्याचे लक्षात आले. याप्रकरणी पवार यांनी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल केला होता.

मात्र, त्यांचा नोकर कल्याण पसार झाला होता. कल्याण हा पुंडलिकनगर भागात लपून बसला असल्याची माहिती गुन्हेशाखेला मिळाली होती. या माहितीआधारे कल्याणचा शोध घेत त्याला अटक करण्यात आली. ही कामगिरी पोलिस निरीक्षक अविनाश आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय प्रशांत आवारे, देविदास राठोड, दत्तू सांगळे, विकास माताडे, आनंद वाहूळ, नंदलाल चव्हाण आदींनी केली.

अशी होत होती चोरी

दुकानमालक पवार कल्याणला गोडावूनमध्ये सामान आणण्यासाठी पाठवित होते. त्यावेळी एक बकेट सांगितल्यास कल्याण दोन बकेट काढून एक विक्रीसाठी बाजूला ठेवत होता. बकेटचा माल कमी भरल्यामुळे हा प्रकार उघडकीस आला. मालकाने दुकानाच्या गोडाऊनमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविले होते. बकेट कमी भरल्याचे लक्षात आल्यानंतर या सीसीटीव्हीचे फूटेज तपासले गेले, त्यात दुकानाच्याच नोकराने हा प्रकार केल्याचे निदर्शनास आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सुनेनेच काढला सासूचा काटा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी वाळूज

घरातील किरकोळ कारणावरून सतत होणारे भांडण; तसेच पेइंग गेस्ट ठेवण्यास दिलेल्या नकाराचा राग मनात धरून ६७ वर्षीय सासूचा सुनेने खून केल्याचा उलगडा वाळूज पोलिसांनी केला. सासूचा झोपेत खून करणाऱ्या सुनेस पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार; समाधान आत्माराम महाजन हा वाळूज एमआयडीसीतील जॉन्सन अॅण्ड जॉन्ससन कंपनीत सुरक्षा रक्षक म्हणून काम करतो. मूळचा पाचोरा (जि. जळगाव) येथील समाधान गेल्या काही दिवसांपासून पत्नी मंगल (३२), मुलगी पूजा (१२), मुले अाशिर्वाद (११) प्रसाद (८) व आई सखुबाई (६७) यांच्यासोबत वाळूज येथील मनीषा नगरातील माज्जीद महेबुब सय्यद यांच्या रोहाउसमध्ये राहत होता. समाधान व त्याची पत्नी मंगल यांनी गेल्या काही महिन्यापासून घरात पेइंग गेस्ट म्हणून अविनाश बापू पाटील (२५) यास राहण्यास जागा दिली होती. हा प्रकार समाधानची आई सखुबाई यांना मान्य नव्हता.

त्यामुळे सून मंगल व सासू सखुबाई यांच्यात सतत खटके उडत होते. घरगुती कारणामुळे अनेकदा भांडणात वाढ होत असे. त्यामुळे दोघींमध्ये नेहमीच कुरबुर होऊन कडाक्याचे भांडण होत असे. त्यातच घर मालकाने गेल्या महिन्यात २८ नेव्हेंबर रोजी घर सोडण्यास सांगितले. त्यावर महाजन कुटुंबीयाने दुसरीकडे घर भाड्याने घेवून येथील पसारा हलविला होता. मात्र, नव्या घरी जाण्यावरून सासू-सुनेत कडाक्याचे भांडण झाले. त्यानंतर सासू सखुबाई या (१ डिसेंबर) रोजी रोहाऊसच्या गच्चीवर झोपल्या होत्या.

ही बाब सून मंगलला माहिती होती. ती भल्या पाहटे २ वाजेच्या सुमारास गच्चीवर गेली. गच्चीवर जाताने तिने संशय येऊ नये तसेच कोणी ओळखू नये यासाठी गाऊन परिधान केला व चेहरा स्कार्फने झाकून घेतला. हातात लोखंडी डंब्बेल्स घेऊन ती गेली. गच्चीवर गाढ झोपेत असलेल्या सखुबाईच्या डोक्यात डंब्बेल्स वार करून त्यांचा खून केला. त्यानंतर खुनाचा आरोप आपल्यावर येऊ नये त्यासाठी तिने सखुबाईच्या अंगावरील चांदीचे दागिने काढून घेतले. शेजारी राहणाऱ्यांच्या गच्चीवरील वरवंटा व पाटा प्रेताच्या बाजूला टाकून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला.

दुसऱ्या दिवशी घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर वरील प्रकार समोर आला. सासू सुनेच्या वादातून हा प्रकार घडल्याचे पोलिसांनी सांगितले. तसेच या प्रकरणी सून मंगल हिस पोलिसांनी अटक केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नोकरीवर टांगती तलवार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

केंद्र सरकारच्या 'नॅको'अंतर्गत महाराष्ट्रामध्ये एचआयव्ही-एड्सचे निदान-नियंत्रण-समुपदेशनासह इतर महत्वपूर्ण कार्य करणाऱ्या सुमारे अडीच हजार डॉक्टर-परिचारिका-प्रयोगशाळा तंत्रज्ञ-समुपदेशकासह २० पदांवरील कर्मचाऱ्यांच्या शासकीय सेवेवर १७ वर्षांनंतरही टांगती तलवार कायम आहे. एकाही कर्मचाऱ्याला कायम सेवेत सामावून घेण्यात आलेले नसून, प्रत्येकाला १७ वर्षांपासून १२ महिन्यांचे कंत्राट देण्यात येत आहे. ना पीएफ कापला जातो, ना बदली होते, ना कुठल्या वैद्यकीय सुविधा मिळतात. याच पदावरील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कर्मचारी दुपटीपेक्षा जास्त वेतन घेत असून, आता कधी सेवेतून काढले जाईल, याचाही नेम राहिलेला नाही.

'महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटी'अंतर्गत (एमसॅक्स) विविध २० पदांवर २२८९ कर्मचारी कार्यरत आहेत. राज्यातील ६५० आयसीटीसी केंद्र, ९७ एआरटी केंद्र, ३० जिल्हा एड्स प्रतिबंधक व नियंत्रण पथक कार्यालये (डॅप्कू) आदी विविध केंद्र व कार्यालयांमध्ये 'एमसॅक्स'चे कर्मचारी कार्यरत आहेत. यामध्ये एचआयव्ही-एड्सचे निदान करणारे प्रयोगशाळा तंत्रज्ञ, बाधितांचे व सर्व प्रकारच्या नागरिकांचे समुपदेशन करणारे समुपदेशक, यासह वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, जिल्हा कार्यक्रम अधिकारी, डाटा ऑपरेटर, टेक्निकल सुपरव्हायझर आदी पदांवर 'एमसॅक्स'चे कर्मचारी महत्वपूर्ण कार्य करीत आहेत. त्यांच्या योगदानामुळेच काही प्रमाणात का होईना राज्यातील एचआयव्ही-एड्सचे प्रमाण दिवसेंदिवस घटत आहे. १९९८ पासून म्हणजेच 'एमसॅक्स' स्थापन झाल्यापासून हे कर्मचारी राज्यभरामध्ये कार्यरत आहेत. मात्र पूर्णपणे शासकीय नियमानुसार शासकीय सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना १७ वर्षांनंतरही कुठल्याच शासकीय सुविधा मिळत नाहीत. सर्व २२८७ कर्मचाऱ्यांना दरवर्षी १२ महिन्यांचे कंत्राट दिले जाते. सद्यस्थितीत दहा जणांच्या युनिटमध्येही सर्व कामगारांचा पीएफ कापला जातो. मात्र कौशल्यपूर्ण व जबाबदीरीचे काम करुनही या कर्मचाऱ्यांना ना कायम सेवेत सामावून घेण्यात आले, ना त्यांचा साधा पीएफ कापला जातो. ज्या ठिकाणी नियुक्ती झाली, त्याच ठिकाणी सर्व कर्मचारी मागच्या १७ वर्षांपासून कार्यरत आहेत. कुठल्याही कारणास्तव बदलीची सुविधा नसल्याने महिलांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे. मुळात वेतन, इन्क्रिमेंट कमी असून, दोन वर्षांच्या इन्क्रिमेंटचे एरिअर्सदेखील मिळालेले नाही. या कर्मचाऱ्यांना कुठल्याही वैद्यकीय सुविधा नाहीत. 'ईएसआयसी' लागू नाही. कुठल्याही कारणास्तव कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास वारसांना मदत मिळण्याची सोय नाही. प्रयोगशाळा तंत्रज्ञांना १७ वर्षांनंतर सुमारे १९ हजार वेतन मिळते, पण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळा तंत्रज्ञांना तेवढ्याच सेवेनंतर सुमारे ४५ हजार वेतन मिळते. या सर्व कारणांसाठी तसेच 'एरियर्स'च्या मागणीसाठी 'एमसॅक्स' कर्मचारी संघटनेने 'नॅको'सह राज्य सरकारकडे पाठपुरावा केला, काही महिन्यांपूर्वी आंदोलनही केले आहे. मात्र 'नॅको'सह राज्य सरकारने दुर्लक्ष केल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. देशात २५ हजार कर्मचाऱ्यांवर तलवार

'नॅको'अंतर्गत एड्स नियंत्रणासाठी 'एमसॅक्स'प्रमाणेच देशभर २५ हजार कर्मचारी असून, यापैकी कुणालाही कायम सेवेत सामावून घेण्यात आलेले नाही. मात्र मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश, हरयाणा आदी राज्यांमध्ये 'एरियर्स' देण्यात आले. हिमाचल प्रदेशमध्ये या कर्मचाऱ्यांचा पीएम कापला जात आहे. तसेच मुंबईमध्ये कार्यरत सुमारे २०० 'एमडॅक्स' कर्मचाऱ्यांना कायम सेवेत सामावून घेण्यात आले आहे. सुप्रिम कोर्टाच्या निर्णयानुसार दहा वर्षांच्या शासकीय सेवेनंतर सामावून घेणे बंधनकारक आहे, असेही कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष मोहम्मद रईस यांनी 'मटा'ला सांगितले.

'एमसॅक्स'च्या सुमारे अडीच हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार आहे. हा राष्ट्रीय कार्यक्रम २०१७ पर्यंत असून, आम्हाला कधी काढून टाकले जाईल. शासकीय सेवा असूनही शासकीय सुविधा नाहीत. आज बहुतेकांनी चाळीशी पार केली असून, दुसरीकडे नोकरीची संधी राहिली नसल्याने आमची कोंडी झाली आहे.

संजय जिवतोडे, अध्यक्ष, एमसॅक्स

'एमसॅक्स'च्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती ही मुळातच कंत्राटी पद्धतीची आहे. स्थानिक पातळीवरील कामासंबंधीचे नियंत्रण आरोग्य सेवेअंतर्गत केले जाते; परंतु सोयी-सुविधा व निर्णय घेण्याचे अधिकार 'एमसॅक्स'च्या मुंबईतील मुख्य कार्यालायलाच आहेत.

-डॉ. जी. एम. गायकवाड, जिल्हा शल्य चिकित्सक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वर्ष उलटूनही मराठवाडा कोरडाच

$
0
0

गेल्या अधिवेशनात दिलेली आश्वासने अपूर्णच

Tushar.Bodkhe@timesgroup.com

औरंगाबाद : नवे सरकार अन् तरूण मुख्यमंत्री असल्यामुळे मराठवाड्यातील जनतेच्या अपेक्षा प्रचंड उंचावल्या होत्या. भाजप -शिवसेना सरकार विकासकामे करेल, अशी अपेक्षा होती. अपेक्षेप्रमाणे मागील वर्षी हिवाळी अधिवेशनात सरकारने मराठवाड्यासाठी निधी व योजनांच्या आश्वासनांचा पाऊस पाडला; पण वर्षभरात आश्वासने प्रत्यक्ष दिसली नाहीत

नागपूर येथे सोमवारपासून (७ ऑगस्ट) हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे. यंदा तीव्र दुष्काळामुळे अधिवेशन वादळी होण्याची शक्यता आहे. विरोधकांचा दबाव वाढताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नवीन घोषणा करतील; मात्र, मागील वर्षीच्या अधिवेशनातील घोषणांचे काय झाले, असा प्रश्न आहे. प्रादेशिक अनुशेष दूर करण्यासाठी नवीन सिंचन प्रकल्प, हिंगोली जिल्ह्यात टेक्सटाइल पार्क, औरंगाबाद शहरात 'स्कूल ऑफ प्लॅनिंग अँड आर्किटेक्चर' संस्था, ऊसतोड कामगारांसाठी परळीत स्वतंत्र मंडळ, नवे शेती धोरण आणि मराठवाड्यासाठी स्वतंत्र प्रादेशिक विकास मंडळ स्थापन करण्याची घोषणा सरकारने केली होती. यातील एकाही घोषणेची अंमलबजावणी झाली नाही. तांत्रिक पूर्तता करून राज्यपालांच्या परवानगीने मराठवाड्यात नवीन सिंचन प्रकल्प सुरू करू, अशी घोषणा जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी केली होती. मध्य गोदावरी खोऱ्यातील १८ टीएमसी पाणी वापराचा बृहत आराखडा मंजुरीसाठी प्रशासकीय स्तरावर प्रलंबित आहे. मराठवाड्यातील २६ नवीन प्रकल्पांना मंजुरी देण्याची विनंती त्यांना करण्यात आली होती. प्रत्यक्षात वर्षभरात सिंचन प्रकल्पांचा प्रश्न 'जैसे थे' आहे. हिंगोली-परभणी पट्ट्यात टेक्सटाइल पार्क अपेक्षित असताना अजूनही हालचाल नाही. चार शासकीय कला महाविद्यालयातील १०३ रिक्त पदे भरण्याची घोषणा उच्च शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केली होती, पण राज्यातील चार शासकीय कला महाविद्यालयांसह औरंगाबादच्या कला महाविद्यालयातील जागाही रिक्त आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी औरंगाबादमध्ये नियोजन आणि पायाभूत क्षेत्रातील अग्रगण्य संस्था 'स्कूल ऑफ प्लॅनिंग अँड आर्किटेक्चर' स्थापन करणार असल्याचे विधानसभेत जाहीर केले. ही संस्था कागदावरच आहे. ऊसतोड कामगारांसाठी माथाडी कामगार महामंडळाच्या धर्तीवर मंडळ स्थापन करण्यात येणार आहे. या मंडळाचे मुख्यालय परळी (जि. बीड) येथे राहणार असून मंडळाला दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांचे नाव दिले जाईल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी जाहीर केले. अर्थात, ऊसतोड कामगारांसाठीचे मंडळही कागदावरच आहे.

निधीची प्रतीक्षा

मराठवाड्याच्या विकासासाठी पुरेशा निधीची गरज आहे. विदर्भ, मराठवाडा आणि उर्वरीत महाराष्ट्र यांच्यात मराठवाड्याचा निधी वाटा वाढवण्याची शिफारस केळकर समितीने राज्य सरकारला केली आहे. मराठवाड्याचा निधी १८.७५ टक्क्यांवरून २५.३१ टक्के करावा असे समितीने म्हटले. प्रत्यक्षात राज्य सरकारने वर्षभरात पुरेसा निधी दिला नसल्याने विकासकामे रखडली आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘लॉ’साठी आता ‘सीईटी’

$
0
0

प्रवेशात सुसूत्रता आणण्यासाठी सरकारचा निर्णय; कॉलेजांचा परीक्षेला विरोध

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

विधी पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश हवा असेल तर यापुढे विद्यार्थ्यांना प्रवेशपूर्व परीक्षा द्यावी लागेल. येत्या शैक्षणिक वर्षापासून अभ्यासक्रमाला सीईटी घेण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. कॉलेजांचा मात्र सामायिक प्रवेश परीक्षेला विरोध केला आहे.

राज्यातील विनाअनुदानित खाजगी व्यावसायिक शिक्षण संस्थांमधील प्रवेशात आणि शुल्क निश्चितीमध्ये सुसूत्रता आणण्यासाठी शासनाने अशा अभ्यासक्रमांचे प्रवेश सामायिक प्रवेशपूर्व परीक्षेतून घेण्याचे स्पष्ट केले. लॉ पदवी अभ्यासक्रमाचे प्रवेश २०१६-१७ वर्षापासून याच प्रक्रियेतून होणार आहे. राज्यशासनाने याबाबतचा अद्यादेश काढत प्रक्रियेबाबत स्पष्ट केले. 'लॉ'च्या तीन वर्षे; तसेच पाच वर्षे कालावधीच्या पदवी अभ्यासक्रमांसाठी प्रवेश राज्यस्तरीय सामायिक प्रवेश प्रक्रियेतून होणार आहेत. गुणवत्ता यादी तयार करून हे प्रवेश दिले जाणार आहेत. या प्रक्रियेबाबत कॉलेजांमध्ये मात्र नाराजीचा सूर आहे. सीईटी कोणत्या यंत्रणेमार्फत घेण्यात येणार, परीक्षांचे केंद्र कोणत्या शहरांमध्ये असतील हेही अद्याप स्पष्ट करण्यात आलेले नाही. असे असले तरी सीईटीमुळे जागा मोठ्या प्रमाणात रिक्त राहतील, विद्यार्थ्यांचा खर्च वाढविणारा हा निर्णय असल्याचे या अभ्यासक्रमातील जाणकारांना वाटते. ग्रामीण भागातील कॉलेजांकडे दुर्लक्ष होते आहे, यामुळे शैक्षणिक वेळापत्रकही बिघडेल असे कॉलेजांना वाटते. बीएड अभ्यासक्रमाच्या धर्तीवर विधी अभ्यासक्रमासाठी यंदा प्रथम होत असलेल्या प्रवेशपूर्व परीक्षेत जागा मोठ्या प्रमाणात रिक्त राहण्याची भिती व्यक्त केली जात आहे. रिक्त राहणाऱ्या जागांमध्ये ग्रामीण भागातील कॉलेजांची संख्या जास्त असेल असे तज्ज्ञांना वाटते.

सीईटीचा निर्णय घेताना ग्रामीण भागातील कॉलेजांचा तेथील विद्यार्थ्यांचा विचार करणे गरजेचे होते. विद्यापीठाकडून आधीच बार काउंसिलचे नियम पाळले जात नाही. त्यात सीईटीचा निर्णय घेण्यात आला. यामुळे जागा मोठ्या प्रमाणात रिक्त राहण्याची भिती आहे; तसेच विद्यार्थ्यांचा खर्चही वाढेल, असे सध्यातरी चित्र आहे.

- डॉ. सी. एम. राव, प्राचार्य, एम. पी. लॉ. कॉलेज.

सीईटीमुळे फारकाही फरक पडेल, असे वाटत नाही. शासकीय कॉलेजकडे विद्यार्थ्यांचा वाढता कल लक्षात घेत हा निर्णय घेतल्याचे वाटते. असे असले तरी यामुळे मेरीटनुसार प्रवेश मिळेल. चांगल्या कॉलेजांना मागणी कायम असेल.

- डॉ. भीमानेनी चौधरी, माजी अधिष्ठाता, विधी विद्याशाखा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दौऱ्याविरोधात भाजपचे आंदोलन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, लातूर

लातूर शहराला पिण्यास पाणी नाही. निधीअभावी अनेक कामे अर्धवट अवस्थेत आहेत. यावर उपाययोजना करण्यात असमर्थ ठरलेल्या मनपा नगरसेवकासह काही अधिकारी प्रशिक्षण दौऱ्याच्या नावाने केरळ सहलीला निघालेले आहेत. मनपाची आर्थिक परिस्थिती डबघाईस आलेली असतानाही हा केरळ दौरा आयोजित केला असल्याने शहर जिल्हा भारतीय जनता युवा मोर्चा, महिला आघाडी व अल्पसंख्यांक आघाडीकडून भीक मागो आंदोलन करून विरोध करण्यात आला.

हे आंदोलन युवा मोर्चाचे शहर जिल्हाध्यक्ष गौरव मदने, महिला अध्यक्षा गीता गौड व अल्पसंख्यांक आघाडीचे अध्यक्ष अफजलखान पठाण यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. साडेतीन वर्षांपूर्वी नगरपरिषदेचे रूपांतर महानगरपालिकेत झालेले असताना शहरवासिय अनेक नागरी सुविधांपासून वंचित आहेत. त्यातच गेल्या काही वर्षांपासून पर्जन्यमान अतिशय कमी झाल्यामुळे तीव्र पाणी टंचाई जाणवू लागली आहे. यावर्षीच्या दुष्काळी परिस्थितीने तर हिवाळ्यातच पाण्यासाठी वणवण भटकण्याची पाळी शहरवासियांवर आलेली आहे. शहरातील विकासकामे निधीअभावी रेंगाळलेली आहेत. या सर्व परिस्थितीने शहरवासियांना मोठ्या गैरसोयीला तोंड द्यावे लागत आहे. याबाबत उपाययोजना आखण्यात नगरसेवकांसह पालिका प्रशासनालाही सपशेल अपयश आलेले आहे.

या परिस्थितीत नगरसेवक व काही अधिकारी प्रशिक्षण दौऱ्याखाली केरळ सहलीला निघालेले आहेत. या सहलीवर लाखो रूपयांचा चुराडा करण्याची ऐपत नसतानाही पालिकेकडून या दौऱ्याचे नियोजन सुरू झालेले असून याच्या निषेधार्थ सोमवारी शहर जिल्हा भाजपच्या विविध आघाड्यांनी भिक मागो आंदोलन केले.

या आंदोलनात अर्जुन माने, अॅड. ललित तोष्णीवाल, विवेक बाजपाई, राहूल पाटील, गिरीष तुळजापूरे, मयुर जाधव, स्वाती जाधव, विशाल जाधव, राहूल कावळे, सुनील मलवाड, प्रविण येळे, अजित माने, अभिनव मोहिते, संतोष पांचाळ, भीमा गाढवे, शकील वलांडीकर, अविनाश सोमवंशी, सुवर्णा येलाले, मन्सूरखान पठाण, अनिल शिंदे, प्रशांत गौडगाव सहभागी झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिसासह आठ जणांवर गुन्हा

$
0
0

नांदेडः लग्नाच्या वरातीतील डीजे बंद करा असे सांगणाऱ्या पोलिसावर हल्ला करून अश्लील शिवीगाळ करणाऱ्या आठ जणांवर सरकारी कामात अडथळा केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यासोबतच पोलिसांवर हल्ला करणाऱ्यामध्ये एका पोलिसाचा समावेश आहे. याप्रकरणी दोन जणांना वजिराबाद पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

६ डिसेंबर रोजी शहरात सामुहिक विवाह मेळावा पार पडला. त्यात अनेक लग्ने पार पडली. काही जणांनी रात्री निरोपाची मिरवणूक वाजत-गाजत काढली. त्यात बाजा आणि डीजे यांच्या निनादात लग्नाचा उत्साह ओसंडून वाहत होता. या दरम्यान रात्रीचे ११ केव्हा वाजले याकडे आनंद व्यक्त करणाऱ्या कोणालाच कळले नाही. त्या मुळे रात्री वजिराबाद गोवर्धन घाट पुलाजवळून डीजे वाजवत जाणाऱ्या एका लग्न वरातीला आपला डीजे बंद करण्याच्या सूचना पोलिस हवालदार पवार आणि पोलिस शिपाई सुशील कुबडे यांनी दिल्या. यावेळी वरातीत सहभागी झालेल्यांनी पोलिसांशी वाद घातला. या वादात एक पोलिस सुद्धा सामील झाला अन त्यामुळे वाद वाढतच गेला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेल्वे विस्ताराबाबत लवकरच निर्णय

$
0
0

म. टा. प्रतिनीधी, जालना

रेल्वे वाहतूक व्यवस्थेची किती आणि कशी मागणी असेल यासंदर्भात रेल्वे प्रशासन स्वतंत्र अहवाल तयार करणार आहे. या भागातील रेल्वे विस्तारीकरणासंदर्भात निर्णय घेण्यात येईल असे दक्षिण मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक रवींद्र गुप्ता यांनी सांगितले.

जालना रेल्वे स्थानक परिसराची पाहणी करताना ते बोलत होते. हा नियमित पाहणी दौरा आहे. त्यामुळे विशेष असे काही नाही असे ते म्हणाले. परभणी ते मनमाड रेल्वे लोहमार्ग दुपदरीकरणाचे काम तातडीने सुरू करण्यात यावे अशी प्रमुख मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी सोमवारी दक्षिण मध्य रेल्वे महाव्यवस्थापक गुप्ता यांच्या जालना भेट दौऱ्यात केली. दानवे यांच्यावतीने गुप्ता यांना भाजपाच्या कार्यकर्त्यांनी भेटून एक निवेदन दिले. परभणी ते मनमाड या लोहमार्गाच्या दुहेरीकरणास सन २०१२ च्या रेल्वे अंदाजपत्रकात मंजुरी मिळाली आहे. अद्याप हे काम प्रारंभ करण्यात आलेले नाही या मुद्द्यावर खासदार दानवे यांनी जोर दिला. रेल्वेच्या संदर्भात एक सविस्तर निवेदन खासदार दानवे यांच्यावतीने यावेळेस महाव्यवस्थापक गुप्ता यांना देण्यात आले.

यामध्ये कोल्हापूर ते धनबाद, अजमेर ते हैदराबाद आणि ओखा ते रामेश्वर या तीन रेल्वे अठवड्यातून किमान तीन दिवस चालवण्यात याव्यात अशी मागणी करण्यात आली.

जालना रेल्वे स्थानक परिसरात टॅक्सी आणि रिक्षा स्टँड स्वतंत्र करण्यात यावे. जालना स्थानकावर फ्लॅटफार्म क्रमांक चारवर आदर्श स्थानक योजनेत स्वतंत्र इमारत बांधण्यात यावी, नांदेड ते बिकानेर आणि गोरखपूर ते बनारस या दोन्ही रेल्वे मनमाड मार्गे चालवण्यात याव्यात, औरंगाबाद ते हैदराबाद या पॅसेंजरची वेळ एक तास अलीकडे करण्यात यावी. मनमाड ते मुंबई ही गोदावरी एक्स्प्रेस जालन्यातून सोडण्यात यावी. बदनापूर आणि पारडगांव या दोन्ही रेल्वे स्थानकाच्या इमारती नवीन उभारण्यात याव्यात, जालना रेल्वे

स्थानक परिसराबाजूला भूमीगत मार्ग उभारण्यात यावा आणि जालना रेल्वे स्थानक परिसरातील पोलिस चौकीचे रूपांतर पोलिस स्टेशनमध्ये करण्यात यावे. या सर्व मागण्या यावेळी करण्यात आल्या आहेत. भाजपचे जिल्हाध्यक्ष रामेश्वर भांदरगे, जेष्ठ नेते भास्कर दानवे, रेल्वे उपभोक्ता समितीचे अध्यक्ष अर्जुन गेही, प्रदीप मुथा, सरचिटणीस राजेश जोशी, देवीदास देशमुख, गोवर्धन कोल्हे, आबा डोंगरे, तुकाराम चव्हाण, शिवाजी गायकवाड यांच्यासह अनेक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. पाण्याची व्यवस्था करण्यात यावीजालना रेल्वे स्थानक परिसरात एटीएम, मेडिकल स्टोअर, टेलिफोन बूथ, चांगली दर्जेदार कॅँटीन, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात यावी अशी मागणी यावेळी कार्यकर्त्यांनी केली. रेल्वे संघर्ष समितीचे अध्यक्ष गणेशलाल चौधरी यांनी रेल्वे महाव्यवस्थापक गुप्ता यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राजेनिंबाळकर यांना हायकोर्टाचा दिलासा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

उस्मानाबादचे नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांना अवैध बांधकाम प्रकरणी नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील यांनी अपात्र ठरवले होते. या निर्णयाला मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. एन. डब्लू. सांबरे यांनी सोमवारी स्थगिती दिली. या आदेशामुळे येत्या ११ डिसेंबरला होणारी नगराध्यक्षपदाची निवडणूक टळली आहे.

उस्मानाबादचे नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांना नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील यांनी २ डिसेंबर रोजी अवैध बांधकाम प्रकरणी अपात्र ठरवून सहा वर्षासाठी निवडणूक लढवण्यासही अपात्र ठरवले होते. या निर्णयाला राजेनिंबाळकर यांनी औरंगाबाद खंडपीठात आव्हान दिले.

शिवाजी चौकातील अनधिकृत बांधकामास मकरंद राजेनिंबाळकर यांनी संरक्षण देऊन ते नियमित केल्याचा आक्षेप उदयसिंह निंबाळकर यांनी घेतला होता. त्यात राज्यमंत्र्यांनी त्याांना ६ वर्षांसाठी अपात्र ठरविले. या प्रकरणाची सुनावणी ९ नोव्हेंबरला पूर्ण झाली. पण राज्यमंत्री रणजित पाटील यांनी निकाल २ डिसेंबरला रात्री दिला. या निर्णयाची सत्य प्रत राजेनिंबाळकर यांना मिळण्याआधीच उस्मानाबादचे जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी ३ डिसेंबर रोजी रातोरात अधिसूचना काढून नगराध्यक्ष पदाची निवडणूक जाहीर केली होती. ही घाई संशय निर्माण करणारी आहे. २ डिसेंबरचा निर्णय रद्द करण्यात यावा अशी विनंती याचिकेत करण्यात आली आहे. या याचिकेत प्रतिवादी नगरविकास सचिव, नगरविकास राज्यमंत्री, यांना नोटीस बजावण्याचे आदेश कोर्टाने दिले . सहाय्यक सरकारी वकील ए. व्ही. देशमुख यांनी शासनाच्यावतीने नोटीस घेतली.

नैसर्गिक न्यायतत्वाचा भंग

राज्यमंत्र्यांनी नैसर्गिक न्यायतत्वाचा भंग केला आहे. पुरावा सादर करण्याची संधी देण्यात आली नाही असा युक्तिवाद राजेनिंबाळकर यांचे वकील राजेंद्र देशमुख यांनी केला. राज्यमंत्र्यांनी सारासार विचार न करता घेतलेला हा निर्णय आहे असे याचिकेत म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लातूर पोलिसांकडून ८८ किलो गांजा जप्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, लातूर

लातूरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सोमवारी सकाळी नांदेड रोडवर दोन आरोपींकडून ८८ किलो गांजा जप्त केला. या गांजाची किंमत अंदाजे २ लाख ६४ हजार रुपये असल्याचे समजते.

या बाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, टाटा पिकअप व्हॅन क्रमांक एपी-१५ टी.सी.३९५४ या गाडीतून तस्करीसाठी आणला जात असलेला ८८ किला गांजा सापडला. प्रथम दर्शनी उघड्या दिसणाऱ्या या गाडीत खालच्या बाजूस कोणाच्याही लक्षात येणार नाही अशा पद्धतीने प्रत्येकी दोन किलोच्या पॅकेटमध्ये गांजा आढळून आला. पोलिसांनी याप्रकरणी तेलंगणाच्या किशन विसलावत व अंजने इलु नागुला या दोघांना ताब्यात घेतले. स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सुधाकर बावकर यांनी हा गांजा तस्करीच्या उद्देशाने आणला होता. यामागे मोठे रॅकेट असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

स्थानीक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बालाजी सोनटक्के यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक बावकर हे करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चौका घाटात व्यापाऱ्याला लुटले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, फुलंब्री

एका व्यापाऱ्याला चौका घाटात अडवून लुटणाऱ्या टोळीतील दोन जण एका पोलिसाच्या सतर्कतेमुळे अटक करण्यात आली. या टोळीने व्यापाऱ्याकडून रोख व अंगठी असा अडीच लाख रुपयांचा ऐवज पळवला आहे. ही घटना शनिवारी घडली.

प्रमानंद थावरदास चावराई (रा. औरंगाबाद) तंबाखूजन्य पदार्थाचे व्यापारी आहेत. ते शनिवारी सायंकाळी टाटा टेम्पोमधून (एम. एच. २० सी टी ३०७६) सिल्लोडहून औरंगाबादकडे जात होते. त्यावेळी त्यांना चौका घाटात तीन मोटारसायकल व एका कारमधून आलेल्या १२ ते १५ जणांनी अडवले. टेम्पोचा चालक व चावराई यांना मारहाण करून त्यांच्याकडून दोन लाख ३३ हजार रुपये, १३ हजार रुपयांची सोन्याची अंगठी व एक मनगटी घड्याळ असा दोन लाख ४९ हजार रुपयांचा ऐवज हिसकावून पळ काढला. त्यानंतर काही वेळाने येथून फुलंब्री येथील पोलिसांच्या मोटारीचे चालक शेख इलियास फुलंब्रीकडे जात होते. शंका आल्यामुळे त्यांनी मोटारसायकल थांबवून चावराई यांच्याकडे विचारपूस केली, तेव्हा लूटमार करून दरोडेखोर औरंगाबादकडे पळून गेल्याचे सांगितले. चावराई यांनी दरोडेखोरांच्या वाहनांचे क्रमांक सांगतले. ही माहिती शेख इलियास यांनी सावंगी टोल नाक्याजवळील कर्मचाऱ्यांना दिली. टोल नाक्याजवळील कर्मचाऱ्यांनी मोटार सायकल अडवून त्यास ताब्यात घेतले. तोपर्यत शेख यांनी पोलिस निरीक्षक मारोती पंडित यांना माहिती दिली. या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक पी. डी. भारती, पोलिस शिपाई विजय भिल्ल, एस. के. घुगे, डी. एस. पठाण यांच्या पथकाने चौकशीसाठी ताब्यात घेतले. याप्रकरणी फुलंब्री ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बक्षीस जाहीर

शेख इलियास यांच्या समयसूचकतेमुळे दोन जण पकडले गेले. यामुळे पोलिस अधीक्षकांनी त्यांना इलियास यांना पाच हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


परप्रांतीय शेतमजुरांवर कापूस वेचणीची भिस्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कन्नड

गेल्या आठवड्यापासून तालुक्यात कापूस वेचणीला वेग आला आहे. मात्र मजुरांची वानवा जाणवत असल्याने शेतकरी मध्यप्रदेशातील मजुरांवर भिस्त ठेऊन आहेत. गेल्या पंधरवड्यातील पावसाळी वातावरण व दिवाळीमुळे कापूस वेचणी थंडावली होती. आता आकाश निरभ्र झाले असून दिवाळीच्या सणानंतर सगळे कामाला लागले आहेत. त्यामुळे तालुक्यात कापूस वेचणीला वेग आला आहे. यंदा कमी पावसामुळे एक वा दोन वेचणीतच कापूस संपत आहे. सध्या मोठ्या प्रमाणावर फुटलेला कापूस वेचनीच्या प्रतीक्षेत आहे. यामुळे कापूस वेचणीचे दर वाढले आहेत. शिवाय मजुरांची चणचण भासत आहे. कन्नड तालुक्यात सुमारे ३५ हजार हेक्टरवर खरीप हंगामात कापसाची लागवड करण्यात आली आहे. यावेळी शेतकऱ्यांनी संकरित व देशी वाणाला पसंती दिली. बेमोसमी प्रतिकूल वातावरण, मोठ्या प्रमाणावर कीडनाशकाची फवारणी, महागडी खते देवूनही यंदा कापसाने काही प्रमाणात बागायती क्षेत्र वगळता ठेंगा दाखवला आहे. त्यातच मजुरांची चणचण भासत आहे. सध्या मजूर रब्बी कांदा लागवडीकडे मोठ्या प्रमाणावर वळले आहेत. त्यामुळे कापूस वेचायचा कसा हा प्रश्न शेतकऱ्यासमोर आहे. काही शेतकरी यासाठी पर्याय म्हणून मध्यप्रदेश व विदर्भातील मजुरांना पसंती देत आहेत. त्यांनी दलालांमार्फत संपर्क करून कापूस वेचणी व शेती कामासाठी मजूर मागवले आहेत. ज्यांच्या शेतावर शेतमजूर उतरले आहेत, त्या शेतकऱ्याची इतर शेतकऱ्यांना मनधरणी करावी लागत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुष्काळग्रस्तांची तहान भागवा!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

दुष्काळात पाण्यासाठी तडफडणाऱ्या मराठवाड्याची तहान भागवा, जायकवाडी लाभक्षेत्रातील जनतेसाठी तातडीने पाणी पाळ्या सोडा यासह अन्य मागण्यांसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाने (भाकप) सोमवारी गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळासमोर धरणे आंदोलन केले. मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करू, असा इशारा आंदोलकांनी दिला.

जायकवाडी प्रकल्पाचे लाभक्षेत्र असलेल्या परभणी जिल्ह्यात भीषण दुष्काळ व पाणी टंचाई निर्माण झाली आहे. न्यायालयीन प्रक्रियेद्वारे जायकवाडी प्रकल्पात १२.८४ टीएमसी पाणी सोडण्याची परवानगी देण्यात आली. हे पाणी सोडण्यात येत आहे. मात्र, गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने अपूर्ण व अर्धसत्य शपथपत्र सादर करून मराठवाड्यातील पाण्याची गरज कमी दर्शवली आहे. प्रशासनातील अधिकाऱ्यांनी राजकीय नेत्यांशी संगमनत करून मराठवाड्याच्या पाणी हक्कावर घाला घातला आहे, असा आरोप भाकप नेते राजन क्षीरसागर यांनी केला. या प्रकरणात दोषी असलेल्या अधिकाऱ्यावर कारवाई करा, अशी मागणी त्यांनी केली.जायकवाडी प्रकल्पाच्या उपलब्ध पाण्यातून परभणी विभाग क्रमांक दोनसाठी ४ पाणी पाळ्या तरतूद करा व पहिली पाणी पाळी तातडीने देण्यात यावी, गोदावरी नदीवरील बंधाऱ्यांच्या गरज; तसेच जायकवाडी व गोदावरी नदीवर अवलंबून असलेल्या पाणीपुरवठा योजनांची आवश्यकता योग्य प्रकारे न्यायालयीन शपथपत्रात नोंद केली नाही. त्या नुकसानीची जबाबदारी निश्चित करा, डिग्रस, मुळी, ढालेगाव या बंधाऱ्यासह झर्रा, तलान या ठिकाणी किमान ४० टक्के पाणीसाठा तातडीने उपलब्ध करण्यात यावा, पीक विमा योजनेतून १०० टक्के नुकसान भरपाई मिळावी, चारा छावण्या तसेच रोजगार हमी योजनेचे कामे सुरू करा आदी मागण्या आंदोलनकर्त्यांनी केल्या आहेत. या मागण्यांचे निवेदन पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आले. भाकप नेते डॉ. भालचंद्र कानगो, विलास गवळी, तुकाराम कानडे यांच्यासह कार्यकर्ते, शेतकरी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विवाहितेस ब्लॅकमेल करणाऱ्यास कोठडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शरीर संबध ठेवले नाही तर अश्लील फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड करण्याची धमकी २५ वर्षीय विवाहितेला देणाऱ्या रोमिओला सिडको पोलिसांनी अटक केली असून, त्याला बुधवारपर्यंत (नऊ डिसेंबर) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ए. व्ही. कस्तुरे यांनी सोमवारी दिले.

लोहगाव (जि. लोहगाव) येथे सासर असलेली विवाहिता शहरातील सिडकोत माहेरी आली असता, त्या विवाहितेच्या मोबाइलवर वेळोवेळी फोन करून शरीर संबंध का ठेवत नाही, माझ्यासोबत लग्न कर, नाही तर तुझे अश्लील फोटो व व्हिडिओ क्लिप पतीच्या मोबाइलवर आणि सोशल मीडियावर अपलोड करण्याची धमकी स्वामी विवेकानंद नगरातील कुणाल गणेश क्षीरसागर हा रोमिओ देत होता. त्याच्याविरूद्ध सिडको पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली असता, गुन्हा दाखल करण्यात येऊन त्याला पोलिस निरीक्षक निर्मला परदेशी यांनी रविवारी रात्री अटक केली. त्याला सोमवारी (सात डिसेंबर) प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ए. व्ही. कस्तुरे यांच्या कोर्टात हजर करण्यात आले असता, अॅड. डी. आर. काठुळे यांनी, आरोपीच्या ताब्यातून अश्लील फोटो व व्हिडिओ क्लिप जप्त करावयाची आहे, आरोपीच्या मित्राच्या पेनड्राईव्हमध्ये व लॅपटॉपमध्ये फोटो-क्लिप ठेवले असल्यामुळे पेनड्राईव्ह, लॅपटॉप जप्त करावयाचा बाकी आहे, त्यामुळे आरोपीला पोलिस कोठडी देण्यात यावी, अशी विनंती कोर्टात करण्यात आली असता, ही विनंती ग्राह्य धरून आरोपीला बुधवारपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश कोर्टाने दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पीडित विवाहितेला विकत घेतले

$
0
0

आरोपी अग्रवाल कुटुंबाची माहिती

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मिसारवाडी प्रकरणातील पीडित महिलेला एक लाख वीस हजार रुपयांत खरेदी केल्याची माहिती अटकेत असलेल्या अग्रवाल कुटुंबाने दिली आहे. दरम्यान, त्यांच्या घरच्या झडतीमध्ये काही बाँडपेपर पोलिसांनी जप्त केले आहेत. या खरेदी विक्री प्रकरणात कोण एजंट आहेत याचा तपास पोलिस करीत आहेत.

मिसारवाडी येथील १९ वर्षांच्या विवाहितेचा सासरच्या मंडळीनी छळ केल्याचा प्रकार गेल्या सोमवारी उघडकीस आला होता. या प्रकरणी पती संजय अग्रवाल, सासू आशा, दीर सागर व शरद व नणंद दीपा यांना अटक करण्यात आली आहे. पोलिस कोठडीत असलेल्या अग्रवाल कुटुंबीयांनी या तरुणीला एक लाख वीस हजार रुपयांत विकत घेतल्याची माहिती पोलिसांना तपासात दिली आहे. आरोपींना सोमवारी कोर्टात सादर करताना पोलिस कोठडीची मागणी करीत असताना तपास अधिकाऱ्यांनी हा मुद्दा मांडला आहे. या अनुषंगाने हा खरेदीविक्रीचा व्यवहार झाला असल्यास यामध्ये कोण एजंट आहेत याचा तपास पोलिस करीत आहेत. तसेच अग्रवाल यांच्या घरझडतीमध्ये संजयच्या लग्नाचा बाँड, पूर्वीच्या लग्नाचा घटस्फोट घेतलेला बाँड व करारनामा तसेच एक लॅपटॉप पोलिसांनी जप्त केला आहे. या लॅपटॉपचा कोड संजयला माहित असून तो सहकार्य करीत नसल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भूमाफिया टोळीतील दोघे अटकेत

$
0
0

औरंगाबाद: पहाडसिंगपुरा येथील जमिनीची बेकायदेशीर प्लॉटिंग करून विकणाऱ्या भूमाफियांच्या टोळीतील दोघांना रविवारी आर्थिक गुन्हेशाखेने अटक केली. हर्सूल कारागृहातून यांना हस्तांतरीत करून घेण्यात आले. २० ऑक्टोबर रोजी या प्रकरणी बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पहाडसिंगपुरा येथील रेणुकामातानगर व ताजमहल कॉलनी परिसरातील ग्रीन झोन जमिनीची बेकायदा प्लॉटिंग करून तिची विक्री करण्यात आली होती. शेख सलीम शेख सांडू या रहिवाशाने अब्दुल सलीम अब्दुल अजीम, अब्दुल रऊफ अब्दुल रहीम, अमजदखान मोहमदखान पठाण, मा‌धव माणिक सोनवणे, तत्कालीन मनपा इमारत निरीक्षक, अतिक्रमण हटाव पथकाचे अधिकारी, तत्कालीन तलाठी व मंडळ निरीक्षक यांच्याविरुद्ध फसवणूक, बनावट कागदपत्रे तयार करणे तसेच महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला होता. अब्दुल सलीम याला अटक करण्यात आली आहे. दुसरे आरोपी अब्दुल रऊफ अब्दुल रहीम व अमजदखान पठाण यांनी गुरुवारी कोर्टासमोर शरणागती पत्कारली. कोर्टाने त्यांची हर्सूल कारागृहात न्यायालयीन कोठडीत रवानगी केली होती. रविवारी आर्थिक गुन्हेशाखेने या दोन्ही आरोपींचे हस्तातंर करुन घेत त्यांना अटक केली.

एक दिवसाची कोठडी

सोमवारी आरोपींना कोर्टात हजर करण्यात आले असता एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. आरोपी अब्दुल रऊफच्या घरझडतीसाठी एक पथक सोमवारी दुपारी चिखलीला रवाना झाले आहे. पोलिस निरीक्षक मधुकर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक शामसुंदर कोठाळे, पीएसआय सुभाष खंडागळे आदींनी ह‌ी कारवाई केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images