Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

माती परीक्षण प्रयोगशाळा सुरू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, लातूर
शेतीच्या आरोग्यासाठी माती परीक्षण ही अत्यावश्यक बाब झाली आहे. माती परीक्षणाची अत्याधुनिक प्रयोगशाळा औसा तालुक्यातील लोदगा या ठिकाणी आरसीएफच्या साह्याने फिनिक्स फाऊंडेशनने सुरू केली. मराठवाड्यातील ही दुसरी प्रयोगशाळा आहे. या प्रयोगशाळेचे आरसीएफचे विपनन अधिकारी अशोक घसघसे यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी पांडुरंग पोले होते. यावेळी राष्ट्रीय केमीकल्स अॅँड फर्टिलायझर्सचे उपमहाव्यवस्थापक सुहास शेलार, जंयतीलाल राठोड, बिरेश्वर बॅनर्जी, गणेश वरगंटीकर, जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी दिनकर जगदाळे, विभागीय कृषी सहसंचालक ए. एच. किरनाळे, प्रतापसिंह कदम, मोहन भिसे, औशाच्या तहसीलदार अहिल्या गाठाळ यांची उपस्थिती होती.
माजी आमदार पाशा पटेल म्हणाले, 'शेती वाचविण्यासाठी जमिनीचा पोत सुधारणे, आवश्यक आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना मदत व्हावी म्हणून फिनिक्स फाऊंडेशनने पुढाकार घेतला. त्याला आरसीएफने साथ दिली आहे. या माती परिक्षण प्रयोगशाळेनंतर जमिनीतील सुक्ष्म द्रव्याची आणि शेतातील पाण्याची तपासणी करण्याची प्रयोग शाळा आरसीएफने मंजूर करावी. ग्रामदूत नियुक्त करून त्यांच्यामार्फत शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन माती घेऊन येतील, त्याचे परीक्षण केले जाईल, प्रयोगशाळेतील अहवाल त्या शेतकऱ्यांना दिला जाणार आहे.'
यावेळी बोलताना आरसीएफचे अशोक घसघसे यांनी कंपनीच्या विस्ताराची माहिती दिली. मराठवाड्यातील अत्याधुनिक अशी दुसरी प्रयोगशाळा असुन देशातील १९ वी प्रयोगशाळा असल्याचे त्यांनी सांगितले. या प्रयोगशाळेला शेतकरी कसा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


केंद्रीय दर्जाबाबतच्या प्रस्तावाचा मेळ लागेना

$
0
0

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने केंद्रीय दर्जा मिळावा यासाठीचा राज्यशासनाकडे प्रस्ताव पाठविलाच नसल्याचे राज्यशासनाने स्पष्ट केले. विधान परिषदेत हा प्रश्न उपस्थित झाल्यानंतर हा मुद्दा समोर आला आहे. शासनाकडे प्रस्ताव पाठविल्याचे पूर्वीच विद्यापीठ प्रशासनातर्फे जाहीर केले होते.

विद्यापीठाला केंद्रीय विद्यापीठाचा दर्जा मिळावा यासाठी विद्यापीठ प्रशासनाने अहवाल तयार केला. त्यासाठी विविध राज्यातील विद्यापीठांचे दौरे करण्यात आले. त्याबाबतचा प्रस्ताव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आला. याबाबत विधान परिषदेत ९३ अनव्ये आमदार सतीश चव्हाण यांनी सूचना मांडली असता, तसा प्रस्तावच शासनाला सादर करण्यात आला नसल्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सांगितले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्वापीठास केंद्रीय विद्यापीठाचा दर्जा दिल्यास मराठवाड्यातील शिक्षण क्षेत्राला बळकटी मिळेल, संशोधन वाढीस लागेल. त्यामुळे शासनाने सकारात्मक विचार करावा, असे चव्हाण यांनी मांडले. मागणीला उत्तर देताना तावडे यांनी तशा प्रकारचा प्रस्ताव सादर करण्यात आला नसून विद्यार्थ्यांची दिशाभूल केली जात असल्याचा आरोप चव्हाण केला आहे.

नोव्हेंबरमध्ये दिला प्रस्ताव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी प्रस्ताव सादर केला होता. दोनशे पानांचा हा प्रस्ताव सादर करताना विधानसभेचे सभापती हरीभाऊ बागडे यांच्या उपस्थित चर्चा झाल्याचे विद्यापीठ प्रशासनाकडून सांगण्यात आले. त्याचवेळी शिक्षणमंत्री यांनी तसा प्रस्ताव सादर केला नसल्याचे सांगितल्याचे सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तपासाचे आव्हान कायम

$
0
0



Vijay.Deulgaonkar@timesgroup.com

एन-९ परिसरातील डॉ. चित्रा डकरे यांच्या खुनाला १६ दिवस उलटले आहेत. पोलिस अद्यापही तपासामध्ये फारसे यशस्वी झाले नाही. तीन वर्षापूर्वी झालेल्या श्रुती भागवतच्या खुनाप्रमाणेच हा खून देखील अनाकलनीय ठरणार का, हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. घटनास्थळी वाढलेल्या नाहक गर्दीमुळे पुरावे नष्ट झाल्याची भिती देखील व्यक्त करण्यात येत आहे.

बु धवार दोन डिसेंबर रोजी एन-९ परिसरातील विमलज्योती गृहनिर्माण संस्थेच्या दुसऱ्या मजल्यावरील डॉ. चित्रा डकरे यांचा मारेकऱ्यांनी निर्घृण खून केला. त्या एकट्या असताना त्यांचे हात बांधून गळा चिरण्यात आला. गॅलरीच्या दरवाज्याने मारेकरी पसार झाला. शहर पोलिस दल या घटनेमुळे हादरून गेले. युद्धपातळीवर आरोपीचा शोध सुरू झाला. या घटनेला १६ दिवस उलटले, मात्र पोलिसांच्या हाती काहीही लागलेले नाही. पोलिस आयुक्तांनी या घटनेतील माहिती सांगणाऱ्यासाठी एक लाखाचे बक्षिसही जाहीर केले. माहिती देणाऱ्याचे नावही गोपनीय ठेवले जाणार आहे, मात्र लाखाच्या बक्षिसाचा मोह अद्याप तरी कोणाला झालेला नाही. पोलिसांकडे जादुची कांडी नाही, हे मान्य असले तरीही दिवसाढवळ्या घडलेल्या या खुनाच्या तपासाबाबत सर्वसामान्यांना शंका येणे साहजिकच आहे.

डॉ. चित्रा डकरे यांच्या खुनामुळे उल्कानगरीतील श्रुती भागवत यांच्या खुनाची आठवण ताजी झाली. श्रीनाथ अपार्टमेंटमध्ये एकट्या राहत असलेल्या श्रुती भागवत यांचा देखील खून करून मृतदेह घराच्या गॅलरीत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. दोन्ही घटना समान आहेत. अपार्टमेंटमध्ये एकट्या असलेल्या महिलांसोबत हे प्रकार घडले आहेत. तीन वर्षे उलटली तरी श्रुती भागवत यांच्या मारेकऱ्याचा शोध घेण्यास पोलिसांना यश आलेले नाही. तत्कालीन पोलिस आयुक्त संजयकुमार यांनी देखील त्यावेळी युद्धपातळीवर तपास यंत्रणा राबवली होती, मात्र काहीही यश पोलिसांना प्राप्त झाले नव्हते. डॉ. डकरे यांचा खुनाचा तपास देखील त्याच मार्गाने पुढे सरकत असल्याचे चित्र जाणवत आहे. यामध्ये दोष फक्त पोलिसांचा आहे, असेही नाही. त्यांना देखील जनतेच्या सहकार्याची गरज आहे, मात्र परिसरातील नागरिकांनीच जर असहकार्याची भूमिका घेतली असेल तर त्याला पोलिसांचा नाईलाज आहे. दुसरीकडे ही बाब विचारात घेणे गरजेचे आहे. श्रुती भागवत खून प्रकरणात चौकशी दरम्यान अनेकांची हरार्समेंट पोलिसांनी केल्याचे समोर आले होते. नागरिक या प्रकाराला वैतागले होते. पोलिसांचा हा त्रास आपल्याला होऊ शकतो अशी भिती एन-९ परिसरातील नागरिकांना वाटण्याची शक्यता नाकारता येत नाही. या दोन्ही खून प्रकरणातील एका समान बाब म्हणजे घटनास्थळीचे पुरावे नष्ट होण्याची भिती. घटनास्थळी एखादा लहान धागा देखील मारेकऱ्यांपर्यंत पोहोचवू शकतो, मात्र तोच जर सुरुवातीला नष्ट झाला असेल तर पुढे तपासात अडचण येऊ शकते. डॉ. डकरे यांच्या खून प्रकरणात पोलिसांच्या पहिलेच अनेक नागरिकांनी घटनास्थळाला भेट दिली होती. यामध्ये डॉ. डकरे यांच्या नातेवाईकांचा देखील समावेश होता. अशा ‌ठिकाणी वाढलेली वर्दळ ही नक्कीच तपासासाठी धोकादायक होती. श्रुती भागवत प्रकरणात देखील तत्कालीन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मोठा फौजफाटा व फोटोग्राफरसह घटनास्थळी गर्दी केली होती. तेथील वस्तू हाताळल्यामुळे अनेक पुरावे नष्ट झाल्याची भिती त्यावेळी एका वरिष्ठ अधिकाऱ्याने व्यक्त केली होती. तीच भिती या प्रकरणातही व्यक्त होत आहे. पोलिसांच्या तपासाच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढण्याचा हेतू नाही. त्यांचे प्रयत्न देखील प्रामाणिकपणे सुरू आहेत, मात्र खबऱ्यांचे नेटवर्क पोलिसांचे कोलमडले का हा देखील प्रश्न या निमित्ताने समोर आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डॉ. कुलकर्णी यांच्या नियुक्तीचा चेंडू पालिका व शासनाच्या कोर्टात

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी,औरंगाबाद

आरोग्य वैद्यकीय अधिकारीपदी शासनाकडून प्रतिनियुक्तीवर आलेले डॉ. सुहास जगताप रुजू होताच रजेवर गेलेल्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. जयश्री कुलकर्णी यांनी मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली होती. कोर्टाने डॉ. कुलकर्णी यांना दिलासा देण्यात आला नाही. त्यांच्या नियुक्तीवर महापालिका व राज्य शासन यांनीच निर्णय घेण्याचे आदेश न्या. संभाजी शिंदे व न्या. पी. आर. बोरा यांनी दिले.

डॉ. कुलकर्णी यांनी डॉ. जगताप यांच्या नियुक्तीला आव्हान दिले होते. पालिकेतील आरोग्य वैद्यकीय अधिकारी हे पद बदलीसाठीचे नाही. सार्वजनिक आरोग्य खात्यातून करण्यात आलेली थेट नियुक्ती बेकायदा असल्याचा दावा याचिकेत करण्यात आला आहे. या पदासाठी आवश्यक असलेली पात्रता डॉ. जगताप यांच्याकडे नाही, या वैधानिक पदासाठी सार्वजनिक आरोग्याचा डिप्लोमा आवश्यक आहे. राज्य शासनाने जगताप यांची नियुक्ती करताना प्रक्रियेचा अवलंब केला नाही. विशेष म्हणजे डॉ. कुलकर्णी यांची नियुक्ती राज्य शासनानेच २४ जून २०१५ रोजी कायम केली आहे, असे याचिकेत म्हटले होते. याप्रकरणात पालिकेतील १७ वैद्यकीय अधिकारी व १४ कर्मचाऱ्यांनी दिवाणी अर्ज केला. डॉ. कुलकर्णी यांना पालिकेच्या सर्वसाधारण सभेत सक्तीच्या रजेवर जाण्याचा निर्णय तत्कालीन आयुक्त प्रकाश महाजन यांनी घेतला होता. त्या मानसिक छळ करतात, असा आक्षेप याचिकेत घेण्यात आला होता. या कर्मचाऱ्यांनी डॉ. कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली काम करण्यास स्पष्ट नकार दिला होता. डॉ. कुलकर्णी यांची बाजू अजय देशपांडे यांनी मांडली. वैद्यकीय अधिकारी यांच्यातर्फे व्ही. डी. साळुंके, राज्य शासनातर्फे सुनील काळदाते, तर डॉ. जगताप यांच्या वतीने सिद्धेश्वर ठोंबरे यांनी काम पाहिले.

रोगराईचे थैमान सुरूच, घोळ पालिकेचा

गेल्या काही महिन्यात शहरात डेंगी, मलेरिया, चिकनगुनिया, स्वाईन फ्लू या आजारांनी डोके वर काढले. आजही तीच परिस्थिती आहे, असे मत कोर्टाने व्यक्त केले. आरोग्य वैद्यकीय अधिकारी व त्यांच्या सहकाऱ्यांमध्ये वाद असताना सार्वजनिक आरोग्याची वाताहत होईल. वैयक्तिक नियुक्तीपेक्षा सार्वजनिक आरोग्याला प्राधान्य देणे आवश्यक आहे. पालिकेचे प्रशासकीय प्रमुख व आयुक्त यांचा याचिकाकर्त्याच्या कार्यपद्धतीवर विश्वास राहिलेला नाही हे शपथपत्रात नमूद करण्यात आले आहे. यात कोणाची चूक आहे हे पाहण्याची ही वेळ नाही. हा सारा घोळ पालिकेनेच घातला आहे, असा ठपका ठेऊन या वादावर तोडगा काढण्याचे काम पालिका व राज्य शासनाचेच आहे, असे कोर्टाने आपल्या ४७ पानी निकालात म्हटले आहे. याचिकाकर्त्या आपल्या सहकाऱ्यांकडून काम घेऊ शकत नाही, त्यामुळे अशा परिस्थितीत डॉ. कुलकर्णी यांच्या बाजूने निर्णय देणे जोखमीचे ठरेल, असे मतही कोर्टाने नोंदविले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुष्काळ मुक्तीसाठी पंचसूत्रीची घोषणा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, उस्मानाबाद
दुष्काळाचा मुकाबला करण्यासाठी उस्मानाबाद जिल्हा प्रशासन पाणीटंचाई आणि चारा टंचाईवर मात, हाताला काम, अन्नसुरक्षा आणि जलयुक्त शिवार अभियान अशा पंचसूत्रीच्या माध्यमातून काम करीत आहे. या दुष्काळ मुक्तीसाठी जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून घोषणापत्र तयार करण्यात आले असून, त्यांच्या अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी सर्व यंत्रणेला सूचना केल्या आहेत.
दुष्काळ ही नैसर्गिक आपत्ती आहे. त्यामुळे या आपत्तीचा सर्वांनी मिळून सामना करणे गरजेचे आहे. गावपातळीपासून ते जिल्हा पातळीपर्यंत विविध विभागांची यंत्रणा दुष्काळाशी मुकाबला करीत आहे. तसेच शेतकरी व सर्वसामान्य वर्गासाठी झटत आहे. आपण करीत असलेले हे काम त्यांच्यापर्यंत पोहोचवा. त्यांच्याशी थेट संवाद साधा, असे आवाहन यानिमित्ताने बोलताना जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी सर्व संबंधित यंत्रणेच्या अधिकाऱ्यांना केले.
शासन जनतेच्या पाठीशी आहे. हे आपल्या कृतीतून दाखवून द्या, विविध विभागांमार्फत अत्यंत चांगल्या पद्धतीने काम होत आहे. शासकीय योजनांचा लाभ घेवून प्रतिकूल परिस्थितीशी सामना करणारी अनेक उदाहरणे आहेत. त्यांचे अनुभव या लोकांपर्यंत घेवून जा, अशी सूचनाही नारनवरे यांनी केली.
शासन यंत्रणांनी केलेले काम लोकांपर्यंत पोहोचले पाहिले, त्यासाठी सकारात्मक पद्धतीने काम करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व यंत्रणेच्या अधिकाऱ्यांना दिल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणी द्या, अन्यथा पाणीबंद

$
0
0

'हर्सूल'मधील पाणीउपसा रोखण्याचा चेतनानगर, राजनगरमधील महिलांचा इशारा

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

चेतनानगर-राजनगर वॉर्डातील सुमारे वीस वसाहतींना पाणीपुरवठा करा, अन्यथा हर्सूल तलावातील पाणी उपसा करू देणार नाही, येथील पंपहाउस बंद पाडला जाईल, असा इशारा नगरसेविका ज्योती अभंग यांच्यासह वॉर्डातील महिलांनी दिला आहे. या महिलांनी गुरुवारी हर्सूल तलावावर आंदोलन केले.

चेतनानगर-राजनगर हा वॉर्ड गुंठेवारीमध्ये येतो. या वॉर्डात चेतनानगर, म्हाडा कॉलनी, राजनगर, सारावैभव, अंबरहिल्स, बशीरनगर, हरिओमनगर, हरसिद्धीनगर, हितोपदेश सोसायटी आदी वसाहती आहेत. या वसाहतींमधील घरांना नळकनेक्शन देण्यात आलेले नाही. त्यामुळे नागरिकांना बोअरचे पाणी वापरावे लागते. महापालिकेकडे पाणीपुरवठ्याची व्यवस्था होती तेव्हा टँकर्सने पाणीपुरवठा केला जात होता. औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीकडे पाणीपुरवठ्याचे हस्तांतर झाल्यानंतर या वसाहतींचे टँकर बंद करण्यात आले आहेत.

वारंवार मागणी करूनही टँकर सुरू होत नसल्याने गुरुवारी नगरसेविका ज्योती अभंग यांच्या नेतृत्वाखाली वॉर्डातील महिला हर्सूल तलावावर एकत्र आल्या. हर्सूल तलाव राजनगर-चेतनानगर वॉर्डातच आहे. या तलावातून जुन्या शहरातील सुमारे २६ वॉर्डांना पाणीपुरवठा केला जातो. वॉर्डात तलाव असूनही वॉर्डातील वसाहतींना पाणीपुरवठा होत नसल्याने महिलांनी संताप व्यक्त केला. वॉर्डात पाणीपुरवठा करा, अन्यथा हर्सूल तलावातून पाणी उपसा करू देणार नाही, महापालिकेचे पंपहाउस व फिल्टर बंद करण्याचा इशारा देण्यात आला आहे. या संदर्भात महापालिका आयुक्तांनाही निवेदन दिल्याचे त्यांनी नगरसेविका अभंग यांनी स्पष्ट केले.

औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीने वॉर्डातील सर्व वसाहतींमध्ये जलवाहिनी टाकावी, जलवाहिनी टाकेपर्यंत टँकरने पाणीपुरवठा करावा. ही दोन्ही कामे होत नसतील तर, हर्सूल तलावाचे पाणी रोखून धरणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

आमच्या वॉर्डात तलाव असूनही त्याचा नागरिकांना काहीच उपयोग होत नाही. 'धरण उशाला व कोरड घशाला' अशी आमची अवस्था आहे. त्यामुळे महिलांनी निर्वाणीचा इशारा दिला आहे.

- ज्योती अभंग, नगरसेविका

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विवाहितेला छळणाऱ्या नवऱ्यास सक्तमजुरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नांदेड

पत्नीला एक लाख रुपये माहेरहून आणण्यासाठी त्रास देणाऱ्या पतीला येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी महेंद्र सोरते यांनी सहा महिने सक्तमजुरी आणि एक हजार रुपये रोख दंड अशी शिक्षा ठोठावली .

आंबेडकर नगर येथील छाया अशोक मोगले या ३१ मे २०११ रोजी सरकारी दवाखान्यात उपचार घेण्यासाठी आल्‍या होत्या. यावेळी त्यांनी पोलिसांना जवाब दिला होता. त्यांचे घर आंबेडकर नगर येथे आहे. त्यांचे लग्न अशोक शंकरराव मोगले यांच्या सोबत ६ मार्च २००५ रोजी झाले होते. एक वर्ष संसार चांगला चालला आणि पुढे सन २००६ मध्ये त्यांना मुलगी झाली. त्यानंतर त्रास सुरू झाला. माहेरच्या मंडळीने छाया यांना माहेरातून एक लाख रुपये आणावेत, यासाठी नेहमीच छळले. ३१ मे २०११ रोजी छायाचा नवरा घरी अल्यानंतर तिला मारहाण करून घरातून हाकलून दिले. मारहाणीनंतर त्या सरकारी दवाखान्यात उपचार घेण्यासाठी आल्या होत्या.

छायाने दिलेल्या जबाबानुसार शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिस हवालदार एस डी. धात्रक यांनी पूर्ण तपास करून शिवाजी शंकरराव मोगले (वय ३२) आणि त्याची आई सारजाबाई शंकरराव मोगले (वय ५२) या दोघांविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.न्यायालयात या खटल्यात सहा साक्षीदार तपासण्यात आले. उपलब्ध पुरावा आधारे न्या. महेंद्र सोरते यांनी छायाला मारहाण करण्यासाठी तिचा नवरा अशोक मोगले यांना दोषी मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिक्षक मतदारांमध्ये दहा हजारांची वाढ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मराठवाडा शिक्षक मतदारसंघासाठी राबविण्यात आलैल्या मतदार यादी पुनर्निरीक्षण कार्यक्रमात १० हजार मतदारांची वाढ होऊन मतदारांची संख्या ६१ हजार ६३ झाली आहे. हा कार्यक्रम १ ऑगस्ट ते १६ नोव्हेंबर दरम्यान राबवण्यात आला. मतदारांची नोंदणी, वगळणी तसेच दुरुस्ती करण्यात आली. या मोहिमेत १० हजार ७९१ मतदारांनी नोंदणी केली असून ७९६ मतदार वगळण्यात आले आहेत. १ ऑक्टोबरपर्यंतच्या मतदारयादीनुसार मराठवाड्यात ४३ हजार ३८६ पुरूष व ८ हजार २४२ स्त्री असे एकूण ५१ हजार ६२८, अशी मतदारांची संख्या होती. संक्षिप्त पुनर्निरीक्षण कार्यक्रमानंतर १४ डिसेंबर २०१५ रोजी अंतिम मतदारयादी प्रसिद्ध करण्यात आली. यानुसार पुरूष मतदारांची संख्या ५१ हजार ९३ पुरूष तर, १० हजार ५३० स्त्री मतदारांची संख्या आहे.

जिल्हा समाविष्ट एकूण

 औरंगाबाद ३१२७ १२३३०

 जालना ६२७ ४३१०

 परभणी ७३६ ४७१०

 हिंगोली ३०२ २४३५

 नांदेड १२११ ९६०८

 बीड १३४३ १०६२२

 लातूर २०६० ११३३१

 उस्मानाबाद १३८५ ६२७७

एकूण १०७९१ ६१६२३

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दोषींवर कारवाई करा

$
0
0

रोहयो विहीर घोटाळा; विभागीय आयुक्तांचे झेडपी सीईओंना आदेश

म. टा. प्रतिनिधी, पैठण

महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या विहीर घोटाळ्याची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, या कारवाईचा अहवाल सादर करण्याचे आदेश विभागीय आयुक्तांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिले आहे.

योजनेतील विहीर वाटपात गैरव्यवहार झाल्याचा आरोप झाल्यानंतर जिल्हा परिषदेचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी डी. ई चाटे यांनी चौकशी केली. या चौकशीत पैठण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी उल्हास सोमवंशी यांनी त्यांच्या जवाब देताना तत्कालीन आमदार संजय वाघचौरे, तत्कालीन सभापती विलास भुमरे, तत्कालीन जिल्हा परिषद सभापती सुनील शिंदे, तत्कालीन जिल्हा परिषद सभापती रामनाथ चोरमले व विद्यमान आमदार संदीपान भुमरे यांच्या दबावात येवून बेकायदेशीर विहिरी मंजूर केल्याचा जवाब दिला. गटविकास अधिकारी यांनी बेकायदा विहीर मंजूर केल्याने तालुक्यातील पात्र लाभार्थी या योजनेपासून वंचित राहिल्याचा आरोप करत गटविकास अधिकारी उल्हास सोमवंशी यांच्यावर कार्यवाही करण्याची मागणी पंचायत समिती सदस्या प्रज्ञा कुलकर्णी यांनी विभागीय आयुक्तांकडे केली होती. पंचायत समिती सदस्या प्रज्ञा कुलकर्णी यांच्या निवेदनाची दखल घेत, विभागीय आयुक्तांनी या प्रकरणाची चौकशी करून दोषीच्या विरोधात कारवाई करून अहवाल देण्याचे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिले आहेत.

उपोषण करणार

विहीर घोटाळ्यातील अधिकारी, कर्मचारी व राजकीय पुढारी यांच्यावर कार्यवाही करण्याची मागणी पंचायत समिती सदस्या प्रज्ञा कुलकर्णी यांनी लावून धरली आहे. पुढील आठवड्यात जिल्हाधिकारी कार्यालासामोत उपोषण करणार असल्याची माहिती कुलकर्णी यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाण्यासाठी घेतले सरपंचाने विष

$
0
0

औरंगाबाद : वारंवार विनंतीअर्ज करूनही पाण्याचा टॅँकर न दिल्याने एका सरपंचाने गटविकास अधिकाऱ्यांच्या दालनासमोरच विषारी औषध प्राशन केल्याची खळबळजनक घटना गुरुवारी दुपारी गंगापूर येथे घडली. विक्रम राऊत (वय २७, रा. देहगाव बंगला), असे सरपंचाचे नाव असून त्यांच्यावर घाटीत उपचार सुरू आहेत.

दहेगाव बंगला, मुरुमी व सांरगपूर या तीन गावाची ग्रुपग्रामपंचायत असून या गावांना टेंभापुरी प्रकल्पातून पाणीपुरवठा केला जातो. परंतु, दुष्काळी परिस्थितीमुळे प्रकल्पात पाणीसाठा नसल्याने या गावाना टॅकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात यावा, यासाठी सरपंच विक्रम राऊत गेल्या काही दिवसांपासून प्रयत्नशील होते. तसा प्रस्ताव त्यांनी गंगापूर पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांनाकडेही दोन महिन्यांपूर्वी सादर केला होता. पण, वारंवार पाठपुरावा करूनही पाणी मिळत नसल्याने ते त्रस्त झाले होते. या प्रश्नावर गटविकास अधिकाऱ्यांची भेट घेण्यासाठी ते गुरुवारी दुपारी कार्यकर्त्यांसह गंगापूर येथील कार्यालयात गेले. पण, अधिकारी उपलब्ध नव्हते. त्यावेळी पाणीपुरवठा झाल्याशिवाय गावात जाणार नाही, असे म्हणत कोणाला काही कळण्याच्या आत विषारी औषध घेतले. हे लक्षात येताच त्यांना तत्काळ गंगापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार झाल्यानंतर घाटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून प्रकृती स्थिर असल्याचे त्याचे मित्र तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर निळ यांनी सांगितले.

शनिवारी मोर्चा

ग्रामस्थांना पाणी मिळावे, म्हणून सरपंचाना खेट्या मारव्या लागतात. विष प्यावे लागते. तरीही प्रशासन हालचाल करत नाही, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष नेते डॉ. ज्ञानेश्वर निळ यांनी केला. याप्रश्नी येत्या शनिवारी गंगापूरमध्ये निषेध मोर्चा काढण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विजेच्या १९९ खांबांनी रस्ते गिळले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महापालिकेचे ढिसाळ नियोजन, जुजबी कारवाईमुळे 'स्मार्ट सिटी'कडे होणारी वाटचाल शहराची वाटचाल विद्रुपीकरणाकडे सुरू आहे. गजानन मंदिर चौक ते जयभवानीनगर चौकापर्यंतच्या रस्त्यावर १३५ वीजेचे खांब, तर जयभवानी चौक ते मुकुंदवाडी स्टेशनपर्यंतच्या भर रस्त्यात वीजेचे ६४ खांब आहेत. या दोन्ही रस्त्यांवरील १९९ खांबांमुळे वाहतूक कोंडी आणि किरकोळ अपघातांच्या घटना वाढल्या आहेत.

तत्कालीन महापालिका आयुक्त प्रकाश महाजन, पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांच्या पुढाकाराने मुकुंदवाडीत रस्त्यावर अतिक्रमण केलेल्या बांधकामांची पाडापाडी करण्यात आली. त्यामुळे रस्ता मोठा झाला. मात्र, रस्त्याच्या एकदम कडेला असणारे वीजेचे खांब आता रस्त्याच्या मध्यभागी आलेत. त्यामुळे किरकोळ अपघात, वाहतुकीची कोंडी आणि या खांबापासून सुरू होणारी पार्किंग शहराच्या विद्रुपीकरणात भर घालत आहे. हे खांब आत्ताच नाही हटवले, तर आगामी काळात पुन्हा या रस्त्यावर खांबापर्यंत अतिक्रमण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. गजानन महाराज मंदिर चौक ते पुंडलिकनगर हा रस्ता सर्वात जास्त रहदारीचा. सिडकोतून साताऱ्यात याच मार्गे जावे लागते. याच मार्गावर एलपीजी रिक्षांची वाहतूक सुरू असते. या रस्त्यावर ठिकठिकाणी वीजेचे खांब आहेत. या खांबाच्या आड दुचाकी, चारचाकी वाहनांची पार्किंग केलेली आढळते. अनेकांनी आपल्या हातगाड्या इथे थाटल्या आहेत. दुकानदारांनी आपले सामान खांबापर्यंत रस्त्यावर ठेवले आहे. त्यामुळे हा रस्ताही आपसुक अरुंद झाला आहे. हे खांब तातडीने हटवले नाही तर आगामी काळात या भागात वाहतूक कोंडी तीव्र होऊ शकते. किरकोळ अपघातांच्या घटना सुरूच आहेत. याकडे महापालिका कधी लक्ष देणार, असा प्रश्न परिसरातले नागरिक करत आहेत.

पालिका प्रशासन झोपेत

महापालिका प्रशासनाने उशिरा का होईना, मुकुंदवाडी स्टेशनपर्यंतचे अतिक्रमण पाडले. यामुळे रस्ते मोकळे झाले. मात्र, आता भर रस्त्यावर आलेले वीजेचे खांब पालिकेला दिसत नाहीत. शहराचे विद्रुपीकरण स्मार्ट पालिका कधी रोखणार, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक विचारत आहेत.

जयभवानी नगरात लोकांनी केलेले अतिक्रमण पाडले. मात्र, रस्त्यावर आलेले खांब हटवले नाहीत. त्यामुळे वाहतूक कोंडी होते. अपघाताची शक्यता वाढली आहे. हे खांब तातडीने काढावेत.

- ताराचंद गायकवाड

पुंडलिकनगर ते हनुमान चौकातपर्यंत रस्त्यावर वीजेचे खांब आहेत. या अतिक्रमणामुळे वाहतुकीस अडथळा होतो. किरकोळ अपघात वाढले आहेत. महापालिकेने तत्काळ हे खांब हटवावेत.

- वसंत सोनार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालिकेत महिलांची मुस्कटदाबी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महापालिका सभागृहात ५० टक्के महिला नगरसेवक असताना त्यांना त्यांच्या वॉर्डातल्या समस्या मांडण्यासाठी संधी दिली जात नाही. त्यामुळे त्यांची कुचंबना होते. या संदर्भात वैयक्तिक लक्ष घालून योग्य कार्यवाही करावी, अशी तक्रारवजा मागणी शिवसेनेच्या क्रांतिचौक वॉर्डाच्या नगरसेवक शिल्पाराणी वाडकर यांनी सभागृहनेते राजेंद्र जंजाळ यांच्याकडे केली.

महापालिका सभागृहात ११३ नगरसेवक निवडून आले आहेत. त्यापैकी ५६ पुरूष तर, ५७ महिला आहेत. पालिकेच्या सभागृहात महिलांचे स्थान ५० टक्के पेक्षा जास्त आहे. त्यामुळे त्यांना त्याच प्रमाणात चर्चेत सहभागी करून घेणे अपेक्षित आहे, पण असे होताना दिसत नाही. साफसफाई, पाणीपुरवठा, खुल्या जागांचा विकास, रस्त्याची दुरुस्ती अशा विषयांवर महिला प्रश्न मांडतात. मात्र, त्यांना त्यासाठी संधी दिली जात नाही. पुरुष नगरसेवक पाणीपुरवठा, साफसफाईच्या प्रश्नांना दुय्यम स्थान देत नगररचना विभागाशी संबंधित विषयांना चर्चेच्या वेळी प्राधान्य देतात. विविध कामात झालेले घोटाळे चर्चेच्या माध्यमातून चव्हाट्यावर आणण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. त्यातून कारवाई काय होते, हा भाग दुय्यम असला तरी त्यावर चर्चा मात्र तासनतास केली जाते. त्यामुळे महिलांना त्यांच्या वॉर्डातील समस्या सर्वसाधारण सभेत मांडताना संघर्षच करावा लागतो. क्रांतिचौक वॉर्डाच्या नगरसेविका शिल्पाराणी वाडकर यांनी सभागृहनेत्यांच्या कार्यालयात पत्रच दिले. त्याच त्यांनी म्हटले आहे की, 'शासनाने सर्वच ठिकाणी महिलांना समान स्थान देण्यासाठी ५० टक्के आरक्षण दिले आहे. महापालिकेतदेखील पन्नास टक्के महिला नगरसेवक म्हणून निवडून आल्या आहेत. त्यांना आपल्या वॉर्डातील समस्या सर्वसाधारण सभेत मांडण्याचा व प्रशासनाला जाब विचारण्याचा पूर्ण हक्क आहे, पण त्यांना सर्वसाधारण सभेत तशी संधी मिळत नाही. त्यामुळे त्यांची कुचंबना होते. या प्रकरणात आपण वैयक्तिक लक्ष घालून योग्य ती कार्यवाही करावी,' अशी मागणी वाडकर यांनी केली आहे.

सर्वसाधारण सभेत सर्वच नगरसेवकांना त्यांच्या वॉर्डातील प्रश्न मांडण्याचे स्वातंत्र्य असले तरी कुणाचीही मुद्दाम मुस्कटदाबी केली जात नाही. महिलांनाही त्यांच्या वॉर्डातील प्रश्न मांडण्याचे स्वातंत्र आहे. त्यांना बोलू न देण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही.

- राजेंद्र जंजाळ, सभागृहनेता, महापालिका

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गुणवत्तेने उघडला उद्योगाचा राजमार्ग!

$
0
0

Sudhir.Bhalerao@timesgroup.com

उद्योग क्षेत्रात पाऊल टाकायचे म्हटल्यास वाळूज औद्योगिक वसाहतच नजरेसमोर येते. आर्थिक अडचणी असल्या तरी स्वतःचा उद्योग सुरू करायचा या जिद्दीने प्रशांत पिंगळे यांनी पैठण औद्योगिक वसाहतीत आपले नशीब अजमावण्याचे ठरवले. अनेक वर्षे दुचाकी तर कधी बसमधून प्रवास करीत त्यांनी उद्योगाला नावारुपास आणले. अथक मेहनतीच्या बळावर त्यांनी उदयोग क्षेत्रातील संघर्षाची वाटचाल सुकर बनवली. त्यांचा संघर्ष हा नवउद्योजकांसाठी प्रेरणादायक ठरणारा आहे.

पिंगळे मुळचे अंमळनेरचे. नोकरीनिमित्त नटवर पिंगळे औरंगाबादला आले. जीवन प्राधिकरण खात्यातून वरिष्ठ लिपिक म्हणून ते सेवानिवृत्त झाले. प्रशांत पिंगळे यांचे बारावीपर्यंतचे शिक्षण औरंगाबादेतच झाले. इंजिनीअरिंगचे शिक्षण त्यांनी धुळे येथे घेतले. बी. ई. इलेक्ट्रॉनिक्सची पदवी संपादन केल्यानंतर उद्योग क्षेत्र त्यांना खुणावू लागले. मात्र, उदयोग क्षेत्राचा अनुभव घेण्यासाठी त्यांनी देसरडा ग्रुपमध्ये पाच वर्षे नोकरी केली. या कालावधीत उद्योगाच्यादृष्टीने सर्व कामांचा अनुभव घेतला.

२००२ मध्ये उद्योग क्षेत्रात त्यांनी तीन भागीदारांसह उडी मारण्याचे धाडस केले. पैठण औद्योगिक वसाहतीत बंद पडलेल्या एका कंपनीची जागा लिलावात विकत घेतली. एमएसएफसीकडून लिलावात जागा घेतल्यानंतर वर्षभर त्यांना अनेक किचकट प्रश्नांचा सामना करावा लागला. नाउमेद न होता त्यांनी या सर्व प्रश्नांचा सामना करून उद्योगाला आकार देण्यासाठी स्वतःला झोकून दिले. श्रीनाथ अॅलाइज अँड इंजिनीअरिंग कंपनीत प्रशांत पिंगळे यांच्यासह आणखी तीन भागीदार होते. २००५ पर्यंत त्यांनी भागिदारीत उद्योगाचे काम केले. त्यानंतर प्रशांत पिंगळे यांनी गॅलेक्सी इंजिनीअरिंग कंपनीची स्थापना केली. पैठण औद्योगिक वसाहतीतच त्यांनी आपल्या नव्या कंपनीची सुरुवात केली. अंजता फार्मा, एन्क्रोव्होर, हिंदुस्तान कॉमोसाइट्स, पेप्सको या कंपन्यांचे 'जॉब वर्क' करण्याची संधी मिळाली. पेप्सिको कंपनीतील मशिनरी या प्रामुख्याने विदेशातील आहेत. या मशिनरींचे मेटेंनन्स करणे एक आव्हानच आहे. या जर्मनी, चीन, तैवान, फ्रान्स या देशांमधील मशिनरी असल्याने नेहमी स्पेअरपार्टसचा तुटवडा जाणवायचा. त्यामुळे पेप्सिको कंपनीने प्रशांत इंगळे यांच्या गॅलेक्सी इंजिनीअरिंग कंपनीला स्पेअरपार्टस बनवण्याचे सांगितले. पहिली ऑर्डर त्यांनी ४८ हजार रुपयांच्या एका पार्टसची दिली. फिलिंग मशीनचा वॉल त्यांनी बनवून दिला. वॉलचे काम अप्रतिम झाले आणि तेथून त्यांच्या उद्योगाच्या भरभराटीला प्रारंभ झाला. सद्यस्थितीत गॅलेक्सी कंपनीत पेप्सिकोसाठी जवळपास पाचशेच्यावर स्पेअरपार्टस बनवले जातात. भरुच, रोहा, पानिपत, हैदराबाद, बंगळुरु येथे पेप्सिको कंपनीचे प्लँट आहेत. या कंपन्यांकडूनही स्पेअरपार्टसची मागणी वाढली. स्पेअरपार्टसचे काम वाढल्यानंतर जॉब वर्कचे काम आपोआपच कमी होत गेले. स्पेअरपार्टसचा दर्जा हा आंतरराष्ट्रीय दर्जाचा असल्याने सँपल अथवा डिझाइनवरून ते नवे पार्टस बनवत आहेत. या कामात त्यांनी हुकुमत निर्माण केली. साहजिकच त्यांच्या कामाचा व्याप वाढत गेला.

जॉब वर्कवरून स्पेअरपार्टसची निर्मितीपर्यंतचा त्यांचा प्रवास खडतरच होता. पेप्सिको कंपनीच्या कामांमुळे त्यांच्या कंपनीचा आलेख उंचावत गेला. तीन कॅडबरी बनवणाऱ्या कंपन्यांचेही काम त्यांच्याकडे आले. चॉकलेट बनवणाऱ्या कंपन्यांसाठी टँक बनवून देणे, पाइप लाइन्स टाकणे, फ्रॅबिकेशन्सची अनेक कामे ते सध्या करत आहेत. हैदराबाद, विशाखापट्टणम येथील युनायटेड ब्रेव्हरीज कंपनीसाठीही ते पार्टस बनवतात. या कंपनीसाठीही त्यांनी आत्तापर्यंत ३०-४० स्पेअरपार्टसची निर्मिती केली आहे. तीन प्रमुख कंपन्यांना ते नियमित सेवा देत असल्याने उत्पादनाचा दर्जा आणि २४ तास सेवा यावर त्यांचा कटाक्ष असतो.

१ लाख ३० हजार रुपयांच्या गुंतवणुकीतून उद्योग क्षेत्रात पाऊल टाकले होते. त्यानंतर गॅलेक्सी इंजिनीअरिंगची सुरुवात करताना आठ आधुनिक लेथ, वेल्डिंग मशीन घेऊन त्यांनी नव-नवीन उत्पादन निर्मितीचे आव्हान स्वीकारले. वयाच्या २९ व्या वर्षी उद्योजक बनण्याचे स्वप्न त्यांनी प्रत्यक्षात साकारले. स्वतःचा उद्योग उभारण्यासाठी केवळ उत्पादन निर्मितीचे ज्ञान असून भागत नाही तर, व्यावसायिक ज्ञानही तेवढेच आवश्यक ठरते. देसरडा ग्रुपमधील वेगवेगळ्या कामांचा अनुभव मला फायदेशीर ठरला असे ते आवर्जुन सांगतात. कोणतेही काम असो ते त्याला एक आव्हान म्हणून स्वीकारतात. अशी अनेक आव्हाने त्यांनी लिलया पेलली. कंपन्यांच्या गरजेप्रमाणे पार्टस बनवून देणे यात त्यांची हातोटी निर्माण झाली आहे. अनेक वर्षे मध्यरात्री कंपनीत जाऊन स्पेअरपार्टस बसवण्याचे कामही त्यांनी केले आहे आणि हेच त्यांचे बलस्थान ठरले.

विविध कंपन्यांसाठी स्पेअरपार्टस बनवून दिल्यामुळे आगामी काळात स्वतःच मशिनरी बनवण्याचा त्यांचा मानस आहे. मशिनरी उत्पादन आणि फूड प्रॉडक्टस या उद्योगांकडे त्यांचा कल आहे. चॉकलेट, स्नॅक फूड निर्मिती करणे आपल्याकडे सहज शक्य असल्याचे त्यांनी सांगितले. गेल्या वीस वर्षांपासून प्रशांत पिंगळे आणि नासेर खान यांची खास मैत्री आहे. या मैत्रीतून ते दोघे गॅलेक्सी कंपनीत भागीदार बनले. कामांमधील पारदर्शकता, समन्वय या गोष्टींमुळे त्यांची दोस्तीही अतुट बनली आहे. भविष्यात नायजेरिया देशात स्पेअरपार्टस पाठवण्यादृष्टीने ते तयारी करीत आहेत. उत्पादनाचा दर्जा चांगला ठेवल्यास निर्यात सहज शक्य असल्याचे मत त्यांनी आवर्जुन नोंदवले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संपाने एसटीला ६० लाखांचा फटका

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

वेतनवाढीसाठी इंटकने पुकारलेल्या राज्यव्यापी एसटी बंदमध्ये औरंगाबाद विभागाचे तब्बल ६० लाखांचे नुकसान झाले. बसस्थानकावर उभ्या असलेल्या अनेक गाड्यांचे आंदोलकांनी टायर फाडल्यामुळे हे नुकसान वाढले आहे. संपामुळे प्रवाशांचे हाल झाले.

आंदोलनाच्या मध्यरात्रीपासूनच काही अज्ञातांनी एसटी स्टॅँमध्ये उभ्या असलेल्या बसचे पंक्चर केले. यामुळे नाइट हॉल्टवर आलेल्या सर्व गाड्या स्थानकावरच थांबून होत्या. औरंगाबाद मध्यवर्ती बस स्थानकासह सिडको आगारातही अशा पद्धतीने अज्ञातानी टायर पंक्चर केले. सकाळच्या सत्रात सीबीएस येथून पुणे, शिर्डी तसेच अन्य मार्गावर बस सेवा सोडण्याचा प्रयत्न केला. मात्र, टायर पंक्चरच्या बस रस्त्यात उभ्या असल्याने अनेक गाड्या तशाच उभ्या होत्या. इंटकच्या आंदोलनकर्त्यांनी एसटी आगाराच्या प्रवेशद्वारावरच आंदोलन सुरू केले. त्यामुळे प्रवासी असूनही सायंकाळपर्यंत बससेवा सुरू नव्हती. वेतनवाढीसाठी होणारे आंदोलन यशस्वी करण्यासाठी मध्यवर्ती बस स्थानकाच्या प्रवेशद्वारावर शेकडो इंटक कार्यकर्ते जमले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेतकऱ्यांनी काढली किडनी विकायला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

राष्ट्रीयीकृत बँकांनी कर्ज नाकारल्यामुळे मराठवाड्यातील शेतकरी खासगी फायनान्स कंपन्याकडून कर्ज घेत आहेत. १२ टक्के व्याजदराचे आमिष दाखवून २४ टक्के व्याज वसूल केले जात आहेत. हजारो शेतकरी फसले असून कंपन्यांवर सावकारी कायद्यानुसार कारवाई करावी, अशी मागणी अन्नदाता शेतकरी संघटनेने केली आहे. या मागणीसाठी संघटनेने गुरुवारी दुपारी क्रांतिचौकात निदर्शने केली.

'डोळा घ्या एक लाखाला', 'किडनी घ्या तीन लाखाला' अशा घोषणांनी क्रांतिचौक दणाणून गेला. खासगी फायनान्स कंपन्यांच्या विळख्यात सापडलेल्या औरंगाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी निदर्शने करून कंपन्यांवर थेट कारवाईची मागणी केली. अन्नदाता शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष जयाजीराव सूर्यवंशी यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले. दुष्काळामुळे शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती खालावली आहे. राष्ट्रीयीकृत बँका कर्ज देत नसल्यामुळे हजारो शेतकरी खासगी फायनान्स कंपन्यांकडून कर्ज घेत आहेत. आंध्र प्रदेश, तामिळनाडू व कर्नाटकातील फायनान्स कंपन्यांनी मराठवाड्यात कार्यालये उघडली आहेत. कंपन्या कमी व्याजाचे आमिष दाखवून शेतकऱ्यांना फसवत असल्याचा आरोप अन्नदाता शेतकरी संघटनेने केला आहे. अन्नदाता संघटनेच्या प्रसिद्ध पत्रकात 'विस्तार फायनान्स', 'शुभम', 'महिंद्रा', 'श्रीराम', 'एल अँड टी', 'किसान कुट्टा' यासारख्या कंपन्यांचा उल्लेख आहे. दरम्यान, २० ते ३० टक्के भरमसाठ व्याज वसूल करणाऱ्या कंपन्यांवर सावकारी कायद्यानुसार कारवाई करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. यावेळी गणेश डोखळे, भानुदास बुरकूल, गोरख ठोंबरे, अप्पासाहेब ठोंबरे, ज्ञानदेव ठोंबरे आदी शेतकरी उपस्थित होते.

अवयव विक्रीला

फायनान्स कंपन्यांच्या जाळ्यातून आमची सुटका करा किंवा आमचे अवयव विकून कर्ज फेडण्याची परवानगी द्या, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. डोळा व किडनी विक्रीला काढल्याच्या घोषणा देत शेतकऱ्यांनी लक्ष वेधले. राज्याच्या गुप्तचर विभागाने कारवाई करावी, असेही शेतकऱ्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


गर्भवतीचे अपहरण करून प्रसूतीनंतर अर्भक पळवले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

गर्भवती महिलेचे अपहरण करून अवघ्या दीड तासात तिची प्रसूती केली अन् प्रसूतीनंतर जन्मलेले जुळे घेऊन आरोपी फरार झाले, अशी तक्रार गुरुवारी सिडको पोलिस ठाण्यात आली. सुनील कटारे आणि कविता कटारे असे या दांपत्याचे नाव आहे.

सुनील कटारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, कविता कटारे (रा. पानगव्हाण, ता. वैजापूर) या गर्भवती असून त्यांच्यावर सेव्हनहिल येथील खासगी हॉस्प‌िटलमध्ये उपचार सुरू होते. बुधवारी प्रसूतीची तारीख होती. त्यामुळे सुनील त्यांच्या एन सहा येथे राहणाऱ्या बहीणकडे मुक्कामी होते. बुधवारी सकाळी साडेदहा वाजता दोघेजण दुचाकीवर हॉस्पिटलमध्ये जाण्यास निघाले. यावेळी सेंट्रल नाक्याजवळ कविताच्या मोबाइलवर हॉस्पिटलमधून फोन आला. कविताची आजच प्रसूती करण्यात येणार असून सोबत दुपटे घेऊन येण्यास सांगितले. सुनीलने कविताला हॉस्पिटलजवळ सोडून दुपटे घेऊन येतो असे सांगितले. मात्र, कविताने मी इथेच थांबते म्हणत सुनीलला बहिणीकडे पाठविले. काही वेळात तो परतला असता त्याला कविता दिसली नाही. सव्वाबारा वाजता कविताचा फोन आला. यावेळी तिच्या रडण्याचा आवाज आला. तीन मिनिटांनी पुन्हा त्यांना कविताचा फोन आला. यावेळी तिने रडत तुम्ही इकडे या असे सांगितले. त्यानंतर फोन कट झाला. यानंतर कविताचा फोन लागला नाही. दरम्यान सव्वा वाजता एका महिलेचा सुनीलच्या मोबाइलवर फोन आला. सुनील कटारे बोलत आहात का, अशी विचारणा केली. त्यानंतर पुन्हा काही मिनिटांनी फोन आला, तुमची पत्नी बाबा पेट्रोलपंपाजवळील पोलिस महानिरीक्षक कार्यालयाजवळील हॉस्पिटलजवळ बसल्याची माहिती दिली. सुनील व त्याच्या नातेवाईकांनी तेथे रडत बसलेल्या कविताला ताब्यात घेतले. या घटनेचा धक्का बसल्याने सुनील व कविताने मूळगाव पानगव्हाण गाठले. कविताला तेथील एका हॉस्पिटलमध्ये दाखल केले. गुरुवारी सकाळी त्यांनी सिडको पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. पोलिस निरीक्षक निर्मला परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक सुदाम भागवत यांनी चौकशी करीत सेंट्रलनाका येथील घटनास्थळाची पाहणी केली. कविता प्रसूत कोठे झाली, अर्भकांचे काय झाले हे प्रश्न अनुत्तरित आहेत.

कविता चालत गेली

सुनीलने कविताला ज्या ठिकाणी सोडले, तेथे एका गॉगल विक्रेत्याची टपरी आहे. त्याने खाली उतरलेल्या कविताला पाहिले होते. ही महिला पायी रिक्षास्टँडच्या दिशेने गेल्याची माहिती त्याने पोलिसांना‌ दिली.

विद्यार्थिनींची मदत

बाबा पेट्रोल पंप परिसरातील एका हॉस्पिटलजवळ आढळलेली कविता भेदरलेल्या अवस्थेत होती. ती कोणाला जवळ येऊ देत नव्हती. तेथून जाणाऱ्या विधी महाविद्यालयाच्या दोन तरुणींच्या हा प्रकार लक्षात आला. त्यांनी तिला बोलते केल्यानंतर तिने सुनीलचा क्रमांक दिला. त्यांनी सुनीलला फोन करून बोलावून घेतले. तोपर्यंत त्या कविताला ‌धीर देत होत्या.

प्रकरण सिडको पोलिस ठाण्यात आले. सिडको पोलिसांकडून चौकशी करण्यात येत आहे. वैजापूर येथे देखील चौकशी सुरू आहे. सत्यता पडताळण्यात येत आहे.

- अमितेशकुमार, पोलिस आयुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रवाशांची वेतनकोंडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

एसटी कर्मचाऱ्यांना २५ टक्के वेतनवाढीची मागणी करत महाराष्ट्र एसटी वर्कर्स कॉँग्रेसने गुरुवारी राज्यव्यापी संप पुकारला. आंदोलनामुळे एसटीची ७५ टक्के वाहतूक बंद होती. मराठवाड्यातील ४७ पैकी ३७ आगार ठप्प होते. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांची शाळा बुडाली, कर्मचाऱ्यांची ऑफिसला दांडी पडली. खेड्यातील रुग्णांना हॉस्पिटल गाठणे अशक्य झाले आणि अख्खा मराठवाडा

वेठीस धरला गेला. या आंदोलनात काँग्रेसच्या नेत्यांनी सक्र‌िय सहभाग घेतला.

गुरुवारी सकाळपासून औरंगाबाद मध्यवर्ती बसस्थानकाच्या गेटसमोर इंटकचे कार्यकर्ते, एसटी कर्मचाऱ्यांनी ठिय्या मांडला. सिडको बसस्थानक, चिकलठाणा कार्यशाळेत कामगारांनी काम बंद आंदोलन केले. सिल्लोड आगारात सकाळच्या सत्रात औरंगाबादसह अन्य भागात एसटी बसची वाहतूक सुरू होती. मात्र, दुपारनंतर आमदार अब्दुल सत्तार यांच्यासह अन्य लोकप्रतिनिधींनी आंदोलनकर्त्यांची भेट घेतली. त्यामुळे वाहतूक बंद पडली.

पैठण, गंगापूर, सोयगावमध्येही बस वाहतूक ठप्प होती. नांदेडमध्ये कॉँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांमुळे आंदोलनाला पाठबळ मिळाले. चव्हाणांनी स्वतः बसस्थानकात जाऊन इंटकच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. त्यामुळे आंदोलन अधिक चिघळले. नांदेड जिल्ह्यात शंभर टक्के बस वाहतूक बंद होती. बीड जिल्ह्यातील सर्व ८ आगारात आंदोलन यशस्वी झाले. लातूर, उस्मानाबाद आगारातही बस वाहतूक बंद होती.

अतिरेक

जालना आगारात आंदोलनकर्त्यांनी अतिरेक केला. त्यामुळे पोलिसांच्या मदतीने बसस्टॅँडचे प्रवेशद्वार मोकळे करत एसटी वाहतूक सुरू करण्यात आली. जाफराबाद, अंबड आणि परभणीतल्या २ आगारात वाहतूक सुरू होती. औरंगाबाद जिल्हयात वैजापूर वगळता सर्व आगारात एसटीसेवा ठप्प होती. त्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले.

'इंटक'ला मी स्वतः तीन वेळा बैठकीसाठी बोलावले. वेळ देऊनही इंटकचे पदाधिकारी आले नाहीत. या आंदोलनाबाबत एसटीने कोर्टात धाव घेतली आहे. या संपात काँग्रेसचे खासदार, आमदार आणि कार्यकर्ते उतरले होते. प्रवाशांची गैरसोय आम्ही सहन करणार नाही. संबंध‌ितांवर कारवाई करू.

- दिवाकर रावते, परिवहन मंत्री

मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, कोकण व अन्य भागात चांगला प्रतिसाद मिळाला. बंद ८० टक्के यशस्वी झाला. मात्र, लोकांची गैरसोय झाली. प्रशासनाने आमच्याशी बोलाचाली केल्या नाहीत. त्यामुळे हे आंदोलन सुरू ठेवणार आहोत.

- जयप्रकाश छाजेड, अध्यक्ष इंटक संघटना

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जालन्यात दिलवालेचे शो रद्द

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, जालना
असहिष्णुनतेचा मुद्दा निर्माण करून देशाची प्रतिमा मलीन केल्याच्या आरोपावरून हिंदू महासभेच्यावतीने शाहरुख खानच्या विरोधात जालन्यातील नीलम चित्रपटगृहासमोर राडा करण्यात आला. यावेळी परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. मात्र, संतप्त कार्यकर्त्यांमुळे चित्रपटगृह मालकाने दिलवाले सिनेमाचे चारही शो रद्द केले.
हिंदू महासभेच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी सकाळी दिलवाले चित्रपटाचा पहिला शो सुरू होण्यापूर्वीच नीलम चित्रपटगृहा बाहेर निदर्शने करीत जोरदार घोषणाबाजी केली. याप्रकरणी पोलिसांनी हिंदू महासभेचे धनसिंग सूर्यवंशी, ईश्वर बिल्ल्होरे, कालूसिंग राजपूत, विक्की हिवाळे, अजय हिवाळे, प्रशांत हजारे, नितिन वाडेकर, रवी यादव आदिंना अटक करून सुमारे दोन तास स्थानबद्ध करून ठेवले होते.
शाहरुख खान आणि आमिर खान विनाकारण असहिष्णुतेचा मुद्दा निर्माण करत आहेत. या दोघांच्या चित्रपटामुळे भारतात लव्ह जेहादला प्रोत्साहन मिळत आहे. त्यामुळे दोघांवर देशद्रोहचा गुन्हा नोंदवावा.
धनसिंग सूर्यवंशी,
मराठवाडा प्रमुख, हिंदू महासभा
हिंदू महासभेने विरोध केल्यामुळे दिलवाले चित्रपटाचे आजचे चारही शो रद्द केले असून यापुढे चित्रपट प्रदर्शित करायचा की नाही याचा निर्णय परिस्थिती पाहून घेतला जाईल.
शरद जैसवाल,
संचालक, नीलम चित्रपटगृह, जालना

उस्मानाबादमध्ये सिनेमा बंद पाडला
उस्मानाबाद- असहिष्णुतेवरून वांदग माजविणाऱ्या शाहरुख खानच्या दिलवाले चित्रपटाला विरोध दर्शवित युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी येथील श्री चित्रपटगृहात सुरू असलेला शो बंद पाडला. यावेळी त्या ठिकाणी लावण्यात आलेल्या पोस्टरची तोडफोड करण्यात आली. त्यामुळे शो पाहण्यासाठी आलेल्या नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उजनी-लातूर जलवाहिनीसाठी व्यवहार्यता तपासा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, लातूर
उजनी-लातूर थेट पाणीपुरवठा योजनेचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यास आणि या योजनेच्या व्यवहार्यतेचा अभ्यास करण्याच्या कामाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर विधानभवनात झालेल्या बैठकीत मान्यता दिली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
या बैठकीस आमदार अमित देशमुख, आमदार त्र्यंबक भिसे, आमदार बसवराज पाटील, आमदार संभाजीराव पाटील-निलंगेकर, लातूरचे महापौर अख्तर शेख, उपमहापौर कैलास कांबळे, स्थायी समिती सभापती, बाळासाहेब देशमुख, गटनेता नरेंद्र अग्रवाल, नगरसेवक समद पटेल मुख्यमंत्र्याचे स्वीय सहाय्यक अभिमन्यु पवार आदि उपस्थित होते.
लातूरचे महापौर शेख अख्तर यांच्या नेतृत्वाखाली गेल्या चार दिवसांपासून लातूर शहराच्या पिण्याच्या पाण्यासाठी उजनी धरणातील पाणीसाठा राखीव ठेवावा आणि थेट जलवाहिनीद्वारे लातूरला पाणी देण्यात यावे या मागणीसाठी धरणे अंदोलन सुरू करण्यात आले होते. या आंदोलनाची दखल विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी विधानसभेत घेतली होती.
मुख्यमंत्री फडणवीस यांनीही धरणे आंदोलनात सहभागी झालेल्याशी आपण चर्चा करू असे आश्वासन विधानसभेत दिले होते. यानुसार शुक्रवारी मुख्यमंत्र्यांनी आंदोलनकर्त्यांसोबत सविस्तर चर्चा केली.

पहिला टप्पा यशस्वी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लातूर शहराला उजनी धरणाचे पाणी देण्यासंदर्भात अनुकूल भूमिका घेतल्याबद्दल आमदार अमित देशमुख यांनी त्यांचे आभार मानले. उजनीचे पाणी लातूरसाठी घेण्याच्या प्रयत्नाच्या याचा महत्वाचा हा पहिला टप्पा आहे, अशी प्रतिक्रीया आमदार देशमुख यांनी दिली आहे.

लातूरच्या पाण्याच्या प्रश्नासंदर्भात नागपूर येथे धरणे आंदोलन यशस्वी केल्याबद्दल आमदार देशमुख यांनी महापौर अख्तर शेख आणि त्यांचे सहकारी सभापती सपना किसवे, श्रीदेवी औसे, नगरसेवक समद पटेल, महादेव बरूरे, दगडूअप्पा मिटकरी, राजे खटके, मंहमद शेख, नागसेन कामेगावकर, कैलास खानापूरे, नामदेव इगे, सुभाष पंचाक्षरी, दत्ता मस्के, राजू आवस्कर, संजय निलेगावकर, जाफर शेख, महेबूब पठाण, राजकूमार मिटकरी, गौस शेख, युनुस शेख, बप्पा मार्डीकर, अनिल वसेकर, समीर शेख, अमोल लोखंडे, बालाजी मगर, विपूल शेडगे, विजयकूमार येरटे, विरेंद्र सौताडेकर, धोडीराम यादव यांच्यासह काँग्रेस पक्षाचे विविध पदाधिकारी, कार्यकर्ते यांचे आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेकटा दरोड्यातील आरोपी फरारच

$
0
0

औरंगाबाद : शेकटा रोडवरील शिंदे वस्तीवर दरोडा टाकणाऱ्या आरोपींना पकडण्यात ग्रामीणच्या दरोडा विरोधी पथकास अद्यापही यश आले नाही. या भागात गेल्या २० दिवसांत दुसरी घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

ढाकेफळ येथे २७ नोव्हेंबर रोजी दरोड्याची घटना घडली होती. त्याचा तपास लागत नाही तोच शेकटा येथील शिंदे शेतवस्तीवर राहणाऱ्या भाऊसाहेब शिंदे यांच्या घरावर दरोडा पडल्याची घटना १० डिसेंबर रोजी पहाटे उघडकीस आली. बुधवारी (९ डिसेंबर) रात्री ते आपल्या कुटुंबासोबत झोपले असता पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घरावर दगडफेक करत घरात प्रवेश केला. भाऊसाहेब शिंदे व त्यांचा मुलगा संजय शिंदे याने दरोडेखोरांचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता दरोडेखोरांनी कुऱ्हाडीने हल्ला करत दोघांना जखमी केले. घरातील लोखंडी पेटी घेऊन चोरटे पसार झाले. घरापासून काही अंतरावर गेल्यानंतर चोरट्यांनी लोखंडी पेटीतील २१ हजार रुपये काढून घेऊन पेटी तेथेच टाकून पसार झाले होते. दरम्यान, बिडकीन पोलिसांनी श्वानपथक व फिंगरप्रिंट तज्ज्ञांना बोलावून आरोपींचा माग काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर बिडकीन सह दरोडा विरोधी पथक, स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस दरोडेखोरांना शोधण्यासाठी प्रयत्न करत आहेत. परंतु, अद्याप त्यांना यश मिळू शकले नाही. आरोपीच्या शोधार्थ विविध ठिकाणी पथके रवाना करण्यात आले असून लवकरच अटक होईल, अशी माहिती पोलिसांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images