Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

पत्ता उपलब्ध असूनही तपास करण्यास टाळाटाळ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पैठण

अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून घेऊन गेलेल्या नेपाली वेटर तरुणाचा पत्ता उपलब्ध असतानाही पोलिस तपास करण्यात टाळाटाळ करत असल्याचा आरोप मुलीच्या वडिलांनी केला आहे. ही घटना होऊन एक महिना उलटला आहे.

गेस्ट हाउस परिसरातील एका हॉटेलमध्ये नेपाळी तरूण महेशसिंग सहा महिन्यापासून वेटरचे काम करत होता. त्याने राहण्यासाठी भाड्याने घेतलेल्या खोलीशेजारील दहावीत शिकणाऱ्या एका सोळा वर्षाच्या मुलीला १९ नोव्हेंबर रोजी पळवून नेले.

मुलीच्या आई वडिलांनी पाथर्डी, जालना, नाशिक, औरंगाबाद येथे शोध घेतला. मात्र, मुलगी न सापडल्याने मुलीच्या वडिलांनी २१ नोव्हेंबर रोजी पैठण पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. पळवून नेणाऱ्या वेटरचा साथीदार कल्याणसिंग पैठण येथील एका हॉटेलमध्ये काम करत असल्याची माहिती मिळाल्यानंतर मुलीच्या वडिलांनी त्यांच्याकडून महेशसिंगचा नेपाळ येथील पत्ता मिळवून पैठण पोलिसांना दिला. पोलिसांनी कल्याणसिंग यांच्याकडे चौकशी करून या प्रकरणाकडे नंतर दुर्लक्ष केले. पोलिसांकडे वेळोवेळी संपर्क करूनही चौकशी सुरू आहे, तुम्ही शोध घ्या, नेपाळाला जाण्यासाठी गाडीचा बंदोबस्त करावा लागेल, असे म्हणत टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप मुलीच्या वडिलांनी केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


ड्रायपोर्ट यशस्वी होईल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, जालना

मराठवाड्यातील शेती उत्पादने आणि उद्योगांना विश्वाचे द्वार आजपासूनच उघडले आहे. रोजगाराच्या निर्मितीला चालना मिळणार आहे. आपल्या या नाविन्यपूर्ण संकल्पनेचे देशातील हे पहिले ड्रायपोर्ट नक्कीच यशस्वी होणार असल्याचा विश्वास केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी व्यक्त केला.

जालना जिल्ह्यातील जवसगाव (ता. बदनापूर) येथे जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टच्या वतीने आयोजित 'ड्रायपोर्ट'च्या भूमिपूजन समारंभात ते बोलत होते. 'समुद्र किनारा नाही, पाणी नाही, आपल्या नद्याही वाहत नाहीत, मग हे बंदर कसे काय? तर ही संकल्पना उद्योजकांबरोबरच्या चर्चेदरम्यान सुचली,' असे गडकरी यांनी सांगितले.

देशातील प्रमुख उद्योगपतींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत बैठक झाली. मुंबईहून लंडन येथे कोणताही माल पाठवणे सोपे आहे, पण मुंबईहून दिल्लीला माल पाठवणे मोठे अवघड आणि खर्चिक असल्याचा मुद्दा या बैठकीत मांडला होता. यावर उत्तर शोधत असताना आपल्याला या 'ड्रायपोर्ट'ची संकल्पना सुचली आणि सर्व दृष्टीने अभ्यास केल्यानंतर आज देशातील या मराठवाड्यातील पहिल्या 'ड्रायपोर्ट'चे भूमिपूजन करण्याचे भाग्य लाभले आहे याचे मोठे समाधान वाटते, असे त्यांनी सांगितले. जालन्यातील ड्रायपोर्टच्या माध्यमातून जगातील कच्चे तेल आयात करून येथे तेल शुद्धीकरण करणारी रिफायनरी सुरू करणे सहज शक्य आहे. त्यामुळे देशांतर्गत खाद्य तेलाच्या

किंमती कमी होतील. आपल्या मराठवाड्यातील मोसंबी, डाळींब, द्रांक्षे, सीताफळ यांना जगातील बाजारपेठ सहजपणे उपलब्ध होईल.

जालन्यातील स्टील उद्योगाला संपूर्ण जगातील लोखंडी भंगार थेट आणि अतिशय स्वस्तात मिळेल. रोजगाराच्या नवनवीन संधी उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी सांगितले. जेएनपीटीचे अध्यक्ष अनिल डिग्गीकर यांनी गडकरी यांचे स्वागत केले.

यावेळी व्यासपीठावर विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, जालन्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर, खासदार रावसाहेब दानवे, चंद्रकांत खैरे, ए. टी. नाना पाटील, पद्मभूषण डाॅ. बद्रीनारायण बारवाले, आमदार अर्जून खोतकर, माजी मंत्री राजेश,टोपे, आमदार संभाजी पाटील निलंगेकर, नारायण कुचे, संतोष दानवे, जयप्रकाश मुंदडा, जालना जिल्हा परिषदेचे अध्यक्ष तुकाराम जाधव, नगराध्यक्ष पार्वताबाई रत्नपारखे, जेएनपीटीचे अध्यक्ष अनिल डिग्गीकर, संचालक विवेक देशपांडे यांच्यासह जालना आणि औरंगाबाद येथील अनेक उद्योजक, परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. जेएनपीटीचे संचालक जेष्ठ उद्योगपती रामचंद्र भोगले यांनी सूत्रसंचालन केले.


सव्वाचार तास उशीर
दुपारी साडेबारा वाजता होणाऱ्या या नियोजित कार्यक्रमाला तब्बल पावणेपाच वाजता सुरुवात झाली. कार्यक्रमास उशीर झाल्याने व्यासपीठावरील सर्वांचेच एकत्रित स्वागत करण्यात आले. भूमिपूजन आणि कोनशीलेचे अनावरण केल्यानंतर प्रकल्पाला जमिनी देणाऱ्या दरेगाव आणि जवसगाव गावांतील शेतकऱ्यांचा गडकरी यांनी प्रातिनिधिक सत्कार केला. त्यानंतर थेट माइकचा ताबा घेऊन भाषण केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाव वाढले; झोळी रिकामी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, फुलंब्री

कापसाच्या भावात अचानक वाढ झाल्यानंतर आणखी भाववाढीच्या अपेक्षेने आवक मंदावली आहे. मात्र यंदाची दुष्काळी परिस्थितीमुळे घटलेले उत्पादन व अनेक शेतकऱ्यांनी यापूर्वीच कापूस विक्री केल्याने भाववाढीचा लाभ शेतकऱ्यांना मिळण्याची शक्यता कमीच आहे.

या आठवड्यात कापसाच्या भावात सरासरी पाचशे रुपयांनी वाढ झाली आहे. यापूर्वी साध्या कापसाला ४१०० ते ४२०० रुपये प्रतिक्विंटल, डीसीएस कापसाला ५१०० ते ५२०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळत होता. त्यातून उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त होत होती. दैनंदिन खर्च भागविण्यासाठी पैसाच नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी इच्छा नसताना कमी भावात कापूस विकला. या आठवड्यात अचानक चारशे ते पाचशे रुपये प्रति क्विंटलमागे वाढ झाली आहे. भावात कापसाच्या भावात ४०० ते ५०० रुपये प्रतिक्विंटलने वाढ झाली. यामुळे कापूस राखून असलेल्या शेतकऱ्यांनी आणखी भाव वाढण्याच्या अपेक्षेने विक्री कमी केली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाच्या गाठींची मागणी वाढल्याने भाववाढ झाल्याचे व्यापारी सांगत आहेत. सध्या बाजारात साध्या कापसाला क्विंटलमागे ४५००ते ४६०० रुपये, डीसीएस कापसाला ५५०० त ५६०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळत आहे. रुईसाठी ३४ हजार रुपयांचा भाव असून सरकीची २२०० रुपये दराने विक्री होत आहे.

सततची दुष्काळ व अवकाळी पाऊस यामुळे यावर्षी शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पादन झालेले नाही. कोरडवाहू शेतकऱ्यांना तर जेमतेम कापूस मिळाला. विहिरींचे पाणी असलेल्या शेतकऱ्यांची अवस्था थोडी बरी आहे. पण अनेक शेतकऱ्यांनी कापूस मिळेल त्या दरात विकल्याने भाववाढीचा लाभ मिळत नाही. विशेषतः अल्पभूधारक शेतकऱ्यांचा सर्वाधिक तोटा झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बजाजनगरमध्ये दोन घरफोड्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, वाळूज

बजाजनगरातील लोकमान्य चौकात दोन ठिकाणी घरफोडी करून चोरांनी जवळपास २० हजार रुपयांची मुद्देमाल लंपास केला. एकाच रात्री दोन ठिकाणी घरफोडी झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. नागरिक पोलिस रात्री गस्त घालतात की नाही, अशी शंका व्यक्त करीत आहेत.

लोकमान्य चौकातील श्रीगणेश हाउसिंग सोसायटीमधील आरएक्स ५/२२ येथील रहिवासी दिलीप मोहिते हे मूळगावी अमरावती येथे कामानिमित्त सहकुटुंब गेले होते. ते शुक्रवारी परत आल्यानंतर घराचा दरवाजा उघडा असल्याचे दिसले. हे शेजार्यांच्याही लक्षात आले. घरात पाहणी केल्यानंतर घरातील सर्व समान अस्तव्यस्त पडले होते. घरात कोणी नसल्याने काहीच मुद्देमाल चोरट्यांना सापडला नाही. दरम्यान, याच सोसायटीमधील आरएक्स- ५/२ मधील रहिवासी नितिन धनंजय जाधव काही कामानिमित्त मूळगावी चिकलठाण ता. कन्नड येथे गेले होते. चोरांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून प्रवेश केला. घरातील एक एलईडी टीव्ही, पाच हजार रुपये रोख असा सुमारे २० हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. चोरांनी घरातील सर्व सामान अस्तव्यस्त फेकून दिले. या दोन्ही घटना एकाच रात्री एकाच सोसायटीमध्ये घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. घटनेची माहिती मिळल्यानंतर एमआयडीसी वाळूज पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. परंतु, अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही.

पोलिस सुस्तावले

बजाजनगरात दुचाकी जाळण्याचे प्रकार घडल्यानंतर पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. त्यावेळी चोऱ्या कमी झाल्या होत्या. जाळपोळीचे प्रकार थांबल्यानंतर गस्तीवरील पोलिस सुस्तावले आहेत. यामुळे घरफोडी वाढल्याची तक्रार करून गस्त वाढवावी, अशी मागणी नागरिक करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मराठवाडा, विदर्भात ९५० कोटींचे रस्ते

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
मराठवाडा विदर्भात येत्या काळात ९५० कोटी रुपये गुंतवून रस्त्यांची कामे करण्याचा निर्णय नुकत्याच झालेल्या विधीमंडळाच्या अधिवेशनात घेण्यात आला आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी येथे दिली.

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातर्फे आयोजित करण्यात आलेल्या नवीन रस्त्यांच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. पाटील म्हणाले, 'स्वातंत्र्यानंतर आतापर्यंत मराठवाड्यातील रस्त्यावर जेवढा खर्च करण्यात आला नाही तेवढा खर्च केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी आज या भागातील रस्त्यांवर केला आहे. महाराष्ट्र राज्याच्या सार्वजनिक बांधकाम खात्याचे बजेट ३७०० कोटी रुपये होते. आता ते वाढवून ४५०० कोटी रुपये करण्यात आले आहे. महाराष्ट्र सरकार रस्ते विकासासाठी निधी उपलब्ध करून देत आहे. केंद्र सरकारची देखील या कामासाठी मदत लागणार आहे.'

खासदार रावसाहेब दानवे यांनी नितीन गडकरी यांच्या कार्यपद्धतीची स्तुती केली. स्वातंत्र्यानंतर केंद्र सरकारने सर्वात जास्त पैसा राज्यातील रस्त्यांसाठी दिला आणि तो गडकरींनीच दिला, असे ते म्हणाले. त्यामुळे रस्त्यांचे कामाचे श्रेय गडकरींनाच दिले पाहिजे, असा उल्लेख त्यांनी केला. ड्रायपोर्टची संकल्पना गडकरींनी आणली. आज जालना येथे त्याचे भूमिपूजन झाले. ड्रायपोर्टमुळे येत्या सात-आठ वर्षांत जालना - औरंगाबाद ही दोन्ही शहरे एकत्र येतील व या दोन्हीही शहरांचा विकास वेगाने होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी मुकुंदवाडी येथे उड्डाणपुल बांधण्याची व कचनेरफाटा ते ढोरकीन रस्ता करण्याची मागणी केली.

या दोन्ही रस्त्यांची कामे करण्याचे गडकरी यांनी मान्य केले, असे ते म्हणाले. गडकरींमुळे राज्यातील रस्ते चांगले झाले, असा उल्लेख त्यांनी केला. नवीन उड्डाणपुलांचे फाउंडेशन चार - पाच फूट उंच घेतले तर पाणीसाठा तयार होण्यास मदत होईल. त्या दृष्टीने येत्या काळात विचार करावा, असे आवाहन त्यांनी केले. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे सदस्य आर. के. पांडे यांनी प्रास्ताविक केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मराठा आरक्षणासाठी देणार तांत्रिक लढा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'मराठा समाज मागास नाही आणि मराठा समाजातील ५० टक्के समाजाला आरक्षण देणे शक्य नाही या दोन मुद्यांवर हायकोर्टाने मराठा आरक्षण फेटाळले. अभ्यासपूर्ण मांडणी नसल्यामुळे आरक्षणाचा तिढा कायम आहे. जनरेट्यासह तांत्रिक लढा आरक्षणासाठी आवश्यक आहे' असे प्रतिपादन आरक्षण विषयाचे अभ्यासक बाळासाहेब सराटे यांनी केले. मराठा आरक्षण जनआंदोलन राज्यस्तरीय खुल्या बैठकीत ते बोलत होते.

मराठा आरक्षणाचे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. इतर मागासवर्गीयात मराठा समाजाला आरक्षण देऊ नये अशी इतर समाजाची मागणी आहे व योग्य तांत्रिक पुरावे दिले नसल्यामुळे आरक्षणावर ठोस निर्णय झाला नाही. या पार्श्वभूमीवर राज्यातील मराठा संघटनांनी एकत्रितपणे आरक्षणाचा लढा सुरू ठेवण्यासाठी शिवप्रहार संघटनेचे अध्यक्ष संजीव भोर यांनी खुली बैठक आयोजित केली. देवगिरी महाविद्यालयात शुक्रवारी दुपारी ही बैठक झाली. यावेळी प्रदीप सोळुंके, डॉ. अशोक तेजनकर, किशोर चव्हाण, राजेंद्र दाते पाटील, प्रा. सीताराम काकडे, सुरेश डिडोरे पाटील, बाळासाहेब सराटे, अरूण कदम, प्रशांत इंगळे, बाळासाहेब गरूड, सागर पाटील, शिवाजी शेलार, सखाराम काळे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी सराटे म्हणाले, 'बापट आयोगाचे सदस्य खेड्यात पाहणीसाठी गेल्यानंतर अहंकारापोटी मराठा समाजातील लोकांनी आरक्षण नाकारले. १९६७ मध्ये पहिल्यांदा आरक्षण जाहीर झाल्यानंतरही स्वस्थ राहिले. एखाद्या क्षेत्रात संयमाने न शिरण्याचे समाजात वैगुण्य आहे. अगदी एमआयडीसी व डीएमआयसीमध्येही उद्योजक आरक्षण व सवलती घेतात. शेतकरी समाजाच्या मराठा जातीला आरक्षण मिळणे काय गैर आहे ? सामाजिक प्रतिष्ठेचे पालुपद लावून मराठ्यांना आरक्षणात डावलण्यात आले. राष्ट्रीय स्तरावर ओळख गमावलेल्या समाजाने आता कृष्णराव केळुस्कर, शिक्षणमहर्षी वि. रा. शिंदे व राष्ट्रभूषण सयाजीराव गायकवाड यांचे विचार आत्मसात करण्याची गरज आहे. आरक्षणाचा लढा विवेकाने लढावा लागणार आहे'.

संजीव भोर यांनी संघटनांच्या आगामी कार्यावर प्रकाश टाकला. 'मंत्र्यांना निवेदन देऊन व रास्ता रोको करून आरक्षण मिळणार नाही. या माध्यमातून प्रसिद्धी मिळेल पण आरक्षण नाही. आरक्षणाचे श्रेय लाटण्यासाठी सगळी लढाई असेल तर सर्वाधिक काम करणाऱ्या संघटनेला आपोआप श्रेय मिळेल. लोक रस्त्यावर उतरल्यास प्रश्नाकडे लक्ष वेधले जाईल. तांत्रिक लढा देऊन समस्या समोर आणू' असे भोर म्हणाले. 'उच्च शिक्षणात मराठा समाजाचे प्रमाण केवळ १० ते १५ टक्के आहे. ग्रामीण भागातून रेटा वाढला तर राजकीय पाठिंबा मिळेल' असे मत डॉ. अशोक तेजनकर यांनी मांडले. सूत्रसंचालन अविनाश खापे यांनी केले.

महापुरुषांची अवहेलना नको

'अगदी किरकोळ आंदोलनातही छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेण्याची गरज नाही. सामाजिक आदर्श म्हणून इतर आदर्शांचाही विचार करावा लागेल. राजकीय पक्षांनीही शिवाजी महाराजांचे नाव घेऊन महापुरुषांचे महत्त्व कमी केल्यास रोखता येणार नाही. हा प्रकार पुन्हा करू नका' असे आवाहन सराटे यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पिस्तुलधारीचा सामना

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, वाळूज

पैशाने भरलेली बॅग घेऊन जात असताना अचानक एक जण समोरून गाडी आडवी लावतो. गाडी आडवी लावणारा पिस्तुल रोखून समोरील व्यक्तीकडे पैशाने भरलेल्या बॅगची मागणी करतो. बॅग देईपर्यंत पिस्तुल त्याच्यावर रोखले जाते, पण बॅग देतांना पिस्तुल धरलेल्या हाताला झटका देतो आणि पिस्तुल दूर पडते. याच संधीचा फायदा घेत लुटमारी करणाऱ्यावर हल्ला चढवितो. दोघांची चांगलीच झटापट होते अखेर लुटारू दुचाकीवरून पळून जातो. चित्रपटातील घटनेसारखा हा प्रकार शुक्रवारी आंबेगाव विटावा शिवारात घडला.

जीवन प्रेमचंद ताटू (वय २३, रा. चिकनगाव ता. आंबड जि. जालना हमु गारखेडा) हे एसकेएस मायक्रो फायनॉन्समध्ये फिल्ड असिस्टंट आहेत. या फायनान्स कंपनीकडून लघुउद्योजकांना कर्ज दिले जाते. कर्जाची रक्कम पोहचवणे व हप्ते जमा करण्याचेकाम ताटू यांच्याकडे आहे. ते नेहमीप्रमाणे शुक्रवारी सकाळी बॅगेत एक लाख २० हजार रुपये घेऊन निघाले होते. साजापूर, एकलहरा, नांदेडा आदी ठिकाणी भेटीगाठी घेत कर्ज वाटप, हप्ते वसूल करत प्रवास करीत होते. त्यांनी जवळील रकमेपैकी एक लाख रुपयांचे वाटप केले व एक लाख पाच हजार रुपये वसूल केले. त्यामुळे त्यांच्या बॅगेत एक लाख २५ हजार रुपये होते. ही रक्कम घेऊन नांदेडा येथून निघाल्यानंतर ते आंबेगाव येथे दुपारी सव्वाबाराच्या सुमारास पोहोचले. त्यावेळी एका काळ्या रंगाच्या पल्सरवरील (एम एच १७, ९३१६) एका व्यक्तीने रस्त्यावर गाडी आडवी लावून त्यांना अडविले. तुझ्याजवळील बॅग दे, असे दरडावत ताटू यांच्यावर पिस्तुल रोखले. पिस्तूल पाहून घाबरलेले ताटू पैशाची बॅग त्याच्याकडे पुढे झाले. त्याचवेळी हिंमत करून त्यांनी त्या लुटारूच्या पिस्तूल असलेल्या हाताला जोरदार धक्का दिला. त्यामुळे हातातून पिस्तुल निसटून लांबवर पडले. याचा लाभ उठवत ताटू यांनी लुटारूवर हल्ला चढवला. मात्र लुटारून एक दगड फेकल्याने ते जखमी झाले. याचा यावेळी होणारी झटापट व आरडाओरड पाहून नागरिक धावत आले. नागरिक येत असल्याचे पाहून लुटारूने पळ काढला. या घटनेची माहिती तत्काळ एमआयडीसी वाळूज पोलिसांना कळविण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन झटापटीत पडलेला गावठी कट्टा ताब्यात घेतला. जखमी ताटू यांच्यावर प्रथमोचार करण्यात आले असून, त्यांची तब्यत स्थिर आहे. याप्रकरणी ताटू यांच्या तक्रारीवरून अनोळखी दुचाकीस्वाराविरुद्ध एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. एका लुटारूचा हिंमतीने सामना केल्यामुळे ताटू यांच्याकडील रक्कम शाबूत राहिली व एक गावठी पिस्तूल सापडले.

लुटारूला अटक

मोटारसायकलचा उपलब्ध क्रमांक व पळून गेलेल्या दिशेने शोध घेऊन पोलिसांनी एका तरुणाला अटक केली आहे. संतोष भगवान काळे (वय २८, रा.जोगेश्वरी झोपडपट्टी, ता. गंगापूर), असे त्याचे नाव आहे. ही माहिती पोलिस उपनिरीक्षक रावसाहेब जोंधळे यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिडको वाळूज महानगरात बिबट्याचे दर्शन?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, वाळूज

सिडको वाळूज महानगर १ मध्ये शुक्रवारी दुपारी अडीचच्या सुमारास बिबट्या नजरेस पडल्याची वार्ता पसरल्यानंतर खळबळ उडाली आहे. बिबट्याच्या शोध घेण्यासाठी नागरिकांनी संपूर्ण खाम नदी परिसरा पिंजून काढला, मात्र बिबट्या नदीच्या दिशेने पळून गेला असावा, अशी समजूत करून घेऊन शोध मोहीम थांबविण्यात आली.

सिडको वाळूज महानगरातील कामगार मिलिंद विजय सदावर्ते यांना शौचास जाताना परिसरातील दाट काटेरी झुडपात बिबट्या दिसला. बिबट्याला पाहून सदावर्ते प्रचंड घाबरले व वसाहतीकडे पळत सुटले. त्यांनी बिबट्या पाहिल्याचे काही जणांना सांगितले. नागरिकांनी या घटनेची माहिती तत्काळ एमआयडीसी वाळूज पोलिसांना कळविली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. नागरिक व पोलिसांनी परिसरात सर्वत्र शोध घेतला मात्र बिबट्या आढळून आला नाही. त्यामुळे नागरिकांनी बिबट्या नदीपात्रातून पळून गेला असावा, असा अंदाज करून शोध थांबवला. यावेळी एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षक अशोक झिने, तिसगावचे उपसरपंच विष्णू जाधव, सिडको वाळूज महानगरातील सुशील ढाकणे, योगेश शिंदे, विशाल माने, नितीन जाधव, अक्षय जाधव, गोलू पाटील, नील सदावर्ते, उमांकात जाधव, राजेंद्र सोनावणे, एकनाथ जाधव आदींनी परिसर पिंजून काढला.

वन विभागावर रोष

या घटनेची माहिती पोलिस व नागरिकांनी वन विभागाला कळवली. मात्र खूप वेळ वाट पाहूनही वन विभागाचे कर्मचारी फिरकले नाहीत. यामुळे नागरिकांमधून रोष व्यक्त होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


लघु उद्योजकांना सरकारी खरेदीत २० टक्के वाटा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

राज्य सरकारची कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये साहित्य, फर्निचर खरेदी करताना यापुढे २० टक्के साहित्य लघु उद्योजकांकडून खरेदी करावे लागणार आहे. त्यात चार टक्के साहित्य खरेदीसाठी अनुसूचित जातीच्या लघु उद्योजकांना प्राधान्य देण्यात येणार आहे. त्यामुळे लघु उद्योजकांना थोडाफार दिलासा मिळणार आहे.

सरकारी कार्यालये, महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती याठिकाणी फर्निचर, विद्युत साहित्य, टेबल, खुर्ची, संगणक यासह अनेक वस्तूंची खरेदी केली जाते. तीन लाखांवरील किमतीची खरेदी करताना ई टेंडर पद्धत लागू करण्यात आली. एरव्ही संबंधित संस्थांना स्थानिक पातळीवर निर्णय घेऊन खरेदी करण्याचे अधिकार बहाल केले होते. 'एमएसएसआयडीसी'मार्फत स्थानिक लघु उद्योजकांकडून हे साहित्य खरेदी करावे, असे अभिप्रेत होते, पण दरातील तफावत आणि अन्य अडचणींमुळे लघु उद्योजकांना प्राधान्य दिले जात नव्हते. स्थानिकांना प्राधान्य देण्याच्या उद्देशाने राज्य सरकारने ३० ऑक्टोबर रोजी एक अध्यादेश जारी केला आहे. त्यात सरकारी विभागांनी करावयाच्या कार्यालयीन खरेदीसाठीच्या कार्यपद्धतीची नियमपुस्तिका तयार केल आहे. त्यानुसार सरकारी, निमसरकारी कार्यालय, मंडळ, महामंडळ, सरकारी उपक्रम, संस्था, स्वायत्त संस्था, जिल्हा परिषद, महापालिका, नगर पालिका, नगर परिषदा; तसेच सार्वजनिक उपक्रम आदींअंतर्गत येणाऱ्या कार्यालयांना साधनसामग्रीची खरेदी करावी लागते. केंद्र सरकारच्या सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालयाकडून सूक्ष्म व लघु उद्योगांसाठी विशेष सवलती २०१२मध्ये लागू केल्या आहेत. राज्य सरकारकडून वस्तूंच्या खरेदीसाठी खूप मोठी रक्कम खर्ची पडत असल्याने खरेदीत जास्तीत जास्त पारदर्शकता आणणे, खरेदीच्या अधिकारांचे विकेंद्रीकरण करणे आदींचा विचार करण्यात आला आहे. त्यानुसार स्थानिक पातळीवर खरेदी समित्या स्थापन कराव्या लागणार आहेत.

खरेदी करताना दरकरार, ई-टेंडरिंग पद्धती किंवा सरकारी धोरणानुसार जी पद्धत आहे ती कायम राहील, पण एकूण खरेदीच्या २० टक्के साहित्य शासन मान्यप्राप्त (एमएसएसआयडी नोंदणीकृत) लघु उद्योजकांकडून खरेदी करावे लागणार आहे. या २० टक्क्यांमधून चार टक्के साहित्य खरेदी अनुसूचित जाती प्रवर्गातील लघु उद्योजकांकडून करावी लागणार आहे.


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वक्फ बोर्डाच्या आदेशाला स्थगिती

$
0
0

औरंगाबाद : खुलताबाद येथील जर जरी बक्ष दर्गा उत्सव समितीच्या खर्चाचे अधिकार वक्फ बोर्डाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नसीमबानो पटेल यांनी गोठवले होते. या आदेशाला महाराष्ट्र वक्फ न्यायाधीकरणाचे अध्यक्ष ए. ए. शहापुरे यांनी स्थगिती दिली.

खुलताबाद उरूस साजरा करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी उत्सव समिती स्थापन केली हे. त्यात तहसीलदार, मुख्याधिकारी, दर्गा समितीचे पदाधिकारी, मुनीबोद्दिन मुजिबोद्दिन यांचा समावेश आहे. या समितीत सलिकोद्दिन चिश्ती यांचा समावेश करण्यात आला नाही. त्यामुळे त्यांनी वक्फ बोर्डाकडे अर्ज करुन या समितीत निवड व्हावी अशी विनंती केली. १८ डिसेंबरला नसिमबानो पटेल यांनी चिस्ती यांचा समितीत समावेश करण्याचे निर्देश दिले. वक्फ बोर्डाच्या परवानगीशिवाय उत्सव समितीने दर्ग्याच्या बँक खात्यातून रक्कम काढण्यास मनाई केली. समितीचे अधिकार गोठविले. या आदेशाला मुनीबोद्दिन यांनी वक्फ न्यायाधीकरणाकडे आव्हान दिले. नसिमबानो यांनी दर्गा समितीचे अध्यक्ष व इतर सदस्यांना नोटीस बजावण्यात आली, पण या नोटीसमध्ये सुनावणीचे कारण नमूद करण्यात आले नाही. हे प्रकरण काय आहे हे जाणून घेण्यासाठी मुनीबोद्दिन वक्फ बोर्डात गेले. पण त्यांना टाळून पटेल यांनी मूळ नियुक्ती असलेल्या भूमी अभिलेख कार्यालयात जाऊन एकतर्फी आदेश जारी केला, असा युक्तिवाद मुनीबोद्दिन यांचे वकील सतीश तळेकर यांनी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रिकाम्या तिजोरीची काळजी नको : गडकरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, जालना
महाराष्ट्र राज्याची तिजोरी रिकामी आहे तरी काही काळजी करू नका. मराठवाड्यातील गरीबीचे चित्र बदलण्यासाठी भारत सरकार पूर्णठामपणे तुमच्या पाठीशी उभे आहे. आपणच सर्वजण मिळून हे चित्र पालटून टाकू, असे म्हणाले केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले.

जालन्यातील अग्रसेन चौकात सायंकाळच्या संधीप्रकाशात शुक्रवारी झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. ३ हजार ४२९ कोटी रुपयांच्या केंद्र सरकारच्या महामार्ग विकास योजनेतील रस्त्यांच्या कामांचे नितीन गडकरी यांनी जालन्यात भूमिपूजन केले. 'यातील बहुतेक रस्ते सिमेंटचे आहेत आपल्या किमान दोन पिढ्या तरी या सर्व रस्त्यावर खड्डे पडणार नाहीत काहीही चिंता करू नका,' असे गडकरी आर्वजून म्हणाले.

मराठवाड्यातील सध्याच्या परिस्थितीत शेतकऱ्यांची अवस्था चांगली नाही. हा शेतकरी कसा जगेल आणि प्रगती करेल याची काळजी घेण्याची गरज आहे. शेतीवरील खर्च कमी झाला पाहिजे, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. कोळशापासून युरियाची निर्मिती करण्याचा प्रस्ताव. त्यामुळे युरियाच्या किंमती ५० टक्क्यांहून कमी होऊ शकेल. शेतकऱ्यांच्या विहीरीला बारा महिने पाणी राहण्यासाठी छोट्या-छोट्या नाल्यात चेक डॅम बांधा, नदी नाले खोल करा, असे त्यांनी सांगितले. 'गडकरी हे राज्य मंत्रिमंडळात असताना आपण त्यांच्या सोबत राज्यमंत्री म्हणून काम केले आहे, पण आता ते फार पुढे गेले आहेत. आता त्यांनी आमच्याकडे काही पाहिले पाहिजे,' असे सांगून आमदार अर्जूनन खोतकर म्हणाले, 'आता गडकरी देशाचे उपपंतप्रधान झाले पाहिजेत, अशी जनतेची मागणी आहे. तसे झाले तरच महाराष्ट्राला न्याय मिळेल.'

'आम्ही चांगल्या कामाचे आणि विकासाचे भुकेलेलो आहोत. गडकरी सातत्याने नव्या योजना राबवणारे नेते आहेत. विधान परिषदेत विरोधी पक्षनेते असताना त्यांच्या प्रश्नांचा सरकारवरील भडीमार पाहिला. भोकरदनबरोबर अंबड आणि गोदावरीच्या काठावरील रस्त्यांच्या विकासाची कामे त्यांनी मंजूर करावीत,' अशी मागणी मांजीमंत्री राजेश टोपे यांनी केली.

पालकमंत्री बबनराव लोणीकर म्हणाले,' शेगाव ते पंढरपूर या रस्त्यासाठी त्यांनी १२०० कोटी रुपयांची तरतूद त्यांनी केली. ते उपपंतप्रधान झाल्यावर महाराष्ट्रातील अकरा कोटी जनतेच्या अपेक्षा पूर्ण होतील.'

खासदार रावसाहेब दानवे म्हणाले,'देशाच्या स्वातंत्र्यानंतर जालना जिल्ह्यात केंद्र सरकारचा एकही प्रकल्प आला नाही, मात्र गडकरी यांनी देशातील पहिल्या ड्रायपोर्टच्या उभारणीसाठी जालन्याची निवड केली. राज्य सरकारच्या तिजोरीत पैसा नाहीत. त्यामुळे राज्यातील रस्ते केंद्र सरकारच्या माध्यमातूनच होऊ शकतील.' गेल्या सरकारने पाच वर्षांत केवळ दीडशे कोटी रुपयांचा निधी रस्त्यासाठी दिला. एकाच वर्षात गडकरी यांनी चार हजार कोटी रुपये दिले आहेत. त्यामुळे गडकरी हे खरे रोडकरी आहेत, असे विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे म्हणाले. प्रा.रवींन्द्र मगर यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.



गडकरींकडून दिलगिरी
माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या वाढदिवशी त्यांना दिल्लीत भेटण्यासाठी गेलो होतो. तेथे थोडा उशीर झाला. त्यामुळे येथील कार्यक्रमांना उशीर झाला, असे म्हणत गडकरी यांनी दिलगिरी व्यक्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लॉकअॅपमध्ये आत्महत्येचा प्रयत्न

$
0
0

औरंगाबादः मोबाइल चोरी प्रकणात संशयावरून अटकेत असलेल्या एका आरोपीने लॉकअॅपमध्येच गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना क्रांतिचौक पोलिस ठाण्यात गुरुवारी सकाळी आठच्या सुमारास घडली. बंदोबस्तावरील पोलिस कर्मचाऱ्यांनी धाव घेतल्याने पुढील अनर्थ टळला. बाळासाहेब गंगाराम शिंदे (वय २२, रा. नारळीबाग) असे आत्महत्याचे प्रयत्न करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. मोबाइल चोरी प्रकरणी त्यास क्रांतिचौक पोलिसांनी अटक केली. अधिक चौकशीसाठी त्यास लॉकअॅपमध्ये ठेवण्यात आले होते. त्याने गुरुवारी सकाळी सव्वाआठ वाजता लॉकअॅपमधील चादर फाडून ती गळ्यात गुंडाळून आत्महत्येचा प्रयत्न केला. ही बाब ड्यूटीवर असलेेले पोलिस नाईक सुभाष काशीनाथ साबळे यास समजली. त्यांनी प्रसंगावधान राखून धाव घेतली. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी बाळासाहेब शिंदे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याची रवानगी हर्सूल कारागृहात करण्यात आली आहे, अशी माहिती तपास अधिकारी पोलिस उपनिरीक्षक गणेश धोकरट यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेतवस्तीवर लुटमार; गुन्हेगार अटकेत

$
0
0

औरंगाबाद : पैठण तालुक्यातील ढाकेफळ येथील शेतवस्तीवर लुटमार करणाऱ्या दोघांना ग्रामीण पोलिसांनी अटक केली. त्यांचा एक साथीदार पसार आहे. संशयित आरोपींनी २७ नोव्हेंबर रोजी रात्री डोळ्यात मिरची पूड टाकून संजय सुखदेव सिसोदे (वय ३०) यांना मारहाण करत लुटले होते.ढाकेफळ येथील संजय सिसोदे यांच्या घराचा कडीकोयंडा तोडून रात्री तीन ते चार आरोपींनी घरात प्रवेश केला. या लुटारूंनी सिसोदे यांच्या डोळ्यात मिरची पूड टाकून बेदम मारहाण करून घरातील ५६ हजारांचा ऐवज लांबवला. याप्रकरणी पैठण एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लुटारूंना पकडण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेसह दरोडा प्रतिबंधक पथक प्रयत्न करत होते. या दरोड्यामागे डाबर काटकोर चव्हाण (वय ३०) आणि कृष्णा उर्फ पिंट्या रतन बर्फे (दोघे रा. मारोळा बिडकीन) व त्यांच्या साथीदारांचा हात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक डॉ. कांचन चाटे व दरोडा विरोधी पथकाचे अरुण केंद्रे यांना मिळाली. त्याआधारे दोन्ही पथकातील कर्मचाऱ्यांनी कारवाई करत चव्हाण व बर्फे यांना अटक केली. दरम्यान, त्यांचा एक साथीदार अजून पसार आहे. त्यांच्याकडून आणखी दरोड्याचा गुन्हा उघडकीस येण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बस प्रवासात पर्समधील ६६ हजारांचे दागिने लंपास

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

बसने प्रवास करणाऱ्या एका महिलेचे पर्समधील ६६ हजार रुपये किंमतीचे दागिने चोरट्यांने लंपास केले. याप्रकरणी क्रांतिचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शीतल गणेश वाघ (वय २५, रा. पुणे) असे फिर्यादी महिलेचे नाव आहे. फिर्यादी अहमदनगरहून औरंगाबादकडे एस.टी. महामंडळाच्या बसने गुरुवारी (२४ डिसेंबर) प्रवास करत होत्या.

येथील बसस्थानकात त्या सायंकाळी साडेपाच वाजता उतरल्या. त्यांनी पर्सची पाहणी केली असता त्यात ठेवलेले सोन्यांचे मंगळसूत्र, गंठन आदी ६६ हजार ३८० रुपये किंमतीचे दागिने चोरीला गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

माथेफिरूने लावली घराला आग

औरंगाबादः अज्ञात माथेफिरूने ब्रीजवाडी भागातील एका घराच्या दरवाजास आग लावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. कुटुंबीयांना जाग आल्याने पुढील अनर्थ टळला. फिर्यादी वनिता साबळे गुरुवारी रात्री कुंटुबीयांसह घरात झोपलेले असतानाच अज्ञात व्यक्तीने त्यांच्या घराच्या दरवाजाला आग लावली. घरातील लहान मुल जागे झाल्याने हा प्रकार उघड झाली. ही घटना एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात नोंदवण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एकतर्फी प्रेमातून दोघींना धमकी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

एकतर्फी प्रेमातून शहरातील दोन तरुणींना दोघांनी सतत पाठलाग करून त्रास दिला. एकाने तरुणीला जीवे मारण्याची तर, दुसऱ्याने प्रेमास प्रतिसाद न दिल्याने तरुणीना बदनामी करण्याची धमकी दिली.

लग्न कर नाही तर, जीवे मारू, अशी धमकी एका २२ वर्षीय तरुणीला निलेश कैलास मनगटे (रा. शेलगाव ता. कन्नड) हा त्रास देत होता. त्याने गुरुवारी (२४ डिसेंबर) दुपारी २ वाजता एम्स हॉस्पिटलकडे जाताना या मुलीला रस्त्यात अडवून पुन्हा ठार मारण्याची धमकी दिली. तसेच केस धरुन मारहाण केली, विनयभंग केला, असे पीडिताने तक्रारीत नमूद केले आहे. त्यावरून निलेश मनगटे विरोधात सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

याच पद्धतीची दुसरी घटना मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे. 'फक्त हो म्हण नाही तर, जिवे मारून टाकेल,' अशी धमकी दिल्याचे पीडिताने तक्रार दिली आहे. मुकुंदवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सोळा वर्षाची मुलगी गुरुवारी (२४ डिसेंबर) दुपारी साडेबारा छत्रपती कॉलेज परिसरातून घराकडे पायी जात होती. त्यावेळी तिच्या घराजवळ राहणारा अभिषेक मोरे याने तिचा पाठलाग केला. त्याने आवाज दिल्यानंतरही फिर्यादीने प्रतिसाद न दिल्याने संतापलेल्या अभिषेकने तिच्यासमोर दुचाकी आडवी लावत थांबण्यास भाग पाडले. 'मी तुझ्यावर आठवी, नववीपासून प्रेम करतो. पागल समजते का मला,' असे म्हणत त्याने रात्री आठवाजेपर्यंत उत्तर दिले पाहिजे, फक्त हो म्हण अन्यथा जिवे मारुन टाकेन, अशी धमकी दिली. आई-वडिलांना काहीही सांगून तुझ्याविरुद्ध भडवून देईल, असेही धमकावले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


भूसंपादन करून मालकाला ठेंगा!

$
0
0

मोबदला मिळाला नाही म्हणून महापालिकेत खेट्या

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महापालिकेच्या नगररचना विभागाचा अजून एक प्रताप समोर आला आहे. उस्मानपुरा भागातील एका भूसंपादन प्रकरणी जमीन ताब्यात घेतली. मात्र, त्याचा मोबदला म्हणून मालकाला ठेंगा दाखवला. जमीन मालकाच्या पालिकेत खेट्या सुरू आहेत, पण बाराऐवजी चोवीस मीटरच्या टीडीआरची खैरात वाटणाऱ्या अधिकाऱ्यांना त्यांची कीव येत नाही.

पालिकेच्या नगररचना विभागातील टीडीआरचे प्रकरण चांगलेच गाजू लागले आहे. चार प्रकरणात चुकीच्या पद्धतीने टीडीआर दिल्यामुळे पालिका आयुक्तांनी नगररचना विभागाचे सहाय्यक संचालक डी. पी. कुलकर्णी यांच्यासह उपअभियंता शिरीष रामटेके व अन्य तीन जणांना कारणे दाखवा नोटीस बजावली. टीडीआरचे हे प्रकरण ताजे असतानाच उस्मानपुरा भागातील भूसंपादनाचे एक प्रकरण उघड झाले आहे. नगर भूमापन क्रमांक १६०२९ पैकी सर्व्हे क्रमांक ५० मधील शिवराम यादव यांच्या जमिनीमधून विकास योजनेतील ८० फूट व ५० फूट रस्त्यात बाधित होत असलेल्या जमिनीचे भूसंपादन केले. भूसंपादनाचा मोबदला मात्र यादव यांना देण्यात आला नाही. जी जमीन संपादित केली, त्या जमिनीचा मालकीहक्क दिसून येत नाही. तसेच नेमके किती क्षेत्र महापालिकेच्या योजने अंतर्गत बाधित आहे याचाही अंदाज येत नाही, असे पत्र महापालिकेतर्फे यादव यांना देण्यात आले. त्यानंतर यादव यांनी जिल्हा अधीक्षक भूमीअभिलेख यांच्या आदेशाने वारसा हक्काने हे बाधित क्षेत्र फेरफार क्रमांक ७२२० ते ७३६२ चौरस मीटर जागेची मालमत्ता पत्रामध्ये नोंद घेतली. त्या जागेचा नवीन नकाशा देखील त्यांनी काढला. जमिनीच्या मालकी हक्काची कागदपत्रे, पीआर कार्ड, मोजणी नकाशा आदी कागदपत्रे नगररचना विभागात सादर केल्यावर देखील अद्याप त्यांना संपादित जमिनीचा मोबदला दिलेला नाही. हा मोबदला मिळावा, अशी मागणी करणारा शेवटचा अर्ज त्यांनी ९ डिसेंबर रोजी पालिका आयुक्तांच्या कार्यालयात दिला. अद्याप त्यावर काहीही कारवाई झालेली नाही.

उस्मानपुरा भागातील या प्रकरणाबद्दल लगेच काही सांगता येणार नाही. फाइल आणि कागदपत्रे पाहून माहिती द्यावी लागेल.

- डी. पी. कुलकर्णी, सहाय्यक संचालक, नगररचना विभाग

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

८५ शहरांचे प्रस्ताव

$
0
0

स्मार्ट सिटीसाठी आता प्रतीक्षा केंद्रातील सादरीकरणाची

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी केंद्र सरकारकडे देशभरातील ८५ शहरांचे प्रस्ताव दाखल झाले आहेत. जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सादर केलेल्या प्रस्तावाचे सादरीकरण केंद्र सरकारच्या उच्चाधिकार समिती समोर करावे लागणार आहे. त्यानंतर २६ जानेवारी रोजी स्मार्ट सिटी निवडण्यात आलेल्या पहिल्या टप्प्यातील शहरांची नावे जाहीर केली जाणार आहेत. महाराष्ट्रातील दहा शहरांची त्यांचे प्रस्ताव सादर केले आहेत.

स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी केंद्र सरकारने देशभरातील ९८ शहरांची निवड केली आहे. या सर्व शहरांच्या महापालिका आयुक्तांना स्मार्ट सिटीचे प्रस्ताव १५ रोजी केंद्र सरकारकडे सादर करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार ९८पैकी ८५ शहरांनी आपापले प्रस्ताव सादर केले आहेत. महाराष्ट्रातील दहा शहरांचा समावेश स्मार्ट सिटी प्रकल्पात करण्यात आला आहे. या सर्व शहरांचे प्रस्ताव राज्य सरकारच्या माध्यमातून केंद्र सरकारकडे सादर केले आहेत. केंद्र सरकारकडे सादर करण्यात आलेल्या प्रस्तावांचे सादरीकरण संबंधित शहराच्या आयुक्तांना केंद्र सरकारच्या उच्चाधिकार समितीच्या समोर करावे लागणार आहे. अद्याप या सादरीकरणाची तारीख केंद्र सरकारने जाहीर केली नसली तरी जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हे सादरीकरण होईल, असे मानले जात आहे.

सादरीकरणानंतर प्रस्तावांची छाननी करून स्मार्ट सिटी प्रकल्पातील पहिल्या टप्प्यातील शहरांची नावे २६ जानेवारी रोजी लालकिल्ल्यावरून पंतप्रधान जाहीर करतील, असे सांगितले जात आहे. त्यामुळे स्मार्ट सिटी प्रकल्पातील सर्वांचे लक्ष केंद्र सरकारच्या उच्चाधिकार समिती समोर होणाऱ्या सादरीकरणाकडे लागले आहे.

केरळमधील शहरांनी माघार घेतली

केरळमध्ये काही दिवसांपूर्वी अतिवृष्टी झाली. त्यामुळे अनेक शहरे जलमय झाली. शहरांचे अतोनात नुकसानही झाले. या आघातातून न सावरल्यामुळे केरळमधील शहरांनी स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव सादर केले नसल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे ९८पैकी ८५ शहरांचे प्रस्ताव दाखल झाले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रिकाम्या तिजोरीची काळजी नको : गडकरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, जालना

महाराष्ट्र राज्याची तिजोरी रिकामी आहे तरी काही काळजी करू नका. मराठवाड्यातील गरीबीचे चित्र बदलण्यासाठी भारत सरकार पूर्णठामपणे तुमच्या पाठीशी उभे आहे. आपणच सर्वजण मिळून हे चित्र पालटून टाकू, असे म्हणाले केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले.

जालन्यातील अग्रसेन चौकात सायंकाळच्या संधीप्रकाशात शुक्रवारी झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. ३ हजार ४२९ कोटी रुपयांच्या केंद्र सरकारच्या महामार्ग विकास योजनेतील रस्त्यांच्या कामांचे नितीन गडकरी यांनी जालन्यात भूमिपूजन केले. 'यातील बहुतेक रस्ते सिमेंटचे आहेत आपल्या किमान दोन पिढ्या तरी या सर्व रस्त्यावर खड्डे पडणार नाहीत काहीही चिंता करू नका,' असे गडकरी आर्वजून म्हणाले.

मराठवाड्यातील सध्याच्या परिस्थितीत शेतकऱ्यांची अवस्था चांगली नाही. हा शेतकरी कसा जगेल आणि प्रगती करेल याची काळजी घेण्याची गरज आहे. शेतीवरील खर्च कमी झाला पाहिजे, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. कोळशापासून युरियाची निर्मिती करण्याचा प्रस्ताव. त्यामुळे युरियाच्या किंमती ५० टक्क्यांहून कमी होऊ शकेल. शेतकऱ्यांच्या विहीरीला बारा महिने पाणी राहण्यासाठी छोट्या-छोट्या नाल्यात चेक डॅम बांधा, नदी नाले खोल करा, असे त्यांनी सांगितले. 'गडकरी हे राज्य मंत्रिमंडळात असताना आपण त्यांच्या सोबत राज्यमंत्री म्हणून काम केले आहे, पण आता ते फार पुढे गेले आहेत. आता त्यांनी आमच्याकडे काही पाहिले पाहिजे,' असे सांगून आमदार अर्जूनन खोतकर म्हणाले, 'आता गडकरी देशाचे उपपंतप्रधान झाले पाहिजेत, अशी जनतेची मागणी आहे. तसे झाले तरच महाराष्ट्राला न्याय मिळेल.'

'आम्ही चांगल्या कामाचे आणि विकासाचे भुकेलेलो आहोत. गडकरी सातत्याने नव्या योजना राबवणारे नेते आहेत. विधान परिषदेत विरोधी पक्षनेते असताना त्यांच्या प्रश्नांचा सरकारवरील भडीमार पाहिला. भोकरदनबरोबर अंबड आणि गोदावरीच्या काठावरील रस्त्यांच्या विकासाची कामे त्यांनी मंजूर करावीत,' अशी मागणी मांजीमंत्री राजेश टोपे यांनी केली.

पालकमंत्री बबनराव लोणीकर म्हणाले,' शेगाव ते पंढरपूर या रस्त्यासाठी त्यांनी १२०० कोटी रुपयांची तरतूद त्यांनी केली. ते उपपंतप्रधान झाल्यावर महाराष्ट्रातील अकरा कोटी जनतेच्या अपेक्षा पूर्ण होतील.'

खासदार रावसाहेब दानवे म्हणाले,'देशाच्या स्वातंत्र्यानंतर जालना जिल्ह्यात केंद्र सरकारचा एकही प्रकल्प आला नाही, मात्र गडकरी यांनी देशातील पहिल्या ड्रायपोर्टच्या उभारणीसाठी जालन्याची निवड केली. राज्य सरकारच्या तिजोरीत पैसा नाहीत. त्यामुळे राज्यातील रस्ते केंद्र सरकारच्या माध्यमातूनच होऊ शकतील.' गेल्या सरकारने पाच वर्षांत केवळ दीडशे कोटी रुपयांचा निधी रस्त्यासाठी दिला. एकाच वर्षात गडकरी यांनी चार हजार कोटी रुपये दिले आहेत. त्यामुळे गडकरी हे खरे रोडकरी आहेत, असे विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे म्हणाले. प्रा.रवींन्द्र मगर यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

गडकरींकडून दिलगिरी

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या वाढदिवशी त्यांना दिल्लीत भेटण्यासाठी गेलो होतो. तेथे थोडा उशीर झाला. त्यामुळे येथील कार्यक्रमांना उशीर झाला, असे म्हणत गडकरी यांनी दिलगिरी व्यक्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ड्रायपोर्ट यशस्वी होईल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, जालना

मराठवाड्यातील शेती उत्पादने आणि उद्योगांना विश्वाचे द्वार आजपासूनच उघडले आहे. रोजगाराच्या निर्मितीला चालना मिळणार आहे. आपल्या या नाविन्यपूर्ण संकल्पनेचे देशातील हे पहिले ड्रायपोर्ट नक्कीच यशस्वी होणार असल्याचा विश्वास केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी व्यक्त केला.

जालना जिल्ह्यातील जवसगाव (ता. बदनापूर) येथे जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टच्या वतीने आयोजित 'ड्रायपोर्ट'च्या भूमिपूजन समारंभात ते बोलत होते. 'समुद्र किनारा नाही, पाणी नाही, आपल्या नद्याही वाहत नाहीत, मग हे बंदर कसे काय? तर ही संकल्पना उद्योजकांबरोबरच्या चर्चेदरम्यान सुचली,' असे गडकरी यांनी सांगितले.

देशातील प्रमुख उद्योगपतींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत बैठक झाली. मुंबईहून लंडन येथे कोणताही माल पाठवणे सोपे आहे, पण मुंबईहून दिल्लीला माल पाठवणे मोठे अवघड आणि खर्चिक असल्याचा मुद्दा या बैठकीत मांडला होता. यावर उत्तर शोधत असताना आपल्याला या 'ड्रायपोर्ट'ची संकल्पना सुचली आणि सर्व दृष्टीने अभ्यास केल्यानंतर आज देशातील या मराठवाड्यातील पहिल्या 'ड्रायपोर्ट'चे भूमिपूजन करण्याचे भाग्य लाभले आहे याचे मोठे समाधान वाटते, असे त्यांनी सांगितले. जालन्यातील ड्रायपोर्टच्या माध्यमातून जगातील कच्चे तेल आयात करून येथे तेल शुद्धीकरण करणारी रिफायनरी सुरू करणे सहज शक्य आहे. त्यामुळे देशांतर्गत खाद्य तेलाच्या किंमती कमी होतील. आपल्या मराठवाड्यातील मोसंबी, डाळींब, द्रांक्षे, सीताफळ यांना जगातील बाजारपेठ सहजपणे उपलब्ध होईल.

जालन्यातील स्टील उद्योगाला संपूर्ण जगातील लोखंडी भंगार थेट आणि अतिशय स्वस्तात मिळेल. रोजगाराच्या नवनवीन संधी उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी सांगितले. जेएनपीटीचे अध्यक्ष अनिल डिग्गीकर यांनी गडकरी यांचे स्वागत केले.

यावेळी व्यासपीठावर विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, जालन्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर, खासदार रावसाहेब दानवे, चंद्रकांत खैरे, ए. टी. नाना पाटील, पद्मभूषण डाॅ. बद्रीनारायण बारवाले, आमदार अर्जून खोतकर, माजी मंत्री राजेश,टोपे, आमदार संभाजी पाटील निलंगेकर, नारायण कुचे, संतोष दानवे, जयप्रकाश मुंदडा, जालना जिल्हा परिषदेचे अध्यक्ष तुकाराम जाधव, नगराध्यक्ष पार्वताबाई रत्नपारखे, जेएनपीटीचे अध्यक्ष अनिल डिग्गीकर, संचालक विवेक देशपांडे यांच्यासह जालना आणि औरंगाबाद येथील अनेक उद्योजक, परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. जेएनपीटीचे संचालक जेष्ठ उद्योगपती रामचंद्र भोगले यांनी सूत्रसंचालन केले.

सव्वाचार तास उशीर

दुपारी साडेबारा वाजता होणाऱ्या या नियोजित कार्यक्रमाला तब्बल पावणेपाच वाजता सुरुवात झाली. कार्यक्रमास उशीर झाल्याने व्यासपीठावरील सर्वांचेच एकत्रित स्वागत करण्यात आले. भूमिपूजन आणि कोनशीलेचे अनावरण केल्यानंतर प्रकल्पाला जमिनी देणाऱ्या दरेगाव आणि जवसगाव गावांतील शेतकऱ्यांचा गडकरी यांनी प्रातिनिधिक सत्कार केला. त्यानंतर थेट माइकचा ताबा घेऊन भाषण केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खैरे-सावेंमध्ये रंगला श्रेयवाद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या कार्यक्रमात खासदार चंद्रकांत खैरे आणि आमदार अतुल सावे यांच्यामध्ये श्रेयवाद रंगला. केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी ज्या रस्त्यांच्या कामाचे भूमिपूजन केले ती कामे आपल्यामुळेच मंजूर झाली, असा दावा या दोन्ही नेत्यांनी केला.

चंद्रकांत खैरे म्हणाले, 'केंद्रात एनडीएचे सरकार आल्यावर दुसऱ्याच आठवड्यात मी व गडकरी पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटलो व रस्त्यांच्या कामाबद्दल त्यांच्याशी चर्चा केली. औरंगाबाद परिसरातील राष्ट्रीय महामार्गाचे काम तुमच्याच हातून व्हावे, असे इश्वरीय संकेत आहेत. त्यामुळे तुम्ही ही कामे करा, अशी विनंती पंतप्रधानांना केली.'

त्यामुळे आज ज्या रस्त्यांच्या कामांचे भूमिपूजन होत आहे. त्याचे श्रेय कुणा माझे नाही आणि तुमचेही नाही, असे ते अतुल सावे यांना उद्देशून म्हणाले. या कामांचे श्रेय एनडीए सरकारचे एकत्रित आहे, असे ते म्हणाले.

आमदार सावे म्हणाले, 'नगरनाका ते चिकलठाणा या रस्त्याच्या सहपादरी करावा, त्याचे काँक्रिटीकरण करावे यासाठी मी ३ डिसेंबरला नितीन गडकरी यांना दिल्लीत भेटून पत्र दिले आणि आज २५ डिसेंबर रोजी या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन होत आहे याचा आम्हाला आनंद आहे. औंरगाबाद शहरातील या रस्त्यासह परिसरातील अन्य रस्त्यांचा विकास करण्यासाठीही गडकरी यांच्याशी त्यावेळी चर्चा केली होती.'


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images