Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

आदेश धुडकावून शुभेच्छाफलक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

हायकोर्ट, पोलिस आयुक्त, महापालिकेचे आदेश धुडकावून शहरात पुन्हा एकदा शुभेच्छांचे फलक झळकत आहेत. चौकाचौकात व महत्त्वाच्या ठिकाणी असे फलक लावण्यास मनाई करण्यात आली आहे. मात्र, हे आदेश धाब्यावर बसविल्यामुळे शहरात होर्डिंगचे साम्राज्य निर्माण होत आहे.

वाढदिवस, नूतनवर्ष यासह विविध उपक्रमांचे आणि कार्यक्रमांचे होर्डिंग चौकाचौकांमध्ये, मुख्य रस्त्यांच्या बाजूला लावण्यास कोर्टानेच मनाई केली आहे. कोर्टाच्या या आदेशाची अंमलबजावणी राज्याची राजधानी असलेल्या मुंबईपासून केली जाते. औरंगाबादमध्येही दोन वर्षांपूर्वी तत्कालीन पोलिस आयुक्त संजयकुमार यांच्या पुढाकाराने ही कारवाई करण्यात आली. पोलिस आणि महापालिका प्रशासन मिळून विविध चौकांमधील व रस्त्यांच्या बाजूला लावण्यात आलेले होर्डिंग काढून टाकण्याची मोहीम हाती घेण्यात आली होती. त्यामुळे औरंगाबाद शहर होर्डिंगमुक्त झाले होते. आता पुन्हा या शहरात होर्डिंगचे साम्राज्य निर्माण होऊ लागले आहे. सामाजिक कार्यकर्ते सचिन राठी यांनी खासदार चंद्रकांत खैरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्याने शहरात महत्त्वाच्या ठिकाणी भलेमोठे होर्डिंग लावले आहेत. उड्डाणपूल, पैठणगेट, गुलमंडी अशा महत्त्वाच्या ठिकाणी हे होर्डिंग पाहण्यास मिळतात. या होर्डिंगच्या संदर्भात पालिकेच्या मालमत्ता विभागातून मिळालेल्या माहितीनुसार या विभागातून होर्डिंग लावण्यासाठी कोणालाही कोणत्याही प्रकारची परवानगी देण्यात आली नाही. तर सचिन राठी यांनी मात्र आपण परवानगी घेऊनच होर्डिंग लावले आहेत. ज्यांना परवानगी दाखवणे गरजेचे होते त्यांना दाखवली आहे,

असे उत्तर दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


स्वातंत्र्यसैनिक रमणभाई पारीख यांचे निधन

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
मराठवाडा मुक्तीसंग्रामातील स्वातंत्र्यसैनिक आणि श्री गुजराती समाज विकास मंडळाचे माजी सचिव रमणभाई पारीख (वय ९०) यांचे गुरुवारी पहाटे निधन झाले.
कैलासनगर स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या मागे एक मुलगा, एक मुलगी, भाचा, सून, नातवंडे असा परिवार आहे. शुक्रवारी सायंकाळी पाच वाजता सरस्वती भुवन संस्थेच्या मध्यवर्ती सभागृहात श्रद्धांजली सभा होणार आहे. रमणभाई पारीख यांचा जन्म पाच नोव्हेंबर १९२५ रोजी झाला. मल्टिपर्पज हायस्कूलमध्ये त्यांनी उर्दू माध्यमातून शिक्षण घेतले. लहानपणीच त्यांच्या वडिलांचे निधन झाल्याने आई कै. वेणीबेन यांनी संपूर्ण घराची जबाबदारी स्वीकारली. विद्यार्थी दशेतच रमणभाईंनी सामाजिक व मराठवाडा मुक्तीसंग्रामात सहभाग घेतला होता. १९४८ नंतर श्री गुजराती समाज विकास मंडळ संचलित शैक्षणिक संस्थेच्या कार्यात त्यांनी स्वतःला वाहून घेतले. सामाजिक कार्याची आवड असल्याने त्यांनी १९५७मध्ये नगरपालिका निवडणूक लढवली. अपक्ष नगरसेवक म्हणून ते निवडूनही आले होते. १९७८मध्ये विधानसभा निवडणूक रिंगणातही त्यांनी उडी घेतली होती. मात्र, त्यात त्यांना यश आले नाही. १९७३च्या भीषण दुष्काळात त्यांनी पाणी, अन्नधान्य मदत कार्यात सक्रिय सहभाग घेतला होता. मराठवाडा विकास परिषदेच्या विविध आंदोलनात त्यांचा सक्रिय सहभाग असायचा. १९७६मध्ये शासकीय कर्मचाऱ्यांच्या ५२ दिवसांच्या संपाचे त्यांनी नेतृत्त्व केले होते. १९७७मध्ये आणीबाणीच्या काळात त्यांनी भूमिगत सामाजिक काम करण्याची जबाबदारी पार पाडली होती. १९७४मध्ये मुलींसाठी स्वतंत्र शाळा सुरू करण्यासाठी त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. श्री गुजराती कन्या विद्यालयाचे ते संस्थापक सचिव होते. स्वामी रामानंद तीर्थ संशोधन समितीचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी भूमिका बजावली होती. वैद्यकीय प्रवेश, इंजिनिअरींग प्रवेश, रेल्वे प्रश्न, मराठवाडा वैधानिक विकास मंडळ अशा विविध आंदोलनात त्यांनी सक्रिय सहभाग घेतला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वस्तुनिष्ठ अहवालाचे विद्यापीठाला आदेश

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
बारकोड उत्तरपत्रिका खरेदीतील अनियमिततेवर शासनानेही डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ प्रशासनाला खडे बोल सुनावले आहेत. विद्यापीठाला दिलेल्या पत्रात संबंधितांवर कारवाई न झाल्याने विद्यापीठाच्या व्यवस्थापनाबाबत संशयास्पद वातावरण निर्माण झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. विद्यापीठाला याचा वस्तुनिष्ठ अहवालही सादर करण्याचे सांगण्यात आले आहे. नोव्हेंबरमध्ये विद्यापीठाला हे पत्र पाठविण्यात आल्याचे समोर आले आहे.

विद्यापीठाने प्रायोगिक तत्त्वावर इंजिनीअरिंग व लॉ अभ्यासक्रमासाठी बारकोड उत्तरपत्रिका वापरण्याचा निर्णय घेण्यात आला. सप्टेंबर २०१४ ते जानेवारी २०१५दरम्यान बारकोड उत्तरपत्रिका खरेदी करण्यात आल्या. सुमारे ७३ लाख ५० हजार रुपयांच्या उत्तरपत्रिकांची खरेदी झाली. यात अनियमितता झाल्याचा आरोप झाला. त्यानंतर विद्यापीठाने चौकशी समिती नेमली. समितीने यात मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्याचे स्पष्ट केले. यामुळे राज्यभर प्रकरण गाजले. विधीमंडळात ही गाजलेल्या प्रकरणात शासनानेही गंभीर दखल घेतल्याचे समोर आले आहे. विद्यापीठाला नोव्हेंबरमध्ये पाठविण्यात आलेल्या पत्रावरून हे स्पष्ट झाले आहे. शासनाने याबाबतचा अहवालही सादर करण्याच्या सूचना केल्याचे स्पष्ट होते. पत्रात विद्यापीठाच्या कारभारावर नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. शासनाच्या कक्ष अधिकारी यांच्या स्वाक्षरीचे हे पत्र आहे. नियुक्त केलेल्या चौकशी समितीने अव्यवहार्य छपाई कामाचा अहवाल व छपाईमध्ये असलेल्या विसंगतीबाबत संबधितांवर कारवाइ करण्याविषयी शिफारस केली असल्याचे समजते, परंतु आजपर्यंत संबंधितांवर कार्यवाही न झाल्याने त्याबाबत विद्यापीठाच्या व्यवस्थापनाबाबत संशयास्पद वातावरण निर्माण झाल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.

महिनाभरानंतर पत्र बाहेर

बारकोड उत्तरपत्रिका खरेदीतील अनियमिततेबाबत विद्यापीठ प्रशासन दोषींना पाठीशी घालण्याचे प्रयत्न करीत आहे. गोपनीयता ठेवण्याकडेच प्रशासनाचा कल आहे. शासनाने पत्र पाठविल्यानंतरही विद्यापीठ प्रशासनाने मोठी गोपनीयता ठेवली अखेर महिनाभरानंतर हे पत्र बाहेर पडले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कॅरिबॅग विकणाऱ्या १३ जणांविरुद्ध गुन्हे

$
0
0

महापालिकेच्या पथकाने कॅरिबॅगवर गुरुवारी कारवाई केली.

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

बंदी असताना २० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिकच्या पिशव्या व कपांची विक्री करणाऱ्या १३ दुकानदारांविरुद्ध गुरुवारी गुन्हे दाखल करण्यात आले. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी याप्रकरणी तक्रार दिली. सिटीचौक व क्रांतिचौक पोलिस ठाण्यांतर्गत ही कारवाई करण्यात आली.

सिटीचौक पोलिस ठाण्यात महापालिकेचे स्वच्छता निरीक्षक अशोक नारायण चावरिया यांनी तक्रार दाखल केली होती. त्यावरून छापे टाकण्यात आले. यामध्ये शहागंज येथील न्यू राज प्रोव्हिजन्सचे हरिष गोकुळचंद केसवानी, फेरीवाला ड्रायफ्रूट विक्रेता अन्वर इब्राहिमखान, ओम प्रो​व्हिजन्सचे विजय शामलालजी छाबडा, अपना किराणा स्टोअर्सचे शेख अहेमद शेख अब्दुल रहेमान व साई तेल भांडारचे सुरेश सरवैये यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करून त्यांच्या ताब्यातून पिशव्या व कप आदी जप्त करण्यात आले.

क्रांतिचौक पोलिस ठाण्यात वॉर्ड अधिकारी संपत येडुबा जरारे यांनी तक्रार दिली होती. त्यांच्या तक्रारीवरून समतानगर येथील न्यू जाकेर किराणा होलसेलरचे शेख जाकेर नूर शेख, समीर किराणा स्टोअर्सचे शेख सरवर शेख गनी व मिटकर शॉपीचे चंद्रकांत फकीरचंद मिटकर यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले.



किमान २०० दंड

या विक्रेत्यांवर भारतीय दंड संहितेच्या कलम १८८ ( लोकसेवकाने दिलेल्या आदेशाचे उल्लंघन करणे), क‌लम २६८ सार्वजनिक आरोग्यास अपायकारक वस्तू बाळगणे, कलम २९० सार्वजनिक उपद्रव करणे यासोबतच महापालिका अधिनियमासह कलम ९ कॅरिबॅग उत्पादन व वापर नियम कायदा २००६, मुंबई पोलिस कायदा कलम ११५, ११७, महाराष्ट्र महापालिका अधिनियम १९४९मधील कलम ३७६ (अ)नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या कलमांनुसार विक्रेत्यांवर किमान २०० रुपये किंवा त्यापेक्षा जास्त रकमेची दंडात्मक कारवाई होऊ शकते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महिला सुरक्षेसाठी संकटमोचक अॅप

$
0
0

औरंगाबाद ः एकटी महिला, विद्यार्थिनी संकटात सापडली आहे. जवळपास कोणी दिसत नाही. मग अशावेळी फक्त हेल्प नावाचे बटण दाबा. अन् पोलिस तुमच्या मदतीला. ग्रामीण पोलिसांनी खास या मोबाइल अॅप्लिकेशनची निर्मिती केली आहे. 'औरंगाबाद ग्रामीण पोलिस' असे या अॅपचे नाव असून ते २ जानेवारीपासून ते कार्यान्वयित होईल.
महिलांच्या सुरक्षेसाठी विशेष उपाय योजना आखल्या जात आहेत. महिला हेल्पलाइन, व्हॅटस् अॅप सुविधा, महिला सुरक्षा पथक, असे उपक्रम सुरू आहेत. त्यात एखाद्या संकटात सापडलेल्या व्यक्तीला तत्काळ मदत मिळावी यासाठी टेक्नॉलॉजीचा प्रभावी वापर करण्याचा निर्णय घेतला व या अॅपची संकल्पना पुढे आली, अशी माहिती पोलिस अधीक्षक नवीनचंद्र रेड्डी यांनी 'मटा'शी बोलताना दिली. मोबाइल अॅप्लिकेशनचे नाव 'औरंगाबाद ग्रामीण पोलिस' असे असून इंग्रजी व मराठी भाषेतही त्याचा वापर करण्याची सुविधा देण्यात आली आहे. यामध्ये अत्याधुनिक तंत्र वापरण्यात आले असून मदत मागणाऱ्या व्यक्तीचे ठिकाणही कळणार आहे.
सुरुवातीला अॅंड्रॉइड मोबाइलवर ही सुविधा उपलब्ध असेल. त्यानंतर टप्प्या-टप्प्याने आवश्यक त्या सुधारणा केल्या जातील. हे अॅप डाउनलोड केलेल्या व्यक्तीने संकटकाळात मदत हवी असल्यास अॅप्सवरील हेल्प नावाचे बटन क्लिक (कॉल) केल्यास नियंत्रण कक्षातील संबंधित अधिकाऱ्यांना ही माहिती मिळेल. तसेच अलर्टबाबत वरिष्ठ दोन अधिकाऱ्यांनाही सूचना प्राप्त होईल. त्यआधारे संबंधितास तत्काळ मदत पुरवली जाईल.
इथेही मिळेल मदत
औरंगाबाद ग्रामीण पोलिस अॅपवर पोलिस अधिकाऱ्याचे दूरध्वनी क्रमांक, नियंत्रण कक्षाचे दूरध्वनी क्रमांक, हेल्पलाइन आदी माहिती दिली आहे. www.aurangabadruralpolice.gov.in हे संकेतस्थळही पोलिसांनी सुरू केले आहे. यासह ९७६३७७६६४४ या मोबाइल क्रमांकावरून मदत मिळेल. महिला, तरुणी, वृद्ध यांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन ग्रामीण पोलिसांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आदेश धुडकावून शुभेच्छाफलक

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
हायकोर्ट, पोलिस आयुक्त, महापालिकेचे आदेश धुडकावून शहरात पुन्हा एकदा शुभेच्छांचे फलक झळकत आहेत. चौकाचौकात व महत्त्वाच्या ठिकाणी असे फलक लावण्यास मनाई करण्यात आली आहे. मात्र, हे आदेश धाब्यावर बसविल्यामुळे शहरात होर्डिंगचे साम्राज्य निर्माण होत आहे.
वाढदिवस, नूतनवर्ष यासह विविध उपक्रमांचे आणि कार्यक्रमांचे होर्डिंग चौकाचौकांमध्ये, मुख्य रस्त्यांच्या बाजूला लावण्यास कोर्टानेच मनाई केली आहे. कोर्टाच्या या आदेशाची अंमलबजावणी राज्याची राजधानी असलेल्या मुंबईपासून केली जाते. औरंगाबादमध्येही दोन वर्षांपूर्वी तत्कालीन पोलिस आयुक्त संजयकुमार यांच्या पुढाकाराने ही कारवाई करण्यात आली. पोलिस आणि महापालिका प्रशासन मिळून विविध चौकांमधील व रस्त्यांच्या बाजूला लावण्यात आलेले होर्डिंग काढून टाकण्याची मोहीम हाती घेण्यात आली होती. त्यामुळे औरंगाबाद शहर होर्डिंगमुक्त झाले होते. आता पुन्हा या शहरात होर्डिंगचे साम्राज्य निर्माण होऊ लागले आहे. सामाजिक कार्यकर्ते सचिन राठी यांनी खासदार चंद्रकांत खैरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्याने शहरात महत्त्वाच्या ठिकाणी भलेमोठे होर्डिंग लावले आहेत. उड्डाणपूल, पैठणगेट, गुलमंडी अशा महत्त्वाच्या ठिकाणी हे होर्डिंग पाहण्यास मिळतात. या होर्डिंगच्या संदर्भात पालिकेच्या मालमत्ता विभागातून मिळालेल्या माहितीनुसार या विभागातून होर्डिंग लावण्यासाठी कोणालाही कोणत्याही प्रकारची परवानगी देण्यात आली नाही. तर सचिन राठी यांनी मात्र आपण परवानगी घेऊनच होर्डिंग लावले आहेत. ज्यांना परवानगी दाखवणे गरजेचे होते त्यांना दाखवली आहे, असे उत्तर दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यापीठात धरणे आंदोलन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
रितसर पत्रव्यवहार करूनही दूषित सांडपाण्याबाबत कार्यवाही करण्यात आली नाही. कर्मचाऱ्यांची पदोन्नतीची प्रकरणे प्रलंबित आहेत. संवैधानिक अधिकारी मिटिंगच्या नावाखाली सर्वाधिक वेळ कुलगुरूंच्याच दालानात बसलेले असतात, त्यामुळे कामकाजावर परिणाम होत असल्याचा आरोप करून विद्यापीठातील काही कर्मचाऱ्यांनी गुरुवारी लाक्षणिक उपोषण केले.

विद्यापीठातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळा परिसरातील मुख्य रस्त्यालगत असलेल्या बंधाऱ्यात दूषित सांडपाणी साचते, त्यामुळे दुर्गंधी पसरते आहे. याबाबत वारंवार पत्रव्यवहार दिल्यानंतरही प्रशासनाकडून कारवाई होत नसल्याने आणि इतर मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले. सेवजेष्ठता यादी सुधारित करा, पदोन्नतीची प्रकरणे निकाली काढा, शिक्षण संचालकांनी दिलेल्या पत्राचे पालन करा, कंत्राटी कर्मचाऱ्यांचा प्रश्न सोडवा, मिटिंगच्या नावाखाली प्रशासकीय कामाकडे, कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले जात आहे. संघटनांना भेटीसाठी वेळ द्या आदी अनेक मागण्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ मागासवर्गीय शिक्षकेतर कर्मचारी संघटनेने केल्या आहेत. यावेळी अध्यक्ष सुभाष बोरीकर, नितीन गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कन्नडमध्ये नववर्षाची पाडापाडीने सुरुवात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कन्नड
कन्नड शहरातील जुने बसस्थानक परिसरातील आरक्षित जागेवरील अतिक्रमण नगर पालिकेच्या पथकाने शुक्रवारी पाडण्यास सुरुवात केली. हा कारवाई मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या दिलेल्या आदेशानुसार करण्यात येत आहे.
अतिक्रमणविरोधी मोहिमेला शुक्रवारी सकाळी ९ वाजता पोलिस बंदोबस्तात सुरुवात झाली. मुख्यधिकारी (भाप्रसे) विपिन इटनकर यांच्या निर्देशानुसार स्वच्छता निरीक्षक नाना गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली आरक्षण क्रमांक २७ वरील ३० अतिक्रमणे पाडण्यात आली. येथे काही पक्क्या घरांचा समावेश होता. तहसील रोडवरील पंचायत समितीच्या भिंतीलगतच्या टपऱ्या दुपारी हटविण्यात आल्या. अतिक्रमण काढणार असल्याची नोटीस नगर पालिकेने बजावली असल्याने बसस्थानक परिसरातील बहुतांश जणांनी स्वतःहून अतिक्रमणे हटविली. ही कारवाई सायंकाळी साडेपाचपर्यंत सुरू होती. या कारवाईत दरम्याने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. पोलिस निरीक्षक सुभाष भुजंग, सहायक पोलिस निरीक्षक डी. एन. पायघन, पोलिस उपनिरीक्षक स्वप्ना शहापूर, नायब तहसीलदार आर. एस. शिंदे, तलाठी विकास वाघ हे उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जीनिंगकडे थकला दोन कोटींचा कर

$
0
0

सिल्लोड : कापूस हंगामात कोट्यवधी रुपयांची उलाढाल करणारे सिल्लोड तालुक्यातील जिनिंग प्रेसिंग कारखाने शासनाचा अकृषक कर भरीत नाही. शासनाचा सुमारे दोन कोटी रुपयांचा कर थकल्यामुळे तहसीलदार संतोष गोरड यांनी ३२ जिनिंग प्रेसिंगची बँक खाती गोठविली आहेत.
सिल्लोड शहर व तालुक्यातील ३२ जिनिंग प्रेसिंग कारखान्यांकडे महसूल विभागाची चालू व थकबाकी असा १ कोटी ९१ लाख ६५३५ रुपयांचा अकृष कर थकला आहे. या रक्कमेपोटी नव्याने आलेले तहसीलदार गोरड यांनी थकबाकीसाठी नोटीस दिली. या नोटीसला कारखानदारांनी प्रतिसाद दिला नाही, करही भरला नाही. त्यामुळे बँक खाती गोठवण्यात आली.कारखान्यांकडील थकबाकी पुढीलप्रमाणेः गुरूकृपा जिनिंग ४,७७, ७२६ रुपये, जयलक्ष्मी जीनिंग ९,२७,११६, नवीन कोटेक्स जिनिंग ७,९६,४८०, किंजल जिनिंग ४,००,३९०, खंडेलवाल जिनिंग ४,३३,६१२, अग्रवाल कोटेक्स ५,५६,९८७, सहकार जिनिंग १२,१८,७२२, मुलचंद फुलचंद जिनिंग ४,५३,६१४, पुनित इंटरप्रायजेस ८,०५,९०६, प्रदीप फायबर्स ११,५४,९२६, शिवम जिनिंग ७,०८,५९८, गौरीशंकर कोटेक्स १०,७१,०६८, मनजित ऑईल २,८५,०५७, राजराजेश्वर कॉटन ९,४७,२६७, हरिओम जिनिंग ७,९६,६७६, सहकार जिनिंग अन्वी ९,७१,५९२, जोशी कोटेक्स ५,३९,७२६, सिद्धेश्वर जिनिंग लिहाखेडी ५,७९,३४९, सहकार जिनिंग अजिंठा ४,१४,५१२, साठे जिनिंग अजिंठा ३,९१,४१९, सहकार जिनिंग भराडी ५,२६,२४०, राधासर्वेश्वर जिनिंग ४,९८,७१४, बागवान कोटजीन ३,०१,६३४, सचिन फाईन ४,७३,७६६, शिवम फायबर्स ८,६५,३५७, रोकडोबा जिनिंग लिहाखेडी ४,३८,८०३, ऋषी फायबर्स १०,८१,५६८, मराठवाडा अॅग्रीकल्चर ४,७५६, शिंदे जिनिंग सावखेडा ९,८४,९५५.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विठ्ठलसृष्टी गृहप्रकल्प; तक्रारदारांची पोलिसांत धाव

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, वाळूज
रांजणगाव शेणपुंजी येथील मौर्या असोशिएटच्या विठ्ठलसृष्टी गृहप्रकल्पात रो-हाऊस बुकिंगमध्ये फसवणूक झालेल्यांची संख्या वाढत आहे. मात्र एमआयडीसी वाळूज पोलिसांकडून तपास होत नसल्याने नागरिकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.
रांजणगाव शेणपुंजीलगत मोर्या असोशिएटने गाजावाजा करून 'विठ्ठलसृष्टी' हा ग्रृहप्रकल्प सुरू केला. येथे एकूण ७५१ घरे बांधण्यात येणार होती. घराच्या आकारमानानुसार नागरिकांकडून बुकिंगची रक्कम घेण्यात आली. त्यापैकी काही जणांना १०० रुपयांच्या बाँडपेपरवर ९ पानाचा करारनामा करून दिला आहे. बुकिंग रक्कम घेऊन गृहप्रकल्प परस्पर रद्द करून फसवणूक केल्याप्रकरणी साहेबराव हिवाळे (रा. रांजणागव शेणपुंजी) व योगेश सुखदेव जगदाळे (रा. हर्सूल सावंगी) यांच्याविरुद्ध एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात नुकताच गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोघांनी गृहप्रकल्प रद्द करून त्या जागेवर प्लॉटिंग केल्याची माहिती मिळाल्यानंतर बुकिंगधाराकांनी विचारणा केली. त्यांना घराऐवजी प्लॉट घ्या, असा सल्ला देण्यात आला, पण अनेकांनी पैसे परत मागितले. रक्कम देण्यास टाळाटाळ केल्याने विजय रामा इंगळे (रा. सैलानीनगर रांजणगाव शेणपुंजी) यांनी २२ डिसेंबर रोजी तक्रार दिली आहे. याची माहिती मिळाल्यानंतर शशीभुषण कुमार, गौतम रामदास मेश्राम, अंकित शरद पाटील, संतोष लक्ष्मण निकम, प्रदीपकुमार वर्मा, राजू केशव कांबळे, अविनाश विलास झुंजार, योगेश भगवान चौधरी, जोगेंद्र आर. प्रजापती, लक्ष्मण तुमाराम लांडे, राजाराम अबादे, दत्ता सुखेदव शिंदे, अखिलेश मालाकार, मुकेश एकनाथ मेश्राम, रामआवातर अवधूत गोंड, लता राठी यांनी पोलिसात धाव घेतली आहे. या प्रकरणाचे गाभीर्य लक्षात घेऊन तपास करावा, अशी मागणी आहे.
रो-हाऊसच्या आकारानुसार ५० हजार ते ३ लाख ६० हजार रुपये देऊन बुकिंग केल्याचे पोलिसांना सांगितले. ही फसवणूक जवळपास २० लाख रुपयांपर्यंत आहे. याप्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक महेश बाळासाहेब टाक करत आहेत. त्यांनी वरील नागरिकांना मंगळवारी चौकशीसाठी पोलिस ठाण्यात बोलावले होते. परंतु, ते दिवसभर फिरकलेच नाहीत. त्यानंतरही तक्रारदार पोलिस ठाण्यात खेटे घालत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ग्रामपंचायतींना दोन लाखांची पुस्तके

$
0
0

वैजापूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती वर्षानिमित्त 'बार्टी' च्या वतीने तालुक्यात समता रथाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमात तालुक्यातील ग्रामपंचायतींना संत-महापुरुषाच्या विचारांच्या १५ पुस्तकांचा संच मोफत देण्यात आला. तालुक्यात सुमारे दोन लाख रुपयांची पुस्तके वाटप करण्यात येत आहेत.
पुणे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेमार्फत (बार्टी) काढण्यात आलेल्या समता रथाचे शहरात आगमन झाल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले यांच्या पुतळ्यास अभिवादन करुन रथाचे स्वागत करण्यात आले. तालुक्यातील डवाळा, खबाळा, घायगांव, वैजापूर ग्रामीण एक, महालगाव, चिंचडगाव, जाबरगाव, चोरवाघलगांव, लाडगाव, विरगाव, खंडाळा, जरूळ, शिवूर आदी ग्रामपंचायतींना या पुस्तकांचे संच देण्यात आले. या रथामध्ये समतादूत सागर सोनवणे, विलास म्हस्के, रमा साळवे, नानेश्वर सोनवणे, शशिकांत कांबळे यांनी पथनाट्य करून समाज प्रबोधन केले. यावेळी कृष्णराव कांबळे, राजेश गायकवाड, कृषी अधिकारी हणमंत बोयनर, साहेबराव पडवळ, राजू पडवळ, ज्ञानेश्वर घोडके, प्रवीण ताबे, आबासाहेब जेजूरकर, जगन गायकवाड ,अनिल आल्हाट आदींची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘थकित मानधनवाढ त्वर‌ित द्या’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
एप्रिल २०१४ पासूनचे थकित मानधनवाढ त्वरित द्यावे, निवृत्त कर्मचाऱ्यांना एकरकमी एक लाख रुपये द्यावे यासह विविध आठ ठराव गंगापूर येथे आयोजित अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मेळाव्यात मंजूर करण्यात आले.
आयटकप्रणित महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियनतर्फे या मेळाव्याचे आयोजन गंगापूर येथील गटसाधना केंद्रात शुक्रवारी करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी युनियनचे नेते कॉ. राम बाहेती होते. रजिस्टर व विविध छापील अर्ज संबंधित विभागाने पुरविले पाहिजे, १ एप्रिल २०१४ पासूनचे थकित मानधनवाढ त्वरित द्यावी, निवृत्त कर्मचाऱ्यांना एकरकमी एक लाख रुपये द्यावेत, ऑनलाइन पेमेंटची पद्धत रद्द करा, अंगणवाडी कर्मचाऱ्यांसह सर्व असंघटित कामगारांसाठी पहिला वेतन आयोग लागू करा हे ठराव करण्यात आले. या मागण्यांसह इतर प्रश्नांसाठी २२ जानेवारी रोजी गंगापूर तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा कॉ. बाहेती यांनी यावेळी दिला. या मेळाव्याला छाया पोटे, सुमन प्रधान, चंचल खंडागळे, कैलास कांबळे यांच्यासह मोठ्या संख्येने अंगणवाडी कर्मचारी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

किराणा दुकान मध्यरात्री खाक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, वाळूज
पंढरपूर येथील एक किराणा दुकान शॉटसर्किटमुळे लागलेल्या आगीत भस्मसात झाले. या दुकानातील माल व फर्निचर जळून मोठे नुकसान झाले आहे. अग्निशमन दलाच्या जवानांसह नागरिकांनी धाव घेऊन आग आटोक्यात आणली. ही घटना गुरुवारी मध्यरात्री घडली.
पंढरपूर येथील विलास एकनाथ खाडे यांचे पाटोदा रस्त्यावर सम्राट अशोक शाळेलगत रसिकराज किराण स्टोअर्स आहे. ते नेहमीप्रमाणे दुकान बंद करून गुरुवारी सायंकाळी नववर्षानिमित्त सहकुटंब शिर्डी येथे दर्शनासाठी गेले होते. काही नागरिकांनी त्यांना मध्यरात्री फोन करून दुकानातून आगीचे लोळ बाहेर पडत असल्याचे कळवले. त्यांनी या घटनेची माहिती तत्काळ वाळूज येथील अग्निशमन केंद्रात दिली. तोपर्यंत शेजारच्या नागरिकांनी आग विझवण्यासाठी धावधाव केली. अग्निशमन बंबाने आग आटोक्यात आणेपर्यंत दुकानातील फर्निचर, किराणा सामान जळून खाक झाले. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा अंदाज अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला. याप्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिनिंग प्रेसिंगवर अजिंठ्यात गुन्हा

$
0
0

सिल्लोडः विनापरवाना कापूस खरेदी-विक्री केला व कृषी उत्पन्न बाजार समितीचा कर न भरल्याच्या आरोपावरून तालुक्यातील लिहाखेडी येथील रोकडोबा जिनिंग प्रेसिंगवर अजिंठा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही फिर्याद कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव विश्वास पाटील यांनी दिली. रोकडोबा जिनिंग प्रेसिंग कारखान्यात बाजार समितीने वेळोवेळी तपासणी केली. येथे होत असलेली कापूस खरेदी-विक्री व उलाढालीची माहिती बाजार समितीला द्यावी, असे लेखी देण्यात आले. परंतु अजय जैन यांनी (रोकडोबा जिनिंग) विनापरवाना खरेदी सुरू ठेवली. बाजार समितीने परवाना रद्द केल्यानंतरही जैन यांनी कापूस खरेदी सुरू ठेवल्याने अजिंठा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी सहायक पोलिस निरीक्षक शंकर शिंदे तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खासदार, आमदारांचा विभाजनास विरोध

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
महावितरणचे पाच कंपन्यांमध्ये विभाजन करण्यास खासदार चंद्रकांत खैरे व आमदार संजय शिरसाठ यांनी विरोध केला आहे. या निर्णयाच्या विरोधात संसदेत प्रश्न उपस्थित करू, असे आश्वासन खासदार खैरे यांनी दिले.
महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार संघटनेच्या १८ व्या वर्धापन दिनानिमित्त मौलाना अबुल कलाम आझाद सभागृहात कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला खासदार खैरे, आमदार शिरसाठ, संघटनेचे कार्याध्यक्ष बाबा वाकडे, उपाध्यक्ष डी. एन. देवकाते, सरचिटणीस सय्यद जहिरोद्दिन, संघटन सचिव आर. पी. थोरात, भाऊसाहेब भाकरे यांची प्रमुख उपस्थिती होती. सय्यद जहिरोद्दीन यांनी जीटीएलकडून शहरातील वीज वितरण महावितरणाकडे देण्यात आले, पण अद्याप पुरसे कर्मचारी मिळाले नसल्याबद्दल खंत व्यक्त केली. उलट वसुलीसाठी अधिकाऱ्यांचा दबाव वाढल्याची तक्रार केली.
जीटीएल कंपनीला माझा पहिल्यापासून विरोध होता. आता महावितरणचे पाच कंपन्यांमध्ये विभाजन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाला विधानसभेत विरोध करू, असे आमदार शिरसाट म्हणाले. महावितरणचे विभाजन कदापी होऊ देणार नसल्याची प्रतिज्ञा त्यांनी केली. खासदार खैरे यांनीही विभाजनाला कडाडून विरोध केला. तत्कालीन उर्जामंत्री पी. एम. सईद यांची भेट घेऊन महावितरणचे विभाजन न करण्याची सूचना केली होती, त्यामुळे तेव्हा सहा महिने विभाजन लांबले. आताही पाच कंपन्या करण्याचा प्रस्ताव देण्यात आला असून त्याला संसदेत विरोध करणार असल्याचे खासदार खैरे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


एसटी बससेवा वेरूळ लेणीत सुरू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
वेरूळ लेणी परिसरात खासगी वाहनांना प्रवेशबंदीचा लागू करून पर्यटकांसाठी एसटी बस सेवा सुरू केली आहे. या सेवेला पहिल्या दिवशी ३७ हजार रुपयांचा महसूल मिळाला. या सेवेचा १८२२ पर्यटकांनी लाभ घेतला.वेरूळ लेणी येथील पार्किंग १ जानेवारीपासून पर्यटक केंद्रात स्थलांतरित करण्यात आली आहे. पर्यटक केंद्र ते वेरूळ लेणी या प्रवासाकरिता एसटी महामंडळाने सेवा सुरू केली. यासाठी चार सिटीबस व दोन निमआराम बसची व्यवस्था करण्यात आली आहे. पहिल्या दिवशी शुक्रवारी ५२ फेऱ्यांमधून १८२२ प्रवाशांनी प्रवास केला. त्यातून ३७,७६० रुपयांचा महसूल मिळाल्याचे सांगण्यात आले. पर्यटकांनी निमआरामऐवजी सिटीबसला पसंती दिली, त्यामुळे शनिवारपासून आणखी दोन सिटीबस उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वच्छता मित्र स्पर्धा वैजापूरमध्ये उत्साहात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, वैजापूर
येथील विनायकराव पाटील महाविद्यालयाच्या स्वामी विवेकानंद सभागृहात बुधवारी (३० डिसेंबर) पाणीपुरवठा व स्वच्छता या विषयावर स्वच्छता मित्र वक्तृत्व करंडक स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत कनिष्ठ व वरिष्ठ गटात ४० स्पर्धकांनी सहभाग नोंदवला.
राज्य शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागातर्फे घेण्यात आलेल्या या स्पर्धेचे आयोजन जिल्हा परिषद, पंचायत समिती व विनायकराव पाटील महाविद्यालयाने केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवाजी थोरे यांनी स्पर्धेचे उद्घाटन केले. यावेळी पंचायत समिती उपसभापती सुभाष जाधव, गटविकास अधिकारी डी. एस. अहिरे, विस्तार अधिकारी एच. बी.कहाटे, मराठी विभाग प्रमुख डॉ. ललित अधाने, प्रा. संभाजी जाधव, विस्तार अधिकारी व्ही. पी. पंडित, गटसमन्वयक पी. आर. गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती. माजी शिक्षणाधिकारी धोंडिरामसिंह राजपूत, प्रा. ज्ञानेश्वर खिल्लारी, प्रा. बाळासाहेब गायके यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. दोन्ही गटात प्रथम विजेत्यास पाच हजार रुपये, द्वितीय विजेत्यास तीन हजार रुपये व तृतीय क्रमांकास दोन हजार रुपयांचे रोख बक्षीस व प्रशिस्तीपत्र देण्यात आले. विजेत्यांची नावे पुढीलप्रमाणेः वरिष्ठ गट संदीप राऊत (प्रथम), प्रियंका तांबे (द्वितीय), पूजा विसपूते (तृतीय) कनिष्ठ गट दीपक थोरात (प्रथम), विशाल नागुडे (द्वितीय), आरती पवार (तृतीय).

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सातारा-देवळाईत पुन्हा पालिका

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, सातारा
महापालिकेत समाविष्ट केलेल्या सातारा-देवळाईसाठी आता पुन्हा एकदा नगर पालिका स्थापना करण्यात आला आहे. नगर पालिकेचे कामकाज शुक्रवारपासून (एक जानेवारी) सुरू झाले आहे. नागरिकांनी दाखल केलेल्या आक्षेपांच्या सुनावणीनंतर महापालिका की नगर पालिका, हा प्रश्न निकाली निघणार आहे.
महापालिकेचे वॉर्ड अधिकारी सी. एम. अभंग यांनी प्रशासक रमेश मुंडलोड, मुख्याधिकारी अशोक कायंदे यांच्याकडे पदभार सोपवला. सातारा-देवळाई भागाचा कारभार गेल्या ७ महिन्यांपासून महापालिकेकडे होता, परंतु अधिसूचनेवरील हरकतींवरील सुनावणी होऊन हस्तांतर झाले नसल्याने या परिसरात तांत्रिकदृष्ट्या नगर पालिकाच होती. त्यामुळे महापालिकेने पाणीपुरवठा, साफसफाई, आरोग्य केंद्र याशिवाय अन्य कामे केली नाहीत. त्यामुळे दीड वर्षापासून येथील पथदिवे बंद राहिले. परिणामी नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागला. या भागातील कामे महापालिकेने ३१ डिसेंबर २०१५पासून बंद केली. त्याच्या दोन दिवसांआधी महापालिकेचे शहर अभियंता सखाराम पानझडे यांनी विभागीय आयुक्तांची भेट घेऊन पालिका पाणीपुरवठा करणार नसल्याचे सांगितले होते. तेव्हापासूनच या भागातून महापाकेने काढता पाय घेणार हे स्पष्ट झाले होते. त्यामुळे प्रशासनाने सातारा-देवळाई नगर पालिकेसाठी दोन अधिकाऱ्यांची नियुक्ती केली. या अधिकाऱ्यांनी सूत्रे स्वीकारल्यानंतर नगर पालिकेचे शुक्रवारपासून कामकाज सुरू झाले.
या पावसाळ्यात अत्यल्प पाऊस पडल्याने परिसरात तीव्र पाणीटंचाई भासत आहे. त्यामुळे परिसरातील बांधकामे थांबवावीत, असे आवाहन नगर पालिकेतर्फे करण्यात आले आहे. प्रशासक व मुख्याधिकाऱ्यांचे जावेद पटेल, बाळासाहेब गायकवाड, हरिभाऊ राठोड, नामदेव बाजड, संतोष मंत्री, रोहन काळे आदींनी स्वागत केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मेल हॅक करून ‘कॉस्मो’ला ५७ लाखांना गंडविले

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, वाळूज
वाळूज एमआयडीसीतील एच. आर. कॉस्मो फिल्म लिमिटेड कंपनीच्या उपव्यवस्थापकांचा ई-मेल आयडीचा पासवर्ड चोरून ब्रिटनमधील बँकेच्या खात्यातून तब्बल ५६ लाख ७८ हजार ६६२ रुपये पळविल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला. याप्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात आज्ञात व्यक्तीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार; वाळूज एमआयडीसीतील एच. आर. कॉस्मो फिल्म कंपनीतील उपव्यवस्थापक योगीता तोष्णीवाल यांचा कंपनीच्या ई-मेल आयडीचा पासवर्ड आज्ञात व्यक्तीने चोरून घेतला. या मेल आयडीवरून तुर्कस्तानमधील ग्राहकांना ई-मेल पाठविल्याचे भासविण्यात आले. कंपनीने या ग्राहकाला विक्री केलेल्या मालाचे तब्बल ५६ लाख ७८ हजार ६६२ रुपये तोष्णीवाल यांच्या ब्रिटनमधील बँक खात्यातून वळती करण्यात आली. त्यांचे नॅशनल वेस्टमिनिस्टर बँकेत खाते आहे. या खात्यावरून रक्कम चोरण्यात आली आहे. हा प्रकार गेल्या महिन्यात २२ डिसेंबर रोजी घडला. याप्रकरणी राजीव बालमुकुंद जोशी यांनी गुरुवारी (३१ डिसेंबर) राजी रात्री उशिरा दिलेल्या तक्ररारीवरून आज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलिस निरीक्षक रामेश्वर थोरात हे करत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

झणझणीत वडी रस्सा

$
0
0




Shripad.Kulkarni
@timesgroup.com
बेसन, अर्थात पिठल्याच्या वडीवर गरम गरम, झणझणीत रस्सा आणि सोबतीला गरम भाकरी... हा बेत खवय्यांच्या आवडीचा. वडी रस्सा हा महाराष्ट्रीय पदार्थ. विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागात हा पदार्थ आवडीने खाल्ला जातो.
मसालेदार, झणझणीत 'वडी रस्सा' ही पडेगावातील ओळख. पिठल्यापासून वड्या तयार केल्या जातात. जिरे, कोथिंबीर, मीठ, हळद, आलं-लसूण टाकून तयार केलेल्या पिठल्याच्या वड्या तयार केल्या जातात. पिठलं तयार करण्याची खास पद्धत आहे. पिठलं शिजवताना अर्धा ते पाऊण तास घोटावे लागते. संपूर्ण पिठलं एकजीव केले जाते. शिजल्यावर पिठले एका प्लेटवर पसरवितात. त्यापूर्वी प्लेटला तेल लावतात. बारा ते पंधरा मिनिटांत ते आळून येते. त्यानंतर पिठल्याच्या शंकरपाळ्याच्या आकाराच्या वड्या कापून घेतात. या वड्यांची जाडी सुमारे अर्धा सेंटीमीटरपर्यंत असते. रस्सा तयार करण्याची पद्धतीही वैशिष्टपूर्ण आहे. रस्स्यासाठी गरम मसाला (काळा मसाला) वाटून तयार करतात. त्यात धणे, दालचिनी, शहाजिरे, दगडफूल, तमालपत्र, लवंग, मिरे, खसखस, गोडंबी, मसाला विलायची, नाकेतोळ, स्टारफूल आदी १५ ते १७ मसाल्याचे पदार्थ वापरतात. हे पदार्थ भाजल्यानंतर वाटून घेतले जातात. प्रत्येक पदार्थाचे प्रमाण ठरलेले असल्याचे 'उज्ज्वल'चे संचालक साहेबराव बनकर, व्यवस्थापक जी.एस. पिंजरकर सांगतात. कांदा, आलं, लसूण, कोथिंबीर, लाल मिर्ची यांच्या फोडणीत मसाला टाकून रस्सा तयार केला जातो. रश्शाला उकळी आल्यानंतर अर्धा ते पाऊण तासाने मसाल्याचा विशिष्ट वास दरवळतो. रश्शासाठी मसाल्याचे माप ठरलेले असते. त्यामुळे चवीमध्ये कधीही बदल होत नाही. काळ्या मसाल्याचा 'थिक ग्रेव्ही' स्वरुपातील रस्सा वड्यांवर टाकून सर्व्ह केला जातो. गरम मसाल्यात वापरलेल्या पदार्थांची चव रस्सा खाताना ठळकपणे जाणवते. रस्सा झणझणीत आहे, मात्र तिखट नाही. रश्शाचा बेस काळा मसाला आहे. तिखट चवीनुसार वापरले जाते. रस्त्यात तेलाचे प्रमाणही अन्य मसालेदार भाज्यांच्या तुलनेत कमी असते. मसाला वाटून एकजीव केलेला असतो. त्यासाठी वापरलेले पदार्थ मिसळून एक विशिष्ट चव रस्स्याला येते. गरम रश्शातून येणारा मसाल्याचा गंध खाणाऱ्यांच्या मनात दीर्घकाळ घर करून राहतो.
बेसन करताना ते भरपूर घोटले असल्याचा अनुभव वड्या खाताना येतो. या वड्या रश्शासोबत खाताना सहजपणे विरघळतात. वड्या खाताना लसूण आणि कोथिंबिरीचा स्वादही जाणवतो. वडी रस्सा आणि भाकरी या मेन्यूला खवय्यांची पसंती असते. अनेक जण वडी रस्स्यात भाकरी कुस्करून खातात. एकदा झणझणीत वडी रस्सा खाल्यास त्याचा स्वाद जिभेवर दीर्घकाळ नक्कीच रहातो. काळ्या मसाल्यात केलेल्या रश्शामुळे ऑसिडिटीचा त्रास होण्याची शक्यता नाही. सुमारे ३० वर्षांपूर्वी पडेगावात उज्ज्वल रेस्तराँची सुरुवात झाली, ती वडी रस्सा या पदार्थापासून. अनेक औरंगाबादकर वडी रस्सा खाण्यासाठी पडेगावात विकएंडला जातात, असा अनुभव आहे.






मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images