Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

महा-पेडिक्रिटिकॉन’ परिषद शनिवार-रविवारी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
बालरोग अतिदक्षता विषयांमधील वेगवेगळ्या विषय-उपविषयांवर बालरोगतज्ज्ञांची दुसरी राज्यस्तरीय परिषद शनिवार व रविवारी (९ व १० जानेवारी) हॉटेल रामा इंटरनॅशनल येथे होणार आहे. बालरोगतज्ज्ञांची शहर संघटना तसेच संघटनेच्या राज्यस्तरीय अतिदक्षता शाखेच्या वतीने व 'आयएमए'च्या शहर शाखेच्या सहकार्याने ही परिषद होणार आहे.

'बियाँड सेव्हिंग लाइव्ज' या संकल्पनेवर आधारित 'महा-पेडिक्रिटिकॉन २०१५-१६' या परिषदेमध्ये शनिवारी सकाळी आठ ते दुपारी एक या वेळेत मेकॅनिकल व्हेन्टिलेशन, प्रोसिजर्स इन पीआयसीयू, पेरिटोनिअल डायलिसिस, अॅडव्हान्स्ड सेप्सिस मॅनेजमेंट, सर्व्हाव्हल ऑफ सिकेस्ट या विषयांवर कार्यशाळा होईल. शनिवारी दुपारी दोन ते सायंकाळी साडेसात दरम्यान 'अॅडव्हान्सेस इन पेडियाट्रिक क्रिटिकल केअर', 'इमर्जन्सिस इन ऑफिस प्रॅक्टिस' व 'इन्फेक्शियस डिसिजेस इन पीआयसीयू' या विषयांवर चर्चासत्र होणार आहेत. रविवारी सकाळी आठ ते साडेपाच दरम्यान बालरोग अतिदक्षता विषयांवर चचर्सत्र तसेच मान्यवरांचे मार्गदर्शन होणार आहे. या परिषदेमध्ये डॉ. सुनीत सिंघी (चंदिगढ), डॉ. क्रिशन चुघ (दिल्ली), डॉ. उमा अली (मुंबई), डॉ. सोनू उडानी (मुंबई), डॉ. सुचित्रा रणजित (चेन्नई), आनंद शांडिल्य (मुंबई), डॉ. प्रमोद जोग (पुणे), डॉ. सतीश देवपुजारी (नागपूर), डॉ. विश्राम बुचे (नागपूर), डॉ. मधुमती ओटिव्ह (पुणे), डॉ. संजय घोरपडे (सातारा), डॉ. परमानंद आंदणकर (मुंबई) आदी राष्ट्रीय स्तरावरील प्रख्यात तज्ज्ञ सहभागी होणार आहेत. याशिवाय विविध राज्यातील नामांकित बालरोगतज्ज्ञ परिषदेमध्ये सहभागी होणार आहेत. परिषदेच्या संयोजन समितीचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र खडके, सचिव डॉ. मंदार देशपांडे हे आहेत. परिषदेमध्ये सुमारे ५००पेक्षा डॉक्टर सहभागी होतील, अशी अपेक्षा आहे.


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


लोकशाही दिनीही फरफट सुरू

$
0
0



औरंगाबाद : लोकशाही दिनाची वेळ बदल्याने तक्रारदारांना सोमवारी दुपारी अडीचपर्यंत ताटकळावे लागले. जनतेच्या तक्रारी, अडचणी न्याय पध्दतीने लगेच सुटाव्यात यासाठी प्रभावी उपाययोजना म्हणून शासनामार्फत सर्व स्तरावर लोकशाही दिन राबवण्यात येतो. मात्र, लालफितीत अडकेला कारभार आणि ढिसाळ नियोजनामुळे सर्वसामान्यांची लोकशाही दिनीही फरफट सुरू होती. प्रशासनाने अचानक लोकशाही दिनाची वेळ ११ ऐवजी दुपारी १ केली. मात्र त्याची माहिती तक्रारदारांना नव्हती. कहर म्हणजे दुपारी एक वाजता सुरू होणारा लोकशाही दिन दोन वाजता सुरू झाला. जिल्हाधिकारी निधी पांडेय तर चक्क अडीचला आल्या. त्यामुळे तक्रारदारांना दुपारी अडीचपर्यंत ताटकळत बसावे लागले. डीपीसी हॉलच्या बाहेर तक्रारदारांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. येथेही ओळखीच्या लोकांचा पहिल्यांदा नंबर लावणे सुरू होते, असा असा आरोप तक्रारदारांनी केला.

जिल्हाधिकारी आले अडीचला
बदलेल्या वेळेनुसार दुपारी दोननंतर लोकशाही दिनाला सुरुवात झाली. जिल्हाधिकारी निधी पांडेय मात्र दुपारी अडीचनंतर आल्या. तत्पूर्वी निवासी जिल्हाधिकारी, अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी लोकांच्या तक्रारी जाणून घेतल्या. यात सर्वाधिक तक्रारी महसूल विभागाच्या होत्या. एकूण अर्जांपैकी केवळ ७ प्रकरणे निकाली काढण्यात आली.

सोमवारचे चित्र
१०४ अर्जांची नोंदणी
२३ अर्ज जिल्हा परिषद
४० अर्ज महसूल
१५ अर्ज इतर विभाग
७ अर्ज विद्युत विभाग ७
६ अर्ज पोलिस
३ अर्ज पाटबांधारे विभाग
२ अर्ज महापालिका
१ अर्ज सार्वजनिक बांधकाम विभाग









मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उड्डाणपूल उभारूनही रेल्वे क्राॅसिंगचा वापर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
संग्रामनगर रेल्वे उड्डाणपूल उभारल्यानंतरही लोहमार्गावरून वाहतूक सुरू आहे. संग्रामनगर रेल्वे रुळावर तात्पुरते रेल्वे गेट तयार करण्यात आले होते. पूल उभारल्यानंतरही क्रॉसिंग गेट बंद केलेले नाही. आता या रेल्वे क्रॉसिंगवर वाहनांची संख्या वाढण्यास सुरुवात झाली आहे. त्याशिवाय पुलाखालील लोहमार्गावरूही वाहनांची ये-जा सुरू असल्याने अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे.

औरंगाबाद शहरातून बीड बायपासकडे जाण्यासाठी शहानूरमियॉ दर्ग्याजवळील संग्रामनगर रेल्वे गेट बंद करून उड्डाणपूल उभारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. सुमारे दोन वर्षांपूर्वी पुलाचे काम पूर्ण करण्यात आले. पूल उभारताना रेल्वेने तात्पुरते गेट उभारले होते. हे रेल्वे क्रॉसिंग गेट उड्डाणपूल उभारल्यानंतर बंद करण्यात येणार होते, मात्र स्थानिक नागरिकांच्या विरोधामुळे गेट हटविण्यात आले नाही.

या गेटचा वापर सध्या वाढत आहे. अनेक दुचाकी वाहने उड्डाणपुलावरून न जाता रेल्वे क्रासिंगचा वापर करतात. यामुळे या भागातही वाहनांची वर्दळ वाढत चालली आहे. याशिवाय पुलाखालूनही काही दुचाकी रेल्वे क्रॉसिंग गेटमधून बीड बायपासकडे जातात. त्यामुळे अपघतांची शक्यता निर्माण झाली आहे.

रेल्वेला आर्थिक फटका
उड्डाणपूल तयार झाल्यानंतर गेट बंद न केल्याने तेथे रेल्वेला तीन कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी लागली आहे. त्यांच्या वेतनावर दरमहा दीड लाख रुपये खर्च करावे लागत आहेत. ही क्रॉसिंग सुरू असल्यामुळे दरवर्षी १८ लाखांचा फटका रेल्वेला सहन करावा लागत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अडीच हजारांची लाच घेताना बदनापूरचा जमादार गजाआड

$
0
0


औरंगाबाद : अडीच हजारांची लाच घेणाऱ्या बदनापूरच्या पोलिस ‌हवालदाराला लाच लुचपत प्रतिबंधक पथकाने गजाआड केले. सोमवारी दुपारी चार वाजता बदनापूर येथे ही कारवाई करण्यात आली. आरोपीवर चॅप्टर केस न करण्यासाठी या लाचेची मागणी करण्यात आली होती.
बदनापूर पोलिस ठाण्यात एका तरुणावर मारहाणीचा गुन्हा दाखल आहे. या आरोपीला तपास अधिकारी हवालदार रावसाहेब तांबे यानी अटक करून शनिवारी कोर्टात हजर केले असता त्याची जामीनावर सुटका करण्यात आली. दरम्यान त्याच्यावर चॅप्टर केस न करण्यासाठी तांबे याने पाच हजारांची लाच मागितली होती. या प्रकरणी आरोपीच्या भावाने औरंगाबाद येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधत तक्रार दिली. या तक्रारीवरून सोमवारी बदनापूर येथे सापळा रचण्यात आला. येथील कल्याणी हॉटेलजवळ तांबे यांना अडीच हजाराची लाच घेताना अटक करण्यात आली. या प्रकरणी बदनापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी, अप्पर अधीक्षक सुदर्शन मुंढे, उपअधीक्षक प्रकाश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक कृष्णा शिंदे, भरत राठोड आदींनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बारमालक, शिक्षकालाही गंडा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

रिझर्व्ह बँकेचा रिलीज फंड देण्याचे आमिष दाखवून गंडा घालणाऱ्या टोळीने इतरांना देखील गंडा घातल्याचे समोर आले आहे. उस्मानाबाद येथील बारमालक व परभणी येथील शिक्षकाने देखील या प्रकरणी सोमवारी आर्थिक गुन्हेशाखेत धाव घेत तक्रार दिली. २७ कोटी रूपये मिळणार असल्याचे आमिष रिझर्व्ह बँकेचे बनावट पत्र तयार करून या टोळीने गुंतवणूकदारांना दाखविले होते.

शहरातील व्यवसायिक अभिजित कुलकर्णी यांना ३५ लाखांचा गंडा घातल्याप्रकरणी पुण्याच्या मातंगी संस्थेच्या निवेदिता कुलकर्णी, विश्वनाथ अवचट, रिझर्व्ह बँकेचा कर्मचारी अशोक जंगम, परभणीचा बाळासाहेब दैठणकर, कमलाकर कुलकर्णी यांच्यासह कोल्हापूरचा एसटी कर्मचारी सुरेश चव्हाण यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी निवेदिता कुलकर्णी व विश्वनाथ अवचटला अटक केली आहे. दरम्यान, या टोळीने राज्यात अनेकांना गंडा घातल्याचे समोर येत आहे. उस्मानाबाद येथील भुजंग गुंडू शेट्टी यांचे दोन बियर बार होते. कोल्हापूरच्या सुरेश चव्हाणशी त्यांची ओळख झाली. त्यांना देखील रिझर्व्ह बँकेचे बनावट पत्र दाखवित रिलीज फंड मिळणार असल्याचे आमिष दाखविण्यात आले.

या आमिषाला बळी पडून त्यांनी बारची विक्री करून चव्हाणच्या खात्यावर २५ लाख रुपये भरले तर अशोक जंगमला मुंबई येथे १५ लाख रुपये रोख दिले होते. तसेच परभणी येथील शिक्षक संतोष पेंडलवार यांनी देखील या टोळीच्या आमिषाला भुलून मातंगी एंटरप्रायजेसच्या खात्यावर १९ लाख रुपये भरले होते.

रिझर्व्ह बँकेचे बनावट पत्र केले तयार

रिझर्व्ह बँकेने को ऑपरेटिव्ह बँकेला दिलेल्या परिपत्रकाचा क्रमांक आरोपी जंगम याने मिळविला होता. याचा वापर करीत मातंगी एंटरप्रायजेसला २७ कोटींचा रिलीज फंड मिळणार असल्याचे बनावट पत्र त्याने तयार केले होते. या पत्रासाठी लागणारा कच्चा मसूदा त्याने निवेदिता कुलकर्णीच्या डायरीत लिहीला होता. पोलिसांनी ही डायरी जप्त केल्यानंतर हा प्रकार उघड आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सत्संग कार्यक्रमातून मोबाइल लंपास

$
0
0

औरंगाबाद : विभागीय क्रीडा संकुल येथून सत्संगाच्या कार्यक्रमातून मंगळसूत्र व मोबाइल लंपास करण्यात आले. रविवारी सायंकाळी हा प्रकार घडला. याप्रकरणी जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रविवारी सायंकाळी विभागीय क्रीडा संकुल येथे धार्मिक गुरू अण्णासाहेब मोरे यांच्या सत्संगाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला संगीता रणछोड हंडाटे (रा. विशालनगर) ही महिला गेली होती. यावेळी गर्दीमध्ये चोरट्यांनी त्यांचे साडेनऊ हजार रुपयांचे मंगळसूत्र लंपास केले. त्याचप्रमाणे अनिल नाथाराव काकडे (वय ४५ रा. शिवाजीनगर, एन ११) या भाविकाचा दहा हजार रुपयांचा मोबाइल याच कार्यक्रमातून चोरट्यांनी लांबविला. या दोन्ही घटनांप्रकरणी पोलिस ठाण्यात चोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चिमुकलीला सोडून माता पसार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

अडीच महिन्यांच्या तान्ह्या चिमुकलीला सोडून माता पसार झाली. अयोध्यानगरी येथील जंगलात सोमवारी दुपारी हा प्रकार घडला. नागरिकांच्या सतर्कतेने या बालिकेचा जीव वाचला असून बाळाला घाटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

कर्णपुराजवळील अयोध्यानगरी मैदानाच्या मागील बाजूस दाट झाडीचा परिसर आहे. दुपारी तीन वाजेच्या सुमारास तेथून जाणारी महिला निर्मला बिलेगे यांना लहान बाळाच्या रडण्याचा आवाज आला. एका मखमली चादरीमध्ये चिमुरडी त्यांना आढळली. तिच्या अंगात स्वेटर व टोपी देखील होती. बिलेगे यांनी कर्णपुरा येथील नागरिकांना याबाबत माहिती दिली. स्थानिक लक्ष्मणराव देशमुख व इतर नागरिकांनी या ठिकाणी धाव घेतली. या मुलीला बाहेर काढण्यात आले. नियंत्रण कक्षाला याबाबत माहिती दिली. घटनास्थळी रुग्णवाहिकेसह डॉक्टर दाखल झाले. या मुलीला घाटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तिची तपासणी केली असता प्रकृती ठणठणीत होती. या प्रकरणी छावणी पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

वाहनाच्या धडकेत पादचारी महिला ठार

भरधाव वाहनाने दिलेल्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या महिलेचा उपचारादरम्यान सोमवारी पहाटे मृत्यू झाला. चंद्रकला भिमराव शिंदे (वय ५५ रा. एन २, रामनगर) असे या मृत महिलेचे नाव आहे.

चंद्रकला शिंदे या २५ डिसेंबर रोजी लग्न समारंभासाठी बाहेर गेल्या होत्या. समारंभावरून परतल्यानंतर रामनगर येथील बसस्टॉपवर त्या उतरल्या. रस्ता ओलांडत असताना त्यांना भरधाव वेगाने जाणाऱ्या वाहनाने ‌धडक दिली. यामध्ये डोक्याला गंभीर जखम झाल्याने त्या जखमी झाल्या. त्यांना उपचारासाठी खासगी हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर शस्त्रक्रिया देखील करण्यात आली होती. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नऊ आरोपींचा जामीन फेटाळला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

जनावरे चरण्याच्या कारणावरून गंभीर मारहाण करणाऱ्या ९ आरोपींचा अटकपूर्व जामीन अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर. आर. काकाणी यांनी नुकताच फेटाळला. या प्रकरणी मोईन बशीर खान (रा. अंभई, ता. सिल्लोड) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, १२ डिसेंबर २०१५ रोजी सकाळी नऊच्या सुमारास आरोपी गुलाब इंदास सैय्यद याची जनावरे फिर्यादीच्या शेताच्या कडब्यावर गेली असता फिर्यादीचा भाऊ अमजद पठाण याने जनावरे घेऊन जाण्याचे सांगितले. त्यावर गुलाब इंदास सैय्यद याने फिर्यादीच्या भावाला दगडाने मारहाण केली. त्याच दिवशी दुपाची चार वाजता फिर्यादी दुकानावर टीव्ही दुरुस्त करीत असताना, आरोपी सलीम गुलाब सैय्यद, कलीम गुलाब सैय्यद, मोबीन गुलाब सैय्यद हे तिथे आले व त्यांनी फिर्यादीला जिवे मारण्याची धमकी देत आरोपी सलीमने फिर्यादीच्या डोक्यात टीव्ही फोडला, तर इतरांनी लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली.

ग्रामस्थांनी फिर्यादीची सुटका करून त्याला घरी पाठविले. मात्र, घरी आधीपासूनच आरोपी सलीम याचे भाऊ अझीम, अमीन, ताहेर व त्यांच्या वडिलांनी व इतर नातेवाईकांनी फिर्यादी, त्याचे भाऊ व व वडिलांना मारहाण केली. या प्रकरणात हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करणारा फिर्यादीचा भाऊ शकील व भावजयीस मारहाण करण्यात आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या मारहाणीच्या प्रकरणामध्ये फिर्यादीच्या डोक्याला १५ टाके पडले, भाऊ मोहसीन बशीर खान याच्या डोक्याला १५ टाके पडले, चुलत भाऊ शकील कदीर खान याला ५ टाके पडले, चुलत भाऊ अमजद बशीर खान पठाण याला ८ टाके पडले, तर वडील बशीर खान अब्दुल हमीद खान पठाण यांना डोक्याला मार लागला व त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. या प्रकरणी १३ डिसेंबर २०१५ रोजी अजिंठा पोलिस ठाण्यामध्ये फिर्याद दिली.

त्यावरून भादंवि कलम ३०७, ३२६, ३२४, १४३, १४७, १४८, ४२७ अन्वये ९ आरोपींवर गुन्हा दाखल झाला. या सर्व आरोपींनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला असता, कोर्टाने सर्व आरोपींचा अटकपूर्व जामीन फेटाळला. या प्रकरणी सहाय्यक सरकारी वकील उदय पांडे यांनी सरकार पक्षाची बाजू मांडली.

हे आहेत ९ आरोपी

या प्रकरणी सलीम गुलाब सैय्यद, कलीम गुलाब सैय्यद, सैय्यद अमीन सैय्यद गुलाब, मोबीन गुलाब सैय्यद, अझीम गुलाब सैय्यद, ताहेर गुलाब सैय्यद, सैय्यद झाहेद सैय्यद ताहेर, सैय्यद गुलाब सैय्यद इंदास, शेख इक्बाल शेख मुसा या नऊ आरोपींवर अजिंठा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शहरात चोरट्यांचा धुमाकूळ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहरात चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. विविध पाच घटनांमध्ये सुमारे दीड लाखांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. यामध्ये दोन घरे फोडण्यात आली असून पाच दुकानांचे शटर उचकटवून चोरी करण्यात आली. याप्रकरणी सबंधित पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पहिल्या घटनेत रेल्वे स्टेशन रोडवरील पगारिया अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या मह‌ावीर दोशी यांच्या घरी घरफोडी करण्यात आली. महावीर दोशी व त्यांची पत्नी गुरुवारी इंदापूर येथे लग्नासाठी गेले होते. रात्री अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराचे कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश केला. घरातील सोनी कंपनीचा एलईडी, कॅमेरा, मोबाइल असा ५१ हजारांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. गावावरून परतल्यानंतर दोशी यांनी याप्रकरणी क्रांतिचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

दुसऱ्या घटनेत दशमेशनगर येथील नागरिकाचे घर फोडण्यात आले. येथील क्लासिक अपार्टमेंटमध्ये राहणारे सर्वेश्वरराव सोमसुंदरराव सत्याबोलू हे बुधवारी त्यांच्या मूळ गावी हैदराबादला गेले होते. रविवारी ते घरी परतले. या दरम्यान चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश केला. घरातील चांदीचे सामान, रोख रक्कम, मोबाइल असा ३८ हजारांचा ऐवज चोरट्यांनी यावेळी लंपास केला. याप्रकरणी उस्मानपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

चोरीची तिसरी घटना शनिवारी रात्री उस्मानपुरा परिसरात घडली. येथील योगेश अशोकराव देवगिरीकर (रा. चेतन प्लाझा, सम्राटनगर) हे व्यवसायाने डॉक्टर आहेत. शनिवारी रात्री दवाखाना बंद करून ते घरी गेले होते. यावेळी चोरट्यांनी त्यांच्या दवाखान्यासह इतर दोन दुकानांचे शटर उचकटवून चोरीचा प्रयत्न केला. मात्र येथून कोणताही ऐवज चोरट्यांना नेता आला नाही. रविवारी सकाळी हा प्रकार लक्षात आला. या प्रकरणी उस्मानपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. चोरीच्या अन्य एका घटनेत गजानन महाराज चौकात दुकान फोडण्यात आले. भूषण अशोक कोठारी (रा. राजाबाजार) यांचे मल्टी सर्व्हिसेस दुकान आहे. शनिवारी रात्री चोरट्यांनी दुकान फोडून १८ मोबाइल, आयपॅड, ब्लुटूथ, चार्जर असा ४२,६३० रुपयाचा माल लंपास केला. या प्रकरणी जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाचव्या घटनेत कुंभारवाडा येथील कपड्यांचे दुकान फोडण्यात आले. तरबेज भुरेखान (रा. टाइम्स कॉलनी) यांचे श्री पलांडे अपार्टमेंटमध्ये लेडीज वेअरचे दुकान आहे. शनिवारी त्यांनी दुकान बंद केल्यानंतर चोरट्यांनी त्यांच्या दुकानाचे शटर वाकवून आतमध्ये प्रवेश केला. दुकानातील महिलांच्या कपड्यांचा २० हजार रुपयांचा माल चोरट्यांनी चोरून नेला. या प्रकरणी सिटीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उड्डाणपूल उभारूनही रेल्वे क्राॅसिंगचा वापर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

संग्रामनगर रेल्वे उड्डाणपूल उभारल्यानंतरही लोहमार्गावरून वाहतूक सुरू आहे. संग्रामनगर रेल्वे रुळावर तात्पुरते रेल्वे गेट तयार करण्यात आले होते. पूल उभारल्यानंतरही क्रॉसिंग गेट बंद केलेले नाही. आता या रेल्वे क्रॉसिंगवर वाहनांची संख्या वाढण्यास सुरुवात झाली आहे. त्याशिवाय पुलाखालील लोहमार्गावरूही वाहनांची ये-जा सुरू असल्याने अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे.

औरंगाबाद शहरातून बीड बायपासकडे जाण्यासाठी शहानूरमियॉ दर्ग्याजवळील संग्रामनगर रेल्वे गेट बंद करून उड्डाणपूल उभारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. सुमारे दोन वर्षांपूर्वी पुलाचे काम पूर्ण करण्यात आले. पूल उभारताना रेल्वेने तात्पुरते गेट उभारले होते. हे रेल्वे क्रॉसिंग गेट उड्डाणपूल उभारल्यानंतर बंद करण्यात येणार होते, मात्र स्थानिक नागरिकांच्या विरोधामुळे गेट हटविण्यात आले नाही.

या गेटचा वापर सध्या वाढत आहे. अनेक दुचाकी वाहने उड्डाणपुलावरून न जाता रेल्वे क्रासिंगचा वापर करतात. यामुळे या भागातही वाहनांची वर्दळ वाढत चालली आहे. याशिवाय पुलाखालूनही काही दुचाकी रेल्वे क्रॉसिंग गेटमधून बीड बायपासकडे जातात. त्यामुळे अपघतांची शक्यता निर्माण झाली आहे.

रेल्वेला आर्थिक फटका

उड्डाणपूल तयार झाल्यानंतर गेट बंद न केल्याने तेथे रेल्वेला तीन कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी लागली आहे. त्यांच्या वेतनावर दरमहा दीड लाख रुपये खर्च करावे लागत आहेत. ही क्रॉसिंग सुरू असल्यामुळे दरवर्षी १८ लाखांचा फटका रेल्वेला सहन करावा लागत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खासदार खैरे यांच्या मुलीच्या विवाहसोहळ्यास नेत्यांची हजेरी

$
0
0

औरंगाबाद : शिवसेना खासदार चंद्रकांत खैरे यांच्या मुलीच्या विवाहसोहळ्यानिमित्त शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्यासह विविध पक्षाचे नेते, उद्योजक, सामाजिक कार्यकर्त्यांसह नागरिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली.

खासदार खैरे यांच्या मुलीचा विवाहसोहळा बायपास रोडवरील गुरुलॉन्स येथे मंगळवारी सायंकाळी मोठ्या धुमधडाक्यात पार पडला. शिवसेना नेते उद्धव ठाकरे, केंद्रीयमंत्री नितीन गडकरी, अनंत गिते, रवींद्र वायकर, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, परिवहनमंत्री दिवाकर रावते, भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, खासदार गजानन किर्तीकर, विनायक राऊत, संजय जाधव, आनंद आडसूळ, सदाशिव लोखंडे, अनिल देसाई, प्रतापराव जाधव, आमदार अतुल सावे, अर्जून खोतकर, माजीमंत्री राजेंद्र दर्डा, माजी आमदार किशनचंद तनवाणी यांच्यासह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, विविध राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकाऱ्यांसह धार्मिक, सामाजिक, उद्योग आदी क्षेत्रांतील मान्यवर, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थिती होते. खासदार खैरे यांच्यासह आमदार प्रदीप जैस्वाल, संजय शिरसाट, महापौर त्र्यंबक तुपे, अंबादास दानवे, नंदकुमार घोडेले आदीं पाहुण्याचे स्वागत करत होते.

गडकरींचे मौन

ज्येष्ठ सिनेअभिनेत्री आशा पारेख यांच्या पद्मभूषण पुरस्काराची मागणी केली होती, असे विधान केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी केले होते. गडकरी यांचा दावा पारेख यांनी फेटाळला होता. याबाबत त्यांना पत्रकारांनी प्रश्न विचारले असता गडकरी यांनी मौन साधले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेल्वेत सापडलेले दागिने विद्यार्थिनींनी केले परत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

नगरसोल-नरसापूर रेल्वेने औरंगाबादला येत असताना एका पर्समध्ये सापडलेले सुमारे एक लाख रुपयांचे दागिने विद्यार्थिनींनी लोहमार्ग पोलिसांच्या स्वाधीन केले.
दे‌वगिरी महाविदलयात बीकॉमच्या थर्ड सेमिस्टरमध्ये शिक्षणऱ्या श्रद्धा नेटके, पूर्वा शर्मा आणि नेहा कोठारी या विद्यार्थिनी लासूर स्टेशनहून नगरसोल-नरसापूर एक्स्प्रेसने औरंगाबादला येण्यासाठी निघाल्या होत्या. रेल्वेच्या डब्यात बसल्यानंतर त्यांना खाली कोपऱ्यात एक छोटीशी बॅग पडलेली दिसली. त्यांनी पर्सबाबत डब्यातील अन्य प्रवाशांकडे विचारणा केली. ही पर्स डब्यातील प्रवाशांपैकी कोणाचीही नव्हती. यानंतर या मुलींनी सुरक्षा रक्षकाचा शोध घेऊन बॅग त्याचा हवाली करण्याचा निर्णय घेतला. काही प्रवाशांनी त्यांना बॅग ‌लोहमार्ग पोलिसांच्या हवाली करण्याचा सल्ला दिला.

औरंगाबाद रेल्वे स्टेशनवर उतरताच त्यांनी ही बॅग लोहमार्ग पोलिस निरीक्षक प्रसाद धारिया, उपनिरीक्षक बनसोडे यांच्याकडे यांच्याकडे सोपविली. पोलिसांनी या विद्यार्थिनींसमोर पर्स उघडून पाहिले असता, पर्समध्ये सोन्याचे मंगळसूत्र, एक गोठ, २ कानातील सोन्याचे टॉप्स असे एकूण अंदाजे एक लाख रुपये किंमतीचे दागिने आढळले. हा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला. प्रामाणिकपणाबद्दल पोलिस निरीक्षक धारिया यांनी विद्यार्थिनींचे कौतुक केले. या विद्यार्थिनींना पुरस्कार देण्याचा प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठविणार असल्याचीही माहिती प्रसाद धारिया यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सुविधांची माहिती आता ऑनलाइन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

कॉलेजमधील पायाभूत सुविधा, वसतिगृहातील सोयीसुविधा, सभागृह, लेडिज कॉमन रूम अशी माहिती आता ऑनलाइन पाहता येणार आहे. कॉलेजमधील उपलब्ध सोयीसुविधांची माहिती वेबसाइटवर जाहीर करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

कॉलेजमध्ये प्रवेश घेईपर्यंत पालकांना तेथे कोणत्या सोयीसुविधा आहेत, याची कल्पना नसते. सुविधांवरून अनेकवेळा वादही होतात. आता कॉलेजांना आपल्या सोयीसुविधांची संपूर्ण माहिती वेबसाइटवर जाहीर करावी लागणार आहे. संचालकांनी याबाबबत सर्व विद्यापीठांना पत्र पाठविले आहे. कॉलेजांना आपल्या सोयीसुविधांची इत्यंभूत माहिती आपल्या वेबसाइटवर जाहीर करावी, अशा सूचना दिल्या आहेत. यासंदर्भातील पत्रामध्ये म्हटले आहे की, स्पर्धेमध्ये टिकून राहण्यासाठी दर्जेदार शिक्षण अनिवार्य आहे. त्यामुळे उच्चशिक्षणाचा गुणवत्मक दर्जा उंचावणे आवश्यक असून, गुणवत्ता व दर्जा वाढीसाठी कॉलेजातील सोयीसुविधा हा महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे कॉलेजांनी सोयीसुविधांची माहिती वेबसाइटवर जाहीर करावी.

तपासणी गुलदस्त्यात

उच्चशिक्षण विभागाने राज्यातील कॉलेजांमध्ये तपासणी मोहीम राबविली. दोन वर्षांत दोनदा कॉलेजांची तपासणी करण्यात आली. कॉलेजांच्या तपासणीचा अहवालही शासन दरबारी धुळखात पडून आहे. कॉलेजांमधील पायाभूत सुविधा, विद्यार्थी संख्या, शिक्षकांची संख्या अशा प्रकारे माहिती तपासण्यात आली. कॉलेजांच्या झाडाझडतीचा हा अहवालावर कोणतीच कार्यवाही झालेली नाही.

ही असेल माहिती...

इमारत, वर्गखोल्या, ग्रंथालयातील सुविधा, ग्रंथालयातील पुस्तकांचा तपशील, पिण्याच्या पाण्याची सुविधा, स्वच्छतागृह, खेळाचे मैदान, जिम्नॅशियम, प्रयोगशाळा व संगणक कक्षातील साहित्य लेडीज कॉमन रूम, वसतिगृहांची उपलब्धता व वसतिगृहातील सोईसुविधा, कँटीन, सभागृह व व्याख्यानकक्ष याबाबत माहिती वेबसाइटवर जाहीर करावी लागणार आहे. जानेवारीत ही प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. त्यामुळे आगामी शैक्षणिक वर्षात ही माहिती विद्यार्थी, पालकांना पाहता येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

१०८ वर्षांत झेडपी पोचणार गावागावांत!

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद

ग्रामीण भागासाठी मंत्रालयाची भूमिका बजावणाऱ्या जिल्हा परिषद प्रशासनाने 'एक दिवस ग्रामस्थांसोबत' हा उपक्रम राबविण्यास सुरवात केली आहे. पहिल्या टप्प्यात ६० सर्कमधील एकेक गाव निवडून अडचणींची माहिती करून घेतली जाणार आहे. महिन्यात एक गाव असे गणित धरले जिल्ह्यात १३०० गावे आहेत. या गावांपर्यंत पोचण्यास प्रशासनाला तब्बल १०८ वर्षे लागणार आहेत!

जिल्हा परिषदेच्या अखत्यारित जिल्ह्यातील सर्व गावे येतात. या गावांमधील रस्ते, पाणी, पायाभूत सुविधा, रोजगार, ग्रामपंचायत अंतर्गत कामांची जबाबदारी झेडपीची असते. प्रशासनामार्फत राज्य सरकारच्या आर्थिक मदतीवर ही कामे करणे अपेक्षित असते. त्या दृष्टीने नियोजनही केले जाते, पण योजनांचा लाभ अंतिम घटकांपर्यंत जातो की नाही, याची तपासणी करणारी यंत्रणा जिल्हा परिषदेत नाही.

मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी लोकप्रतिनिधींशी चर्चा करून जिल्ह्यात 'एक दिवस ग्रामस्थांसोबत' हा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला. जिल्ह्यातील ६० सर्कलमधील एक गाव निवडून तेथे ठरलेल्या दिवशी झेडपीची संपूर्ण यंत्रणा उपस्थित राहणार आहे. सर्व विभागांचे अधिकारी आपापल्या कार्यालयाचा आढावा घेऊन गावकऱ्यांच्या अडचणी जाणून घेतात. स्वच्छता अभियान, विहिरीतील गाळ काढणे, ग्रामपंचायत इमारतीची दुरुस्ती, पाणीपुरवठ्याची सुविधा, महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना (एमआरईजीएस) अंमलबजावणी याचा आढावा घेऊन कोणत्या गोष्टी तातडीने करणे आवश्यक आहे, याबाबत चर्चा होते. किरकोळ त्रुटी राहिलेली कामे पूर्ण करण्यासाठी आठवडाभराचा कालावधी देऊन त्याचा आढावा नंतर घेण्यात येतो.

हा उपक्रम महिनाभरापूर्वी सुरू झाला. धोंदलगाव (ता. वैजापूर), चिंचाळा (ता. पैठण) येथे दोन उपक्रम झाले. तिसरा उपक्रम बुधवारी बुट्टे वडगाव (ता. गंगापूर) येथे आयोजित करण्यात आला आहे. मुळातच या कार्यक्रमाविषयी अनेक शंका उपस्थित होत आहेत. गाव निवडण्याचा अधिकारी लोकप्रतिनिधींनाच देण्यात आला आहे. २०१७च्या मार्च महिन्यात जिल्हा परिषद निवडणुका होणार आहेत त्याची तयारी अनेक सदस्यांनी सुरू केली आहे. त्यासाठीचा एक पूरक उपक्रम म्हणूनही याकडे पाहिले जात आहे. वर्षानुवर्षे ग्रामीण भागाच्या विकासासाठी कोट्यवधींचा निधी देण्यात आला. असे असताना अजूनही अनेक गावांत बहुतांश प्राथमिक सुविधा पोचलेल्या नाहीत. महिन्यात एका गावात जिल्हा परिषद प्रशासन पोचणार असेल तर, जिल्ह्यातील १३०० गावांपर्यंत पोचण्यासाठी तब्बल १०८ वर्षे लागतील. एवढा मोठी मोहीम पूर्ण करण्यासाठी प्रशासनाच्या चार-पाच पिढ्या लागतील.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महाराष्ट्राच्या खेळाडूंचा दिल्लीपर्यंत ‘स्टँडिंग’ प्रवास

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

दिल्ली येथे येत्या ६ जानेवारीपासून होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या २८८ खेळाडूंचा संघ सोमवारी (४ जानेवारी) सचखंड एक्स्प्रेसने रवाना झाला. क्रीडा विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे खेळाडूंना रेल्वेचे रिझर्व्हेशन मिळाले नाही. त्यामुळे त्यांना दिल्लीपर्यंतचा प्रवास उभे राहून करावा लागणार आहे. काही खेळाडूंवर टायलेट-बाथरूममध्ये, दोन सीटमधील जागेत बसण्याची वेळ आली.

औरंगाबाद रेल्वे स्टेशनवर दुपारी बाराच्या सुमारास महाराष्ट्राचा २२८ खेळाडूंचा संघ पोहोचला. राष्ट्रीय स्पर्धेत नेटबॉल, योगा, किक बॉक्सिंग, रस्सीखेच, सॉफ्टबॉलसह ८ क्रीडा प्रकारांतील खेळाडू, प्रशिक्षक औरंगाबादेतून रवाना झाले. या खेळाडूंचे रेल्वे रिझर्व्हेशन कन्फर्म नसल्याचा मुद्दा काही प्रशिक्षकांनी उपस्थित केला होता. तिकीट कन्फर्म होतील, असा विश्वास व्यक्त करून क्रीडा अधिकाऱ्यांनी या खेळाडूंना रेल्वे स्टेशनवर पाठविले. रेल्वे येईपर्यंतही तिकीट कन्फर्म झाले नव्हते. दिल्लीपर्यंतचा प्रवास कसा होईल, असा प्रश्न खेळाडू, प्रशिक्षकांनी उपस्थित केला.

'रेल्वेत बसा, मनमाडनंतर पाहू,' असं सांगून खेळाडूंना रेल्वे बसविण्यात आले. या राष्ट्रीय स्पर्धांसाठी खेळाडूंना नेण्याची जबाबदारी क्रीडा विभागाची असते. या स्पर्धेबाबत रेल्वे विभागाला क्रीडा विभागाकडून कळविण्यात आले नव्हते. त्यामुळे खेळाडूंना सचखंड एक्स्प्रेसच्या एस-५, एस-६ आणि अन्य डब्यांत घुसून प्रवास करावा लागला.

मनमाड येथे तिकीट कन्फर्म असलेले प्रवासी डब्यात आल्यानंतर खेळाडूंना खाली बसून प्रवास करावा लागला. क्रीडा विभागाच्या दुर्लक्षाचा फटका खेळाडू, प्रशिक्षक, संघ व्यवस्थापकांना बसला. मनमाड स्टेशनवर रेल्वे पोहोचल्यानंतर तेथे काही खेळाडू, प्रशिक्षकांना जागा देण्यात आली. कमी जागा असल्याने एका सीटवर दोन-तीन खेळाडू बसले. दिल्लीपर्यंतचा प्रवास त्यांना दाटीवाटीने करावा लागला.

रेल्वेमंत्र्यांचे मदत घेण्याचे आश्वासन

रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी ट्विटरच्या माध्यमातून अनेक प्रवाशांना मगत केली आहे. आपणही ट्विटरच्या मदतीने त्यांच्याकडून मदत मिळविण्याचे प्रयत्न करू, असे आश्वासन क्रीडा विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रशिक्षक, खेळाडूंना दिले, मात्र प्रत्यक्षात त्यासाठी काहीही प्रयत्न करण्यात आले नाहीत, असे काही खेळाडूंनी सांगितले.

२२८ खेळाडूं च्या रिझर्व्हेशनसाठी नांदेड विभागाच्या व्यवस्थापकांना पत्र पाठविण्यात आले होते. शिवाय खासदार खैरे यांनाही विनंती करण्यात आली होती. तरीही रिझर्व्हेशन कन्फर्म झाले नाही.

- उर्मिला मोरोळे, जिल्हा क्रीडा अधिकारी, औरंगाबाद

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘उजनी’च्या पाण्यावर लातूर पालिकेचा दावा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, लातूर

लातूर शहरासाठी कायमस्वरूपी पाणीपुरवठा योजनेसाठी उजनी धरणात पाणीसाठा आरक्षित करण्याचा ठराव लातूर महापालिकेच्या विशेष सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला.

शहरातील पाणी टंचाईवर मात करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांसाठी महापालिकेची विशेष सभा बोलविण्यात आली होती. ही सभा सोमवारी रात्री उशिरापर्यंत सुरू होती. विशेष सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर अख्तर शेख होते. या वेळी महापालिका आयुक्त सुधाकर तेलंग यांनी पाणीसाठ्याची स्थिती, करावयाची उपाययोजना सभेपुढे मांडली. आयुक्त म्हणाले, 'मांजरा धरणात २.५ दशलक्ष घनमीटर पाणी शिल्लक असून, ते फेब्रुवारीपर्यंत पुरेल. साई व नागझरी बंधाऱ्यातील पाणी संपले आहे. मांजरा धरण आणि नागझरी बंधाऱ्यात चर खोदून पाणी शोधले जात आहे. भूवैज्ञानिकांच्या अहवालानुसार पाणी लागण्याचा अंदाज आहे.'

शहराला लोकसंख्येच्या प्रमाणात दररोज ६६ दशलक्ष घनमीटर पाण्याची गरज आहे. मात्र दर दहा दिवसांनी नळाद्वारे पाणी दिल्याने सध्या २३ दशलक्ष घनमीटर पाणीपुरवठा केला जात आहे. शासनाकडे उस्मानाबादच्या योजनेतून उजनीचे आठ दशलक्ष घनमीटर पाणी आणण्याचा प्रस्ताव दिला आहे. निम्न तेरणा धरणातून आठ दशलक्ष घनमीटर पाणी आणण्यासाठी २७ कोटी रुपयांची योजना प्रस्तावित आहे. त्याशिवाय भंडारवाडी धरणाच्या जुन्या योजनेतून दीड दशलक्ष घनमीटर पाणी मिळण्याची आशा आहे. शहराला कायमस्वरूपी पाणी योजना होण्यासाठी उजनी धरणातील पाण्यावर लातूर शहरासाठी आरक्षण करणे आणि ६८८ कोटी रुपयांची योजना मंजुरीसाठी पाठविणे आवश्यक आहे, याकडेही लक्ष वेधण्यात आले.

आयुक्ताच्या निवेदनानंतर सर्वपक्षीय नगरसेवकांनी अनेक सूचना केल्या. त्यानंतर सभागृहाने उजनीचे पाणी लातूरला आणण्यासाठी पाण्याचे आरक्षण आणि थेट पाइपलाइनचा प्रस्ताव अमृत योजनेतून सादर करण्याचा ठराव एकमताने मंजूर केला. त्याच सोबत निम्न तेरणा प्रकल्पातून पाणीपुरवठा योजना हाती घेण्यासाठी ही सभागृहाने मंजुरी दिली. विंधन विहिरीची खोली २०० फुटावरून ४०० फुटापर्यंत वाढविण्यासाठी विशेष बाब म्हणून सवलत देण्याची मागणी शासनाकडे करण्यात आली. या वर्षातील पाणी टंचाईच्या काळात १०० टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी ४२ कोटी रुपयांचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यासही या वेळी मंजुरी देण्यात आली.

या वेळी माजी महापौर स्मिता खानापुरे आणि इतर नगरसेविकांनी सभात्याग करून सभागृहातील सततच्या गोंधळाला चाप लावण्याचा यशस्वी प्रयत्न केला. त्यानंतर सभागृह सुरू झाले आणि सुरळीत कामकाज झाले. या वेळी झालेल्या चर्चेत लक्ष्मण कांबळे, चंद्रकांत चिकटे, दीपक सुळ, रवी सुडे, शैलेश स्वामी, सुरेश पवार, सपना किसवे, राजकुमार जाधव, डॉ. रुपाली साळुंके यांनी सक्रिय सहभाग घेतला.

मीटरवरून गोंधळ

शहरातील नळाला मीटर बसविण्याचा प्रस्ताव सभाहाने फेटाळून लावला. नळाद्वारे सध्या पाणी देता येणार नाही, पाणीच नाही तर मीटर कशाला? असा प्रश्न उपस्थित केला. तर, जनक्षोभ वाढेल म्हणून काही नगरसेवकांनी मीटरला विरोध केला असल्याचे सभागृह नेते नरेंद्र अग्रवाल यांनी सांगितले. चार तास किंवा अधिक पाणी येते अशा ठिकाणीच मीटर बसविण्याचा प्रस्ताव असल्याचे ते म्हणाले. मीटर महापालिकेकडून घ्यायचे की स्वता: खरेदी करायचे, याची मुभा नळधारकाला देण्याचा प्रयत्न करणार असल्याचेही अग्रवाल यांनी स्पष्ट केले. मात्र, विरोधी पक्षांचा मीटरला विरोध नाही, तर त्याच्या खासगीकरणाला विरोध असल्याचे विरोधी पक्षनेते मकरंद सावे यांनी सांगितले. मीटरच्या व्यवहारात नरेंद्र अग्रवाल यांनी दलाली घेतली असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राजा मणियार यांनी केला आणि त्यानंतर प्रचंड गोंधळ झाला. आरोपाला प्रत्युत्तर देताना नरेंद्र अग्रवाल म्हणाले, 'मणियार यांनी त्यांनी केलेले आरोप सिद्ध करून दाखवावेत. मी त्यांना पाच कोटी रुपये दंड देऊन, वाटेल ती शिक्षा भोगण्यास तयार आहे.'

६६ दशलक्ष घनमीटर

लातूर शहराला दररोज आवश्यक पाणी

२३ दशलक्ष घनमीटर

दहा दिवसांआड पुरवठ्यामुळे मिळणारे पाणी

रु. ६८८ कोटी

उजनी-लातूर पाणीपुरवठा योजनेचा खर्च

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुकुंदराज स्वामी यात्रेनिमित्त आज रंगणार कवीसंमेलन

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, बीड

मराठीतील आद्यकवी मुकुंदराज यांच्या समाधीस्थळी दरवर्षी भरणाऱ्या यात्रेमध्ये यंदा राज्यस्तरीय काव्यसंमेलन भरणार आहे. गेल्या वर्षीपासून सुरू करण्यात आलेल्या या संमेलनामुळे अंबाजोगाईतील रसिकांना पर्वणी अनुभवायला मिळणार आहे.
अंबाजोगाईची ओळख मुकुंदराज यांच्या नावाने ओळखली जाते. मुकुंदराजांच्या समाधीस्थळी दरवर्षी यात्रा भरते आणि त्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन दरवर्षी होत होते. गेल्या वर्षीपासून नगर परिषदेच्या वतीने कवी संमेलनाचे आयोजन करण्यात येत आहे. आद्यकवी मुकूंदराज सांस्कृतिक सभागृहात सायंकाळी सात वाजता हे कवी संमेलन होणार आहे. यामध्ये राज्यातील नामवंत कवींचा सहभाग अंबाजोगाईकरांना सुखावणारा ठरणार आहे. अंबाजोगाईकरांनी या कवी संमेलनाचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन अंबाजोगाई विकास आघाडीचे प्रमुख राजकिशोर मोदी, नगराध्यक्षा रचना मोदी, उपनगराध्यक्ष मनोज लखेरा, मुख्याधिकारी रामनिवास झंवर यांनी केले आहे. या कवी संमेलनात प्रा. सुरेश शिंदे (मंगळवेढा), प्रा.जयराम खेडेकर (जालना), श्रीमती लता ऐवळे (वाळवा), स्नेहलता स्वामी (तहसीलदार, मुखेड), आबा पाटील (जत) व प्रशांत केंदळे (नाशिक) या निमंत्रित कवींचा यासहभाग असणार आहे.
अंबाजोगाईकरांसाठी आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्रातील नामवंत कवींच्या कवी संमेलनासाठी रसिक श्रोत्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आवाहन राजकिशोर मोदी यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भूमिगत’साठी अतिक्रमणे पाडणार

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
'अतिक्रमणांमुळे भूमिगत गटार योजनेचे काम थांबवले जाणार नाही. नाल्यांवरची अतिक्रमणे पाडू,' असा इशारा महापालिका आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी मंगळवारी दिला. अतिक्रमणांमुळे भूमिगतचे काम थंडावले, असे वृत्त 'मटा'ने मंगळवारच्या अंकात प्रसिद्ध केले होते. त्यानंतर आयुक्तांनी भूमिका स्पष्ट केली.
नाल्यांवरची अतिक्रमणे पाडून भूमिगत गटार योजनेचे पाइप टाकण्यासाठी आवश्यक तेवढी जागा तयार करून द्या, असे पत्र पालिकेच्या ड्रेनेज विभागाने नगररचना विभागाला दिले आहे. नगररचना विभाग व प्रशासकीय विभाग यांनी समन्वयाने नाल्यावरची अतिक्रमणे पाडण्याची कारवाई करायची आहे, पण अद्याप त्या दृष्टीने कार्यवाही सुरू करण्यात आलेली नाही. नाल्यावरच्या अतिक्रमणांचा भूमिगत गटार योजनेच्या कामाला अडथळा आहे. यासंदर्भात केंद्रेकर यांना विचारले असता ते म्हणाले, 'नाल्यावरची अतिक्रमणे काढावीच लागतील. त्याशिवाय दुसरा पर्याय नाही. अतिक्रमणे काढण्यासाठी विशेष मोहीम घ्यावी लागेल.' भूमिगतच्या कामामुळे खराब झालेल्या रस्त्यांच्या दुरुस्तीचे काय, असे पत्रकारांनी केंद्रेकर यांना विचारले असता ते म्हणाले, 'खराब रस्ते दुरुस्त करण्याची जबाबदारी त्या कंत्राटदाराची आहे. मात्र, रस्त्यांचे काम लगेचच केले जाणार नाही. खोदलेल्या रस्त्यांची दबाई योग्य प्रकारे झाली पाहिजे. त्यासाठी किमान चार महिन्यांचा अवधी द्यावा लागेल. आता लगेच त्या रस्त्यांचे डांबरीकरण केले तर दोन - पाच महिन्यांनी ते उखडले जाण्याची शक्यता असते. त्यामुळे उशीर झाला तरी रस्त्यांची कामे चांगल्या प्रकारे व्हावीत अशी भूमिका आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वसुलीच्या प्रमाणात विकासकामे

$
0
0


औरंगाबाद ः 'मालमत्ता कर वसुलीच्या प्रमाणात शहरात विकास कामे केली जाणार आहेत,' अशी माहिती महापालिका आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी मंगळवारी पत्रकारांना दिली. पालिका आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर केंद्रेकर यांनी प्रथमच पत्रकार परिषद घेतली.
केंद्रेकर म्हणाले, 'करांची वसुली आणि विकास कामे या परस्पर पूरक बाबी आहेत. त्यामुळे पालिकेचे उत्पन्न वाढले पाहिजे याकडे लक्ष केंद्रीत केले आहे. त्यामुळे वसुलीचे प्रमाण १५ टक्क्यांवरून ४० टक्क्यांपर्यंत गेले आहे. शहरातील सर्व नागरिकांनी आपले कर्तव्य समजून मालमत्ता कर भरला तर पालिकेचे उत्पन्न वाढेल आणि विकास कामे देखील होतील. सर्वसाधारण सभा आणि स्थायी समितीने ठरवून दिलेल्या बजेटमध्ये कोणत्याही प्रकारची कपात करण्यात आली नाही, तसा अधिकारही आयुक्तांना नाही. महापालिकेचे सध्याचे बजेट पाचशे कोटींचे आहे. या बजेटच्या दीडपट कामे करता येऊ शकतात. वसुलीचे प्रमाण वाढले तर विकास कामांचे उद्दीष्ट देखील पूर्ण होईल. ज्या कामांच्या वर्कऑर्डर झाल्या आहेत व ज्या कामांना प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे, ती सर्व कामे होणार आहेत. प्रत्येक नगरसेवकाने त्यांच्या वॉर्डातील पंधरा लाखांपर्यंतची कामे सुचवावीत. ती कामे वसुलीच्या प्रमाणात पूर्ण केली जातील. ड्रेनेजच्या देखभाल दुरुस्तीची कामे करण्यासाठी पाच लाख रुपयांच्या निधीला वॉर्ड निहाय मान्यता दिली आहे. या कामांचे टेंडरही लवकरच निघेल,'अशी माहिती केंद्रेकर यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘समांतर’बद्दल आता कोर्टातच शपथपत्र

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
'समांतर जलवाहिनीचे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. त्यामुळे या संदर्भात कोर्टातच शपथपत्र दाखल करू,' अशी भूमिका महापालिका आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी स्पष्ट केली. २८ जानेवारीपर्यंत शपथपत्र दाखल करण्याचे आदेश हायकोर्टाने दिले आहेत.
समांतर जलवाहिनीचे काम करणाऱ्या औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीचे काम समाधानकारक नाही. त्यामुळे आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी या कंपनीला करार रद्द का करण्यात येऊ नये, अशी नोटीस बजावली. या नोटीसला कंपनीने उत्तरही दिले. कंपनीचे उत्तर प्राप्त झाल्यावर अद्याप महापालिका प्रशासनाने त्यावर काहीच कारवाई केली नाही किंवा भूमिकाही स्पष्ट केली नाही. या संदर्भात पत्रकारांनी केंद्रेकर यांना विचारले असता ते म्हणाले, 'हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे. त्यामुळे त्या संदर्भात अधिक बोलणे योग्य होणार नाही. समांतर जलवाहिनीच्या प्रकल्पाबद्दल २८ जानेवारीपर्यंत शपथपत्र दाखल करण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत. त्यामुळे आता कोर्टातच शपथपत्र दाखल केले जाईल. कंपनीने नोटीसला दिलेल्या उत्तराचा सध्या अभ्यास सुरू आहे,' असा उल्लेख त्यांनी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images