Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

पाणंदमुक्तीमुळे होणार आरोग्यावरील खर्च कमी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कन्नड
'स्वच्छता अभियानामुळे नागरिकांचे आरोग्य सुधारणार असून आरोग्यावरील खर्च कमी होणार आहे. यामुळे गावकऱ्यांनी पाणंदमुक्ती चळवळीत सहभाग घ्यावा,' असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी केले.
देवगाव (रंगारी) येथे पंचक्रोशीतील गावांसाठी महसूल विभागातर्फे नुकतेच महाराजस्व अभियान राबवण्यात आले. यानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. जिल्हा परिषद सदस्या उज्ज्वला सोनवणे अध्यक्षस्थानी होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजीव नंदकर यांनी केले. 'गावकऱ्यांनी पाणंदमूक्त अभियान राबवून स्वच्छता मोहिमेस हातभार लावावा,' असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. चौधरी यांनी केले. जिल्हा परिषद सदस्या सोनवणे यांनी देवगाव रंगारी गावात दारूबंदीसाठी शासनाकडून मिळत असलेल्या सापत्न वागणुकीबाबत जाहीर नाराजी व्यक्त केली.उपविभागीय पोलिस अधिकारी शरद बरडे, सहायक पोलिस निरीक्षक राज्यश्री खाडे यांनी रस्ते सुरक्षा मोहिमेची माहिती दिली. माजी आमदार किशोर पाटील, अनिल पाटील सोनवणे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी विविध खात्याकडून १३ लाभार्थ्यांना कुटुंब अर्थसहाय्य योजनेतून प्रत्येकी २० हजार रुपयांच्या धनादेशाचे वाटप, १ कृषीपंप जोडणी, ४ शेततळयांना कार्यारंभ प्रमाणपत्र, ९ लाभार्थ्यांना विकलांग अर्थसहाय्य योजनेतून प्रत्येकी २,५०० रुपयांचे धनादेश देण्यात आले.
कन्नडचे नगराध्यक्ष संतोष कोल्हे, संजय गव्हाणे, राजकुमार गंगवाल, डॉ. आण्णासाहेब शिंदे, जिल्हा परिषद सदस्य सुदाम मोकासे, विशेष अधिकारी प्रियंका वझे, उपविभागीय कृषी अधिकारी प्रकाश उगले, गटविकास अधिकारी के. एस. सानप, सरपंच कल्पना सोनवणे, पंचायत समिती सदस्य मनीषा धस यांची उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उपसरपंच संदिप गोरे, प्रदीप दिवेकर, सुभाष रावते, शालिनी धनुरे, मीना दिवेकर, भगवान सुरासे, कमलाकर चौधरी, गुफरान क़ुरेशी, नीलेश घोडके यांनी परिश्रम घेतले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


२२०० सहकारी संस्था निघणार अवसायनात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
औरंगाबाद जिल्ह्यातील ५,०४० सहकारी संस्थांपैकी तब्बल ७५२ संस्था या केवळ कागदोपत्री तर, ८९५ संस्थांचा ठावठिकाणाच नसल्याचे सहकार विभागाने केलेल्या तपासणीमध्ये स्पष्ट झाले आहे. या व इतर २,२०० संस्था अवसायनात काढण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. आतापर्यंत १,५२४ संस्था अवसायनात काढण्याचे अंतरिम आदेश देण्यात आले असून ६२५ हून अधिक संस्थांची नोंदणी रद्द करण्यात आली आहे.
सहकार विभागाच्या आदेशानव्ये जिल्ह्यातील सहकारी संस्थांचे सर्व्हेक्षण करण्यात आले. यात जिल्ह्यातील अनेक संस्था केवळ कागदोपत्री असल्याचे स्पष्ट झाले. जिल्ह्यात नोंदणीकृत संस्थाची संख्या ५,०४० आहे. त्यात नागरी व ग्रामीण बँका, प्राथमिक शेती पतपुरवठा व इतर शेती पतपुरवठा करणाऱ्या संस्था, गृहनिर्माण संस्था व प्रिमायसेस संस्था, मजूर संस्था, पाणी पुरवठा व पाणी वाटप संस्था, खरेदी विक्री संस्था, बलुतेदार संस्था आदी संस्थांचा समावेश आहे. जिल्ह्यात बंद, कार्यस्थगित व कागदोपत्री असलेल्या ७५२ संस्था आढळून आल्या. नोंदणीकृत पत्त्यावर नसलेल्या व ठावठिकाण नसलेल्या अशा ८९५ संस्था असल्याचे समोर आले. सहकारी अधिनियमाप्रमाणे अनेक संस्थांचे ऑडिट अहवाल आले नव्हते, अशा संस्थांच्या अस्तित्वाबद्दल सहकार खात्याला शंका होती. त्यामुळे सहकारी विभागातर्फे संस्थेचे रेकॉर्ड, लेखा परीक्षण अहवाल, बँक खात्याचा तपशील आदींसह आवश्यक बाबींची तपासणी केली. त्यात कागदोपत्री संस्था, ठावठिकाणा नसलेल्या संस्था याबाबत माहिती उजेडात आल्याचे जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) नारायण आघाव यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

केंद्रीय मंत्र्यांवर गुन्हे दाखल करा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
हैदराबाद विद्यापीठातील विद्यार्थी रोहित वेमुला याच्या आत्महत्येत जबाबदार असलेले केंद्रीयमंत्री बंडारू दत्तात्रय, स्मृती इराणी यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी विद्यार्थी संघटनांनी केली आहे. या मागणीसाठी विद्यार्थी संघटनांनी बुधवारी क्रांतिचौकात निदर्शने केली.

डीवायएफआय, एआयएसएफ, एसएफआय, जनक्रांती संघटना या संघटनांनी ही निदर्शने केली. हैदराबाद विद्यापीठातील विद्यार्थी रोहित वेमुला याने आत्महत्या केली आहे. याप्रकरणी केंद्रीय कामगारमंत्री बंडारू दत्तात्रय, मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांच्यासह आत्महत्येस जबाबदार असणाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत. शैक्षणिक परिसरांमध्ये जातीयवादी मानसिकतेतून सरकारने हस्तक्षेप बंद करावा, आदी मागण्या् यावेळी करण्यात आल्या.

यावेळी अॅड. अजय बुरांडे, अॅड. अभय टाकसाळ, तृप्ती गडवे, डॉ. संदीप घोगरे यांनी भाषणे केली. योगेश खोसरे, भगवान भोजने, अर्जून भूमकर, भाऊसाहेब झिरपे, रमेश जोशी, संदीप पेडे, रवी मोताळे आदींसह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कर्मचाऱ्यांचा पीएफ १५ तारखेपर्यंत भरा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
भविष्य निर्वाह निधी संघटना कार्यालयात (पीएफ) पीएफ जमा करण्यासाठी आता ग्रेस पिरेड मिळणार नाही. पाच दिवसांची सवलत मागे घेण्यात आली असून, यापुढे आस्थापनांना कर्मचाऱ्यांचा पीएफ १५ तारखेपर्यंत भरावाच लागणार आहे, अशी माहिती भविष्य निर्वाह निधी व संघटनेचे आयुक्त सुधीर गणवीर यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.
कामगार व कर्मचारी वर्गाचा प्रॉव्हिडेंट फंडाचा हप्ता आता दरमहा १५ तारखेच्या आत संस्थांना भरावा लागणार आहे. कर्मचारी भविष्य निधी अधिनियम १९५२ नुसार विविध संस्थांमध्ये कार्यरत असलेल्या कामगार व कर्मचारीवर्गासाठी लागू असलेल्या पीएफ योजनेचा दरमहा हप्ता १५ तारखेपर्यंत भरणे आवश्यक आहे. या नियमाव्यतिरिक्त पीएफ कार्यालयाने ऑनलाइन सुविधा नसल्यामुळे पाच दिवसांची मुदत वाढवून दिली होती. परंतु, आता ऑनलाइन सुविधा उपलब्ध असल्याने पाच दिवसांची वाढीव मुदत (ग्रेस पिरेड) बंद करण्यात येत आहे. १५ तारखेपर्यंत हफ्ता जमा न झाल्यास जेवढे दिवस उशीर होईल, तेवढ्या दिवसांचा दंड व व्याज आकाराला जाणार आहे. मराठवाड्यातील ४ हजार ४६६ संस्थांमधील सुमारे ५ लाख ५० हजार कर्मचाऱ्यांचा पीएफ दरमहा जमा होतो. संस्थांनी या बदलाची नोंद घेऊन १५ तारखेच्या आत भविष्य निर्वाह निधीचा हप्ता जमा करावा, असे आवाहन आयुक्तांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शंभर रुपये खिशात ठेवा; वाहतूक नियम तोडा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
बेशिस्त वाहतुकीला शिस्त लागावी, यासाठी वाहतूक पोलिस कसोशीने प्रयत्न करत आहेत. पण त्याचवेळी खिशात शंभर रुपये ठेवा व खुशाल नियम तोडा, अशी मानसिकता वाढीस लागली आहे.
परवान्याचे उल्लंघन असो की ट्रिपल सीट वाहन चालविणे, नियम तोडल्यास केवळ शंभर रुपये दंड आकारला जातो. गेल्या वर्षभरात दीड लाखाहून अधिक बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई झाली. पण नाममात्र दंड असल्याने वाहतुकीला शिस्त लागली नाही. वाहतूक नियमांबद्दल गंभीर इशारे देणारे घोषवाक्य ठिकठिकाणी लावले आहेत. परंतु, त्याकडे दुर्लक्ष करून नियम तोडणे हा अपराध असल्याचे बहुसंख्य बेशिस्त वाहनचालकांना वाटतच नाही. वाहतुकीला शिस्त लागावी, त्यातून रस्त्यावरील अपघात कमी व्हावेत, यासाठी पोलिसांकडून प्रयत्न केले जात आहेत. पण दंडाची रक्कम घ्या, पण लवकर मोकळे करा, अशी मानसिकता कमी होताना दिसत नाही. वाहतुकीचे नियम तोडल्यानंतरही शिक्षा म्हणून नाममात्र होणारी दंडात्मक कारवाई होत असल्याने ही मानसिकता वाढत आहे.
मोटार वाहन कायदा व मुंबई पोलिस कायद्यानुसार कारवाई केली जाते. धोकादायक पद्धतीने लेन कटिंग केल्यास प्रथम गुन्ह्यासाठी १०० रुपये दंड, त्यानंतरच्या गुन्ह्यासाठी ३०० रुपये दंड घेतला जातो. सिग्नल तोडणे, पार्किंगच्या नियमांचे उल्लंघन, विचित्र हॉर्न, वाहन चालविताना मोबाइलवर बोलणे, नियमानुसार नंबरप्लेट नसणे, विनापासिंग वाहन चालविणाऱ्या दुचाकीचालकाकडून शंभर रुपये दंड घेतला जातो. विनापासिंग चारचाकी वाहन चालवल्यास हजार रुपयांचा दंड वसूल केला जातो. दारू पिऊन वाहन चालविणे, रेसिंग आदी गुन्ह्यांसाठी दंडात्मक तसेच तुरुंगवास अशा दोन्ही शिक्षेची तरतूद आहे. पण फार कडक शिक्षा नसणे व नाममात्र दंड आकारणी यामुळे बेशिस्त वाहनचालकांना जरब बसत नाही.
वाहतूक नियम दुसऱ्यांदा तोडल्यास ३०० रुपये दंड आहे. मात्र नियम तोडण्याची कितवी वेळ आहे, याची कोणतीही माहिती पोलिसांकडे नाही.

अडीच कोटीचा दंड वसूल
वाहतूक नियमांचा भंग केल्याबद्दल २०१५ मध्ये शहरात एक लाख ६४ हजार वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली. त्यातून २ कोटी ५८ लाख ६४ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून घरपोच पावत्या दिल्या जात असून आतापर्यंत २३३ जणांना नोटीस बजावण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मी कारभारीण : कुटुंबासाठी डोळस हातभार

$
0
0

Unmesh.Deshpande@timesgroup.com
आपल्या कुटुंबाला डोळसपणे हातभार लावणाऱ्या रेखा पाटील यांची कथा आणि व्यथा स्तब्ध करणारी आहे. ही कथा ऐकल्यावर रेखा पाटील खरोखरच कारभारीण आहेत याची प्रचिती येते, पण त्यांच्या चेहऱ्यावर त्याचा लवलेशही नसतो. कुटुंबाची आपण गरज म्हणून शिवणकाम करतात. ब्लाउज शिवण्यात त्यांचा हातखंडा आहे. या कामात आपला हात कुणी धरू शकत नाही, हे देखील त्यांच्या लक्षात आले आहे. त्यामुळे दररोज नव्या उमेदीने त्या आपल्या कुटुंबासाठी शिवणयंत्राचे चाक फिरवतात.

पतीला काचबिंदू झालेला. त्यांना मिळणारा जेमतेम पगार. त्यामुळे कुटुंबाचा गाडा पुढे कसा न्यायचा, हा प्रश्न पडलेला. त्यातून रेखा पाटील यांनी नेटाने मार्ग काढला आहे. त्यांचे पती हे गारखेडा परिसरातील एका दुकानात काम करतात. दुपारी बारा ते रात्री बारा अशी त्यांची कामाची वेळ. रोज बारा तास काम केल्यावर त्यांना महिन्याकाठी जेमतेम पगार मिळतो. त्यांच्या पतीच्या डोळ्याला काचबिंदू झाला. त्यामुळे त्यांना अंधूक दिसते. काचबिंदूचे ऑपरेशन करण्यासाठी त्यांनी जालना, सुरत, मुंबई येथे विविध डॉक्टरांना डोळे दाखविले. डोळ्याची रक्तवाहिनी कमकुवत झाल्यामुळे ऑपरेशन करता येत नाही, असे त्यांना डॉक्टरांनी सांगितले. डोळा चांगला होणे अवघड आहे, याची जाणीव त्यांच्या पत्नी, रेखा पाटील यांना झाली. त्यांना अतुल नावाचा एक मुलगा आहे. तो दहावीत शिकतो. त्याला ऐकू येत नाही. जन्मजात त्याचा एक कान कार्यरत नसल्याचे पाटील सांगतात. त्यामुळे पती, मुलगा यांना सांभाळण्याची जबाबदारी रेखा यांच्यावरच आली. पतीच्या जेमतेम पगारावर घर चालविण्यासाठी पुरत नाही. त्यामुळे त्यांनी शिवण यंत्राचा सहारा घेण्याचे ठरविले. लहानपणापासून त्यांना कपडे शिवण्याची आवड होती. कुटुंबाची परिस्थिती लक्षात घेऊन त्यांनी ही आवड व्यावसायात बदलली. ब्लाउज शिवण्यात रेखा पाटील यांचा हातखंडा आहे. घर स्वतःचे नसल्यामुळे विंचवाचे बिऱ्हाड पाठीवर या उक्ती प्रमाणे त्यांनी अनेक घरे बदलली. वाळूज, मुकुंदवाडी, गजानन कॉलनी, शिवनेरी कॉलनी येथे त्या भाड्याने घर घेऊन पती व मुलासह रहात होत्या. जेथे राहिल्या तेथे त्यांनी ब्लाउज शिवून देण्याचा व्यवसाय केला. त्यामुळे त्या त्या भागांतील महिला त्यांच्याशी जोडल्या गेल्या. घर बदलले तरी ग्राहकांच्या रुपाने महिला कायम राहिल्या. उलट त्यात वाढच होत गेली, असे त्या पाटील सांगतात. गारखेडा भागातील अजिंक्यनगरात सध्या रेखा पाटील राहतात. दहा बाय दहाच्या एका खोलीत पती, पत्नी आणि मुलगा असा तीन जणांचा संसार चालतो. रेखा यांच्या मदतीला त्यांची आई इंदूबाई पाटील या देखील असतात.

घरातील दैनंदिन काम उरकल्यावर रेखा पाटील ब्लाउज शिवण्याचे काम सुरू करतात. रोज तीन - चार ब्लाउज शिवून होतात, असे त्या सांगतात. संक्रांत, दिवाळी अशा सणांच्या काळात काम जास्त असते. महिला मोठ्या संख्येने ब्लाउज शिवून घेण्यासाठी येतात. त्यामुळे जास्तवेळ शिवणकाम करावे लागते. आपण आपल्याच कुटुंबासाठी हे सगळे करीत असल्यामुळे या कामाचा शीण येत नाही. उलट आपण कुटुंबाला काहीतरी हातभार लावू शकतो, याचा अभिमान वाटतो, अशी त्यांची भावना आहे. लहानपणी छंद म्हणून शिवणकाम शिकले आता परिस्थितीमुळे शिवणयंत्र चालविण्याचे काम करावे लागत आहे, पण त्यात गैर काहीच वाटत नाही. दोन हजार रुपये घरभाडे, त्याशिवाय पाणीपट्टी, लाइट बिल आणि अन्य पूरक खर्च याची गोळाबेरीज करताना पतीची दमछाक होत असे. कुटुबासाठी ते बारा-बारा तास काम करतात. त्यांच्या तोंडून कधीही तक्रारीचा किंवा नाराजीचा सूर निघत नाही. हीच बाब माझ्यासाठी प्रेरणा देणारी ठरली आणि नवऱ्याच्या डोळ्याचे आणि मुलाच्या कानाचे व्यंग कुरवाळीत न बसता, पदर खोचून नवऱ्याच्या खांद्याला खांदा लावून काम करण्याचा निर्णय घेतला. आज हा निर्णय 'डोळस' असल्याचे सिद्ध होत आहे. ब्लाउज शिवण्याच्या निमित्ताने एकदा जोडली गेलेली महिला कायमची ग्राहक होते. शिवणकामाच्या पैशापेक्षा हे नाते रेखा पाटील यांना मोलाचे वाटते. पोटापुरते कमवायचे, नफ्यासाठी नाही, असे त्यांचे धोरण आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आरोग्य उपकेंद्राअभावी फरफट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सातारा
देवळाई येथील नागरिकांना महानगरपालिकेच्या सातारा येथील आरोग्य केंद्रात जाऊन उपचार घेणे गैरसोयीचे पडत आहे. त्यामु्ळे देवळाईमध्ये दुसरे आरोग्य केंद्र सुरू करावे, अशी मागणी करण्यात येत आहे.
सातारा-देवळाई नगरपालिका झाल्यानंतर येथील जिल्हा परिषदेचे प्राथमिक आरोग्य उपकेंद्र बंद करण्यात आले. त्यामुळे चार महिने येथील नागरिकांना आरोग्य सुविधेपासून वंचित राहावे लागले. गरोदर महिलांना आवश्यक असणारा एमसीटीएस (मदर अॅण्ड चाईल्ड ट्रेकिंग सिस्टिम) क्रमांक मिळत नव्हता. महानगरपालिकेने सातारा ग्रामपंचायत कार्यालयात जुलै २०१५ मध्ये आरोग्य केंद्र सुरू केले. त्यामुळे सातारा व परिसरातील नागरिकांना त्याचा फायदा झाला. परंतु, देवळाईतील नागरिकांना हे केंद्र गैरसोयीचे ठरले आहे. देवळाईची हद्द बाळापूर गावाच्या शिवेपर्यंत आहगे. तेथून साताऱ्यातील आरोग्य केंद्र दूर पडते. शिवाय रस्त्यांची अवस्था वाईट असल्याने गरोदर महिलांना अधिक त्रास होतो. आरोग्य केंद्रात संगणक नसल्याने एमसीटीएस क्रमांकाची नोंदणी करता येत नाही. त्यासाठी मनपाच्या राजनगर येथील केंद्रात जावे लागते. साताऱ्यातील आरोग्य केंद्रात लस ठेवण्यासाठी उपकरण नाही. देवळाईतील अनेकांना लस संपल्याने परत जावे लागते. शिवाय तिथपर्यंत जाण्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नाही. त्यामुळे देवळाई परिसरात आरोग्य उपकेंद्र सुरू करावे, अशी मागणी आप्पासाहेब शिंदे, हरिभाऊ राठोड, अनिल जगताप, संतोष जाधव यांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेल्वे कर्मचाऱ्यांचे आंदोलन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
'पीपीपी' आणि 'एफडीआय' च्या आडून रेल्वेचे खासगीकरण थांबविण्यात यावे, रेल्वे कर्मचाऱ्यांच्या पेन्शनचा नवीन कायदा रद्द करावा, या मागणीसाठी दक्षिण मध्य रेल्वे रेल्वे एम्प्लॉइज संघातर्फे मंगळवारी धरणे आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन रेल्वे स्टेशनच्या नवीन इमारतीसमोर झाले.
आंदोलनाचे नेतृत्व संघाचे अध्यक्ष अफसर हुसैन अहेमद, सचिव धनंजय कुमार सिंग यांनी केले. यावेळी रेल्वे स्टेशन प्रमुख अशोक निकम, निलिमा ठाकरे, गोपाल चव्हाण, मिलिंद गायकवाड, सुनील साळवी, राजू जगन्नाथ, इस्माईल बशीर यांच्यासह कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. औरंगाबादप्रमाणे दक्षिण मध्य रेल्वेच्या प्रत्येक स्टेशनवर हे आंदोलन करण्यात आले. वेतनवाढीत कपात न करता सातव्या वेतन आयोगाच्या शिफारसीप्रमाणे वाढ द्यावी, अशी मागणी करण्यात आली. शासनाने कमी वेतनवाढ दिल्यास मार्चमध्ये बेमुदत संपावर जाण्याचा इशारा धनंजय सिंग यांनी दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आरटीओ कॅम्पची फुलंब्रीत सुरुवात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, फुलंब्री
येथे प्रत्येक महिन्यात ड्रायव्हिंग लायसन्स कॅम्प अखेर सुरू करण्यात आला आहे. पहिला कॅम्प बुधवारी पार पडला. यावेळी १४० नागरिकांनी परवान्यासाठी नोंदणी केली. फुलंब्री येथे कॅम्प आयोजित करण्यात येत नसल्याने तालुक्यातील नागरिकांना औरंगाबाद येथील आरटीओ कार्यालयात जावे लागत होते. येथील तरुणांनी आरटीओ कार्यालयात आंदोलन करून पाठपुरावा केल्यानंतर येथे कॅम्प आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला. पहिल्याच कॅम्पला उपस्थित राहिलले मोटार वाहन निरीक्षक रंगनाथ बंडगर, सहायक मोटार वाहन निरीक्षक धनंजय देवकर, हिशोबनीस एस. एम. प्रकेलु यांचा माजी सरपंच सुहास शिरसाट यांनी सत्कार केला. हा कॅम्प सुरू होण्याआधी अर्जदार व नागरिकांना रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्त वाहतूक नियमांची माहिती देण्यात आली. याप्रसंगी राम बनसोड, योगेश मिसाळ, सुमित प्रधान, नागेश देवमाळी, आवेज चिस्ती, उमर पटेल, मुन्तेजीब काझी, गणेश निराशे, सुरेश निराशे, देविदास गाडेकर, सचिन शेरकर, इरफान सय्यद आदींची उपस्थिती होती.
..........

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुलींनी मरगळ झटकावी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, वाळूज
'स्त्री-पुरूष असा भेद कधीच संपला असून मुलीदेखील कोणत्याच क्षेत्रात मागे दिसून येत नाही. मुलींनी मरगळ झटकून सर्व क्षेत्रात करिअरच्या दृष्टीने पाहावे,' असे आवाहन मनपाचे माजी शिक्षणाधिकारी सुंदरकांत देशमुख यांनी व्यक्त केले.
ते वेलडन इन्स्टिट्यूट कॉमर्स क्लासेस व बजाज ऑटो पुरस्कृत समाजसेवा केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित किशोरी कार्यशाळेत बोलत होते. ही कार्यशाळा बजाजनगर येथील जयभवानीचौक परिसरात पार पडली. या कार्यशाळेत किशोरवयीन मुलींच्या व्यक्तीमत्व विकासासाठी तज्ज्ञ व्यक्तींनी मार्गदर्शन केले. सकाळच्या सत्रात मनपाचे माजी शिक्षणाधिकारी देशमुख यांनी महिलांसमोरील करिअर संधी याबाबत मार्गदर्शन केले. याप्रसंगी पुढे बोलतांना देशमुख म्हणाले की, मुलींनी करिअर निवडतांना आपल्या आवडीनिवडीचा विचार केला पाहिजे. आज प्रत्येक्ष क्षेत्रात मुली अग्रेसर आहेत. मात्र आपण या क्षेत्रात काम करू शकतो की नाही अशी भीती मुलींमध्ये असते. ही भिती दूर करण्याची गरज आहे. माहिती तंत्रज्ञान असो किंवा प्रशासकीय सेवा, त्यात मुली उल्लेखनीय कामगिरी करत असल्याची माहिती देशमुख यांनी दिली.
दुपारच्या सत्रात मानसोपचार तज्ज्ञ मधुरा अन्वीकर यांनी किशोरवयीन मुलींची जडण-घडण या विषयावर मार्गदर्शन केले. तिसऱ्या सत्रात या वयात आहार व आरोग्य कसे सांभाळावे याबाबत डॉ. रश्मी बोरीकर यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी बजाज विहारच्या सुनीता तगारे, इन्स्टिट्यूटचे प्रा. सचीन घुगे, प्रा. अपुर्वा हिरशचंद्रे, प्रा. विकास निकम, प्रा. राहुल काकडे आदींसह जवळपास १३० मुलींची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यापीठाकडून शुल्कवाढ मागे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
दुष्काळामुळे हतबल झालेल्या विद्यार्थ्यांनी बुधवारी जोरदार संघर्ष करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ प्रशासनाला शुल्कवाढीचा निर्णय मागे घेण्यास भाग पाडले. शुल्कवाढीत भाजपच्या बीड जिल्ह्यातील नेत्याचा दबाव असल्याचे आणि त्याला शिक्षणमंत्र्यांचेही पाठबळ मिळाल्याची चर्चा विद्यापीठ वर्तुळात आहे. विद्यापीठाच्या शुल्कवाढीचा प्रकार 'मटा'ने चव्हाट्यावर आणला होता.

विद्यापीठाने तब्बल दुप्पट शुल्कवाढ केली. त्यात बीबीए, बीसीए, एमएसस्सी आदी नऊ व्यवसायिक अभ्यासक्रमांचा समावेश होता. यानंतर विद्यार्थी, पालक आणि विद्यार्थी संघटनांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. विविध कॉलेजांचे विद्यार्थी, विविध विद्यार्थी संघटना विद्यापीठ प्रशासनाला जाब विचारण्यासाठी एकवटल्या. त्यानंतर खडबडून जागी झालेल्या प्रशासनाने शुल्कवाढ स्थगित करण्याचा निर्णय घेतला. शुल्कवाढीचे परिपत्रक स्थगित करण्यात येत असल्याचे कुलगुरू डॉ. चोपडे यांनी पत्रकारांना सांगितले.

शैक्षणिक शुल्काबाबत विद्यापीठाने डॉ. डी. बी. आघाव शुल्क समिती नेमली होती. डॉ. आघाव यांच्या समितीने शुल्कवाढीची शिफारस केली होती. २९ ऑगस्ट २०१५ रोजी व्यवस्थापन परिषदेत समितीच्या शिफारशी स्वीकारण्यात आल्या. यासंदर्भात २९ डिसेंबरला कायम विनाअनुदानित वरीष्ठ महाविद्यालय कृती समितीने कुलगुरूंची भेट घेतली होती. यानंतर दोन दिवसांत शुल्कवाढीला हिरवा कंदिल दाखविला. कृती समितीच्या पत्रावर भाजपचे रमेश पोकळे यांची स्वाक्षरी आहे. यासंदर्भात थेट शिक्षणमंत्री विनोद तावडे व त्यांच्या स्वीय सहायकाचाही फोन आल्याची चर्चा विद्यापीठात रंगली आहे, परंतु कोणाचाही फोन आला नसल्याचे व कोणाचाही दबाव नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. दरम्यान, शुल्कवाढीची मागणी केली नसल्याचे पोकळे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नामदेव ढसाळांचा विद्रोह होणार चित्रबद्ध

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
पद्मश्री नामदेव ढसाळ यांच्या कविता चित्रबद्ध करण्याच उपक्रम देशातील काही चित्रकारांनी हाती घेतला आहे. शहरात २२ ते २४ जानेवारी दरम्यान देशभरातील चित्रकार एकत्र येऊन ढसाळ यांचे साहित्यिक विद्रोही योगदान चित्रबद्ध करणार आहेत.
कवी नामदेव ढसाळ यांच्या निधनाला १५ जानेवारी रोजी दोन वर्ष पूर्ण झाले. त्यांच जन्मदिवस १५ फेब्रुवारी आहे. हे औचित्य साधून हा उपक्रम आखण्यात आला आहे. ढसाळ यांनी साहित्यक्षेत्रात दिलेल्या भरीव योगदानाची स्मृती या निमित्ताने जागवली जाणार आहे. या चित्रकार्यशाळेसाठी २५ प्रतिभावान चित्रकारांना निमंत्रित करण्यात आले आहे, अशी माहिती संयोजक व चित्रकार नंदकुमार जोगदंड यांनी दिली. नवी दिल्ली येथील स. वि. सावरकर, डॉ. वाय. एस. आलोने, मुंबईचे तुका जाधव व प्रकाश भिसे, बडोदा येथील नवीन पहांदे, नागपूरचे संजय डोंगरे व पुणे येथील बापू झांजे हे प्रसिद्ध चित्रकार ढसाळ यांच्या कविता चित्रबद्ध करणार आहेत. ही कार्यशाळा गारखेड्यातील यशवंत कला महाविद्यालयात आयोजित करण्यात आली आहे. या कार्यशाळेला नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन प्रा. प्रकाश सिरसाट, गौतम अडागळे, देवानंद पवार, किशोर उघडे यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अबकारी कर वसुलीत उस्मानाबाद नंबर वन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, उस्मानाबाद
चालू आर्थिक वर्षात अबकारी कर वसुलीत उस्मानाबाद जिल्हा हा मराठवाड्यातील आठही जिह्यात नंबर वन आहे. यंदा उस्मानाबाद जिल्ह्याला १०१ कोटी ३६ लाख रूपये कर वसुलीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. उस्मानाबाद जिल्ह्याने दुष्काळी स्थितीतही आतापर्यंत १०० कोटी ३ लाख रुपये इतकी कर वसुली केली असल्याची माहीती उस्मानाबाद राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिक्षक स्नेहलता श्रीकर यांनी दिली.
जिल्ह्यात सध्या दुष्काळी स्थिती आहे. अनेक साखर कारखाने बंद आहेत. परिणामी यंदा उसतोड कामगारांची संख्याही जिल्ह्यात कमीच आहे. या दुष्काळाचा परिणाम सेलवर झालेला असतानाही उस्मानाबाद जिल्ह्याने उद्दिष्ट पूर्तीकडे वाटचाल केली आहे.
उस्मानाबाद येथील कार्यालयात अधिकाऱ्यांची व कर्मचाऱ्यांची वाणवा असताना शिवाय वाहनसंख्येचा अभाव असताना उपलब्ध अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेमुळे करवसुलीचे उदिष्ट गाठु शकलो, अशी कबुली स्नेहलता श्रीकर यांनी दिली.
सध्याद या कार्यालयात उपअधीक्षकाचे एकपद रिक्त आहे. याशिवाय चारही निरीक्षकांची पदे रिक्त आहेत. येथे केवळ चार उपनिरीक्षकांच्या सहाय्याने कारभार करावा लागत आहे, अशी खंत श्रीकर यांनी व्यक्त केली.अशाही स्थितीत उस्मानाबाद जिल्ह्याने अबकारी कर वसुलीचे उद‌िष्ट शंभरटक्के पूर्णकरत मराठवाड्यात नंबर वनचा दर्जा प्राप्त करण्याचा प्रयत्न केला आहे.

गोडाऊन उपलब्ध करून देध्याची गरज
येथील कार्यालयाकडे जप्त केलेला मुद्देमाल ठेवण्यासही सध्या जागा नाही. एक गोडाऊन साहित्याने भरलेले आहे. जप्त केलेला मुद्देमाल न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत सांभाळावा लागतो. शासनाने येथे आणखीन गोडाऊन उपलब्ध करून देणे गरजेचे आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जलयुक्त शिवारच्या नाल्यालगत वनराईची निर्मिती

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, लातूर
शाश्वत शेती करायची असेल तर मृद व जलसंधारण करून भूजल पातळी वाढविणे गरजेचे आहे. माती व पशुधन यांच्या संवर्धनाकरिता दीर्घकालीन चारा नियोजन करण्यासाठी लातूर तालुक्यातील हरंगुळ (बु) गावातील युवकांनी पुढाकार घेऊन लोकवाट्यातून जलयुक्त शिवार योजनेतंर्गत नाला सरळीकरण, रुंदीकरण व खोलीकरणाचे २५ किलो मीटरचे लांबीचे काम यशस्वीरित्या पूर्ण केले आहे. यापुढे चालून त्यांनी नाल्याच्या बाजूला अभिनव उपक्रमतंर्गत वनराई निर्माण करण्याचे कार्य हाती घेतले आहे.
या योजनेसाठी गावातील पोलिस पाटील सूर्यकांत पाटील, संतोष शेळके, गोविंद शेळके, शाम बरुरे, भीमा झुंजारे, महेश पाटील, दयानंद पाटील, रामचंद्र सुडे, सुधीर पाटील, गणेश पाटील, कपील बरुरे, राजकुमार वाघमारे, राम वाघमारे, राम बिर्ले, बालू कैले, विरभद्र लोखंडे, युवराज माळी, विकास कांबळे, वाल्मिक कांबळे, युवराज खरोसे, अमित वाघमारे, दत्ता वाघमारे या युवकांनी परिश्रम घेतले. शासकीय व राजकीयस्तरावर सर्वतोपरी प्रयत्न करुन १० कोटी रुपयांचा आराखडा तयार करुन त्यांच्या मंजुरीसाठी प्रयत्न केले जात आहेत. नाल्यांच्या बाजूला झाडे लावून निर्माण केलेल्या नाल्यातील पाण्याचा थेंब ना थेंब याच भागात जिरवण्या बरोबरच हे नाले अधिक काळ टिकून रहावेत यासाठी ही संकल्पना राबविण्यात येत आहे. या योजनेसाठी त्यांना शासकीय पातळीवर कृषी अधिकारी सूर्यकांत लोखंडे यांनी ही मार्गदर्शन आणि वेळोवेळी शासनस्तरावर वेगवेगळ्या योजनांची माहिती देऊन त्यांच्या पुर्ततेसाठी पाठपुरावा केला आहे.
वनराईमुळे पर्यावरण पूरक व शेतकऱ्यांना उत्पन्न देणाऱ्या वृक्षांची लागवड या नाल्याच्या सभोवती केली जाणार आहे. एकूण ५० किलो मीटर अंतरात ही वृक्ष लागवड करणे अपेक्षीत असून त्यासाठी ३ कोटी ४५ लाख रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यानुसार हा आरखडा मंगळवारी जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांच्या समोर सादर करून त्यास मंजूरी घेण्यासाठी हरंगुळ गावात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यानुसार पोले यांनी गावातील सर्व उपक्रमांचे कौतुक करून या आराखड्यास मंजूरी देण्यासाठी शासनस्तरावर आपण अधिका-अधिक प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन ही दिले आहे.
जलयुक्त शिवारच्या कामासाठी लोकवाट्या शिवाय जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनीही निधी दिल्याची माहिती सूर्यकांत पाटील यांनी दिली. त्यापैकी लातूरचे खासदार डॉ. सुनील गायकवाड यांनी १० लाख, आमदार अमित देशमुख यांनी १२ लाख रुपये तर आमदार दिलीपराव देशमुख यांनी त्यांच्या निधीतून ५ लाख रुपयांचा निधी दिला आहे. त्याशिवाय गावातील अगदी इतरांच्या शेतात मजुरी करणाऱ्या गजानन माळी सारख्या मजुरांनीही पाचशे रुपयांपासून ते अगदी लाखो रुपयांपर्यत लोकवाटा दिला आहे.
जलयुक्त शिवारच्या झालेल्या कामाचा गौरव करून हरंगुळ गावाचा जलयुक्त शिवार योजनेत समावेश करण्याकामी मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक अभिमन्यू पवार यांच्या सहकार्यामुळे या कामासाठी प्रोत्सहनपर ५० लाख रुपयांचा निधी मुख्यमंत्र्यानी मंजूर केलेला आहे.
कृषी अधिकारी लोखंडे यांनी दिलेल्या माहितीनुसार गावातील पाणी टिकवण्यासाठी रिचार्ज शाफ्ट बोअर नुसार या नाल्यातील पाणी वाहून जाऊ नये यासाठी या भागात पडणारा पावसाचा थेंब न थेंब जमिनीत जिरवण्याचा आमचा प्रयत्न असेल. त्याशिवाय या भागांत १२० बांधबंदिस्ती, अंतर्गत पाणी जिरवण्याचे काम केले जाणार आहे. ३१ सिमेंट बंधाऱ्यांच्या माध्यमातून पाणी आडवले जाणार आहे. यामुळे हरंगुळ शिवारातील १९२७ हेक्टर क्षेत्र वाहित होऊन १२ महिने ओलिताखाली राहणार आहे, असा विश्वास त्यांना वाटतो.

जलयुक्त शिवार अंतर्गत तयार करण्यात आलेल्या नाल्यांपैकी मोठे नाले हे ५० फुट रुंदीचे असून त्यांची खोली साधारण २० फूट इतकी आहे. तर लहानात लहान असलेले नाले हे २५ फुट रुंदीचे असून १५ फुट इतकी आहे. शासनाकडून केल्या गेलेल्या कामांवरती साधारण रुंदी ८ ते १० फुट एवढी असते व खोली ही ५ ते ८ फुटापर्यंत असते.

भविष्यात येथील शेतकर्यांना दुष्काळाचा सामना करावा लागू नये यासाठी उपलब्ध असलेले पाणी ठिबक सिंचन आणि तुषार सिंचनाच्या योजनेतून संबंधित ठिबक आणि तुषार सिंचनाचे सेट उपलब्ध करुन दिले जाणार आहेत. त्यासाठी शासनाकडून अल्पभूधारकांना ४५ % अनुदान दिले जाणार आहे तर सर्वसाधारण शेतकर्याला ३५ % अनुदान असेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टंचाईच्या झळामुळे विदेशी पाहुण्याच्या संख्येत घट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नांदेड
थंडीची दिवस हे खरेतर पक्षी निरिक्षणासाठीची पर्वणीचे ठरतात. पण यंदा थंडी कायम राहूनही, पाण्याचे मात्र मोठे दुर्भिक्ष्य निर्माण झाले आहे. सलग काही वर्षांच्या मान्सूनच्या नाराजीमुळे मराठवाडा आणि विदर्भात पाणीटंचाई जाणवू लागली आहे. या पाणीटंचाईची झळ विदेशी पाहुण्या म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या पक्ष्यांनाही सहन करावी लागत आहे.
नद्या, नाले, तलाव, मालगुजारी टँक आटले आहेत. उरलेल्या काही जलसाठ्यावरही आता अतिक्रमण सुरू झाले आहे. यातील पाण्याचा वापर अन्य कारणांसाठीही होऊ लागला आहे. भरमसाठ उपसामुळे या तलावावर येणाऱ्या विदेशी पाहुणे पक्षांची संख्या रोडावली आहे. या विदेशी पक्ष्यांच्या प्रवासाबाबत आणि अधिवासाबाबत पक्षीमित्र छायाचित्रकार म्हणून विजय होकर्णे, डॉ. प्रेमेंद्र बोथरा, मिलिंद सावदेकर पाठपुरावा करत आहेत. गेल्या चार ते पाच वर्षांपासून मराठवाड्यातील नांदेड, हिंगोली, परभणी, विदर्भातील वाशीम येथील तलावावर येणाऱ्या देशी-विदेशी प्रजातीच्या नोंदी घेत आहेत. यात अग्नीपंख (फ्लेमींगो), पेंटेडस्टॉर्क, ब्लॅक टेड गॅाडवीट, बार हेडेड गूज, रडी-शेल डक, गढवाल, युरेशीयम वीजेन, कॉमन टेल, नार्दन पिनटेल, नार्दन शॅावेलकर, कॅामन पोचाड, चक्रवाक (गोल्डन डक) याशिवाय इतरही काही पक्ष्यांच्या संख्येबाबत निरीक्षण घेण्यात आले आहे. वाशिम जिल्ह्यातील एकभुरजी तलावावर सावदेकर यांनी १७० वेगवेगळ्या पक्ष्यांच्या नोंदी ठेवल्या आहेत.
एकूणच विदर्भ, मराठवाड्यातील पाण्याची स्थिती पाहता, टंचाईच्या झळा या पक्ष्यांनाही बसण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे तलावांवर विहरणाऱ्या पक्ष्यांची विहंगम दृश्य आणखी दुर्मीळ होईल, अशी चिंता व्यक्त केली जाते आहे. यामुळे पक्षीमित्र, संशोधक, पक्षीमित्र, अभ्यासक पक्ष्यांच्या पुढल्या हंगामातील प्रवास आणि याच वर्षीतील अधिवास याबाबत चिंता व्यक्त करू लागले आहेत. अशा प्रतिकुल परिस्थितीतही पक्ष्यांच्या हालचालीबाबत आणखी निरीक्षण करण्याची, आवश्यकता व्यक्त केली जाते आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जालना पालिकेच्या सभेत मलाईदार प्रस्ताव

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, जालना
जालना पालिकेच्या सर्वसाधारण सभेत गुरुवारी २५ विषय चर्चेला येणार आहेत. विशेषतः महात्मा फुले मार्केट, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या विशेष प्रयत्नातील अंतर्गत जलवाहिनी प्रस्तावाचा लोकसहभाग यासोबतच थेंबभर पाणी नसलेल्या कुंडलिका आणि सीना नदीच्या पात्रात संरक्षण भिंत बांधण्याचा मलाईदार प्रस्ताव आहे.
पाणी, रस्ते, वीज आणि स्वच्छता या सर्व आघाड्यांचा बोजवारा उडालेल्या जालना पालिकेच्यावतीने या नागरिकांना आवश्यक असणाऱ्या मुलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याऐवजी भलतेसलते विषय चर्चेला घेऊन या प्रश्नाला बगल देण्यासाठी रचना तयार करण्यात आली आहे. 'धरण उशाला अन कोरड घशाला' अशी काहीशी अवस्था झालेल्या जालना शहरातील अंतर्गत जलवाहिन्यांमधून सरासरी ६० टक्के पाणी गळती होऊन वाया जाते यावर उपाय करण्यासाठी खासदार रावसाहेब दानवे यांनी राज्य सरकारच्या भूतपूर्व नगरोस्थान योजनेचा जालन्याला फायदा करून देण्यासाठी प्रयत्न केला. ही योजना संपूर्ण राज्यात बंद झाली असताना विशेष बाब म्हणून जालन्यात आणली. मात्र, या साधारण १३० कोटी रुपयांच्या योजनेचे काम सुरू करण्यासाठी पंचवीस टक्के लोकसहभाग पालिकेने भरण्याचा कळीचा प्रश्न उपस्थित झाला आहे. पालिकेच्या तिजोरीत ठणठणाट असताना ही रक्कम भरायची कशी यावर चर्चा चालू आहे. दरम्यान, या योजनेचा डीपीआर तयार आहे. लोकसहभाग भरला की निविदा प्रक्रिया सुरू होईल पण सध्याच्या घडीला तरी बाजारात तुरी अन्....अशीच अवस्था आहे.
शहरातील मध्यवर्ती वस्तीमध्ये असलेल्या सुमारे तीनशे व्यापारी धंदा करत असलेल्या महात्मा फुले मार्केट सन २००६ मध्ये पाडले. हे सगळे व्यापारी अक्षरशः रस्त्यावर आले. आजपर्यंत सर्व बाजूंनी या सगळ्या व्यापारी वर्गांनी अनेकदा पट्या करून नेत्यांच्या घराच्या पायऱ्या झिझवल्या आहेत. तथापी समस्या सुटू शकलेली नाही. बीओटी तत्त्वावर आधारित आता हे मार्केट उभे करण्यासाठी पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी पुढाकार घेतला आहे. त्यामुळे नक्की काम मार्गी लागेल असे व्यापारी बोलताना भावना व्यक्त करतात. सर्वसाधारण सभेत या मार्केटच्या बांधकामातील किचकट अटीवर उपाय शोधला जाणार आहे.
जालना शहरातील मध्य भागातून वाहणाऱ्या कुंडलिका आणि सीना या दोन्ही मोठ्या नद्यांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे नेमक्या शब्दात सांगायचे झाल्यास शहराच्या गटार योजना या नद्या झाल्या आहेत. पाण्याचा एक थेंब नाही आणि आता या दोन्ही नद्यांच्या पात्रावर भिंत बांधण्याचा मलाईदार प्रस्ताव सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

केंब्रिज रस्ता डिसेंबरपर्यंत पूर्ण होणार

$
0
0


म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद
केंब्रिज ते सावंगी फाटा हा १३ किलोमीटरचा रस्ता डिसेंबरपर्यंत पूर्ण करणार असल्याची हमी सार्वजनिक बांधकाम विभागाने मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल केलेल्या शपथपत्रात घेतली आहे. जालना रोडला पर्यायी रस्ता असलेल्या कैलासनगर ते एमजीएम रस्त्यासाठी काही भूसंपादन प्रक्रिया बाकी आहे, ती लवकरच पूर्ण करणार असल्याचे महापालिकेने शपथपत्रात म्हटले आहे.
शहरातील रस्त्यांच्या दूरवस्थेसंदर्भात वकील रुपेश जैस्वाल यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेत सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महापालिकेने बुधवारी शपथपत्र सादर केले. न्या. रवींद्र बोर्डे व न्या. एआयएस चिमा यांच्यासमोर सुनावणी झाली. या याचिकेत गेल्या सुनावणीत शहराच्या आरोग्याची बिकट परिस्थिती लक्षात घेऊन खंडपीठाने प्रशासनाला धारेवर धरले होते. पोलिस आयुक्तांनी शहरातील वाहतुकीवर सविस्तर उपाययोजना सुचविल्या होत्या, तर महापालिकेतर्फे आरोग्याचे प्रश्न सोडविण्यासाठी उपाययोजना करण्याचे शपथपत्र दाखल केले होते.
क्रांतिचौक उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूने संरक्षक जाळी कोणता विभाग लावणार, असा प्रश्न उपस्थित झाला होता. रस्ते विकास महामंडळातर्फे या संरक्षक जाळ्या बसवण्यात येणार असल्याचे खंडपीठात सांगण्यात आले. महापालिकेतर्फे राजेंद्र देशमुख, रस्ते विकास महामंडळातर्फे श्रीकांत अदवंत, तर शासनातर्फे अमरजितसिंग गिरासे यांनी काम पाहिले. महापालिकेकडून रस्त्यातील खड्डे बुजवण्यासाठी हॉटमिक्स हॉटलिड प्लॅंट बसवण्यात येणार आहे. ७ जानेवारी रोजी सर्वसाधारण सभेत हा निर्णय घेण्यात आला. लवकरच हा प्लॉन्ट उभारला जाईल, असे पालिकेच्या शपथपत्रात म्हटले आहे. जालना रोडला पर्यायी रस्ता असलेल्या कैलासनगर ते एमजीएम रस्त्यासाठी काही भूसंपादन प्रक्रिया बाकी आहे, ती लवकरच पूर्ण करणार असल्याचे पालिकेने म्हटले आहे. ऐतिहासिक पैठणगेट, रोशनगेट, दिल्ली गेट येथे दोन्ही बाजूंनी पर्यायी रस्ते केलेले आहेत. उर्वरित गेटच्या बाजूने रस्ते करण्यात येणार असून, त्यासाठीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे. गुलमंडी, सराफा, पानदरीबा, सुपारी हनुमान, कटकटगेट, भांडीबाजार या ठिकाणच्या रस्त्यांच्या रुंदीकरणाचे काम हाती घेतले असून, ही प्रक्रिया लवकरच पूर्ण केली जाईल.
क्रांतिचौक ते रेल्वेस्टेशन या रस्त्याचे काही काम बाकी आहे. काही जागा रेल्वेची असल्याने रेल्वे विभागाने साडेतीन कोटी रुपयांची मागणी केली आहे. ही रक्कम लवकरात लवकर दिली जाणार आहे. पोलिस आयुक्तांनी सुचवल्याप्रमाणे वाहतूक सल्लागार समितीची स्थापना करण्याचे नियोजन करण्यात येईल, असे पालिकेच्या शपथपत्रात म्हटले आहे.
पावसाळ्यापूर्वी काम पूर्ण करणार
सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे कार्यकारी अभियंता वृषाली गाडेकर यांनी शपथपत्र सादर केले. मोंढा नाका, सेव्हनहिल्स, संग्रामनगर पुलावर रिफ्लेक्टर बसविण्यात आले. उर्वरित पुलांवरही रिफ्लेक्टर बसवण्यात येणार आहेत. शरणापूर फाटा ते साजापूर या ४.६ किमी रस्त्याचे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करणार असल्याचे या शपथपत्रात म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चोरीच्या तीन शेळ्या, कारसह तिघांना अटक

$
0
0

फुलंब्री : तालुक्यातील वडोदबाजार येथील आठवडी बाजारात जळगांव जिल्ह्यातून विकण्यासाठी आणलेल्या चोरीच्या तीन शेळ्या व इंडिका कार, असा दोन लाख २७ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे.

चोरीच्या शेळ्या विकण्यासाठी वडोदबाजार येथील आठवडी बाजारात येत असल्याची माहिती वडोदबाजार पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सापळा रचण्यात आला. यावेळी सोमवारी सायंकाळी पाच वाजता खामगाव फाट्यानजिक फरशी येथील गायरानातून जाणारी संशयित इंडिका कार (एम एच ०१, ए एम ४१६१) पोलिसांना आढळून आली. त्यात तीन शेळ्या होत्या. हेडकॉन्स्टेबल जनार्दन राठोड व गणेश कोरडे यांनी शेळ्यांसह कार ताब्यात घेतली. याप्रकरणी निसार फनातुला मुलतानी (रा. पिरबावडा हल्ली मुक्काम संजयनगर गल्ली नंबर ७, औरंगाबाद), चेतन ढाकरे (रा. मंगरूळ दस्तगीर ता. धामणगांव जि. अमरावती), मसरत सरदार मुलतानी (रा. येवला जि. नाशिक) या तिघांना अटक करण्यात आली. त्यांना मंगळवारी फुलंब्री कोर्टासमोर हजर केले असता जामिनावर मुक्तता केल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक शिंदे यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एका दिवसात पारा ४ अंशांनी उतरला

$
0
0


औरंगाबाद : एरव्ही मकरसंक्रांतीनंतर थंडी तिळातिळाने कमी होते असे म्हटले जाते, पण औरंगाबादकरांना या आठवड्यात उलटा अनुभव येत आहे. सोमवारपासून दररोज थंडीचा कडाका वाढत आहे. बुधवारी शहराचे तापमान १० अंशांपर्यंत घसरले होते. उत्तरभारतामध्ये थंडीची लाट सुरू आहे. त्याचा हा परिणाम असल्याचे मानले जात आहे.
नवीन वर्षाची सुरुवात झाल्यानंतर काही दिवस थंडी हळूहळू कमी होत होती. मात्र, सकाळच्या सत्रात कडाका कायम होता. या आठवड्यात गायब झालेली थंडी पुन्हा परतली आहे. दिवसभर वारे वाहत असले तरी उन्हाचे चटके मात्र बसत आहेत. सकाळी आणि रात्री मात्र थंडी अशी विचित्र परिस्थिती औरंगाबादकर अनुभवत आहेत. मंगळवारी किमान १५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली होती. ते तब्बल चार अंशांनी घसरले. बुधवारी १०.६ अंश सेल्सिअस तापमान चिकलठाणा वेधशाळेत नोंदविले गेले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ग्रामविकास खाते घेणार पोर्टल

$
0
0


Makarand.Kulkarni
@timesgroup.com
औरंगाबाद ः राज्यातील जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि ग्रामपंचायतींच्या लेखा पद्धतीच्या नोंदीसाठी ग्रामविकास खात्याकडून 'संग्राम' हे पोर्टल वापरण्यात येत आहे. मात्र, यामध्ये अनेक त्रुटी असून त्यात देशात आदर्श अशी 'दर्पण' प्रणाली मध्यप्रदेश सरकारने विकसित केली आहे. त्याची पाहणी प्रधान सचिव के. गिरीराज यांनी नुकतीच केली. पुढील सहा महिन्यांत हे पोर्टल महाराष्ट्रात लागू होण्याची शक्यता आहे.
ग्रामविकास खात्याच्या अखत्यारित असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या खर्चाचा लेखा जोखा नोंदविण्यासाठी तसेच अन्य नोंदींसाठी राज्यभर 'संग्राम' नावाचे पोर्टल वापरले जाते. त्यातून बऱ्यापैकी फायदा झाला. मात्र, यात आणखी पारदर्शकता आणि सुलभता यावी, यासाठी सुधारणा सुचविण्यात आल्या. याच धर्तीवर मध्यप्रदेश सरकारने विकसित केलेले पोर्टल अधिक फायदेशीर असल्याची माहिती ग्रामविकास खात्याला मिळाली होती. प्रधान सचिव के. गिरीराज यांच्यासह एक उपसचिव आणि औरंगाबाद जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी उत्तम चव्हाण यांच्या शिष्टमंडळाने गेल्या आठवड्यात मध्यप्रदेशचा दौरा केला. खांडवा जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि जोसवाडी ग्रामपंचायतीत जाऊन तेथील पोर्टलची माहिती घेतली. मध्यप्रदेश सरकारने एनआयसी भोपाळ येथून 'दर्पण' नावाचे पोर्टल तयार केले आहेत. मध्यप्रदेशात द्विस्तरीय अकाऊंटिंग सिस्टीम कार्यान्वित आहे. राज्य सरकारकडून थेट पंचायत समिती आणि ग्रामपंचायतींना निधी वितरित केला जातो. त्या पार्श्वभूमीवर 'दर्पण' पोर्टलमध्ये सूक्ष्म नोंदी ठेवण्यात आल्या आहेत. दोन दिवस महाराष्ट्रातील शिष्टमंडळाने या कार्यप्रणालीची माहिती करून घेतली.
कामात होणार सुधारणा
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अशा प्रकारचे पोर्टल ग्रामविकास खाते लवकरच विकसित करणार आहे. भोपाळ एनआयसी किंवा पुणे एनआयसीमधून नवीन पोर्टल विकसित करून घेऊन ते पुढील चार महिन्यांत महाराष्ट्रात कार्यान्वित करण्याच्या दृष्टीने ग्रामविकास खाते विचार करत आहे. नवीन पोर्टलमुळे ग्रामपंचायत पातळीवरील कामात सुधारणा होणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images