Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

पर्यटनातून आर्थिक विकास

$
0
0



- विजय चौधरी

जगप्रसिद्ध वेरूळ लेणी व बारावे ज्योतिर्लिंग घृष्णेश्‍वर मंदिरासाठी प्रसिद्ध असलेल्या वेरूळसारख्या गावाचा विकास करताना स्थानिक जनतेचे आर्थिक स्थैर्य वाढविण्यासाठी प्रयत्न आवश्यक आहेत. वेरूळला पर्यटनातून सामाजिक, आर्थिक विकास साधण्याची नामी संधी आहे. गरज आहे ती त्याकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन बदलण्याची...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या खासदार आदर्श गाव योजना या धोरणामध्ये शिवसेनेचे राज्यसभा सदस्य खासदार राजकुमार धूत यांनी वेरूळ गाव दत्तक घेतले आहे. त्यासाठी सव्वा दोन कोटी रुपयांचा निधी दिला आहे. पर्यटन राज्यमंत्री प्रा. राम शिंदे यांनी वेरूळसह इतरही पर्यटनस्थळे विकसित करण्यासाठी ९०० कोटी रुपयांची योजना असल्याचे जाहीर केलेले आहे. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पात घृष्णेश्‍वर ज्योतिर्लिंग मंदिराच्या विकासासाठी ५० लाख रुपयांची तरतूद केल्याचे जाहीर केले आहे. वेरूळ, म्हैसमाळ, खुलताबाद, सुलीभंजन गावाच्या सर्वांगीण विकासाचा आराखडा पर्यटन प्राधिकरणाने तयार केला आहे. त्यासाठी ५०० कोटी रुपयांच्या निधीची मागणी आहे. पहिल्या टप्प्यात १४५ कोटी रुपयांच्या आराखड्याला विभागीय आयुक्तांनी मान्यता दिली आहे. प्राधिकरणाचा प्रारूप आराखडा मंजूर करून अर्थसंकल्पात तरतूद करण्यासाठी पाठविण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. या योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे झाल्यास वेरूळच्या पर्यटन विकासात एका नव्या पर्वाची भर पडेल. या योजनेचे दृश्य परिणाम दिसावयास काही वर्षांचा कालावधी जावा लागेल.
पर्यटनाच्यादृष्टीने वेरूळचा नियोजनपूर्वक सामाजिक व आर्थिक विकास करता येण्यासारखा आहे. तसे झाल्यास स्थानिकांना रोजगाराची मोठी संधी उपलब्ध होऊ शकेल. देशविदेशातील पर्यटकांना येथे दर्जेदार दळणवळणाची व राहण्याची सोय झाल्यास पर्यटन विकासाला अधिक चालना मिळेल. त्यातून स्थानिक तरुणांना रोजगाराची संधी मिळवून देता येईल. ग्रामीण भागातील तरुणांचे शहराकडे रोजगारासाठी जाणारे लोंढे थांबविता यावेत, या युवा शक्तीला कौशल्य विकासाचे धडे मिळावेत. स्थानिक पातळीवरच चांगला रोजगार मिळावा, त्यासाठी लागणारे आवश्यक कौशल्य त्यांना शास्त्रीय ज्ञानाद्वारे आत्मसात करता यावे यासाठी प्रयत्न होण्याची गरज आहे. वेरूळमध्ये पर्यटन व्यवसायावर अवलंबून असलेल्या कुटुंबांची संख्या मोठी आहे. अर्धवट शाळा सोडलेले तरुण तसेच उच्चशिक्षित रोजगारासाठी औरंगाबादकडे धाव घेतात किंवा स्थानिक कौशल्य व दर्जाअभावी कमी रोजंदारीवर वेठबिगार म्हणून राबतात. त्यांच्यासाठी स्वतःचा व्यवसाय स्थापण्यासह रोजगारासाठी तयार असणाऱ्या असंख्य संधी लक्षात घेऊन पर्यटन व्यवसायातील वेगवेगळे प्रशिक्षण वर्ग सुरू करण्याची गरज आहे. गाइड, आदरातिथ्याचे शिक्षण देऊन स्थानिक बेरोजगारांना प्रशिक्षित केल्यास पर्यटन व्यवसायाला उत्तम दर्जा प्राप्त होईल. उत्तमात उत्तम सोयी सुविधा हीच पर्यटनाची गुरुकिल्ली आहे. स्थानिक तरुणांचा, महिला बचतगटांचा पर्यटनात सहभाग असायला पाहिजे. त्यांना प्रशिक्षित करून उत्पन्नाचे साधन मिळाले पाहिजे. या क्षेत्रात टूर ऑपरेटर्सनी दूरदृष्टी दाखवली, तर वंचित घटकांच्या विकासाचे काम शक्य होऊ शकेल.
शालेय शिक्षणापासून दूर राहिलेल्या व चांगल्या रोजगाराची अपेक्षा बाळगून काम करणाऱ्या सुशिक्षित तरुणांना वास्तविक पायाभूत प्रशिक्षणाची आणि योग्य मार्गदर्शकाची आवश्यकता आहे. पर्यटनातून विकास साधताना सामाजिक विषमतेचेही भान ठेवायला हवे. वेरूळची बेरोजगारी कमी व्हावी, यासाठी मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती करावयास हवी. पर्यटनाचा विकास होण्यासाठी पर्यटकांना सुविधा उपलब्ध करून देण्याच्या कामात स्थानिक रहिवाशांना सहभागी करून घेतले गेले पाहिजे. पर्यटन उद्योगाच्या माध्यमातून उपलब्ध होणारा पैसा आणि रोजगार लक्षात घेऊन पर्यटन धोरण ठरविण्याची गरज आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सीमा परिषदेची पंच्याहत्तरी

$
0
0





- प्रवीण बा. मोरे

भारतीय स्वातंत्र्याच्या कायद्यानुसार १५ ऑगस्ट १९४७ रोजी आपला भारत देश ब्रिटीश राजवट संपुष्टात येऊन स्वतंत्र झाला. या कायद्यान्वये देशातील स्थानिक राजे व संस्थांनिकांना स्थानिक राजे व संस्थांनिकांना स्वतंत्र भारतात सामिल होण्याबाबतचे स्वातंत्र्य देण्यात आले होते. त्यामुळे स्थानिक व राजेरजवाड्यांना स्वतंत्र भारतात सामिल करून घेण्याबाबतचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. भूभाग, आकार व लोकसंख्येने मोठे असलेले भारतीतील दुसऱ्या क्रमांकाचे हैद्राबाद संस्थान हे स्वतंत्र राहणे भारताच्या अखंडतेच्या दृष्टीने धोकादायक होते. परंतु अनेक संस्थानिक राजेरजवाडे यांच्या इच्छा अाकांक्षाची पर्वा न करता संस्थानिकाना स्वतंत्र भागात अखंडतेच्या दृष्टीने, सार्वभौमत्वाच्या व संरक्षणाच्या दृष्टीने सामील करणे, नितांत आवश्यक होते व त्यासाठी जुनागढ, जम्मू-काश्मीरबरोबरच मध्य हैदराबाद संस्थानांत संस्थानविरोधी संघर्ष सुरू झाला.
संरक्षण व राजकीयदृष्ट्या हालचालींना सुरुवात झाली. हैदराबादचा संस्थानिक निजाम हा मराठवाडा, तेलंगण व कर्नाटकच्या काही जिल्ह्यातील हैदराबाद संस्थान म्हटल्या जाणाऱ्या भूभागावर आपली अधिसत्ता गाजवत होता. हैदराबादच्या निजामाने ३१ जुलै १७२४पासून मुघलांचा दक्षिणेतील सुभेदार म्हणून या भागात प्रवेश केला होता. स्वातंत्र्यानंतर निजामाने स्वतंत्र भारतात सामील होण्यासाठी स्पष्ट नकार दिला व 'आझाद हैदराबाद'ची घोषणा केली. अनियंत्रित राजसत्ता भोगताना आपल्या अधिनस्त 'रजाकार' सैनिकांमार्फत संस्थानातील प्रजेवर अनन्वित अत्याचार केले. संस्थानात कोणत्याही प्रकारच्या जनताभिमुख व विकासात्मक योजना आखल्या नाहीत. सर्वसामान्य जनता दडपणाखाली कशी राहील, तसेच जोरजबरदस्ती करून, शेती उत्पादन साधणे, व्यापार यावर नियंत्रण ठेवले होते. अशा परिस्थितीत संस्थानात जनआंदोलनास सुरुवात झाली. संस्थानिकाच्या दमननीतीचा रजाकाराच्या अन्यायाविरुद्ध संघटनात्मक कार्यास सुरुवात झाली, त्यात राष्ट्रीय काँग्रेस, आर्य समाज, कम्युनिस्ट यांच्याबरोबर महाराष्ट्र परिषदेच्या माध्यमातून तसेच सर्वसामान्य जनता, शेतकरी व डॉ. बाबासाहेब आंबेडकराच्या शेड्यूल्ड कास्ट फेडरेशनचेही कार्य महत्त्वाचे ठरते. 'आम्ही गुलामाचे गुलाम होण्यास तयार नाही', अशी स्पष्ट भूमिका संस्थानिकांबाबत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी प्रतिपादीत केली. त्यामुळे संस्थानातील दलितांना निजामाने विरोध करा. निजाम देशाचा शत्रू आहे, अशा आशयाचे पत्रके वाटण्याचा शे.का.फे.च्या मराठवाड्यातील कार्यकर्त्यांना आदेश दिले. निजामविरोधी कार्यात जबाबदार राज्यपद्धतीस समर्थन व सहायोग देण्याबाबत स्पष्टपणे सांगितले.

निजाम व संस्थानिकांबाबत डॉ. बाबासाहेबांचा विरोध
पहिल्या गोलमेज परिषदेपासून भारतातील दलितांना समाजोद्धारासाठी व स्वविकासासाठी स्वातंत्र्य आवश्यक आहे. त्यांचा सर्वांगीण विकास खऱ्या स्वातंत्र्यातच होऊ शकतो. त्यामुळे राजांना, संस्थानिकांना स्वायत्ता देणे अथवा त्यांचे अस्तित्व हे लोकशाहीसाठी धोकादायक आहे, असा स्पष्ट विचार मांडला. अशा लोकशाही मार्गांचा, अखंड भारताचा व जबाबदार राज्य पद्धतीचा विचार मांडणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना संस्थानात निजामाने भाषण बंदी केली होती. बंदीचा विचार न करता संस्थानाच्या सीमेवरिल ब्रिटीश हद्दीत मौजे मक्रणपूर (डांगरा ता. कन्नड) शिवनानदी तीरावरील औरंगाबाद येथील ३० डिसेंबर १९३८ रोजी व उस्मानाबाद व सोलापूर सीमेवरील तडवळे ढोकी या ब्रिटीश हद्दीतील गावी २३ फेब्रुवारी १९४१ साली सीमा सभाचे आयोजन केले. यात निजामविरोधी सीमा सभांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी समाजोद्धाराबरोबरच निजामाच्या प्रजाविरोधी नितीचा पाढा वाचला.
संस्थानातील तमाम दलित समाज या परवानगी नाकारलेल्या निजाम विरोधी सभांना हजर झाला. २१, २२, २३ फेब्रुवारी १९४१ रोजी झालेल्या तडवळे ठोकी या उस्मानाबाद सीमेवरील गावात सीमासभेचे आयोजन केले. या वेळी आमदार जिवाप्पा ऐदाळे यांनी भगप्पा सोनवणे, भगवान भालेराव, पंढरीनाथ निकाळजे, नाथा भालेराव, यशवंत सोनवणे, पारूबाई सोनवणे, देविचंद कदम, गोविंदराव भालेराव, हरीभाऊ तोरणे, गणपतराव सुकाळे यांनी या परिषदेचे आयोजन केले होते. सभेच्या आयोजनात जिवाप्पा ऐदाळे, तोरणेमास्तर, निकाळजे, सोनवणे, भालेराव यांच्याबरोबरच सुधारणाप्रिय, श्रीमंत पाटील दडपेमामा, शंकरराव निंबाळकर, बाबुराव देशपांडे हेही सभेला हजर होते. परिषदेसाठी मराठवाड्यातील 'मोगलाई' व ब्रिटीश हद्दीतील गावाना 'आंगलाई' अशी ओळख असणाऱ्या परिसरातील मोठ्या संख्येने जनसमुदाय सभेला हजर होता. या निजामविरोधी दलित परिषदेच्या पंढरपूरच्या 'अकबर प्रेस'मधून छापून आणल्या होत्या.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी २३ फेब्रुवारी १९४८ रोजी झालेल्या सभेच्या भाषणात, जातीभेदावर प्रखर भाषण केले. 'खालसा मुलुखात (आंगलाई) म्हणजे ब्रिटीश हद्दीत व मोगलाई म्हणजे निजम हद्दीत दलितांची स्थिती एकसारखीच आहे. त्यांना जमीन नाहीत, उत्पन्नाची साधने नाहीत, शिक्षणाची संस्थानात सोय नाही. मोगलार्इमध्ये दलित अत्याचार होतात. चाकरी केली नाही, तर जबरदस्ती केली जाते, कोणत्याही प्रकारचे राजकीय, सामाजिक, धार्मिक हक्क नाहीत. ही केवळ दडपशाहीच आहे, हा अन्याय आहे,' असे विचार मांडले. तसेच, निजाम सरकार दारूचे ठेके देते व ठेक्याद्वारे भरमसाठ उत्पन्न मिळवत होते. समाजाच्या उन्नतीसाठी कोणताही ठोस उपाय संस्थान करीत नाही. असे दारूचे ठेके सरकारने बंद केले पाहिजे, असे सांगताच निजामाच्या दारूविषयक धोरणावर बाबासाहेबांनी कठोर टीका केली.
परिषद संपन्न झाल्यानंतर बाबासाहेबांनी गावातील सन्मित्र तरुण संघ वाचनालयास भेट दिली. बार्शी तालुक्यातील ग्रामीण भागातील ही परिषद दलितोद्धारासाठी, समाजजागृतीबरोबरच निजामविरोध सभा म्हणून या सीमासभेचे ऐतिहासिक महत्त्व मोठे आहे. समाज हिताबरोबर राष्ट्रहिताचा विचार दलित जनतेस समजावून सांगितला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या हैदराबाद संस्थानातील व मराठवाड्यातील या सीमासभांचे महत्त्व म्हणजे सांगितला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या हैदराबाद संस्थानातील व मराठवाड्यातील या सीमासभांचे महत्त्व म्हणजे दलितांची व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या राष्ट्रनिष्ठेच्या कार्याची ओळख सांगणारी घटना होय. आज या तडवळे ढोकी येथील ग्रामीण भागातील दलितोद्धाराच्या व निजामविरोधी सीमा परिषदेस ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. समाजातील सर्वच थरातून हैदराबाद स्वतंत्रता अर्थात मुक्ती लढा लढला गेला, याची साक्ष देणारी ही महत्त्वपूर्ण घटना होय.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणीपुरवठा योजनांची साडेचार कोटी थकबाकी

$
0
0

म.टा. प्रतिनिधी, सिल्लोड
पाणीपुरवठा योजनेच्या वीजबिलाची चालू थकबाकी १५ दिवसांत न भरल्यास तालुक्यातील १२८ ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा योजनेचा वीजपुरवठा खंडित करण्यात येईल, असा इशारा महावितरणने दिला आहे. तालुक्यात चार कोटी ३३ लाख रुपये चालू थकबाकी आहे.
तालुक्यातील १२८ ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठ्यासाठी १६५ विद्युत पंपाना जोडणी देण्यात आली आहे. या ग्राहकांकडे एप्रिल २०१५ ते जानेवारी २०१६ या नऊ महिन्यांची चार कोटी ३३ लाख रुपये चालू थकबाकी आहे. कमी पावसामुळे तालुक्यात दुष्काळ असून पाणी मिळणे कठीण झाले आहे. महावितरणने वीजपुरवठा खंडित केल्यास पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्राथमिक आरोग्य केंद्र वासडीत सुरू करावे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कन्नड
तालुक्यातील करंजखेडा आरोग्य केंद्राला वासडी व परिसरातील दहा गावे जोडली आहेत. मात्र, करंजखेडा आडवळणी असल्याने रुग्ण कन्नड किंवा पिशोर येथे जातात. पिशोर येथील ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर तपासत नाहीत किंवा शवविच्छेदन करत नाहीत, त्यामुळे वासडी येथे प्राथमिक आरोग्य केंद्र स्थापन करावे, अशी मागणी आहे.
वासडी, देवपूळ, निभोरा, तपोवन, पळशी, साखरवेल, खातखेडा, मेहेंगाव, हस्ता आदी गावे गौताळा अभयारण्याच्या कुशीत डोंगरात आहेत. या गावांचा संपर्क पिशोर व कन्नड सोबत जास्त येतो. ही गावे करंजखेडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला जोडलेली आहेत. पण सोयीमुळे येथील गावकरी उपचारासाठी, कोणी मृत झाल्यानंतर शवविच्छेदन करण्यासाठी पिशोर ग्रामीण रुग्णालयात जातात. पण नियमांचा दाखला देऊन तेथील डॉक्टर शवविच्छेदन करत नाही. याचा मृतांच्या नातेवाईकांना त्रास होतो. दुसरीकडे करंजखेडा येथे जाणे सोईस्कर नाही.
करंजखेडा आरोग्य केंद्र वासडीपासून सुमारे १० किलोमिटर तर, पिशोर येथील रुग्णालय ८ किलोमिटरवर आहे. या गावच्या ग्रामपंचायतींनी वासडी येथे प्राथमिक आरोग्य केंद्र स्थापन करण्याचे ठराव दिले आहेत. भाजयुमोचे उपाध्यक्ष केतन काजे यांनी मंत्र्यांना निवेदन देऊन मागणी केली. वासडी येथे आरोग्य केंद्र सुरू केल्यास सुविधा मिळतील, अशी अपेक्षा आहे. वासडीचे सरपंच धनजी निकम, मेहेंगावच्या सरपंच सुनीता आव्हाड, हस्ताचे सरपंच मनोहर निळ, निभोराच्या सरपंच लताबाई सोनवणे, देवपूळच्या सरपंच लताबाई ताठे, तपोवनचे उपसरपंच वामनराव नागरे, वासडीच्या उपसरपंच कमलबाई मुगले, निभोराचे उपसरपंच मच्छिंद्र दिघोळे आदींनी ही मागणी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खासदार शेट्टींच्या वक्तव्याचा निषेध

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
शेतकरी प्रश्नी केंद्र आणि राज्य सरकार असंवेदनशील आहे. त्यात खासदार गोपाळ शेट्टी यांनी शेतकरी आत्महत्येबाबत जे वक्तव्य केले त्यातून शेतकऱ्यांचा अपमान केला. हे वक्तव्य निंदनीय असल्याचे मत नोंदवून काँग्रेसने शेट्टींचा निषेध केला.
शेट्टी यांच्या वक्तव्याबाबत काँग्रेसने निषेध सभा आयोजित केली होती. यावेळी जिल्हाध्यक्ष केशवराव औताडे बोलत होते. ते म्हणाले, की शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारची मदत सरकारच्यावतीने कुठल्याही स्तरावर नाकारली जात आहे. भविष्यकालीन आणि कौटुंबिक चिंतेने त्रस्त होऊन शेतकरी आत्महत्येचा मार्ग स्वीकारत आहेत. दुर्दैव म्हणजे केंद्र व राज्य सरकारच्या प्रतिनिधींना शेतकरी आत्महत्या म्हणजे फॅशन वाटत आहे, हे निषेधार्ह आहे.
शहराध्यक्ष अॅड. सय्यद अक्रम म्हणाले, की राज्यातील शेतकरी दुष्काळामुळे अडचणीत सापडला आहे. दुष्काळाला सामोरे जाण्यासाठी कुठलेही ठोस नियोजन नाही. त्यामुळे शेतकरी अडचणीत आहे. भाजप खासदार गोपाळ शेट्टी यांनी अत्यंत बेजबाबदार वक्तव्य करून असंवेदनशीलतेचा कळस गाठला आहे, त्यांच्या वक्तव्याचा निषेध अक्रम यांनी केला.
यावेळी माजी आमदार नितीन पाटील, डॉ. कल्याण काळे, प्रकाश मुगदिया, विलास औताडे, इब्राहिम पठाण, विनोद तांबे, पृथ्वीराज पवार यांनी विचार मांडले. सभेनंतर उपस्थितांनी निदर्शने केली. राजेंद्र दाते पाटील, राजेश मुंडे, जगन्नाथ काळे, किरण डोणगावकर, किशोर बलांडे, जनार्धन निकम, मनोज पाटील आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अवयव दानामुळे चौघांना जीवनदान

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
'ब्रेन डेड' तरूण रामभाऊ उबाळे यांच्या अवयवदानाने तब्बल चौघांना जीवनदान मिळाले. त्यांच्या हृदयाचे प्रत्यारोपण चेन्नई येथील फोर्टिस हॉस्पिटलमध्ये, यकृताचे पुण्यातील 'रूबी हॉल'मध्ये, एका मूत्रपिंडाचे सेठ नंदलाल धूत हॉस्पिटलमध्ये, तर दुसऱ्या मूत्रपिंडाचे प्रत्यारोपण कमलनयन बजाज हॉस्पिटलमध्ये झाले. रविवारी सकाळी साडेआठला विशेष विमानाने चेन्नई येथे हृदय नेण्यात आले व ९ वाजून २० मिनिटांनी रुग्णवाहिकेद्वारे यकृत पुण्याला नेण्यात आले. प्रत्यारोपण करण्यात आलेल्या चौघा रुग्णांची प्रकृती उत्तम असल्याचे सूत्रांकडून रात्री सांगण्यात आले.
रामभाऊ उबाळे (वय २८, रा. वाई ता. मंठा. जि. जालना) यांचा गुरुवारी (१८ फेब्रुवारी) सायंकाळी अपघात होऊन त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागला होता. त्यांना तत्काळ औरंगाबादमधील लाइफ मल्टिस्पेशालिटी ह़ॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र शुक्रवारी सकाळी रामभाऊ 'ब्रेन डेड' झाल्यानंतर नातेवाईकांना कल्पना देण्यात आली. नातेवाईकांनी अवयवदानाचा निर्णय घेतल्यानंतर 'ब्रेन डेड' रामभाऊंना शुक्रवारी मध्यरात्री दोन वाजता धूत हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले. झेडटीसीसी समितीने देशभरातील गरजू रुग्णांचा शोध घेऊन हृदय, फुफ्फुस, यकृत, दोन्ही मूत्रपिंड प्रत्यारोपणाचा निर्णय घेण्यात आला. गरजू रुग्णांच्या प्रतीक्षा यादीनुसार रक्तगट जुळणाऱ्या चेन्नईतील ग्लोबल हॉस्पिटलमधील रुग्णावर हृदयाचे प्रत्यारोपण करण्याचा निर्णय घेण्यात आला. चेन्नईहून खास विमानाने 'ग्लोबल'ची टीम रात्री उशिरा शहरामध्ये दाखल होणार होती. मात्र ज्या रुग्णावर हृदयाचे प्रत्यारोपण होणार होते, त्या रुग्णाची प्रकृती रात्री गंभीर झाली आणि हृदयाचे प्रत्यारोपण करण्याची स्थिती राहिली नसल्याने प्रत्यारोपणाचा निर्णय रद्द करण्यात आला. याच रुग्णावर हृदयासह फुफ्फुसाचे प्रत्यारोपण करण्याचा प्रयत्न होणार होता. मात्र, ते रद्द झाल्यानंतर तातडीने दुसऱ्या गरजू रुग्णाचा शोध घेऊन चेन्नईतील फोर्टिस हॉस्पिटलमध्ये एका गरजू रुग्णावर हृदयाचे प्रत्यारोपण करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र या रुग्णाला केवळ हृदय हवे होते व त्यामुळे फुफ्फुसाच्या प्रत्यारोपणाचा निर्णय रद्द झाला. त्यानुसार रविवारी (२१ फेब्रुवारी) पहाटे सहा वाजता लष्कराचे विमान औरंगाबाद विमानतळावर दाखल झाले. याच विमानातून 'फोर्टिस'ची डॉक्टरांची टीम धूत हॉस्पिटमध्ये दाखल झाली. त्याचवेळी रविवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास धूत हॉस्पिटलमध्ये रामभाऊंचे विविध अवयव काढण्याची शस्त्रक्रिया सुरू झाली. सगळ्यात शेवटी हृदय काढण्यात आले आणि सुमारे साडेआठच्या सुमारास त्याच विमानाने चेन्नईला हृदय नेण्यात आले आणि लष्करातील कर्नलच्या १६ वर्षांच्या मुलावर हृदयाचे प्रत्यारोपण झाले. रविवारी दुपारी तीनपर्यंत हृदयाचे प्रत्यारोपण झाले होते व प्रत्यारोपण झालेल्या १६ वर्षीय मुलाची प्रकृती उत्तम असल्याचे सूत्रांनी रात्री सांगितले. दरम्यान, शनिवारी ठरल्यानुसार रुग्णवाहिकेतून रविवारी सकाळी ९ वाजून २० मिनिटांनी रुग्णवाहिकेतून यकृत नेण्यात आले आणि पुण्याच्या 'रूबी हॉल'मध्ये एका रुग्णावर यकृताचे प्रत्यारोपण झाले. अवयव नेण्यासाठी धूत हॉस्पिटलपासून पुण्यापर्यंत 'ग्रीन कॉरिडॉर' तयार करण्यात आला होता. त्यासाठी पोलिस व जिल्हा प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता.

डॉक्टरवर 'किडनी ट्रान्स्प्लान्ट'
मागच्या सहा वर्षांपासून दोन्ही मूत्रपिंड निकामी झाल्यामुळे 'सीएपीडी डायलिसिस'वर असलेल्या आणि औरंगाबाद शहरामध्ये वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या एका चाळीशीतील डॉक्टरवर रामभाऊंच्या एका मूत्रपिंडाचे कमलनयन बजाज हॉस्पिटलमध्ये प्रत्यारोपण झाले, तर जालना येथील ३४ वर्षीय पुरूष रुग्णावर दुसऱ्या मूत्रपिंडाचे धूत हॉस्पिटलमध्ये प्रत्यारोपण झाले. प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया झालेल्या दोन्ही रुग्णांची प्रकृती उत्तम असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

मध्यरात्री प्रकृती ढासळली
'ब्रेन डेड' झालेल्या रामभाऊंची प्रकृती शनिवारी रात्री ११ नंतर ढासळली आणि विविध अवयव काढता येतील का, निदान मूत्रपिंड तरी काढता येतील का, अशी एकंदर स्थिती निर्माण झाली होती. मात्र विविध डॉक्टरांसह भूलतज्ज्ञांच्या टीमने शर्थ लढवून रामभाऊंची प्रकृती सावरली.

डॉक्टरांच्या टीमचे प्रयत्न
हृदय काढण्याच्या शस्त्रक्रियेसाठी चेन्नईतील 'फोर्टिस'चे डॉ. मुरली व त्यांची टीम, तर यकृत काढण्याच्या शस्त्रक्रियेसाठी पुण्याच्या 'रूबी'चे डॉ. बोकील व त्यांची टीम आली होती. त्याचबरोबर 'धूत'चे मुख्य वैद्यकीय संचालक डॉ. विजय बोरगावकर, 'धूत'चे प्रशासकीय अधिकारी डॉ. हिमांशू गुप्ता, मूत्रमार्ग शल्यचिकित्सक डॉ. अभय महाजन, मूत्रपिंडविकारतज्ज्ञ डॉ. रविंद्र भट्टू, मूत्रपिंडविकारतज्ज्ञ डॉ. सचिन सोनी, भूलतज्ज्ञ डॉ. बालाजी आसेगावकर, डॉ. प्रमोद अपसिंगेकर, डॉ. वैशाली देशपांडे, डॉ. वैशाली चौरे आदी शहरातील टीमने अवयव काढण्यासाठी सहकार्य केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

थरारक लोकनृत्यांनी रसिक भारावले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
रणशिंग तुतारी व रणशिंग हलगीचा ठेका...धारदार कुऱ्हाड नाचवणारा तरूण अन् पुढच्या क्षणी खाली बसलेल्या व्यक्तीच्या डोक्यावरील नारळाचे दोन तुकडे. प्रत्येकाच्या काळजाचा ठोका चुकवणारा हा प्रसंग लिलया सादर करीत सांगलीच्या अण्णाभाऊ साठे लेझीम व दांडपट्टा मंडळाने रसिकांची भरभरून दाद मिळवली. कलाग्राम ऋतुरंग महोत्सवात रविवारी हा चित्तथरारक नृत्य प्रकार सादर झाला.
रोटरी क्लब ऑफ औरंगाबाद आणि सांस्कृतिक कार्य संचालनालयाने चार दिवसांचा कलाग्राम ऋतुरंग महोत्सव आयोजित केला आहे. या महोत्सवात दुसऱ्या दिवशी विविध राज्यातील लोकनृत्यांनी रसिकांचे मनोरंजन केले. कोकणातील जाखडी (बाल्या) नृत्याने सादरीकरणाला सुरुवात झाली. ढोलकीचा ठेका आणि लयबद्ध नृत्याने सर्व रसिक मंत्रमुग्ध झाले. त्यानंतर छत्तीसगढमधील 'पंथी' नृत्य सादर झाले. दुर्ग जिल्ह्यात सतनामी पंथाचे लोक हे नृत्य सादर करतात. मांदर, झांज, झुमका आणि घुंगरू या वाद्यांसह मानवी मनोरे करीत कलावंतांनी उत्तम सादरीकरण केले. आंध्र प्रदेशातील 'गरगलू' नृत्य रसिकांनी भान हरपून पाहिले. डोक्यावरील वस्तू सांभाळत प्रत्येक कलाकाराने लयबद्ध नृत्य केले. तीन बाटल्यांवर पेटलेली बत्ती ठेवून जमिनीला समांतर होत कलाकारांनी रसिकांना खिळवून ठेवले. मध्य प्रदेशातील 'कर्मा' या नृत्यालाही प्रतिसाद मिळाला. गौड जमातीचे लोक कर्माची पूजा करतात. सांगली जिल्ह्यातील अण्णाभाऊ साठे दांडपट्टा मंडळाने थरारक कसरती व दांडपट्टा चालवण्याचे प्रात्यक्षिक सादर केले. हनुवटीखालील बटाट्याचे दोन तुकडे करणे, डोक्यावरील नारळ कुऱ्हाडीने फोडणे असे मराठमोळे मर्दानी कलाप्रकार मंडळाने सादर केले. हा प्रकार पाहताना अनेकांनी डोळे झाकून घेतले. तर इतर रसिकांनी भरभरून दाद दिली. तेलंगणातील घसाडी व छत्तीसगडमधील ढोलू पुनिया या कलाप्रकारांनाही दाद मिळाली. महोत्सवाला सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक अजय अंबेकर व फिल्मसिटीचे संचालक मिलिंद लेले उपस्थित होते.

कव्वाली रंगली
हैदराबाद येथील वारसी बंधू यांनी सुफी गायनातून रसिकांची मने जिंकली. संत कबीर यांच्या 'हरने हरको देखा' या गीतातून गायनाला सुरुवात झाली. 'दमा दम मस्त कलंदर' आणि इतर पारंपरिक कव्वालींनी वारसी बंधू यांनी संध्याकाळ श्रवणीय केली. या महोत्सवात सोमवारी लोकनृत्य व फ्यूजन सादर होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लाखाचे दागिने केले परत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
रिक्षात बसल्यानंतर एकमेकांच्या सारख्या बॅगाची अदलाबदल झाली. एका बॅगेत सुमारे लाख रुपयांचे दागिने असूनही एका प्रवाशाने प्रामाणिकपणे ती पोलिसांच्या ताब्यात दिली. बॅगमध्ये ओळख पटेल, असा कोणताही पुरावा नसताना पोलिसांनी ओळख पटवून ती बॅग संबंधितास परत केली.
नांदेडकडून औरंगाबादकडे येणाऱ्या मराठवाडा एक्स्प्रेसमधून मुकुंदवाडी रेल्वेस्टेशनवर सकाळी दहा वाजता दोन प्रवासी जोडपे उतरले. नामदेव प्रकाशरराव निकम (रा. शांतीनगर, परभणी) व सचिन अंकुशराव जिव्हे (रा. चौधरी कॉलनी, चिकलठाणा), अशी त्यांची नावे आहेत. या दोघांना एकाच मार्गाने जायचे असल्याचे ते स्टेशनबाहेरून एकाच रिक्षात बसले. प्रकाशनगर येथे नामदेव निकम यांची सासुरवाडी आहे, ते तेथे बॅग घेऊन पत्नीसह उतरले. सचिन जिव्हे हे चिकलठाणा येथे बॅग घेऊन उतरले. पण दोन्ही बॅगा सारख्याच असल्याने दोघांनाही शंका आली नाही. घरी गेल्यानंतर जिव्हे यांना बॅगची अदलाबदल झाल्याचे लक्षात आले. त्यानी बॅगची तपासणी केली असता त्यात कपडे व एक मंगळसूत्र, कानातले, असे ३२ ग्रॅमचे दागिने होते. मात्र, बॅगच्या मालकाची ओळख पटेल, असे काहीही त्यात नव्हते. त्यामुळे बॅग मालकाशी संपर्क कसा साधावा, हा प्रश्न त्यांना पडला. त्यांनी तत्काळ दागिन्याच्या बॅग घेऊन मुकुंदवाडी पोलिस ठाणे गाठून पोलिस उपनिरीक्षक अमोल सातोदकर यांना हा प्रकार सांगितला. सातोदकर यांनी मुकुंदवाडी रेल्वेस्टेशन व रिक्षाचालकांशी बोलून बॅग मालकाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, पण अपयश आले. दरम्यान, बॅगचे मालक नामदेव निकम यांनी मुकुंदवाडी पोलिस ठाणे गाठले. सातोदकर, शेख अस्लम यांनी शहानिशा करून बॅग त्यांच्या स्वाधीन केली तेव्हा निकम यांचा जीव भांड्यात पडला. सचिन जिव्हे यांचा प्रामाणिकपणा व पोलिसांची तत्परता यामुळे दागिन्यांसह बॅग सापडल्याबद्दल निकम यांनी दोघांचे आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शिवसेना, संघात अखेर समझोता

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
शिवसेना व राष्ट्रीय स्वयंसेवक संघात शाखा रविवारी झालेल्या बैठकीत शिवाजीनगर येथे शाखा भरवण्यावर एकमत झाले. हिंदू ऐक्यासाठी शिवसेनेने माघार घेतली असली तरी, नागरिकांना त्रास होणार नाही, याची काळजी घेण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.
शिवाजीनगर येथील संघाची शाखा भरवण्यावरून वाद निर्माण झाला होता. दहावी व बारावीच्या परीक्षा सुरू असल्याने शिवसैनिकांनी शाखा बंद पाडण्याचा प्रयत्न केल्याने तणाव निर्माण झाला होता. पोलिस उपायुक्त राहुल श्रीरामे, सहायक आयुक्त रविकांत बुवा आणि पोलिस निरीक्षक सुनील तेलुरे यांनी घटनास्थळी धाव घेतल्याने तणाव वाढला नाही. दरम्यान, या मैदानावर बंदोबस्त लावण्यात आला होता.
या वादावर चर्चा करण्यासाठी रविवारी संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक देवजीभाई पटेल, शिवसेनेचे माजी आमदार प्रदीप जैस्वाल, संघाचे शहर कार्यवाह दिवाकर कुलकर्णी, हेमंत जोशी, शिवाजीनगरचे शिवसेना नगरसेवक राजेंद्र जंजाळ, संघाचे विस्तारक, प्रचारक यांची संयुक्त बैठक जैस्वाल यांच्या कार्यालयात घेण्यात आली. हिंदू राष्ट्रनिर्मिती आणि हिंदू ऐक्यासाठी शाखा चालवल्या जातात. शिवसेना, भाजप आणि संघ तिघांसाठी शाखा उपयुक्त असल्याचे पटेल, कुलकर्णी यांनी सांगितले. विद्यार्थ्यांना त्रास होणार नाही, याची काळजी घेण्याची भूमिका जैस्वाल यांनी मांडली. शिवाजीनगर येथे शाखा चालवण्यास शिवसेनेचा हरकत नसल्याचे स्पष्ट करण्यात आले.
'संघ आणि शिवसेना एकाच समाजासाठी काम करतात. मी स्वत: शाखेचा प्रथमवर्ग शिक्षित आहे. मी किंवा शिवसेना शाखेस आक्षेप घेणार नाही. फक्त नागरिकांना त्रास होणार नाही, मुलांना फायदा होईल व सुरक्षित वाटेल असे संघाने पाहावे,' असे नगरसेवक राजेंद्र जंजाळ यांनी सांगितले. 'येथे तीन वर्षांपासून शाखा चालते, यापुढेही सुरू राहील. वादानंतर नागरिकांची समजूत घालण्यात आली आहे. संघ व शिवसेनेचे ज्येष्ठ नेत्यांनी रविवारी समजौता घडवून आणला आहे,' अशी माहिती देवगिरी प्रांत प्रचारक वामनराव देशपांडे यांनी सांगितले. संघ प्रचारक लोकेश पाटील यांना काही तरुणांनी मारहाण केल्याची घटना दहा दिवसांपूर्वी घडली होती. या परिसरात इंदिरानगर व मुस्लिम वस्ती असल्याने त्याबद्दलही काळजी घ्यावी, अशी चर्चा झाल्याची माहिती आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धावत्या तपोवन रेल्वेचे इंजिन बंद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
नांदेडहून मुंबईकडे जाणाऱ्या तपोवन एक्स्प्रेसचे इंजिन रविवारी दुपारी परतूर रेल्वेस्टेशनजवळ नादुरुस्त झाले. त्यामुळे रेल्वे सुमारे पाऊण तास थांबवण्यात आली. इंजिन दुरुस्तीनंतर ती सव्वा तास उशिराने औरंगाबादला पोहोचली. इंजिनातील बिघाडामुळे रेल्वेचे वेळापत्रक कोलमडल्याची ही आठवड्यातील तिसरी घटना आहे. तपोवन एक्स्प्रेस नांदेड येथून रविवारी सकाळी नियोजित वेळी रवाना झाली. ती दुपारी एकच्या दरम्यान, परतूर रेल्वेस्टेशनजवळ पोहोचली. तेथे इंजिन बंद पडल्याने रेल्वे थांबली. इंजिन चालक, गार्ड व सहायक इंजिन चालकांनी प्रयत्न करून इंजिनमधील दोष दूर केला. यामुळे औरंगाबाद येथे रेल्वे पोहोचण्यास एक तास उशिर झाला. इंजनातील बिघाड व इतर तांत्रिक दोषामुळे वाहतूक ठप्प होण्याची ही आठवड्यातील तिसरी घटना आहे. यापूर्वी जनशताब्दी रेल्वेचे इंजिन औरंगाबाद ते जालना दरम्यान बिघडले होते. जनशताब्दी रेल्वेच्या इंजिन कपलिंग तुटल्याने बोगीपासून वेगळे झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सदाचार संवर्धक पुस्कार तापडिया यांना प्रदान

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
शहरातील सदाचार संवर्धक ज्येष्ठ नागरिक संस्था, दक्षिण औरंगाबाद यांच्यातर्फे पद्मा तापडिया यांना सामाजिक कार्याबद्दल सौ. शालिनी सदावर्ते स्मृति सदाचार संवर्धक पुरस्कार प्रदान करण्यात आला.
डॉ. अंजली बंगलोर यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी नगरसेवक जयश्री कुलकर्णी तसेच सदावर्ते कुटुंबीयांची उपस्थिती होती. मातोश्री वृद्धाश्रमाच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांच्या अडचणींची जाणीव झाली असल्याचे सत्काराला उत्तर देतांना पद्मा तापडिया यांनी सांगितले. डॉ. अंजली बंगलोर यांनी लहान मुलांना होणाऱ्या सेरेब्रल पाल्सी या आजाराविषयी मा‌हिती सांगून आजी-आजोबांनी याकडे कसे लक्ष द्यावे याबाबत माहिती सांगितली. कार्यक्रमासाठी जे. डी. कोपरकर, पार्वेकर, रमेश आंबेकर, भालगावकर, अनिल चौधरी, आर्सेकर यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सातारा, देवळाईसाठी १०० कोटींची मागणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
सातारा-देवळाई भागासाठी नागरी सुविधा पुरविण्यासाठी १०० कोटींचा निधी अपेक्षित आहे. यासाठी पालिका प्रशासनामार्फत सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करावा आणि हा प्रस्ताव सरकारकडे पाठवावा. यासाठी पालिका आयुक्तांना अधिकार प्रदान करावेत, असा ठराव गटनेते रेणुकादास वैद्य यांनी मांडला आहे.
वैद्य यांनी महापौरांना यासंदर्भात २० फेब्रुवारी रोजी पत्र दिले आहे. त्यात म्हटले आहे, की सातारा-देवळाई नगरपालिका क्षेत्र सरकारच्या निर्णयानुसार औरंगाबाद महापालिकेच्या हद्दीत समाविष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांना पाणीपुरवठा, ड्रेनेज, पथदिवे, रस्ते मजबुतीकरण, दुरुस्ती व डांबरीकरण ही कामे प्राधान्याने करणे गरजेचे आहे. या नागरी सुविधा पुरविण्यासाठी पालिका प्रशासनाला मोठ्या प्रमाणावर निधी लागणार आहे.
ही बाब लक्षात घेऊन या भागाला नागरी सुविधा पुरविण्यासाठी १०० कोटींचा निधी मागितला जावा. पालिका प्रशासनामार्फत सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करून तो सरकारकडे पाठविण्यात यावा. डीपीआर तयार करणे व निधी मिळविण्याबाबत सरकारकडे प्रस्ताव सादर करण्यासाठी पालिका आयुक्तांना अधिकार प्रदान करावेत, अशी मागणी वैद्य यांनी केली आहे. हा प्रस्ताव सर्वसाधारण सभेत मान्यतेसाठी ठेवावा, असेही वैद्य यांनी दिलेल्या पत्रात नमूद केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मराठवाड्यात पाणीपातळीत मोठी घसरण

$
0
0

Shripad.Kulkarni@timesgroup.com

औरंगाबाद : मराठवाड्यातील भूजल पातळीत मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे येणाऱ्या तीन-साडेतीन महिन्यांत दुष्काळाच्या झळा आणखी तीव्र होण्याची चिन्हे आहेत. भूजल सर्वेक्षण विभागाच्या अहवालानुसार विभागातील ७६पैकी ७५ तालुक्यांतीत पाणीपातळी गेल्या पाच वर्षांच्या सरासरीच्या तुलनेत खोल गेली आहे. केवळ सिल्लोड तालुक्यातील पाणीपातळीत जुजबी वाढ झाली आहे. परभणी, नांदेड, उस्मानाबाद, लातूर, बीड या पाच जिल्ह्यांतील पाणीपातळीतील घसरण तीन मीटरपेक्षा खाली जास्त आहे.

विभागाचे वार्षिक सरासरीत पर्जन्यमान ७७९ मिली मीटर आहे. गेल्या पावसाळ्यात ४३२.२१ मिली मीटर पावसाची नोंद झाली. वार्षिक सरासरीच्या तुलनेत हे प्रमाण अवघे ५५.४८ टक्के आहे. पावसाने पाठ फिरविल्याचा परिणाम विभागातील भूजल पातळीवरही झाला आहे. भूजल सर्वेक्षण विभागाने जानेवारी महिन्यात पाणीपातळीचे मोजमाप केले. त्यानुसार सर्वच जिल्ह्यांत भूजलपातळी गेल्या पाच वर्षांच्या सरासरी पातळीच्या तुलनेत खाली गेली आहे.

नऊ तालुके क्रिटिकल : विभागात ३२ तालुक्यातील भूजल पातळी तीन मीटरपेक्षा जास्त खोल गेली आहेत. त्यापैकी नऊ तालुक्यांतील पातळी चार मीटरपेक्षा जास्त खोल गेली आहे. आष्टी (जि. बीड) तालुक्यात ५.६५ मीटरने आणि कळंब (ता. उस्मानाबाद) तालुक्यात ५.४५ मीटरने पाणी खोल गेल्याची नोंद आहे. औरंगाबाद, हिंगोली व जालना जिल्ह्यातील एकाही तालुक्यातील भूजल तीन मीटरपेक्षा जास्त खोल गेलेले नाही. अन्य पाच जिल्ह्यांतील स्थिती गंभीर आहे.

तीन मीटरपेक्षा खोल पाणीपातळी असलेले तालुके ः परभणी, पूर्णा, सेलू, नांदेड, मुदखेड, अर्धापूर, भोकर, देगलूर, मुखेड, कंधार, बिलोली, धर्माबाद, नायगाव, लोहा, उस्मानबाद, तुळजापूर, उमरगा, लोहारा, भूम, कळंब, वाशी, परंडा, लातूर, उदगीर, जळकोट, अहमदपूर, चाकूर, बीड, पाटोदा, आष्टी, अंबाजोगाई, परळी.

पाणीपातळीतील घट

जिल्हा.............सरासरी......२०१६मधील......घट
औरंगाबाद.......८.७९...............९.६६.........-०.८७
जालना...........७.७३................८.८८........-१.१५
परभणी..........८.८२................११.८५.......-३.०२
हिंगोली..........५.९९................७.९३.........१.९४
नांदेड.............६.०८................९.४५.........-३.३७
उस्मानाबाद.....६.३८..............१०.३१.........-३.९४
लातूर.............५.५६..............८.८५...........-३.२९
बीड...............७.४२..............१०.४७..........-३.०५

(सरासरी: गेल्या पाच वर्षांतील जानेवारीतील पातळी, २०१६ मधील : जानेवारी २०१६ मधील पाणीपातळी)

खोल खोल पाणी

एक मीटरपर्यंत : ८ तालुके
एक ते दोन मीटर : १२ तालुके
दोन ते तीन मीटर : २३ तालुके
तीन मीटरपेक्षा जास्त : ३२ तालुके

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाळूचोरांच्या हल्ल्यात तलाठी जखमी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सिल्लोड
अवैध वाळू उपसा रोखून पकडलेले ट्रॅकर तहसील कार्यालयात आणताना तलाठी महेश हरिदास भडके यांना वाळूचोरांनी मारहाण केली. या मारहाणीत ते जखमी झाले आहेत. ही घटना धानोरा येथे घडली. यावेळी तहसीलदारांच्या मोटारीवर दगडफेक करण्यात आली. याप्रकरणी सिल्लोड ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तलाठी भडके व त्यांचे सहकारी विष्णू सोनवणे रविवारी सकाळी सात वाजता धानोरा येथे गेले होते. त्यांना पूर्णा नदीच्या पात्रात त्यांना दोन ट्रँक्टरमध्ये वाळू भरली जात असल्याचे दिसले. त्यांनी सहकाऱ्यासह पाठलाग करून ट्रॅक्टर पकडले. त्यावेळी अंकुश काकडे यांचा ड्रायव्हर कृष्णा गंजीधर काकडे सापडला. त्याचे दोन्ही ट्रॅक्टर तहसील कार्यालयात घेऊन येत असताना संदीप काकडे, तुळशीराम भानुदास काकडे, अर्जून बाजीराव काकडे यांनी तलाठ्याच्या पथकास तहसील कार्यालयात ट्रॅक्टर कसे घेऊन जाता, असे विचारून शिवीगाळ करून धमकी दिली. तलाठ्याच्या शर्टची कॉलर पकडून खाली ओढून दगड उचलून हातावर मारला. या हल्ल्यात ते जखमी झाले. ही घटना धानोरा ग्रामपंचायत कार्यालयाजवळ घडली. यापूर्वी ट्रॅक्टर पकडल्याची माहिती दिल्यानंतर ते आणण्यासाठी तहसीलदारांची मोटार घेऊन दोन जण धानोरा येथे गेले होते. या मोटारीवर (एमएच २०, यू ९६५३) दगडफेक करून काच फोडण्यात आली.

तलाठी भडके यांच्या फिर्यादीवरून कृष्णा गंजीधर काकडे, अंकुश विठ्ठल काकडे, संदीप भानुदास काकडे, तुळशीराम भानुदास काकडे, भानुदास काकडे, अर्जून बाजीराव काकडे (रा. सर्व धानोरा) यांच्याविरुद्ध सिल्लोड ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या आरोपींना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक मिलिंद खोपडे यांनी दिली. भडके यांच्यावर उपजिल्हाधिकारी रुग्णालयात उपचार करण्यात आले. ही माहिती मिळाल्यानंतर आमदार अब्दुल सत्तार, तहसीलदार संतोष गोरड, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष सुरेश बनकर यांनी रुग्णालयात जाऊन त्यांची विचारपूस केली.

अवैध वाळू चोरांकडून तलाठ्याला मारहाण झाल्याने महसूल यंत्रणेतील कर्मचारी धस्तावलेले आहे. 'अवैध वाळू उपसा करणाऱ्यांची शक्ती वाढत असून राज्य सरकारने कठोर कारवाई करावी,' अशी मागणी तलाठी संघाचे राज्याध्यक्ष अशोक कोकाटे यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उत्तरपत्रिका तपासणीत ‘असहकार’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
माध्यमिक व वरिष्ठ कॉलेजांना जोडलेल्या अकरावी, बारावीच्या वर्गांसाठी स्वतंत्र प्रशासन व्यवस्था करा, अशी मागणी करून राज्यातील शिक्षकांनी उत्तरपत्रिका तपासणीत असहकार आंदोलन सुरू केले आहे. दिवसाला एकच उत्तरपत्रिका तपासणार, असा पवित्रा शिक्षकांनी घेतला आहे. यापूर्वी कायम विनाअनुदानित उच्चमाध्यमिक विद्यालयांच्या शिक्षकांनी उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार टाकला आहे. शिक्षकांच्या या भूमिकेमुळे बोर्डासमोरील अडचणींमध्ये वाढ झाली आहे.

राज्यातील ज्युनिअर कॉलेज माध्यमिक शाळांना किंवा वरिष्ठ महाविद्यालयांना जोडण्यात आलेली आहेत. ज्युनिअर कॉलेजांना स्वतंत्र प्रशासन द्यावे, अशी मागणी अनेक वर्षापासून आहे. कॉलेजांना स्वतंत्र प्राचार्यपद द्यावे, व्यवस्थापनाची प्रक्रिया स्वतंत्र स्तरावर करावी, अादी मागण्यांसाठी राज्यातील अनुदानित ज्युनिअर कॉलेजांमधील शिक्षकांनी उत्तरपत्रिका तपासणीवर असहकार आंदोलन सुरू केले आहे. आंदोलनात दररोज एकच उत्तरपत्रिका तपासण्याचा निर्णय शिक्षकांनी घेतला आहे. विविध विषयांच्या मुख्य नियामकांच्या बैठकीनंतर विभागीय मंडळ अध्यक्षांना याबाबत निवेदन देण्यात आले. उत्तरपत्रिका तपासणीचे काम पुढील आठवड्यापासून सुरू होत आहे. त्यात विनाअनुदानित शिक्षकांनी पूर्वीच उत्तपरत्रिका तपासणीवर बहिष्काराचा निर्णय घेतला. ऐन परीक्षांच्या काळात शिक्षकांच्या या भूमिकेमुळे मंडळाच्या समोरील अडचणींमध्ये भर पडणार आहे.

गोधने समितीची बैठकही नाही
ज्युनिअर कॉलेजांच्या या प्रश्नाबाबत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त राजेंद्र गोधने यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली होती. समितीच्या दोन बैठका झाल्या. त्यानंतर वर्षभरापासून यासंदर्भात बैठक झाली नसल्याचे शिक्षकांचे म्हणणे आहे.

अकरावी, बारावीचे वर्ग माध्यमिक शाळांना किंवा वरिष्ठ कॉलेजांना जोडलेली आहेत. स्वतंत्र प्रशासन नसल्याने अनेक अडचणी येतात. शालेय शिक्षण किंवा उच्चशिक्षण अशा विभागांमध्ये विभागले गेल्याने अनेक अडचणी निर्माण होतात. मोठ्या कॉलेजांमध्ये उपप्राचार्यपद आहे, परंतु अशा कॉलेजांची संख्याही कमी आहे. शासनाला वारंवार याबाबत निवेदन दिले. त्यानंतर असहकार आंदोलन करण्याचा निर्णय झाला. दिवसाला एकच पेपर आम्ही तपासणार आहोत.
- राजेंद्र पगारे, जिल्हाध्यक्ष, जुक्टा.

राज्यातील ज्युनिअर कॉलेज : ७,५००
शिक्षकांची संख्या : ६०,०००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अंबर दिव्याच्या वाहनांवर आजपासून कारवाई

$
0
0

औरंगाबाद : शासकीय वाहनांवरील दिवे लावण्याच्या नवीन नियमांनुसार दिवे लावले आहे की नाही, याची तपासणी मोहीम परिवहन विभागाकडून सोमवारपासून सुरू करण्यात येणार आहे. अंबर दिवे लावण्यासाठी परिवहन आयुक्तांकडून स्टिकर घ्यावेत, असे आदेश देण्यात आले होते.

राज्य सरकारने अंबर दिव्यांबाबत नियमावली जाहीर केली होती. त्याबाबत ४ एप्रिल २०१४ रोजी अध्यादेश काढण्यात आले होते. या आदेशामध्ये लाल दिवा, लाल दिवा फ्लॅशर, अंबर दिवा फ्लॅशरविना, याशिवाय निळा दिवा फ्लॅशरविना यांच्या वापरासाठी शासकीय वाहनांची विभागणी करण्यात आली आहे. या वाहनांना परिवहन आयुक्तांकडून दिलेले स्टीकर लावण्याचेही आदेश देण्यात आले आहेत, मात्र राज्यात अनेक ठिकाणी या नियमांचे पालन केले जात नाही. या पार्श्वभूमीवर औरंगाबाद शहरातील अंबर दिवे असलेल्या वाहनांची तपासणी केली जाणार आहे. सोमवारपासून ही कारवाई सुरू केली जाणार असल्याची माहिती आरटीओ सर्जेराव शेळके यांनी दिली.

प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून कारवाई करण्यासाठी पथक नेमण्यात आले आहे. या कारवाईत दोषी आढळलेल्या शासकीय वाहनांवर कारवाई करण्यात येणार आहे.
- सर्जेराव शेळके, प्रादेशिक परिवहन अधिकारी, औरंगाबाद.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शैक्षणिक पात्रतेवरून अभियत्यांत नाराजी

$
0
0

औरंगाबाद : जलसंपदा विभागातील भरती प्रक्रियेत अर्हतेवरून पदवीधर बेरोजगार अभियंत्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. डिप्लोमाधारकाप्रमाणे आम्हालाही परीक्षेची संधी द्यावी, अशी मागणी करत, जलसंपदा विभागाच्या कारभारावर विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. याबाबत शासनाकडे ऑनलाइन तक्रारही सादर केली आहे.

जलसंपदा विभागाने कनिष्ठ अभियंतापदासाठी (स्थापत्य) सरळसेवा भरतीअंतर्गत जाहिरात दिली. डिप्लोमाधारकांनाच यात संधी देण्यात आली. उच्च शैक्षणिक अर्हता असतानाही अर्ज सादर करता येत नसल्याने राज्यभरातील स्थापत्य अभियांत्रिकी पदवीधारकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. जलसंपदा विभागाला उच्चशैक्षणिक अर्हताधारकांची अॅलर्जी का? त्यांची संधी डावलू नका, असे सांगत हे विद्यार्थी एकवटले आहे. रविवारी पुन्हा या विद्यार्थ्यांनी बैठक घेत कोर्टात जाण्याची तयारी सुरू केली. जलसंपदा विभागाच्या या अर्हतेबाबत अनेक पदवीधारकांनी 'आपले सरकार' यावर ऑनलाइन तक्रारही नोंदविली आहे. शासनाला याबाबत ऑनलाइन तक्रारी केल्याचे शिरीष जाधव यांनी 'मटा'शी बोलताना सांगितले. पदवीधारकांनाही परीक्षेची संधी द्या, अशी मागणी करण्यात आली आहे. जलसंपदा विभाग सरळसेवा भरती प्रक्रियेतून १२५६ पदे भरणार आहे. अनेक वर्षानंतर एवढ्या मोठ्या प्रमाणात पदभरती होत आहे. त्यात केवळ डिप्लोमाची अट असल्याने पदवीधारकांची संधी हुकणार आहे. त्यामुळे राज्यातील पदवीधर अभियंते एकत्र येत लढा देत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बिगर सेट-नेट प्रश्नावर एम.फुक्टो कोर्टात जाणार

$
0
0

औरंगाबाद : बिगर नेट-सेटधारक प्राध्यापकांबाबत मुंबई हायकोर्टाने दिलेल्या निर्णयावर महाराष्ट्र प्राध्यापक महासंघ सुप्रीम कोर्टात दाद मागणार आहे. त्याबाबत प्राध्यापकांची मते जाणून घेण्यासाठी रविवारी एम.फुक्टो संलग्नित डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ महाविद्यालयीन प्राध्यापक संघटनेची (बामुक्टो) बैठक पार पडली.

मुंबई हायकोर्टाने बिगर नेट-सेटधारकांच्या बाबतीत २३ डिसेंबर २०१५ रोजी निर्णय दिला. त्यात संबंधित प्राध्यापकांनी ज्या दिवशी पात्रता पूर्ण केली, त्या दिवसापासूनच त्यांना इतर सर्व सुविधा देण्यात याव्यात. त्यांची पूर्वीची सेवा गृहित धरू नये, असे स्पष्ट केले. यामुळे या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात दाद मागणार असल्याचे प्राध्यापक संघटनेच्या बैठकीत सांगण्यात आले. यावेळी डॉ. अशोक तेजनकर, डॉ. विक्रम खिलारे यांनी मार्गदर्शन केले. महाराष्ट्र प्राध्यापक महासंघ (एम.फुक्टो) मार्चमध्ये सुप्रीम कोर्टात धाव घेणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घरातच दारुअड्डा, मद्यपानही भेदभावाशिवाय!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
घरातच दारू तयार होते. वारंवार होणाऱ्या 'त्योहार'च्या नावाखाली सर्वचजण मनसोक्त पितात दारू आणि स्त्री-पुरूष असा भेदाभेद न होता केले जाते मद्यपान. केवळ मद्यपानच नव्हे तर तंबाखूचेही सेवन तेवढेच खांद्याला खांदा लावून होते. त्यामुळे कर्करोग व 'सब-म्युकस फायब्रोसिस'चे प्रमाणही मोठ्या प्रमाणावर आहे. अनेक गावांमध्ये अस्वच्छता, अनारोग्य तर आहेच; पण अजूनही अनेक गावांमध्ये वीज-पाणी नाही आणि २५-२५ किलोमीटरपर्यंत डॉक्टरदेखील नाही. त्यामुळे डॉक्टर आहे का, हे पाहूनतच रुग्णांना नेले जाते, नाहीतर शेवटचे 'कार्य' उरकण्याची तयारी केली जाते..., अशा शब्दांत छत्तीसगडच्या जशपूरनगरातील शिबिराचा अनुभव व्यक्त केला वैद्यकीय विद्यार्थ्यांनी.

डॉ. हेडगेवार रुग्णालयाने १९९७पासून सुरू करण्यात आलेल्या 'सेवांकुर' उपक्रमाअंतर्गत २७२ तरुण डॉक्टर, कन्सल्टंट, 'एबीबीएस' व 'बीडीएस'च्या विद्यार्थ्यांचे छत्तीगडमधील जशपूरनगर येथे २ ते ८ फेब्रुवारीदरम्यान शिबिर झाले. या शिबिरातील अनुभवांचे कथन काही विद्यार्थ्यांनी रविवारी (२१ फेब्रुवारी) हेडगेवार रुग्णालयात झाले. या वेळी विद्यार्थ्यांनी अनेक धक्कादायक अनुभव मांडले. केंद्र सरकारनेच जाहीर केलेल्या देशातील १८४ अत्यंत मागास भागांमध्ये जशपूरनगरचा समावेश होतो आणि त्यामुळेच या वनवासी भागाची निवड करण्यात आली होती. अखिल 'भारतीय वनवासी कल्याण आश्रम'च्या सहकार्याने हे शिबिर झाले.

अनुभव सांगताना डॉ. महेश देशपांडे म्हणाले, 'हा भागाचे वर्णन 'झिरो हेल्थ एक्सेस' असे करता येईल. कुठेही जा, तब्बल २५ किलोमीटरपर्यंत आरोग्य केंद्र नाही आणि पूर्णवेळ डॉक्टरही नाही. त्यामुळे उपचारांसाठी डॉक्टरकडे जाण्याचे प्रमाण मुळातच खूप कमी आहे आणि मृत्युपंथाला लागलेल्या रुग्णाला डॉक्टरकडे नेण्याआधी आधी डॉक्टर आहे का, हे प्रत्यक्ष जाऊन पाहिले जाते आणि डॉक्टर असेल, तरच रुग्णाला तिथपर्यंत नेले जाते. अशी एकंदर त्या भागामध्ये आरोग्याची स्थिती आहे.'

दाल-भात याच मर्यादित आहारामुळे व्हिटॅमिनची मोठ्या प्रमाणावर कमतरता आहे. तंबाखू-मद्यसेवनाचे प्रमाणही जास्त आहे आणि त्यामुळे विविध प्रकारच्या कर्करोगांचे प्रमाणही जास्त असल्याचे दिसून आले आहे. ५० रुपये कमाई असेल, तर ४० रुपये दारूवर व १० रुपये संसारावर खर्च करण्याची मानसिकता येथील लोकांमध्ये दिसून येते. तरीही 'अतिथीदेवो भवः' ही येथील लोकांची संस्कृती आहे आणि येथील माणसे नक्कीच दिलदार आहेत, असे अनुभव रुग्णालयाचे डॉ. अश्विनीकुमार तुपकरी, डॉ. आनंद फाटक, डॉ. अविनाश बुचे, डॉ. महेश देशपांडे, डॉ. नितीन गादेवाड, डॉ. विशाल ढाकरे, डॉ. मयूर भोसले यांच्यासह आदित्य कुलकर्णी, प्रसन्न सोनवणे, अमित भालेराव, सुबोध भागवत, तनुजा येडते, शर्वरी कोंडपल्ले आदी विद्यार्थ्यांनी मांडले.

आठ हजार रुग्णांची तपासणी
या शिबिराअंतर्गत ५० गावांमध्ये आरोग्य तपासणी शिबिरे झाली व आठ हजार रुग्णांची तपासणी करण्यात आली. १५० गावांमध्ये आरोग्य आणि आरोग्य जागृतीसंदर्भात सर्वेक्षण करण्यात आले. सुमारे पाच ते सहा लाख रुपयांची औषधीही शिबिरासाठी नेण्यात आली होती व ज्या रुग्णांना तातडीने शस्त्रक्रियांची गरज होती, त्यांची विविध ठिकाणी 'लिंक'ही लावण्यात आल्याचेही यानिमित्ताने डॉ. फाटक यांनी सांगितले. या शिबिरामध्ये स्थानिक पातळीवरील २० वैद्यकतज्ज्ञही सहभागी झाल्याचे डॉ. देशपांडे म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘वन टू वन’: विकास आराखड्यात नियमांची पायमल्ली

$
0
0

Pramod.Mane@timesgroup.com
औरंगाबाद महापालिकेत समाविष्ट करण्यात आलेल्या १८ खेड्यासाठीचा प्रारूप विकास आराखडा प्रसिद्ध करण्यात आला आहे. या आराखड्यात कुठल्या प्रकारचे आरक्षण असावे, याचा अभ्यास करण्यात आलेला नाही. नागरी सुविधांच्याबाबतीत या आराखड्यात दुर्लक्ष करण्यात आले आहे. राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आलेला प्रारूप विकास आराखडा रद्द करणारी याचिका चिकलठाणाचे शेतकरी गोविंद नवपूते यांनी मुंबई हायकोर्टाच्या आैरंगाबाद खंडपीठात केली आहे. याविषयी त्यांच्याशी साधलेला संवाद...

प्रश्न ः प्रारूप विकास आराखड्याचा इरादा कधी जाहीर करण्यात आला आणि प्रसिद्ध कधी झाला?
- १९८२मध्ये औरंगाबाद महापालिकेची स्थापना करण्यात आली. औरंगाबाद शहराच्या लगतच्या अठरा खेड्यांचा समावेश महापालिकेत करण्यात आला. १९९२मध्ये समावेश केलेल्या क्षेत्राचा विकास आराखडा प्रसिद्ध करण्यात आला. नगर रचना अधिनियमाप्रमाणे दर २० वर्षांनी विकास आराखड्याचे पुनःनिरीक्षण करून सुधारित विकास आराखडा प्रसिद्ध करणे आवश्यक आहे. सिडकोने २०९ हेक्टर क्षेत्र त्यांच्या कार्यक्षेत्रातून वगळले व शिवाजीनगरचा समावेश पालिकेत झाला. त्यामुळे महापालिकेत १९८२मध्ये समाविष्ट करण्यात आलेले क्षेत्र, सिडकोने वगळलेले क्षेत्र आणि शिवाजीनगर भागातील सुधारित विकास आराखडा तयार करण्याचा इरादा २०११मध्ये जाहीर करण्यात आला. तब्बल चार वर्षांनंतर, ४ फेब्रुवारी २०१६ रोजी आराखडा प्रसिद्ध करण्यात आला.

प्रश्न ः आराखडा प्रसिद्ध होण्यापूर्वी नियम व अधिनियम काय सांगतात?
- शासनाच्या परवानगीने पालिकेने नगर रचना उपसंचालक या अधिकाऱ्यांची नगर रचना अधिकारी म्हणून नेमणूक केली. नगर रचना कार्यालयाने चार वर्षे शहराच्या विविध भागांचे सर्वेक्षण करून प्रारूप विकास आराखडा तयार केला. तो शासनाकडे मंजुरीस्तव सादर केला. शासनाने हा आराखडा नगररचना अधिकाऱ्यांनी गोपनीय पद्धतीने पालिकेकडे सुपूर्द कराव व पालिकेने हा आराखडा प्रसिद्ध करावा, असे आदेश दिले. खरे तर पालिका प्रशासनाने आलेला आराखडा प्रसिद्ध करावयास हवा होता, पण त्यात फेरबदल करून नियम व अधिनियमांची पायमल्ली करण्यात आलेली आहे. नवीन विकास आराखडा तयार करताना तरतुदींचे पालन करण्यात आलेले नाही. शासनाच्या मान्यतेने नियुक्त करण्यात आलेल्या नगररचना अधिकारी यांनी बंद लिफफ्यात सादर केलेला मूळ विकास योजनेला प्रसिद्ध करण्याच्या प्रक्रियेस पालिकेने बगल दिली आहे.

प्रश्न ः आराखडा सादर करताना काय चुका झाल्या?
- नगर रचना अधिकारी यांनी तयार केलेली विकास योजना प्रसिद्धीपूर्व बदलण्याचा पालिकेला कोणताही अधिकारी नाही. हा आराखडा महापौरांच्या आदेशाने बदलण्यात आलेला आहे. नवीन विकास योजना प्रमाणित करून प्रसिद्ध करण्याचा अधिकारी महापौरांना नाही. शहराच्या विकासासाठी व व्यापक जनहिताच्या दृष्टीने आवश्यक असलेली ३७७ आरक्षणे व ३९ रस्ते नवीन विकास आराखड्यात बेकायदा वगळण्यात आलेली आहेत, असा दावा आम्ही याचिकेत केला आहे. नागरी विमान वाहतूक खात्याच्या सूचना झुगारून विमानतळालगत असलेल्या जागेवर व्यापारी प्रयोजनासाठी आरक्षण देण्यात आले आहे. यापूर्वीच्या आराखड्यात विमानतळालगतच्या भागात निवासी किंवा व्यापारी संकुले बांधण्यास मनाई होती. महत्त्वाच्या रस्त्यांची रुंदी बेकायदा कमी करण्यात आली, असा आमचा दावा आहे. अनेक ठिकाणी मंजूर ले-आउटवर निवासी घरे असताना आरक्षणे टाकण्यात आली आहे. एकंदरच नवीन विकास आराखडा आपल्या मनाप्रमाणे बदलण्याचा अधिकारी पालिकेला नाही. तो व्यापक जनहिताच्या दृष्टीने घातक असल्याने रद्द करावा, अशी विनंती याचिकेत करण्यात आलेली आहे.

प्रश्न ः आराखडा प्रसिद्ध करताना महापौरांनी नियमांची पायमल्ली केली आहे का?
- निश्चितच. ३१ ऑक्टोबर २०१५ रोज महापालिकेकडे हस्तांतरीत करण्यात आलेला आराखडा आहे तसा प्रसिद्ध करायला हवा होता, पण त्यात महापौरांच्या आदेशाने मोठे बदल करण्यात आलेले आहेत. या बदलाआधारे रस्ते, सार्वजनिक उद्याने, शाळा, आरोग्य केंद्र, यासारख्या महत्त्वाच्या नागरी सुविधांसाठी राखीव केलेली आरक्षणे वगळलेली आहेत. महापौरांनी सुचविलेल्या बदलाप्रमाणे विकास आराखडा प्रसिद्ध करण्यात आला, तो नियमबाह्य आहे. यासंपूर्ण विकास आराखड्यात राजकारण्यांनी हस्तक्षेप केला आहे. नियोजन मानांकनाचा भंग झाला आहे, असा आमचा दावा आहे. महापौरांनी स्वाक्षरी केलेला विकास आराखडा शासन राजपत्रात प्रसिद्ध झालेला आहे. २८ जानेवारी २०१६ रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत पालिकेचे आयुक्त उपस्थित नव्हते, त्यांनी बेकायदा तयार झालेल्या आराखड्यावर स्वाक्षरी केलेली नाही. पालिका व नगररचना प्रशासनाने कायद्याचा गळा घोटला आहे, असा आमचा दावा आहे. नगरसेवकाच्या मर्जीनुसार आराखडा होऊ शकत नाही. त्यामुळे राजपत्रात प्रसिद्ध झालेला आराखडा बेकायदा आहे. अधिकारचा गैरवापर करून कायदेशीर प्रक्रियेची चेष्टा करण्यात आलेली आहे. प्रारूप आराखड्यासाठीचा करण्याचा ठराव पालिकेला नाही. नियोजन प्रक्रियेत पालिका किंवा सर्वसाधारण सभेला हस्तक्षेप करता येत नाही. महापौरांनी प्रसिद्ध केलेल्या आराखड्यात २५९ आरक्षणे वगळण्यात आलेली आहेत. प्रारूप आराखड्यावर महापौरांना स्वाक्षरी करण्याचा अधिकार नाही. महाराष्ट्र महापालिका कायद्यातील कलम ६८नुसार आयुक्तांना स्वाक्षरी करण्याचे अधिकार दिले आहेत. या कायद्याचा भंग नवीन आराखड्यात करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images