Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

जलयुक्तची कामे रखडली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी शासनाने मोठा गाजावाजा करून जलयुक्त‌ शिवार योजना जाहीर केली, मात्र औरंगाबाद जिल्ह्यात या योजनेची कामे संथगतीने सुरू अाहेत. जिल्ह्यात १३०२ कामे सरकारी भाषेत 'प्रगतीपथा'वर आहेत. अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी ४४ कोटी रुपयांचा निधी लागणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वीच अभियानाअंतर्गत पहिल्या वर्षातील अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी मार्चअखेरची डेडलाइन दिली असल्याने त्यापूर्वी ही कामे पूर्ण करण्याचे आव्हान जिल्हा प्रशासनासमोर आहे. २०१५-२०१६साठी जलयुक्त शिवार अभियानांतर्गत औरंगाबाद जिल्ह्यामध्ये २२८ गावांची निवड करण्यात आली होती. जिल्ह्यात राबवण्यात आलेल्या या योजनेमध्ये ५४०० कामांचे उद्दिष्ट ठरवण्यात आले होते, मात्र जिल्ह्यात कासवगतीने सुरू अाहेत. या कामांमध्ये फारशी प्रगती नसून, आतापर्यंत यातील ४०९८ कामे पूर्ण झाली आहेत. उर्वरित १३०२ कामे अद्यापही सरकारी भाषेत प्रगतीपथावर आहेत. यानुसार औरंगाबाद तालुक्यात ५८३, पैठण ४७१, फुलंब्री १९४, वैजापूर २८३, गंगापूर ६४३, खुलताबाद १७२, सिल्लोड ९५०, कन्नड ५०५ तर, सोयगाव तालुक्यात पूर्ण झालेल्या २९७ व इतर अपूर्ण कामांवर आतापर्यंत ६० कोटी १५ लाख रुपयांचा खर्च झाला आहे. लोकसहभागातून झालेल्या कामांचाही वाटा मोठा असून, तो खर्चात समाविष्ट करण्यात आलेला नाही. पूर्ण झालेल्या कामांमध्ये कंपार्टमेंट बंडिंग ७९१ (९२ अपूर्ण), मातीनालाबांध २०४ (१४ अपूर्ण), खोल सलग चर २७२ (३३ अपूर्ण), साखळी सिमेंट बंधारा २२० (५१ अपूर्ण), विहीर फेरभरण ४९२ (४५४ अपूर्ण) यांसह इतर कामे झाले अाहेत. अभियानातून झालेल्या या कामांमुळे २६९५१ हेक्टर क्षेत्राला फायदा झाल्याचा प्रशासनाचा दावा आहे.

पुढचे पाठ मागचे सपाट...
जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत नवीन वर्षासाठी २२३ गावे निवडण्याची प्रक्रिया सुरू आहे, मात्र गेल्या वर्षीचीच कामे अद्यापही अपूर्ण असल्यामुळे 'पुढचे पाठ मागचे सपाट' अशी अवस्था झाली आहे. जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत गेल्यावर्षी २२८ गावांची निवड करण्यात आली होती, मात्र यंदा जिल्ह्यात २२३ गावे निवडण्यात येणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


उच्चशिक्षित जोडीदार, एकत्र कुटुंब हवे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
दिवसेंदिवस अनेक कारणांमुळे विभक्त होत असलेल्या कुटुंबपद्धतीऐवजी आमचा जोडीदार एकत्र कुटुंब पद्धतीत राहणारा उच्चशिक्षित असावा, अशी अपेक्षा राज्यस्तरीय सर्वशाखीय माळी समाज वधू-वर व पालक परिचय मेळाव्यात बहुतांश भावी वधू-वरांनी व्यक्त केली.

संत सावता सुमन वधू-वर संस्थेने आयोजित केलेल्या वधू-वर पालक परिचय मेळाव्यासाठी महाराष्ट्र, गुजरात व मध्य प्रदेश आदी राज्यातून माळी समाजातील सर्व शाखांच्या समाजबांधवांनी सहभाग नोंदविला. प्रा. गजमल माळी अध्यक्षस्थानी होते. यावेळी आयोजक शांताराम गाडेकर, स्थायी समितीचे सभापती दिलीप थोरात, नगरसेवक राजू वैद्य, सावता महाराजांचे वंशज, संगीता पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.

संत एकनाथ रंगमंदिरामध्ये सकाळपासून सुरू झालेल्या या मेळाव्यासाठी ४७० मुली आणि ३७० मुलांची उपस्थिती होती.

मेळाव्यासाठी डॉक्टर, इंजिनीअर, एमबीए, प्राध्यापक, व्यावसायिक, शिक्षक, शिक्षिका, बँकिंग क्षेत्रात काम करत असलेल्या भावी वधू-वरांची उपस्थिती होती. मान्यवरांचे स्वागत व मनोगतानंतर वधू व वरांच्या परिचयाला सुरुवात करण्यात आली. नोंदणी करण्यात आलेल्या भावी वधू व वरांनी मंचावर येऊन आपला परिचय दिला. यावेळी वधू-वरांनी सभासद क्रमांक सांगून शिक्षण, जन्मतारीख, मूळ गाव, सध्याचे गाव, फोन क्रमांक, आजोळ आदींसंबंधीची माहिती दिली आणि स्वतःचा परिचय करून दिला. यावेळी आयोजकांकडून वधू व वरांना त्यांच्या अपेक्षाही विचारण्यात आल्या असता बहुतांश मुलींनी डॉक्टर, इंजिनीअर जोडीदार हवा, असे सांगत चांगली नोकरी, स्वतःचे घर असणाऱ्यांना पसंती दिली. मुलांनी उच्चशिक्षित जोडीदार असावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी बहुतांश मुलींनी आम्हाला एकत्र कुटुंबातील जोडीदार हवा, अशी आवर्जून अपेक्षा केली. मेळाव्यासाठी काही मुला-मुलींना उपस्थित राहणे शक्य झाले नाही. त्यांच्या पालकांनी येथे उपस्थित राहून मुला-मुलींची माहिती सांगितली. मेळाव्यासाठी दीड हजारांपेक्षा अधिक पालक व मुला मुलींची उपस्थिती होती. वधू-वरांच्या परिचयापूर्वी बोलताना अध्यक्ष प्रा. गजमल माळी यांनी, सर्व समाज एकत्र आल्याबद्दल आनंद व्यक्त केला व समाज एकत्र होणे महत्त्वाचे असल्याचे सांगितले. कार्यक्रमासाठी संत सावता सुमन महिला सेवाभावी संस्थेच्या अध्यक्षा संगीता पवार, हरिभाऊ पवार यांची उपस्थिती होती.

१९ रेशीमगाठी जुळल्या
दिवसभर सुरू असलेल्या माळी समाजाच्या मेळाव्यामध्ये विविध ठिकाणांहून आलेल्या १९ मुला-मुलींचे विवाह एकाच दिवशी जुळले असल्याची माहिती हरिभाऊ पवार यांनी दिली. मेळाव्यात पसंत करण्यात आलेल्या मुला-मुलींच्या पालकांनी पुढील बोलणी सुरू केली असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘शिक्षणाशिवाय प्रगती अशक्य’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
देशात श्रीमंत, गरीब यांच्यातील दरी वाढते आहे. प्रत्येक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात विषमता आढळते. ही दरी दूर करण्याचे साधन म्हणजे चांगले शिक्षण मिळणे हा पर्याय आहे. शिक्षणातून रोजगार यामुळेच प्रगती शक्य आहे, असे प्रतिपादन भारतीय समाजविज्ञान संशोधन परिषदचे अध्यक्ष (आयसीएसएसआर) डॉ. सुखदेव थोरात यांनी केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात आयोजित राष्ट्रीय शिक्षण हक्क परिषदेत ते बोलत होते.

मराठवाडा अंडप्रिव्हिलेज््ड टिचर्स असोसिएशनतर्फे (स्वाभिमानी मुप्टा) परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. विद्यापीठाच्या नाट्यगृहात झालेल्या कार्यक्रमाला व्यासपीठावर पद्मश्री डॉ. फातेमा झकेरिया, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे, माजीमंत्री गंगाधर गाडे, प्राचार्य सुरेश सदावर्ते, संघटनेचे अध्यक्ष शंकर अंभोरे यांची उपस्थिती होती. डॉ. थोरात पुढे म्हणाले, 'आजची स्थिती पाहिली तर, देशात समानता आली, असे म्हणता येणार नाही. उद्योगधंदे व जमीनीचे राष्ट्रीयकरण करा ही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची दूरदृष्टी होती. ती तत्कालीन सरकारने न अवलंबल्यामुळे दलितांमध्ये गुणवत्ता असूनही त्यांना संधी मिळत नाही. प्रत्येक क्षेत्रात तफावत आढळते. शिक्षण व रोजगार हे प्रगतीचे साधन आहे हे समाजाने लक्षात घ्यायला हवे. त्याशिवाय प्रगती शक्य नाही.' यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवनगौरव पुरस्काराने गंगाधर गाडे यांना सन्मानित करण्यात आले. यासह क्रांतीसूर्य सावित्रीबाई फुले पुरस्काराने पद्मश्री डॉ. फातेमा झकेरिया, राजर्षी शाहू महाराज पुरस्काराने कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे यांना तर प्राचार्य सुरेश सदावर्ते यांना बुद्धरत्न पुरस्काराने गौरविण्यात आले.

चार तास उशीर
सकाळी १० वाजता सुरू होणारी परिषद चार तास उशिरा सुरू झाली. उद्घाटकांसह इतर मान्यवर सभागृहात उपस्थित होते. यानंतरही उद्घाटनाचा कार्यक्रम विलंबाने सुरू झाला. विलंबामुळे सभागृहातील उपस्थित मान्यवरांसह, उपस्थितांना ताटकळत बसावे लागले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वधू-वरांचा डिजिटल परिचय

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
औरंगाबाद जिल्हा काण्व ब्राह्मण समाज या संस्थेने आयोजित केलेल्या वधू-वर परिचय मेळाव्यात विवाहेच्छुकांची माहिती प्रोजेक्टरच्या मदतीने सादर करण्यात आली.

काण्व ब्राह्मण समाजाने रविवारी (२१फेब्रवारी) सीमंत मंगल कार्यालयात आठवा राज्यस्तरीय सर्व शाखीय वधू-वर सूचक मेळावा आयोजित केला होता. त्यात सुमारे ३५० विवाहेच्छुक वधू-वरांनी मेळाव्यात सहभाग नोंदवला. मेळाव्याचे उद्घाटन बिडकीनचे सरपंच राजू कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले. काण्व संस्थेचे अध्यक्ष धनंजय पांडे, वधू-वर सूचक समितीचे अध्यक्ष रमाकांत कुलकर्णी, वधू-वर समिती सदस्य उदय मानवतकर, बालाजी पाध्ये, हेमंत देशपांडे, काण्व संस्थेचे सचिव धनंजय कुलकर्णी, प्रमोद कुलकर्णी, हेमंत देशपांडे आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती.

या मेळाव्यात सर्व वधू-वरांची माहिती प्रोजेक्टरच्या साह्याने सादर करण्यात आली. प्रातिनिधिक स्वरुपात मुला-मुलींच्या मुलखतीही घेण्यात आल्या. या निमित्ताने विवाहेच्छुक मुला-मुलींच्या अपेक्षांची चर्चाही घडवून आणण्यात आली. या मेळाव्यात पूर्वनोंदणी केलेल्यांच्या माहितीचा समावेश असलेल्या स्मरणिकेचे प्रकाशनही यावेळी करण्यात आले. नावनोंदणी न केलेल्यांची पुरवणी वधू-वर पुस्तिकासुद्धा लगेच प्रकाशित होणार असल्याचेही यावेळी आयोजकांनी सांगितले. स्नेहल कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रसाद देशपांडे, सचिव धनंजय कुलकर्णी, लक्ष्मीकांत जयपूरकर, कार्याध्यक्ष दीपक खळेगावकर, सहसचिव पुरुषोत्तम भाले, सुरेंद्र आनंदगावकर, दिलीप दहिभाते, नंदकुमार सोनोनी, राधाकृष्ण न्यायाधीश, गणेश टाकरवणकर, अलका भाले, अॅड. ज्योती पत्की, शरदिनी देशमुख यांनी परिश्रम घेतले.

वधू-वरांचा परिचय व्हावा, सर्व शाखीय भेद विसरून आता हे वधू-वर मेळावे आयोजित करण्यात यावेत, हा या मेळाव्याचा उद्देश होता. तो सफल झाला आहे.
- रमाकांत कुलकर्णी, अध्यक्ष, वधू-वर सूचक समिती.

प्रोजेक्टरवर माहिती देऊन मेळावा आधुनिक करण्याचा प्रयत्न केला. याशिवाय पुस्तिका काढून वधू-वरांच्या नावांचा परिचयाचे एकत्रीकरणही केले गेले आहे.
- धनंजय पांडे, अध्यक्ष, काण्व ब्राह्मण समाज.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संघाचे कौमुदी पथसंचलन

$
0
0

औरंगाबाद : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने 'माघी पौर्णिमे'निमित्त रविवारी (२१ फेब्रुवारी) पूर्ण वेषातील कौमुदी पथसंचलन केले. माघा पौर्णिमेनिमित्त होत असलेल्या संचलनाला गुणवत्तापूर्ण कौमुदी पथसंचलन, असे म्हणण्याचा संघाचा प्रघात आहे. रात्री ८ वाजता सघोष पथसंचलन शहरातून काढण्यात आले. या पथसंचलनाचा मार्ग सिंधी कॉलनी समिती मैदान-मित्रनगर मार्ग-जालना रोड-आकाशवाणी चौकातून-अतुल होंडा शोरूम-शिवगणेश मंदिर-स्मशान मारुती मंदिर-कैलासनगर मुख्य रस्तावरून-सम्राट अशोक-मोंढा नाका-समिती मैदान असा होता. या गुणवत्तापूर्ण संचलनात सुमारे ३०० जण सामील झाले होते. यात संघाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचा समावेश होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अधिकाऱ्यांची जोरदार बॅटिंग

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची सभा शनिवारी झाली. या सभेत कधी नव्हे ते विविध विभागाच्या अधिकाऱ्यांनी सदस्यांना 'बोल्ड' करून सर्वांना आश्चर्यचकित केले.

सभेच्या सुरवातीला माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी भगवान सोनवणे यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती झाली. मनोहर गवई, रामदास पालोदकर, ज्ञानेश्वर मोठे यांनी सोनवणे यांना परीक्षा शुल्क आणि शैक्षणिक शुल्क याबाबत कोड्यात टाकले. सोनवणे समाधानकारक उत्तर देऊ शकले नाहीत. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भीमाशंकर जमादार यांच्या विभागाचे पोस्टमार्टेम सदस्यांनी नंतर केले. औषधी खरेदी, यंत्रसामग्री खरेदी, प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रांचे बांधकाम या विषयावरून त्यांना चांगलेच ताणले. जमादारांनी आपल्या परीने उत्तर देण्याचा प्रयत्न केला, पण रामदास पालोदकर, ज्ञानेश्वर मोठे, त्यानंतर शिक्षणाधिकारी आर. ए. मोगल यांचा नंबर होता. आंतर जिल्हा बदलीवरून यांना रामदास पालोदकर यांनी अडचणीत आणण्याचा प्रयत्न झाला, पण मोगलांना कायदे तोंडपाठ होते.

बिंदूनामावली, पटसंख्येचा तपशील दिल्यानंतर सध्याच्या नोंदीनुसार एकही रिक्त पद दिसत नाही. सगळ्या गोष्टी ऑनलाइन आहेत, हे सांगितल्यानंतर पालोदकर पुढे प्रश्न उपस्थित करू शकले नाहीत. महिला बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय कदम यांनी मनोहर गवई यांच्यातील सामना बराच रंगला. गवई यांनी नवीन अंगणवाड्या, अंगणवाड्यांना मंजूर केलेले वॉटर फिल्टर यासंदर्भात विचारणा केली. त्यावर कदम यांनी अंगणवाडी मंजुरी केंद्राकडून होत असते. एकाच वेळी केंद्र सरकार नवीन अंगणवाड्यांची घोषणा करत असते. आपल्या पातळीवर काहीच नसते. यासंदर्भात वेळोवेळी पत्रव्यवहार केला गेला असल्याचे स्पष्टीकरण दिले. एवढ्यावरच न थांबता वर्षभरापूर्वी याच विभागाच्या कामकाजाविषयी सभागृहात अभिनंदनाचा ठराव घेतला गेला होता, असे निदर्शनास आणून दिले.

पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता व्ही. ए. रबडे यांनीही कोणत्या परिस्थितीत योजना अंमलात आणता येईल. दुष्काळी परिस्थितीचा सामना करतानाचे निकष काय? हे सभागृहासमोर स्पष्टपणे सांगितले. त्यामुळे सीइओ डॉ. अभिजित चौधरींना एरव्ही करावी लागणारी मध्यस्थी करावी लागली नाही. गेल्या तीन वर्षांत पहिल्यांदाच अधिकाऱ्यांसमोर सदस्य 'बोल्ड' झाल्याचे चित्र दिसले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नार्सिझम मुळे होते व्यक्तिमत्व उद‍‍्ध्वस्त

$
0
0

Manoj.Kulkarni@timesgroup.com

औरंगाबाद : वारंवार सेल्फी काढल्यामुळे 'नार्सिझम' हा मानसिक विकार जडतो, कार्यक्षमता कमी होते आणि व्यक्ती नैराश्याच्या खाईत लोटली जाते. अशा व्यक्तिमत्वात विकृती येत असल्याचे समोर येत आहे.

काही दिवसांपूर्वी बेंगळुरूमध्ये सेल्फी काढताना दोन युवकांचा मृत्यू झाला. या सेल्फी काढण्याच्या अतिरेकामुळे युवकांच्या व्यक्तिमत्वात कमालीचा बदल होताना दिसतो आहे. दररोज एक सेल्फी काढून सोशल मीडियावर पोस्ट करणे हे सेल्फीचे व्यसन जडण्याची पहिली पायरी असते. हळुहळु ही संख्या ४-५ सेल्फीवर गेल्यास त्या व्यक्तीला 'नार्सिझम' झाल्याचे समजावे. अशी व्यक्ती स्वतःभोवती गुरफटते. भ्रमात राहते. नैराश्याच्या सावटाखाली येते. त्याचा इतर जगाशी संबंध तुटतो. सूर्य आपल्या हातात आहे, आपण एखादी वास्तू धरून उभे आहोत असे सेल्फी वारंवार काढणे हे 'नार्सिझम'चे लक्षण आहे.

नार्सिझमचा इतिहास : नार्सिस्ट नावाचा एक ग्रीक राजा होता. तो नेहमी तळ्याकाठी बसायचा. वेगवेगळी वस्त्रे, डोक्यावर फुले परिधान करून स्वतःचे प्रतिबिंब तळ्यात पाहायचा. अनेकजण सेल्फीचा उगम इथून झाला म्हणतात. अशा व्यक्ती स्वतःतच्या कोषात रममाण होता. नार्सिस्ट राजावरून या विकाराला 'नार्सिझम' नाव पडले.

सेल्फी काढणे एका मर्यादेत ठीक आहे. याचे व्यसन धोकादायक असते. त्यामुळे व्यक्तीची कार्यक्षमता कमी होते. व्यक्ती स्वकेंद्री बनते. आभासी विश्वात रममाण होते. दिवसाला ४-५ सेल्फी काढून पोस्ट करणाऱ्या व्यक्तीला 'नार्सिझम'ची लागण झालेली असते. अशा व्यक्ती कठीण प्रसंगाचे धक्के सहन करून शकत नाहीत. त्यांना सगळीकडे फक्त चांगले, चांगले हवे असते. हे रोजच्या जगात शक्यही नसते.
- डॉ. संदीप शिसोदे, मानसोपचार तज्ज्ञ

सेल्फीचे दुष्परिणाम
- कार्यक्षमता कमी होते.
- आभासी विश्वात रममाण.
- जे चांगले तेच बघतो.
- वाईट गोष्टींकडे दुर्लक्ष.
- स्वसंभाषणात गुंग होतात.
- अभ्यासावर परिणाम होतो.

शार्क माशापेक्षाही धोकादायक
- जगात १४ जणांचा सेल्फीमुळे बळी.
- शार्क माशांनी आजवर ८ बळी घेतले.
- दरवर्षी काढले जाणारे सेल्फी १ लाख कोटी.
- दिवसभर जगभरात २७५ कोटी सेल्फी फिरतात.
- इन्स्टाग्रामवर सेल्फी टॅगचे ५.५ कोटी फोटो.
- फेसबूकवर आठवड्यात 'सेल्फी'चे ४ लाख स्टेटस.

जगातला पहिला सेल्फी
- रॉबर्ट कॉर्नेलिअर यांनी १८३९मध्ये स्वतःची प्रतिमा घेतली. हा पहिला सेल्फी.
- १९६६ मध्ये नासाचे बझ अल्ड्रिन यांनी चंद्रावर पोचल्यावर सेल्फी काढला.
- नासाच्या 'क्युरॅसिटी रोव्हर' या रोबो बग्गीने मंगळावर उतरल्यावर सेल्फी काढून पृथ्वीवर पाठवला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बैल चरण्यावरून दोन गटांत हाणामारी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, खुलताबाद
कपाशीच्या पिकात चरायला गेलेल्या बैलाला हाकलल्याच्या किरकोळ कारणांवरून दोन गटांत झालेल्या तुंबळ हाणामारीत एकमेकांविरुद्ध तक्रारींनुसार १८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना कनकशीळ येथे रविवारी सायंकाळी सात वाजता घडली. पोलिसांनी एका गटातील पाच जणांना अटक केली आहे.
शेतातून घरी जाताना शेजारच्या वस्तीवरील कमलाबाई रंगनाथ दांडेकर यांनी जिजाबाई दांडेकर यांना तुमच्या बैलाने आमचे कपाशीचे नुकसान केले, असे सांगून समजावण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी जिजाबाईने शिवीगाळ करत, आम्ही तुमचा बैल कोंडवाड्यात नेऊन टाकू, असे धमकावले. याची माहिती दिंगबर दांडेकरने वडिलांना सांगितली. नंतर दोन्हीही गटातील बाचाबाचीचे रुपांतर भांडणात होऊन तुंबळ हाणामारीत झाली. कुऱ्हाड, कोयता, काठ्याचा वापर होऊन डोके फुटली. भांडण सोडविण्यासाठी गेलेल्यांनाही काठीने मारहाण झाली. या प्रकरणी दिगंबर दांडेकर यांच्या फिर्यादीवरून रंगनाथ दांडेकर, कारभारी दांडेकर, राजू दांडेकर, कमलाबाई दांडेकर, अनिता दांडेकर, पंढरीनाथ दांडेकर, संतोष दांडेकर, हिराबाई दांडेकर, गणेश दांडेकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. राजू रंगनाथ दांडेकर यांच्या फिर्यादीवरून दिगंबर दांडेकर, किसन दांडेकर, बाबासाहेब दांडेकर, सचिन दांडेकर, स्वप्नील दांडेकर, जिजाबाई दांडेकर, शांताबाई दांडेकर, मंदाबाई दांडेकर, प्रमोद दांडेकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सहायक पोलिस निरीक्षक अभिजीत मोरे तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


श्री घृष्णेश्वर मंदिराच्या उत्तरेकडे पार्किंगचा प्रस्ताव

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, खुलताबाद
भाविकांची गैरसोय दूर करण्यासाठी श्री घृष्णेश्वर मंदिराच्या उत्तरेकडे गट क्रमांक ६९१ मध्ये पार्किंग सुरू करण्याचा प्रस्ताव आहे. या विकासकामांना सहकार्य करून अतिक्रमणे काढून घ्यावीत, असे आवाहन आमदार प्रशांत बंब यांनी नुकत्याच झालेल्या एका बैठकीत केले.
वेरूळ येथे पर्यटन व तीर्थक्षेत्र विकास योजना, पर्यटन प्राधिकरणातून विकास योजना राबविण्यात येणार आहेत. त्यासाठी मंदिर व लेणी परिसरातील अतिक्रमणे काढावी लागणार आहेत. मंदिर परिसरातील दुकानदारांचा त्यास विरोध आहे. यावर तोडगा काढण्यासाठी झालेल्या बैठकीला आमदार बंब, उपविभागीय अधिकारी राजू नंदकर, एमटीडीसीचे प्रादेशिक व्यवस्थापक अण्णासाहेब शिंदे, एएसआयचे वरिष्ठ संवर्धन सहायक हेमंतकुमार हुकरे, तहसीलदार बालाजी शेवाळे, सहाय्यक पोलिस निरीक्षक अभिजीत मोरे, देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष संजय वैद्य, सरपंच साहेबराव पांडव, दुकानदार संघटनेचे मकरंद आपटे, गणेशसिंग हजारी, पारधी संघटनेचे बैग्या चव्हाण, रवींद्र पुराणिक उपस्थित होते.
श्री घृष्णेश्वर मंदिरात येणाऱ्या भाविकांसाठी सध्या राष्ट्रीय महामार्गाच्या पलिकडे आहे. त्यामुळे भाविकांनी रस्ता ओलांडून यावे लागते. ही गैरसोय दूर करण्यासाठी उत्तरेकडील गट क्रमांक ६९१ या जागेत पार्किंग सुरू करण्यात येणार आहे. पार्किंग ते मंदिराच्या प्रवेशद्वारापर्यंत बॅरिकेट लावण्यात येणार आहेत, असे उपविभागीय अधिकारी नंदकर यांनी सांगितले. यावेळी बोलताना आमदार बंब यांनी विकासकामांचे महत्त्व लक्षात आणून दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

माजी आमदारांसह ४० जण निर्दोष

$
0
0

वैजापूरः रास्ता रोको आंदोलन केल्याप्रकरणी शिवसेनेचे माजी आमदार आर. एम. वाणी यांच्यासह ४० आंदोलकांची सबळ पुराव्याअभावी निर्दोष सुटका करण्यात आली. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ए. टी. शेरे यांनी हा निर्णय दिला.
शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी वाणी यांच्या नेतृत्वाखाली २००७ मध्ये औरंगाबाद रस्त्यावरील शिऊर बंगला येथे आंदोलन करण्यात आले होते. त्यावेळी सार्वजनिक रस्ता अडवणे, गैरकायद्याची मंडळी जमवणे या आरोपाखाली वाणी यांच्यासह ४० जणांवर शिऊर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ए. टी. शेरे यांच्या न्यायालयात झालेल्या सुनावणीत सबळ पुराव्याअभावी सर्वांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. वाणी यांच्यासह महिला आघाडीच्या जिल्हा संघटक आनंदी अन्नदाते, तालुकाप्रमुख रमेश पाटील बोरनारे, डॉ. आण्णा शिंदे, प्रकाश चव्हाण, साबेरखान, कचरू डिके, गोकुळ आहेर, मनाजी मिसाळ, गोरख शिंदे, सुभद्राबाई कोतकर, सत्यभामा कुंदे, मधुकर पवार, सलीम कुरेशी, प्रकाश वाघ, मनोज सोनी, गौतम सोनवणे, बाळासाहेब कुंदे, बाळासाहेब जाधव यांची न्यायालयाने सुटका केली. आंदोलकांतर्फे अॅड. आसाराम रोठे व अॅड. अनिल रोठे यांनी काम पाहिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सधन शेतकरी रोजंदारीवर

$
0
0

देविदास त्रिंबके, वाळूज
दुष्काळाची दहाकता दिवसेंदिवस वाढत असून पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. भीषण दुष्काळामुळे शेतीव्यवसाय सोडून गंगापूर तालुक्यातील जिकठाण येथील सधन शेतकरी देखील रोजीरोटीसाठी एमआयडीसीकडे वळाले आहे.
औरंगाबादपासून अवघ्या २२ किलोमिटर अंतरावर अहमदनगर रस्त्यावर जिकठाण हे सुमारे सहा हजार लोकवस्तीचे गाव आहे. गावापासून अवघ्या दहा किलोमिटर अंतरावरील वाळूज एमआयडीसी असूनही मुबलक पावसामुळे गावातील नागरिकांनी शेती सोडली नाही. पावसामुळे परिसरातील विंधन विहिरी, विहिरींना मुबलक पाणी असल्याने शेती हा हक्काचा व्यवसाय होता. पण गेल्या काही वर्षांपासूनच्या दुष्काळाच्या झळा बसत असल्याने शेतीवरचा विश्वास डळमळीत होत आहे. येते गेल्या सात महिन्यांपासून टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे. भर पावसाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी सुरू झालेली मरमर आता अधिक वाढली आहे. सध्या जिल्हा परिषदेतर्फे तीन टँकर पाणी रोज सार्वजनिक विहिरीत ओतण्यात येते. ही विहीर तब्बल ४८ फूट खोल असून त्यातून पाणी शेंदून भरावे लागते. विहिरीत गाळ साचला असल्याने आज भरलेले पाणी तब्बल दोन दिवसांनंतर पिण्यासाठी वापरता येते. एवढे ते गढूळ होते. शासनाकडून पिण्याच्या पाण्यासाठी मिळालेल्या निधीचा वापर करून टेंभापुरी धरणातील पेयजल योजनेतील विहिरीतून पाइपलाइन करमअयात आली आहे. पण धरणच कोरडे पडल्याने विहिरीलाही पाणी नाही. त्यामुळे ही योजना नावालाच उरली आहे. त्यामुळे पाण्याची समस्या कायमस्वरुपी सोडवण्यासाठी पर्याय काढण्याचा प्रयत्न असल्याची माहिती सरपंच नवाज पटेल यांनी दिली. आजूबाजूच्या वाड्या वस्त्यांवर राहणाऱ्या नागरिकांना पाणी मिळत नाही. पाऊस नसल्याने शेती सुकली, फळबागा करपल्या आहेत. परिणामी पोट भरण्यासाठी सधन शेतकरी एमआयडीसीचा रस्ता धरत आहेत. रोजंदारीतून बाजारहाट होतो, पण मोठे प्रश्न सुटत नाहीत. गावातील अनेक तरूण, नागरिक दररोज वाळूज एमआयडीसीमध्ये रोजगारासाठी जात आहेत.
नगदी पिके घेण्यासाठी मजूर मिळत नसल्याने अनेक शेतकरी हे फळबागांकडे वळले. फळबागा जगवण्यासाठी शेतात कुपनलिका खोदल्या. पण सलग तीन वर्षे पर्जन्यमान कमी असल्याने फळबागांना पुरसे पाणी मिळत नाही. परिणामी फळबागा करपत आहेत. वाळणाऱ्या बागा बघण्यावाचून आता शेतकऱ्यांच्या हाती काहीही राहिलेले नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

केंद्रेकरांच्या बदलीमुळे संताप

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
धडाडीचे अधिकारी म्हणून ओळख असलेले औरंगाबाद महापालिकेचे प्रभारी आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्याकडून आयुक्तपदाचा कार्यभार काढून घेण्यात आला आहे. शासनाने केलेल्या फेरबदलामुळे शहरातील सर्वसामान्य नागरिकांमध्ये, सामाजिक संघटनांमध्ये संताप व्यक्त होत आहे. विविध सामाजिक संघटना मंगळवारी (२३ फेब्रुवारी) बैठक घेण्याची तयारी करत आहेत.
औरंगाबाद महापालिकेचे प्रभारी आयुक्त म्हणून तीन महिन्यांपूर्वी केंद्रेकर यांनी पदभार स्वीकारला. कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळख असलेल्या केंद्रेकरांच्या तीन महिन्यातील कामकाजामुळे त्यांच्याकडे तीन वर्ष पदभार रहावा ही शहरातील नागरिकांची भावना होती. विविध सामाजिक संघटनांनी एकत्र येत शासनाला निवेदने दिले. परंतु, सोमवारी (२२ फेब्रुवारी) त्यांच्याकडून आयुक्तपदाचा कार्यभार काढण्यात आला. शासनाने तसे आदेश काढले. यामुळे नागरिकांमध्ये नाराजी आहे.
या बदलीबाबत महापालिका पदाधिकाऱ्यांनी संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या. शहरवासियांनी जर या प्रकरणी आंदोलन छेडले तर, शिवसेना आणि आम्ही आंदोलनात सहभागी होऊ, असे सांगण्यात आले.
यासंदर्भात महापौर त्रिंबक तुपे म्हणाले,'सुनील केंद्रेकर यांनी आयुक्त म्हणून तीन महिन्यांत अतिशय चांगली कामे केली. शहराच्या विकासाची सुरुवात झाली होती. आम्ही सत्ताधारी, विरोधक सगळ्यांनी एकत्र येऊन केंद्रेकरांसाठी ठरावही मंजूर केला होता. सर्वपक्षीय नगरसेवक एखाद्या मुद्यावर तेही अधिकारी येथे राहू द्यावे. या मुद्यावर एकमत होणे सोपे नाही. यामागे षडयंत्र रचल्याचा आरोप केला असून याचा शोध घेतला जाईल, असे शिवसेनेने स्पष्ट केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणी नियोजनासाठी आज विभागीय बैठक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
मराठवाड्यातील सर्वात मोठ्या जायकवाडी धरणामध्ये सध्या तीन टक्यांपेक्षाही कमी जलसाठा उपलब्ध असून येत्या काही दिवसातच धरणातील मृतसाठ्यातून पाण्याचा उपसा करावा लागणार आहे. या पाण्याचे नियोजनासाठी मंगळवारी (२३ फेब्रुवारी) अॅक्शन प्लान तयार करणार असल्याचे विभागीय आयुक्त डॉ. उमाकांत दांगट यांनी सांगितले.
जायकवाडीच्या उपलब्ध पाण्याच्या नियोजनासंदर्भात आठ दिवसांपूर्वी विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली तातडीची बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत औरंगाबाद, बीड, परभणी आणि जालना या जिल्ह्यांकडून पाण्याचा नियोजन आराखडा मागवण्याचे आदेश दिले होते. प्रत्येक जिल्ह्याला पाण्याची किती आवश्यकता आहे व पाण्याचे कसे नियोजन करण्यात येईल या संदर्भातील अहवाल विभागीय आयुक्त कार्यालयाला प्राप्त झाला आहे. मंगळवारी होणाऱ्या बैठकीमध्ये पाण्याचा अॅक्शन प्लान तयार करण्यात येणार आहे. धरणातील पाण्याचा विचार करता जुलै २०१६ पर्यंत पिण्यासाठी ३.५० टीएमसी पाण्याची आवश्यकता आहे. मात्र सध्या धरणामध्ये दोन टीएमसी साठा उपलब्ध आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ट्रकखाली चिरडून महिलेचा मृत्यू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सातारा
कचखडीने भरलेल्या एका हायवा ट्रकखाली चिरडून एका महिलेचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात सोमवारी दुपारी पाऊणच्या सुमारास बीड बायपासवर झाला. या अपघातात मोटारसायकलवरील तिचे सासरे जखमी झाले आहेत. या महिलेच्या डोक्यावरून हायवाचे मागचे चाक गेले.
मीना अमोल मालोदे (वय २३ रा. हतनूर, ता. कन्नड) यांच्या नातेवाइकाचे बीड बायपासवरील हिवाळे लॉन्स येथे लग्नासाठी कन्नड तालुक्यातील मीना अमोल मालोदे या सासरे अशोक मालोदे यांच्यासोबत मोटारसायकलवरून (एमएच २० बी डी २३६७) जात होत्या. कन्नड तालुक्यातील हतनूर येथील ते रहिवासी आहेत. त्यांचे पती अमोल मालोदे हे आधीच आले होते. बीड बायपासवरील अब्रार कॉलनी येथील सेंट्रल इंडिया ट्रान्सपोर्टसमोरील पुलापासून थोडे पुढे आल्यानंतर मागून येणाऱ्या हायवा ट्रकने (एमएच २० बी डी ४१००) मोटारसायकलला धडक दिली. या धडकेने अशोक मालोदे एका बाजुला पडले. परंतु, मोटारसायकलवर मागे बसलेल्या मीना मालोदे या ट्रकच्या मागील चाकाखाली आल्या. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. हेल्मेट घातल्याने अशोक मालोदे यांच्या डोक्याला फार मार लागला नाही. घटनेची माहिती मिळाल्यानंतर सातारा पोलिस, टु मोबाइल व वाहतूक शाखेचे सहायक उपायुक्त सी. डी. शेवगण घटनास्थळी पोहोचले. मीना मालोदे यांनी घाटी हॉस्पिटलमध्ये तपासून डॉक्टरांनी मृत घोषित केले. पोलिसांनी ट्रक व चालक शेख कय्युम याला ताब्यात घेतले आहे. सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक विक्रमसिंग चौहान पुढील तपास करत आहेत.
मीना यांचे दोन वर्षांपूर्वी अमोल मालोदे यांच्यासोबत लग्न झाले होते. ते पती व सासऱ्यांना शेती कामात मदत करत असत. या अपघाताची माहिती समजल्यानंतर कन्नड तालुक्यातील हतनूर व माहेर केसापूर येथे शोककळा पसरली. बीड बायपास वाहतुकीसाठी अत्यंत धोकादायक झाला असून एक वर्षांत अवजड वाहनाच्या चाकाखाली येऊन तीन बळी गेले. २१ मे २०१५ रोजी एक १९ वर्षांच्या युवकाचा मृत्यू झाला. दुसरी घटना रेणुकामाता कमानीसमोर घडली होती. याच ठिकाणी २४ नोव्हेंबर रोजी एका ४२ वर्षाच्या महिलेचा ट्रकखाली चिरडून मृत्यू झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उद्योगांच्या पाण्यात लवकरच कपात

$
0
0

Ramchandra.Vaybhat@timesgroup.com

औरंगाबाद : मराठवाड्यात दुष्काळाची तीव्रता फेब्रुवारी महिन्यापासूनच जाणवत आहे. औरंगाबाद, जालना शहरांसह उद्योगांना पाणीपुरवठा करणाऱ्या जायकवाडी धरणात महिनाभर पुरेल एवढाच उपयुक्त साठा शिल्लक असून त्यानंतर पुन्हा मृतसाठ्यातून उपसा करावा लागणार आहे. यामुळे येत्या काही दिवसात बांधकामांवर बंदी तसेच उद्योगांच्या पाण्यातही कपातीचा निर्णय घेतला जाऊ शकतो, असे जिल्हाधिकारी डॉ. निधी पांडेय यांनी सोमवारी सांगितले.

पावसाअभावी जुलैमध्ये खबरदारीचा उपाय म्हणून जायकवाडी प्रकल्पातून उपसा करण्यात येत असलेल्या घरगुती आणि उद्योगांच्या पाण्यात दहा टक्के पाणीकपातीचा निर्णय घेण्यात आला. त्यावेळी जायकवाडीत केवळ ७.५८ दशलक्ष घनमीटर (०.३४ टक्के) इतका उपयुक्त पाणीसाठा शिल्लक होता. झपाट्याने कमी होत असलेल्या पाण्यामुळे केवळ जायकवाडी धरणावर अवलंबून असलेले शहर आणि उद्योगांवरही दुष्काळाचे भीषण संकट घोंगावत आहे. नाथसागरामधून औरंगाबाद, जालना, अंबड शहरांसह काही गावांना आणि उद्योगांसाठीही पाणीपुरवठा सुरू आहे. धरणात सध्या केवळ ५८.४८९ दशलक्ष घनमीटर (२.६९ टक्के) उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. हा पाणीसाठा महिनाभर पुरण्याची शक्यता आहे. सध्या औरंगाबाद व जालना शहराला तसेच उद्योगाला करण्यात येत असलेल्या पाणीपुरवठ्यापेक्षा अधिक पाण्याचे दररोज बाष्पीभवन होत आहे. आपेगाव-हिरडपुरी बंधाऱ्यात पिण्यासाठी १५ दशलक्ष घनमीटर पाणी सोडण्याची मागणी जोर धरत आहे. पाण्याची गरज आणि उपलब्ध पाण्याचे गणित जुळवण्यासाठी लवकरच पाणीकपातीचा निर्णय घ्यावा लागेल.

सध्या जायकवाडी धरणात उपलब्ध पाण्याचा आढावा घेतला जात आहे. पिण्याच्या पाण्याला प्राधान्य असून पाणीकपातीच्या निर्णयामुळे कुणाचीही अडचण होणार नाही. जायकवाडी धरणामध्ये उपलब्ध पाणी व संभाव्य गरज याचा आढावा घेतल्यानंतर १५ मार्चनंतर पाणीकपात होण्याची शक्यता आहे.
- डॉ. निधी पांडेय, जिल्हाधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जाट आंदोलनाचा रेल्वेला फटका

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
हरिणायातील जाट आंदोलनामुळे सचखंड एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्याने प्रवाशांची गैरसोय झाली. सचखंडशिवाय मंगळवारी मनमाड जंक्‍शन येथून दिल्लीकडे जाणाऱ्या तीन रेल्वेही रद्द करण्यात आल्या आहेत.
जाट समाजाने आरक्षणासाठी आंदोलन सुरू केले आहे. आंदोलनादरम्यान हिंसाचारामुळे अनेक रेल्वे रद्द करण्यात आल्या आहेत. सोमवारी व मंगळवारी नांदेड-अमृतसर सचखंड एक्स्प्रेस रेल्‍वे रद्द करण्यात आली. त्यामुळे नांदेड येथे गुरुद्वारा येथे दर्शनासाठी आलेल्या भाविकांना नांदेडमध्ये थांबावे लागले. औरंगाबादहून दिल्लीकडे मोठ्या संख्येने प्रवासी जातात. याशिवाय उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश येथे जाणाऱ्या भाविकांचीही संख्याही मोठी आहे. रेल्वे रद्द केल्यामुळे प्रवाशांची गैरसोय झाली. मनमाड रेल्वे स्टेशनहून दिल्लीकडे १३ मुख्य रेल्वे धावत असतात. जाट आंदोलनामुळे मनमाड ते दिल्ली झेलम एक्स्प्रेस, मुंबई सीएसटी ते अमृतसर-पठाणकोट आणि पंजाब मेल या तीन रेल्वे रद्द करण्यात आल्या आहेत. सोमवारी आणि मंगळवारी सचखंड एक्स्प्रेस रद्द केल्याने सुमारे साडेसहा लाख रुपये प्रवाशांना परत देण्यात आले. सोमवारी रात्रीपर्यंत ५२० प्रवाशांना ४ लाख ८६ हजार रुपयाचा परतावा द्यावे लागले. त्यानंतर मंगळवारी ‌सचखंड रद्द झाल्याने दुपारी दोनपर्यंत ३५७ जणांचे १ लाख ३७ हजार रुपये परत केल्याची माहिती रेल्वेच्या सूत्रांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शासकीय वाहनांना दंड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
नवीन परिपत्रकानुसार शासकीय वाहने, रुग्णवाहिकांवरील दिव्यांबाबत आरटीओकडून कारवाई सुरू करण्यात आली आहे. परवानगी नसताना अंबर दिवा लावल्याबद्दल वक्फ बोर्डाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे वाहन, तहसीलदार, आणि पोलिस आदींच्या १० शासकीय वाहने व ५ रुग्णवाहिकांवर कारवाई करण्यात आली. वाहनचालकांना 'मेमो' देऊन प्रत्येकी शंभर रुपये दंड वसूल करण्यात आला.
आरटीओ कार्यालयाने अंबर दिवे वापरणाऱ्या शासकीय वाहनांवरील कारवाईला सोमवारपासून प्रारंभ केला. त्यासाठी प्रादेशिक परिवहन अधिकारी सर्जेराव शेळके यांनी दोन पथकांची स्थापना केली आहे. पथकांमध्ये चार मोटार वाहन निरीक्षकांचा समावेश आहे. वक्फ कार्यकारी अधिकारी यांच्या शासकीय वाहनावर अंबर दिवा लावण्यात आला होता. पोलिस, केंद्रीय उत्पादन शुल्क तसेच तालुका दंडाधिकारी यांच्या मोटारींवर अंबर दिव्याबाबत पथकाने कारवाई केली. पथकाने रस्त्यावर धावणाऱ्या पाच रुग्णवाहिकांवर कारवाई केली. नवीन परिपत्रकानुसार रुग्णवाहिकेसाठी जांभळया काचेमध्ये लुकलूकणारा दिवे बसवावा लागणार आहे. मात्र, अनेक रुग्णवाहिकांवर निळ्या आणि अंबर दिव्यांचा वापर केला जात आहे. चालकांना दिवा बदलून घेण्याचे आदेश देण्यात आले.

अंबर दिव्याबाबत आजपासून कारवाई सुरू करून पोलिस, महसूल, सेंट्रल एक्साइज कार्यालयांच्या शासकीय वाहनांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईत वाहनचालकांना सूचनेनुसार दिव्यांमध्ये बदल करण्याचे निर्देश दिले आहेत. ही कारवाई सहा दिवस चालणार आहे.
- किरण मोरे, सहायक आरटीओ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापालिका आयुक्तपदी बकोरिया

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
औरंगाबाद महापालिकेच्या आयुक्तपदी ओमप्रकाश बकोरिया यांची नियुक्ती सोमवारी करण्यात आली. त्यामुळे गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या चर्चा, तर्क वितर्कांना पूर्णविराम मिळाला आहे. अत्यंत कर्तव्यकठोर, शिस्तप्रिय आयएएस अधिकारी म्हणून बकोरिया यांची राज्यात ओळख आहे. पुणे महापालिकेत अतिरिक्त आयुक्त म्हणून बकोरिया कार्यरत होते.

औरंगाबाद महापालिकेचे आयुक्तपद १८ नोव्हेंबर रोजी रिक्त झाले होते. प्रकाश महाजन यांची बदली झाल्यानंतर सिडकोचे मुख्य प्रशासक सुनील केंद्रेकर यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार दिला गेला. कडक शिस्तीचे अधिकारी म्हणून ओळख असलेल्या केंद्रेकर यांनी दोन महिन्यांत शहर स्वच्छता मोहिमेसह अनेक प्रश्न योग्य पद्धतीने हाताळले होते. केंद्रेकरांना तीन वर्षे पालिकेत ठेवावे, असा ठरावही दोन दिवसांपूर्वी झालेल्या सर्वसाधारण सभेत संमत झाला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंधरा दिवसांपूर्वी विदर्भातील चिखलदरा पर्यटनस्थळाचा विकास करण्याची जबाबदारी केंद्रेकरांना जबाबदारी दिली जाईल, असे सूचक वक्तव्य केले होते. त्या पार्श्वभूमीवर औरंगाबादेत नवीन अधिकारी येणार अशी अटकळ बांधली जात होती. सोमवारी दुपारी बकोरियांच्या नियुक्तीची बातमी पालिकेत येऊन धडकली.

मूळ मध्य प्रदेशचे असलेले ओमप्रकाश बकोरिया २००६च्या बॅचचे आयएएस आहेत. भोपाळ येथील रिजनल इंजिनिअरिंग कॉलेजमधून त्यांनी बीई इलेक्ट्रॉनिक्स व एम.टेक केले आहे. आयएएस झाल्यानंतर दुसऱ्या वर्षी ते कोल्हापूरला अतिरिक्त जिल्हाधिकारी म्हणून रुजू झाले. शिस्तप्रिय आणि नियमाने काम करण्यासाठी आग्रही असलेल्या बकोरिया यांच्या कामाने कोल्हापूरकर खूष झाले होते. तेथून गडचिरोली येथे आदिवासी विकास प्रकल्पप्रमुख म्हणून २००८ ते २००९ त्यांनी काम केले. त्यानंतर सलग पाच वर्षे अमरावती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून बकोरिया यांची कारकीर्द गाजली होती. कुठल्याही राजकीय दबावाल न जुमानता लोकोपयोगी निर्णय घेण्याची क्षमता असलेल्या राज्यातील निवडक अधिकाऱ्यांपैकी एक म्हणून बकोरिया यांची ओळख आहे.

नंदूरबार, पुण्यात आंदोलन
अमरावतीहून बकोरिया नंदूरबार जिल्हाधिकारी म्हणून रुजू झाले. त्यांच्या कामाने आम जनता खूष होती. कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच त्यांची बदली केली गेली. त्याविरोधात सर्व व्यापाऱ्यांनी उस्फूर्तपणे बंद पाळत बदलीस विरोध केला होता. त्यानंतर पुणे मनपात अतिरिक्त आयुक्त म्हणून रुजू झाल्यानंतरही अवघ्या ११ महिन्यांत बकोरियांची बदली केली गेली. त्याविरोधात नागरिकांनी सरकारच्या विरोधात आंदोलन छेडले होते.

पाणी व कचरा व्यवस्थापनास प्राधान्य
'मटा'ने ओमप्रकाश बकोरिया यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले,'यंदा दुष्काळी परिस्थिती आहे. त्यामुळे पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. औरंगाबादेत रुजू झाल्यानंतर शहरवासीयांना पाण्याचा प्रश्न भेडसावणार नाही, यासाठी प्राधान्याने लक्ष दिले जाईल. याशिवाय घनकचरा व्यवस्थापनाचा प्रश्नही योग्य पद्धतीने सोडविला जाईल. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे औरंगाबाद ऐतिहासिक शहर आहे. शहरात कुठेही ट्रॅफिकची समस्या जाणवणार नाही, यासाठी स्वतंत्र कार्यपद्धती राबविण्यात येईल.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निर्यातदारांनी करसवलतीचा लाभ घ्यावा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
केंद्राच्या निर्यात बंधू योजनेंतर्गत निर्यातदारांना कर्जावरील व्याजदरात तीन टक्के सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याबरोबरच आसियान राष्टांमध्ये मुक्त व्यापार करारदेखील अस्तित्वात आला आहे. याचा लाभ घ्यावा, असे आवाहन चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रिज अँड अॅग्रीकल्चरतर्फे (सीएमआयए) आयोजित परिषदेत सोमवारी करण्यात आले.
सीएमआयए, फेडरेशन ऑफ इंडियन एक्स्पोर्ट ऑर्गनायझेशन यांच्यावतीने निर्यात प्रोत्साहन परिषद घेण्यात आली. फिओचे सदस्य ज्येष्ठ उद्योगपती नंदकिशोर कागलीवाल, सीएमआयए अध्यक्ष आशिष गर्दे, सहसंचालक निहार लखिया, परराष्ट्र व्यापार धोरणातील तज्ज्ञ बी. पी. बुनकर, रंजन श्रीवास्तव, एन. रामकृष्णन यांची उपस्थिती होती. ड्राय पोर्ट आणि एअर कार्गोमुळे औरंगाबादेतून निर्यात वाढ अपेक्षित आहे. त्यावर परिषेदत चर्चा झाली. अन्नप्रक्रिया उद्योगांना चालना देण्यासाठी पैठण येथे फूड पार्क उभारण्यात येत आहे. या ठिकाणी येऊ इच्छिणाऱ्या उद्योगांना भूखंडाचे वाटप सुरू झाले आहे. येत्या डिसेंबरअखेर हा प्रकल्प कार्यान्वित होईल, अशी माहिती प्रवर्तक नंदकिशोर कागलीवाल यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना दिली.
राज्यातील हा फूडपार्कचा पहिलाच प्रकल्प आहे. या प्रकल्पातून दहा हजार शेतकरी जोडले जाणार आहेत. फळ, भाजीपाला संकलन व प्रक्रिया केंद्र अशी तीन टप्प्यांत विभागणी केली जाईल. या ठिकाणी पाच केंद्रे सुरू केली जातील. प्रत्येक केंद्राला २० गावे जोडली जाणार आहेत. परिणामी या गावातील दहा हजार शेतकरी फूडपार्कशी जोडली जातील. पॅकेजिंगसारखे पूरक उद्योगही त्यात सुरू होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पैठण एमआयडीसीमध्ये ११० एकर क्षेत्रावर फूडपार्कची उभारणी करण्यात येत आहे. त्यात वस्तीर्ण असे सामायिक सुविधा केंद्र असेल आणि उर्वरित जागा उद्योगांना दिली जाईल. ही प्रक्रिया सुरू झाली असून जूनपर्यंत पायाभूत सुविधांची कामे पूर्ण होतील, असे प्रवर्तक नंदकिशोर कागलीवाल यांनी नमूद केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डाळींच्या भावात घसरण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
गेल्या दोन आठवड्यांपासून महागाईचे मीटर डाउन झाले आहे. यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळाल असून किराणा मालाचे भाव स्थिर असून डाळींचे दर उतरले आहेत. तेल-तुपाच्या बाबतीतही फारमोठी दरवाढ झालेली नाही. यामुळे उलाढाल वाढली आहे. फळभाज्याचे दर प्रतिकिलो १० ते २० रुपयांनी कमी झाले आहेत.
महागाईचा दर कमी झाल्याने किराणा, अन्नधान्य, डाळी, भाज्यांचे दर उतल्याचे किराणा व्यापारी संजय कांकरीया यांनी सांगितले. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार किराणा मालाचा उठाव वाढला आहे. काही जिन्नसांचे दर तर दोन-तीन आठवड्यांपासून स्थिर आहेत. आता पुढील आठवड्यांपर्यंत हे दर कायम राहतील, या सर्व जिन्नसांचे दर महिनाअखेर सादर होत असलेल्या अर्थसंकल्पानंतर बदलतील किंवा वाढतील, असा अंदाज सुरेश मते या किरकोळ भुसार व किराणा व्यापाऱ्यांने सांगितले. भाज्यांचे दर किमान १० ते २० रुपयांनी उतरले असून पालकभाज्या तर किरकोळ स्वरुपांत विकतांना ५ रुपये जुडी याप्रमाणे विकल्या जात आहेत, असे भाजीविक्रेते जनार्दन जाधव यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images