Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

बीड शहरासाठी २ बायपासचा प्रस्ताव

$
0
0
बीड शहरातील रहदारीचा प्रश्न सोडवण्यासाठी औरंगाबाद-सोलापूर महामार्गाच्या औरंगाबाद ते येडशी या टप्प्यातील रस्त्याचे चौपदरीकरण पर्यावरण विभागाच्या मंजूरीनंतर सुरू होईल.

५ वर्षांच्या मुलीवर उमरग्यामध्ये बलात्कार

$
0
0
चॉकलेटच्या आमिषाने घरामध्ये नेऊन पाच वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याची घटना उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरग्यामध्ये घडली. या प्रकरणातील तरुणाला अटक करण्यात आली आहे.

फार्मसीच्या विद्यार्थ्यांची कॅरिऑनची मागणी

$
0
0
‘इंजिनीअरिंग’च्या पाठोपाठ ‘फार्मसी’ अभ्यासक्रमही कॅरिऑनच्या वाटेवर असल्याचे चित्र आहे. आम्हाला ही कॅरिऑन हवाच अशी मागणी फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी केली आहे.

कॅरीबॅगविरोधात लातुरात जागृती

$
0
0
लातूर शहर प्लॅस्टिकमुक्त करण्यासाठी ३५ प्रभागांमधून निघालेल्या जनजागरण फेऱ्यांना चांगला प्रतिसाद मिळाला. महापालिकेसह स्वयंसेवी संस्था आणि शहरातील ७५ शाळा-कॉलेजच्या १३ हजार विद्यार्थ्यांनी प्लॅस्टिक मुक्तीचा संकल्प केला.

शेतक-यांचा सिल्लोडला मोर्चा

$
0
0
सिल्लोड तालुक्यातील शेतकऱ्यांची वीज तोडणी बंद करून तोडलेली वीज पुरवठा सुरू करावा, या मागणीसाठी खासदार रावसाहेब दानवे यांच्या नेतृत्वाखाला भारतीय जनता पक्षाने विद्युत वितरण कंपनीच्या सहाय्यक अभियंता कार्यालयावर शनिवारी शेतकऱ्यांचा मोर्चा काढला.

कलेच्या प्रांतात भाषेच्या मर्यादा नसाव्यात

$
0
0
कलावंतांनी प्रांतवादात अडकू नये. कलेच्या प्रांतात भाषेच्या मर्यादा नसाव्यात. अन्यथा कलाकृती चौकटीत अडकून पडते, असे प्रतिपादन शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला या नाटकाचे लेखक राजकुमार तांगडे यांनी केले.

विभागीय आयुक्त कार्यालयात ‘आयएसओ’साठी गडबड

$
0
0
फायलींचे टेबलीवरचे गठ्ठे आता दिसणार नाहीत. फक्त कामाचीच फाइल कर्मचाऱ्यांच्या टेबलावर असेल. एखाद्या कोपऱ्यात अडगळीचे सामान पडलेले नसेल.

मनसे शाखाध्यक्ष निवडीसाठी गर्दी

$
0
0
शहरातील ९९ वॉर्डात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शाखा अध्यक्षांची निवड करण्यासाठी रविवारी सुभेदारी विश्रामगृहात मुलाखती घेण्यात आल्या.

कॅन्सर केंद्रात उद्यापासून २ वेळा ओपीडी सेवा

$
0
0
कॅन्सर उपचारासाठी बाहेरच्या जिल्ह्यातून येणाऱ्या रुग्णांची संख्या वाढल्याने मराठवाडा विभागीय कॅन्सर विशेषोपचार केंद्रात दोन वेळा ओपीडी सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

रेल्वेसाठी परभणीचीही उडी

$
0
0
रेल्वे बजेटमध्ये घोषित करण्यात आलेली मुंबई-लातूर ही रेल्वे नांदेडपर्यंत वाढविण्याच्या मागणीसाठी परभणी रेल्वे स्थानकावर परभणीकरांनी रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक पी. सी. शर्मा यांना घेराव टाकला.

पोलिस सज्ज

$
0
0
गणेशोत्सव शांततेत पार पडावा, यासाठी पोलिस दल सज्ज झाले आहे. अडीच हजार अधिकारी, कर्मचारी, रोडरोमियो पथक, स्पेशल पोलिस ऑफिसर, ४० फिक्स पॉइंट आदींचा बंदोबस्तामध्ये समावेश आहे.

तीन जिल्ह्यांत १५० टँकर

$
0
0
पावसाने पाठ फिरविल्यानंतर मराठवाड्यातील औरंगाबाद, बीड आणि उस्मानाबाद जिल्ह्यांत टँकरद्वारे पाणी पुरवठ्याची वेळ आली आहे. या तिन्ही जिल्ह्यांत मिळून तब्बल १५८ टँकर सुरू करण्यात आले आहेत.

धर्मदाय हॉस्पिटल अडचणीत

$
0
0
गरीब रुग्णांना चांगल्या आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी सरकारकडून धर्मदाय हॉस्पिटल्सना अनुदान पुरविले जाते. जिल्ह्यातील १९ हॉस्पिटल्सची झाडाझडती गेल्या तीन दिवसांत झाली.

गणेशाच्या स्वागतासाठी भाविक सज्ज

$
0
0
श्री गणेशाच्या स्वागतासाठी शहरवासीय सज्ज झाले असून आज घरगुती आणि सार्वजनिक मंडळात गणेशाची वाजतगाजत स्थापना होणार आहे. गणेश चतुर्थीच्या दिवशी खरेदीसाठी गर्दी असते.

नांदेड-कुर्ला रेल्वे आठवडाभरात

$
0
0
मुंबई लातूर रेल्वे नांदेडपर्यंत वाढविण्यासाठी होणाऱ्या विरोधामुळे, बजेटमध्ये जाहीर करण्यात आलेल्या रेल्वेचा विस्तार होत नाही. यामुळे नांदेड कुर्ला रेल्वे आठवडाभरात सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

गणपती आले तरी खड्डे कायम

$
0
0
गणेशोत्सवापूर्वी प्रमुख रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याची पालिकेची घोषणा पोकळ असल्याचे स्पष्ट झाले आहे. गणपती आले तरी, खड्डे कायम आहेत. पॅचवर्कचे काम अत्यंत धिम्या गतीने सुरू असल्यामुळे गणेशभक्तांमध्ये नाराजी आहे.

२५ हजार घरांमध्ये इको फ्रेंडली बाप्पा

$
0
0
गणेशोत्सवात होणारे प्रदूषण कमी करण्याच्या प्रयत्नाला शहरातील नागरिकांकडून यंदा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा दुप्पट घरांमध्ये इको फ्रेंडली गणपतींची प्रतिष्ठापना करण्यात आली.

गणेशोत्सवाचे पावित्र्य राखा

$
0
0
शहरात लाडक्या गणरायाचे घरोघरी उत्साहात आगमन झाले आहे. सार्वजनिक गणेश मंडळांनी पुढील दहा दिवस भरगच्च कार्यक्रम आयोजित केले आहेत. यात सवंग कार्यक्रम टाळून गणेशोत्सवाचे पावित्र्य राखण्याचे आवाहन मान्यवर कलाकारांनी केले. ‘लुंगी डान्स’, ‘मुन्नी बदनाम’सारखी गाणी वाजवून उत्सवाला गालबोट लावू नका असे त्यांनी म्हटले आहे.

कमी वीज वापर निसर्गाचे रक्षण

$
0
0
गणपती उत्सवात विजेचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढतो. गणेश मंडळांची सजावट, मंडळांसमोर प्रखर प्रकाशाचे दिवे, घरांमध्ये दिव्यांच्या माळांची आरास, गाणी- आरती- देखावे यासाठी ध्वनिक्षेपकाचा वापर या सगळयांसाठी विजेची गरज भासते.

पर्यावरणासाठी हवा लोकसहभाग

$
0
0
औरंगाबादेतील पर्यावरणाच्या रक्षणासाठी महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने तयार केलेल्या ‘व्हिजन डॉक्युमेंट’मध्ये पर्यावरणीय धोरण आणि वित्तीय प्रारूप तयार करण्यात यावे, असे नमूद करण्यात आले आहे.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images