Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

महाआरोग्य शिबिराचे वर्ल्ड रेकॉर्ड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, बीड
गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान व सार्वजनिक आरोग्य विभागाच्यावतीने बीड जिल्ह्यात सध्या महाआरोग्य शिबिर सुरू आहे. बीडमध्ये सुरू असलेल्या महाआरोग्य शिबिरात मोठ्या प्रमाणात पेशंटची तपासणी झाली आहे. त्यामुळे याची दखल नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने घेतली आहे. या महाआरोग्य शिबिराची माहिती घेण्यासाठी वर्ल्ड रेकॉर्डची टीम लवकरच बीडमध्ये दाखल होणार आहे.
बीड जिल्ह्यात दुष्काळी चक्र गेल्या चार वर्षांपासून जिल्ह्यातील जनतेची पाठ सोडायला तयार नाही. त्यामुळे अनेकांना पैशाअभावी लहान-मोठ्या आरोग्य तपासण्या आणि आजारावर उपचार करणे शक्य होत नाही. यातून मार्ग काढण्यासाठी पालकमंत्री पंकजा पालवे यांनी गोपीनाथराव मुंडे महाआरोग्य शिबिराचे आयोजन केले. पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या संकल्पनेतून आणि खासदार प्रितम मुंडे यांच्या पुढाकाराने गेल्या १७ फेब्रुवारी पासून हे शिबिर संपूर्ण जिल्ह्यात सुरू आहे. या ऐतिहासिक शिबिराला सर्वत्र उदंड प्रतिसाद मिळत आहे. जिल्ह्यातील अनेक गरजू रूग्ण मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन शिबिराचा लाभ घेत आहेत.
गेल्या चार दिवसांत तब्बल ८० हजार पेशंटची या शिबिरात वेगवेगळ्या तपासणी करण्यात आली. सुमारे १२ हजार पेशंटची शस्त्रक्रिया व पुढील उपचारासाठी नोंदणी झाली आहे. या पेशंटची तपासणी मंगळवारपर्यंत चालणार असल्याने त्यांच्या संख्येत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
एवढ्या भव्य आणि नियोजनबद्ध स्वरूपात असे शिबिर जिल्हास्तरावर पहिल्यांदाच होत असल्याने या शिबिराची दखल गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड या जागतिक विक्रमाची नोंद करणाऱ्या संस्थेने घेतली आहे. अशा प्रकारचे शिबीर यापूर्वी कुठे झाले तसेच त्याची व्याप्ती आणि इतर माहिती घेण्यासाठी ग्रीनिज वर्ल्ड रेकॉर्डची टीम लवकरच बीडमध्ये येणार आहे. दरम्यान, महाआरोग्य शिबीराची जागतिक पातळीवर नोंद होण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दुष्काळामुळे यंदा लग्न न करण्याचा मुलींचा संकल्प

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, बीड
गेल्या काही दिवसांपासून बीड जिल्ह्याचा दुष्काळ पाठ सोडायला तयार नाही. या दुष्काळी स्थितीमुळे शेतीत सततची नापिकी आणि या नापिकीतून कर्ज बाजारीपणा येथील शेतकऱ्यांच्या पाचवीला पुजाला आहे. दुष्काळामुळे आर्थिक संकट ओढावल्याने आई-वडीलांना यावर्षी तर लग्नाचे संकट नको या भावनेतून गेवराई तालुक्यातील वारूळ तांड्यावरील बंजारा समाजाच्या २५ मुलींनी यावर्षी लग्न न करण्याचा निर्धार केला आहे .
बीड जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीचा फटका मोठ्याप्रमाणात अर्थकारणाला बसला आहे. त्यातच घरातील वृद्ध सदस्यांचे आजारपण, पोराबाळांची शिक्षण आणि वयात आलेल्या मुलीची लग्न कशी करायची हा मोठा प्रश्न दुष्काळान मांडून ठेवला आहे. ज्या वयात लग्नाची गाठ जोडायची त्या वयात आई वडिलांकडे लग्नाला लागणाऱ्या खर्चाही तरतूद नाही. त्यामुळे या मुली जुन्या कपड्यांवर ठिगळ जोडून मिठा मिरच्याची सोय लावत आहेत.
बीड जिल्ह्यात एकीकडे गतवर्षी जिल्ह्यात तीनशेहून अधिक शेतकऱ्यांनी या नापिकी कर्जबाजारीपणामुळे निराश होऊन जीवनयात्रा संपविली. आपल्या वडिलांनी लग्नाची चिंता मनात ठेवून टोकाचा निर्णय घेऊ नये याच भावनेतून गेवराई तालुक्यातील वारूळ तांड्यावरच्या बंजारा समाजाच्या मुलीचा निर्धार केला आहे. गावातील एका मुलीचे लग्न पैशाअभावी होऊ शकले नाही त्यामुळे गावातील लग्नाच्या वयात आलेल्या सर्वच मुलीनी यंदा लग्न न करता तो पुढच्या वर्षी करण्याचा निर्णय घेतला आहे.

घरांनी फक्त वयोवृद्ध माणसे व मुलीच
तीन हजार लोकसंख्या असलेल्या या गावातील निम्म्याहून अधिक घरांना कुलूप आहे. काही लोक ऊसतोडणीला गेली आहेत, तर बरेच जण कामा धंद्याच्या शोधात शहराकडे स्थलांतरीत झाली आहेत. या घरांनी आता फक्त मुली आणि म्हातारी माणसे आहेत. आधीच खायचे आबाळ आणि त्यातच पुन्हा लग्नाला येणारा अवाढव्य खर्च करायचा कुठून या प्रश्नांने त्या व्यतीत झाल्या आहेत. या मुलींनी आई-वडीलांच्या डोक्यावरचे ओझं काही काळासाठी तरी बाजूला सारण्याचा निर्णय घेतला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणीटंचाईचा बीडमध्ये बळी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, बीड
बीड जिल्ह्यात दुष्काळामुळे ग्रामीण भागात पाण्यासाठी कोसो पायपीट करण्याची वेळ ग्रामीण जनतेवर आली आहे. या पाणी टंचाईमुळे शुक्रवारी एका बालिकेचा बळी घेतला आहे. पाणी आणावयास विहिरीवर गेलेल्या आठ वर्षीय मुलीचा विहिरीत पडून मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी बागपिंपळगाव (ता. गेवराई) येथे घडली. गंभीर जखमी झालेल्या मुलीचा शुक्रवारी उपचार सुरु असताना मृत्यू झाला.
राजश्री नामदेव कांबळे ( वय ८) असे मरण पावलेल्या मुलीचे नाव आहे. बागपिंपळगाव येथिल दलित वस्तीत मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई जाणवत होती.
याची माहिती प्रशासनास देण्यात आली होती. मात्र, टँकर सुरू करण्यात आले
नाही. त्यामुळे गावाशेजारी असलेल्या नऊ परस खोल असलेल्या विहिरीत पाणी
भरण्यासाठी चौथी इयत्तेत शिकणारी राजश्री कांबळे ही मुलगी मंगळवारी गेली होती. पाणी आणताना विहिरीत पाय घसरून ती पडली व या घटनेत ती गंभीर जखमी झाल्याने तिला बीडच्या जिल्हा रुग्णालयात उपचारसाठी दाखल
करण्यात आले. मात्र, तिला बीडहून औरंगाबाद येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना शुक्रवारी तिचा मृत्यू झाला. तिच्या प्रेतासह नातेवाईकांनी आणि संतप्त ग्रामस्थानी पंचायत समितीत
ग्रामसेवक आणि विरोधात खुनाच्या गुन्हा नोंदवण्याची मागणी केली. या मागणीसाठी ठिय्या आंदोलन केले. तिचे प्रेत बिडिओच्या दालनात ठेवून कारवाईची मागणी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बीडमध्ये दोन टक्के पाणी शिल्ल्क

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, बीड
बीड जिल्ह्यात यावर्षी पावसाळयात समाधानकारक पाऊस झालेला नाही. जिल्ह्यात १७ लाखांच्या जवळपास लोकसंख्येला पिण्याच्या पाण्याच्या
टंचाईला तोंड द्यावे लागते आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनासमोर नागरिकांना येत्या काळात पाणी पुरवण्याचे आव्हान असणार आहे. आगामी काळात जिल्ह्यात पाणीटंचाई अधिक गंभीर होऊ शकते. जिल्ह्यात आज घडीला केवळ दोन टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.
बीड जिल्ह्यात सरासरी ४९ टक्के पाऊस झाला आहे. जिल्ह्यावर दुष्काळी संकट गडद झाले असून यामुळे मोठ्या प्रमाणात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण
झाला आहे. या कमी पावसामुळे बिंदुसरा, मांजरा यासारखे अनेक सिंचन
तलाव कोरडे पडले आहेत. जिल्ह्यात एकूण मोठे दोन, मध्यम १६ आणि लघु १२४ असे एकूण १४१ सिंचन प्रकल्प आहेत. त्या सर्व सिंचन प्रकल्पाची पाणीसाठा क्षमता ८८३.१३ दशलक्ष घनमीटर आहे. पावसाळ्यात समाधानकारक पाऊस न पडल्याने जिल्ह्यातील ६८ सिंचन प्रकल्प कोरडे पडले आहेत. ५६ प्रकल्प जोत्याच्या खाली गेले आहेत. जिल्ह्यातील तलावात केवळ दोन टक्के म्हणजेच १८.३८ दशलक्ष घनमीटर पाणी शिल्लक आहे. त्यामुळे बीड शहराला आठ दिवसातून, अंबाजोगाई शहरात पंधरा दिवसाहून अधिक दिवसांतून पाणीपुरवठा केला जात आहे. ग्रामीण भागात तर पाणी पातळी खालवल्याने पाणी आणायचे कोठून हा प्रश्न प्रशासनास सतावतो आहे. बीड जिल्ह्यात १६ लाख ९२ हजार नागरिकांना पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत असल्याचे पाणी टंचाई जाणवते आहे, असे जिल्हाधिकारी कार्यालयातील टंचाई कक्षाच्या आकडेवारी वरून दिसून येत आहे.

सहाशे गावांना पुरवावे लागणार पाणी
जिल्ह्यातील ३६५ गावे आणि ३०१ वाड्या अशा सहाशेहून अधिक गावावाड्या वस्त्यात पाणी पुढचे चार महिने पुरवावे लागणार आहे. सध्यस्थितीत आणि वस्त्यांना तब्बल ४७० टँकरच्या १०९६ खेपा करून या तहानलेल्या गावांना पाणी पुरवावे लागत आहे. तर आगामी काळात पाणीटंचाई आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. मार्च-एप्रिल २०१६ मध्ये टंचाई तीव्र होऊन टँकरची संख्या वाढण्याची चिन्हे आहेत.

येत्या काळात तब्बल आठशे टँकर व त्याच्या प्रत्येकी तीन फेऱ्या अशा एकूण २४०० दररोज फेऱ्या करून टंचाई निवारण करावे लागणार आहे. हे टँकर भरण्यासाठी स्त्रोत कुठले आहेत. याचाही नियोजन करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील उपलब्ध पाणी जपून वापरणे गरजेचे आहे.
चंद्रकांत सूर्यवंशी, निवासी उपजिल्हाधिकारी, बीड

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यापीठ पदवी परीक्षा आजपासून

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मार्च-एप्रिल २०१६ पदवी अभ्यासक्रमांच्या परीक्षा बुधवारपासून (९ मार्च) सुरू होत आहेत. ४५ अभ्यासक्रमांचे वेळापत्रक परीक्षा विभागाने जाहीर केले आहे. चार जिल्ह्यांतून २ लाख ९३ हजार ३५ विद्यार्थी पदवी परीक्षा देणार आहेत. १९४ परीक्षा केंद्रावरून ही परीक्षा घेतली जाणार आहे.

यंदा दुष्काळात पाणी टंचाई विचारात घेऊन विद्यापीठाच्या पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या परीक्षा लवकर घेण्याचा निर्णय घेतला. पदवी अभ्यासक्रमांची परीक्षा ९ मार्चपासून सुरू होत आहे. त्यात बीए, बीकॉम, बीएस्सी, बीव्होक, बीसीए, बीबीए अशा विविध २५ अभ्यासक्रमांचा समावेश आहे. यंदा वेळापत्रकही आटोपते घेण्यात आल्याने परीक्षा महिनाभरात पूर्ण होणार आहेत. पदव्युत्तर अभ्यासक्रमांची परीक्षा १५ मार्चपासून सुरू होत आहे. त्यात एमए, एमएसडब्ल्यू, बीलिब, एमलिब, एमए (एमसीजे), बीजे, एमकॉम, डीबीएम, एलएलएम, एलएलबी, एमसीए, एमबीए अशा अभ्यासक्रमांचा समावेश आहे.

पदवी अभ्यासक्रमाचे परीक्षार्थी
अभ्यासक्रम........................विद्यार्थी संख्या
बीए (प्रथम ते अंतिमसत्र)..........११८१८५
बीकॉम (प्रथम ते अंतिमसत्र)......४९०१६
बीएस्सी (प्रथम ते अंतिमसत्र).....९६७७३
बीएस्सी (कम्प्युटर सायन्स).......११८५३
बीएस्सी (बायो-टेक्नॉलॉजी).......१५१५
बीसीए.................................९७४९
बीबीए.................................२७६६

बीए अभ्यासक्रम आघाडीवर
पदवीमध्ये विद्यार्थ्यांच्या संख्येत बीए अभ्यासक्रम आघाडीवर आहे. बीए अभ्यासक्रमाची यंदा १ लाख १८ हजार १८५ विद्यार्थी परीक्षा देत आहेत. यापाठोपाठ ९६ हजार ७७३ परीक्षार्थी बीएससीचे आहेत. बीकॉम अभ्यासक्रमाची संख्याही वाढली असून, ४९ हजारांच्या घरात गेली आहे.

विद्यार्थ्यांमध्ये नाराजी
वेळापत्रात यंदा आटोपशीरपणा घेतल्याचे परीक्षा विभागाचे अधिकारी दावा करत असले तरी, विद्यार्थ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. अभ्यासक्रम पूर्ण झाला नसल्याचेही अनेक अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांचा आरोप आहे. एमबीए अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी यामुळे परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उद्योजक व्हा... : स्टेशनरी दुकान ते उद्योजक

$
0
0

Dhananjay.Kulkarni@timesgroup.com
कॉलेजला असतानाच अगदी ठरवून नोकरी न करता छोटा व्यवसाय करावा आणि नंतर उद्योजक व्हावे, असे स्वप्न बाळगणारे मंगेश पळसकर आज वाळूजमधील दोन युनिटचे संचालक अाहेत. त्यांच्या उद्योगांची उलाढाल ८ कोटींहून अधिक आहे. एम.एस्सी. कम्प्युटर अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर त्यांनी बिझनेसमन, उद्योजक असा त्यांचा आलेख उंचावत जाणारा आहे...

पळसकर कुुटुंबीय मध्यवर्गीय. आई विजया गृहिणी तर वडिल राम पळसकर स्टेट बँकेत नोकरीत. दहावीपर्यंत मंगेश यांनी सरस्वती भुवन येथे शिक्षण घेतले. बारावी ते एम.एस्सी. कॉम्प्युटर करत असतानाच १९९८ला ठरवून स्वत:चे स्टेशनरी दुकान टाकले होते. जयविश्वभारती कॉलनीत शाळा-कॉलेजसमोर राहत्या घराच्या अंगणातच हे दुकान होते. तब्बल ८ वर्षे दुकान आणि घर असे दोन्ही सांभाळून शिक्षणही पूर्ण केले. मोठा भाऊ गिरीश बायर कंपनीत आंध्र प्रदेशात तर बहिण शैलजाचे स्वत:चे बुटिक. दुकानातून रोज किमान एक हजार रुपये तरी येत होते. दुकान चांगले सुरू होते, पण मित्र शैलेश सोमाणी यांनी मंगेश यांच्यासमोर आणखी बिझनेस वाढविण्याची ऑफर ठेवली. सोमाणी स्वत: बीई झाल्याने त्यांनी जागेत टू-व्हीलर आणि फोर व्हीलरला लागत असलेल्या विविध कंम्पोनंटविषयी माहिती दिली. यात रस निर्माण झाला. यातून दीड लाखाच्या भांडवलासह वाळूजला युनिट टाकले. सुरुवातीला काहीच अनुभव नसल्याने सहा महिने कठिण गेले. नंतर कंम्पोनंटचा अभ्यास करत युनिट वाढवायला सुरुवात केली. बहिणीचे पती अभय देशमुख यांनी बजाज ऑटोमधून स्वेच्छानिवृत्ती घेतली होती. त्यांना पार्टनर करून घेत दोघांनी उद्योग सुरू केला. सोमाणी, देशमुख आणि पळसकर यांचे पहिले युनिट २००३मध्ये रेणुका एंटरप्रइजेस नावाने सुरू झाले. सीएनसी मशीन, लेथ ‌मशीनवर टू व्हीलर, फोर व्हीलरचे कंम्पोनंटचे प्रोडक्शन सुरू केले. वाळूजला ऑपरेटर मिळत नसे. त्यामुळे ते स्वत: मशीन ऑपरेटिंग शिकले, मशीनच्या मर्यादा, कामगारांच्या अडीअडचणी यातून मग विविध कल्पना सुचत गेल्या. अडीअडचणींचे भांडवल पुन्हा फॅक्टरीतच गुंतवले. काळ, काम आणि वेग यांचे गणित सांभाळत अभय देशमुखांसह मंगेश पळसर आपल्या प्रगतीचा आलेख उंचावत होतेच.

सुरुवातीपासून काही तरी वेगळं करण्याची ऊर्मी बाळगलेल्या मंगेश यांनी नंतर २००५मध्ये वरद इंजिनीअरिंग हे युनिट सुरू केले. १९९८ ते २००५पर्यंतचा दुकानदार ते उद्योजक हा प्रवास कुठेतरी स्थिर होत होता. दीड लाखाच्या गुंतवणुकीत पहिल्या दोन वर्षांत काहीच हाती न लागल्याने नैराश्य जवळ येत होते, परंतु कामात गुंतवून ठेवणे, सप्लायर्स आणि व्हेंडर्सच्या डिमांड पूर्ण करत राहणे यात मन गुंतवले. यातच वरद इंजिनीअरिंगचा कारभार वाढत गेला. इंजिनीअरिंग केले नसताना मॅन्युफॅक्चरिंग युनिट सुरू करून मंगेश यांनी आधीच वाहवा मिळवली होती. सुरुवातीला फक्त दोन ऑपरेटर्सला नोकरी देणारे वरद युनिट आज ६०-७० जणांना प्रत्यक्ष आणि १० ते १५ जणांना अप्रत्यक्ष रोजगार देऊ लागले. वाढता व्याप पाहून युनिटमध्ये युनियन लागली. त्यावेळी युनियन लागू होऊ नये यासाठी कामगारांशी झालेली चकमक, तोडफोड आणि त्यातून आलेले नैराश्य याचा प्रोडक्शनवर काहीही विपरीत परिणाम होऊ दिला नाही. आई-वडिलांच्या सकारात्मक राहण्याची शिकवण दिली होती. मंगेश संकटांना सामोरे जात गेले. आज ऑटो कंम्पोनंटमध्ये बुश, फ्लॅश, सीएनसी मशीन, लेथ मशिन आणि आता क्विन्स क्विडल अर्थात संपूर्ण अत्याधुनिक सेवा व दोन मशीनचे काम करू शकणारे एक मशी युनिट मंगेश आणि त्यांचे पार्टनर अभय देशमुख यांनी उभे केले आहे. रेणुका आणि वरद या दोन युनिटच्या उभारणीसाठी लागत असलेल्या सर्व परवानग्या कुठल्याही एजंटाशिवाय मिळवताना आलेला अनुभव आणि त्यासाठी केला गेलेला संघर्ष कायम अनुभवात भर टाकणारा ठरला. याच जोरावर आज संजीव ऑटो, ऋचा इंजिनीअरिंग, व्हेरॉक यासारख्या मोठ्या उद्योजकांना मंगेश आपला माल पुरवत आहेत. वर्षाला साडेआठ ते नऊ कोटींची उलाढाल करणारे मंगेश आज ओम सर्व्हिसेस, श्लोक रिअॅल्टी, वरद इंजिनीअरिंग, रेणुका एंटरप्रायझेस यांचे संचालक झाले आहेतच. शिवाय आता पश्चिम महाराष्ट्रातील लोणंद एमआयडीसी येथे टेक्नोफोर इंजिनीअर्स नावाने नवे व पाचवे युनिटही सुरू केले आहे. पुण्यातील अजय जोशी यांच्या पार्टनरशिपमध्ये हे पाचवे युनिट सुरू करून ऑटोमोबाइल इंजिनीअरिंगमध्ये आणखी वेगळे पाऊल टाकले आहे. संपूर्ण कम्प्युटराइज्ड युनिट आणि ऑटोमोबाइल कंम्पोनंट युनिट हे या नव्या युनिटचे वैशिष्ट्ये आहे. उद्योग थाटताना बँकेकडून लागणारे अर्थसहाय्य, पर्यावरण महामंडळाच्या परवानग्या, सब‌‌सिडी, योजनांच्या निर्मिती, गव्हर्नमेंट लायझनिंग वर्क, उद्योग उभारणीसाठी लागणारे कर्जे आदी कामे स्वतः केली. अशीच कामे इतरांनाही करावे लागतील म्हणून त्यांनी 'ओम सर्व्हिसेस'ची सुरुवात केली. २०१५-२०१६मध्ये श्लोक रिअल इस्टेट फर्म स्थापन करून रिअल इस्टेटमध्येही प्रवेश केला आहे.

स्वबळावर त्यांनी भागीदारीमध्ये वाळूजमध्ये छोटेखानी युनिट सुरू करण्यापासून त्यांनी लाखोंची गुंतवणूक करत आज पाच फर्म सुरू केल्या आहेत. शैलेश सोमाणीसारखा मित्र उद्योग उभारणीसाठी गॉडफादर ठरला आणि छोटा व्यावसायिक असताना त्याने मला उद्योजक होण्याची संधी दिली, असे मंगेश म्हणतात.

संबंधित क्षेत्राच्या प्रत्येक गोष्टीचे ज्ञान मिळवा, किमान २-३ वर्षे नोकरी करून समृद्ध अनुभव मिळवा आणि त्यानंतरच उद्योजक होण्यासाठी झोकून द्या, असे मंगेश आवर्जून सांगतात. जगात असे कोणतेच काम नाही जे आपल्याला जमणार नाही ते साध्य करण्यासाठी १०० टक्के झोकून द्या, मग यश आपोआप मिळत जातेच, अशी मंगेश यांची फिलॉसॉफी आहे. नकारात्मक भूमिका सोडावी. आपले ध्येय निश्चित करावे. ते गाठण्यासाठी प्रयत्न करावेत. जिद्द, मेहनत व चिकाटीच्या जोरावरच उद्योजकतेत यशस्वी होता येते. नोकरीत काहीही चालत नाही. सतत काहीतरी नवे करण्याचा ध्यास घ्यावा लागतो. मेहनतीची तयारी ठेवावी लागते. हेच आपल्या यशाचे गमक आहे, असे मंगेश सांगातात.

आधुनिक मशीनरी, टेक्नॉलॉजीचा वापर, कुशल मनुष्यबळ विकसित करणे यांवर ते भर देतात. यापुढे त्यांचा मशीनरी उत्पादन आणि ऑटोमोबाइलच्या ऑटो कंम्पोनंट उद्योगांसह रिअल इस्टेटमध्ये जाण्याचा त्यांचा विचार आहे, आई-वडिलांचे आशीर्वाद, संस्कार आणि पत्नी रेणुकाची मिळालेली साथ खूप मोलाची ठरली, असेही ते आवर्जून नोंदवतात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बलात्कारप्रकरणी सात जणांना कोठडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नांदेड
युवतीचे राजस्थानमधील एका युवकाशी लग्न करून दिल्यानंतर तिला राजस्थानला नेण्यापूर्वी तिच्यावर नांदेडमध्ये बलात्कार करणाऱ्या युवकासह सात जणांना नांदेड येथील जिल्हा न्यायाधीश जी. ओ. अग्रवाल यांनी १४ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.
सोमवारी (७ मार्च) रोजी पहाटे चारच्या सुमारास शेख गफूर शेख हाफीज (वय २४ रा. आंबेडकरनगर, नांदेड) याने अत्याचार केल्याची माहिती पिडीत युवतीने वसमतनगर रेल्वेस्थानकावर पोलिसांना दिली. त्या पिडीत युवतीची सर्व माहिती जाणून घेतल्यानंतर वसमत पोलिसांनी हे प्रकरण नांदेडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडले असल्याने त्यांच्याकडे पाठवून दिले. त्यानंतर काल दिवसभर त्या पिडीत युवतीची माहिती जाणून घेतल्यानंतर मंगळवारी रात्री पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला.
नाजिया उर्फ नादीराबी शेख सिद्दीकी (वय २५ रा. बिकानेर ह.मु.विष्णूनगर), लालचंद दिरदुराम जाजरीया ( वय ३६, रा. जुनजूनु), रामनिवास नवरंगराम तोतासरा (वय २३ रा. सिकर), जावेद बाबु सिका (वय ३३, रा. आंबेडकरनगर नांदेड), शेख गफूर शेख हाफीज (वय २४ रा.आंबेडकरनगर नांदेड), गणपत धोंडीबा हैबतकर (वय ५० रा. गोरठा), सुनंदा शिवाजी वाघमारे (वय ४७ रा. उमरी) अशा पाच जणांना अटक करण्यात आली.
या प्रकरणी तपास सहायक पोलिस अधीक्षक रोहित मताने यांच्याकडे होता. बुधवारी दुपारी रोहित मताने, आणि सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप भारती यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक बाबासाहेब खारडे, चंद्रकांत पवार, पोलीस कर्मचारी एकनाथ गंगातिरे, मोहन हाके, राठोड, महिला पोलीस बनसोडे आणि गंदेवार यांनी आरोपींना अटक केली.
त्यांना न्यायाधीश अग्रवाल यांच्या समक्ष हजर केले. न्यायाधीश अग्रवाल यांच्यासमोर सहायक पोलीस अधीक्षक मोहित मताने आणि सहायक सरकारी वकील अॅड. लाठकर यांनी पोलिस कोठडी देण्यासाठी विनंती केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डोंगरगावमधून टँकरने पाणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, लातूर
शिरूर अनंतपाळ तालुक्यातील डोंगरगाव बॅरेजमधून लातूर शहरासाठी टँकरने पाणी भरण्यास बुधवारपासून सुरू करण्यात आले. यावेळी लातूरचे जिल्हाधिकारी पांडुरंग पोले, जिल्हा पोलिस प्रमुख डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण उपस्थितीत होते. यावेळी कोणाचा विरोध झाला नाही. यावेळी दक्षता म्हणून मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
डोंगरगाव बॅरेजमधील पाणी लातूर शहरासाठी मुख्यमंत्र्यांनी घोषीत केले होते. बॅरेजेसच्या निर्मितीच्या वेळी सुद्धा अत्यंत अडचणीच्या काळात लातूर शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी बॅरेजेस बांधले जात असल्याचे म्हटले आहे. तरी सुध्दा या परिसरातील अकरा गावांना त्यामध्ये पाणी आरक्षीत करण्यात आले आहे. त्यांचे आरक्षण कायम ठेऊन लातूर शहराला पाणी पुरवठा करण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. त्या निर्णयाला काही नेत्यांनी विरोध दर्शविला होता. त्यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी यांची भेट घेतली होती. त्यावेळी लातूरच्या पाण्याला विरोध करता येणार नसल्याचे जिल्हाधिकारी यांनी निदर्शनास आणून दिले होते. त्यानंतर बुधवारी स्वत: जिल्हधिकारीच फौजफाट्यासह बॅरेजवर पोहचले आणि टँकर भरून लातूरकडे पाठवणे सुरू केले आहे.
या बाबत महापालिकेचे उपायुक्त संभाजी वाघमारे म्हणाले, 'दुपारपर्यंत दहा ते बारा टँकर भरुन लातूरकडे रवाना केले आहेत. २२ ते २८ लीटर क्षमतेचे टँकर आहेत. त्यामुळे मुख्य टाकीत हे पाणी साठवले जाईल. पुरेसा साठा झाल्यानंतर त्याचे वितरण करण्यात येणार आहे.
बॅरेजवर निलंग्याचे उपविभागीय अधिकारी भवानजी आगे, शिरुर अनंतपाळच्या तहसीलदार, पोलिस अधिकारी उपस्थित होते. पाणी पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी प्रशासनाने कंबर कसली असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

रेणापूरात रस्ता रोको
भंडारवाडी धरणातून लातूरला पाणीपुरवठा करू नये या मागणीसाठी रेणापूरातील राजकीय सामाजिक संघटनाच्या २२ कार्यकर्त्यांनी पिंपळफाट्यावर रस्ता रोको आंदोलन करून तहसीलदारांना निवेदन सादर केले. भंडारवाडी धरणावर अवलंबून असलेल्या खेड्यांना भविष्यात पाणी टंचाई निर्माण होऊ नये याची व्यवस्था करुनच पाणी लातूरसाठी द्यावे असे या निवेदनात म्हटले आहे.


डोंगरगावचा पाणीपुरवठा सुरू झाला असला तरी आम्ही त्या ठिकाणी सर्व दक्षता घेत आहोत. गावकऱ्यांशी बोलणे झालेले आहे. त्यांचे आरक्षीत पाणी कायम राहणार असल्यामुळे आज कोणी अडवणूक केलेली नाही. रेणापूरच्या शिष्टमंडळानेही भेट घेतली आहे. त्यांच्या हक्काचे पाणी कमी होऊ नये याची काळजी घेण्याची त्यांची मागणी आहे. या बाबत लक्ष घातले आहे.
पांडुरंग पोले, जिल्हाधिकारी, लातूर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सराफा बाजार बेमुदत बंद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, उस्मानाबाद

पॅनसक्ती व उत्पादन शुल्क विरोधात सराफा व्यापाऱ्यांनी आता बेमुदत बंदचा पवित्रा घेतल्यामुळे उस्मानाबाद जिल्ह्यातील सराफा बाजाराचे व्यवहार पूर्णतः थंडावले आहेत. यामुळे या व्यवसायाशी निगडीत असलेल्या कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे.

या आंदोलनात देशभरातील सहा लाखांहून अधिक सराफा विक्रेते, सुवर्णकार सहभागी झाले आहेत. दोन लाख रुपयांवरील दागिने खरेदी-विक्रीकरिता जानेवारीपासून करण्यात आलेली पॅनची सक्ती तसेच अर्थसंकल्पात सूचविण्यात आलेली एक टक्का उत्पादन शुल्काची तरतूद या दोन्ही बाबी मागे घेईपर्यंत, आंदोलन सुरूच राहील असे स्पष्ट करण्यात आले आहे.

या आंदोलनाकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी १० मार्च रोजी पुणे येथे राज्यातील दीड लाख सराफ व्यापाऱ्यांचा मोर्चा काढण्यात येणार आहे.यंदाच्या अर्थसंकल्पात सरकारने नव्याने अबकारी करासह इतर जाचक कर व अटी लागू केल्याने व्यापाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष आहे.

सोन्यावरील अबकारी करविरोधात सराफा व्यापाऱ्यांनी पुकारलेला बंद बुधवारी सलग आठव्या दिवशीही सुरू होता. त्यामुळे कोट्यावधीचे व्यवहार ठप्प आहेत. आंदोलन तीव्र करण्यासाठी गुरुवारी (१० मार्च) पुणे येथे विभागीय आयुक्त कार्यालयावर राज्यस्तरीय मोर्चा काढण्यात येणार असून, यामध्ये उस्मानाबाद जिल्ह्यातील सुमारे ४६० सराफा व्यापारी आणि सुमारे ३२५ कारागीर याशिवाय ७० ठोक व्यापारी सहभागी होणार आहेत.

सराफा व सुवर्णकारांच्या बेमुदत बंदचा फटका लगीनगाठ बांधणाऱ्यांना बसू लागला असून, सोन्याने नव्हे तर बेन्टेक्सच्या दागिन्याने नवरी सजविण्याची पाळी आली आहे. ऐन लग्नसराईच्या हंगामात सराफा व्यापाऱ्यांचे हे आंदोलन सूरू झाल्याने वर-वधूंच्या पित्यांची मोठी पंचाईत होवू लागली आहे.

२०१२ मध्ये २१ दिवसांचा बंद पाळण्याची पाळी सराफा व सुवर्णकार संघटनेवर आली होती. या बंदमुळे कारागिरांवर उपासमारीची वेळी आली आहे.

- विष्णू सारडा, माजी अध्यक्ष, सराफा व सुवर्णकार संघटना, उस्मानाबाद

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पासपोर्ट कार्यालयासाठी केंद्राला नोटीस

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी,औरंगाबाद

मराठवाड्यात औरंगाबाद किंवा योग्य तेथे पासपोर्ट कार्यालय सुरू करण्यासाठी मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठात जनहित याचिका करण्यात आली आहे. या याचिकेत केंद्र सरकारला नोटीस बजावून माहिती घेण्याचे निर्देश न्या. रवींद्र बोर्डे व न्या. पुखराज बोरा यांनी बुधवारी दिले आहेत.

इंडियन ख्रिश्चन युनायटेड ब्रिगेडचे जालना जिल्हाध्यक्ष राहुल शिंदे यांनी ही याचिका केली आहे. ते सामाजिक कार्यकर्ते आहेत. पासपोर्ट कार्यालय ही मराठवाड्यातील नागरिकांची गरज आहे. याचिकाकर्ते हे गेल्या १८ महिन्यांपासून सर्व केंद्रीय व राज्य शासनाकडे निवेदन देऊन हे कार्यालय मराठवाड्यात होण्याची विनंती करत आहेत. बीड व औरंगाबाद वगळता जालना, लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी, उस्मानाबाद या जिल्ह्यांतील नागरिकांना पासपोर्ट काढण्यासाठी नागपूर येथील कार्यालयात जावे लागते. ते गैरसोयीचे आहे. बीड व औरंगाबाद येथील नागरिकांना मुंबई कार्यालय गाठावे लागते. नागपूरला जाण्यासाठी रेल्वे नाही. एका व्यक्तीला ७ हजार रुपये खर्च येतो. शिक्षण, हज यात्रा, इस्त्राइल, पर्यटनासाठी विदेशात जाणाऱ्याची संख्या मोठी आहे. पासपोर्ट अर्जात त्रुटी असेल तर पुन्हा नागपूरला जाण्याचा खर्च वाढतो, असे या याचिकेत म्हटले आहे. राज्यात मुंबई, नागपूर, पुणे व ठाणे येथे कार्यालय आहे. याच ठिकाणी ६ सेवाकेंद्रेही आहेत. नाशिकला सेवाकेंद्र आहे, पण मराठवाड्यात कार्यालय किंवा सेवाकेंद्र नाही, असे या याचिकेत म्हटले आहे.

या याचिकेत परराष्ट्र सहसचिव, मुंबई व नागपूर विभागीय पासपोर्ट अधिकारी, औरंगाबाद विभागीय आयुक्त, औरंगाबाद, बीड व जालना येथील पोलिस अधीक्षक यांना प्रतिवादी करण्यात आले आहे. या याचिकेची प्राथमिक सुनावणी बुधवारी झाली. सर्व प्रतिवादींना नोटीस बजावून केंद्र सरकारला माहिती घेण्याचे निर्देश कोर्टाने दिले आहेत. औरंगाबाद किंवा योग्य त्या ठिकाणी पासपोर्टचे स्वतंत्र कार्यालय सुरू करण्याची विनंती याचिकेत करण्यात आली आहे. हे कार्यालय स्थापन होईपर्यंत ६ जिल्हे नागपूरला न जोडता मुंबईला जोडण्याची विनंती याचिकेत करण्यात आली आहे. अर्जदारातर्फे एस. बी. सोळंके हे बाजू मांडत आहेत. केंद्र सरकारतर्फे असिस्टंट सॉलिसिटर जनरल संजीव देशपांडे यांनी नोटीस स्वीकारली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेणूची तिन्ही पिले दगावली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महानगरपालिकेच्या अक्षम्य गलथानपणामुळे हेलमकसा येथून आणलेल्या रेणू बिबट्याने जन्म दिलेल्या तिन्ही पिलांचा बुधवारी मृत्यू झाला. जन्मानंतर त्यांना दूधच काय, पण पाणीही पाजण्यात आले नव्हते. त्यांच्या पोटात दूध किंवा साखर पाण्याचा डोस पाजला गेला असता तर, त्यांचे प्राण बचावले असते, असे मानले जात आहे.

सिद्धार्थ प्राणिसंग्रहालयात हेमलकसा येथून राजा आणि रेणू ही बिबट्याची जोडी आणली आहे. त्यांना अद्याप स्थानिक वातावरणाशी जुळवून घेता आलेले नाही. ते येथील वातावरणात रमावेत म्हणून प्राणिसंग्रहालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केला, पण त्यात त्यांना यश आले नाही. राजा अद्यापही स्थानिक वातावरणाशी एकरूप झालेला नाही आणि रेणूने आजारपणच काढले. ती गर्भवती असल्याचे प्राणिसंग्रहालयाच्या संचालकांसह अन्य कर्मचाऱ्यांच्या लक्षात आले नाही. त्यामुळे रेणूला वेगळाच कोणतातरी आजार आहे, असे मानून उपचार केले जात होते. ७ मार्चच्या सायंकाळी रेणूने तीन पिलांना जन्म दिला. त्यांना रेणूने दूध पाजले नाही. आई दूध पाजत नसेल तर, बाहेरचे दूध या पिलांना पाजणे गरजेचे होते, पण त्यांना जन्मापासून ९ मार्च रोजी (बुधवार) सकाळपर्यंत दूधच काय, पण पाणीही पाजण्यात आले नाही. त्यामुळे पिलांचा अशक्तपणा वाढत गेला आणि बुधवारी सकाळी आठ वाजता एकाचे तर साडेनऊ वाजता दुसऱ्या पिलाचे निधन झाले. तिसरे पिल्लू सायंकाळी साडेसात वाजता दगावले. सकाळी दोन पिले दगावल्यावर प्राणिसंग्रहालयाच्या कर्मचाऱ्यांमध्ये धावापळ सुरू झाली. पिले अशक्तच असल्याने दगावली, असे सांगितले जाऊ लागले. तिसऱ्या पिलाचा मात्र कोणताच विचार केला जात नव्हता. उपमहापौर प्रमोद राठोड व स्थायी समितीचे सभापती दिलीप थोरात प्राणिसंग्रहालयात आले. त्यांनी काही सूचना केल्या. आयुक्त ओम प्रकाश बकोरिया देखील एक तास प्राणिसंग्रहालयाच्या संचालकांच्या कार्यालयात बसून होते. त्यांनी संचालकांसह सर्व कर्मचाऱ्यांना कामाला लावले. त्यानंतर तिसऱ्या पिलाला वाचवण्यासाठी खटपट सुरू झाली. पण तिसऱ्या पिलानेही सायंकाळी साडेसात वाजता प्राण सोडला.

रेणूची दोन पिले कशामुळे दगावली याची चौकशी तज्ज्ञ डॉक्टर करीत आहेत. त्यांचा अवहाल आल्यावर या प्रकरणातील दोषींवर कारवाई केली जाईल. बिबट्याच्या जोडीने हेमलकसा ते औरंगाबाद हा ८०० किलोमीटरचा प्रवास केला. २ मार्च रोजी रेणूला उलटी झाली. त्यामुळे ३ मार्च रोजी तिची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. तिला इन्फेक्शन झाल्याचे डॉक्टरांच्या लक्षात आले. त्यानुसार उपचार सुरू केले. तिच्या रक्ताची तपासणीही करण्यात आली. ७ मार्च रोजी तिने तीन पिलांना जन्म दिला. त्यापैकी दोघांचा बुधवारी सकाळी मृत्यू झाला. रेणूचा एक्स-रे काढण्याल्यानंतर तिच्या पोटात पिले असल्याचे लक्षात आले होते. तिच्या हालचालीवरूनही ती गर्भवती असल्याचे स्पष्ट जाणवत होते. - ओम प्रकाश बकोरिया, आयुक्त, महापालिका.

८०० किमी प्रवास जीवावर बेतला

गर्भवती रेणूला महापालिकेच्या प्रशासनाने ८०० किलोमीटर अंतरावरून टेम्पोतून धडधडत औरंगाबादला आणले. हाच प्रवास तिच्यासाठी घातक ठरला. तिची प्रकृती अद्याप सुधारलेली नाही. बिबट्यांना आणण्यासाठी वापरलेल्या वाहनात पिंजऱ्यांना वाळूच्या गोण्यांचा आधार देण्यात आला होता तर, गाडीवर ताडपत्रीचे छत टाकण्यात आले होते.

डॉ. प्रकाश आमटे यांच्या हेमलकसा येथील 'आमटेज् अॅनिमल आर्क' येथून १७ फेब्रुवारी रोजी राजा आणि रेणू ही बिबट्याची जोडी औरंगाबाद महापालिकेच्या प्राणिसंग्रहालयासाठी आणण्यात आली. हेमलकसा ते औरंगाबाद हे अंतर ८०० किलोमीटरचे. या दोन्ही शहरांदरम्यानचे रस्ते काही अपवाद वगळता अत्यंत वाईट. रस्त्यावर जागोजागी खड्डे. अशा परिस्थितीत राजा आणि रेणूला अद्ययावत गाडीतून न आणता पालिकेने टेम्पोचा वापर केला. अशी वाहने दीर्घ पल्ल्याच्या प्रवासासाठी धोकादायक असतात, असे जाणकारांचे मत आहे.

टेम्पोत दोन छोटे पिंजरे ठेवून राजा आणि रेणूला औरंगाबादला आणण्यात आले. येथे आणण्यापूर्वीच रेणू गर्भवती होती. प्रवासातील हादरे तिच्यासाठी मारक ठरले, असे तज्ज्ञांचे मत आहे. टेम्पोत पिंजरा सरकू किंवा घसरू नये म्हणून वाळूने भरलेल्या पोत्यांचा आधार देण्यात आला होता. वरून उघड्या असलेल्या या गाडीवर ताडपत्रीचे छत टाकण्यात आले होते. रस्त्यात पिण्याच्या पाण्याची आणि अन्नाची काय व्यवस्था करण्यात आली होती, याची कुणालाच कल्पना नाही. खडखड करणाऱ्या वाहनातून मोठा प्रवास केल्यामुळे रेणूच्या प्रकृतीवर परिणाम झाल्याची माहिती तज्ज्ञांनी दिली. प्रसुतीनंतर तिला औरंगाबादला आणले असते तर, तिची प्रकृती बिघडली नसती आणि पिलेही वाचली असती, असे बोलले जात आहे.





एम.पी.ची रेस्क्यू हॅन आरामदायी

मध्य प्रदेशातील मुकुंदपूर सतना येथील प्राणिसंग्रहालयासाठी औरंगाबाद महापालिकेच्या प्राणिसंग्रहालयातील दुर्गा आणि नकुल ही वाघांची जोडी पाठवण्यात आली. या जोडीला घेऊन जाण्यासाठी मध्य प्रदेश सरकारने आरामदायी रेस्क्यू व्हॅन पाठवली होती. हायड्रॉलिक पद्धतीची ही व्हॅन पूर्णपणे वातानुकूलीत होती. त्यात पिंजरा देखील होता. व्हॅनमध्ये छोटे फ्रिज होते. त्यात वाघांचे खाद्य ठेवण्यात आले होते. व्हॅनमध्ये एवढी अद्ययावत सुविधा असतानाही दर चार तासांनी वाघांना काय हवे, काय नको याची पाहणी केली जात होती. सुमारे ११०० किलोमीटरचा प्रवास दुर्गा आणि नकुलसाठी आरामदायीच ठरला होता.

पिलांच्या मृत्युचा रेणूला धक्का

पिलांच्या मृत्युमुळे रेणू या बिबट्याला मोठा धक्का बसला. दिवसभर ती अस्वस्थ होती. पिंजऱ्यात इकडून तिकडे येरझाऱ्या घालत होती तर, कधी चक्कर आल्या सारखी बसून रहात होती.

हेमलकसा येथून आणलेल्या रेणू बिबट्याने सोमवारी सायंकाळी तीन पिलांना जन्म दिला. त्यापैकी दोन पिलांचे बुधवारी सकाळी तर, तिसऱ्या पिलाचे सायंकाळी निधन झाले. त्याचा आघात रेणूवर झाला. यामुळे ती कमालीची अस्वस्थ झाली. तिला छोट्या पिंजऱ्यात ठेवण्यात आले होते. तेथे ती येरझाऱ्या घालू लागली. मध्येच खाली बसत होती. तिला चक्कर आली असावी, असे वाटत होते. तिची वर्तवणूक सवंदेनशील मनाला हेलावून टाकणारी होती. प्राणिसंग्रहालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांसमोर आता तिला सारवण्याचे आव्हान आहे.

डॉ. भादेकर धावून आले, पण...

रेणूच्या तिसऱ्या पिलासाठी डॉ. अनिल भादेकर धावून आले. त्यांनी तत्काळ त्यांनी उपचार सुरू केले. त्यामुळे या तिसऱ्या पिलाच्या ज‌िवात जीव आला, पण सायंकाळी तिसरे पिलूही दगावले.

रेणू बिबट्याने ७ मार्च रोजी तीन पिलांना जन्म दिला. त्यांच्या जन्माची वार्ता 'मटा'ने सर्वप्रथम प्रसिद्ध केली, परंतु योग्य देखभालीअभावी बुधवारी सकाळी दोन पिलांचे निधन झाले. त्यानंतर उपमहापौर राठोड यांनी डॉ. अनिल भादेकर यांना बोलावून घेतले. इन्क्युबेटरमधील पिलाचे अंग थंड पडले होते. डॉ. भादेकर यांनी इन्क्युबेटरचे तापमान वाढविण्यास सांगितले. शिवाय त्याच्या आंगावरून हात फिरवून ऊब निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे निपचित पडलेल्या पिलाची हालचाल सुरू झाली. डॉ. भादेकर यांच्या सूचनेवरून कृत्रिम दूध आणून पिलाला पाजण्यात आले. परंतु, संध्याकाळी पिलू दगावले.

बिबट्याच्या पिलांच्या मृत्यूला प्राणिसंग्रहालयाचे संचालक म्हणून डॉ. बी. एस. नाईकवाडे हेच जबाबदार आहेत. त्यांनी पुरेशी काळजी घेतली असती तर पिले वाचली असती. पिलांच्या आईची प्रकृती देखील बिघडली नसती, पण डॉ. नाईकवाडे त्यांच्या मूळ कामाकडे लक्ष न देता दुसऱ्याच कामाला महत्त्व देतात. त्याचात हा परिणाम आहे. बिबट्याची तीन पिले त्यांच्याच हलगर्जीपणामुळे दगावल्यामुळे डॉ. नाईकवाडे यांच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे.- रेणुकादास वैद्य, गटनेते, शिवसेना, महापालिका.

डॉ. नाईकवाडे यांच्या हलगर्जीपणामुळे बिबट्याची तिन्ही पिले दगावली. पालिकेच्या आयुक्तांनी याची दखल घेऊन त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे. उपचार करताना कशाला प्राधान्य द्यावे, इन्क्युबेटर कसे वापरले पाहिजे, याचे साधे ज्ञानही त्यांना नाही, असे आता लक्षात आले आहे.- प्रमोद राठोड, उपमहापौर.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘बाइक रॅली’तून स्त्रीशक्तीचा जागर

$
0
0

कर्तबगारीच्या सर्व क्षेत्रांत आपला ठसा उमटविणाऱ्या स्त्रीला सलाम करण्यासाठी यंदाही जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने 'महाराष्ट्र टाइम्स'तर्फे महिलांची 'बाइक रॅली' आयोजित करण्यात आली आहे. जागतिक महिला दिनानंतरच्या रविवारी, १३ मार्च रोजी ही रॅली काढण्यात येईल. औरंगाबादसह, पुणे, कोल्हापूर, नाशिक, नागपूर व ठाणे या शहरांमध्ये ही रॅली निघणार आहे.

महिलांच्या कर्तबगारीचा सन्मान करण्यासाठी, त्यांचाच सहभाग असलेली बाइक रॅली 'मटा'तर्फे गेल्या दोन वर्षांपासून आयोजित करण्यात येत आहे. दोन्ही वर्षी या उपक्रमाला जोरदार प्रतिसाद मिळाला आहे. गेल्या वेळी भगवे फेटे, सलवार कुडता, जीन्स-टी शर्टही... अशा वेगवेगळ्या रंगीबेरंगी पेहरावात नारीशक्तीने धमाल केली होती.

सेलिब्रिटींच्या उपस्थितीत सहभागी महिलांच्या नातेवाइकांनी केलेल्या चीअरिंगमुळे या रॅलीतील उत्साह सुरुवातीपासूनच वाढला. ही रॅली पाहण्यासाठी रस्त्यांवरही गर्दी झाली होती. अशीच धमाल करण्याची संधी यंदा पुन्हा चालून आली आहे. यंदा १३ मार्चला क्रांतिचौकातील हॉटेल मॅनोरपासून येथून सकाळी आठ वाजता ही रॅली निघेल.

करिअरच्या शिखराच्या दिशेने आत्मविश्वासाने वाटचाल करतानाच महिला आज कौटुंबिक जबाबदाऱ्याही समर्थपणे सांभाळत आहेत. विविध क्षेत्रांत पुरुषांच्या बरोबरीने अनेक आव्हानांना सामोऱ्या जाणाऱ्या या महिलांना प्रोत्साहन देणे, हा या उपक्रमाचा उद्देश आहे. 'बाइक रॅली' हा स्त्री शक्तीच्या या नव्या साक्षात्काराचा प्रतीकात्मक हुंकार आहे. परंपरेने दिलेल्या जबाबदाऱ्या आणि निसर्गाने मातृत्वाच्या वरदानातून दिलेले वात्सल्य यांचा समतोल साधत स्त्री प्रसंगी रणरागिणीही होते, याचा प्रत्यय देणाऱ्या अनेक घटना आपल्या आसपास घडताना दिसतात. महिला सक्षमीकरणाच्या केवळ घोषणा न देता त्याची खऱ्या अर्थाने अंमलबजावणी करण्यासाठी समाजाने मोकळ्या मनाने पुढे येण्याची आता गरज आहे, असा संदेश समाजाला दिला जावा, अशी कल्पना यामागे आहे.




बाइक रॅलीचा मार्ग

क्रांतिचौकातील मॅनॉर लॉन्स येथून सुरुवात. सेव्हन हिल्स्, गजानन मंदिर रोड, सूतगिरणी चौक, शहानूरमियॉँ दर्गा चौक, पीरबाजार, एकनाथ रंगमंदिर रोड मार्गे मॅनॉर लॉन्स येथे रॅलीचा समारोप होईल. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी महिलांनी नावनोंदणीसाठी BikerallyAGB असा एसएमएस 58888 या क्रमांकावर पाठवावा अथवा www.mtonline.in/womenbikerally येथे नावनोंदणी करावी.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रोहयो घोटाळ्याप्रकरणी गुन्हे दाखल करा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, बीड
बीड जिल्ह्यात गेल्या काही वर्षांत रोजगार हमी योजनेत अनेक अनियमितता असल्याचे समोर आले आहे. जिल्ह्यातील काही ग्रामपंचायतीमध्ये चुकीच्या पद्धतीने कोट्यावधी रुपयाची कामे करण्यात आल्याच्या तक्रारी आल्या होत्या. विशेष म्हणजे रोजगार हमी विभागातील कर्मचारी आणि ग्रामपंचायतीचे
पदाधिकारी यांच्या संगनमताने जिल्ह्यातील काही तालुक्यात शासनाच्या तिजोरीतील अफरातफर करण्यात आली होती. खुद्द जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी जिल्ह्यातील महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतील भ्रष्टाचार प्रकरणी आपल्या समोर आलेल्या काही बाबी धक्कादायक असल्याचे सांगत सरकारला चुना लावणाऱ्या विरोधात गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले असल्याचे सांगितले.
बीड जिल्ह्यात गेल्या दोन वर्षांपासून महात्मा गांधी रोजगार हमी योजनेत अनेक अनियमितता सुरू होत्या. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी गुत्तेदारांना आणि ग्राम पंचायतीचे ग्रामसेवक व ग्राम रोजगार सेवक, ग्राम पंचायत पदाधिकारी यांना हाताशी धरून एका-एका गावात कोट्यावधी रुपयांचे कामे रोजगार हमी मधून केली गेली. ही कामे करत असताना गावाचे लेबर बजेट किती आहे. जॉब कार्ड किती मजुरांना देण्यात आले. तांत्रिक मान्यता कामाला
कशी दिली गेली. त्यासोबतच कामाची मागणी करणारे मजूर किती आहेत, मंजूर कामे किती आहेत. या बाबी न तपासता अनेक गावात तीस लाख रुपयांची कामे करण्याची मर्यादा असताना कोट्यावधी रुपयांची कामे २०१४ - २०१५ आणि २०१५-२०१६ या दोन वर्षात उरकण्यात आली. अशाप्रकारे अनेक कामे कागदावर दाखवून रोजगार हमीची कामे करून शासनाच्या तिजोरीला कोट्यावधीचा चुना लावण्यात आला.
बीड तालुक्यातील काही ग्राम पंचायतीमध्ये रोहयोत मोठे रॅकेट सुरू होते. मात्र, याविरोधात अनेक तक्रारी जिल्हाधिकारी राम यांच्याकडे आल्या होत्या. या संदर्भात जिल्हाधिकारी राम यांच्याशी संपर्क साधला असता बीड जिल्ह्यातील रोजगार हमी योजनेत सुरू असलेल्या गैरप्रकार बाबत चौकशी झाली आहे. ज्या ग्राम पंचायतीमध्ये
नियम डावलून योजनेचा गैर फायदा उचलला गेला आहे, अशा ठिकाणी त्या माहितीवरून आपल्याला धक्कादायक माहिती समोर आली आहे. मात्र, आपण या प्रकरणी चुकीचे काम करणाऱ्या ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक, ग्राम
रोजगार सेवक आणि अन्य लोकविरोधात गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले असल्याची माहिती जिल्हाधिकारी राम यांनी गुरुवारी दिली.

कारवाईच्या भीतीने अनेकांचे धाबे दणाणले
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना तशा सूचना दिल्याअसल्याचेही जिल्हाधिकारी राम म्हणाले. त्यामुळे येत्या काही दिवसात 'रोजगार हमी अर्धे तुम्ही, अर्धे आम्ही'करणाऱ्यांना कारवाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. यापूर्वी ही बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात झालेल्या या योजनेतील भ्रष्टाचार प्रकरणी केज पंचायत समितीचे
या पूर्वीचे गट विकास अधिकारी आगरते यांच्या विरोधात फौजदारी स्वरुपाची कारवाई करण्यात आली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्पेनच्या मदतीने हायस्पीड रेल्वे!

$
0
0

औरंगाबाद: औरंगाबादहून मुंबई अवघ्या दोन तासांत...! विश्वास बसणार नाही, पण हायस्पीड रेल्वेमुळे हा प्रवास शक्य होणार आहे. नागपूर ते मुंबईदरम्यान ताशी ३०० किलोमीटर वेगाने धावणारी हायस्पीड रेल्वे सुरू करण्याचा प्रस्ताव आहे. या रेल्वेच्या सर्वेक्षणासाठी स्पेनमधील चार अधिकाऱ्यांचे पथक गुरुवारी औरंगाबादेत आले होते.

नागपूर, अकोला, औरंगाबाद, नाशिक, बोईसरमार्गे मुंबई असा या रेल्वेचा मार्ग असेल. हायस्पीड रेल्वेमुळे नागपूर ते औरंगाबादचे अंतर दोन तासांत तर, औरंगाबाद ते मुंबईचा प्रवासही फक्त दोन तासांत होईल. दुसऱ्या टप्प्यात नागूपर ते हावडा यादरम्यान हायस्पीड रेल्वे कॅरिडोअर तयार करण्यात येणार आहे. या मार्गाला मान्यता मिळाल्यास येत्या सहा ते आठ वर्षांत हा प्रकल्प पूर्ण होईल, असा विश्वास या पथकातील अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. त्यांनी औरंगाबाद स्टेशनसह, मध्यवर्ती बस स्थानकाची पाहणी गुरुवारी सकाळी केली. स्पेन रेल्वे आणि भारतीय रेल्वे यांच्यात रेल्वे वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी करार करण्यात आला आहे. त्याअंतर्गत हा प्रकल्प प्रस्तावित आहे.

औरंगाबाद रेल्वे मार्गावरून सध्या धावणाऱ्या रेल्वेची माहिती घेतली. सध्या औरंगाबादहून मुंबईचे अंतर किती वेळेत पूर्ण होते. प्रवासी संख्या किती असते. औरंगाबाद येथून करण्यात येणाऱ्या माल वाहतुकीचे प्रमाण किती आदी माहिती त्यांनी घेतली. स्पेनमधील अधिकारी कार्लोस बिजारियो अपारटीओ, अल्बार्टो मासेरियो, एफ. जे. सोबटेनो, जे. जे. ओटेरो, रेल्वे महामंडळाचे वरिष्ठ व्यवस्थापक के. के. गुहा, सल्लागार ए. एस. पवार, वाहतूक व्यवस्थापक पगारे, स्टेशन प्रमुख अशोक निकम, वाहतूक अधिकारी के. एल. जाखडे, वाणिज्यिक विभागाचे अधिकारी धनंजय सिंह, आरोग्य अधिकारी आशुतोष गुप्ता यांची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बिबट्याच्या पिलांचा अन्न-पाण्याअभावी मृत्यू

$
0
0

औरंगाबाद ः पोटात अन्न नसल्यामुळे रेणू या बिबट्याच्या तीन पिलांचा मृत्यू झाला, असे शवविच्छेदन अहवालात नमूद करण्यात आले आहे. पिलांच्या पोटात अन्न नसल्याने त्यांना कमालीचा अशक्तपणा आला होता, असेही त्यात स्पष्टपणे नमूद केले आहे.

रेणू आणि राजा या बिबट्याच्या जोडीला १७ फेब्रुवारी रोजी सिद्धार्थ उद्यानाच्या प्राणिसंग्रहालयात आणले. रेणूने ७ मार्च रोजी तीन पिलांना जन्म दिले. या तिन्ही पिलांचे ९ मार्च रोजी निधन झाले. त्यांचे पोस्टमार्टेम करण्यात आले. त्यावेळी प्राणिसंग्रहालयातील अधिकाऱ्यांसह परभणी येथील विद्यापीठाच्या पशुवैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे डॉक्टर, वनविभागाचे अधिकारी उपस्थित होते.

याबद्दल परभणी येथील डॉ. विलास आहेर यांनी सांगितले की, बुधवारी दोन पिलांचे आणि गुरुवारी सकाळी एका पिलाचे शवविच्छेदन केले. तिन्ही पिलांच्या पोटात अन्न, पाणी नव्हते. त्यामुळे त्यांना कमालीचा अशक्तपणा आला आणि त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला, असे स्पष्ट झाले. प्राणिसंग्रहालयाचे संचालक डॉ. बी. एस. नाईकवाडे यांनी यासंदर्भातील अहवाल दिला. त्यात म्हटले आहे की, तिन्ही पिलांचा मृत्यू पोटात अन्न व पाणी कमी झाल्यामुळे ओढावला. प्रयोगशाळेचा अहवाल प्राप्त झाल्यावर जंतुसंसर्गाचे व मृत्यूचे निश्चित कारण कळू शकेल.

दरम्यान, रेणूने गेल्या दोन दिवसांत अन्न घेतले नव्हते. पिलांच्या मृत्युमुळे राजनेही अन्नत्याग केला होता. त्यांनी आज आहार घेतला, अशी माहिती प्राण‌िसंग्रहालयातील कर्मचाऱ्यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


चौथऱ्यावर महिलांना प्रवेश द्यावा

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद

शनी शिंगणापूर येथील श्री शन्नेश्वर देवस्थानातील चौथऱ्यावर महिलांना प्रवेश मिळावा यासाठी मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठात जनहित याचिका करण्यात आली आहे. या याचिकेत राज्य शासन महिलांचा मंदिर प्रवेश देण्याच्या बाजूने आहे. उत्तर दाखल करण्यासाठी राज्य शासनाने दोन आठवड्याचा वेळ मागून घेतला आहे. त्यास कोर्टाने संमती दिली आहे.

'श्री क्षेत्र शनि शिंगणापूर हे जागृत देवस्थान आहे. श्री शनैश्वर देवस्थान शिंगणापूर सार्वजनिक न्यासानेही महिलांना प्रवेश नाकारला आहे. आजच्या संगणक युगातही या गावाने गावपण, तसेच परंपरेने चालत आलेल्या रूढी-परंपरा मोठ्या श्रद्धेने जतन केल्या आहेत. महिलांनी शनिदेवाच्या चौथऱ्यावर जाऊन पूजा करणे निषिद्ध आहे. त्यामुळे एका तरुणीने चौथऱ्यावर जाऊन पूजा केली होती. त्यानंतर राज्यभर गदारोळ झाला. महिलांना प्रवेश न देणे हा कायद्याचा भंग आहे,' असे याचिकाकर्ते डॉ. वसुधा पवार यांनी म्हटले आहे .

खंडपीठाचे न्या. रवींद्र बोर्डे व पुखराज बोरा यांच्यासमोर गुरुवारी सुनावणी झाली. शनीच्या दर्शनासाठी स्त्री-पुरुष भेदाविषयी व महिला भाविकांना शनी देवाच्या चौथऱ्यावर प्रवेशास बंदी

असल्याचा मुद्दा अर्जदाराचे वकील अमेय सबनीस यांनी मांडला. घटनेनुसार दर्शन घेण्याचा समान अधिकार आहे. याचा भंग श्री शनैश्वर देवस्थान करत आहे, असा युक्तिवाद सरकारचे वकील अमरजितसिंह गिरासे यांनी केला. उत्तर दाखल करण्यासाठी दोन आठवड्याचा अवधी द्यावा अशी विनंती गिरासे यांनी कोर्टाला केली. ही विनंती कोर्टाने मान्य केली.

संस्थानच्यावतीने कोणताही भेदभाद होत नाही. प्रत्येक देवस्थानचे काही नियम आहेत. घृष्णेश्वर येथेही पुरुषांना मंदिरात जातांना परंपरा पाळाव्या लागतात. शनीचा चौथरा हा अगदी छोटा असून त्याठिकाणी सर्वांनाच प्रवेश दिला तर अपघाताची घटना घडू शकते. त्यामुळे महिला व पुरुष दोघांनाही

थोड्या अंतरावरुन दर्शनाचा नियम केला आहे, असा युक्तिवाद संस्थानचे वकील व्ही. डी.सपकाळ यांनी केला. या याचिकेत श्री शनैश्वर देवस्थान शिंगणापूर सार्वजनिक न्यास उत्तर दाखल करणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

४३ हजार मुलांचे स्थलांतर रोखले

$
0
0

Ashish.Choduhari@timesgroup.com
औरंगाबाद ः उसतोड कामगारांचा जिल्हा अशी बीडची ओळख. यंदा जिल्ह्यात भीषण दुष्काळ. त्यामुळे स्थलांतरित होण्याचे प्रमाण जास्त आहे. स्थलांतर होण्याचे प्रमाण मोठे असले तरी, हंगामी निवासी वसतिगृहांच्या माध्यमातून ४३ हजार १९२ मुलांना गाव सोडण्यापासून रोखण्यास शिक्षण विभागाला यश आले आहे. शिक्षण हमी कार्डच्या माध्यमातून २ हजार ३१५ मुले इतर जिल्ह्यांत शिक्षणाचे धडे गिरवित आहेत.

स्थलांतरामुळे शिक्षणापासून वंचित राहणाऱ्या मुलांचे प्रमाण वाढत आहे. विशेषतः बीड जिल्ह्यातून उसतोडीसाठी जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. यावर्षी दुष्काळामुळेही स्थलांतराचे प्रमाण वाढते आहे. उसतोड मजूर कुटुंबासह गाव सोडत असल्याने मुलांवर शिक्षण बंद करण्याची वेळ येते, हे विचारात घेत शिक्षण विभागाने हंगामी वसतिगृहे उभारली आहेत. बीड जिल्ह्यात त्यामुळे यावर्षी ४३ हजार मुलांचे स्थलांतर रोखण्यास यश मिळाले. मुलांची त्यांच्याच नातेवाईकांकडे राहण्याची व्यवस्था करण्यात आली असून, त्यांना शाळेत दोन वेळचे जेवण आणि शैक्षणिक साहित्य दिले जात अाहे, अशी माहिती शिक्षण विभागातून देण्यात आली.

प्रत्येक विद्यार्थ्याची सहा महिन्यांसाठी वसतिगृहाची सुविधा मिळते. त्यासाठी एका विद्यार्थ्यावर सरकारी ८ हजार २०० रुपये खर्च करीत अाहे. हा निधी भोजन, शैक्षणिक साहित्यासाठी खर्च केला जातो. या सोयीनंतरही स्थलांतरित झालेल्यापैकी २ हजार ३१५ विद्यार्थ्यांना शिक्षण हक्क कार्ड दिले आहे. कुटुंबाचे जेथे स्थलांतर झाले, तेथील जवळच्या शाळेत विद्यार्थ्याला त्याच वर्गात प्रवेश दिला जातो. त्यामुळे त्यांच्या शिक्षणात खंड पडला नाही.

प्रधानसचिव नंदकुमार यांनी या वसतिगृहांचा गुरुवार (१० मार्च) रोजी औरंगाबादमध्ये आढावा घेतला. शिक्षणाची प्रगती, वसतिगृहातील सुविधांची माहिती त्यांनी घेतली.

हंगामी वसतिगृह......................७४६
वसतिगृहातील मुलांची संख्या......२२०३६
मुलींची संख्या..........................२११५६
एकूण विद्यार्थी संख्या.................४३१९२
स्थलांतरीत विद्यार्थी संख्या..........६२९२
शिक्षण हमी कार्ड विद्यार्थी...........२३१५

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

थायलंडच्या शिष्टमंडळाची विद्यापीठाला भेट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात थायलंडमधील प्राध्यापकांच्या शिष्टमंडळाने बुधवार (९ मार्च) रोजी भेट दिली. दोन्ही देशांत विधी क्षेत्रातील देवाण-घेवाण होण्याची आवश्यकता असल्याचे शिष्टमंडळाचे प्रमुख थायलंडमधील संवैधानिक न्यायालयाचे अध्यक्ष नुराक मराप्रणित यांनी सांगितले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मरठवाडा विद्यापीठात विधी विभागातर्फे हा कार्यक्रम घेण्यात आला. महात्मा फुले सभागृहात झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे होते. शिष्टमंडळात थायलंड येथील ५६ अध्यापक संशोधकांचा समावेश होता. प्रारंभी विधी विभागाच्या प्रमुख डॉ. साधना पांडे यांनी विधी अभ्यासक्रमाबाबत पॉवर पॉइंटच्या माध्यमातून सादरीकरण केले. यावेळी बोलताना नुराक मराप्रणित म्हणाले, 'तथागत गौतम बुद्धाने दिलेल्या शांतीच्या संदेश साऱ्या जगाने स्वीकारला आहे. भारत व थायलंड या दोन्ही देशांना जोडणारे गौतम बुद्ध आहेत.'

कुलगुरू डॉ. चोपडे म्हणाले, 'विद्यापीठात सध्या थायलंडमधील सहा विद्यार्थी शिक्षण, संशोधन करीत आहेत. ही संख्या वाढली पाहिजे. विद्यापीठ विद्यार्थ्यांना पुरेशा सोयी देण्यासाठी प्रयत्न करत असून, परदेशी विद्यार्थ्यांसाठी शंभर मुलांचे वसतिगृह बांधण्यात येणार आहे.' यावेळी डॉ. सुहास मोराळे, विधी अधिकारी स्मिता चावरे यांची उपस्थिती होती. डॉ. आनंद देशमुख सूत्रसंचालन केले व डॉ. नंदीता पाटील यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बनावट कागदपत्रांद्वारे पाच लाखांची फसवणूक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
बांधकाम कंपनीचा परवाना रद्द झालेला असताना ही कंपनी सुरू असल्याचे भासवून, बनावट कागपत्रे तयार करून फिर्यादीची ४ लाख ९० हजारांची फसवणूक केल्याप्रकरणी आरोपीचा अटकपूर्व जामीन अर्ज सत्र न्यायाधीश एस. एल. पठाण यांनी फेटाळला. या प्रकरणी बुद्धप्रकाश शर्मा (रा. गारखेडा परिसर) यांनी सिडको पोलिस ठाण्यामध्ये फिर्याद दिली आहे.

फिर्यादीनुसार, आरोपी सुरेंद्रकुमार सीताराम गुप्ता याने 'परितोष मार्केटिंग प्रा. लि.'च्या नावाने सिडको एन-५ येथील कॅनॉट प्लेस येथे अजंठा कॉम्प्लेक्स नावाच्या इमारतीचे बांधकाम केले. या इमारतीत सदनिका खरेदीसाठी सुरेंद्रकुमार गुप्ता याच्याशी फिर्यादीने जानेवारी २००१ मध्ये संपर्क साधला. तेव्हा गुप्ता याने सांगितले की, परितोष मार्केटिंग कंपनी प्रा. लि. चा संचालक आरोपी सूर्यकांत एम. गुप्ता याने लेखी पत्राद्वारे मला अधिकार बहाल केले आहेत. त्यावरून अजंठा कॉम्प्लेक्समध्ये ए-१० फ्लॅट हा ४ लाख ९० हजारांना घेण्याचा व्यवहार केला. आरोपीने २० जानेवारी २००१ रोजी फिर्यादीला नोंदणीकृत करारनामा करून दिला. त्याप्रमाणे फिर्यादीने ५० हजार रूपयांचा धनादेश, एसबीआय बँकेचे मंजूर झालेले कर्ज ३ लाख व रोख ५० हजार व धनादेशाद्वारे ७० हजार, असे एकूण ४ लाख ९० हजार रुपये कराराप्रमाणे दिले. सुरेंद्रकुमार गुप्ता व सूर्यकांत गुप्ता यांनी फ्लॅटचा ताबा फिर्यादीला दिला. मात्र, गुप्ता बंधु फ्लॅटचे खरेदीखत करून देण्यास टाळाटाळ करीत आहेत. त्यानंतर सुरेंद्रकुमार गुप्ता हा शहरातून निघून गेला, तर सुरेंद्रकुमार शिवाय खरेदीखत होणार नाही, असे सूर्यकांत गुप्ता याने सांगितले. फिर्यादीने फ्लॅटचे खरेदीखत करून द्यावे, यासाठी गुप्ता बंधुंशी वेळोवेळी संपर्क साधला. मात्र, टाळाटाळ करण्यात आली. पुढे सूर्यकांतने फिर्यादीला आरोपी अनिल अग्रवालचा नंबर दिला. फिर्यादीने अनिल अग्रवालशी संपर्क साधला असता तो म्हणाला की, सुरेंद्रकुमार गुप्ता याच्याकडून मी हा फ्लॅट खरेदी केला आहे. या प्रकरणी सुरेंद्रकुमार व सूर्यकांत गुप्ता बंधू आणि अनिल जगदिश अग्रवाल यांनी संगनमत करून 'परितोष'ची मान्यता रद्द झालेली असताना

ही कंपनी अस्तित्वात असल्याचे भासवून खोटे, बनावट कागदपत्र तयार करून त्याचा उपयोग करून २१ जानेवारी २०१६ रोजी फिर्यादीच्या फ्लॅटचे खरेदीखत अनिल अग्रवाल याच्या नावाने करून दिले आणि फिर्यादीची ४ लाख ९० हजार रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणी अनिल अग्रवाल याने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला असता, सहाय्यक सरकारी वकील एस. टी. शिरसाट यांनी जामीन देण्यास विरोध केला. सुनावणीअंती कोर्टाने वरीलप्रमाणे आरोपीचा जामीन फेटाळला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

५४ कॉपीबहाद्दरांवर मंडळाची कारवाई

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
माध्यमिक व उच्चमाध्यमिक परीक्षा मंडळातर्फे सुरू असलेल्या दहावी, बारावीच्या परीक्षेत कॉपी करण्याचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. गुरुवारी तब्बल ५४ कॉपीबहाद्दरांवर कारवाई करण्यात आली. दहावी, बारावीत कॉपी करणाऱ्यांवरील कारवाईची संख्या ४७४पर्यंतर पोहोचली आहे. यंदा महसूल आणि शिक्षण मंडळाचे कॉपीमुक्त परीक्षा अभियान सपशेल अपयशी ठरले आहे.

दहावी, बारावीच्या परीक्षा सध्या सुरू असून, कॉपी प्रकरणांचा आकडा पाचशेच्या जवळ पोहोचला आहे. शहरी, ग्रामीण भागातील अनेक परीक्षा केंद्रावर सपशेल कॉपीला प्रोत्साहन दिले जात असल्याचे कॉपीबहाद्दरांवरील कारवाईवरून समोर आले आहे. कॉप्यांचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन २००९मध्ये कॉपीमुक्त परीक्षा अभियान राज्यभर राबविण्यात आले. यंदा हे अभियान अपयशी ठरले आहे.

दहावीच्या परीक्षांना १ मार्चपासून सुरुवात झाली. आजपर्यंत २२६ विद्यार्थी कॉपी करताना आढळले. बारावीत २४८ कॉपीबहाद्दर पडण्यात आले. यासह परीक्षा केंद्रावर मोबाइलचा वापरही आढळून आला आहे. वाढत्या कॉपी प्रकरणांमुळे मंडळाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहेत; तसेच महसूल विभागाचे बैठी पथक काय करीत आहेत, असा प्रश्नही समोर आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images