Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

हेल्मेटसक्तीप्रमाणे जलफेरभरणसक्ती

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
हेल्मेटसक्तीप्रमाणे शहरात रेनवॉटर हार्वेस्टिंगची (जलफेरभरण) सक्ती करण्याबाबत महापालिका आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत चर्चा करण्यात आली. यासंदर्भात विस्तृत भूमिका ठरविण्यासाठी व जलजागृती करण्यासाठी २५ मे रोजी रेन वॉटर हार्वेस्टिंग अभियानाचे आयोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला.
बकोरिया यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीला तारा बसोले, मीनल नाईक, श्रीमती कोरान्ने, प्रयास संस्थेचे रवी चौधरी आदी उपस्थित होते. रेनवॉटर हार्वेस्टिंगयुक्त शहर करण्यासाठी संपूर्ण जलजागृती करण्याच्या उद्देशाने बकोरिया यांच्या बरोबर स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींनी चर्चा केली. शहरात असलेल्या जलस्त्रोतांचा पुनर्विकास करणे, हेल्मेटसक्ती प्रमाणे रेनवॉटर हार्वेस्टिंगची सक्ती करणे, त्यासाठी जलजागृती करणे या उपक्रमांवर चर्चेत एकमत झाले. यासंदर्भात बुधवारी (२५ मे) बकोरिया यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्रात जलजागृती अभियानाचे आयोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला. दुपारी तीन वाजता हे अभियान होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


विमानतळ विस्ताराला मोजणी खर्चाचा खोडा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
विमानतळ विस्तारीकरणासाठी १८२ एकर जागा भूसंपादन करावे लागणार आहे. पण जमीन मोजणीच्या निम्म्या खर्चाच्या मुद्यावर प्रक्रिया रखडली आहे. निम्मा खर्च उचलण्याच्या महसूल विभागाच्या पत्राला विमानतळ प्राधिकरणाकडून अद्याप उत्तर मिळाले नसल्याने ही प्रक्रिया खोळंबली आहे.
औरंगाबाद विमानतळाच्या विस्तारीकरणाचा प्रयत्न गेल्या तीन वर्षांपासून सुरू आहे. त्याबद्दलचा प्रस्ताव विमानतळ प्राधिकरणातर्पे महसूल विभागाला देण्यात आला आहे. त्यानंतर महसूल विभागाने भूसंपादनाकरिता विमानतळ प्राधिकरणाने निम्मे पैसे देण्याची मागणी केली. ही मागणी विमानतळ प्राधिकरणाने फेटाळली आहे. देशभरात विमानतळाकरिता घेण्यात आलेल्या जागा महसूल विभाग किंवा राज्य शासनाकडून देण्यात देण्यात येतात, विमानतळ बांधण्याचा खर्च प्राधिकरण करते, असे महसूल विभागाला कळवण्यात आले आहे.
या घडामोडीनंतर विमानतळ विस्तारीकणाचा प्रस्ताव थंड बस्त्यात पडला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी औरंगाबाद विमानतळ विकासासाठी निधी घोषित करून तो एमआयडीसीमार्फत देण्याबद्दल घोषणा केली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा विस्तारीकरणाला वेग येणार, अशी चर्चा सुरू झाली. त्यासाठी विभागीय आयुक्तालयात बैठका घेण्यात आल्या. विमानतळ प्राधिकरणाने या बैठकांमध्ये विस्तारीकरणासाठी पूर्वेकडील जमीन घेण्यात येईल, असे संकेत दिले आहेत. पण विस्तारीकरणात पुन्हा अडचणी आल्या आहेत.
जमिनीचे मोजमाप भूमीअभिलेख विभागाकडून करावे लागणार असून मोजणीचे शासकीय शुल्क कोणी भरावी यावरून विमानतळ प्राधिकरण आणि महसूल विभाग आमने-सामने आले आहेच. महसूल विभागाने मोजणीकरिता विमानतळ प्राधिकरणाने पैसे भरावेत, अशी सूचना करणारे पत्र पाठवले आहे. जमीन देण्याची जबाबदारी राज्य शासनाची असल्याने मोजणीसाठी पैसे देण्यास विमानतळ प्राधिकरणाची तयारी नाही. त्यामुळे संबंधितांनी महसूल विभागाच्या पत्राला अद्याप उत्तर दिलेले नाही. दोन विभागांच्या परस्परविरोधी धोरणामुळे विस्तारीकरण रखडले आहे.

महसूल प्रशासनाने विमानतळ विस्तारीकरणाच्या जमीन मोजणीकरिता विमानतळ प्राधिकरणाकडे आवश्यक असलेल्या निम्म्या रकमेची मागणी केली होती. त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नसल्याने प्रकरण 'जैसे थे' आहे.
- शशिकांत हदगल, उपविभागीय अधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अंत्यविधीहून येताना कुटुंबातील तिघे ठार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कन्नड
अत्यंविधीहून येताना झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील तीन जण ठार, तर दोघे जखमी झाले. औरंगाबाद-धुळे राष्ट्रीय महामार्गावरील हतनूर शिवारात एका झाडावर कार आदळून गुरुवारी रात्री साडेअकराच्या सुमारास ही घटना घडली. मृतांत औरंगाबादचे नीलेश पाटणी, त्यांचा अडीच वर्षांचा मुलगा मिलन आणि सासरे महावीर कासलीवाल यांचा समावेश आहे.
धुळ्याकडून औरंगाबाद येत असलेली फोर्ड फिगो (एम. एच. १६ ए. जे. ४२०२) हतनूर शिवारातील वृंदावन ढाब्याजवळ गुरुवारी रात्री लिंबाच्या झाडावर आदळली. कार मधील नीलेश मदनलाल पाटणी (वय ३७, रा. एन ५ सिडको, औरंगाबाद) जागीच ठार झाले. मिलन नीलेश पाटणी या अडीच वर्षीय मुलाला औरंगाबादला उपचारासाठी नेत असताना रस्त्यात मृत्यूने गाठले. पाटणी यांचे सासरे महावीर बन्सीलाल कासलीवाल (वय ६५, रा. शहागंज) यांचा खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना मृत्यू झाला.
या कारमध्ये एकूण सहा जण होते, त्यापैकी दोन महिला व दोन बालके होती. मयत नीलेश पाटणी यांच्या पत्नी पल्लवी नीलेश पाटणी व आत्या पुष्पा ठोले (वय ४५, रा. श्रीरामपूर) या अपघातात गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांना उपचारासाठी औरंगाबादमध्ये एका खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. अपघात झाल्यानंतर ढाब्यावरील कर्मचाऱ्यांनी याची माहिती कन्नड पोलिसांना त्वरित दिली. हतनूरचे पोलिस पाटील प्रकाश पवार, पोलिस मित्र संतोष ढोले, पोहेकॉ मनोज घोडके, पोकॉ राजू संपाळ, सोनवणे, राजपूत यांनी मदत करून हतनूर येथील १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेने जखमींना उपचारासाठी औरंगाबाद येथे खासगी रुग्णालयात पाठवले. नीलेश पाटणी यांच्या पार्थिवाचे विच्छेदन हतनूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉ. शिवकुमार हजारे यांनी शुक्रवारी सकाळी केले. पोलिस निरीक्षक बाजीराव कुटे यांनी घटनास्थळी भेट दिली.
पाच वर्षाची पलक नीलेश पाटणी या अपघातातून सुखरूप बचावली. मरण पावलेले तिघे समोरच्या सीटवर बसले होते. कारची झाडाला जोरदार धडक बसल्याने ती तीन फूट मागे फेकली गेली. त्यावेळी कारमधील एअरबॅग उघडल्या. मात्र, त्यामुळे कोणाचे प्राण वाचू शकले नाहीत. मयत पाटणी यांच्यामागे आई, वडील, एक विवाहित बहीण व एक भाऊ आहे. त्यांचा औरंगाबादमध्ये महालक्ष्मी ट्रँव्हल्स हा व्यवसाय असल्याचे निकटवर्तीयांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘सीबीएसई’त कॉमर्सचा टक्का वरचढ

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएसई) घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल शनिवारी जाहीर झाला. औरंगाबादच्या विद्यार्थ्यांनी परीक्षेत नेत्रदीपक यश मिळविले. केंद्रीय विद्यालय वगळता शहरातील सर्वच शाळांचे शंभर टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. वाणिज्य शाखेतील विद्यार्थी विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांपेक्षा गुणवत्तेत सरस ठरले.
राज्य मंडळाप्रमाणे सीबीएसईतही मुलांच्या तुलनेत मुलींनीच बाजी मारली आहे. नाथ व्हॅलीची सिरत निरहने वाणिज्य शाखेतून ९६.२ टक्के, तर याच हायस्कूलचा अनंत काळे याने ९४.४ टक्के मिळवित यश मिळविले. सीबीएसईतर्फे १ मार्च ते २६ एप्रिल दरम्यान बारावीची परीक्षा घेण्यात आली. देशभरातून १० लाख ६५ हजार १७९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यातील ८३.५ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. मागील वर्षीच्या तुलनेत १.५ टक्क्यांनी निकालात वाढ झाली आहे. गतवर्षी ८२ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते. मुलांच्या तुलनेत मुलींचा उत्तीर्णतेचा टक्का अधिक आहे. एकूण विद्यार्थिनीपैकी ८८.५८ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या. मुलांचे उत्तीर्ण प्रमाण ७८.८५ टक्के एवढे आहे. औरंगाबादच्या विद्यार्थ्यांनीही परीक्षेत चमकदार कामगिरी केली. औरंगाबादमध्ये केंद्रीय विद्यालयासह, नाथ व्हॅली, पीएसबीए, जैन इंटरनॅशनल (जीआयएसए), रिर्व्हडेल हायस्कूल, स्टेफिंगस्टोन, पोदार अशा स्कूलमधून विद्यार्थी बारावीच्या परीक्षेला बसले होते. त्यात केंद्रीय विद्यालय वगळता सर्व हायस्कूलचा शंभर टक्के निकाल लागला.
शहरातून २८५ विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली. यातील २८२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. काही विद्यार्थ्यांना अनेक विषयात पैकीच्या पैकी गुण मिळाले. गणिताचा पेपर अवघड गेल्याने विद्यार्थ्यांचे टेन्शन वाढले होते, तर संगीतसारख्या विषयाने विद्यार्थ्यांना दिलासाही मिळाल्याचे सूत्रांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एव्हरेस्टवीर रफिकचा मनपातर्फे गौरव

$
0
0


औरंगाबादः गिर्यारोहक पोलिस कॉन्स्टेबल रफिक शेखने एव्हरेस्ट शिखर पादाक्रांत केले. असा पराक्रम करणारा तो पहिलाच असल्याने त्याचा महापालिकेतर्फे यथोचित गौरव करण्यात येणार असल्याचे महापौर त्र्यंबक तुपे यांनी 'मटा'शी बोलताना सांगितले.
एव्हरेस्ट शिखर सर करून रफिकने औरंगाबादचे नाव जागतिकस्तरावर पोहचवले. त्याच्या या कामगिरीची उचित दखल घेणे आवश्यक आहे. औरंगाबादकरांना अभिमान वाटावा अशीच ही कामगिरी आहे. महापालिकेतर्फे क्रीडा क्षेत्रातील नाविण्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या खेळाडूंची नोंद घेतली जाते. पहिला एव्हरेस्टवीर होण्याच्या बहुमान मिळवणाऱ्या रफिकला मानचिन्ह तसेच भरीव आर्थिक मदत देण्यासाठी मी निश्चितच पुढाकार घेणार आहे. त्याच्या आर्थिक परिस्थितीची मला कल्पना आहे आणि त्यामुळेच सर्वसाधारण सभेत त्याला मदत करण्याचा ठराव मांडण्यात येईल. त्याच्या गौरवासाठी महापालिका कुठेही कमी पडणार नाही, असे तुपे यांनी स्पष्ट केले. रफिक शेख औरंगाबादला परतल्यानंतर सत्कार सोहळ्याची तारीख निश्चित केली जाईल. औरंगाबादच्या क्रीडा क्षेत्राला साजेसा हा कार्यक्रम असेल असे त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लेबर कॉलनीत घुसखोर नाही

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
'१९६० मधील अध्यादेशानुसार लेबर कॉलनीतील घरांची खरेदी केल्याचे सार्वजनिक बांधकाम विभाग सांगत आहे. केंद्र शासनाच्या निधीतून उभी राहिलेली शासकीय निवासस्थाने कुणाकडे खरेदी केली ते स्पष्ट करा. गोपनीय कागदपत्रे दडवून मूळ रहिवाशांना घुसखोर ठरवून अन्याय केला जात आहे,' असा आरोप लेबर कॉलनी रेसिडेन्ट वेल्फेअर सोसायटीचे अध्यक्ष डी. एस. मनोरे यांनी केला. साई मंदिरात शनिवारी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
१९५२ मध्ये उभारलेल्या लेबर कॉलनी या शासकीय वसाहतीतील घरे सोडण्याची नोटीस बजावली आहे. या वसाहतीत वेगवेगळ्या विभागातील २५० कुटुंब राहतात. केंद्र शासनाचा ७५ टक्के निधी व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या २५ टक्के निधीतून कॉलनी उभी राहिली. तीन पिढ्या सोसायटीत राहिल्यामुळे आमच्यावर अन्याय सुरू असल्याचा आरोप रहिवाशांनी केला. याबाबत भूमिका मांडण्यासाठी रहिवाशांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी अध्यक्ष डी. एस. मनोरे, उपाध्यक्ष यु. के. खंडारे, अॅड. सचिन वर्मा, माजी नगरसेवक युनूस पटेल यांची प्रमुख उपस्थिती होती. 'मराठवाड्यात १३ शहरात अशा शासकीय वसाहती आहेत. औरंगाबाद वगळता इतरत्र संबंधित कर्मचाऱ्यांना घराचे हस्तांतरण झाले. मात्र, १९८७ मध्ये अध्यादेश निघूनही म्हाडाने हस्तांतरण केले नाही. याबाबत अनेक मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा केला. प्रत्येकवेळी स्थगिती मिळाली; मात्र, घरांचे हस्तांतरण झाले नाही' असे मनोरे यांनी सांगितले. सार्वजनिक बांधकाम विभाग वसाहत खरेदी केल्याचा दावा करीत असेल तर कुणाकडून खरेदी केली ते स्पष्ट करा असे आव्हान रहिवाशांनी दिले. 'हायकोर्टाने आदेश देऊनही लेबर कॉलनीला न्याय मिळाला नाही. कॉलनीच्या रचनेत बदल करू शकत नसल्याचे कोर्टाने स्पष्ट म्हटले आहे. मात्र, विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी जबाबदारी टाळत आहेत. या प्रकरणात मोठे अर्थकारण आहे. ही जागा बिल्डरला देऊन कोट्यवधी रूपये उभे करण्याचा प्रयत्न सुरू आहे' अशी टीका अॅड. वर्मा यांनी केली. दरम्यान, घरे रिकामी करण्यासाठी पोलीस रहिवाशांना त्रास देत असल्याचा आरोप नागरिकांनी केला.

रहिवाशांची गर्दी
लेबर कॉलनीत चाकरमानी मध्यमवर्गीय राहतात. घरे रिकामी करण्याची नोटीस आल्यानंतर रहिवाशी भेदरले आहेत. या पत्रकार परिषदेला कॉलनीच्या पदाधिकाऱ्यांसह रहिवाशी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आमच्यावरील अन्याय दूर करा अशी मागणी रहिवाशांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

युवा पिढीच्या करिअरला दिशा देणारा उपक्रम

$
0
0


Sudhir.Bhalerao@timesgroup.com
औरंगाबादः खंडेलवाल दिंगबर जैन हा मुळात राजस्थानी समाज. खंडेलवानगर या नावावरून खंडेलवाल समाज अशा नावाने हा समाज ओळखला जाऊ लागला. देशभरात या समाजाची लोकसंख्या लाखोंच्या घरात आहे. खंडेलानगर हे जैन समाजाचे प्रमुख केंद्र आहे. राजा-महाराजांची राजवट संपुष्टात आल्यानंतर व्यवसाय व रोजी-रोटीसाठी हा समाज देशभर विखुरला गेला.
मराठवाड्यात खंडेलवाल दिगंबर जैन समाज मोठ्या प्रमाणावर अनेक वर्षांपासून स्थायिक झालेला आहे. राजाबाजार येथे खंडेलवाल दिगंबर जैन पंचायत हे समाजाचे मुख्य स्थान. शहरातील दहा जैन मंदिरांचे कामकाज येथून चालते. धार्मिक, सामाजिकसह अनेक उपक्रम वर्षभर राबवले जातात. खंडेलवाल दिगंबर जैन समाज हा प्रामुख्याने व्यवसायभिमुख आहे. पारंपरिक तसेच विविध व्यवसायात या समाज आघाडीवर आहे. काळाच्या बदलानुसार अनेक आव्हाने समोर असली, तरी व्यवसायातील अढळ स्थान राखून हा समाज या आव्हानांना सामोरे जात आहे. या समाजातील युवा पिढीचा उच्च शिक्षणाकडे कल वाढलेला आहे. व्यवसायाबरोबरच उच्चपदस्थ नोकरी मिळवण्याकडे युवा पिढीचा कल आहे.

समाज सहायता निधी
खंडेलवाल दिगंबर जैन पंचायतच्यावतीने समाजातील दुर्बल कुटुंबांना शिक्षण तसेच आजारपणासाठी बिनव्याजी आर्थिक मदत केली जाते. औरंगाबाद शहरापुरती ही योजना राबवली जाते. २००१ पासून ही योजना अंमलात आणण्यात आली. समाज बांधवांकडून या योजनेकरिता निधी गोळा करण्यात आला. ५१०० ते ११ हजार रुपयांपर्यंत निधी दानशूरांनी दिला. जवळपास १२ लाखांचा निधी जमा झाला. या निधीच्या व्याजातून ही योजना राबवली जात आहे. शिक्षणाकरिता एक लाख रुपये दोन वर्षाच्या कालावधीसाठी दिले जातात. हॉस्पिटलसाठीही एक लाख रुपये तातडीने दिले जातात. या योजनेचा लाभ समाजातील अनेक युवक-युवतींनी घेतला आहे. आत्तापर्यंत १८१ विद्यार्थी व लोकांना हा निधी देण्यात आला आहे. या योजनेचा लाभ घेऊन अनेक युवा आज उच्च पदावर पोहचले आहेत. इंजिनीअर, सीए, संगणक तज्ज्ञ, औषधीशास्त्र अशा विविध क्षेत्रात समाजातील युवक-युवतींनी आपला ठसा उमटवला आहे, असे पंचायतचे अध्यक्ष ललित पाटणी, अॅड. एम. आर. बडजाते, अशोक गंगवाल यांनी सांगितले.

लग्नातील विविध खर्चांना फाटा
गेल्या दोन वर्षांपासून जैन समाजातील विवाह सोहळ्यात होणारा खर्च कमी करण्याकरिता पंचायतने पुढाकार घेतला आहे. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. एका लग्न कार्यात किमान १६ पदार्थ बनवले जातात. संगीत रजनी असे विविध कार्यक्रम घेतले जातात. अन्नाची नासाडी होऊ नये यासाठी विशेष लक्ष दिले जाते. धार्मिक परंपरेनुसार लग्न कार्य होतील यावर पंचायतने भर दिला आहे. या उपक्रमाला राज्यातच नव्हे तर राज्याबाहेरही चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे ललित पाटणी यांनी सांगितले. वधू-वर परिचय मेळावा, गरजुंना वह्या-पुस्तकांचे वाटप, अन्नदान असे विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात.

कुलदेवी मातांचे एकमेव मंदिर
राजाबाजार येथील खंडेलवाल दिगंबर जैन पंचायतच्या माध्यमातून कर्णपुरा भागात २०१०मध्ये कुलदेवी मातांचे मंदिर उभारण्यात आले. या समाजाच्या प्रत्येक गोत्राचे कुलदैवत राजस्थानात आहे. मात्र, प्रत्येकवेळी त्या कुलदैवताच्या दर्शनासाठी जाणे शक्य होत नाही. बारा कुलमातांच्या प्रतिकृती राजस्थान येथून बनवून आणण्यात आल्या. आचार्य प्रज्ञायोगी दिगंबर जैनाचार्य गुप्तीनंदी गुरुदेव यांच्या उपस्थितीत नवग्रह विधानात या मूर्तींची विधिवत प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. पंचायतचे अध्यक्ष ललित पाटणी व सुरेशकुमार ठोळे यांच्या ही संकल्पना आली आणि ती त्यांनी यशस्वीपणे साकारली. या मंदिरात चक्रेश्वरी माता, मातणी माता, जमवाई माता, औराली माता, जीन माता, चौऊथी माता, पद्मावती माता, अमन माता, सैतली माता, नांदणी माता, लोहणी माता, लोसिल माता यांची कर्णपुरा येथील मंदिरात प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे. कुलदेवी माता मंदिर हे देशातील एकमेव मंदिर असून नवरात्री उत्सवात या मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होते.

खंडेलवाल दिगंबर जैन पंचायत विश्वस्त मंडळः अध्यक्ष - ललितकुमार पाटणी, सचिव अशोक अजमेरा, विश्वस्त - भागचंद बिनायके, महावीर पाटणी, अॅड. एम. आर. बडजाते, चांदमल चांदीवाल, किरणकुमार पहाडे, डॉ. रमेशकुमार बडजाते, महेंद्र ठोले, प्रकाशचंद अजमेरा, दिलीप ठोले.

समाजातील साधू-संतांच्या सुविधेसाठी राजाबाजार परिसरातच तीन मजली भव्य इमारत उभारण्यात आली आहे. जैन धर्माच्या आहार, विधीप्रमाणे या ठिकाणी व्यवस्था करण्यात आलेली आहे. युवा पिढीचा शिक्षणाकडील कल पाहता त्यांना बाहेरगावी जाण्याची गरज पडणार नाही, याकरिता उच्च शिक्षणाबाबतचे मार्गदर्शन औरंगाबादेतच देण्याचा प्रयत्न आहे. - ललित पाटणी, अध्यक्ष, खंडेलवाल दिगंबर जैन पंचायत

समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील युवक-युवतीला शिक्षणासाठी निधी उपलब्ध करुन दिला जातो. आत्तापर्यंत अनेकांनी याचा लाभ घेतला असून इंजिनीअर, प्राध्यापकही झाले आहेत. आजारपणासाठीही बिनव्याजी एक लाख रुपयांपर्यंत मदत दिली जाते. गरजुंना याचा मोठा लाभ होत आहे. - अॅड. एम. आर. बडजाते

उच्च शिक्षणाचे युवा पिढीतील प्रमाण वाढते आहे. नोकरीकडे कल वाढलेला दिसून येतो. पारंपरिक व्यवसायही सांभाळताना युवा पिढीत दिसत आहे. पंचायतच्या माध्यमातून होतकरुंना वेळोवेळी मदत केली जात आहे आणि त्याचा फायदा होताना दिसून येत आहे. - अशोक गंगवाल

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तथागतांना अभिवादन

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
जगाला शांतीचा संदेश संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध यांची जयंती शहरात शनिवारी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. बुद्धवंदना, प्रवचन, भीमगीते, अभिवादन फेरी यासह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
सिद्धार्थ उद्यानातील भव्य अशा भगवान बुद्धांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादनासाठी पहाटे पाचपासून गर्दी झाली. याठिकाणी महापरित्राण पाठ, वंदना झाल्यानंतर ध्वजारोहण करण्यात आले, अशी माहिती महासंघाचे जिल्हाध्यक्ष अशोक कांबळे यांनी दिली. क्रांतिचौकातून भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल व भिक्खू संघाच्या वतीने तथगतांच्या मूर्तीची मिरवणूक काढण्यात आली. नूतन कॉलनी, सिल्लेखाना, पैठणगेट, गुलमंडी, सिटीचौक, भडकलगेट मार्गे ही मिरवणूक सिद्धार्थ उद्यानात दाखल झाली. उद्यानातील भव्य बुद्धमूर्तीला अभिवादन करून मिरवणुकीचा सांगता सोहळा पार पडला. दुपारनंतर या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभेतर्फे धम्मदीक्षा समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. महासभेतर्फे आयोजित केलेल्या सात दिवसीय श्रामणेर व बौद्धाचार्य प्रशिक्षण शिबिरातील श्रामणेर व बौद्धाचार्यांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. महापालिकेच्या वतीने महापौर त्र्यंबक तुपे, अतिरिक्त आयुक्त रमेश पवार, उपायुक्त रवींद्र निकम यांच्यासह रतनकुमार पंडागळे, माजी उपमहापौर प्रकाश निकाळजे, समता सैनिक दलाचे डी. व्ही. खिल्लारे, दिनकर ओंकार, किशोर जोहरे यांच्यासह शेकडो उपासकांनी अभिवादन केले.

बुद्धविहारांमध्ये त्रिशरण, पंचशील गाथा पठन
बुद्धलेणी येथे भंदन्त विशुध्दानंद बोधी महाथेरो यांच्या उपस्थितीत कार्यक्रम घेण्यात आला. जंयती निमित्त शहराच्या विविध भागात असलेल्या बुद्धविहारात बुद्धवंदना त्रिशरण पंचशील गाथाचे पठण करण्यात आले. चौका घाट येथील लोकुत्तरा बुद्ध विहारात बुद्धाच्या चरणी लिन होण्यासाठी मोठ्या संख्येने बुद्ध उपासक आणि उपासिका यांनी गर्दी केली. भंदन्त बोधीपालो महाथेरो, भन्ते आनंद बोधी महाथेरो, भंदन्त काश्यप थेरो, ज्ञानरक्षित, भिक्खू धम्मबोधी, भिक्खू रेवत, धम्मज्योत यांच्या प्रमुख उपस्थितीत पंचशील त्रिशरण व महापूजा झाली. त्यानंतर भंदन्त बोधीपालो महाथेरो यांचे प्रवचन झाले.

राष्ट्रीय समाज पक्ष
विठ्ठलनगर येथे आयोजित कार्यक्रमात भगवान गौतम बुद्ध यांना अभिवादन करण्यात आले. संतोष कोल्हे, शशिकांत शिंदे, संतोष लाखे, दिलीप रिठे, विष्णू शिंदे, किशोर माळी, रवी वैद्य, नारायण रिठे, सुरेश कटारे आदी उपस्थित होते.

काँग्रेस
काँग्रेसतर्फे भगवान बुद्ध जयंतीनिमित्त सिद्धार्थ उद्यान येथे सामूहिक त्रिशरण पंचशील घेण्यात आले. वॉर्ड क्रमांक १६ चे अध्यक्ष, आरोग्य सेवा सेलचे शहर सरचिटणीस आनंद भामरे, रोहन थोरात, अमित त्रिभुवन, अॅड. राजेंद्र वाघ, विशाल लांडगे, कडुबा राऊत, दादाराव बोर्डे, सॅम हिवाळे, शेखर शिर्के, विक्री भटकर आदी उपस्थित होते.

स्वाभिमान दलित पँथर
पँथरतर्फे तथागत भगवान गौतम बुद्ध जयंतीनिमित्त सिद्धार्थ उद्यान येथे अभिवादन करण्यात आले तसेच बुद्धवंदना घेण्यात आली. अध्यक्ष मिलिंद बोर्डे, संदीप अंगुरे, सचिन नरवडे, चंद्रकांत पारखे, खालीद शेख, पंकज खरात, विनोद बनकर, संदीप जाधव, समाधान गरुड आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जुन्या आठवणी जागवणारे लिखाण

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
'मनाच्या डायरीत लेखिका सुनिता चिपाटे यांनी अचूक निरीक्षणे नोंदवली आहेत. नोंदीमुळे अचूक व्यक्तीचित्रण आली आहेत. माणसांच्या अचूक छटा टिपणारे चिपाटे यांचे 'माझ्या कपाळाचं कुकू' पुस्तक वाचकांच्या जुन्या आठवणी जागवते' असे प्रतिपादन प्रसिद्ध मुलाखतकार सुधीर गाडगीळ यांनी केले. पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात ते बोलत होते.
सुनिता चिपाटे लिखित 'माझ्या कपाळाचं कुकू' या पुस्तकाचे शनिवारी तापडिया नाट्यमंदिरात प्रकाशन करण्यात आले. या कार्यक्रमाला गझलनवाज भीमराव पांचाळे, मुलाखतकार सुधीर गाडगीळ, प्रकाशक अनंत दाशरथे आणि लेखिका सुनिता चिपाटे यांची प्रमुख उपस्थिती होती. पुस्तकाच्या आशयावर गाडगीळ यांनी भाष्य केले. 'माझ्या कपाळाचं कुकू' पुस्तकातील लेख संवेदनशील मनाने टिपलेली तरल चित्र आहेत. माणसांच्या वेगवेगळ्या छटा लेखात आहेत. पुस्तक वाचताना नॉस्टॅल्जिया चाळवला जातो. आपल्या मनातील प्रसंग, माणसं जागे होऊ लागतात. लेख केवळ व्यक्तीछटा मांडत नाही, तर आवाज व निसर्गछटा मांडतात. उत्तम पुस्तक वाचल्याचा आनंद मिळतो' असे गाडगीळ म्हणाले. आपल्या लेखाचे पुस्तक प्रकाशित होणे हा आयुष्यातील अविस्मरणीय प्रसंग आहे. हा दिवस विसरणे केवळ अशक्य असल्याचे मनोगत सुनिता चिपाटे यांनी मांडले. स्त्रियांच्या सार्वत्रिक दुःखाची ही प्रातिनिधीक मांडणी आहे. सर्वसामान्य, शेतकरी, मजूर यांच्याप्रमाणे शहरी मध्यमवर्गीयांच्या भावना चिपाटे यांनी मांडल्या असे संजीव बोचरे म्हणाले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नीलेश चव्हाण आणि संयोजन सुनील चिपाटे यांनी केले. यावेळी रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पांचाळे यांना दाद
पुस्तक प्रकाशन सोहळ्यानंतर गजलनवाज भीमराव पांचाळे यांचा गायनाचा कार्यक्रम झाला. हळव्या गझलांनी रसिकांना भारावून टाकले. गझल गायनाचा सर्वोत्तम आविष्कार अनुभवत ही मैफल रंगली. अनेक श्रोत्यांनी उभे राहून कार्यक्रमाचा आनंद घेतला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एन्व्हायर्मेंटल केअर क्लस्टरची स्थापना

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
शहरातील औद्योगिक संघटनांनी एकत्र येत 'मराठवाडा एन्व्हायर्मेंटल केअर क्लस्टर' (एमइसीसी) या विशेष हेतू कंपनीची (एसपीव्ही) स्थापना केली आहे. अशा प्रकारचे क्लस्टर देशात पहिल्यांदा स्थापन केल्याची माहिती क्लस्टरचे अध्यक्ष बी. एस. खोसे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली. या क्लस्टरच्या माध्यमातून पावसाळ्यात वाळूज औद्योगिक वसाहतीत तीन लाख झाडे लावण्यात येणार आहेत.
क्लस्टरचे अध्यक्ष खोसे म्हणाले, 'या उपक्रमात सीआयआय, सीएमआयए, एमआयडीसी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, बजाज अॅटो, बजाज अॅटो व्हेंडर्स असोसिएशन सहभागी झाली आहेत. क्लस्टरच्या माध्यमातून औद्योगिक क्षेत्रातील दहा हजार नागरिकांना २६ जानेवारी २०१६ रोजी स्वच्छतेची शपथ देण्यात आली. क्लस्टरचा मुख्य उद्देश पर्यावरण संरक्षण व संवर्धन असा आहे. येत्या काळात तीन लाख झाडे लावण्याचे ठरविण्यात आले आहे. वाळूज औद्योगिक वसाहतीत रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावली जाणार आहेत. त्यासाठी तारेचे कुंपण घालण्यात आले आहे. क्लस्टरमध्ये वाळूज मधील दीड ते दोन हजार कारखाने सहभागी झाले असून लावण्यात आलेली झाडे त्यांना दत्तक दिली जाणार आहेत. त्यामुळे लावलेली झाडे शंभर टक्के जगतील. रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावण्याबरोबरच लँडस्केपिंग करणे, मोकळ्या जागेत वृक्षारोपण करणे हे उपक्रम देखील हाती घेतले जाणार आहेत,' असा उल्लेख त्यांनी केला. एन्व्हायर्मेंटल क्लस्टर भारतात सर्वप्रथम औरंगाबादमध्ये स्थापन झाल्याचा दावा सीएमआयएचे अध्यक्ष आशिष गर्दे यांनी केला. पत्रकार परिषदेला विजय लेकुरवाळे, रवींद्र कुलकर्णी, श्रीकांत मुंदडा, रवींद्र कोंडेकर, नारायण पवार, अनिल पाटील, अशोक काळे, राहुल मोगल, एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी राजेंद्र गावडे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पांढऱ्या वाघिणींचे वय झाल्याने आहार घटला

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
महापालिकेच्या प्राणिसंग्रहालयातील राणी आणि गीता या दोन पांढऱ्या वाघिणींचे वय झाल्यामुळे त्यांचा आहार घटला आहे. त्याचा परिणाम त्यांच्या शरीरावर होत आहे. महापौर त्र्यंबक तुपे यांनी शनिवारी या दोन्ही वाघिणींची पाहणी केली.
महापौर त्र्यंबक तुपे, उपमहापौर प्रमोद राठोड, अतिरिक्त आयुक्त रमेश पवार, उपायुक्त रवींद्र निकम, उद्यान अधीक्षक विजय पाटील यांनी शनिवारी सिद्धार्थ उद्यानाला भेट दिली. बौद्ध पौर्णिमेनिमित्त उद्यानातील भगवान गौतम बुद्धांच्या मूर्तीला त्यांनी अभिवादन केले. त्यानंतर प्राणिसंग्रहालयाची पाहणी केली. प्राण्यांना दिल्या जाणाऱ्या अन्नाच्या दर्जाची तपासणी आणि पिंजऱ्याच्या परिसरात फिरून तेथील स्वच्छतेचीही पाहणी करण्यात आली.
राणी आणि गीता या दोन पांढऱ्या वाघिणींनी काही दिवसांपासून अन्न-पाणी कमी केल्याची माहिती तेथील कर्मचाऱ्यांनी यावेळी दिली. राणीचे वय ३० वर्ष असून गीता १८ वर्षांची आहे. वय जास्त झाल्यामुळे त्याचा परिणाम आहारावर होतो. वाघांचे आयुष्यमान १८ ते २० वर्ष असते. या दोन्हीही वाघिणींना कोणताही आजार झालेला नाही, फक्त जेवणाचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे त्यांच्यात अशक्तपणा जाणवतो, असे कर्मचाऱ्यांनी लक्षात आणून दिले. जेवणाचे प्रमाण कमी होऊ नये म्हणून राणी आणि गीताच्या आहारात बदल करण्यात आला आहे. बिफ ऐवजी त्यांना चिकन दिले जात आहे. राणी आणि गीताची काळजी घ्या, त्यांच्या बद्दलची माहिती नियमित कळवीत जा, अशी सूचना महापौरांनी कर्मचाऱ्यांना केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अपघाताबद्दल स्टेशन मास्तरांना शिक्षा

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद

घाटनांदूर स्टेशनजवळ सिकंदराबाद-मनमाड एक्स्प्रेस मालगाडीवर आदळून झालेल्या अपघात प्रकरणात स्टेशन मास्तर आणि पॉइंट्समनना दोषी ठरवत कोर्टाने दोन वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. हा अपघात तीन जानेवारी २००३ रोजी पहाटे झाला होता. त्यामध्ये वीस प्रवाशांचा मृत्यू झाला होता, तर ७४ जण जखमी झाले होते.

स्टेशन मास्तर प्रशांतकुमार वर्मा आणि पॉइंट्समन विनायक नागरगोजे अशी दोषी आरोपींची नावे असून, ते दक्षिण-मध्य रेल्वेचे कर्मचारी आहेत. या प्रकरणात प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी (रेल्वे) ए. सी. डोईफोडे यांनी दोघांना शिक्षा ठोठावली आहे. सिकंदराबाद-मनमाड एक्स्प्रेस लातूरहून परळीकडे येत होती. पहाटे दीडला ती घाटनांदूर स्टेशनजवळ आली होती. तिला घाटनांदूरचा थांबा नव्हता. त्याचवेळी स्टेशनवर मालगाडी सिग्नलच्या प्रतीक्षेत उभी होती. थांबण्याचा सिग्नल न मिळाल्यामुळे, एक्स्प्रेस वेगाने मालगाडीवर आदळली. एक्स्प्रेसच्या चालकाने इमर्जन्सी ब्रेक लावल्यानंतरही, हा अपघात झाला. या धडकेनंतर एक जनरल आणि एक एसी कोच रुळावरून घसरला. परळीच्या रेल्वे पोलिस ठाण्याने प्रशांतकुमार वर्मा आणि विनायक नागरगोजे यांच्याविरोधात दोषारोपपत्र दाखल केले होते. या प्रकरणात तेरा साक्षीदारांच्या साक्षी महत्त्वपूर्ण ठरल्या. तसेच, सिग्नल आणि अन्य यंत्रणांमधील पुरावेही सादर करण्यात आले. 'स्टेशन मास्तर आणि पॉइंट्समन यांच्या हलगर्जीपणामुळे हा अपघात घडला असून, मानवी त्रुटीच अपघाताला कारणीभूत आहेत. मालगाडी स्टेशनवर असतानाच, एक्स्प्रेसला चुकीचा सिग्नल मिळाला,' याकडे सरकारी वकील आशीष दळे यांनी लक्ष वेधले.

मानवी चुकाच कारणीभूत

या अपघाताला मानवी चुकाच कारणीभूत असल्याचे सांगत, कोर्टाने वर्मा आणि नागरगोजे यांना दोषी ठरविले. या अपघाताला कारणीभूत ठरल्याप्रकरणी दोघांनाही दोन वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली. रेल्वे कायद्याप्रमाणे वर्माला दोन वर्षांची सक्तमजुरी आणि ५० हजार रुपये दंड, तर नागरगोजेला एक वर्षाची शिक्षा आणि पाच हजार रुपये दंड सुनावण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

औरंगाबादचे रस्ते अडकले नागपुरात : गडकरी

$
0
0

Unmesh.Deshpande@timesgroup.com

औरंगाबाद : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूरचे असल्यामुळे सध्या नागपूरचा बोलबाला आहे. महत्त्वाच्या बहुतेक प्रकल्पांनी नागपूरचा रस्ता धरला आहे. आता औरंगाबादचे रस्तेदेखील नागपूरच्या कार्यालयात मंजुरीसाठी अडकले आहेत. जालना रोड आणि बीड बायपास या रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाचा प्रस्ताव व प्रोजेक्ट डिझाइन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या नागपूर येथील मुख्य कार्यालयात पडून आहे. प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यावर निविदा प्रक्रिया होऊन काम सुरू होईल. प्रस्तावाला मंजुरी केव्हा मिळेल याबद्दल मात्र अनिश्चितता आहे.

नितीन गडकरी यांनी याबाबतची घोषणा केली होती. मात्र पाच महिने झाले तरी, प्रत्यक्ष हालचाल नाही. गेल्या आठवड्यात भाजपचे आमदार अतुल सावे यांनी सांगितले की, या दोन्हीही रस्त्यांची निविदा जूनच्या पहिल्या आठवड्यात निघेल व पुढील तीन महिन्यांत प्रत्यक्ष काम सुरू होईल. सावे यांच्या या विधानाच्या आधारे निविदेची स्थिती काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न 'मटा'ने केला असता प्राधिकरणाच्या मुख्य कार्यालयात फाइल असल्याचे समजले. मंजुरी मिळत नाही तोपर्यंत निविदा काढता येत नाही. त्यामुळे आता प्रतीक्षा आहे ती मंजुरीची.

नितीन गडकरी यांनी केली होती घोषणा

नगर नाका ते केंब्रिज शाळा हा ११ किलोमीटरचा जालना रोड, प्राधिकरणाच्या माध्यमातून काँक्रिटचा करण्याची घोषणा केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी २५ डिसेंबर रोजी केली होती. यासाठी ४०० कोटी रूपयांचा निधीही त्यांनी मंजूर केला. बीड बायपास रस्ताही काँक्रिटचा करण्याची घोषणाही त्यांनी केली. महानुभाव आश्रम ते झाल्टाफाटा या चौदा किलोमीटर रस्त्यासाठी ४५० कोटी रूपये मंजूर केले. औरंगाबादमधील दोन महत्त्वाच्या रस्त्यांची कामे एकूण साडेआठशे कोटी रुपये खर्चाने होणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेल्‍वेचे सात दिवस स्वच्छता अभियान

$
0
0

रेल्‍वेचे सात दिवस स्वच्छता अभियान

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद -

केंद्रातील भाजप सरकारला दोन वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर रेल्वेने सात दिवस स्वच्छता अभियान राबविण्याचा निर्णय घेतला आहे. औरंगाबाद रेल्वेस्टेशनवर या अभियानाची सुरुवात करण्यात आली. रेल्वेस्टेशन परिसरातील पार्किंगच्या बाजूच्या भागाची स्वच्छता रेल्वे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केली.

भाजप सरकारने सत्तेवर येताच देशभरात स्वच्छता मोहीम सुरू केली. त्याला देशभरातून चांगला प्रतिसाद मिळाला. स्वच्छता हा सातत्याने करण्याची बाब आहे, त्यामुळे रेल्वेने सरकारला दोन वर्षे पूर्ण होत असताना पुन्हा ही मोहीम हाती घेतली आहे. २६ मे ते १ जून या काळात ही मोहीम देशभरात राबविली जाणार आहे. या मोहिमेचे औरंगाबादला सहाय्यक विभागीय व्यवस्थापक के. गुप्ता, विभागीय अभियंता राजकुमार वानखेडे, रेल्वे स्टेशन प्रमुख ए. सी. निकम, वाहतूक विभागाचे अधिकारी एल. के. जाखडे, आरोग्य निरीक्षक आशुतोष यांच्या उपस्थितीत रविवारी उद्‍घाटन करण्यात आले. औरंगाबादसह अन्य रेल्वे स्टेशनचीही स्वच्छता करण्यात आली.

पाच ट्रॅक्टर कचरा उचलला

रेल्वे स्टेशनच्या पार्किंग जवळील भागात रविवारी सकाळपासूनच स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या अभियानात पाच ट्रॅक्टर कचरा उचलण्यात आल्याची माहिती अभियानात सहभागी अधिकाऱ्यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेतकऱ्यांना कर्जमाफी नको; सक्षम करा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
'दुष्काळामुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांची होरपळ होत असून शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. मात्र कर्जमाफी हा त्यावर पर्याय असू शकत नाही. कर्जमाफी देण्याऐवजी शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या बळकट करण्याचा प्रयत्न करण्याची गरज आहे,' असे प्रतिपादन मंत्रीपदाची माळ गळ्यात पडण्याची वाट पाहत असलेले राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी रविवारी पत्रकार परिषदेत केले.
शेतकऱ्यांचे कर्जमाफ करण्याचे प्रयोग यापूर्वीही करण्यात आले आहेत, मात्र यात सर्वसामान्य शेतकऱ्यांना फायदा होण्याऐवजी मोठ्या शेतकऱ्यांना याचा फायदा झाला. पश्चिम महाराष्ट्रात शेतकरी कोट्यवधी रुपयांचे कर्ज घेतात, सर्वसामान्य गरीब शेतकऱ्याने कर्ज घेतले असले तरी तो प्रमाणिकपणे कर्जफेड करतो. आज शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याची गरज आहे. त्यानुसार शासनाने पाऊले उचलण्याची गरज आहे. कर्ज घेतले तर, ते फेडावे तर लागणारच त्यामुळे कर्जमाफी हा पर्याय होऊ शकत नसल्याचे जानकर म्हणाले.
मंत्रीपद मिळण्याबाबत जानकर म्हणाले की, माझ्या पक्षाची ताकद सध्या कमी असल्याने मला मागणी करता येणार नाही. येणाऱ्या काळात पक्षाची ताकद वाढवण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असून पुढच्या निवडणुकीत बारामतीतून राष्ट्रीय समाज पक्षाचा खासदार निवडून येईल असा दावा त्यांनी केला. सत्ताधारी भाजप व शिवसेनेमध्ये कुरघोडीच्या राजकारणाबद्दल जानकर म्हणाले की, वादविवाद होत असले तरी युती तुटणार नाही, सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेल. भाजप-शिवसेनेपेक्षा काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अधिक भांडणे होती, असा टोला त्यांनी लगावला.
दुष्काळाने होरपळत असलेल्या महाराष्ट्रात शासनाने जलयुक्त शिवार अभियानारखी चांगली योजना सुरू केली याचा उपयोग दोन वर्षानंतर दिसेल. मात्र सध्या पाणी आणि वीज या दोन गोष्टींमध्ये राज्य शासन कमी पडत आहे. यासाठी अधिक काम करण्याची गरज आहे. अत्यल्प पर्जन्यमानामुळे सर्वसामान्य नागरिक, शेतकरी अडचणीत सापडला आहे, पाण्याच्या नियोजनासंदर्भात जलअभ्यासक प्रा. एच. एम. देसरडा, राजेंद्र सिंग यांचे कुणीही ऐकले नाही, शिवाय चितळे समितीचा अहवाल योग्य रितीने राबवायला हवा होता, असे जानकर म्हणाले.
भाजप क्रमांक एक तर शिवसेना हा आमचा दुसऱ्या क्रमांचा मित्रपक्ष आहे. मात्र राष्ट्रीय समाज पक्ष स्थानिक स्तरावरील निवडणुकांमध्ये स्वतंत्रपणे लढतो. जेथे आम्ही स्वतंत्रपणे लढतो तेथे भाजपला नुकसान पोहचत असल्याचे सांगत यंदा आम्ही मुंबई महापालिकेत खाते उघडणार असल्याचे महादेव जानकर यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पाणी, वित्त आयोगाचे नियोजन करा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, लातूर
जलयुक्त शिवार योजनेमुळे गावा-गावांत पाणी उपलब्ध होणार आहे. त्या पाण्याचे आणि चौदाव्या वित्तआयोगाच्या माध्यमातून ग्रामपंचायतीना मिळणाऱ्या थेट निधीचे योग्य नियोजन सरपंचानी व ग्रामसभेने करण्याचे आवाहन ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी लातूर येथे केले.
जिल्हा परिषद लातूरच्यावतीने २०१२-१३ सालचे निर्मल ग्रामपुरस्काराचे रविवारी पंकजा मुंडे यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. लातूर जिल्ह्यातील ५३ ग्रामपंचायतीना पुरस्कार देण्यात आले. समारंभाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्षा प्रतिभा पाटील-कव्हेकर होत्या. यावेळी आमदार सुधाकर भालेराव, आमदार विनायक पाटील यांची ही उपस्थिती होती.
समारंभाचे प्रास्ताविक मुख्यकार्यकारी अधिकारी दिनकर जगदाळे यांनी केले. २०१८ पर्यंत लातूर जिल्हा हगणदारी मुक्त करण्याचा संकल्प लातूर जिल्हा परिषदेने केला असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी आमदार सुधाकर भालेराव यांनी दलित वस्ती सुधारणा कार्यक्रम हा कागदावरच राहू नये अशी अपेक्षा व्यक्त करून प्रत्येक गावात स्मशानभुमीचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी केली. आमदार विनायक पाटील यांनी आम्हाला किती दिवस अपक्ष ठेवणार असा सवाल करून सध्या अपक्ष आमदारांना कोणी विचारत नाही. भाजप- सेनेचे बिनसले तर आम्हाला चांगले दिवस येतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
पंकजा मुंडे म्हणाल्या, 'चौदाव्या वित्त आयोगातून राज्यातील ग्रामपंचायतीना १४ हजार कोटींचा निधी मिळणार असला तरी त्याचा गर्व न करता जबाबदारीने त्या निधीचा उपयोग करण्यासाठी सरपंचानी नियोजन करावे. ज्या घरी शौचालय नाही त्या घरी मी लग्न करून नांदण्यास जाणार नाही असा मुलींनी निर्धार केला तर मुलांचे लग्न ही होणार नाहीत अशी जाणीव करून द्या.'
यावेळी त्यांनी निर्मल ग्राम पुरस्कार प्राप्त सरपंच, ग्रामसेवकांचा सत्कार केला. त्याच प्रमाणे आदर्श पंचायत समितीचे पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांचा ग्रामविकास मंत्री मुंडे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. कार्यक्रमास व्यवस्थापक प्रमोद हुडगे यांनी लिहिलेल्या जलसंजिवनी या मार्गदर्शक पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नाविन्यपूर्ण पद्धतीने तयार करण्यात आलेल्या तयार शौचालयाचे आणि शोष खड्याच्या आराखड्याची पाहणी मंत्रीमहोदयानी केली. नाविन्यपूर्ण पद्धतीने केलेले शौचालय हे उपयोगी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सुजितसिंह ठाकूर यांची विधान परिषदेवर वर्णी ?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, उस्मानाबाद
विधान परिषदेच्या रिक्त झालेल्या दहा जागांसाठी १० जून रोजी मतदान होत आहे. पक्षीय बलाबल पाहता दहा पैकी पाच जागा भाजपला तर दोन जागा शिवसेनेच्या वाट्याला येत आहेत. भाजपच्या कोट्यातून उस्मानाबाद जिल्ह्याला प्रतिनिधीत्व दिले जाणार असून प्रदेश सरचिटणीस सुजीतसिंह ठाकूर यांचे नाव आघाडीवर असल्याची माहिती विश्वसनीय सुत्रांनी 'मटा'शी बोलताना दिली.
विधानसभेतील पक्षीय बलाबल लक्षात घेता दहापैकी सर्वाधिक पाच जागा भाजपला मिळतील. दुसरीकडे शिवसेनेने त्यांच्या हक्काच्या दोन जागांसाठी पक्षाच्या दोन ज्येष्ठ मंत्र्यांची उमेदवारी जाहीर करून टाकली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला मिळून तीन जागा जिंकता येतात. त्यासाठी दोन्ही काँग्रेसमध्ये वरिष्ठ पातळीवर वाटाघाटी सुरू आहेत.
भाजपच्या वाट्याला येणाऱ्या पाच जागांपैकी तीन जागा मित्रपक्षांना देण्याची चर्चा सुरू आहे. तर दुसरीकडे भाजपच्या संघटनेत काम करणाऱ्यांनाही विधानपरिषदेवर संधी देण्याचे भाजपच्या श्रेष्ठीने ठरविले आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातून भाजपचा एकही आमदार निवडून आलेला नाही. त्यामुळ‌े उस्मानाबाद जिल्ह्यातील पक्ष बळकट करण्यासाठी व गेल्या अनेक दिवसांपासून संघटनेत प्रभावीपणे काम करणाऱ्या सुजितसिंह ठाकूर यांच्या नावाची चर्चा सध्या जोरात सुरू आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील भाजपला 'अच्छे दिन' येण्यासाठी ठाकूर यांच्या माध्यमातून प्रतिनिधीत्व देण्याची गरज आहे.

मित्रपक्षांकडून मेटे, खोत चर्चेत
भाजपकडून ठाकूर यांच्याशिवाय पक्ष प्रवक्ते माधव भांडारी यांचे नाव चर्चेत आहे. निवृत्त होत असलेल्या माजी मंत्री शोभाताई फडणवीस यांना संधी मिळण्याची शक्यता कमी आहे. तर मित्रपक्षांकडून शिवसंग्रामचे विनायक मेटे, शेतकरी स्वाभिमानी संघटनेचे सदाभाऊ खोत, रिपाईच्या एकास संधी मिळण्याची दाट शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जेईई-अॅडव्हान्स परीक्षाकेंद्रामुळे गैरसोय टळली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
देशपातळीवर अभियांत्रिकी प्रवेशासाठी घेण्यात येणारी जेईई-अॅडव्हान्स परीक्षा रविवारी पहिल्यांदाच औरंगाबादमध्ये पार पडली. औरंगाबादमध्ये केंद्र असल्याने वेळ व पैशाची बचत झाली व अभ्यासाला वेळ मिळाला, अशी भावना विद्यार्थ्यांमधून व्यक्त झाली. शहरातील तीन परीक्षावर ११९९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली.
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळतर्फे ३ एप्रिल रोजी जेईई-मेन घेण्यात आली. त्याचा निकाल २७ एप्रिल रोजी जाहीर झाला. त्यातून अॅडव्हान्ससाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांची परीक्षा रविवारी घेण्यात आली. मेन्सचे औरंगाबादला केंद्र आहे, परंतु अॅडव्हान्सचे परीक्षा केंद्र मुंबई, पुणे, नागपूर येथे होते. त्यामुळे मराठवाड्यासह संपूर्ण राज्यातील विद्यार्थ्यांना ही परीक्षा देण्यासाठी चारशे ते पाचशे किलोमीटरचा प्रवास करून जावे लागायचे. त्यात वेळ आणि पैसा खर्च होत असे. त्यामुळे औरंगाबादला केंद्र देण्याची मागणी पलकांकडून होत होती. अखेर औरंगाबाद येते परीक्षा केंद्र मान्य करण्यात आले. त्यानुसार पहिली परीक्षा पार पडली. शहरातील देवगिरी, स.भु. व जेएनईसी या तीन परीक्षा केंद्रात परीक्षा घेण्यात आली. औरंगाबाद केंदावर पहिल्यांदाच परीक्षा होत असल्याने पालक, विद्यार्थ्यांमध्ये उत्साह होता. सकाळी ९ ते १२ आणि दुपारी २ ते ५ या दरम्यान दोन सत्रात परीक्षा झाली.

फिजिक्स 'टफ', नियोजन सुद्धा 'टफ'
अॅडव्हान्समध्ये फिजिक्सचा पेपर 'टफ' असल्यसाचे परीक्षार्थींनी सांगितले. काहीजणांना मॅथ्सचा पेपर अवघड गेला. २०१२ नंतर प्रथमच फिजिक्सचा पेपर 'टफ' असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. मुंबई आयआयटीच्या नियंत्रणात ही परीक्षा झाली. परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या सूचनांचे योग्य ते पालन केले गेल्याचे चित्र होते. प्रत्येक विद्यार्थ्याचे बायोमेट्रिक नोंद घेण्यात आली. यासह शूज, बॅग, मोबाइल वापरावर बंदी होती. विद्यार्थ्यांना पेहरावाबद्दल सुद्धा सूचना देण्यात आल्या होत्या.

आपल्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी मुंबई, पुणे केंद्रावर परीक्षेला जावे लागायचे. औरंगाबादला केंद्र आल्यामुळे आपल्या विद्यार्थ्यांचा हा प्रवासाचा वेळ वाचला. त्यामुळे निश्चितच त्याचा फायदा झाला. हे पहिले वर्ष होते, पुढे परीक्षार्थींची संख्या वाढेल.
-काझी निहाल अहमद, पालक.

मला अभ्यासाला कालपर्यंत वेळ मिळाला हे माझ्यासाठी चांगली बाब आहे. सेंटर औरंगाबादला नसते तर, इतर शहरात परीक्षेसाठी जावे लागले असते. त्यासाठी लागणारा वेळ, पैसा दोन्ही वाचले. पेपरही चांगला गेला आता निकालाकडे लक्ष आहे.
-अजित झोटे, विद्यार्थी.

'पेपर-१' पेक्षा 'पेपर-२' थोडासा अवघड होता. गणिताची काठिण्य पातळी उंच होती. परीक्षेचे नियोजनही उत्तम होते. आपल्या शहरातच परीक्षा होत असल्याने थोडा मानसिक ताण कमी झाला.
-मिहीर शहा, विद्यार्थी.

फिजिक्सचा पेपर 'टफ' होता. माझ्या अभ्यासानुसार २०१२ नंतर २०१६ मध्येच पेपर टफ ठरला. अनेक विद्यार्थ्यांचे हेच मत होते. इतर विषयांचे पेपर ठिक होते. त्यात काही अवघड वाटले नाही.
-शुभम वाणी, विद्यार्थी.

औरंगाबादला परीक्षेचे केंद्र आल्यामुळे आपल्या विद्यार्थ्यांचा मोठा दिलासा मिळाला आहे.मला फिजिक्सचा पेपर चांगला वाटला. मॅथ्स थोडेसे विक असल्याने त्यात काही उत्तरे देताना अडचणी आल्या. पेपर एकूण पेपर टफ होता.
-पुर्वीन खंडेलवाल, विद्यार्थी.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सरकत्या जिन्न्याचे काम सरकेना

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
एक मे रोजी सरकत्या जिन्याचे उदघाटन करण्याचे आश्वासन देणाऱ्या विभागीय रेल्वे व्यवस्‍थापक अखिलेश सिन्हा यांना त्यांच्याच विभागाने तोंडघशी पाडले आहे. रेल्वे स्टेशनवरील जिन्याचे काम अद्याप अपूर्ण आहे.
महाराष्ट्र दिनाला उदघाटन न झाल्याने सरकत्या जिन्याचे अजूनही काम पुर्ण झालेले नाही. आगामी सात दिवसात या सरकत्या जिन्‍न्याचे काम पुर्ण होणार असल्याची नवीन माहिती रेल्वे अधिकाऱ्यांकडून दिली जात आहे.
रेल्वे स्टेशनवर सरकता जिना तयार करण्याचा निर्णय दोन वर्षांपूर्वी घेण्यात आला आहे. त्या कामाचे उदघाटन दक्षिण मध्य रेल्वेचे तत्कालीन महाव्यवस्‍थापक पी. के. श्रीवास्तव यांच्या हस्ते करण्यात आले. त्याच्या चार महिन्यानंतर दोन मशीन मुंबईहून मागवण्यात आल्या. उदघाटनाच्या सहा महिन्यानंतर जिना बसवण्याचे काम सुरू करण्यात आले. नवीन महाव्यवस्‍थापक रवींद्र गुप्ता रुजू होण्यापूर्वी सुरू झालेले काम अद्याप संपलेले नाही. हे काम १ मेपर्यंत पूर्ण करण्याचे आश्वासन रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांनी नांदेडचे डीआरएम अखिलेश सिन्हा यांना पत्रकारांसमोर दिले होते. त्यांनी त्यावर विश्वास ठेऊन महाराष्ट्र दिनानिमित्त सरकता जिना सुरू करण्याची घोषणा केली. मात्र, मे महिना संपत आला तरी, काम पूर्ण झालेले नाही. याबाबत रेल्वे अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता सात दिवसात काम पूर्ण होईल, असे सांगण्यात आले.
फलाट क्रमांक २ किंवा ३ वर जाण्यासाठी दादऱ्यावरून जावे लागत आहे. नवीन इमारतीमध्ये प्रवेश केल्यानंतर जिन्याशेजारी फलाट क्रमांक १ न २ वर काम सुरू आहे. त्यामुळे दादऱ्याच्या एकाच बाजुचा वापर होत असलस्याने रेल्वेच्या वेळी कोंडी होत आहे. त्याचा वृद्ध, महिला आणि मुलांना त्रास होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वॉटर ट्रेनच्या मुक्कामाने अडीच कोटींचा फटका

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

निम्न दुधना प्रकल्पातील पाणी परतूरहून दुष्काळी लातूरला रेल्वेद्वारे पाठविण्याची घोषणा राज्य सरकारने घोषणा केली. पाणी नेण्यासाठी रेल्वेही औरंगाबादेत दाखल झाली, मात्र त्याचे कोणतेही नियोजन न केल्यामुळे रेल्वे विभागाला अडीच कोटींचा फटका बसला आहे, अशी माहिती रेल्वेच्या वाणिज्यिक विभागाच्या सूत्रांनी दिली.

तीव्र पाणी टंचाईचा सामना करणाऱ्या लातूर शहराला मिरज येथून रेल्वेद्वारे पाणी पुरविण्यात येत आहे. मिरजपेक्षा परतूरजवळ असलेल्या निम्न दुधना प्रकल्पातून पाणी नेल्यास खर्चात बचत होईल. त्यामुळे परतूर येथून पाणी नेण्याचा प्रस्ताव सरकारकडे सादर करण्यात आला होता. या प्रस्तावाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे आणि महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी परतूर रेल्वे स्‍थानक, पाणीपुरवठा योजना यांची पहाणी केली होती. राज्य सरकारसमोर हा प्रस्तावअसताना औरंगाबाद रेल्वे स्टेशनला कोटा राजस्थान येथून विशेष वॉटर ट्रेन मराठवाड्यात पाठविण्यात आली. ही रेल्वे ६ मे रोजी शहरात दाखल झाली होती. ५० वाघिण्या असलेल्या ही रेल्वे औरंगाबाद स्टेशनवर १३ दिवस थांबून होती. राज्य शासनाकडून या रेल्वेची गरज नसल्याचे उत्तर उशिरा पाठविण्यात आले. त्यानंतर ही रेल्वे पुन्हा कोट्याकडे रवाना करण्यात आली.

या रेल्वेतून पेट्रोल, केरोसिन, अन्य पेट्रोलियम पदार्थांची वाहतूक केली जाते. मराठवाड्याला पाण्याची गरज असल्याने या रेल्वेच्या वाघिण्या विशेष अॅसिड, रसायनांचा वापर करून साफ करण्यात आल्या. त्यानंतर ही रेल्वे औरंगाबादला पाठविण्यात आली. येथे रेल्वे १३ दिवस होती. या रेल्वेतून पेट्रोल व अन्य रसायनांच्या वाहतुकीतून रोज सुमारे १५ ते २० लाख रुपयांचे उत्पन्न मिळते. दररोज या रेल्वेच्या मेंटेनन्सही करावा लागला. रेल्वे १३ दिवस येथे विनावापर थांबल्याने सुमारे अडीच कोटीचा भुर्दंड बसल्याची माहिती रेल्वेच्या सूत्रांनी दिली.

रेल्वे विभागाने विविध द्रव पदार्थ; तसेच विविध रासायने वाहतुकीचे दर निश्चित केले आहेत. त्यासाठी वर्गवारी करण्यात आली आहे. पेट्रोलियम पदार्थाचा समावेश वर्ग १८०मध्ये करण्यात येतो असतो. या वर्गामध्ये एव्हिऐशन टरबाइन ऑईल, कॉम्प्रेस गॅस, क्रुड ऑइल, डिझेल ऑइल, मिथेन गॅस, पेट्रोल व अन्य वायूंचा समावेश आहे. या ऑइल आणि गॅसच्या वाहतुकीसाठी विविध अंतरासाठी प्रति टन दर देण्यात आला आहे.

डॅम रेज आणि वॉर फेजची किंमत वेगळी

रेल्वे विभागाकडून एखादी मालगाडीवर माल लोड करण्यासाठी; तसेच लोड काढण्यासाठी एक निश्चित वेळ देण्यात येतो. माल उतरविण्यासाठी किती वेळ लागतो, त्या प्रमाणात शुल्क आकारणी केली जात आहे. या दंडातूनही रेल्वेची मोठी कमाई होत असते.

असे आहेत रेल्वेचा दर

किलोमीटर...............प्रतिटन दर १ ते १२५..................२५५.२० १२६ ते १५०..............३११.२० १५१ ते १७५..............३४८.८० १७६ ते २००..............३९०.१० २०१ ते २२५..............४०४.४० ३०१ ते ३२५..............५८९.१० ५०१ ते ५५०..............९५४.२० १००१ ते ११००............१८३५.३०

(हे दर या रेल्वे मंत्रालय व रेल्वे बोर्ड यांच्याद्वारे काढण्यात आलेल्या अध्यादेश क्रमांक ८/२०१५प्रमाणे आहेत.)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images