Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

मुकुंदवाडी ठाण्याबाहेर हाणामारी; तिघांवर गुन्हा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
पोलिस ठाण्याबाहेर हाणामारी करणाऱ्या तिघांना मुकुंदवाडी पोलिसांनी अटक केली. मुकुंदवाडी पोलिस ठाण्यासमोर शनिवारी सायंकाळी पाच ते सहा वाजता हा प्रकार घडला. याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शनिवारी सायंकाळी आपसात झालेल्या हाणामारीची तक्रार देण्यासाठी काही नागरिकांचा जमाव मुकुंदवाडी पोलिस ठाण्यासमोर आला होता. यावेळी ठाण्याबाहेर गोंधळ सुरू झाल्याने पोलिसांनी तिकडे धाव घेतली. यावेळी त्याना तीन जण आपसात हाणामारी करताना आढळले.
पोलिसांनी या तिघांना ताब्यात घेतले. ज्ञानेश्वर रावसाहेब थोरे पाटीलन (वय २९, रा. खोकडपुरा), पंढरीनाथ भगवान जायभाय (वय ३२, रा. जयभवानीनगर) व गणेश एकनाथ सातपुते (वय ३३, रा. मुकुंदवाडी) अशी आरोपींची नावे आहेत. त्यांना सार्वजनिक ठिकाणी धुडगूस घातल्याबद्दल
गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. पोलिस कर्मचारी प्रवीण शिवाजी गायकवाड यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली. जमादार गवारे तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मारवाडी समाजातर्फे जलमित्रांचा सत्कार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
'निसर्ग आपल्यास भरभरून दान देतो, पण मानवालाच या अमोल संपत्तीचे महत्त्व नाही. पाण्याइतकी नासाडी तर कधीच पाहली नाही. पाण्याचे दुर्भिक्ष्य पाहता केवळ पाऊस पडला म्हणजे प्रश्न मिटला असे नव्हे. जमिनीत पाणी जिरवणेही तितकेच गरजेचे आहे,' असे प्रतिपादन जल‌तज्ज्ञ विजय केडिया यांनी केले.
सकल मारवाडी युवा मंच व माहेश्वरी बहू मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील दोनशेहून अधिक ‌ठिकाणी जलफेरभरण प्रकल्प यशस्वीपणे पूर्ण करण्यात आला. जलसंवर्धनाच्या या कामाचे उत्कृष्ट नियोजन करणारे प्रकल्पप्रमुख, प्लंबर व नागरिक यांचा सत्कार कार्यक्रम गुरुवारी खडकेश्वरच्या हॉटेल कृष्णा इन इथे झाला. खेळीमेळीच्या वातावरणात झालेल्या या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे खामगावचे विजय चौधरी होते. व्यासपीठावर सकल युवा मंचचे अध्यक्ष संजय मंत्री, नरेश मोरे, माहेश्वरी बहू मंडळाच्या अध्यक्ष पूनम सारडा, ‌‌स्मिता सोनी, श्वेता खटोड उपस्थित होत्या. यावेळी मारवाडी समाजातील विविध संघटनांचे अध्यक्ष व प्रतिनिधीही उप‌स्थित होते. यामध्ये पद्मा तापडिया, निर्मला अग्रवाल, विजया तापडिया, तारा सोनी, मीना नावंदर, संजय सारडा, मुकुंद गट्टाणी आदींचा समावेश होता. 'बुंद-बुंद पाणी जमी के अंदर' या प्रामाणिक हेतूने सकल मारवाडी युवा मंच व माहेश्वरी बहू मंडळाने संबंध उन्हाळा जलफेरभरणाचे काम केले. प्रकल्प्रमुख, जलतज्ज्ञ केडिया व प्लंबर यांच्या टीमने घर, शाळा, दवाखाने व सोसायट्यांमध्ये प्रकल्प पूर्ण करताना कमीत कमी बजेट, एका दिवसात काम पूर्ण करणे, व्यवहारातील पारदर्शिपणा ही त्रिसुत्री जपली. यामुळे या कामाची खूप प्रशंसा झाली. सोशल मीडियामुळे कनेक्टिव्हीटीही छान झाली. प्रकल्पासाठी सकल मारवाडी युवा मंचतर्फे अध्यक्ष संजय मंत्री, अमित भोमा, अशोक शिवाल, नरेश मोर व माहेश्वरी बहू मंडळातर्फे अध्यक्ष पूनम सारडा, स्मिता सोनी, अर्चना तोष्णीवाल, श्वेता खटोड यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास मारवाडी युवा मंचचे सचिव अमित काला, रुपेश कलंत्री, अमित भोमा व अशोक शिवाल, माहेश्वरी बहू मंडळाच्या उपाध्यक्ष प्रेरणा मंत्री, माजी अध्यक्ष सोनाली सारडा आदी उपस्थित होत्या. यावेळी मानचिन्ह व तुळशीचे रोप देऊन सत्कार करण्यात आला.

केवळ पाऊस पडल्याने पाण्याची समस्या सुटणार नाही. जमिनीत पाणी मुरवले गेले पाहिजे. ज्या दोनशे ठिकाणी जलफेरभरण झाले त्यामार्फत ३० हजार लिटर पाणी जमिनीत मुरणार. मात्र, याची पुरेपूर काळजी सुद्धा घ्यायला हवी. यासाठी प्रत्येक आठवड्यात आपल्या गच्ची, फिल्टर स्वच्छ करा. कधी कधी पाणी गढूळ येते. अशावेळी सुती वा तलम कापडाच्या आठ पदरी थराने पाणी गाळून घ्या. कोणतेच बॅक्टेरिया यात शिरकाव करणार नाही. सुती कापडासारखे उत्तम फिल्टर नव्हे.
- विजय केडिया, जलतज्ज्ञ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घाटीचे ‘हृदय’ उपचाराविनाच!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

तब्बल नऊ वर्षांपूर्वी कोट्यवधी रुपये खर्च करून मोठ्या दणक्यात सुरू करण्यात आलेला 'उरोशल्य चिकित्सा आणि हृदयरोग अतिचिकित्सा' (सीव्हीटीएस) हा घाटीचा स्वतंत्र हृदयरोग विभाग पुरता लयास गेल्याचे समोर आले आहे. दीड वर्षांत केवळ १ बायपास शस्त्रक्रिया, तर ५ महिन्यांत केवळ १० अँजिओप्लास्टी व पेसमेकरची केवळ १ प्रोसिजर झाली. इतर हृदय शस्त्रक्रिया-उपचार कमालीचे घटले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे या संपूर्ण विभागात केवळ १ पूर्णवेळ हृदयरोग शल्यचिकित्सक व एकच व तोही मानद हृदयरोगतज्ज्ञ कार्यरत आहे.

गोरगरीब रुग्णांवर हृदयाचे सर्व प्रकारचे उपचार व शस्त्रक्रिया करता यावेत, या हेतुने २००७ मध्ये 'सीव्हीटीएस' या विभागाची भव्य इमारत घाटी परिसरात उभी राहिली. मात्र विभागात सुरुवातीपासूनच पूर्णवेळ हृदयरोग शल्यचिकित्सक (कार्डियाक सर्जन) व हृदयरोगतज्ज्ञांची (कार्डिओलॉजिस्ट) वाणवा आहे. कित्येक वर्ष शल्यचिकित्सक नसल्याने कुठल्याच हृदय शस्त्रक्रिया झाल्या नव्हत्या. दीड वर्षापूर्वी डॉ. सदानंद पटवारी यांची पूर्णवेळ हृदयरोग शल्यचिकित्सक म्हणून नियुक्ती झाली; परंतु हृदयाच्या शस्त्रक्रियांसाठी आवश्यक असणाऱ्या परफ्युजिनिस्ट (संजीवन शास्त्रज्ञ) या तांत्रिक पदावर कोणाचीच नियुक्ती न झाल्याने अपेक्षेप्रमाणे शस्त्रक्रिया होऊ शकल्या नाहीत. डॉ. पटवारी यांनी आतापर्यंत १ बायपास शस्त्रक्रियेसह एकूण १२ शस्त्रक्रिया केल्या आहेत. जेव्हा केव्हा 'परफ्युजिनिस्ट'ची गरज पडली तेव्हा खासगीतून सेवा घेतली. मात्र हे पद कायमस्वरुपी नसल्याने नियमित शस्त्रक्रिया होऊ शकत नाहीत.

अत्यंत धक्कादायक बाब म्हणून किमान दोन 'परफ्युजिनिस्ट'ची पदे अपेक्षित असताना त्याऐवजी प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदांची निर्मिती होऊन त्यावर प्रयोगशाळा तंत्रज्ञाची नियुक्ती झाली. नऊ वर्षांत एकही 'परफ्युजिनिस्ट'ची नियुक्ती झाली नाही आणि त्यामुळेही हृदय शस्त्रक्रियांना खीळ बसली. हृदय शस्त्रक्रियांप्रमाणेच वेगवेगळ्या हृदय उपचारांचीही वेगळी स्थिती नाही. 'कार्डिओलॉजी' विषयामध्ये प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापकांची पदे मंजूर असताना, एकही पूर्णवेळ पद कित्येक वर्षांत नियुक्त झालेले नाही. मागे डॉ. काळबांडे, डॉ.अजित भागवत, डॉ. सतीश रोपळेकर यांनी मानद हृदयरोगतज्ज्ञ म्हणून सेवा दिली; परंतु ही रुग्णसेवा आठवड्यातून केवळ दोन दिवस असल्याने हृदय उपचार-प्रक्रियांवर नेहमीच मर्यादा आल्या. सद्यस्थितीत डॉ. शिरीष देशमुख हे एकमेव मानद हृदयरोगतज्ज्ञ म्हणून कार्यरत असून, पाच महिन्यात केवळ १० अँजिओप्लास्टी, पेसमेकरची १ उपचार प्रक्रिया व १४८ अँजिओग्राफी झाल्या आहेत.

प्रत्येक ठिकाणी महिन्यांचे वेटिंग

'सीव्हीटीएस'मध्ये अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, पेसमेकर आदी उपचार प्रक्रियांसाठी तसेच 'टू डी इको' चाचणीसाठी दोन-दोन, तीन-तीन महिने वेटिंग आहे. त्यातच शासकीय विभागीय कर्क रुग्णालयातील कर्करुग्णांवर उपचार-शस्त्रक्रिया सुरू करण्यापूर्वी 'टू डी इको' ही तपासणी आवश्यक असते. परंतु, त्यासाठी तीन-तीन महिने वेटिंग असल्याने कर्करुग्णांचे हाल होतात व यात त्यांचा आजार बळावतो व शेवटी त्याचाही त्रास रुग्णांनाच सोसावा लागतो, असे सूत्रांनी सांगितले.

'परफ्युजिनिस्ट'साठी पात्र पण...

'सीव्हीटीएस'मधील प्रयोगशाळा तंत्रज्ञ शेख नदीम हे परफ्युजिनिस्ट म्हणून काम करण्यास पात्र, सक्षम व इच्छुक आहेत. 'डीएमईआर'ने 'परफ्युजिनिस्ट'च्या पदावर काम करण्यासाठीच्या मागे घेतलेल्या परीक्षेत ते राज्यातून दुसऱ्या स्थानावर उत्तीर्ण झाले. मात्र अनेकवेळा 'डीएमईआर'कडे पाठपुरावा करुनही त्यांना प्रशिक्षणासाठी पाठवले जात नाही. शेख नदीम यांना परफ्युजिनिस्ट म्हणून प्रशिक्षण दिल्यास विभागाला कायमस्वरुपी परफ्युजिनिस्ट मिळू शकतो व हृदय शस्त्रक्रियांचा मार्ग मोकळा होऊ शकतो; परंतु त्याकडेही काणाडोळा केला जात आहे. त्याचवेळी खासगीत परफ्युजिनिस्टला प्रत्येक केसमागे दिले जाणारे पाच हजार रुपयांचे मानधन देण्याची तयारीही 'डीएमईआर'ची नाही. केवळ दीड हजार रुपये शासकीय मानधनावर कुणीही येण्यास तयार नाही, या वस्तुस्थितीकडे सर्रास दुर्लक्ष केले जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तरुणींनी स्पर्धा परीक्षेत यश मिळवणे आवश्यक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पडेगाव
'तरुणींनी स्पर्धा परीक्षेत यश मिळवून स्वतःकडे अधिकार घ्यावेत. त्यातूनच महिलांच्या सक्षमीकरणाची वाट सापडले,' असे प्रतिपादन पोलिस उपायुक्त राहूल श्रीरामे यांनी केले.
छावणी येथील विद्यादीप बालगृहात 'बेटी पढाव- बेटी बचाव' कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमाचे आयोजन हायकोर्ट विधी सेवा उपसमिती, जिल्हा बालकल्याण समिती यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले. यावेळी विधी साक्षरता, बेटी पढाव-बेटी बचाव यावर आधारित नाट्याचे सादरीकरण करण्यात आले. अध्यक्षस्थआनी पोलिस उपायुक्त राहूल श्रीरामे होते. अॅड. सबाह काजी यांनी बेटी बचाव-बेटी पढाव या विषयावर, तर अॅड रेणुका घुले-पालवे यांनी बालकांचे अधिकार या विषयावर व्याख्यान दिले. 'दिवसेंदिवस मुलींची संख्या घटत असल्याने महिलांवर अत्याचार, लैंगिक शोषण, मुलींचे अपहरण आदी घटना होत आहेत. त्यामुळे शिक्षणावर भर देऊन मुलींची संख्या वाढवण्याची गरज आहे,' असे श्रीरामे यांनी सांगितले. यावेळी पोलिस निरीक्षक श्रीमती पाटील, बालगृह अधीक्षिका सिस्टर विन्सेंटिना, सिस्टर दिपाली बनकर, अॅड. फ्लोरी मिजनस, हायकोर्ट विधी सेवा उपसमितीचे सहायक प्रमोद फाटके, सुंदर टल्ले उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गोदावरी खोऱ्याचा आराखडा अंतिम टप्प्यात : बक्षी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

गोदावरी खोरे एकात्मिक जलआराखडा अंतिम टप्प्यात असून, सखोल अभ्यास करून दोन महिन्यांत हा अहवाल तयार होईल, अशी माहिती समितीचे अध्यक्ष के. के. बक्षी यांनी दिली. गोदावरी खोरे एकात्मिक जलआराखडा अंतिम करण्यासाठी तज्ज्ञांच्या समितीची बैठक शनिवारी (१६ जुलै) गोदावरी पाटबंधारे महामंडळात पार पडली.

ही बैठक तब्बल चार तास चालली. या बैठकीला जलसंचाधारण सचिव पुरुषोत्तम भापकर यांच्यासह गोदावरी पाटबंधारे महामंडळाचे कार्यकारी संचालक सी. ए. बिराजदार, समितीचे दहा सदस्य बैठकीला उपस्थित होते. यावेळी बक्षी म्हणाले, 'गोदावरी खोरे एकात्मिक जलआराखडा तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. राज्यात किती उपखोरे आहेत, त्यांची स्थिती काय आहे याचाही आढावा घेतला जाईल. जलआराखाड्यासाठीची समिती १२ एप्रिलला नेमण्यात आली होती. त्यासाठी १३ सदस्यांची नियुक्ती करण्यात आली होती. समितीची बैठक एक बैठक मुंबईत घेण्यात आली होती. त्यानंतर दुसरी बैठक औरंगाबादमध्ये घेण्यात आली. समितीची मुदत याच महिन्यात संपणार असल्यामुळे समितीला मुदतवाढ घ्यावी लागणार आहे.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

१०३ व्या वर्षी मोतीबिंदू शस्त्रक्रिया फत्ते!

$
0
0

Nikhil.Nirkhee@timesgroup.com

औरंगाबादः एकीकडे पंचविशीत-तिशीत हार्ट अॅटॅक येत आहे; पण दुसरीकडे शतकोत्तर वाटचाल करणारे काहीजण नक्कीच आहेत. असेच एक १०३ वर्षांचे पणजोबा पायाची-डोळ्याची शस्त्रक्रिया झाल्यानंतरही पुन्हा एकदा आयुष्यात ठणठणीतपणे उभे राहून चालते-फिरते झाले आहेत. दीड वर्षापूर्वी त्यांच्या पायावर शस्त्रक्रिया झाली, तर मागच्या आठवड्यात त्यांच्या डोळ्यावर मोतीबिंदूची शस्त्रक्रिया झाली. दोन्ही शस्त्रक्रिया घाटीच्या डॉक्टरांनी यशस्वी केल्या, हे विशेष.
वरणगाव (ता. पातूर, जि. अकोला) येथील गंगाराम मिठ्ठू बोरुडे हेच ते पणजोबा. १९१३ रोजी त्यांचा जन्म झाला आणि उभे आयुष्य त्यांचे शेतीमध्ये गेले.

त्यांच्या डाव्या डोळ्याला फार पूर्वी मार लागला आणि तो कायमचाच गेला. त्यातच मागच्या काही वर्षांपूर्वी त्यांच्या उजव्या डोळ्याच्या पापणीवर गाठ आली आणि हळुहळु त्यांची दृष्टी गेली. वयोमानामुळे दृष्टी गेली, असा त्यांनी समजही करून घेतला. शरीर ठणठणीत होते; परंतु दृष्टी गेल्यामुळे त्यांना सतत मदत लागत होती. पूर्वी ते स्वतःचे काम स्वतःच करत होते; पण दृष्टी गेल्याने त्यांच्यावर मर्यादा आली. याच दुष्टचक्रात भर पडून त्यांच्या पायाला प्रॅक्चर झाले. त्यानंतर त्यांना कुठेही उचलूनच न्यावे लागे. गावाकडे वैद्यकीय सुविधा नव्हत्या आणि या वयात उपचारासाठी कोणीही धोका पत्करण्यास तयार नव्हते.

त्यामुळे नाईलाजाने पंगू आयुष्य त्यांच्या वाट्याला आले. दरम्यान, पणजोबा औरंगाबादला मुलाकडे आले आणि त्यांना घाटीत दाखवले असता, पायावर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला. रक्तदाब, हृदयरोग किंवा इतर आजार नसल्याने शस्त्रक्रियेसाठी कोणतीही अडचण नव्हती. शस्त्रक्रियेनंतर पणजोबा दुसऱ्याच्या हाताला धरून थोडे-थोडे चालू-फिरू लागले, मात्र दृष्टी नसल्याने अडचण कायम होती. ही अडचण गंगाराम यांचा नातू प्रवीण बोरुडे यांनी घाटीतील नेत्र विभागाचे डॉ. जक्कल यांना सांगितली. डॉक्टरांनी पणजोबांना घाटीत बोलावून तपासले असता डाव्या डोळ्याच्या पापणीला गाठ होऊन त्यात पू साचल्याचे आणि डोळ्यात मोतीबिंदू पिकल्याचेही स्पष्ट झाले. या वयात भूल देण्याचा व शस्त्रक्रियेचा धोका होताच; परंतु नातेवाईकांनी शस्त्रक्रियेचा निर्णय घेतल्यामुळे आणि मुळात पणजोबांची प्रकृती उत्तम असल्यामुळे आधी गाठ काढण्यात आली. नंतर मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करून लेन्स लावण्यात आली आणि अवघ्या दोन तासांत पणजोबांना दृष्टी प्राप्त झाली.

डॉक्टरांनी केली प्रयत्नांची शर्थ

घाटीच्या नेत्र विभागप्रमुख डॉ. वर्षा नांदेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहयोगी प्रा. डॉ. अर्चना वरे, सहाय्यक प्रा. डॉ. ज्ञानोबा दराडे व डॉ. तपन जक्कल यांनी शस्त्रक्रियेसाठी शर्थ केली. आता पणजोबा पेपर वाचतात, टीव्ही पाहतात, स्वतःचे काम स्वतः करतात. पुन्हा एकदा स्वावलंबी झाल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेततळ्याचे काम कासवगतीने

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, उस्मानाबाद
मोठा गाजावाजा करून सुरू करण्यात आलेल्या 'मागेल त्याला शेततळे' योजनेची उस्मानाबाद जिल्ह्यातील कामे कासवगतीने सुरू आहेत. चालू आर्थिक वर्षात १ हजार ७०७ शेततळ्यांसाठी कार्यारंभ आदेश देण्यात आले होते. यापैकी १४ जुलै २०१६ अखेर केवळ १३९ शेततळ्यांची कामे पूर्ण झाली आहेत.
उस्मानाबाद जिल्ह्याला २०१६-१७ या आर्थिक वर्षासाठी १ हजार ९६६ शेततळ्यांचे लक्षांक देण्यात आले होते. यासाठी जिल्ह्यातील २ हजार ३९७ शेतकऱ्यांनी अर्ज सादर केले होते. यापैकी २ हजार ३०१ शेतकऱ्यांचे शेततळ्यासाठीचे अर्ज निकषानुसार पात्र ठरले आहेत. यापैकी १ हजार ७०७ शेततळ्यांसाठी कार्यारंभ आदेश देवून त्यातील १ हजार २५४ शेततळ्यांची आखणी करून देण्यात आली. यातील २१३ शेततळ्यांची कामे प्रत्यक्षात सुरू झाली. त्यापैकी १३९ शेततळ्यांची कामे पूर्ण झाली. पूर्ण झालेल्या शेततळ्यापैकी ८४ लाभार्थ्यांना अनुदानाची रक्कम रुपये ३९ लाख ६६ हजार देण्यात आली आहे. मागील चार वर्षांपासून उस्मानाबादसह मराठवाड्यातील पावसाचे प्रमाण दिवसेंदिवस घटत चालले आहे. त्यामुळे येथील भूजल पातळी दिवसेंदिवस खालावत चालली आहे. राज्य सरकारने 'मागेल त्याला शेततळे' हा उपक्रम हाती घेतला. मात्र, तोकड्या अनुदानामध्ये शेततळे पूर्ण होवू शकत नसल्यामुळे शिवाय यासाठी लागणारे अनुदान व्यक्तिरिक्तची अधिकची रक्कम मोजण्याची शेतकऱ्यांची ऐपत नसल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या शेततळे उपक्रमाकडे पाठ फिरवली आहे.
मजूरांची वाढत चाललेली मजूरी, जेसीबी या मशनरीच्या भाड्यात होत असलेली भाडे वाढ आदी कारणामुळे ५० हजारांच्या तोडक्या अनुदानात शेततळे होऊ शकत नाही, असा शेतकऱ्यांचा दावा आहे. कृषी विद्यापिठातील अनुभवी मंडळी व अधिकारीदेखील शेतकऱ्यांच्या या मतांशी सहमत आहेत. परंतु, शासन आदेशापूढे अधिकारी मंडळी देखील हतबल आहेत. परिणामी शासनाच्या या चांगल्या योजनेला उस्मानाबादेत खीळ बसली आहे.
जिल्ह्यात चालू आर्थिक वर्षात एकात्मक फलोत्पादन विकास अभियान योजनेतंर्गत शिवाय राष्ट्रीय कृषिविकास योजनेतंर्गत सामुहिक शेततळे उपक्रम राबविण्यात आलेला नाही. अनुदानाबाबतची रक्कम हीच यासाठीची खरी अडचण आहे. जिल्ह्यात राष्ट्रीय कृषि विकास योजनेतंर्गत २०१५-१६ मध्ये १६९ सामूहिक शेततळ्याचे उद्दिष्ट होते. यासाठी ४ कोटीची अनुदानाची तरतूद होती. तर, एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान योजनेतंर्गत २०१५-१६ मध्ये १६४ सामूहिक शेततळ्याचे उद्दिष्ट असून यासाठी ३ कोटीची अनुदानाची तरतूद करण्यात आली होती.

उस्मानाबाद जिल्ह्यात २००५ पासून सामूहिक शेततळ्याचा उपक्रम राबविण्यात येत आहे. एप्रिल २००५ ते मार्च २०१६ या कालावधीत जिल्ह्यात एकुण ६४६ सामुहिक शेततळे घेण्यात आले.
डी. डी. जाधव, तंत्र अधिकारी, कृषिविभाग, उस्मानाबाद.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डाळीबाबत प्रशासनच संभ्रमात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

तूरडाळीचे भाव नियंत्रणात आणण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाने सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत तूरडाळ विकण्याचा निर्णय घेण्याला १५ दिवस उलटून गेले, मात्र या निर्णयाची अंमलबजावणी कशी करायची, असा प्रश्न प्रशासनाला पडला आहे.

मंत्रिमंडळाच्या निर्णयानुसार रेशनवर अंत्योदय व बीपीएल शिधापत्रिकाधारकांना १२० रुपये किलो दराने डाळ विकत मिळणार असून, मराठवाड्यातील सुमारे २० लाख शिधापत्रिकाधारकांना त्याचा फायदा मिळाणार आहे. याशिवाय केंद्र शासनाकडून राज्याला मिळालेली तूरडाळ खुल्या बाजारात याच दराने विकण्यासाठी उपलब्ध करून देण्याबाबत निर्णय झाला होता, मात्र विभागात किती डाळ आवश्यक आहे, यासंदर्भात विभागीय प्रशासन आकडेमोड करीत अाहे. डाळीची मागणी करण्यासंदर्भात अद्याप कुठेलेही निर्देश मिळालेले नाहीत, त्यामुळे अधिकारी, कर्मचारी संभ्रमात आहेत. डाळीचे वितरण व्यक्तीनिहाय करायचे की रेशनकार्डाच्या आधारे करायचे, याबाबत माहिती नसल्यामुळे पुढील निर्देश देण्यात आलेले नाहीत.

दरमहा १२० रुपये किलो दराने १ किलो तूरडाळ स्वस्त धान्य दुकानातून वितरणाचे नियोजन करण्यात आले होते. डाळ पुरवण्यासाठी एनसीडीएक्स स्पॉट एक्स्चेंजमार्फत ई-लिलावाद्वारे राज्य शासन विकत घेऊन ती स्वस्त धान्य दुकानांमध्ये पोचविण्यात येणार होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


गुरूमंत्र : बोलक्या बाहुल्यांनी आणली अभ्यासात गोडी

$
0
0

Ramchandra.Vaybhat@timesgroup.com
कार्टून व त्यातील विविध पात्र हे चिमुकल्यांच्या जीवनाचा अंग झाले आहेत. सध्या विविध अॅनिमेशनच्या माध्यमातून पौराणिक कथाही कार्टूनद्वारे दाखवण्यात येतात व मुलेही ते अत्यंत आवडीने बघतात. त्यातील कथेचा बोध घेतात. या प्रेरणेतून अजिंठा येथील जिल्हा परिषद प्रशालेतील शिक्षिका सरला कामे यांनी बोलक्या बाहुल्यांचा प्रयोग अध्यापनात करण्याचे ठरवले.
बाहुल्यांसाठी त्यांनी १ बाय ४ आकाराचे लाकडांचे खास व्यासपीठ तयार केले आहे. प्रयोगाच्या वेळी व्यासपीठाला मंडपाप्रमाणे सजवण्यात येते. समोरची बाजू बाहुल्यांच्या सादरीकरणासाठी असते, तर बाहुल्या हाताळणाऱ्या मॅडम पडद्याच्या मागच्या बाजूला असतात. यामुळे विद्यार्थ्यांना फक्त बाहुल्याच दिसतात. त्यामुळे समोरचा कार्यक्रम हा फक्त बाहुल्यांचा आहे असे भासते.
विद्यार्थ्यांना कोणतीही घटना नाटकाच्या माध्यमातून सहज स्मरणात राहते, असे लक्षात आल्यानंतर कामे मॅडम यांनी विषयांमधील कथा, गोष्ट, प्रसंग, दोन व्यक्तींमील संवाद, कविता, संभाषण, पर्यावरणातील समस्या आदी गोष्टी विद्यार्थ्यांसमोर नाटिकेच्या माध्यमातून ठेवल्या. स्वतः तयार केलेल्या बोलक्या बाहुल्यांना पात्राच्या भूमिकेप्रमाणे; तसेच घटनेप्रमाणे वेशभूषा केली जाते. बाहुलीसाठी लहान मुलांच्या खेळण्यातील बाहुलीचे शीर व हात यांचा वापर केला आहे. चिंगी नावाची बाहुली ही तीन फूट उंचीची असून, चिंगीचे संवाद मॅडम स्वतः बोलतात. प्रत्यक्षदर्शींना असे वाटते की चिंगी विद्यार्थ्यांशी; तसेच मॅडमसोबत बोलत आहेत. विषय समजावून सांगण्याला जीवंतपणा येतो, बाहुली आपल्याला प्रत्यक्ष बोलत असल्याचा अनुभव विद्यार्थ्यांना मिळाते. विद्यार्थ्यांना विविध संकल्पना मनोरंजनाच्या माध्यमातून शिकविल्या जातात. खेळातून मिळणाऱ्या या शिक्षणाच्या वर्गात विद्यार्थी आवर्जून हजेरी लावतात. बाहुल्यांमध्ये प्रसंगानुरूप राजस्थानच्या प्रसिद्ध कठपुतलीचाही वापर केला जातो. कवितेचे रेकॉर्डिंग व कठपुतलीचे नृत्यही कृतीयुक्त शिक्षणाचाच भाग असून, यातून विद्यार्थी मनोरंजनातून अध्ययन करतात.
विषयाला अनुसरुन संहिता (स्क्रिप्ट) तयार करण्यात येते व त्यानुसार विषय विद्यार्थ्यांना नाटिकेच्या माध्यमातून समजावून सांगण्यात येतो. नाटिकेसाठी खानदेशी, आहिराणी, विदर्भ, मराठवाडा, सातारा, सांगली आदी भागांतील बोलीभाषेचा वापर केला जातो. त्यामुळे दोन संवाद मनोरंजनात्मक होतात. त्याचबरोबर हास्य, विनोदांचा वापर केल्यामुळे विद्यार्थ्यांना नाटिकेत पुढे काय, याची उत्कंठा असते. या दोन व्यक्तींच्या संवादाचे नाटिकेचे लेखन कामे मॅडम स्वतः करत असल्यामुळे त्यांना बाहुल्यांचा हावभाव, आवाजातील चढ-उतार व बोलीभाषा यांचा ताळमेळ सहज साधता येतो. त्या सातवी ते नववी या वर्गांना मराठी व विज्ञान हा विषय शिकवतात. बोलक्या बाहुल्यांच्या माध्यमातून मराठीची कविता, पाठ, विज्ञानामध्ये पर्यावरण, जीवनसत्वांचे महत्त्व,स्वच्छता, ध्वनीप्रदूषण, वृक्षलागवड, वृक्षसंवर्धन आदी विषयांवर नाटिका तयार करून विषय समजावून सांगण्यात येतो.
एखादा पाठ शिकवल्यानंतर संबंधित पात्र विद्यार्थ्यांना प्रश्न विचारते किंवा विद्यार्थी बाहुल्यांना प्रश्न विचारतात. याप्रश्नोत्तरातून विषय पक्का लक्षात राहत असल्याचेही दिसून आले आहे. कामे मॅडम यांच्या उपक्रमाची दखल घेऊन त्यांना जिल्हा परिषदेने त्यांना आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविले आहे. या कामात पती अशोक कुमावत हेही मदत करतात, असेही कामे यांनी सांगितले.

जनजागृतीसाठीही उपयोग
कामे मॅडम या बोलक्या बाहुल्यांचा वापर स्त्रीभ्रूण हत्या व मुलींवर होणारे अत्याचार, अंधश्रद्धा निर्मूलन, पाणंदमुक्त गाव, वृक्षसंवर्धन, जलयुक्त शिवार या विषयांच्या जनजागृतीसाठीही करतात. कामे यांनी २००९पासून लेक वाचवा, लेक शिकवा या विषयाचे जनजागरण पोस्टर प्रदर्शन, बोलक्या बाहुल्यांच्या माध्यमातून केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोपर्डीची ठिणगी; शहर धुमसले

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
कोपर्डी (ता. कर्जत) येथील बलात्कार व हत्या प्रकरणाचे शहरात तीव्र पडसाद उमटले. संभाजी ब्रिगेडने दिवसभर धरणे आंदोलन केले. एपीआय कॉर्नर येथे बसवर दगडफेक झाल्यामुळे पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी मराठा संघटनांच्या पदाधिकाऱ्यांशी तातडीने चर्चा केली.
अमितेशकुमार यांच्यासोबतच्या बैठकीला छत्रपती शिवाजी प्रबोधिनीचे संचालक बाळासाहेब सराटे, प्रा. चंद्रकांत भराट, संभाजी ब्रिगेडचे राहुल बनसोड यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. कोपर्डी गावातील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणी सरकारने मागण्या मंजूर केल्या आहेत. विधानसभेतही सरकारने घोषणा केली आहे. याप्रकरणी घटनात्मक मार्गाने आंदोलन करण्यास प्रशासनाने अडथळा आणला नाही. कायदेशीर चौकटीत आंदोलन करावे व कायदा हातात घेऊन बेकायदा कृत्ये करू नये. तसेच सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करू नये, असे आवाहन मराठा संघटनांनी बैठकीनंतर केले. सरकारने न्याय प्रक्रियेत दिरंगाई केल्यास राज्यभर तीव्र आंदोलन करण्यात येईल असे सराटे यांनी निवेदनात म्हटले आहे.

एसटी महामंडळाच्या बसवर दगडफेक
कोपर्डीप्रकरणी सोमवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास एपीआय कॉर्नर येथे तरुणांच्या टोळक्याने बसवर घोषणाबाजी करत दगडफेक केली. याप्रकरणी सिडको एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जाफ्राबाद ते सिडको ही बस एपीआय कॉर्नरजवळ आल्यानंतर आठ ते दहा जणांच्या टोळक्याने ही बस अडवली. जोरदार घोषणाबाजी करत या बसच्या समोरील व मागील काचांवर तुफान दगडफेक केली. यानंतर हे टोळके पसार झाले. तेथील एका दुकानाबाहेर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये हा प्रकार कैद झाला. पोलिसांनी दगडफेक करणाऱ्या टोळक्याची ओळख पटवली आहे. अखिल भारतीय शिवक्रांति संघटनेचे सुनील कोटकर व सहकाऱ्यांनी ही दगडफेक केल्याचे चित्रित झाले असून याप्रकरणी बसचालकाच्या तक्रारीवरून पोलिस ठाण्यात दंगल करणे व सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक श्रीपाद परोपकारी यांनी ही माहिती दिली.

बुलंद छावा युवा परिषद
समाजाचा भावनिक उद्रेक बघता कोपर्डी प्रकरणी दोषींवर जलदगती न्यायालयात खटला चालवून तत्काळ फाशीचा निकाल लावण्यात यावा, अशी मागणी बुलंद छावा मराठा युवा परिषदेने केली. याबाबत विभागीय आयुक्त उमाकांत दांगट यांना निवेदन देण्यात आले. पीडित कुटुंबाला मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून २५ लाख रुपये मदत करावी. भविष्यात पुन्हा अशी घटना घडू नये म्हणून गृहखाते आणि प्रशासनाने काळजी घ्यावी. सैराटसारख्या चित्रपटामुळे समाजाचे संतुलन बिघडत असून, या चित्रपटाच्या प्रसारणावर बंदी घालावी, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. निवेदनावर नितीन शेळके, सतीश वेताळ, मनोज गायके, योगेश देशमुख यांची स्वाक्षरी आहे.

'एनएसयूआय'चे निवेदन
अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डी घटनेने महाराष्ट्राच्या पुरोगामित्वाची आणि कायदा-सुव्यवस्थेची लक्तरे वेशीवर टांगली आहेत. 'दुर्मिळातील दुर्मिळ' प्रकरण हाताळून आरोपींना कठोर शिक्षा करावी, अशी मागणी नॅशनल स्टुंडटस युनियन ऑफ इंडिया संघटनेने केली आहे. याबाबत विभागीय आयुक्त उमाकांत दांगट यांना निवेदन देण्यात आले. आरोपी कोणत्याही जातीधर्माचा असला तरी योग्य कायदेशीर कारवाई करून पीडित बालिकेला न्याय द्यावा असे निवेदनात म्हटले आहे. यावेळी महाराष्ट्र प्रदेश प्रतिनिधी राहुल पाटील, जिल्हाध्यक्ष मुझाहेद पटेल, विद्यापीठ प्रमुख नीलेश आंबेवाडीकर, सागर साळुंके, बरकत अली पठाण, सूरज निकम, धनंजय देशमुख, अमित संत्रे, रोहित कांबळे उपस्थित होते.

आरोपींना फाशी द्या
कोपर्डी प्रकरणात फक्त एक आरोपी अटकेत असून बाकीचे मोकाट आहेत. या आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. नगर जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे यांची शासनाने तत्काळ हकालपट्टी करावी, सोशल मीडियावर दलित विरुद्ध मराठा वाद निर्माण करण्याचे काम काही जातीयवादी लोक करत आहेत. त्यावर तत्काळ आळा घालावा. वेळोवेळी नगर जिल्ह्यात अशा घटना घडत असून, यासाठी नगर हा अत्याचारग्रस्त जिल्हा म्हणून घोषित करावा, अशी मागणी डॉ. निधी पांडेय यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली. त्यावर विजय वाहुळ, विलास मगरे, बबलू पाटील आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

संभाजी ब्रिगेडची धरणे
कोपर्डी अत्याचार प्रकरण पुरोगामी महाराष्ट्राला काळिमा फासणारे आहे. या प्रकरणातील गुन्हेगारांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी संभाजी ब्रिगेडने केली. या मागणीसाठी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी धरणे आंदोलन केले. यावेळी जिल्हाध्यक्ष रमेश गायकवाड, राहुल बनसोड, सचिन मगर, संजय सोमवंशी, दत्तात्रय कराड, रवी बोचरे, अजिनाथ गाडेकर, सचिन गवई, सुनील वाघ, अनिल हिरडे, आकाश पाटील, अच्युत जाधव, विशाल वरकड, भागवत भोरे आदी उपस्थित होते. निर्भया अत्याचार व हत्याकांड प्रकरणात कायद्यात बदल करण्यात आला होता. त्यानुसार या प्रकरणाचा जलद गतीने तपास करुन कारवाई करावी. खटला फास्ट्र ट्रॅक कोर्टात चालवावा, सरकारी वकील अॅड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी आणि पीडित कुटुंबाला २५ लाख रुपये मदत करावी या प्रमुख मागण्या करण्यात आल्या. आरोपींच्या कुटुंबाची सविस्तर चौकशी करून कठोर कारवाई करावी, पोलिसांनी पीडित कुटुंबाला संरक्षण देण्याऐवजी आरोपीच्या कुटुंबाला संरक्षण दिल्याबद्दल संघटनेने तीव्र निषेध केला. या प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा असेही संघटनेने निवेदनात म्हटले आहे.

आरोपींना कठोर शिक्षा करा: अभविप
कोपर्डीत प्रकरणाचा खटला जलदगती न्यायालयात चालवून आरोपींना कठोर शिक्षा करा, अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने केली आहे. अभविपतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ व देवगिरी इंजिनीअरिंग कॉलेज परिसरात निदर्शने करण्यात आली. ५० टक्के महिलांना आरक्षणाच्या गोष्टी केल्या जात आहेत. त्याचवेळी महिलांवर अत्याचाराच्या घटना घडत आहेत. कोपर्डी येथे अल्पवयीन मुलीवर झालेला अत्याचार व हत्याही निंदनीय आहे. ही केस जलदगती न्यायालयात चालवावी व अत्याचार करणाऱ्या नराधमांना कठोर शिक्षा करावी मागणी यावेळी करण्यात आली. शिवराज मानेगोपाळे, पूर्वा पाटील, विवेक पवार, मोनाली सुकटे, दीक्षा वार, किरण जाधव, रुपाली मोरे यांची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डीसीसी’चे संचालक सुरेश पाटील यांच्यावर गुन्हा

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन सुरेश पाटील यांच्यासह राजेश्वर कल्याणकर, अण्णा भोपळे व विजय काळे यांच्याविरुद्ध फसवणूक व बनावट कागदपत्रे तयार केल्याप्रकरणी सोमवारी कोर्टाच्या आदेशाने क्रांतिचौक पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. बँकेच्या निवडणुकीवेळी थकबाकीदार असताना बनावट प्रतिज्ञापत्र सादर केल्याप्रकरणी अॅड. सदाशिव गायके यांनी कोर्टात धाव घेतली होती.
अॅड. गायके यांनी केलेल्या तक्रारीमध्ये सुरेश दयाराम पाटील हे कै. रामचंद्र जीनिंग प्रेसिंग सहकारी सूतगिरणीचे चेअरमन असताना त्यांच्यावर १९ लाख ५३ हजार ५७९ रुपयांची थकबाकी होती. तरीही त्यांनी ७ एप्रिल २०१५ रोजी झालेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदाची निवडणूक लढवली. यावेळी त्यांनी, 'मी वैयक्तिक, सामूहिकरित्या कोणत्याही सहकारी संस्थेच्या वतीने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून घेतलेला कर्जाचा थकबाकीदार नाही,' असे खोटे प्रतिज्ञापत्र बँकेचे कार्यकारी संचालक राजेश्वर भीमराव कल्याणकर यांच्याकडून घेतले. त्यासाठी जुजबी स्वरुपाचे बेबाकी प्रमाणपत्र सादर केले होते. तसेच पाटील थकबाकीदार असताना देखील अण्णा बापूराव भोपळे हे सुचक, तर विजय उत्तमराव काळे हे अनुमोदक झाले होते. सुरेश पाटील यांनी गैरमार्गाने बनावट कागदपत्रांचा वापर करीत निवडणूक लढवल्याचा आरोप करत त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी अॅड. गायके यांनी केली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धुडगुस घालणारा पोलिस कर्मचारी हंबर्डे निलंबित

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'महावीर चौकात शनिवारी मध्यरात्री धुडगूस घालणारा पोलिस कर्मचारी सतीश हंबर्डेला निलंबित केले आहे. त्याच्याजवळ असलेल्या महागड्या डस्टर कारच्या मालकीची चौकशी करण्यात येणार आहे,' अशी माहिती पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी सोमवारी दिली.

वाळूज पोलिस ठाण्यात कार्यरत असलेला हंबर्डे शनिवारी डस्टर ही नवी कार घेऊन महावीर चौकात आला होता. या ठिकाणी त्याने यथेच्छ गोंधळ घातला. यावेळी वेदांतनगर चौकीतील कर्मचारी सचिन काळे यांनी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. यावेळी कर्तव्यावर असलेल्या काळे यांना हंबर्डेने धक्काबुक्की करत शासकीय कामात अडथळा निर्माण केला. क्रांतिचौक पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक नागनाथ कोडे यांनी त्याला ताब्यात घेत अटक केली. त्याच्याविरुद्ध पोलिस ठाण्यात शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. सोमवारी सकाळी त्याला निलंबित केल्याची माहिती अमितेशकुमार यांनी दिली. तसेच त्याच्या जवळ असलेली डस्टर कार त्याच्या मालकीची आहे अथवा कोणाची आहे. त्याने कुठून घेतली याची चौकशी करण्यात येणार असून त्याच्यावर गंभीर कारवाईचा इशारा दिला.

दुसऱ्यांदा निलंबित

हंबर्डे याने काही महिन्यांपूर्वी पोलिस पब्लिक स्कूलमधील समन्वयक पीएसआय गंधपवाड यांना मारहाण केली होती. लहान मुलाच्या भांडणाच्या वादातून हा प्रकार घडला होता. या प्रकरणी हंबर्डेवर सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हा देखील हंबर्डेला निलंबित करण्यात आले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोपर्डी प्रकरणाच्या निषेधार्थ उस्मानाबाद, बीड बंद

$
0
0

म. ट. प्रतिनिधी, उस्मानाबाद

कोपर्डी (ता. कर्जत) येथील अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिची निर्घृणरित्या हत्या करण्यात आली. या घटनेचे पडसाद उस्मानाबाद जिल्ह्यात उमटले. सोमवारी जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेतेमंडळींनी मोर्चा काढला. त्यात महिला व युवती पदाधिकाऱ्यांचा समावेश लक्षणीय होता.

दिल्लीतील निर्भया प्रकरणापेक्षा भयानक असलेल्या या घटनेची तात्काळ सखोल चौकशी करून संब‌धित आरोपी विरोधात जलदगती न्यायालयात खटले चालवावेत, तसेच कोपर्डी सारख्या घटना अन्यत्र घडू नये यासाठी आरोपीवर जरब बसावा, म्हणून नव्याने कायदा करण्यात यावा त्या‌शिवाय कोपर्डी प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा द्यावी, आदी मागण्याचे एक निवेदन सर्वपक्षीय नेतेमंडळीच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी प्रभ्योदय मुळे यांना देण्यात आले.

कोपर्डी घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी आज जिल्ह्यातील व्यापारी प्रतिष्ठाने, शाळा व महाविद्यालये बंद ठेवाण्यात आली होती. बससेवा, अॅटोरिक्षा यांना बंदमधून वगळण्यात आले होते. उस्मानाबाद शहरातील युवती व महिलांना‌ही पुरेसे संरक्षण देण्यात यावे, अशी मागणी यावेळी उप‌स्थित नेतेमंडळीना निवासी उपजिल्हाधिकारी तसेच जिल्हा पोलिस प्रमुखांकडे केली. उस्मानाबाद शहरात काही समाजकंटक युवकांचे टोळके तांबरी विभाग व समता कॉलनी परिसरात वावरत असते. यासाठी या परिसरात सीसीटीव्ही कॅमेर बसवून या रोडरोमिओंचा कायमचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी होत आहे.

श्रेय लाटण्यावरून गदारोळ

कोपर्डी घटनेच्या निषेध व्यक्त करीत या संदर्भातील निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी प्रभ्योदय मुळे यांना देताना या निषेध मोर्चाचे श्रेय लाटण्यावरुन उपस्थित नेते मंडळीत चांगलाच गदारोळ झाला. या गंभीर प्रकरणी कोणच राजकारण करू नये, अशी समज देण्याची पाळी यावेळी उपस्थित ज्येष्ठ मंडळीवर आली.

आरोपींच्या पुतळ्याला फाशी

कोपर्डी येथील घटनेच्या निषेधार्थ उस्मानाबाद शहरातील संतप्त युवकांनी अटक केलेल्या आरोपींच्या पुतळ्याला भर चौकात जाहीर फाशी देऊन राग व्यक्त केला. उस्मानाबाद शहरातील समता नगर येथे युवकांनी एकत्र येऊन आरोपींचा पुतळा बनवला व त्याला चपलेचा हार घालून शहरात त्याची धिंड काढली व नंतर भर चौकात प्रतीकात्मक फाशी दिली. फाशीचा संदेश सर्वांपर्यंत जावा यासाठी फाशी दिलेला पुतळा दिवसभर लटकवतच ठेवला. यावेळी आशिष पाटील, सुजित साळुंके, मंगेशसिंह काटे, बाळासाहेब वरुडकर, बंडू आदरकर, अमर लव्हारे, पंकज पडवळसह युवक सहभागी झाले होते. कोपर्डी घटनेच्या निषेधार्थ उस्मानाबाद जिल्हा कडकडीत बंद पाळण्यात आला.

लातूरमध्ये आज बंद

लातूर ः नगर जिल्ह्यातील कोपर्डी येथील बलात्काराच्या घटनेच्या निषेधार्थ मंगळवार (१९ जुलै) रोजी सर्वत्र बंद पाळण्यात येणार आहे. या बंदमध्ये शहरातील व्यापाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे. या बंदला विविध पक्षाचा व संघटनेचा पाठिंबा आहे.

अंबाजोगाईत मूकमोर्चा

म. टा. प्रतिनिधी, बीड

नगर जिल्ह्यातील कोपर्डी या गावामध्ये घडलेल्या घटनेचे तीव्र पडसाद बीड जिल्ह्यात सर्वत्र उमटले. बीड, केज, वडवणी, गेवराई, माजलगाव अंबाजोगाईत या घटनेचा निषेध नोंदवण्यात आला. या घटनेच्या निषेधार्थ सोमवारी सकाळी मूकमोर्चा अंबाजोगाई शहरातून निघाला. या घटनेमुळे बीड जिल्हा बंदची हाक देण्यात आली होती.

काळ्या फिती लावून निघालेला हा मोर्चा आंबेडकर चौकापासून उपजिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. यावेळी मोर्चाचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या शालेय विद्यार्थिनींनी विविध मागण्यांचे निवेदन उपजिल्हाधिकारी यांना दिले. या मोर्चात शहरातील विविध पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, महाविद्यालयीन युवक व युवती यांचा मूकमोर्चात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन उपजिल्हाधिकारी यांना देण्यात आले. या प्रकरणाची सुनावणी जलदगती न्यायालयात करा, दुर्घटनेतील दोषींना फाशीची शिक्षा द्या, पीडित कुटुंबाला संरक्षण देऊन आर्थिक मदत करा, अशा विविध मागण्या यावेळी देण्यात आलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या.

दरम्यान, जालन्यातील छावा संघटनेने ‌सोमवारी नगर येथील अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचार प्रकरणी मोर्चा काढला. यामध्ये नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मोर्चानंतर निवेदन देण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गुलाब उद्यान सुकले; तळीराम फुलले!

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
शहर पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी महापालिकेने सलीम अली सरोवर परिसरात गुलाब उद्यान उभारण्याचा निर्णय घेतला आहे. नऊ महिन्यात उद्यान उभारण्याचे नियोजन असताना तीन वर्षानंतरही उद्यान रखडले आहे. त्यामुळे गुलाब सुकले आहेत. उद्यानाचा ताबा घेत तळीराम येथे फुलले आहेत. त्यांच्या झिंगाट कामगिरीमुळे उद्यानाची अक्षरशः कचराकुंडी झाली आहे.
शहरात पर्यटनाचे आकर्षण वाढवण्यासाठी सलीम अली सरोवराजवळ तीन एकर जागेत जपानी व रोज गार्डन तयार करण्यात येणार आहे. तत्कालीन महापौर डॉ. हर्षदीप कांबळे यांनी ३० नोव्हेंबर २०१३ रोजी उद्यानाची घोषणा केली होती. राज्य शासन आणि मनपा प्रशासन यांच्या प्रयत्नातून उद्यान आकारास येणार आहे. फक्त नऊ महिन्यात उद्यान पूर्ण करण्यात येईल, असे कांबळे यांनी सांगितले होते. मात्र, तीन वर्षांपासून उद्यानाचे काम रखडले आहे. उद्यानासाठी चार कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला होता. गुलाब फुलाच्या आकाराच्या उद्यानात एक हजारापेक्षा जास्त प्रकारचे गुलाब लावण्यात येणार आहेत. हिरवळ, विविध जातीचे वृक्ष, फुलझाडे, आकर्षक लाकडी बांधकाम व वाहते पाणी अशी वैविध्यपूर्ण रचना आहे. आयुक्तांची बदली झाल्यानंतर हा प्रकल्प अडगळीत गेला. सध्या शहर अभियंता सिकंदर अली यांच्याकडे उद्यानाची जबाबदारी आहे. उद्यानात अर्धवट बांधकाम झाले असून निधीअभावी बांधकाम रखडले आहे. उद्यानाची देखभाल करण्यासाठी सुरक्षारक्षक नसल्याने मद्यपींनी उद्यानाचा ताबा घेतला आहे. दिवसा-रात्री दारूच्या पार्ट्या सुरू आहेत. या ठिकाणी रिकामे प्लास्टिक ग्लास, दारूच्या बाटल्या आणि कचरा पसरला आहे. परिसरातील नागरिकांनी स्वच्छतागृहासारखा उद्यानाच्या जागेचा वापर सुरू केला आहे. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. मनपा प्रशासन उद्यानाची देखभाल करीत नसल्यामुळे मोठा प्रकल्प अधांतरी राहिला आहे. याबाबत महापौर त्र्यंबक तुपे आणि शहर अभियंता सिकंदर अली यांच्याशी संपर्क साधला; मात्र, त्यांनी दूरध्वनी 'रिसिव्ह' केला नाही.

बांधकाम फोडले
गुलाब उद्यानात अर्धवट बांधकाम झाले आहे. सध्या उद्यानाच्या जागेवर उपद्रवी लोकांचा वावर वाढला आहे. काही ठिकाणी बांधकाम फोडले आहे. विटा आणि सिमेंट विखुरण्यात आले आहे. त्यामुळे पुन्हा नव्याने बांधकाम करावे लागणार आहे. काही ठिकाणी कचराकुंडीसारखे बांधकाम वापरत आहेत. मागील अनेक दिवसांपासून एकाही प्रशासकीय अधिकाऱ्याने पाहणी केली नसल्याने उद्यानाचे नुकसान सुरू आहे.

उपद्रवींना रोखणार कोण ?
उद्यानाचे काम सुरू असतानाच शेजारच्या वस्तीतील उपद्रवी लोकांनी नुकसान सुरू केले आहे. त्यामुळे चार कोटी रुपये खर्च करून उभारलेले उद्यान सुस्थितीत राहण्याबाबत साशंकता आहे. उद्यानाची संरक्षक भिंत पाडली असून नागरिकांची उद्यानातूनच रहदारी सुरू आहे. हा प्रकार कायम राहिल्यास पर्यटक उद्यानापर्यंत पोहचण्याची अजिबात शक्यता नाही.
---
मटा भूमिका
---
सौंदर्यदृष्टीतील करंटेपणा
महानगरपालिकेची सौंदर्यदृष्टी सर्वश्रुत आहे. दुभाजके, गतिरोधके, चौक या सर्व बाबतीत शहर कुरूप करून ठेवण्यात सर्वच यंत्रणेने हातभार लावला आहे. त्यामुळे गुलाब उद्यानाची बातमी तीन वर्षांपूर्वी नागरिकांना सुखावून गेली. परंतु या उद्यानाच्या बाबतीत कोणतीही हालचाल न झाल्यामुळे ते प्रत्यक्षात येण्यापूर्वीच विस्मरणात गेले आहे. या उद्यानाच्या नियोजित जागेत कचरा आहेच, परंतु इतर उद्यानेदेखील सुस्थितीत नाहीत. शास्त्रीनगरातील उद्यान असो की, कवितेची बाग. 'सिध्दार्थ' वगळता सर्वच उद्याने पालिकेला नकोशी झाली आहेत. आयुक्तांनी या उपेक्षित उद्यानांच्या अवस्थेचा आढावा घेऊन योग्य इलाज करावा आणि उद्याने किमान फिरण्यालायक करावीत एवढीच अपेक्षा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आरटीओ अधिकाऱ्यांना नोटीस

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
वाहनांच्या किंमत कमी दाखवून, वाहन विक्रीतील कागदपत्रांमध्ये फेरफार करून आरटीओ कार्यालयाला साधारणतः अडीच कोटींचा चुना लावण्यात आला. याप्रकरणात आजी-माजी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून पैसा का वसूल करू नये, असा सवाल करत त्यांना परिवहन आयुक्तांनी नोटीस पाठवल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.
आरटीओ कार्यालयात साधारणतः तीन ते साडेतीन वर्षांपूर्वी काही अधिकारी, एजंटांनी चार चाकी वाहनांच्या किंमती कमी दाखवून, वाहन कर कमी भरला असल्याची माहिती समोर आली होती. या प्रकरणात लेखापरीक्षण अहवालामध्येही त्रुटी काढण्यात आली होती. लेखा परीक्षण अहवालानंतर संबंधित काही कार चालकांकडून मुळ किंमतीप्रमाणे महसूल जमा करण्यात आला होता. मात्र, अनेक वाहनधारकांशी संपर्क करूनही कोणत्याच प्रकारचा प्रतिसाद मिळाला नाही. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी आरटीओ सर्जेराव शेळके यांच्यासह अन्य दोन जणांची चौकशी समिती तयार करण्यात आली होती.
या चौकशी समितीने आपला अहवाल, परिवहन आयुक्त कार्यालयाकडे दाखल केला आहे. या अहवालात संबंधित कर चुकवेगिरी प्रकरणात प्राथमिक दृष्टया संबंधित मोटार वाहन निरीक्षक, लिपिक, सहाय्यक परिवहन अधिकारी आणि अन्य अधिकाऱ्यांची चूक असल्याची माहिती देण्यात आली आहे. अडीच कोटी करचुकवे गिरी प्रकरणात आजी माजी आरटीओ अधिकाऱ्यांवर, त्रिसदस्यीय समितीच्या अहवालानंतर संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना नोटीस देण्यात आली आहे. या नोटीशीच्या खुलाशानंतर पुढील कारवाई केली जाणार असल्याची माहिती आरटीओच्या सूत्रांनी दिली आहे.

आरटीओ कार्यालयातील करचुकवेगिरी प्रकरणात आम्ही अहवाल सादर केला आहे. अहवालानंतर सध्या वरिष्ठ पातळीवर कारवाई सुरू आहे. - सर्जेराव शेळके, प्रादेशिक परिवहन अधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


थकित कर्जाने बॅंकांच्या गटांगळ्या

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
'थकित कर्जाचे वाढलेल्या प्रमाणामुळे राष्ट्रीयकृत बॅँका डबघाईला आल्या आहेत. त्यांच्या खासगीकरणाचा धोका वाढला आहे. त्यामुळे ठराविक लोकांच्या हाती बॅंकांचा कारभार जाईल,' असे मत ऑल इंडिया बँक एम्प्लाइज असोसिएशनचे राष्ट्रीय सरचिटणीस देविदास तुळजापूरकर यांनी व्यक्त केले आहे.
१९ जुलैला बॅंकांचे राष्ट्रीयीकरण झाले. या घटनेला ४७ वर्षे पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर तुळजापूर यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले, 'रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाच्या मार्च २०१६च्या अहवालानुसार, शेड्यूल्ड कमर्शिअल बॅंकांची निव्वळ बुडीत कर्जाची रक्कम ५ लाख ६० हजार ८२२ कोटी रुपये इतकी आहे. हे प्रमाण एकूण कर्जवाटपाच्या ७.७१ टक्के इतके आहे. याव्यतरिक्त २ लाख ९४ हजार ९२९ कोटी रुपयांच्या कर्जाचे पुनर्गठण करून ही रक्कम थकीत होण्यापासून वाचली. याचाच अर्थ एकूण ८ लाख ५५ हजार ५५१ कोटी रुपयांच्या कर्जाची परतफेड त्या कर्जदारांनी केली नाही. यापुढे या कर्जाची वसुलीदेखील अशक्य आहे. याबाबत बॅंकिंग एज्युकेशन ट्रेनिंग अँड रिसर्च अॅकॅडमी (बेट्रा) तर्फे जनजागृती करण्यात येत आहे. थकित कर्जाच्या ओझ्यातून बॅंकांना बाहेर काढायचे असल्यास पहिला उपाय म्हणजे केंद्र सरकारने यासाठी किमान ४ लाख कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करणे आवश्यक आहे. दुसरा पर्याय म्हणजे रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने थकित कर्जासाठी राखीव निधीचा वापर करणे. हे दोन्ही पर्याय प्रत्यक्षात येणार नाहीत. त्यामुळे बॅंकांना नाइलाजास्तव शासकीय भाग भांडवल विक्रीस काढावे लागेल. हे भांडवल विक्री करण्याची वेळ बॅंकांवर आल्यास खासगीकरणाचा धोका आपोआपच वाढेल. राष्ट्रीयकृत बॅंकांचे विलीनीकरण आणि खासगीकरणाला आमचा तीव्र विरोध यामुळेच आहे,' असा ठाम निर्धार तुळजापूरकर यांनी व्यक्त केला.

सध्या एकूण थकित रकमेचा आकडा पावणे सहा लाख कोटी रुपयांच्या घरात आहे. त्यापैकी चाळीस टक्के कर्ज हे केवळ शंभर जणांकडे थकित आहे. हे कर्ज वसूल करण्याचा कृतीशील कार्यक्रम केंद्र सरकारने राबविल्यास बॅंका अडचणीतून सावरतील. त्यासाठी कर्जबुडव्यांची सर्व मालमत्ता जप्त करून त्यांची नावे जाहीर करावीत.
- देविदास तुळजापूरकर, सरचिटणीस, ऑल इंडिया बँक एम्प्लाइज असोसिएशन

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अघोषित संपत्ती जाहीर न केल्यास कारवाई

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
'अघोषित संपत्ती जाहीर करण्याची ३० सप्टेंबर ही शेवटची संधी असून यानंतर आयकर विभाग कारवाईचा बडगा उगारेल,' असा इशारा प्रधान आयुक्त शिवदयाल श्रीवास्तव आणि प्रधान आयकर आयुक्त रुबी श्रीवास्तव यांनी सोमवारी झालेल्या पत्रकार परिषदेत दिला.
'यंदा ८०० कोटींरुपयांहून अधिकचे आयकर 'टार्गेट' आहे. सुमारे ३ लाखांहून अधिक जण मराठवाड्यात टॅक्स भरतील असा अंदाज आहे. यंदा इन्कम डिक्लेरेशन स्किम आणून त्या माध्यमातून नागरिकांना कर भरण्याची सुवर्ण संधी उपलब्ध होत असून आजपर्यंत कोणतीही संपत्ती जी घोषित केली गेली नाही, ती संपत्ती नागरिकांनी जाहीर करावी. ही संपत्ती जाहीर न केल्यास १ ऑक्टोबरनंतर कारवाई केली जाईल. ज्यांनी अलीकडच्या वर्षांत आपले अचूक उत्पन्न घोषित केलेले नाही, अशा सर्व व्यक्तिंना पुढे येऊन अघोषित उत्पन्न घोषित करण्याची संधी 'उत्पन्न घोषणा योजना-२०१६' यातून मिळत आहे. जाहीर केलेल्या मालमत्तांना संपत्ती करातून सूट मिळेल, इन्कम टॅक्स अॅक्ट- वेल्थ टॅक्स अॅक्ट अंतर्गत अशा घोषित उत्पन्नाची पडताळणी किंवा चौकशीही केली जाणार नाही. खटला दाखल होण्यापासून मुक्ती मिळू शकेल. विशिष्ट अटींच्या अधीन बेनामी व्यवहार प्रतिबंध अधिनियम १९८८ पासून सूट मिळेल,' असे रुबी आणि श्रीवास्तव म्हणाले.

मराठवाड्यातील बोलकी आकडेवारी
'मराठवाडयात एकूण २ लाख ७२ हजार ७७८ करदाते असून त्यांच्याकडून गेल्या वर्षी ८०० कोटींचा कर वसूल केला. यंदा ३ लाखांहून अधिक करदाते निर्माण झाले असून संपत्ती घोषित करण्याच्या उद्देशाने हे टार्गेट अधिक समर्पकपणे पूर्ण होईल, असे मत शिवदयाल श्रीवास्तव यांनी व्यक्त केले.

१२००हून अधिक जणांना नोटीस
'कर भरा,' अशा आशयाच्या नोटीस सुमारे १२०० हून अधिक जणांना देण्यात आल्या आहेत. रोज १ जुलैपासून किमान १०० जणांना तरी रोज नोटीस जात आहेत. यात रोज भर पडत असून कर न भरत असलेल्यांचे व कर भरत असलेल्यांचे बँक खाते, फोन टॅप करणे सुरू झाले आहे,' असे रुबी श्रीवास्तव यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नारेगाव कचरा डेपो अनधिकृत

$
0
0


म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद
महापालिकेचा नारेगाव येथील कचरा डेपो अनधिकृत असल्याचे शपथपत्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठात सादर केले. डेपो सुरू करण्यासाठी मंडळाची परवानगीच घेतली नसल्याचे व कच-याची विल्हेवाट लावण्यासाठी कायदेशीर मानांकाचे पालन होत नसल्याचे शपथपत्र स्पष्ट करण्यात आले आहे.
नारेगाव येथील कचरा डेपोमुळे व कचरा जाळल्या जात असल्याने होणाऱ्या धुरामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. त्याविरोधात खंडपीठातील वकील नरसिंह जाधव यांनी जनहित याचिका दाखल केली होती. कचरा डेपो त्वरित बंद करून स्थलांतरित करावा, कचरा जाळण्याचे काम ताबडतोब बंद करावे, अशी विनंती याचिकेत करण्यात आली होती. यापूर्वी झालेल्या सुनावणीत औरंगाबाद खंडपीठाने महापालिका, प्रदूषण नियंत्रण मंडळाला नोटीस बजावली होती.
सोमवारच्या सुनावणीत प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी धनंजय पाटील यांनी शपथपत्र सादर केले. त्यानुसार पालिका प्रत्येक दिवशी ४०० मेट्रीक टन कचरा शहरातून गोळा करते व तो अशास्त्रीय पद्धतीने डेपोत आणून टाकते. या डेपोसाठी पालिकेने मंडळाची कुठलीही परवानगी घेतलेली नाही. हवेतील दूषित घटकांची तपासणी केली असता हवेतील प्रदूषणाचे प्रमाण नियमांपेक्षा जास्त आढळले आहे. मंडळाने कचरा डेपो बंद करण्याचे निर्देश दिलेले आहेत. प्रदूषणासाठी संबंधितांवर नियमांप्रमाणे कार्यवाही करण्यात येईल, असे शपथपत्रात स्पष्ट करण्यात आले आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीने पी. पी. मोरे तर पालिकेच्या वतीने राजेंद्र देशमुख हे काम पाहत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्राणावर आले ते उडीवर निभावले!

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
रस्त्यावरील खड्डे, जीवघेणी वाहतूक यामुळे सोमवारी दुपारी जवाहरनगर पोलिस ठाण्यासमोर दुचाकीस्वार स्कूलबसच्या चाकाखाली येता-येता बचावला. त्याने उडली मारली आणि पुढचा अनर्थ टळला. पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने गुन्ह्याची नोंद न होता प्रकरण आपसात मिटवण्यात आले.
दुपारी पावणेचार वाजता एक स्कूलबस गजानन महाराज चौकाकडून गारखेडा सूतगिरणी चौकाकडे येत होती. नेमके याच वेळी पॅशन प्रो दुचाकीवर एक दुचाकीस्वार विजयनगर चौकाकडून जवाहरनगरकडे येत होता. रस्त्यावरील खड्डे चुकवण्याच्या नादात ही स्कूल बस या दुचाकीस्वाराच्या दिशेने वेगात आली. अंगावर येणारी स्कूलबस पाहून दुचाकीस्वार दुचाकीवरून उडी घेत बाजूला झाला. यामुळे तो थोडक्यात बचावला. या ठिकाणी बघ्यांची गर्दी झाली. चार्ली पोलिसही तेथे दाखल झाले. दुचाकीस्वार व बसचालकात वाद सुरू होता. यावेळी शिंदे नावाचे एक पोलिस अधिकारी देखील घटनास्थळी दाखल झाले. मात्र, बसचालकाने तरुणाच्या दुचाकीचे काही नुकसान झाले असल्यास ते भरून देण्याची तयारी दर्शवली. यानंतर या प्रकरणावर पडदा पडला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दौलताबाद घाटात तरूण ठार, तरुणी जखमी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पडेगाव
दौलताबाद घाटातील दिल्ली गेटजवळ एका ट्रकने दुचाकीस्वाराला दिलेल्या धडकेत एक तरूण जागीच ठार झाला, तर त्याच्या सोबतची तरुणी गंभीर जखमी झाली आहे. हा अपघात मंगळवारी दुपारी दीड वाजता झाला.
धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील दौलताबाद घाटातील दिल्ली गेटजवळ मध्यप्रदेशातून माल घेऊन कर्नाटकात जाणाऱ्या ट्रकने (के. ए. ४९१५) औरंगाबादहून वेरूळकडे जाणाऱ्या दुचाकीला (एम. एच. २०, बी. एच. ९३३) धडक दिली. या धडकेत क्षितीज पंकज पोहुरकर (वय २०. रा. नंदनवन कॉलनी) व राणी मगरे हे दोघे गंभीर जखमी झाले. हा अपघात एवढा गंभीर होता की रस्त्याच्या बाजुला रक्ताचा सडा पडला होता. या दोघांना त्यांचा मित्र गणेश देसाई याने खासगी वाहनाने घाटी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. डॉक्टरांनी क्षीतिज यास मृत घोषित केले. राणी मगरे यांच्यावर उपचार सुरू आहेत.

पोलिसांची खाबुगिरी
वेरूळ गावापासून जडवाहतूक कसाबखेडा फाटामार्गे, तर दौलताबाद टी पॉइंटवरून माळीवाडा-फतियाबाद-कसाबखेडा फाटा अशी वळवली आहे. त्यानंतर सुद्धा जड वाहने सर्रास घाटातून प्रवास करतात. या वाहनांना थांबवून पोलिस 'एन्ट्री' वसूल करून सोडून देतात. यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये पोलिसांबद्दल संताप आहे.

नुकतीच लागली होती नोकरी
क्षितीजच्या वडिलांचे निधन झाले असून ते एमएसईबीमध्ये कार्यरत होते. त्यांच्या जागेवर अनुकंपा तत्वावर क्षितीज नुकताच नोकरीला लागला होता. रायगड येथे त्याची पोस्टिंग होती, तो शनिवारी शहरात आला होता. पण, सुटीवर आलेल्या क्षितीजवर काळाने काळाने घाला घातला.

आनंदाचे झाले शोकात रुपांतर
क्षितीजचा मित्रमैत्रिणीचा ग्रुप पीइएस इंजिनीअरिंग कॉलेजचा होता. मंगळवारी पावसाळी वातावरणाचा आनंद लुटण्यासाठी चार तरुण व चार तरुणी दुचाकीवर म्हैसमाळकडे निघाले होते. आनंदात निघालेल्या या दुचाकीस्वारापैकी क्षितीजच्या दुचाकीचा ट्रकसोबत अपघात झाला आणि आनंदाचे रुपांतर काही मिनिटांमध्ये शोकात झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images

<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>
<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596344.js" async> </script>