Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

कटकट गेटने घेतला मोकळा श्वास

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
कटकट गेट या ऐतिहासिक दरवाज्यात होणाऱ्या वाहतूक कोंडीचा प्रश्न अखेर मंगळवारी सुटला. गेटच्या दोन्ही बाजूला प्रस्तावित रस्त्यासाठी मालमत्तांचे भूसंपादन करण्यात आले. त्याचबरोबर काही अतिक्रमित दुकाने लोकांनी स्वतःहून हटविली. किरकोळ वाद वगळता ही भूसंपादन प्रक्रिया शांततेत पूर्ण करण्यात आली.
महापालिकेचे अतिक्रमण पथक मंगळवारी सकाळी नऊच्या सुमारास कटकट गेट परिसरात पोलिस बंदोबस्त घेऊन पोचले. कटकट गेटच्या दोन्ही बाजूने प्रस्तावित ९ मीटरच्या रस्त्यावरील दुकाने हटविण्याची कारवाई सुरू करण्यात आली. नागरिकांनी मालमत्ता हटविण्यासाठी वेळ देण्याची मागणी केल्यानंतर काही काळासाठी कारवाई थांबविण्यात आली. नागरिकांनी आपल्या मालमत्ता स्वतःहून हटविण्यास सुरवात केली. त्यांना वेळ देऊनही मालमत्ता वेळेत हटविल्या जान नसल्याने महापालिकेने बुलडोजर लावण्याचा निर्णय घेतला. मालमत्ताधारकांनी बुलडोजर लावू नका, आम्ही आमचे सामान काढून घेतो. दरवाज्यालगतची भिंत आधी पाडा, अशी भूमिका काही नागरिकांनी घेतली. यामुळे महापालिका अधिकारी आणि नागरिक यांच्यात वाद झाला होता. काही वेळेसाठी तणाव निर्माण झाला होता. नगरसेवक अजीम अहेमद यांनी मध्यस्थी केल्यानंतर हा वाद मिटला. त्यानंतर मालमत्ता हटविण्याची कारवाई सुरू करण्यात आली.
कटकट गेटच्या डाव्या बाजूला असलेली दुकाने, मालमत्ता हटविण्यात आल्या. हा रस्ता मोकळा करण्यासाठी नगरसेवक अहेमद, नगरसेवक नर्गिस फिरदौस यांनी महापालिका आयुक्त आणि नाग‌रिकांची बैठक घेतली होती. या प्रस्तावित रस्त्यावरील चार मालमत्ता धारकांनी टीडीआर घेण्याचा निर्णय घेतला. एका मालमत्ताधारकाने एफएसआय घेतला. कटकट गेटच्या बाहेरची बाजू ही माजी नगरसेवक मुजीब आलम शहा यांच्या मालकीची असून, त्यांनी रेखांकनामध्ये काही बदल करून देण्याची मागणी महापालिकेकडे केली. त्याप्रमाणे कार्यवाही करण्याचे पालिकेने मान्य केल्यानंतर भूसंपादन प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली. या प्रस्तावित रस्त्यावरील अतिक्रणधारकांनी स्वतःहून अतिक्रमण हटविली. कार्यकारी अभियंता सिकंदर अली यांच्यासह उपायुक्त रवींद्र निकम, प्रभारी नगररचना संचालक ए. बी. देशमुख यांच्यासह महापालिकेचे अतिक्रमण हटाव पथक आणि पोलिस कर्मचारी या कारवाईच्यावेळी उप‌स्थित होते.आमदार इम्तियाज जलील यांनी कारवाईची पाहणी करून मालमत्ताधारकांची भेट घेतली केली. याशिवाय महापौर त्र्यंबक तुपे यांनीही या कारवाईची पाहणी केली.

गल्लीला जाण्यासाठी रस्ता झाला मोकळा
शरीफ कॉलनी वॉर्डात कटकट गेटच्या बाजूला असलेल्या गल्लीतील नागरिकांना या कारवाईमुळे आनंद झाल्याचे एस. एन. पठाण यांनी सांगितले. कटकट गेटमध्ये वारंवार कोंडी होत असल्याने गल्लीमध्ये जाण्यासाठी रस्ता उपलब्ध होत नव्हता. गेटच्या दोन्ही बाजूने रस्ता रस्ता झाल्याने गल्लीमध्ये जाण्यासाठी रस्ता मोकळा झाल्याचे पठाण यांनी सांगितले.

रस्त्याचे कामाचे उद‍‍्घाटन आज होणार
जिल्हा विकास समितीने या रस्त्यासाठी ५० लाख रुपये ‌दिले आहेत. या कामासाठी महापालिका ५० टक्के रक्कम देणार आहे. रस्त्याच्या कामाचे उद्घाटन पालकमंत्री रामदास कदम यांच्या हस्ते बुधवारी केले जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दौलताबादेत २२ लाखांचा गुटखा जप्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
अन्न आणि औषध प्रशासन आणि औरंगाबाद स्थानिक गुन्हे शाखाने मंगळवारी दौलताबाद येथे २२ लाखांचा गुटखा जप्त केला. त्याचबरोबर शेकटा येथे ३२ पोती गुटखा जप्त करण्यात आला. गुटखा जप्तीची ही या महिन्यातील चौथी कारवाई अाहे. आजपर्यंत सुमारे १ कोटीचा गुटखा जप्त करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
पोलिसांना गुटख्याबाबत माहिती मिळाली होती. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखा, अन्न व औषध प्रशासन यांनी मंगळवारी दौलताबाद येथे कारवाई केली. तेथे तीन वाहनांतून (क्रमांक एमएच २१ एक्स ८९३, एमएच २० डीई ८८६ व एमएच २१ एक्स ७२८९) गुटख्याने भरलेली सुमारे ४५ पोती जप्त केली. त्यात २२ लाखांचा गुटखा होता, अशी माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाचे डॉ. राम मुंडे यांनी दिली. दरम्यान, शेकटा येथे १२१ पोती जप्त करण्यात आला असून, गुटख्याची मोजदाद रात्री उशिरापर्यंत सुरू होती, अशी माहिती करमाड पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक डी. जी. चिखलीकर यांनी दिली.
दौलताबाद येथे आरोपी आमेर खान महमूद खान, इब्राहिम खुदबोद्दिन शेख, वसीम शेख व शेख नदीम शेख लाला यांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याकडून सुमारे २२ लाख १० हजारा रुपये किमतीचा हिरा, गोवा गुटखा, रजनीगंधा पानमसाला आदी जप्त केले.
गुन्हा शाखेचे निरीक्षक मधुकर सावंत, उपनिरीक्षक प्रकाश आवारे, दक्षता विभागाचे अन्न सुरक्षा अधिकारी डॉ. राम मुंडे, अन्न सुरक्षा अधिकारी फरीद सिद्दिकी, वर्षा रोडे, गुन्हे शाखेचे सहायक निरीक्षक नंदकुमार भंडारे, बी. वाय. पगारे, राठोड, शाह, विकास माताडे यांनी कारवाई केली.
गुटख्याचे नमुने प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार आहेत. अन्न सुरक्षा अधिकारी राम दत्तात्रय मुंडे यांच्या फिर्यादीवरून दौलताबाद ठाण्यात येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उद्योजक व्हा... : शेतमजुराचा मुलगा झाला उद्योजक

$
0
0

dhananjay.kulkarni@timesgroup.com
Tweet : @dhananjaykMT
गंगापूर तालुक्यातील एकलहरे गावाचे किशोर कुऱ्हाडे यांचे शिक्षण केवळ बारावी सायन्स झालेले. परिस्थितीमुळे पुढे शिकता आले नाही. आई ताराबाई आणि वडिल काणूपाटील कुऱ्हाडे दोघेही शेतमजूर. दोघांनीही त्यांच्या परिस्थितीनुसार मुलांना शिकवले. आई, वडिलांनी मुलांनी थोडेतरी शिकावे यासाठी सातत्याने प्रयत्न केले. किशोर यांना दोन भाऊ. अशोक दोघेही चौथी आणि संजीव यांनी दहावीपर्यंत शिकून स्वत:च्या व्यवसाय सुरू केला. किशोर यांनी बारावी सायन्सपर्यंत शिक्षण घेऊन वेगळीवाट निवडताना आपल्याला संकटे येणार, त्यांचा सामना करावा लागणार याची किशोर यांना जाणीव होतीच, पण आई वडिलांचे पाठबळावर, तोंडात साखर आणि डोक्यावर बर्फ असल्याने कधी निराश वाटले नाही. कामात झोकून देणे हा गुण असल्याने किशोर यांनी आधी चार वर्षे नोकरी केली. शोभा इंजिनीअरिंगच्या अनिल पाटील यांच्याकडे काम करताना त्यांना खूप शिकायला मिळाले. किशोर यांनी अनिल पाटील यांच्या युनिटमध्ये स्वतःला झोकून दिले. स्वत: कोणतेही टेक्निकल शिक्षण न घेता पाटील यांच्याकडून सर्व शिकून घेतले व काम केले. चार वर्षांतील विविध अनुभवांनी किशोर यांचा आत्मविश्वास दुणावला आणि आपण आपल्या मालकाप्रमाणे स्वतःचे युनिट का सुरू करू नये, असे विचार किशोर यांच्या मनात घोळू लागले व त्या विचारांना पाटील यांनीही साथ दिली. पुढे ज्येष्ठ उद्योजक श्रीधर नवघरे यांच्या आर्थिक सहकार्याची साथ मिळाल्याने किशोर यांच्या आयुष्याला अजून एक ‘टर्निंग पॉइंट’ मिळाला. नवघरे यांनी २००८मध्ये एक लेथ मशीन आणि एक ड्रील मशीन घेऊन दिली होती. त्याचे हप्ते कुऱ्हाडे यांनी कष्ट करून फेडले. किशोर ‌कुऱ्हाडेंच्या मनमिळावू, विनम्र स्वभावामुळे आणि संपूर्ण कामाचा आवाका असल्यामुळे ऑर्डर मिळत गेल्या. काम वाढत गेले आणि आता त्यांच्याकडे दोन लेथ, दोन डीआरडी, एक मिलिंग, दोन ड्रील मशीन व इतर असे सुमारे १५ ते १६ मशीन आहेत. अवघ्या आठ वर्षांत त्यांची उलाढाल वर्षाकाठी १२ ते १५ लाखापर्यंत गेली आहे.

आठ जणांना दिले काम
अनिल पाटील यांनी केलेले मार्गदर्शन, श्रीधर नवघरे यांनी त्यांना केलेली मदत यांचे ते कायम आभार मानतात. त्यांनाच ते यात गुरू मानतात. आज २०१६मध्ये त्यांच्या छोटेखानी उद्योगात ८कामगार असून त्यांच्या ४० ते ५० सदस्यांचे कुटुंब त्यांच्या उद्योगावर जगत आहे. छोटे उद्योजक म्हणून उभे राहताना व कमी शिकूनही आपण सरकारला कर देणे लागतो, किंबहुना आपले ते कर्तव्य आहे याची जाणीव त्यांना अाहे. ते दरवर्षी कर भरत आहेत. एकीकडे उद्योगाचा व्याप वाढवताना दुसरीकडे घरसंसार पातळीवर पत्नी मीना यांनी साथ दिली आहे. अचूक काम, जिद्द, ऑर्डर पूर्ण करण्याची हातोटीतून उद्योगाला चालना मिळाली. संधीचे सोने करण्याची आवड व संस्कार कामी आले. सात-आठ वर्षांच्या नोकरीत जमा झालेल्या पुंजीतून भांडवल उभे राहणे शक्य नव्हते, पण वाळूजमध्ये जागा मिळवणे, यंत्रसामग्री उभारणे, कामगारांची जुळवाजुळव, भांडवल मिळवणे, नुकसान झाल्यास ते सहन करण्याची तयारी ठेवणे आदी अडचणींना तोंड दिले. अडचणी अाल्या, तरी प्रयत्न सोडले नाहीत. उद्योगाच्या बळावरच किशोर यांनी स्वतःच्या युनिटसाठी एक हजार चौरस फूट जागा विकत घेतली. शिवाय स्वतःचे घर व दुचाकी गाडीही उद्योगामुळे झाली. नोकरीमध्ये हे शक्य नव्हते, उद्योगामुळेच हे सर्व शक्य झाले, असे ते सांगतात. कठोर मेहनत, शिस्त असेल व आपल्या उद्योगाची पूर्ण माहिती असेल, तर उद्योजक होणे कठीण नाही, असेही किशोर म्हणतात.

आई-वडिलांच्या कष्टाची जाणीव
आई-वडिलांनी शेतमजूर हालाखीत दिवस काढले. त्यावर मात करीत किशोर ‌कुऱ्हाडे यांनी वाळूजमध्ये स्वतःची एक हजार चौरस फूट जागा घेतली. तेथे व्यवसाय सुरू केला आहे. याशिवाय उद्योगाच्या जोरावर ‌कुऱ्हाडेंनी एकलहरे येथे एक एकर जमीन घेऊन शेतीसही सुरुवात केली आहे. शेतीत ते कपाशीचे उत्पादन घेत असतात.

पॅशन म्हणून शक्य
उद्योगात पाऊल ठेवण्याआधी सर्वप्रथम स्वत:कडील कौशल्याचा शोध महत्त्वाचा आहे. त्यानंतर उपलब्ध भांडवल, कर्ज, जागा, उत्पादनाला बाजारात मिळणारा प्रतिसाद, कच्च्या माल, तांत्रिक कौशल्य, मार्केटिंग याचाही विचार करत किशोर यांनी त्यांच्या उद्योगाचा व्याप वाढवला आहे. केवळ कामगारच नव्हे, तर कच्च्या मालाचे पुरवठादार, व्यापारी, वितरक यांच्यासोबत सुद्धा सलोख्याचे संबंध ठेवत किशोर यांनी हे यश मिळवले आहे. ‘दुर्दम्य इच्छाशक्ती असूनही नोकरीत फार काही करता येत नाही. आयुष्यावर मर्यादा पडतात व मुक्तपणे जगता येत नाही. त्यावेळी फक्त विचार न करता चटकन निर्णय घेणे गरजेचे असते,’ असे ते सांगतात.

सचोटी व प्रांजळपणा
कामगार आले नाही, तर स्वतः मशीनवर बसून काम पूर्ण करण्याची हातोटी किशोर यांच्याकडे आहे. उद्योगातील मार्केटिंग, प्रशासन, डिलिव्हरी देणे, नवीन जॉब शोधून आणणे, पर्चेसिंग व इतर सारी काम ते एकटेच करतात.

शेतीची आवड
आई,वडील शेतीत मजुरी करायचे, पण स्वत:चे एकलहरे येथे शेत नव्हते कष्ट करत आणि उद्योगाचा व्याप सांभाळत किशोर यांनी त्याच गावात एक एकर शेती घेतली. कामात मन रमताना आईचा आशीर्वाद, देवावरील श्रद्धा, मेहनत यामुळे हा उद्योग यशस्वी झाला, असे किशोर सांगतात.

कोमल एंटरप्राइजेसचे उत्पादन
इंजिनीअरिंग टुल्स, ड्रीलिंग, लेथिंग, ‌मलिंग आणि इतर ऑटो कंपोनंटच्या विविध पार्टला लागणारे बारीकसारीक काम ते कोमल एंटरप्राइजेस या त्यांच्या व्यवसायातून करतात. कोमल ही त्यांच्या मोठ्या भावाची मुलगी. ती कुटुंबात सर्वांचीच लाडकी म्हणून तिच्या नावाने हा व्यवसाय सुरू केला, असे किशोर सांगतात. किशोर कुऱ्हाडे यांनाही एक मुलगा आणि एक मुलगी आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहरातील प्रत्येक चौक धोकादायक

$
0
0

शहरातील प्रत्येक चौक धोकादायक
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
शहरातील विविध नवीन ११ सिग्नल सुरू करण्यात आले आहेत. त्यामुळे महत्त्वाच्या चौकात होणाऱ्या वाहतूक कोंडीपासून काही प्रमाणात नागरिकांची सुटका झाली आहे. मात्र, बहुतांश चौकात सिग्नलच्या वेळा अत्यंत कमी असल्याने वाहनधारकांचा गोंधळ उडत आहे. दुपारच्या वेळेस या सिग्नलवर पोलिस कर्मचारी उपस्थित राहत नसल्याने या काळात सिग्नल तोडण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात घडत आहेत. एकंदरीत हे सिग्नलही असून अडचण नसून खोळंबा असे झाले आहेत.
शहरातील शहानूरमिया दर्गा चौक, रोपळेकर हॉस्पिटल चौक, सूतगिरणी, गांधीनगर, चिश्तिया कॉलनी चौक, देवळाई चौक या महत्त्वाच्या चौकातील सिग्नल आठ दिवसांपूर्वीच सुरू करण्यात आले आहेत. जालना रोडकडून गारखेडा, बीड बायपासकडे जाणाऱ्या मार्गावर वाहनांची वाहतूक वाढली आहे. या भागात सातत्याने होत असलेल्या वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून या सिग्नलची उभारणी करण्यात आली आहे. बीड बायपासकडून शहरात येणारी वाहने प्रामुख्याने देवळाई चौक, सूतगिरणी व शहानूरमिया दर्गा चौकामार्गे येतात. या ठिकाणी याआधी सिग्नल अथवा वाहतूक पोलिस नसल्याने या चौकात वाहतूक कोंडी होण्याचे प्रकार हमखास घडत होते. रोपळेकर चौकात देखील वाहतूक कोंडीचे प्रकार घडत होते. या सिग्नलमुळे गेल्या आठ दिवसांपासून वाहतूक सुरळीत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
सुरुवातीलाच घरघर
नव्याने उभारण्यात आलेल्या सिग्नलपैकी दोन सिग्नलला सुरुवातीलाच अपशकून झाला आहे. सिग्नल सुरू होऊन आठ दिवस उलटत नाही तोच सूतगिरणी चौक व जवाहरनगर पोलिस ठाण्यासमोरील चौकातील सिग्नल बंद पडले आहेत. या सिग्नलच्या दुरुस्तीला अद्याप मुहूर्त लागलेला नाही.
वेळ वाढवण्याची गरज
नव्याने सुरू करण्यात आलेल्या या सर्व चौकात सिग्नल सुटण्याची वेळ ४५ सेकंद ते एक मिनीट आहे. मात्र, सकाळी व संध्याकाळच्या वेळेस वाहनांची गर्दी होत असल्याने सिग्नलची ही वेळ कमी पडत आहे. या वेळेमध्ये सिग्नल पार करण्यासाठी वाहनधारकांची तारांबळ उडत असल्याचे चित्र दिसून येत आहे. ही वेळ वाढवण्याची गरज आहे.
अवजड वाहनांसाठी पळवाट
जालना रोड वगळल्यास नवीन सिग्नलवर दुपारी वाहतूक पोलिसांना जेवणासाठी तास दोन तासांचा अवधी देण्यात येत आहे. या कालावधीत सिग्नलला कोणी वाली नसल्याने अवजड वाहनधारकांसाठी ही पर्वणीची वेळ ठरत आहे. शहरात दिवसा अवजड वाहनांची वाहतूक करण्यास मनाई आहे. जुन्या मोंढ्यातून ट्रान्सपोर्टची वाहने या काळात काढण्यात येऊन गांधीनगर, महर्षी दयानंद चौक, दर्गा चौक मार्गे बीड बायपासवरून शहराबाहेर काढून सर्रास वाहतूक सुरू असल्याचे चित्र आहे.
सिग्नलची डोकेदुखी
ट्रॅफिक सिग्नलमधील दोष, महापालिकेची अनास्था आणि वाहनचालकांच्या बेशिस्त वर्तनामुळे शहरातील प्रत्येक चौक धोकादायक बनला आहे. या डोकेदुखीची कारणे शोधल्याविना नवनवीन चौकांमध्ये सिग्नल बसविले जात असल्यामुळे वाहतुकीतील अडथळे वाढत चालले आहेत. काही चौकांत एक मिनिटाचे, तर काही ठिकाणी त्याहून कमी वेळेचे सिग्नल बसविण्यात आले. त्यामुळे वाहन एकदा थांबल्यानंतर दोन ते तीन वेळा हिरवा सिग्नल लागल्याशिवाय चौक ओलांडताच येत नाही. चौकांची डावी बाजू मोकळी ठेवली जात नाही. त्यामुळे वाहनांच्या मोठ्या रांगा लागतात. खड्ड्यांचे अडथळे असल्यामुळे लाल दिवा लागण्यापूर्वी चौक ओलांडण्याची घाई वाहनांना करता येत नाही. बीड बायपासवर डिव्हायडरला खेटून ट्रक थांबतात. सिग्नल मिळताच डावीकडून उजवीकडे वळणाऱ्या दुचाक्या ट्रकचालकांना दिसत नाहीत आणि अपघात होतात. प्रत्येक चौकाचा स्वतंत्र अभ्यास करून ​सिग्नलच्या वेळा आणि व्यवस्था सुधारली, तर प्रदूषण टळेल आणि वाहतूकही सुरळीत होईल. पोलिस आणि मनपा प्रशासनाने यासाठी पुढाकार घ्यावा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

झेडपीची आरक्षण सोडत पाच ऑक्टोबरला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या २०१७ मधील सार्वत्रिक निवडणुकांसठी आरक्षण सोडत पाच ऑक्टोबर रोजी काढली जाणार आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार औरंगाबाद जिल्हा परिषदेंतर्गत ६२ गट व पंचायत समितीच्या १२४ गणांसाठी करण्यात आलेल्या प्रारुप प्रभाग रचनेसाठी ही सोडत काढण्यात येईल.
प्रारुप प्रभाग रचनेच्या नागरिकांचा मागास प्रवर्ग व महिला (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग व सर्वसाधारण प्रवर्ग महिलांसह) ही सोडत पाच ऑक्टोबर रोजी सकाळी अकरा वाजता काढण्यात येईल.
जिल्हा परिषद व पंचायत समितीचे नाव व आरक्षण सोडतीचे ठिकाण पुढीलप्रमाणेः औरंगाबाद जिल्हा परिषद- नियोजन समिती सभागृह जिल्हाधिकारी कार्यालय, औरंगाबाद, पैठण पंचायत समिती- तहसील कार्यालय, पैठण, सिल्लोड पंचायत समिती- नर्मदाबाई मंगल कार्यालय, सिल्लोड, कन्नड पंचायत समिती- सीताराम मंगल कार्यालय, बसस्टँडजवळ कन्नड, वैजापूर पंचायत समिती- पंचायत समिती सभागृह, वैजापूर, गंगापूर पंचायत समिती- तहसील कार्यालय, गंगापूर, फुलंब्री पंचायत समिती- तहसील कार्यालय, फुलंब्री, खुलताबाद पंचायत समिती- भद्रा मारोती संस्थान भक्त निवास सभागृह, खुलताबाद आणि सोयगाव पंचायत समिती- बचत भवन, पंचायत समिती सोयगाव.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘पेट’साठी आता दोन महिने थांबा

$
0
0

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ पीएच.डी. पूर्व परीक्षा ‘पेट-४’साठी अर्ज मागविल्यानंतर ही परीक्षा ऑनलाइन घेतली जाणार असल्याने त्याची तयारी सुरू असून, किमान दोन महिने या प्रक्रियेला लागण्याची शक्यता व्यक्त होते आहे. प्रक्रिया करण्यापूर्वीच परीक्षेचे नियोजन करणे अपेक्षित असते, परंतु ‘पेट-४’बाबतही प्रशासनाचा ‘वराती मागून घोडे’ असा प्रकार सुरू आहे.
विद्यापीठाने पेट-४ परीक्षेसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया १५ दिवसांपूर्वी पूर्ण झाली. त्यानंतर परीक्षा केव्हा होणार याचे वेळापत्रक प्रशासनाने जाहीर केलेले नाही. या परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेतल्या जाणार आहेत. त्याची तयारी विद्यापीठाने सुरू केली आहे. अर्ज भरल्यानंतर परीक्षे कशी घ्यायची याचे नियोजन केले जात आहे. त्यातही अद्याप रिक्त जागांची स्पष्ट नसलेली आकडेवारी, परीक्षेचा अभ्यासक्रमही निश्चित नाही. त्यात ‘पेट-३’मधील विद्यार्थ्यांचे रखडलेली प्रक्रिया मार्गी लावण्याची प्रक्रिया सुरू आहे. ऑनलाइन प्रक्रियेलाच दीड ते दोन महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे ‘पेट-४’ परीक्षा पुढे लांबणार असल्याचे सांगण्यात येत आहे. विद्यापीठाने २०१३मध्ये पेट-३ घेतली होती. त्याची प्रक्रिया लांबल्याने पेट-४चे नियोजनही हुकले. आता तीन वर्षानंतर पेट परीक्षा होत आहे. त्यातही प्रशासनाच्या अशा गलथान कारभारामुळे विद्यार्थ्यांची फरफट सुरू आहे.

प्रथमच ऑनलाइन परीक्षा
विद्यापीठ पेट-४ परीक्षा ऑनलाइन घेणार आहे. विद्यापीठ औरंगाबाद, बीड, जालना आणि उस्मनाबाद या चारही जिल्ह्यांत ही परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेणार आहे. प्रथमच अशा प्रकारचा प्रयोग विद्यापीठ करत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी औरंगाबदला येण्याचा खर्च व वेळ वाचणार आहे.

पेट परीक्षा ऑनलाइन घेतली जाणार आहे. त्याची तयारी सुरू असून, या पद्धतीने निकालही तात्काळ विद्यार्थ्याला समजणार आहे. या सगळ्या प्रक्रियेला दीड महिन्यापेक्षा अधिक काळ लागू शकतो.
- डॉ. सतीश पाटील, बीसीयूडी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रशिक्षणार्थींना अवघे १०० रुपये विद्यावेतन!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
महिला व बालविकास विभागाने व्यवसायिक प्रशिक्षण घेणाऱ्या आर्थिकदृष्ट्या मागास कुंटुबातील मुलींना विद्यावेतन देण्यासाठी सुरू केलेली योजना लालफितीतच बंद करण्याची वेळ आली आहे. या योजनेत प्रशिक्षणार्थींना अवघे १०० रुपये विद्यावेतन देण्यात येते. त्यामुळे योजनेकडे गरजू पात्र लाभार्थी मुलींनी पाठ फिरविली आहे.
महिला व बालविकासामार्फत व्यवसायिक प्रशिक्षणासाठी मुलींना विद्यावेतन देण्यात येते. आर्थिकदृष्ट्या मागास कुटुंबातील बहुतेक विद्यार्थी, विद्यार्थिनी लवकर नोकरी मिळावी किंवा स्वतःचा व्यवसाय सुरू करावा म्हणून व्यावसायिक प्रशिक्षण घेतात. हीच बाब लक्षात घेत महिला व बालविकास विभागाने आर्थिकदृष्ट्या मागास कुटुंबातील दहावी पास झालेल्या व व्यवसायिक प्रशिक्षण घेणाऱ्या मुलींसाठी विद्यावेतन योजना सुरू केली. ही योजना सुरू होऊन १५ वर्षांहून अधिक काळ लोटला. या योजनेत प्रशिक्षणार्थींना केवळ १०० रुपये विद्यावेतन देण्यात येते. महागाईचा विचार केला असता हे विद्यावेतन प्रशिक्षर्थांची खिल्ली उडविणारे आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या अनुदानाच्या रक्कमेत एक रुपयाचीही वाढ केली नाही. दरमहा मिळणाऱ्या या शंभर रुपये अनुदान योजनेकडे गरजू प्रशिक्षणार्थींनी पाठ फिरवली आहे. त्यामुळे गेल्या दोन वर्षांत एकही अर्ज येथील कार्यालयास प्राप्त झाला नाही.

योजनेच्या अटी व शर्ती
लाभधारक मुलीचे महाराष्ट्रातील वास्तव्य १५ वर्षांपेक्षा कमी नसावे. त्यांच्या कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीयासाठी शासनाने ठरवून दिलेल्या उत्पन्नापेक्षा जास्त नसावे. प्रशिक्षणार्थी ज्या संस्थेमध्ये जे प्रशिक्षण घेत असेल त्या संस्थेकडे प्रशिक्षणवर्ग चालविण्याचा शासन संबधित प्राधिकरणाचा परवाना आवश्यक आहे. प्रशिक्षणार्थीने निवडलेल्या अभ्यासक्रमासही संबधित प्राधिकरणाची मान्यता पाहिजे. प्रशिक्षणार्थीस इतर संस्था वा व्यक्तीकडून विद्यावेतन मिळत असेल आणि ते या विद्यावेतनापेक्षा जास्त असल्यास या विभागाचे विद्यावेतन दिले जाणार नाही. या योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित कागदपत्रासह महिला व बालविकास विभागकडे अर्ज सादर करावा लागतो. आलेल्या अर्जाची छाननी करून उपलब्ध निधीनुसार अर्जदारास अनुदान दिले जाते. लाभार्थी मुलींचा प्रशिक्षणवर्गाच्या कालवधीनुसार महिन्याकाठी १०० रुपये विद्यावेतन अनुदान दिले जाते.

योजनेच स्वरूप
आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील दहावी पास झालेल्या मुलींना शासनमान्य प्रशिक्षण केंद्रातून पॅकिंग, टेलिफोन ऑपरेटर, टंकलेखन, कम्प्युटर, नर्सिग, आयटीआयमधील प्रशिक्षण घेऊन शैक्षणिकदृष्ट्या स्वतःचे पुनर्वसन करण्यासाठी या योजनेद्वारे १०० रुपये विद्यावेतन म्हणून दिले जातात. ही योजना शहरी भागासाठी आहे.

दोन वर्षांपासून योजना कागदोपत्रीच
वाढत्या महागाईच्या काळात अवघे १०० रुपये प्रतिमाह म्हणून दिले जाणारे हे विद्यावेतन अत्यल्प आहे. त्यामुळेच या योजनेकडे लाभार्थ्यांनी पाठ फिरवल्याचे दिसते. दोन वर्षांत या योजनेसाठी एकही अर्ज आला नाही. २०१२-१३मध्ये ७ मुलींनी या योजनेचा लाभ घेतला. त्यासाठी एकूण ६ हजार रुपये खर्च करण्यात आले. २०१३-१४ आणि २०१४-१५ या दोन्ही वर्षांत संख्या १७ होती, अशी माहिती विभागाच्या सूत्रांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

झेडपी शाळांवर वीज संकट

$
0
0


झेडपी शाळांवर वीज संकट
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
जिल्हा परिषद शाळांना व्यावसायिक दराने केलेली वीज आकारणी भलतीच महागात पडली आहे. तीन वर्षांपासून या प्रश्नाकडे जिल्हा परिषद प्रशासन, राज्य सरकार दुर्लक्ष करत असल्याचा फटका आता शाळांना बसत आहे. जिल्ह्यातील ३५ टक्क्यांहून अधिक शाळांमधील वीजपुरवठा थकीत बिलापोटी खंडित करण्यात आला आहे. त्यामुळे कम्प्युटर बंद पडले असून परिपाठासाठी असलेले लाउडस्पीकरही निरुपयोगी ठरले आहेत.
जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये पुरविलेल्या वीजेचे शुल्क आकारताना ते व्यावसायिक दराने आकारण्यात येत आहे. यासंदर्भात शिक्षक, शिक्षक संघटनांनी शिक्षण विभागाकडे कित्येक वेळा तक्रारी करून याबाबत धोरण निश्चित करून घ्यावे, अशी मागणी केली. राज्य सरकारकडेही निवेदने धाडण्यात आली, पण त्यावर आजवर तोडगा निघालेला नाही. दरम्यान थकीत बिलाची रक्कम वाढल्यामुळे महावितरणने नियमानुसार वीजपुरवठा खंडित करणे सुरू केले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यातील २००० पैकी ३५ टक्के शाळांमधील वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. थकीत बिलाची रक्कम ३००० ते २८ हजार रुपयांपर्यंत आहे. प्रशासनाकडून शाळांच्या वीजबिलाचा प्रश्न सोडविण्यासाठी कुठलीच हालचाली केली गेली नाही. दुसरीकडे प्रगत शैक्षणिक उपक्रमांतर्गत अनेक शाळांत इ लर्निंगचे धडे देणे सुरू झाले. कम्प्युटर प्रशिक्षणाचीही सुविधा उपलब्ध करून दिली, पण शाळेत वीजच नाही तर ही उपकरणे चालणार कशी ? याचा साधा विचारही प्रशासनाने केला नाही. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे कौशल्य वाढविण्यासाठी धडपडणाऱ्या शिक्षकांनी प्रसंगी स्वतःच्या खिशातून पैसे जमा करून वीजबिलाचा भरणा केला. सातत्याने अडचणीच्या ठरलेल्या या प्रश्नाकडे प्रशासन आणि शिक्षण विभागाकडून दुर्लक्ष होत असल्याबद्दल शिक्षकांसह पालकांमध्येही संतापाचे वातावरण आहे.
शिक्षण सभापती विनोद तांबे यांनी शाळांमधून लाऊडस्पीकरसाठी तरतूद करून त्याचे वितरण केले. दैनंदिन परिपाठासाठी या लाऊडस्पीकरचा उपयोग होणार होता, पण वीजपुरवठाच उपलब्ध नसल्याने या लाऊडस्पीकरचा अनेक शाळांमध्ये उपयोग होताना दिसत नाही.

झेडपी शाळांसाठी व्यावसायिक दराने वीजपुरवठा करण्याऐवजी घरगुती दराने वीजपुरवठा करावा, या मागणीचे पत्र महावितरणला दिले आहे, पण त्यावर काहीच निर्णय झालेला नाही. सरकार आणि झेडपी प्रशासनाने याबाबत तत्काळ निर्णय घेऊन प्रश्न सोडवावा आणि ग्रामीण विद्यार्थ्यांची अडचण दूर करावी. - विनोद तांबे, सभापती, शिक्षण

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सफारी पार्कसाठी सपाटीकरण सुरू

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
सफारी पार्कच्या जागेवर महापालिकेकडून सपाटीकरणाचे काम सुरू करण्यात आले आहे. सुमारे दोनशे एकर क्षेत्राचे सपाटीकरण एक महिन्यात पूर्ण केले जाणार असून, त्यानंतर संरक्षक भिंत बांधून फळांची २० हजार झाडे परिसरात लावली जाणार आहेत, अशी माहिती पालकमंत्री रामदास कदम यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
पडेगाव - मिटमिटा परिसरात महापालिकेतर्फे सफारी पार्कचा विकास केला जाणार आहे. यासाठी दोनशे एकर जागेवर अनेक ठिकाणी उंचवटे आहेत. त्यामुळे संपूर्ण जागेचे सपाटीकरण करणे गरजेचे आहे. त्यासाठी चार पोकलेन मशीन्स उपलब्ध करून देण्यात आले आहेत. आणखी पाच ते सहा पोकलेन मशीन उपलब्ध करून देऊ. एक महिन्यात संपूर्ण जागेचे लेव्हलिंग केले जाईल. त्यानंतर सुमारे दीड कोटी रुपयांची तरतूद करून २०० एकर क्षेत्राला संरक्षण भिंत बांधण्यात येईल, असे कदम यांनी सांगितले. संरक्षक भिंतीच्या आतील बाजूने फळांची वीस हजार झाले लावली जाणार आहेत. त्यात आवळा, आंबा, शेवगा, काजू या झाडांचा समावेश असेल असे त्यांनी स्पष्ट केले. वृक्षारोपण झाल्यावर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सफारी पार्कचा विकास केला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
महापालिकेची मालमत्ता कराची वसुली फक्त आठ टक्के आहे, ही चिंतेची बाब आहे. सर्व विभागांचे सहकार्य घेऊन वसुली किमान ५० ते ६० टक्के करा, असे आदेश आयुक्तांना दिल्याचे कदम म्हणाले. दररोज गोळा होणाऱ्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी येत्या १५ दिवसात मशिन्स खरेदी केल्या जातील. त्यामुळे कचरा दिसणार नाही, कचऱ्यापासून खत तयार झाल्याचेच लक्षात येईल, असा विश्वास कदम यांनी व्यक्त केला. औरंगाबादेत होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शहर व जिल्ह्याशी संबंधित असलेल्या सर्व विभागांकडून प्रस्ताव मागवून ते बैठकीत मांडले जातील. शहरातील रस्त्यांसाठी १५० कोटी रुपयांचा प्रस्ताव आहे. ही रक्कम मिळाली तर शहरातील सर्व रस्ते चांगले होतील. पर्यटन स्थळांकडे जाणारे सर्व रस्ते चांगले करण्याचे नियोजन आहे असे कदम यांनी स्पष्ट केले.

रामा - अजिंठा अँबेसेडर हॉटेलला नोटीस
एमजीएम परिसरातील ज्या १६ एकर जागेत बाळासाहेब ठाकरे स्मृतिवन विकसित केले जाणार आहे त्या जागेवर एक सरोवर आहे. या सरोवरात हॉटेल रामा इंटरनॅशनल व अजिंठा अँबेसेडर या दोन हॉटेल्सचे ड्रेनेजचे पाणी सोडलेले आहे. हे पाणी तात्काळ बंद करण्याची नोटीस दोन्ही हॉटेलला द्या, आठ दिवसांत त्यांनी ड्रेनेजचे पाणी बंद केले नाही तर दोन्ही हॉटेल्स बंद करून टाका, असे आदेश रामदास कदम यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना दिले. यासाठी महापालिकेची मदत घेण्याची सूचनाही त्यांनी केली.

अॅट्रॉसिटी कायद्यात सुधारणा व्हावी
मी मराठा आहे. मराठा समाजावर अन्याय होतो यात दुमत नाही. मोर्चाच्या निमित्ताने करण्यात येणाऱ्या मराठा समाजाच्या मागण्या योग्य आहेत, माझे त्याला समर्थन आहे. ऑट्रॅसिटी कायद्यात सुधारणा झाली पाहीजे. राजकीय फायद्यासाठी या कायद्याचा दुरुपयोग केला जातो. दुरुपयोग करणाऱ्यांवरच ऑट्रॅसिटी दाखल करा, असे रामदास कदम म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मी कारभारीण : ..नाते आपुले फॅशनचे; विश्वासाचे, आपुलकीचे!

$
0
0

unmesh.deshpande@timesgroup.com
Tweet : @unmeshdMT
सुराणानगरातील एका अपार्टमेंटमध्ये प्रेरणा यावलकर राहतात. त्यांच्या पतींची जाहिरात एजन्सी. त्यामुळे त्यांना मार्केटिंगचा चांगला अनुभव आहे. त्यांच्या अनुभवाचा फायदा मला गारमेंटच्या व्यवसायात झाला, असे प्रेरणा यांनी सांगितले. २०१० पासून त्यांनी लेडीज गारमेंट विक्रीचा व्यवसाय घरगुती पद्धतीने सुरू केला. सासूबाई शिवणकामाचे क्लासेस घ्यायच्या. त्यांच्याकडे अनेक मुली आणि महिला शिवणकला शिकण्यासाठी यायच्या. त्यांच्याकडूनच आपण टाके मारणे, पेंटिंग करणे याचे शिक्षण घेतले. गारमेंट विक्रीचा व्यवसाय आपण करावा असे वाटत होते. सुरुवातीपासून त्यात आवड होती. सासूबाईंच्या शिवणक्लासच्या माध्यमातून त्याला खऱ्या अर्थाने प्रेरणा मिळाली आणि घरगुती पद्धतीने व्यवसाय सुरू केला, असे प्रेरणा सांगतात. नुसते घरी बसून काय करायचे, असा विचार करून हा व्यवसाय सुरू केला. घर आणि व्यवसाय दोन्हीही सांभाळता आले पाहिजे, असा विचार या मागे होता. व्यवसाय सुरू करण्यापूर्वी मुंबई, कोलकाता येथे जाऊन काही प्रदर्शने पाहिली. त्यातील स्टॉल्सला भेटी दिल्या. त्यातून नवनवीन कल्पना पुढे आल्या. मुंबई, कोलकोता, जयपूर येथून मटेरियल आणून ते विक्री करण्याचे काम सुरू केले. त्यासाठी ‘पिकॉक फेदर’ या नावाने फर्म सुरू केली. लेडिज कुर्ती, ड्रेस मटेरियल, सेमी स्टीच पॅटर्न, लेगीन्स, जेगीन्स, फॅन्सीटॉप, संस्कृती आणि परंपरा जपणारे लेडीज गारमेंटस् विक्री साठी आणले. सुरुवातीला ओळखीच्या महिला ग्राहक होत्या. विश्वास, दर्जा आणि माफक दर यामुळे ग्राहकांची संख्या वाढत गेली. बदलत्या फॅशनसह कलात्मक व नावीण्यपूर्ण गारमेंट उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न असतो, असे त्यांनी सांगितले. गारमेंटस् खरेदीसाठी आपण स्वतः विविध शहरांना भेट देतो. महिला व मुलींना काय आवडेल याची नोंद घेऊन गारमेंटस्ची खरेदी केली जाते. त्यासाठी वेळ द्यावा लागतो, पण वेळ देण्याची आमची तयारी असते.
कारण आपल्या ग्राहकांना चागल्यातल्या चांगल्या वस्तू मिळाव्यात, हाच या मागचा दृष्टिकोन असतो. शहरात विविध ठिकाणी प्रदर्शन लागतात. त्या प्रदर्शनातही स्टॉल लावतो. त्यातून नवनवीन ग्राहक जोडले जातात, असे यावलकर यांनी सांगितले. या सर्व कामात पती, सासू-सासरे, आई-वडील, भाऊ यांचे सहकार्य लाभते. कुटुंबातील सहकार्याशिवाय काहीच करता येत नाही, असा उल्लेख त्या करतात.
‘व्हरायटी - रेट आणि क्वालिटी’ या त्रिसूत्रीच्या आधारे संस्कृती आणि परंपरा जपत व्यवसायाची कास धरली आहे. हे करताना मॉडर्न पॅटर्नला देखील सोडले नाही, असे त्या म्हणाल्या. दोनशे रुपयांपासून चार हजार रुपयांपर्यंतचे गारमेंटस् विक्रीसाठी उपलब्ध असतात. त्यामुळे वेगवेगळ्या आर्थिक गटातील महिला ग्राहक आपल्याशी जोडल्या गेल्या आहेत. एकदा जोडल्या गेलेल्या ग्राहक तुटल्या नाहीत. त्यांच्याशी नाते घट्ट झाले, असे त्या अभिमानाने सांगतात. प्रेरणा यांना येत्या एक - दीड वर्षात स्वतःचे दुकान थाटायचे आहे. गारमेंटस् आणि बुटिक अशा स्वरुपाचे हे शॉप असेल, असे त्या म्हणाल्या. कपड्यांबद्दलची आपली निवड चांगली आहे. महिलांना कपड्यांची निवडच महत्त्वाची असते. त्यामुळे ग्राहक जोडून आहेत. दिवसेंदिवस त्यांची संख्या वाढतच आहे असे यावलकर यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिक्षण सेवकांना कमी करू नये

$
0
0



म. टा.विशेष प्रतिनिधी ,औरंगाबाद
खासगी संस्थेमार्फत २०१२ मे नंतरच्या शिक्षण सेवकांना अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनेच्या कारणावरून सेवेतून कमी करू नये, असा अंतरिम आदेश मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. संजय गंगापूरवाला व न्या. के. एल. वडणे यांनी दिले आहेत.
राज्य शासनाने २मे २०१२ रोजीच्या शासन निर्णयानुसार खासगी प्राथमिक शाळेतील रिक्त पदे भरण्यास बंदी घातलेली आहे. तरीही बऱ्याच खासगी शाळेच्या व्यवस्थापनाने प्राथमिक शाळेतील रिक्त पदे भरली. त्यापैकी अंबाजोगाई (जि. बीड), नांदेड, लातूर, उदगीर, औरंगाबाद, पैठण येथील शाळांमधील जवळपास १६ शिक्षकांच्या नेमणुका २ मे २०१२ नंतर शिक्षणसेवक म्हणून करण्यात आल्या आहेत. काही शिक्षकांच्या मान्यतेचा प्रस्ताव संबंधित शिक्षणाधिकाऱ्यांनी नामंजूर केला आहे. तर काही शिक्षकांचे प्रस्ताव प्रलंबित आहेत. अशा परिस्थितीत अतिरिक्त शिक्षकांचे शासनाने समायोजन करून सर्व सोळा शिक्षकांचे पदे अतिरिक्त दाखवून त्यांच्या जागी अन्य अतिरिक्त शिक्षकांचे समोयोजन करण्याचे ठरवले आहे. त्यामुळे या शिक्षकांनी औरंगाबाद खंडपीठात वेगवेगळ्या याचिका दाखल केल्या.
संबंधित शिक्षकांची नेमणूक करण्यापुर्वी महाराष्ट्र खासगी शाळा (सेवा शर्ती) अधिनियम व नियमातील सर्व तरतुदीचे पालन करून रितसर मान्यतेसाठी प्रस्ताव दाखल केलेले असून, या नियुक्त्या जाहिरातीद्वारे भरल्या आहेत. नेमणूक होईपर्यंत एकही अतिरिक्त शिक्षक पाठवण्यात आला नाही व गेल्या अनेक वर्षांपासून या शिक्षकांच्या मान्यतेचा प्रस्ताव प्रलंबित आहे, असा युक्तीवाद शिक्षकांचे वकील विलास पानपट्टे यांनी केला.
सुनावणीनंतर केवळ अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करावयाचे आहे किंवा याचिकाकर्त्याने धारण केलेले पद रिक्त आहे, या मुद्‌द्‌यावरून सर्व याचिकाकर्त्या सोळा शिक्षकांना सेवेतून कमी करू नये, असे अंतरिम आदेश खंडपीठाने दिले. सहाय्यक सरकारी वकील एस. वाय. महाजन, बी. व्ही. विर्धे, मंजूषा देशपांडे, एस. के. तांबे, जिल्हा परिषदेतर्फे पी. डी. सूर्यवंशी, बी. एस. माळी यांनी काम पाहिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खोटे दस्ताऐवज; कोठडीत वाढ

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
बनावट महिला उभी करून जम‌िनीचे खोटे दस्तऐवज तयार केल्याप्रकरणी आरोपीच्या पोलिस कोठडीत गुरुवारपर्यंत वाढ करण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस. एस. जांभळे यांनी मंगळवारी दिले.
या प्रकरणी डॉ. शुभांगी सुधीर गव्हाणे (रा. निर्मिक, एन-४, एच ७७, सिडको) यांनी सिडको पोलिस ठाण्यामध्ये फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, फिर्यादी व तिची बहीण स्मिता सुखदेव शेळके यांनी सुशिलाबाई दादाराव देशमुख यांच्याकडून चिकलठाणा शिवारात गट नं. ६३८ मधील १ हेक्टर २१ आर जमीन १५ जून १९९६ रोजी रजिस्टर्ड खरेदीखत क्र. १९२५/९६ नुसार खरेदी केली. या खरेदीखतानुसार फिर्यादीच्या हिश्शाला एक एकर व फिर्यादीच्या बहिणीच्या हिश्शाला दोन एकर एक आर जमीन आली आहे. याबाबत फिर्यादीने चिकलठाणा सज्जा येथे फेरफार रजिस्टरला ४१०९ प्रमाणे २१ जून १९९६ अन्वये नोंद घेतली आहे. माझ्या मालकी हक्कातील जमिनीवर आजपर्यंत माझा ताबा व कब्जा आहे. ही जमीन कोणालाही विकली नसल्याचे फिर्यादीने म्हटले आहे.
ही जमीन बळकावण्याच्या उद्देशाने आरोपी शेख नदीम शेख हसन (रा. घाटी मकईगेट) व बळीराम वैजीनाथ भोसले (रा. बीड) यांनी दुसरी महिला उभी करून तिचा फोटो, आधार कार्डच्या आधारे बनावट निवडणूक ओळखपत्र तयार करून फिर्यादीची मालमत्ता बळकावण्याच्या उद्देशाने बनावट दस्तावेज तयार केल्याची तक्रार फिर्यादीने दिली. यावरून पोलिसांनी तपास करून आरोपी बलभीम दगडू खोले (रा. संत तुकारामनगर, बीड) याला अटक केली. त्याला कोर्टाच्या आदेशाने मंगळवारपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्यात आले होते. कोठडीची मुदत संपल्यामुळे आरोपीला मंगळवारी कोर्टात हजर करण्यात आले असता, अटक केलेला आरोपी आणि त्याच्या साथीदारांनी कट रचून फिर्यादीची जमीन स्वत:च्या नावे करून घेतली. त्यांचे कोणी साथीदार आहेत का, या गुन्ह्यातील इतर आरोपी शेख नदीम हसन, बळीराम वैजीनाथ भोसले यांचा शोध घेणे बाकी आहे. तसेच या प्रकरणाचा सखोल तपास करणे बाकी असल्यामुळे आरोपींच्या कोठडीत तीन दिवसांची वाढ करण्यात यावी, अशी विनंती सहाय्यक सरकारी वकील बी. एम. राठोड यांनी कोर्टात केली. ही विनंती ग्राह्य धरून कोर्टाने आरोपीच्या कोठडीत दोन दिवसांची वाढ करण्याचे आदेश दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट हवेतच

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
महाड येथील सावित्री नदीवरील पूल दुर्घटनेनंतर सिल्लोड तालुक्यातील पूल कोसळल्याची घटना घडली. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने राज्यातील सर्व पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आदेश दिले होते. राज्यभरातील पुलांची यानिमित्ताने तपासणी केली जाणार होती. सार्वजनिक बांधकाम विभागाने मोठ्या पुलांची तपासणी करून दोन ब्रिटिशकालीन पूल धोकादायक असल्याचा अहवाल दिला आहे. दरम्यान अन्य पुलांच्या स्ट्रक्चरल ऑडिटसाठी पुरेसे मनुष्यबल नसल्याने ऑडिटबाबत सध्यातरी काहीच हालचाली झालेल्या नाहीत.
महाड दुर्घटनेनंतर सार्वजनिक बांधकाम विभाग खडबडून जागा झाला आणि राज्यातील पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आदेश दिले गेले. त्यात ब्रिटिशकालीन पुलांचा सर्वे तातडीने करा, असे सांगण्यात आले होते. औरंगाबाद विभागातील चार पैकी दोन ब्रिटिशकालीन पूल धोकादायक असल्याचे स्पष्ट झाले. तसा अहवालही पाठविण्यात आला. दरम्यान सिल्लोड जवळ कन्नड मार्गावरील पूल सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात कोसळला. त्यानंतर यंत्रणा पुन्हा खडबडून जागी झाली. सर्व पुलांचे ऑडिट करण्यासाठी पुन्हा एकदा हालचाली सुरू झाल्या. सू्त्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडब्लूडीकडे यंत्रणा नसल्याने मराठवाड्यातील पुलांचे सर्वेक्षण रखडले आहे. त्यात गेल्या दहा दिवसांत मराठवाड्यातील लातूर, बीड, उस्मानाबाद, नांदेड जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला. लातूर जिल्ह्यातील काही पुलांच्या जवळची माती वाहून गेल्याने धोका निर्माण झाला आहे. यासंदर्भात स्ट्रक्चरल ऑडिट पूर्वीच झाले असते तर यंत्रणेला यासंदर्भात उपाययोजना करणे सोपे झाले असते. त्यामुळे आता मराठवाड्यातील पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट कधी होणार ? हा प्रश्न मात्र अनुत्तरित आहे. यासंदर्भात अधीक्षक अभियंता ए. बी. सूर्यवंशी यांच्याशी संपर्क साधला असता होऊ शकला नाही.

- औरंगाबाद - जालना जिल्ह्यातील ३० मीटरपेक्षा अधिक लांबी असलेले पूल - ८१
- ब्रिटिशकालीन पूल - चार
- औरंगाबाद जिल्ह्यात प्रमुख मार्गावर असलेले छोटे पूल - ३००
- मराठवाड्यातील छोटे मोठे पूल (अंदाजे) - ८००

स्वतंत्र विभागाची प्रतीक्षा
राज्य सरकारने गेल्या आठवड्यात पीडब्ल्यूडी अंतर्गत पुलांच्या देखरेखीसाठी स्वतंत्र विभाग कार्यान्वित करण्याचे जाहीर केले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मराठवाड्यातील पुलांच्या देखरेखीसाठी औरंगाबादेत लवकरच स्वतंत्र विभाग सुरू होईल. अधीक्षक अभियंता दर्जाचा अधिकारी या विभागाचा प्रमुख असेल. पण हा विभाग कधी कार्यान्वित होणार याबाबत मात्र प्रतीक्षा आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चार महिन्यांत २८० व्यक्ती झाल्या एचआयव्ही बाधित

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
जिल्ह्यात केवळ चार महिन्यांत २८० व्यक्तींना नव्याने एचआयव्ही संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले असून, ११ गरोदर माताही एचआयव्ही बाधित झाल्याचे समोर आले आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात १५ हजार ४४६ रुग्ण एचआयव्ही बाधित आहेत आणि त्यातील ५ हजार ४०१ रुग्ण औषधोपचार घेत असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाकडून नुकत्याच जिल्ह्याधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत देण्यात आली.
जिल्हा एड्स प्रतिबंधक व नियंत्रण समिती आणि एचआयव्ही, टीबी समन्वय समितीची त्रैमासिक आढावा बैठक निवासी उपजिल्हाधिकारी विश्वंभर गावंडे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीत ही माहिती देण्यात आली.
या बैठकीला जिल्हा सामान्य रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. एस. घाटकर, उपजिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. जी. एम. कुंडलीकर, एच. आर. देशपांडे, महिला व बालविकास विभागाच्या पर्यवेक्षिका अधिकारी टी. आर. पाटील, आप्पासाहेब उगले, मंगेश गायकवाड, संजय पवार, विनोद मस्के, अरविंद वाडीकर आदी उपस्थित होते.

५९ हजार जणांची तपासणी
जिल्हा एड्स प्रतिबंधक व नियंत्रण पथकाच्या अधिपत्याखाली असलेल्या २३ आयसीटीसी केंद्रात एप्रिल २०१६ ते ऑगस्ट २०१६ या कालावधीत २९ हजार ५०७ सामान्य रुग्णांची एचआयव्ही तपासणी करण्यात आली. यापैकी २८९ व्यक्तींना एचआयव्हीची लागण झाल्याचे निदर्शनास आले; तसेच ३० हजार ४४६ गरोदर मातांची एचआयव्ही तपासणी करण्यात आली असून, त्यापैकी ११ गरोदर मातांनाही एचआयव्हीचा संसर्ग झाल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बेकरीची ‘आयटी’कडून चौकशी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
छावणीतील एका नामांकित बेकरी समूहाची प्राप्तिकर विभागाकडून गेल्या दोन दिवसांपासून चौकशी करण्यात येत असून, जिल्ह्यातील वैजापूर येथील एका नामांकित म‌ल्टिस्टेट पतसंस्थेच्या एक हजार खातेधारकांनाही नोटीस बजावल्याने उद्योग आणि व्यवसाय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
दरम्यान, नांदेड, परभणी, जालन्यातील वित्तसंस्था, डॉक्टर, आर्किटेक्ट, कंत्राटदारही प्राप्तिकर विभागाच्या रडारवर असून, सुमारे शहरात ८ हजार नोटीस बजावण्यात आल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांनी दिली आहे. परभणी, जालना, नांदेड येथे नामांकित डॉक्टर, मेडिकल ट्रस्ट या ठिकाणीही सर्वेक्षण करण्यात आले आहे. वैजापूर येथील नामांकित मल्टिस्टेट पतसंस्थेत एक हजार खातेधारकांनी बेहिशेबी व्यवहार केल्याचे उघड झाले आहे. यामुळे या सर्वच खातेधारकांना एकाचवेळी नोटीस बजावण्यात आल्या आहेत.

डॉक्टर, कंत्राटदारांकडे तपासणी
औरंगाबाद शहरातील तीन डॉक्टरांची तपासणी करण्यात आली असून, काहींना नोटीस बजावण्यात आल्या आहेत. वैजापूरच्याधर्तीवर शहरातीलदेखील काही पतसंस्था रडारवर असून, आर्किटेक्ट, डॉक्टर, वकील आणि कंत्राटदार यांचीही तपासणी केली, मात्र त्यांची नावे सांगण्यास प्राप्तिकर खात्याच्या सूत्रांनी नकार दिला. बीड, परभणी आणि नांदेड येथील प्रत्येकी तीन डॉक्टरांकडेही तपासणी केली असून, जालन्यातील पतसंस्था आणि मल्टिस्टेट पतसंस्थांही प्राप्तिकर विभागाच्या रडारवर आहेत.

आजपर्यंत ५ हजार नोटीस
औरंगाबाद शहरात विविध व्यावसायिक आणि उद्योजकांसह कर न भरत असलेल्या सुमारे ५ हजारांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत. जिल्ह्यापातळीवर हा आकडा ८ हजारापर्यंत गेला आहे, असेही सूत्रांनी सांगितले. अघोषित संपत्ती जाहीर करण्यासाठी आता केवळ २ दिवस असून, नोटीसना प्रतिसाद न देणाऱ्यांवर छापे टाकण्याचे सत्र सुरू होऊ शकते.

वैजापूरला छापे
गंगापूर रोड वरील एका राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्याच्या आणि व्यापाऱ्याच्या घरावर प्राप्तिकर विभागाने छापा टाकला असून, बेहिशेबी मालमत्ता बाळगणे, व्यवहार लपवून ठेवणे, बँक व्यवहार लपवणे आदी कारणांसह वारंवार बजावलेल्या नोटीसना उत्तर न दिल्यामुळे ही कारवाई करण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे. ‌‌खातेदारांना नोटीस बजावलेल्या मल्टिस्टेट पतसंस्थेचे मुख्यालय नगर जिल्ह्यात आहे. त्याचबरोबर भंगार, हॉटेल, कापड व मेडिकल व्यावसायिकांसह काही उद्योजकांना नोटीस बजावल्या आहेत. या सर्व खातेधारकांच्या व्यवहारांवर प्राप्तिकर विभागाची गेल्या दोन महिन्यांपासून नजर असून, खात्यांचा डेटाबेस विभागाने मागवून घेतल्याने ही कारवाई सुकर झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दोन विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सातारा
सुधाकरनगरजवळील तलावात मंगळवारी दोन विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाल्याच्या घटनेच्या दुसऱ्या दिवशी, बुधवारी दुपारी श्रीयश कॉलेजच्या मागे असलेल्या सातारा तांडा क्रमांक ३ येथील तलावात एमआयटी कॉलेजचे चिन्मय कुलकर्णी व विवेक चौधरी या दोन विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला.
बुधवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास एमआयटी कॉलेजमधील डिप्लोमा इलेक्ट्रॉनिक्सच्या द्वितीय वर्गात शिकणाऱ्या १३ विद्यार्थ्यांचा ग्रुप लंच टाइममध्ये झाला म्हणून सातारा तांडा क्रमांक ३ येथील तलावात पोहण्यासाठी गेला. विद्यार्थी श्रीयशच्या पार्किंगमध्ये गाड्या लावून पायी तलावाजवळ गेले. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार; कंबरेचे बेल्ट जोडून ते पाण्यात उतरत होते. असे करीत असतानाच चिन्मय संजय कुलकर्णी (१७, रा. औदुंबर, प्लॉट क्रमांक ५४३, भारतमाता कॉलनी) व विवेक सुनील चौधरी (१८, रा. प्लॉट क्र. ६२, नाईकनगर, सूर्या लॉन्सजवळ) हे दोघे पाण्यात बुडाले. ते पाहून सोबतचे विद्यार्थी घाबरले व त्यांनी आरडाओरडा सुरू केला. आवाज ऐकताच आजुबाजुला गुराख्यांनी तलावाजवळ धाव घेतली. पोलिस ठाण्याला व अग्निशमन दलाला माहिती मिळताच सातारा पोलिस ठाण्याची टू मोबाइल व्हॅन व अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी आली.

दोघेही एकुलते एक
चिन्मय व विवेक आई-वडिलांचे एकुलते एक मुले होती. चिन्मय हा इलेक्ट्रॉनिक्सच्या दुसऱ्या वर्षात शिकत होता. चिन्मय हा उत्कृष्ट डान्सर होता. तो मित्रांना डान्सही शिकवत असे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालकमंत्र्यांचा आयुक्तांना फ्री हँड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘कुणाला सस्पेंड करायचे ते करा, तुम्हाला फ्री हँड दिला आहे. सस्पेंड करून जे शिल्लक राहतील त्यांना सोबत घेऊन आपण काम करू.’ असे म्हणत पालकमंत्री रामदास कदम यांनी खासदार-आमदारांसमक्ष पालिकेचे आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांची पाठराखण केली. ‘आयुक्तांच्या कामात कोणीही हस्तक्षेप करू नका, भ्रष्ट अधिकाऱ्यांना पाठीशी घालू नका,’ अशी समजही त्यांनी या लोकप्रतिनिधींना दिली.
विविध विकास कामे आणि मंत्रिमंडळ बैठकीच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी रामदास कदम बुधवारी शहरात आले होते. महापौर बंगल्यात त्यांनी आढावा बैठका घेतल्या. एमजीएम परिसरात १६ एकर क्षेत्रावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मृतिवन उभारले जाणार आहे. त्याचे पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन कदम यांना दाखवण्यात आले. यावेळी खासदार चंद्रकांत खैरे, महापौर त्र्यंबक तुपे, आमदार संजय शिरसाट, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, महानगरप्रमुख प्रदीप जैस्वाल, पालिकेतील सभागृहनेते राजेंद्र जंजाळ, आयुक्त बकोरिया, कार्यकारी अभियंता सिकंदर अली आदी उपस्थित होते.
प्रेझेंटेशनमध्ये काही सुधारणा करण्याची सूचना पालकमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना केली. ‘स्मृत‌िवन परिसरातील शंभर झाडे काढा व हर्सूल तलावाच्या परिसरात विकसित केलेल्या जांभुळबनाच्या भोवती पुन्हा लावा,’ असे त्यांनी पालिकेच्या अधिकाऱ्यांना सांगितले. ‘किती दिवसांत हे काम करणार,’ असा सवाल त्यांनी आयुक्तांना केला. आयुक्त म्हणाले, ‘१५ ऑक्टोबरपर्यंत हे काम पूर्ण करू.’ त्यावर कदम म्हणाले, ‘१५ ऑक्टोबर खूप लांब होते. त्याच्या अगोदर हे काम करा.’ त्यावेळी आयुक्तांनी १० ऑक्टोबरपर्यंत काम करण्याचा शब्द दिला. सगळी यंत्रणा कामाला लावा आणि हे काम युद्धपातळीवर करा, असे कदम यांनी आयुक्तांना सांगितले.
कदम यांचे हे वाक्य संपताच आमदार शिरसाट आयुक्तांना उद्देशून म्हणाले, ‘किमान १० ऑक्टोबरपर्यंत तरी कुणाला सस्पेंड करू नका.’ शिरसाटांचे हे विधान खोडून काढत कदम आयुक्तांना म्हणाले, ‘तुम्हाला फ्री हँड दिला आहे. कुणाला सस्पेंड करायचे ते करा. कुणाचीही गय करू नका. सस्पेंड करून जे शिल्लक राहतील त्यांना सोबत घेऊन काम करू.’ शिरसाटांना उद्देशून ते म्हणाले, ‘आयुक्तांच्या कामात हस्तक्षेप करू नका. भ्रष्ट अधिकाऱ्यांना पाठीशी घालू नका.’

तिघांचे काम उत्तम
महापालिकेत सध्या महापौर तुपे, सभागृहनेते जंजाळ व आयुक्त बकोरिया यांचेच काम उत्तम सुरू आहे, असे प्रशस्तीपत्र पालकमंत्री यांनी दिले. जांभुळबनात साडेपाच हजार झाडे लावल्याबद्दल त्यांनी उद्यान अधीक्षक विजय पाटील यांचे विशेष अभिनंदन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बालसंगोपन योजनेच्या लाभापासून गरजू वंचित

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
बेघर अन् वंचिताचा आधारवड असणाऱ्या बालसंगोपन योजनेला घरघर लागली आहे. ही योजना महिला व बालविकास विभाग स्वयंसेवी संघटनांच्या सहकार्याने राबवते. मात्र, ही जबाबदारी घेतलेल्या जिल्ह्यातील तिन्ही संस्थांनी त्यातून गेल्या अडीच वर्षांपासून अंग काढून घेतले आहे. योजनेतील त्रुटी दूर करण्याकडे गांभीर्याने पाहिले जात नाही. त्यामुळे गरजू बालके योजनेच्या लाभापासून दूर आहेत.
राज्यातील बेघर, निराश्रित व अन्य गरजू बालकांना संस्थेत दाखल करून घेण्याऐवजी कौटुंबिक वातावरणात त्यांचे संगोपन व विकास होण्यास संधी उपलब्ध व्हावी, हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवत महिला व बालविकास विभागाने राज्यात बालसंगोपन योजना सुरू केली. अनाथ, निराधार, परित्यागी बालकांसह दोन्ही पालक असूनही घरात तीव्र कलह आहे, पालकांचा मुत्यू, आजार, कारागृहात आहे आदी विविध कारणांमुळे संगोपनास असमर्थ आहेत अशा कुटुंबातील बालकांना या योजनेचा लाभ दिला जातो. यात त्या बालकास अल्प व दीर्घ कालावधीसाठी पर्यायी कुटुंबात संगोपनासाठी देण्यात येते. एका कुटुंबात दोन पेक्षा जास्त मुले ठेवता येत नाहीत. त्याप्रमाणे एका कुटुंबातील दोन मुलांपेक्षा, भावंडांपेक्षा अधिक भावंडांना या योजनेचा लाभ देता येत नाही, अशा अटी व शर्थी असून बहुतेक प्रकरणात संबंधित लाभार्थी मुलांची जबाबदारी नातेवाईकांकडे दिली जाते, अशी माहिती सूत्रांनी दिली.
लहान वयातच खडतर अनुभवाचा सामना कराव्या लागणाऱ्या बालकांसाठी ही योजना खऱ्या अर्थाने नवसंजीवनी देणारी आहे, पण जिल्ह्यात या योजनेला घरघर लागल्याचे दिसते. या योजनेसाठी दत्तप्रभू संस्था, ऋृषिकेश बहुउद्देशीय संस्थेसह पैठण येथील अन्य एका सामाजिक संस्थांची नियुक्ती केली होती. मात्र, या संस्थांनी गेल्या अडीच वर्षांपासून यासंदर्भातील काम बंद केले आहे. त्यानंतर अन्य दुसऱ्या संस्थांची नियुक्ती करणे अत्यावश्यक होते, पण ती जबाबदारीही विभागाने पार पाडली नाही. या साऱ्या प्रकारात महिला व बालविकास अधिकारी कार्यालयाकडे अपुरे मनुष्यबळ आहे. त्यामुळे शहर व जिल्ह्यातील विविध भागात निराधार किंवा परित्यागी मुलांचा शोध घेण्याची त्यांना सवड मिळेलच असे नाही. तसेच योजनची माहिती प्रचार, प्रसाराअभावी गरजूपर्यंत पोहचत नाही. परिणामी जिल्ह्यातील अनेक गरजू या योजनेच्या लाभापासून दूर आहेत.

फक्त ९० जणांना लाभ
आजघडीला जिल्ह्यातील केवळ ९० बालके या योजनेचे लाभार्थी आहेत. त्यापैकी ८० प्रकरणात त्या या बालकांचे आई किंवा वडिलांपैकी कुणीतरी कारागृहात असून कारागृह प्रशासनामार्फत त्यांच्या पालकांनी अर्ज केल्याने योजना त्यांच्यापर्यंत पोहचू शकली. मात्र, जिल्ह्यातील अन्य गरजू बालकांना आधार कोण देणार, हा प्रश्न मात्र कायमच आहे.

असे आहे योजनेचे स्वरूप
बालसंगोपन योजनेअंतर्गत १८ वर्षाखालील वयोगटातील मुलांना संस्थाबाह्य संगोपन थेट पर्यायी कुटुंब उपलब्ध संगोपन केले जाते. पालनकर्त्या पालकास महिन्याकाठी ४२५ रुपये प्रत्येक लाभार्थीमागे देण्यात येतात. तर ७५ रुपये हे संस्थेला प्रशासकीय खर्चासाठी सहाय्यक अनुदान म्हणून दिले जाते.

योजना खूपच चांगली आहे. मात्र, गरजू बालकांपर्यंत या योजनेचा लाभ पोहचला पाहिजे. ही योजना प्रभावीपणे राबविली पाहिजे. त्यासाठी अधिक कसोशीने प्रयत्न केले पाहिजेत. त्रुटी असतील, तर त्या दूर करणे आवश्यक आहे. - अॅड रेणुका घुले, जिल्हा बाल कल्याण समिती

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वैजापूरच्या पूरग्रस्तांना भरपाईची प्रतीक्षा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, वैजापूर
तालुक्यातील गोदावरी नदीकाठच्या १७ गावातील १७९६ शेतकऱ्यांना पुरामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीची भरपाई अद्याप मिळाली नाही. त्यामुळे आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्यासाठी वाट पहावी लागत आहे. हे शेतकरी नुकसान भरपाई मिळवण्यासाठी तहसील कार्यालयात चकरा मारत आहेत.
नाशिक जिल्ह्यात जुलै महिन्यात मुसळधार पाऊस पडल्याने तेथील धरणात पुरेसा पाणीसाठा झाला होता. त्यामुळे पाटबंधारे विभागाने गोदावरी नदीत पाणी सोडले. हे पाणी गोदावरी नदीतून जायकवाडी धरणात पोहचले. गोदावरी धरणात नांदूर-मधमेश्वर धरणातून मोठ्या प्रमाणावर पाणी सोडल्याने २ अॉगस्ट ते ७ अॉगस्ट या कालावधीत गोदावरी नदीला मोठा पूर आला व या पुराचा फटका नदीकाठच्या १७ गावांना बसला. पुरामुळे अनेक घरे पडली तसेच जवळपास १४०० हेक्टरवरील मका, कापूस, सोयाबिन आदी पिकांचे नुकसान झाले. तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांनी संबंधित गावांना भेट देऊन पिकांच्या नुकसानीचा पंचनामा केला. शासनाच्या निर्देशानुसार ५० टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई मिळणार आहे. परंतु, दोन महिने होऊनही या शेतकऱ्यांना भरपाई न मिळाल्याने शेतकरी संतापले आहेत. पिकांची नुकसान भरपाई त्वरित मिळावी अशी मागणी तालुक्यातील नांदूरढोक येथील दिलीप बाजारे, बाळकृष्ण गायकवाड, सागर चिखले आदी शेतकऱ्यांनी केली आहे.

तालुक्यातील पुरामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवण्यात आला आहे. त्याला अद्याप मंजुरी मिळाली नाही.
- सुमन मोरे, तहसीलदार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘जलयुक्त शिवारमुळे प्रकल्पातील जलसंचय’

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, बीड
परतीच्या पावसाने जिल्ह्यातील प्रकल्पामध्ये मोठ्या प्रमाणात जलसंचय निर्माण झाला आहे. जलयुक्त शिवार अभियानाची फलश्रृतीही सर्वांसमोर आली आहे. याचा फायदा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसह, व्यापार व उद्योग धंद्यांना होईल. बीड जिल्ह्याची विकासाकडे वाटचाल अधिक जोमाने होण्यास निश्चितच मदत होईल, असे प्रतिपादन बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी केले.
परळी तालुक्यातील नागापूर येथील वाण धरण येथे पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले. या कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव ननावरे, उपविभागीय अधिकारी शिवकुमार स्वामी,जलसंपदा विभागाच्या अधिक्षक एस.एन. जगताप, माजलगाव पाटबंधारे विभाग परळीचे कार्यकारी अभियंता डी.एच. शिंदे,यावेळी आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
पालकमंत्री मुंडे म्हणाल्या, ‘सतत दुष्काळाचा सामना करणाऱ्या बीड जिल्ह्याचा पाणीप्रश्न परतीच्या जोरदार पावसाने मिटला आहे. या पावसामुळे जिल्ह्यातील सर्व प्रकल्प तुडूंब भरले आहेत. नदी-नाले खळखळून वाहत होते. हे पाहून मला मनस्वी आनंद होत आहे. जिल्ह्यातील या मुबलक जलसंचयामुळे शेतकऱ्यांसह व्यापार व उद्योग धंद्यानाही नवसंजीवनी मिळणार आहे. या माध्यमातून जिल्ह्याची विकासाकडे होणारी वाटचाल अधिक जोमाने होणार आहे.’
जलयुक्त शिवार योजनेला जनतेचा उत्स्फूर्त सहभाग लाभल्याने ही योजना खऱ्या अर्थाने शासनाची, प्रशासनाची आणि जनतेची करण्यामध्ये सरकारला यश आले आहे. जिल्ह्यात जलयुक्त शिवार योजनेअंर्तगत मोठ्या प्रमाणावर कामे झाली असून यावर आतापर्यंत ६५ कोटी रुपये खर्च झाला आहे. जलयुक्त शिवार अभियानाला जनतेने दिलेल्या प्रतिसादाबद्दल त्यांनी जनतेचे आभार मानले.
बीड जिल्ह्याचा पाणी प्रश्न मिटला असून आता शासकीय योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी अधिकारी आणि पुढाकार घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री मुंडे यांनी यावेळी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images