Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

ऐतिहासिक मकबरा परिसर ‘सायलेन्स झोन’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

ऐतिहासिक बीबी का मकबरा परिसर सायलेन्स झोन करण्याचा निर्णय मंगळवारी महापालिकेच्या हेरिटेज कमिटीच्या बैठकीत घेण्यात आला. मकबरा, औरंगाबाद लेणी ही वारसास्थळे असल्यामुळे त्याच्या परिसरात हेलिकॉप्टरच्या फेऱ्यांवरही निर्बंध घालण्यात आले.

हेरिटेज कमिटीची बैठक महापालिकेचे आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांच्या अध्यक्षतेखाली झाली. बैठकीला कमिटीचे अध्यक्ष जयंत देशपांडे, समितीचे सदस्य डॉ. दुलारी कुरैशी यांच्यासह पुरातत्व विभाग, हर्सूल जेल आणि महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते.

बीबी का मकबरा या विषयावर बैठकीत चर्चा झाली. संपूर्ण मकबरा परिसर सायलेन्स झोन म्हणून जाहीर करण्याचा निर्णय बकोरिया यांनी घेतला. मकबऱ्यापासून शंभर मीटर क्षेत्रात होणारी नवीन बांधकामे तत्काळ पाडून टाकण्यात येतील, असे बकोरिया यांनी स्पष्ट केले. मकबरा परिसरातील सुमारे दीडशे बांधकामांना नोटीस दिली आहे. त्याची माहिती महापालिकेलाही देण्यात आली, पण ती बांधकामे महापालिकेचे अधिकारी पाडत नाहीत, असे पुरातत्व खात्याच्या अधिकाऱ्यांनी लक्षात आणून दिले. त्यावर, ही बांधकामे देखील लवकरच पाडण्यात येतील, असे बकोरिया यांनी स्पष्ट केले.

औरंगाबाद शहरात एअर एलोरा एव्हिएशन या संस्थेने नव्याने हेलिकॉप्टर सेवा सुरू केली आहे. मकबरा आणि औरंगाबाद लेण्याच्या परिसरातून हेलिकॉप्टर फिरवले जाणार आहे. या दोन्ही जागतिक वारसा स्थळांच्या परिसरातून हेलिकॉप्टर फिरवण्यास हेरिटेज कमिटीच्या बैठकीत आक्षेप घेण्यात आला. हेलिकॉप्टरच्या आवाजामुळे सुपरसॉनिक ध्वनी लहरी निर्माण होतात. त्यामुळे वास्तूंवर भेगा पडण्याची शक्यता असते. चार-पाच वर्षांनंतर या भेगा स्पष्टपणे दिसतात. त्यामुळे या स्थळांच्या परिसरातून हेलिकॉप्टर फिरवण्यावर निर्बंध घालण्याचा निर्णय देखील बैठकीत घेण्यात आला.

२५० मीटर अंतर ठेवा

बीबी का मकबरा, औरंगाबाद लेणी यांपासून हेलिकॉप्टरचे अंतर २०० ते २५० मीटर ठेवा, अशी सूचना पालिकेचे आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी एअर एलोरा एव्हिएशन कंपनीचे व्यवस्थापक कृष्णा कदम यांना दूरध्वनीवरून केली, अशी माहिती जनसंपर्क विभागातून देण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


भाजप युतीसाठी तयार; निर्णय दिवाळीनंतर

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
जिल्ह्यातील पाचही नगरपालिका काबीज करण्यासाठी भारतीय जनता पक्षाने तयारी सुरू केली असून दोन व तीन नोव्हेंबरपर्यंत इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या जाणार आहेत. दरम्यान, शिवसेनेसोबत युतीची इच्छा असली तरी स्थानिक कार्यकर्त्यांसोबत चर्चा करून अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.
पैठण, वैजापूर, गंगापूर, खुलताबाद व कन्नड नगरपालिका निवडणुकीमुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण ऐन थंडीत तापत आहे. शिवसेनेसोबत युती करण्याची तयारी भाजपाने दर्शवली. पण, संबंधित नगरपालिका क्षेत्रातील कार्यकर्त्यांचे मत अंतिम असेल. ते विचारात घेऊनच पक्षश्रेष्ठींना कळविण्यात येईल, असे नेतेमंडळी सांगत असल्याने युतीबाबत प्रश्नचिन्ह कायम आहे. दिवाळीनंतरच यावर निर्णय होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, अनेक प्रभागात सहापेक्षा अधिक कार्यकर्त्यांनी उमेदवारीसाठी इच्छा व्यक्त केल्याचे चित्र आहे. इच्छुकांच्या मुलाखती एक ते तीन नोव्हेंबर या काळात घेण्याचे नियोजन आहे. दुसरीकडे उमेदवारीसाठी अनेक इच्छुकांनी जोरदार लॉबिंग सुरू केली आहे.
या नगरपालिकांवर वर्चस्व सिद्ध करण्यासाठी जिल्हाध्यक्ष एकनाथ जाधव, आमदार प्रशांत बंब, सरचिटणीस किशोर धनायत, उपाध्यक्ष संजय खंबायते यांच्यासह जिल्हा पदाधिकाऱ्यांनी बैठका घेऊन नियोजन आखणी सुरू केली आहे. ‘ वन बुथ टेन युथ’ ही संकल्पना व प्रत्येक बुथ मजबूत करण्यावर भर दिला जात आहे. गेल्या दोन ते तीन महिन्यापासून कार्यकर्त्यांसाठी अभ्यासवर्ग, प्रशिक्षण शिबिराचेही आयोजन करण्यात आले होते. विकासपर्वच्या माध्यमातून केंद्र व राज्य सरकारच्या कल्याणकारी योजनांची माहिती जनतेपर्यंत नेत प्रचारकी अभियानही यापूर्वी आखण्यात आले होते.

निवडणुकीत पक्षाची कामगिरी चांगली व्हावी, यासाठी कार्यकर्ते प्रयत्नशील आहेत. शिवसेनेसोबत युतीची तयारी आहे. अर्थात, त्याचा निर्णय स्थानिक कार्यकर्त्यांना विचारता घेऊन दिवाळीनंतर घेतला जाईल. - एकनाथ जाधव, जिल्हाध्यक्ष

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

झेडपी सभापती संतोष जाधव काँग्रेसमध्ये

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा परिषद सदस्य, बांधकाम सभापती संतोष जाधव यांनी बुधवारी मुंबईत एका कार्यक्रमात काँग्रेसमध्ये प्रवेश केला. जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर मनसेला हा मोठा झटका आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत हा सोहळा झाला.
गांधी भवन येथे झालेल्या कार्यक्रमात जाधव यांच्यासह मनसे, राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रीय जनता दलाच्या अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. याप्रसंगी प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण, आमदार अब्दुल सत्तार, विधान परिषदेतील काँग्रेस गटनेते शरद रणपिसे, माजी मंत्री नसीम खान, माजी आमदार कल्याण काळे, प्रदेश सरचिटणीस अॅड. गणेश पाटील, सचिन सावंत, पृथ्वीराज साठे, प्रवक्ते डॉ. राजू वाघमारे यांची उपस्थिती होती. गंगापूर पंचायत समिती सदस्य चंद्रकांत गवळी, औरंगाबाद पंचायत समिती सदस्य सर्जेराव पाटील यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रीय जनता दलाच्या पदाधिकाऱ्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कामगार मुलीच्या नावे तीन लाखांची एफडी

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
तुंबलेल्या ड्रेनेजची स्वच्छता करताना चेंबरमध्ये पडून मृत्यूमुखी पडलेले कामगार प्रदीप हरिश्चंद्र घुले यांच्या पत्नी उषा घुले यांना महापालिकेतर्फे ५ लाख रुपयांची आर्थिक मदत बुधवारी देण्यात आली. यातील ३ लाख रुपये त्यांची दोन वर्षांची मुलगी आरोहीच्या नावे १८ वर्षांसाठी फिक्स डिपॉझिट करण्यात येणार आहेत.
ड्रेनेजचे काम करताना गंभीर जखमी झालेल्या शेख अकबर या मजुराला ५० हजार रुपये हॉस्पिटलचा खर्च आणि १ लाख ३३ हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली. महापौर त्र्यंबक तुपे यांच्या हस्ते हे धनादेश देण्यात आले. यावेळी सभापती मोहन मेघावाले, सभागृह नेता राजेंद्र जंजाळ, विरोधी पक्षनेता अयुब जहागीरदार, बापू घडामोडे, किशनचंद तनवाणी यांची उपस्थिती होती. सलीमअली सरोवराजवळील गणेश विसर्जन विहिरीच्या बाजूला असलेले ड्रेनेज लाइनचे चेंबर स्वच्छ करण्यासाठी प्रदीप घुले चेंबरमध्ये उतरले होते. चेंबरमधील विषारी वायूमुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. शेख अकबर हे गंभीर जखमी झाला होते. त्यांना सिग्मा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्याची प्रकृती आता चांगली आहे. घुले यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत करण्याचा व शेख अकबर यांच्या उपचाराच्या खर्चासह आर्थिक मदत करण्याचा निर्णय सर्वसाधारण सभेत घेण्यात आला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वकिलाच्या पत्नीला अश्लील मेसेज पाठवणारा एमआर गजाआड

$
0
0



म.टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
वकिलाच्या पत्नीला अश्लील मॅसेज पाठवणाऱ्या आरोपीला बेगमपुरा पोलिसांनी लातूर येथून अटक केली आहे. आरोपी मेडिकल रिप्रेझेंटेटीव्ह आहे. दोन महिन्यांपूर्वी याप्रकरणी बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
बेगमपुरा परिसरातील एका ३५ वर्षाच्या महिलेच्या मोबाइलवर गेल्या काही महिन्यांपासून अनोळखी मोबाइल क्रमांकावरून मॅसेज येत होते. या महिलेचा पती वकील आहे. त्यांनी बेगमपुरा पोलिस ठाणे गाठून या अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. या मोबाइलधारकाचा पोलिसांकडून तपास सुरू होता. हा मोबाइल लातूर येथील एक व्यक्ती वापरत असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी लातूर गाठून संशयित आरोपी सूरज बाबुराव तवडे (वय २९ रा. लातूर) याला अटक करीत हा मोबाइल जप्त केला. त्याला अटक करून औरंगाबादला आणण्यात आले. ही कारवाई पोलिस निरीक्षक शेख सलीम यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय औटे, शकील सय्यद व देवा सूर्यवंशी यांनी केली. हा आरोपी उच्चशिक्षीत असून, औषधी तयार करणाऱ्या कंपनीत मेडीकल रिप्रेझेंटेटीव्ह पदावर कार्यरत आहे. या प्रकरणी आरोपीला बुधवारी कोर्टात हजर केले असता, त्याला शुक्रवारपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ए. व्हाय. एच. मोहम्मद यांनी दिले.

सिमकार्ड जळगावचे
पकडण्यात आलेला आरोपी सूरज लातूरचा रहिवासी आहे, मात्र ज्या सिमकार्डचा वापर करून तो मेसेज करीत होता ते जळगाव येथील एका तरुणाच्या नावावर आहे. या तरुणाचे सिमकार्ड सूरज कसे काय वापरत होता याचा तपास करण्यात येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आरक्षणाच्या मागणीसाठी केजमध्ये मुस्लिमांचा मोर्चा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, बीड
केज तालुका मुस्लिम आरक्षण कृती समितीतर्फे बुधवारी मुस्लिम समाजाच्या विविध मागण्यासाठी तहसील कार्यालयावर मूकमोर्चा काढण्यात आला. यामध्ये लहान-मोठ्या मुस्लिम बांधवांनी सहभाग नोंदविला.
केज येथील दर्ग्यात चादर चढवून सकाळी अकराला मोर्चा सुरु झाला. त्यानंतर मंगळवार पेठ, मेन रोड, छत्रपती शिवाजी चौकामार्गे तो तहसील कार्यालयावर धडकला. मुस्लिम समाजाच्या विविध समस्यांविषयी मुस्लिम धर्मगुरुंनी मत व्यक्त करून लहान शाळकरी मुलींच्या हस्ते तहसीलदारांना मुस्लिम आरक्षण, मुस्लिम पर्सनल लॉ व इतर मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
मुस्लिम समाज ७० वर्षांत आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक विकासापासून दूर आहे. समाजाला प्रगतीच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आरक्षणाची तरतूद करावी, सच्चर समिती, रंगनाथ मिश्रा आयोग, डॉ. महेमूद रहेमान समिती या तीन समित्यांनी मुस्लिमांचा अभ्यास करून चिंता व्यक्त केली होती. त्यात आरक्षणाची शिफारस होती. त्याचबरोबर समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विविध उपाय योजना सुचविल्या, परंतु, तत्कालीन शासकांनी याबाबत चालढकल केली आहे. त्यामुळे मुस्लिम समाज मुख्य प्रवाहापासून अधिकच दूर गेला आहे. छत्रपती शाहू महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी वंचितांच्या आरक्षणाची तरतूद केली होती, परंतु आजपर्यंत मुस्लिमांना ते आरक्षण मिळाले नसल्याचे निवेदनात म्हटले आहे. राष्ट्रगीताने मोर्चाची सांगता झाली.

विविध संघटनांचा पाठिंबा
मोर्चास विविध संघटनांनी पाठिंबा दर्शविला. अनेक संघटनानी पिण्याच्या पाण्याची व फराळाचीही सोय केली होती. सर्व मुस्लिम व्यापारी व व्यावसायिकांनी व्यापार बंद ठेवून मोर्चात सहभाग नोंदविला.
#

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोन शाळकरी मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, परभणी
पाथरी तालुक्याच्या लिंबा तांडा परिसरात शेततळ्यात पोहण्यास गेलेल्या दोन शाळकरी मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू घला. ही घटना बुधवारी दुपारी घडली. यावेळी इतर मुलांना एका ग्रामस्थाने वाचविले.
लिंबा तांडा येथील विजय राठोड यांचा मुलगा रोहन व मंजुळा तांडयावरील शिवाजी जाधव यांचा अर्जुन नावाचा मुलगा दिवाळीच्या सुट्ट्या घालविण्यासाठी गावाकडे आला होता. बुधवारी घरातील सर्व सदस्य शेतात सोयाबीन काढणीला गेले असता, दुपारी दोनच्या सुमारास रोहन राठोड, अर्जुन जाधव यांच्यासह तांड्यावरील करण जाधव आणि दीपक पवार हे चौघे शाळकरी मुले पोहण्यासाठी गोदाकाठावरील एका शेततळ्यामध्ये गेले होते. मात्र हे तळे खोल असल्याने चारही मुले बुडत होती. त्याचवेळी शेजारील एका ग्रामस्थाने क्षणाचाही विलंब न करता तळ्यात उडी मारली. त्याने करण व दीपक या मुलांना पाण्या बाहेर काढले. परंतु अर्जुन जाधव व रोहन राठोड ही दोघेजण तळ्यातील गाळात फसून बसले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वैभव पिचड यांची आमदारकी रद्द करा

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, लातूर
वैभव पिचड यांची आमदारकी रद्द करावी अशी मागणी महाराष्ट्र कोळी समाज संघाचे अध्यक्ष शिवसेनेचे उपनेते अनंत तरे यांनी केली. लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील खरबवाडी येथे महर्षी वाल्मिकी जयंतीच्या निमित्ताने कोळी समाजाचा मेळावा आयोजित केला होता.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आदिम विकास परिषदेचे अविनाश कोळी, आमदार विनायक पाटील यांची उपस्थिती होती. खरबवाडी येथे झालेल्या कोळी समाज मेळाव्याच्या निमित्ताने युवकांनी मोटारसायकल रॅलीचे आयोजन केले होते.
यावेळी बोलताना अनंत तरे म्हणाले, ‘न्यायालयाने मधुकर पिचड यांचे जात प्रमाणपत्र रद्द केले आहे. त्यामुळे सरकारने त्यांनी या कोळी समाजाच्या प्रमाणपत्राचा वापर करून उपभोगलेल्या आणि घेतलेल्या सोयी सवलतीची वसुली केली पाहिजे. मधुकर पिचड यांचा मुलगा वैभव पिचडसुद्धा त्याच मतदारसंघातून विजयी झाले आहेत. त्यांच्या वडीलांचेच जात प्रमाणपत्र रद्द झाले आहे. त्यामुळे त्यांचेही प्रमाणपत्र रद्द होते. त्यामुळे वैभव पिचड यांची आमदारकी रद्द करण्याची विनंती आम्ही केली आहे. न्यायलयाने सुद्धा ज्या कागदपत्रांची मागणी महादेव कोळी समाज प्रमाणपत्रासाठी केली आहे. राज्यातील आदिवासी कोळी समाजातील युवकांकडून घ्यावी आणि महादेव कोळी हे प्रमाणपत्र द्यावे.’
महर्षी वाल्मिकी जयंती ही शासकीयस्तरावर गांभिर्याने साजरी करण्याची सूचना करून अनंत तरे यांनी वाल्मीकी जंयतीला सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्याची मागणी तरे यांनी केली. कोळी समाजाने वाल्मीकी जयंती साजरी करताना संघटीत होण्यासाठी दलित समाजाचा आदर्श घेण्याचे आवाहन ही केले. यावेळी आमदार विनायक पाटील, अविनाश कोळी यांचेही भाषणे झाली.

‘त्या’ कुटुंबियाचे सांत्वन
उदगीर तालुक्यातील हाकनाकवाडी येथे पाण्यात एकाच घरातील चार व्यक्तींचा बुडून मृत्यू झाला होता. त्या कुटुंबाला तरे यांनी भेट देऊन सांत्वन केले अन आर्थिक मदतही दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


परीक्षेचा कायदा मोडला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या सुरू असलेल्या सत्र परीक्षा विद्यापीठ कायद्याचा भंग करून घेतल्या जात असल्याचा आरोप प्राध्यापकांनीच केला आहे. सत्र पद्धतीत ९० दिवसांचा कालावधी पूर्ण होणे अपेक्षित असताना विद्यापीठाने केवळ ६० दिवसांतच परीक्षा घेतली आहे. याबाबतत प्राध्यापकांनी कुलगुरूंची भेट घेऊन नाराजी व्यक्त केली.
विद्यापीठाच्या पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षा ४ ऑक्टोबरपासून सुरू झाली आहेत. या परीक्षा बेकायदा होत असल्याचा आरोप प्राध्यापकांनीच केला आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नियमानुसार एका सत्रात अध्यापनासाठी ९० दिवसांचा कालावधी पूर्ण होणे आवश्यक असते, परंतु विद्यापीठाने यापूर्वीच परीक्षा घेण्याची घाई केली असून, हा विद्यापीठ कायद्याचा भंग असल्याचे प्राध्यापकांचे म्हणणे आहे. याप्रश्नी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि महाविद्यालयीन प्राध्यापक संघटनेच्या (बामुक्टो) पदाधिकाऱ्यांनी बुधवारी कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांची भेट घेतली.
तासिका अपूर्ण राहिल्या आहेत, अध्यापन-अध्ययनाला केवळ ६० दिवस मिळाले, अभ्यास न करताच विद्यार्थी परीक्षेला सामोरे जात असल्याचे प्राध्यापकांचे म्हणणे आहे. परीक्षेची घाई करणाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करावी, अशी मागणी प्राध्यापकांनी केली आहे. याबाबत कुलगुरूंना दिलेल्या निवेदनावर प्रा. बप्पा म्हस्के, डॉ. विक्रम खिलारे, डॉ. उमाकांत राठोड, ‌डॉ. दिलीप बिरुटे, डॉ. मारोती तेगमपुरे, डॉ. शफी शेख, डॉ. डी. आर. देशमुख यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

१५ नोव्हेंबरऐवजी झाले ४ ऑक्टोबर
विद्यापीठाने शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला शैक्षणिक वेळापत्रक जाहीर केले होते. सुरुवातीच्या शैक्षणिक वेळापत्रकानुसार १५ नोव्हेंबरनंतर सत्र परीक्षांना सुरुवात होणार होती. यात बदल करून परीक्षा ४ ऑक्टोबरपासून घेण्याचे निश्चित करण्यात आले. विद्यापीठातील प्रशासकीय विभागांमध्ये एकवाक्यता नसल्याने हा गोंधळ उडाल्याचेही मानले जात आहे.

उत्तरपत्रिका तपासणीची सक्ती नको
पदव्युत्तर परीक्षेची कामे व उत्तरपत्रिका तपासणीची सक्ती अनुदानित पदवीच्या प्राध्यापकांना करू नये, अशीही मागणी प्राध्यापकांनी केली आहे. विनाअनुदानित पदवी कॉलेजमधील विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका तपासण्याचे काम विनाअनुदानित पदवी कॉलेजातील प्राध्यापकांकडे सोपवावे, अशी मागणीही संघटनेने केली आहे.

विद्यापीठाच्या सुरू असलेल्या सत्र परीक्षा बेकायदा आहेत. त्यामुळे विद्यापीठ कायद्याचा भंग झाला आहे, ही महत्त्वाची बाब आम्ही कुलगुरूंच्या निदर्शनास आणून दिली. त्यासह विनाअनुदानित कॉलेजांचे प्राध्यापक पेपर तपासणीस येत नाहीत, त्याबाबत विद्यापीठ प्रशासनाने कार्यवाही करावी.
- डॉ. अशोक तेजनकर, सचिव, बामुक्टो.

प्राध्यापकांचे मत
- शैक्षणिक कॅलेंडरमध्ये २७ जून ते २४ ऑक्टोबरदरम्यान अध्यापनाचे नियोजन
- अचानक परीक्षांचे वेळात्रक ३० दिवस अलीकडे आणले
- अभ्यासक्रम अपूर्ण
- विद्यापीठ कायद्याचा भंग

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘इंद्रधनुष्य’मध्ये ८०० विद्यार्थी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
राज्यपाल कार्यालयातर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या इंद्रधनुष्य युवक महोत्सव डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात ५ ते ९ नोव्हेंबरदरम्यान होणार आहे. राज्यातील २० विद्यापीठातील ८०० विद्यार्थी कलावंत सहभागी होणार आहेत, तर स्वागताध्यक्षपदावरून वाद कायम आहे.
विद्यापीठांच्या केंद्रीय युवक महोत्सवात प्रावीण्य मिळवलेल्या कलावंत विद्यार्थ्यांसाठी राज्यपातळीवर हा महोत्सव घेण्यात येतो. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात होणाऱ्या इंद्रधनुष्य महोत्सवाचे यजमानपद यंदा डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला मिळाले आहे. या महोत्सवात प्रत्येक विद्यापीठाचा ४० विद्यार्थ्यांचा संघ सहभागी होणार आहे. विद्यापीठाने महोत्सवाच्या आयोजनाबाबत विविध ३० उपसमित्या स्थापन केल्या आहेत. यांची बैठक बुधवारी विद्यापीठात झाली. त्यांच्या निवास व्यवस्थेसह भोजन, सुरक्षा आदींचा आढावा घेण्यात आला. महोत्सवाच्या आयोजनाच्या तयारीचा राज्यपाल कार्यालयाने आढावा घेऊन प्रशासनाला सूचना केल्या. संगीत, नृत्य, साहित्य, रंगमंचीय आणि ललित कला अशा विभागांतील विविध २४ कलाप्रकारांमध्ये विद्यार्थी कला सादर करणार आहेत.

स्वागताध्यक्षपदावरून गोंधळ
राज्यपाल कार्यालयातर्फे घेण्यात येत असलेल्या इंद्रधनुष्य महोत्सवाच्या स्वागताध्यक्षपदावरून वाद सुरू आहे. विद्यापीठाने प्रा. गजानन सानप यांच्याकडे दिलेल्या जबाबदारीवर अनेक विद्यार्थी संघटनांनी आक्षेप घेतला, तर नेमके कोण स्वागताध्यक्ष कोण हे विद्यापीठाने स्पष्ट केलेले नाही. त्यामुळे स्वागताध्यक्षपदाचा घोळ अद्याप कायम आहे. ‘इंद्रधनुष्य’चे यजमानपद विद्यापीठाला दहा वर्षांनंतर मिळाले आहे. त्यात सुरुवातीलाच प्रशासकीय पातळवरचा गोंधळ समोर आला आहे.

महोत्सवातील कलाप्रकार
महोत्सवात शास्त्रीय गायन, तालवाद्य, सूरवाद्य, आदिवासी नृत्य, प्रश्नमंजुषा, वक्तृत्त्व, वादविवाद, एकांकिका, प्रहसन, मूक अभिनय, नकला, चित्रकला, पोस्टर मेकींग, मातीकला, व्यंगचित्रे, रांगोळी, स्पॉट फोटोग्राफी अशा विविध २४ कलाप्रकारांत विद्यार्थी कलावंत आपली कला सादर करतील.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यापीठात यंदा दिवाळी जोरात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी यांची यंदाची दिवाळी जोरात आहे. महिन्याचा पगार, आठ महिन्यांचा महागाई भत्ता आणि २० हजार रुपये दिवाळी ‌अग्रीम रक्कम गुरुवारी अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा झाली आहे.
विद्यापीठातील कर्मचाऱ्यांनी गुरुवारी कुलगुरूंची भेट घेऊन थकित महागाई भत्ता, अग्रीम रक्कम देण्याची मागणी केली. सुरुवातीला प्रशासनाकडून हो नाही सुरू होते. शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आक्रमक होताच प्रशासनाने माघार घेतली.
त्यानंतर सायंकाळपर्यंत प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी यांच्या खात्यात रक्कम जमा झाली. विद्यापीठाने अग्रीम रक्कम १० हजारांहून २० हजार रुपये केली. यंदा अग्रीम रक्कम योजनेत प्राध्यापकांचाही समावेश करण्यात आला. ही रक्कम वर्षभरात संबंधित कर्मचाऱ्याला परत करावी लागते. अग्रीम रकमेसह आठ महिन्यांचा महागाई भत्ता, महिन्याचे वेतनही जमा केले आहे. त्यामुळे अधिकारी, कर्मचारी, प्राध्यापकांच्या खात्यावर किमान ५० हजार ते अडीच लाख रुपये जमा झाले आहेत. कुलगुरू बी. ए. चोपडे, कुलसचिव डॉ. प्रदीप जब्दे, प्रभारी वित्त व लेखाधिकारी प्रदीप जाधव यांनी चर्चा करून हा निर्णय घेतल्याचे विद्यापीठाकडून सांगण्यात आले. यावेळी बामुटाचे अध्यक्ष डॉ. कल्याण शेजुळे, कास्ट्राईबचे अध्यक्ष डॉ. वाल्मिक सरवदे व शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे नेते डॉ. कैलास पाथ्रीकर यांची उपस्थिती होती.

७६ लाख रुपये जमा
प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी असे एकूण विद्यापीठाचे ७५० कर्मचारी आहेत. महागाई भत्ता, अग्रीम रक्कम आणि वेतनापोटी विद्यापीठाच्या तिजोरीतून गुरुवारी संबंधित कर्मचाऱ्यांच्या खात्यावर सुमारे ७६ लाख रुपये जमा झाल्याचे वित्त व लेखाधिकारी विभागातील सूत्रांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मी कारभारीण ः ...आनंदातून झगमगीत मोगरे फुलतात!

$
0
0

unmesh.deshpande@timesgroup.com
Tweet : @ unmeshdMT
अर्चना काळे. शिक्षण इलेक्ट्रिकल इंजिनीअर. पती सुशांत काळे यांचा व्यवसाय कन्स्ट्रक्शन केमिकल्सचा. त्यांच्याकडे याची डिलरशीप आहे. त्यामुळे अर्चना सुशांत यांच्या व्यवसायात मदत करतात. त्यांची कार्यालयीन जबाबदारी त्या सांभाळतात. अकाउंटसची कामे करतात. हे सर्व करताना त्यांनी टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ साहित्य तयार करण्याचा छंद जोपासला. हा छंद त्यांच्या व्यवसायाची स्वतंत्र शाखा होऊ पहात आहे. बीड बायपास रस्त्यावर महानुभाव आश्रमाच्या चौकाजवळ मंजित प्राइड प्रायमो येथे त्या राहतात. आपल्या वाटचालीबद्दल सांगताना अर्चना म्हणतात, ‘औरंगाबादेत दोन वर्षांपूर्वी काम सुरू केले. पर्यावरणपूरक आकाशदिवे तयार करायला आम्ही प्राधान्य देतो. आकाशदिवे तयार करण्याच्या मी कार्यशाळा घेते. शाळेतील मुलांमध्ये अशा वस्तू तयार करण्याची आवड लगेचच निर्माण होते. कारण त्यांची या वयात जबरदस्त आकलन क्षमता असते. आकाश दिव्यांमध्ये विविध आकार असतात. त्यामुळे मुलांची भौमितिक संकल्पना स्पष्ट होण्यास मदत होते, त्यांच्या बोटांच्या हालचाली वेगवान होतात. मुलांच्या एकाग्रतेत वाढ होते. त्यांच्यात पर्यावरणाची जाण आणि आवड निर्माण होते. आकाश दिव्यांबरोबरच पेन स्टँड, मेणबत्ती स्टँड, पेपर बॅग, विविध प्रकारचे रुखवत, डोहाळ जेवणासाठीची सजावट तयार करण्याचे काम मी करते. हे सर्व करताना कागदाचा वापर जास्तीत जास्त केला जातो. पेन स्टँड, मेणबत्ती स्टँड तयार करण्यासाठी सेलो टेप वापरल्यानंतर शिल्लक राहणारे रोल, पेपर, जुन्या सीडी, बांगड्या याचा वापर केला जातो. त्याशिवाय विविध वस्तू तयार करून शिल्लक राहिलेले लाकूड याचाही वापर या वस्तू तयार करण्यासाठी केला जातो. टाकाऊपासून तयार केलेल्या टिकाऊ वस्तू दिसायला आकर्षक असतात. कमी किमतीतही त्या मिळू शकतात. हे सर्व करण्यासाठी घरच्यांची मदत मिळते. लहानपणापासून आई-वडिलांनी स्वावलंबाचे धडे दिले. पतीच्या व्यवसायात मदत करताना स्वतःचा छंद जोपासून तो वाढवण्यासाठी व त्याचे व्यवसायात रुपांतर करण्यासाठी सासूसह पती, मुलीची मदत होते. ते सर्वजण सांभाळून घेतात,’ असे त्या आवर्जून सांगतात. त्या पुढे म्हणाल्या, ‘टाकाऊपासून टिकाऊ वस्तू तयार करण्याच्या कार्यशाळा मी घेते. तयार केलेल्या वस्तूंच्या विक्रीसाठी विविध प्रदर्शनात स्टॉल देखील लावले आहेत. हे सगळे केले तरी लोकांचा विश्वास आणि त्यांच्याकडून होणारी तोंडी जाहिरात या उपक्रमांसाठी महत्त्वाची ठरते. ती मला मिळत गेली. या सगळ्या कामात माझी बहीण अमिता लेकुरवाळे मदत करते. येत्या काळात अनाथ आश्रमातील मुलांना टाकाऊपासून टिकाऊ वस्तू तयार करण्याचे प्रशिक्षण देण्याचे ध्येय आहे. या मुलांना अशा वस्तू तयार करता आल्या, तर ते दोन पैसे कमावू शकतील. स्वतःच्या पायावर उभे राहण्याचे बळ त्यांच्यात या माध्यमातून निर्माण होईल आणि आपल्यालाही त्यातून वेगळेच समाधान मिळेल,’ असा विश्वास त्या व्यक्त करतात. छंदातून व्यवसाय सुरू करण्याची प्रेरणा कशी मिळाली, याचा किस्सा अर्चना यांनी सांगितला. ‘औरंगाबादला येण्यापूर्वी आम्ही पुण्यात होतो. पुण्यातील शास्त्र वाहिनी या संस्थेच्या एका उपक्रमात माझ्या मुलीने दहा-बारा वर्षांपूर्वी आकाशदिवा तयार केला. या नवनिर्मितीने तिला आभाळ ठेंगणे झाले. आनंद गगनात मावेनासा झाला. तिच्या आनंदात आम्हीही न्हावून निघालो. आनंद देण्याऱ्या या कृती आपण आपल्या घरापासून सुरू केल्या पाहिजेत असे वाटले.’

‘ज्यांची बाग फुलून आली
त्यांनी दोन फुले द्यावीत
ज्यांच्या अंगणात झुकले ढग
त्यांनी ओंजळ पाणी द्यावे
आपले श्रीमंत ह्रदय त्यांनी
रिते करून भरून घ्यावे!’
यामुळेच अर्चना यांच्या या अपार आनंदातून दिवाळसणात अख्खे घर आनंदाने उजळणारे झगमगीत मोगरे फुलतात. ते तुमच्याही घरात फुलावेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वर्षातून मिळणार ८४ दिवसच पाणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महापालिकेने चौथ्या दिवशी पाणीपुरवठा केल्यास औरंगाबादकरांना वर्षभरात फक्त ८४ दिवस पाणी मिळेल. त्यातही तांत्रिक बिघाड झाल्यास पाणीपुरवठ्याचे दिवस ७५ ते ८० दिवसांपर्यंत कमी होण्याची शक्यता आहे.

पूर्ण क्षमतेने पाणीपुरवठा करण्यासाठी जलवाहिन्या सक्षम नसल्यामुळे शहरातील सर्व भागांना समान पाणीपुरवठा करण्यासाठी दर चार दिवसांनी पाणीपुरवठा करण्याचा निर्णय बकोरिया यांनी बुधवारी जाहीर केला. पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक तयार झाल्यावर या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. दर चार दिवसांनी पाणीपुरवठा झाला, तर नागरिकांना महिन्याला सात दिवस आणि वर्षातून ८४ दिवसच पाणी मिळेल. त्यातही काही तांत्रिक अडचण निर्माण झाल्यास किंवा बिघाड झाल्यास पाणीपुरवठ्याचे दिवस आणखी घटतील.

महापालिकेतर्फे सध्या आकारण्यात येणारी पाणीपट्टी ३७५० रुपये आहे. वर्षभर दररोज पाणीपुरवठा केला तर पालिकेने एवढी पाणीपट्टी वसूल करावी अशी सर्वसामान्य नागरिकांची अपेक्षा आहे, पण २०११पासून महापालिकेने दोन दिवसांआड, म्हणजे तिसऱ्या दिवशी पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आठवड्यातून दोनदा, महिन्यातून आठ वेळा आणि वर्षातून ९६ दिवस पाणीपुरवठा होऊ लागला. तांत्रिक बिघाडामुळे पाणीपुरवठा बंद असलेले दिवस यात गृहित धरण्यात आले नाहीत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दिवाळीआधीच तीन दिवसांआड पाणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पैठण येथील जायकवाडी प्रकल्प भरूनही औरंगाबादकरांसमोरील पाणीसंकट आणखी गहिरे होणार आहे. सर्वांना समान पाणीवाटपाचे धोरण स्वीकारून महापालिकेने आता तीन दिवसांआड म्हणजेच तब्बल ९६ तासांनंतर पाणीपुरवठा करण्याचे नियोजन सुरू केले आहे. दिवाळीपूर्वीच औरंगाबादकरांवर पाणी कपातीची कुऱ्हाड कोसळण्याची चिन्हे आहेत.
सध्या शहराच्या काही भागांत तिसऱ्या दिवशी, काही भागांत चौथ्या दिवशी, तर काही भागांत पाचव्या दिवशी पाणीपुरवठा करण्यात येतो. त्यामुळे विविध भागांत पाण्यावरून असंतोषाचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर सर्वांना समान पाणीवाटप करण्याचा विचार पालिका प्रशासनाने सुरू केला आहे. सर्व वॉर्डांत आता चौथ्या दिवशी पाणीपुरवठा करण्याचे नियोजन केले जात आहे. येत्या काळात तिसऱ्या दिवशीच्या नंतर म्हणजे चौथ्या दिवशीच पाणीपुरवठा होईल, असा निर्णयच बुधवारी महापालिकेचे आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी जाहीर केला.

पाणीपुरवठ्यातील विस्कळितपणामुळे सिडको-हडकोतील नगरसेवक आक्रमक झाले होते. त्यांनी सिडको एन ५ येथील जलकुंभावर आंदोलनही केले. त्यानंतर महापौरांच्या दालनात पदाधिकारी, नगरसेवक व आयुक्त यांची संयुक्त बैठक झाली. या बैठकीला महापौर त्र्यंबक तुपे, सभागृहनेते राजेंद्र जंजाळ, स्थायी समितीचे सभापती मोहन मेघावाले, विरोधी पक्षनेते अय्युब जहागीरदार, भाजपचे शहराध्यक्ष माजी आमदार किशनचंद तनवाणी, गटनेते भगवान घडमोडे, गजानन बारवाल यांच्यासह नगरसेवक उपस्थित होते.

सिडको-हडको भागात पाचव्या, सहाव्या दिवशी पाणी येते. पाण्याच्या वेळाही निश्चित नाहीत, पाणीपुरवठ्याची माहिती देण्यासाठी अधिकारी उपलब्ध होत नाहीत, अशा तक्रारींचा पाढा पदाधिकाऱ्यांसह नगरसेवकांनी आयुक्त बकोरिया यांच्या समोर वाचला. त्यानंतर आयुक्त म्हणाले,‘औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीने जादा नळ कनेक्शन दिले आहेत. शहरात पाणी येण्याचे प्रमाण मात्र वाढलेले नाही. महापालिकेची यंत्रणा जायकवाडी धरणातून २०० दशलक्ष लिटर रोज (एमएलडी) पाणी उपसा करू शकते, पण जलवाहिन्यांची पाणी वाहून नेण्याची क्षमता कमी झाली आहे. त्यामुळे १५५ एमएलडी पाण्याचाच पुरवठा केला जाऊ शकतो.’

सिडको हडकोसाठीच्या एक्स्प्रेस जलवाहिनीवर शिवाजीनगर, पुंडलिकनगर व एसएफएस या तीन ठिकाणी क्रॉस कनेक्शन घेण्यात आले आहेत. त्यामुळे सिडको-हडकोतील वॉर्डांचे पाणी कमी झाले आहे. शहराच्या सर्व भागात पाण्याचे समान वाटप करायचे असेल, तर दर चौथ्या दिवशी पाणीपुरवठा करावा लागेल, त्या दृष्टीने प्रशासनाचे नियोजन सुरू आहे, असे त्यांनी सांगितले.

बुधवारी त्याच संदर्भात अधिकाऱ्यांची बैठक झाली. वॉर्डनिहाय पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक तयार केले जात आहे. त्याचबरोबर अनधिकृत नळ कनेक्शन तोडण्याची मोहीम हाती घेतली जाणार आहे, असे बकोरिया यांनी स्पष्ट केले.

पदाधिकाऱ्यांची आज बैठक

चौथ्या दिवशी पाणीपुरवठा करण्याच्या आयुक्तांच्या निर्णयावर विचार करण्यासाठी गुरुवारी सकाळी अकरा वाजता सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात येणार आहे, असे महापौर त्र्यंबक तुपे यांनी सांगितले. शहराच्या सर्व भागातील नागरिक आमचे आहेत. त्यामुळे त्यांना योग्य प्रमाणात पाणी मिळाले पाहिजे, अशीच आमची भूमिका आहे. त्या दृष्टीने उद्याच्या बैठकीत चर्चा करण्यात येणार आहे, असे ते म्हणाले.

औरंगाबादचा पाणीपुरवठा
निवासी नळ कनेक्शन : ९१९२५
व्यावसायिक नळ कनेक्शन : ८८३
सार्वजनिक नळ कनेक्शन : ५००
महापालिकेचे जलकुंभ : ३३
जायकवाडीतून केला जाणारा उपसा : १५५ एमएलडी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गाडगेबाबांचे वाहन पाहण्यासाठी गर्दी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, खुलताबाद
अमरावती येथील श्री गाडगेबाबा महाराज समाधी मंदिर ट्रस्टच्या स्वच्छता संदेश रथाचे खुलताबाद तालुक्यात गुरुवारी आगमन झाले. संत गाडगेबाबा यांनी प्रवास केलेले वाहन या यात्रेत सामील झाले आहे. या वाहनास पाहून ग्रामस्थांनी संत गाडगेबाबा यांच्या स्मृतीला अभिवादन केले. त्यानंतर हे वाहन जालना जिल्ह्यात रवाना झाले.
अज्ञान, अंधश्रद्धा आणि अस्वच्छतेविरुद्ध संत गाडेबाबा यांनी जीवन खर्ची घातले. त्यांनी ज्या वाहनातून प्रवास केला, त्या वाहनाचे गल्ले बोरगाव, वेरूळ, कागजीपुरा येथे जल्लोषात स्वागत करण्यात आले. गावोगावी पायी फिरून दिवसा स्वच्छता व रात्री कीर्तनाच्या माध्यमातून लोकांचे मन स्वच्छ करणाऱ्या संत गाडगेबाबा यांच्या आयुष्याचे हे वाहन साक्षीदार आहे.
यावेळी गटविकास अधिकारी डॉ. राम लाहोटी यांनी संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण अभिवादन केले. यावेळी खंडूजी गायकवाड, जिल्हा स्वच्छता समन्वयक सतीश औरंगाबादकर, तालुका समन्वयक राजेंद्र दांडेकर, सोपान भालके यांच्यासह ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

वाहनाचे महत्त्व
राज्या शासनाने संत गाडगेबाबा यांना हे वाहन १ मार्च १९५० रोजी भेट दिले होते. जनतेची सेवा प्रबोधन करताना याच वाहनात २० डिसेंबर १९५६ रोजी संत गाडगेबाबांचे महानिर्वाण झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सहा लाखांचे बनावट पार्ट जप्त

$
0
0

सहा लाखांचे बनावट पार्ट जप्त
तीन मोबाइलशॉपी चालकाविरुद्ध गुन्हे दाखल
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
आयफोन व बिटस मोबाइल कंपनीचे बनावट पार्ट विक्री करणाऱ्या तीन मोबाइल शॉपीवर पोलिसांनी छापे टाकले. यामध्ये ६ लाखांचे बनावट पार्ट जप्त करण्यात आले आहे. या दुकानदारांविरुद्ध क्रांतिचौक पोलिस ठाण्यात कॉपी राईट अॅक्टनुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
कुंदनसिंग किशनसिंग कहाटे (वय ३९, रा. अजिंठा हौसिंग सोसायटी, दर्गा रोड) व सुजित सुरेश खंडाळे हे प्रोटेक्ट आयपीएलएलपी या कंपनीत अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. कंपनीकडे अॅप्पल व बिटस मोबाइल कंपनीचे कॉपी राईटचे अधिकार आहेत. शहरातील या मोबाइल कंपन्याचे बनावट पार्ट विक्री करणाऱ्या दुकानदाराविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश कंपनीने कहाटे यांना दिले होते. कहाटे यांनी क्रांतिचौक पोलिस ठाण्यात पैठणगेट येथील काही दुकानदाराविरुद्ध तक्रार दिली होती. मंगळवारी क्रांतिचौक पोलिसांच्या पथकाने तीन मोबाइल शॉपीवर छापा टाकला. यामध्ये त्यांना या दुकानामध्ये आयफोन व बिटस कंपनीचे ७२८ बनावट पार्ट आढळून आले. ६ लाख ८ हजार ९०० रुपयांचा हा साठा होता. याप्रकरणी रॉक्सी टॉकीज जवळील चामुंडा मोबाइल शॉपीचे जयराम जोईताजी चौधरी, न्यू चामुंडा मोबाइल शॉपीचे प्रबताराम नरसाराम चौधरी तसेच नाईस मोबाइल शॉपी दलालवाडी येथील मोहम्मद समीर मोहम्मद हनिफ यांच्या विरुद्ध कॉपी राईट अॅक्टनुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याप्रकरणी सहायक पोलिस निरीक्षक सुनीता मिसाळ तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आधी रस्त्यांचे काम; मग ‘भूमिगत’चा दाम

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘भूमिगत गटार योजनेसाठी शहरभर खोदून ठेवलेले रस्ते आधी दुरुस्त करा. या कामाची तपासणी केल्याशिवाय बिलातला एक पैसाही मिळणार नाही,’ असा सणसणीत इशारा गुरुवारी महापालिका आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी कंत्राटदाराला दिला.
महापौर त्र्यंबक तुपे यांच्या उपस्थितीत झालेल्या आढावा बैठकीत भूमिगत गटार योजनेची कामे आणि रस्त्यांच्या दुरवस्थेबद्दल पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. सभागृहनेते राजेंद्र जंजाळ म्हणाले, ‘भूमिगत गटार योजनेची कामे ठप्प आहेत. अंतर्गत ड्रेनेज लाइन टाकण्याचे काम केले जात नाही. कोणती कामे केली जात आहेत, या बद्दल पदाधिकाऱ्यांना सांगितले जात नाही. दोन एसटीपी रद्द केले, पण त्याची माहिती दिली नाही. ड्रेनेज लाइन टाकण्यासाठी अनेक रस्ते खोदून ठेवले, पण अद्याप ते सुस्थितीत आणले नाहीत. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत,’ अशी कैफियत त्यांनी महापौर व आयुक्तांसमोर मांडली.
यावर भूमिगत गटार योजनेच्या कामाची देखरेख करणारे कार्यकारी अभियंता अफसर सिद्दिकी म्हणाले, ‘आठ दिवसांत सर्व रस्त्यांची कामे होतील. शासकीय निधीचा दुसरा हप्ता मिळाल्यावरच अंतर्गत ड्रेनेज लाइन टाकण्याचे काम केले जाणार आहे. ड्रेनेज लाइन टाकण्यासाठी २५ ठिकाणी अतिक्रमणांचे अडथळे आहेत. त्यापैकी १४ ठिकाणची बांधकामे पाडावी लागणार आहेत.’
आयुक्तांनी या संदर्भात अधिक खुलासा केला. ‘जिथे शक्य आहे तिथे बांधकामे वाचवण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे, पण जिथे शक्यच नाही तिथे बांधकामे पाडावी लागणार आहेत. भूमिगत गटार योजनेच्या कंत्राटदाराने रस्त्यांची कामे केली, तरी ती पुन्हा तपासली जातील. त्यासाठी एक पथक तयार करण्यात आले आहे. योग्य प्रकारे काम झाले तरच कंत्राटदाराला पैसे मिळतील.’

पथदिव्यांसाठी सहा पथके
‘पथदिव्यांच्या देखभाल दुरुस्तीसाठी सहा पथकांची स्थापना केली आहे. या संदर्भात जे २४ कंत्राटदार महापालिकेत काम करीत होते, त्यांना मुदतवाढ दिली आहे. प्रत्येक पथकाला कामाचे वाटप केले आहे. कंत्राटदार आणि पथकातील कर्मचारी रात्रीच्या वेळी पथदिव्यांच्या देखभाल दुरुस्तीची कामे करणार असून, दिवाळीत सर्व रस्ते उजळलेले असतील,’ अशी ग्वाही आयुक्तांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मराठवाडा साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. वाघमारे

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
नियोजित ३८ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ विचारवंत, लेखक व माजी कुलगुरू डॉ. जनार्दन वाघमारे यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. सोयगाव येथे डिसेंबर महिन्यात संमेलन होणार आहे. मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी पार पडलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
सोयगाव येथे अजिंठा शिक्षण संस्था मराठवाडा साहित्य संमेलन घेणार आहे. या संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध विचारवंत व स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. जनार्दन वाघमारे यांची निवड करण्यात आली. प्रसिद्ध विचारवंत व लेखक अशी डॉ. वाघमारे यांची ख्याती आहे. ‘अमेरिकन निग्रो - साहित्य आणि संस्कृती’, ‘महाराष्ट्रातील राजकारण व समाजकारण’, ‘मंथन’, ‘विचारमुद्रा’, ‘साहित्य चिंतन’, ‘समाजपरिवर्तनाच्या दिशा’ हे त्यांचे ग्रंथ प्रसिद्ध आहेत. ‘मूठभर माती’ आत्मकथन आणि ‘बखर एका खेड्याची’ कादंबरीने वाचकांची मने जिंकली आहेत. शिक्षण, राजकारण, समाजकारण, साहित्य या विषयांवर मूलगामी भाष्य करणारे विचारवंत म्हणून डॉ. वाघमारे मान्यताप्राप्त आहेत. अध्यक्ष निवडीच्या बैठकीला डॉ. दादा गोरे, प्रा. किरण सगर, डॉ. भास्कर बडे, के. एस. अतकरे, आसाराम लोमटे, डॉ. शेषराव मोहिते, डॉ. ऋषिकेश कांबळे, हेमलता पाटील, डॉ. वृषाली किन्हाळकर, प्रा. विलास वैद्य, देविदास कुलकर्णी, प्रा. कमलाकर कांळे, डॉ. रामचंद्र काळुंखे, डॉ. दिलीप बिरूटे, दगडू लोमटे, जीवन कुलकर्णी आदी सदस्य उपस्थित होते.

बी. रघुनाथ यांच्या नावे पुरस्कार
मराठवाड्यातील थोर प्रतिभावंत बी. रघुनाथ यांच्या नावाने कथा-कादंबरी या वाड्मय प्रकारातील महत्त्वपूर्ण कलाकृतीसाठी एका पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. दरवर्षी पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे. मराठवाडा साहित्य परिषदेच्या सदस्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

श्रवणीय संगीत सभेला दाद

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
शास्त्रीय गायन, वाद्य जुगलबंदी यांनी संगीत सभा गाजली. महामहोपाध्याय डॉ. स. भ. देशपांडे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त ही संगीत सभा आयोजित करण्यात आली होती. डॉ. वैशाली देशमुख यांचे शास्त्रीय गायन श्रवणीय ठरले.
कै. शारदाबाई गोविंदराव देशमुख प्रतिष्ठानने आयोजित केलेला हा कार्यक्रम विवेकानंद महाविद्यालयाच्या सभागृहात गुरुवारी सायंकाळी रंगला. सभेचे उदघाटन पं. नाथराव नेरळकर, पं. शुभदा पराडकर व पं. विश्वनाथ ओक यांनी केले. यावेळी पं. प्रा. विजय देशमुख, गायक प्रा. राजेश सरकटे, अतुल सावे, अरविंद पिंगळे उपस्थित होते. या
सभेत युवा गायक केदार देशमुख यांनी शास्त्रीय गायन केले. ‘राग पुरिया कल्याण’ सादर करून रसिकांची दाद मिळवली. या शास्त्रीय रागदारीने रसिकांना खिळवून ठेवले. तबल्यावर शिरीष गोसावी, हार्मोनिअमवर गिरीश धुंदे आणि तानपुऱ्यावर अभिलाष परळीकर व विजय दोंडगे यांनी साथसंगत केली. त्यानंतर तबला वादक स्वानंदसरस्वती संजीव गोमटे आणि सुधांशू अनंत परळीकर यांची वादन जुगलबंदी रंगली. संगीत सभेचा समारोप प्रसिद्ध शास्त्रीय गायिका डॉ. वैशाली देशमुख यांच्या गायनाने झाला. या सुश्राव्य गायनाने संगीत सभा श्रवणीय ठरली. त्यांना शिरीष गोसावी, गिरीश धुंदे, शलाका निकम आणि शोण पाटील यांनी संगीत साथसंगत केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अविनाश थिगळे यांनी केले. कार्यक्रमाला रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खेळाडूने वय चोरल्याने विजेता संघ बाद

$
0
0

खेळाडूने वय चोरल्याने विजेता संघ बाद
परभणीच्या जिजाऊ ज्ञानतीर्थ शाळेवर कारवाई
कबड्डी स्पर्धा
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
खेळाडूंनी वय चोरण्याचे प्रमाण अनेक क्रीडा स्पर्धांमध्ये दिसून येते. अनेकदा क्रीडा संघटकच खेळाडूंना तसे करण्यास भाग पाडतात. खेळाडूंच्या पालकांचीही त्याला मूक संमती असते. विभागीय शालेय कबड्डी स्पर्धेतही वयचोरीचा प्रकार उघडकीस आल्यामुळे परभणीच्या जिजाऊ ज्ञानतीर्थ शाळेचा संघाला जेतेपदानंतर स्पर्धेतून बाद करण्याचा निर्णय क्रीडा विभागाला घ्यावा लागला.
विभागीय क्रीडा संकुलात विभागीय आंतरशालेय कबड्डी स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेपूर्वी वसंतराव नाईक कॉलेजचे युवराज राठोड यांनी खेळाडूंच्या अधिकृत कागदपत्रांबाबत आक्षेप नोंदवला होता. त्यानंतर सहभागी संघांना खेळाडूंची सर्व कागदपत्रे आणण्यास सांगण्यात आले. मात्र, त्याची योग्य पडताळणी झाली नाही. त्यामुळे परभणीच्या जिजाऊ संघाने वसंतराव नाईक कॉलेज व पाटेगावच्या संघास हरवून अंतिम फेरीत धडक मारली. अंतिम फेरीत जिजाऊ संघाने बीड जिल्ह्यातील ढेकनमोहा येथील गोरक्षनाथ कनिष्ठ कॉलेज संघास २७-८ असे सहज पराभूत करून जेतेपद मिळविले. सामना संपल्यानंतर गोरक्षनाथ संघाने किसन शिंदे या खेळाडूच्या पात्रतेबद्दल आक्षेप नोंदवला.
गोरक्षनाथ कॉलेजचे क्रीडा शिक्षक महादेव रकटे यांच्या लेखी आक्षेपानंतर जिल्हा क्रीडा कार्यालयाने कागदपत्रांची शहानिशा करून जिजाऊ संघास बाद ठरवण्याचा निर्णय घेतला आहे. किसन शिंदे हा खेळाडू काही वर्षांपूर्वी गोरक्षनाथ संघाकडूनच खेळलेला होता. त्याने २०१३मध्ये याच कॉलेजकडून बारावीची परीक्षा दिली होती. परीक्षेस अनुपस्थितीत राहिल्याची सत्यप्रतही त्यांनी सादर केली. किसनची खरी जन्मतारीख १०-५-१९९५ अशी आहे. त्यामुळे तो १९ वर्षांखालील गटात खेळू शकत नव्हता. जिजाऊ शाळेत प्रवेश घेताना त्याने सादर केलेल्या जन्मतारखेच्या दाखल्यावर १०-५-१९९९ अशी जन्मतारीख आहे. रकटे यांनी नोव्हेंबर २०१२मध्ये लातूर येथे झालेल्या राज्य शालेय कबड्डी स्पर्धेतील किसनचे प्रमाणपत्र सादर केले. २०१४मध्ये बदलापूर येथे झालेल्या कुमार गट राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेतही तो सहभागी झाला होता. त्याचे प्रमाणपत्रही त्यांनी सादर केले. सर्व कागदपत्रांची पडताळणी जिल्हा क्रीडा अधिकारी ऊर्मिला मोराळे व स्पर्धा अधिकारी गोकुळ तांदळे यांनी केली.
याबाबत ‘मटा’शी बोलताना जिजाऊ शाळेचे क्रीडा शिक्षक सुरेश भिसे म्हणाले, ‘किसनने शाळेत प्रवेश घेताना दहावीचे खरे प्रमाणपत्र सादर केले होते. त्यावरुनच त्याला प्रवेश देण्यात आला. त्याच्या पूर्वीच्या कामगिरीविषयी आम्हाला काहीच माहिती नाही. या प्रकरणात आमच्या शाळेची कोणतीही चूक नाही. त्यामुळे आमच्या संघास पुढे खेळण्याची संधी द्यावी. आमच्या संघातील खेळाडूंनी गेल्या चार महिन्यांपासून या स्पर्धेची कसून तयारी केली आहे. आमचा संघ प्रथमच विभागीय स्पर्धेत विजेता ठरला आहे. एका खेळाडूच्या चुकीचा फटका पूर्ण संघास बसणार नाही याची काळजी क्रीडा विभागाने घ्यावी.’
जिल्हा क्रीडा अधिकारी ऊर्मिला मोराळे म्हणाल्या, ‘विभागीय शालेय कबड्डी स्पर्धेतील हा प्रकार अंतिम लढत संपल्यानंतर समोर आला आहे. विजेत्या संघातील खेळाडूच्या वयाबाबतचा आक्षेप खरा असल्याचे पडताळणीनंतर सिद्ध झाले. भविष्यात असे प्रकार घडू नये म्हणून कठोर निर्णय घ्यावा लागत आहे.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live


Latest Images