Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

तज्ज्ञ नसतानाही चालणारे केंद्र

$
0
0
मराठवाड्यातील गोरगरीब रुग्णांना कॅन्सरसारख्या दुर्धर आजारावर स्वस्तात आणि प्रभावी उपचार व्हावेत, या उद्देशाने उभारलेल्या मराठवाडा विभागीय कर्करोग विशेषोपचार केंद्राचा गाडा तज्ज्ञ नसतानाही कसाबसा सुरू आहे.

गॅस वितरण एजन्सीमध्ये आधार केंद्र

$
0
0
केंद्र शासनाच्या थेट अनुदान वितरण योजनेतंर्गत गॅस सिलेंडरवरील अनुदानाची रक्कम आधार क्रमांकाच्या माध्यमातून १ डिसेंबर पासून दिली जाणार आहे.

मंगळसूत्रचोरास ३ वर्षे सक्तमजुरी

$
0
0
महिलेचे मंगळसूत्र पळवणाऱ्या आरोपीला प्रथमवर्ग न्यायदंडाधीकारी मृणाल डोईफोडे यांनी तीन वर्षे सक्तमजुरी व दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.

छेडछाड होतेय, थेट अधिकाऱ्यांना फोन करा

$
0
0
छेडछाड होते, कुणी त्रास देतो, महिलावर अत्याचार होत आहे, हुंड्यासाठी छळ केला जातो, यासारखी कोणतीही घटना असो तक्रार नोंदवण्यासाठी थेट अधिकाऱ्यांच्या मोबाइलवर संपर्क साधा, असे आवाहन जालना जिल्हा प्रशासन करत अधिकाऱ्यांचे मोबाइल क्रमांक प्रसिद्ध केले आहेत.

ऑनलाइन लॉटरीवर सोमवारपासून LBT

$
0
0
ऑनलाइन लॉटरीवर सोमवारपासून स्थानिक संस्था कर (एलबीटी) वसूल करा. जे एलबीटी भरणार नाहीत, त्यांची दुकाने सील करा, असे आदेश स्थायी समितीचे सभापती नारायण कुचे यांनी पालिका प्रशासनाला दिले.

फायलींच्या नोंदीची पालिकेत पद्धतच नाही

$
0
0
पालिकेत कोणत्याही फायलीची नोंद होत नाही. आवक-जावक ही पद्धतच अस्तित्वात नाही. सर्व फायली हँड-टू-हँड, टेबल-टू-टेबल चालतात, अशी कबुली पालिकेचे नवनियुक्त शहर अभियंता सखाराम पानझडे यांनी स्थायी समितीच्या बैठकीत दिली.

मालमत्ता कर थकला; १३ दुकाने सील

$
0
0
मालमत्ता कर थकल्यामुळे पालिकेने तेरा दुकानांना सील ठोकले आहे. भावसिंगपुरा भागातील रामभाऊ म्हस्के, प्रल्हाद तुर्कमाने, मधुकर म्हस्के यांच्या मालकीची ही दुकाने होती.

रस्ते दुरुस्तीसाठी कर वाढवा, कर्ज काढा

$
0
0
कर वाढवा, नाही तर कर्ज काढा; पण शहरातील रस्ते युद्धपातळीवर दुरूस्त करा, अशी सूचना शिवसेनेचे संपर्क नेते आमदार विनोद घोसाळकर यांनी शुक्रवारी पालिका आयुक्तांना केली.

मुरुम टाकण्यासाठी पॅचवर्क करणाऱ्या गँग

$
0
0
पॅचवर्कचे काम करणाऱ्या ‘गँग’ आपल्याकडे आहेत. त्यांच्यामार्फतच मुरूम टाकला जातो, असे विधान कार्यकारी अभियंता सिकंदर अली यांनी केले आणि शहरातील रस्त्यांवर गरमागरम चर्चा सुरू असणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीत हास्याचे फवारे उडाले.

रात्रीच्या वेळी बस सेवा गायब

$
0
0
एसटी बसमधून रात्रीच्यावेळी औरंगाबाद बस स्थानकावर पोहोचणाऱ्या प्रवाशांसाठी सिडको सीबीएस सेवा सुरू करण्याचा निर्णय दोन महिन्यांपूर्वी घेण्यात आला. एसटीच्या शेड्यूलमध्ये ही सेवा सुरू करण्याबाबत तरतूदही करण्यात आली.

मातेचा मुलीला फेकण्याचा प्रयत्न

$
0
0
किरकोळ कारणावरून झालेल्या भांडणानंतर तरुणाने आपल्या मुलीला मारहाण केली, त्यामुळे रागाच्या भरात या महिलेने मुलीला उड्डाणपुलावरून खाली फेकण्याचा प्रयत्न केला; मात्र नागरिकांच्या सतर्कतेने ही बालिका बचावली.

पॅचवर्कच्या ‘स्थायी’त चिंधड्या

$
0
0
रस्त्यांच्या पॅचवर्कच्या कामाच्या स्थायी समितीच्या बैठकीत चिंधड्या उडाल्या. पॅचवर्कच्या कामाच्या फायलीच सापडत नाहीत, लेखापरिक्षणासाठी त्या उपलब्ध करून देण्यात आलेल्या नाहीत असे बैठकीत स्पष्ट झाले.

पाणी वळविण्याचा उद्योग थांबला

$
0
0
उर्ध्व गोदावरी खोऱ्यातील पाणी नगर, नाशिक जिल्ह्यांत वळविणाचा उद्योग थांबविल्यानंतर नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यातून गोदावरी नदीच्या पात्रात पाणी सोडण्यास सुरुवात करण्यात आली आहे.

घोसाळकरांनंतर खैरेंनी फोडला बैठकीचा पोळा

$
0
0
शिवसेनेचे संपर्क नेते आमदार विनोद घोसाळकर यांनी शुक्रवारी रस्त्यांच्या संदर्भात पालिका आयुक्तांची भेट घेतल्यानंतर, खासदार चंद्रकांत खैरे यांनी शनिवारी रस्त्यांच्याच मुद्यावरून बैठकीचा पोळा फोडला.

रस्त्यांवर वर्षभरात दोनदा डांबरीकरण

$
0
0
महापालिकेने डिफर्ड पेमेंटच्या माध्यमातून सत्तर कोटी रुपये किंमतीचे रस्ते करण्याचा निर्णय घेऊन विशिष्ट ठेकेदाराच्या झोळीतच या रस्त्यांचे माप टाकले आहे. काही रस्त्यांवर एका वर्षात दोन वेळा ‘ब्लॅकटॉपिंग’ (डांबरीकरण) करण्याची वेळ आली आहे.

‘छावा’चे कार्यकर्ते आज रस्त्यावर उतरणार

$
0
0
रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे शहरातील वाहनधारक त्रस्त झाले असून, आरोग्याचे प्रश्न निर्माण झाले आहेत. याकडे महापालिका व राज्यकर्त्यांचे लक्ष वेधण्यासाठी अखिल भारतीय छावा संघटनेचे कार्यकर्ते रविवारी रस्त्यावर उतरणार आहेत, अशी माहिती संघटनेचे प्रदेश संघटक अप्पासाहेब कुढेकर यांनी दिली.

शहरात ‘रस्ते छोटे, खड्डे फार’

$
0
0
‘पानचक्की आहे सुंदर, खड्ड्यांनी मोडली कंबर’, ‘एक-दोन-तीन-चार, रस्ते छोटे, खड्डे फार’, ‘खड्डे किती, खड्डे किती, कंबर लटकली’ अशा आशयाचे फलक, घोषणा देत भावी अभियंते शनिवारी रस्त्यावर उतरले ते रस्त्यांवरील खड्ड्यांच्या प्रश्नाबाबत.

डोणगावकर यांच्या विरुद्धचा अविश्वास ठराव फेटाळला

$
0
0
औरंगाबाद जिल्ह्यातील मोठी आर्थिक उलाढाल होणारी लासूर स्टेशन कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती कृष्णा पाटील डोणगावकर यांच्याविरुद्धचा अविश्वास ठराव गणपूर्ती अभावी शनिवारी बारगळला.

कारवाईच्या धास्तीने व्यापा-यांची सुट्टी

$
0
0
नियमानूसार साप्ताहीक सुट्टी घेणे बंधनकारक आहे. परंतु त्यांचे उल्लंघन करुन सर्रास दुकान उघड ठेवली जात असल्याचे समोर आल्याने कामगार उपायुक्त कार्यालयाने कारवाईचा बडगा उगारला आहे.

दरोडा प्रकरणातील आरोपी गजाआड

$
0
0
बिलाच्या कारणावरुन हॉटेलचालकास मारहाण करत गल्ल्यातून पैसे लंपास केल्या प्रकरणी पोलसांना हवा असलेला आरोपीला अटक करण्यात आले.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images