उद्योगक्षेत्रात मोठ्या प्रमाणावर संधी निर्माण होत असताना आव्हानेही वाढलेली आहेत. हे पाहता नोकरीयोग्य शिक्षणापेक्षा रोजगार व नवनिर्मितीची प्रेरणा देणारे शिक्षण यावर भर द्यायला हवा असा सूर ‘भारतातील उद्योजकता विकास व संधी’ विषयावर आयोजित राष्ट्रीय परिषदेत सहभागी तज्ज्ञांनी व्यक्त केला.
↧