गाण्यांचे बोल कानावर न पडता केवळ वाद्यवृंदावरील धून ऐकणे रसिक पसंत करू लागले आहेत. त्यामुळे वाद्यांवर आधारित कार्यक्रमांची रेलचेल सध्या औरंगाबादेत वाढली आहे. त्यातल्या त्यात बासरी (वेणू) वर आधारित कार्यक्रम करणारे भगवान कुलकर्णी यांनी आपली आगळीवेगळी छाप पाडून यात काही वेगळं देण्याचा प्रयत्न केला आहे.
↧