‘आम आदमी पक्षा’च्या मिल कॉर्नर येथील संपर्क कार्यालयावर अज्ञातांनी हल्ला चढविला. चार ते पाच व्यक्तींनी कार्यालयात घुसखोरी करून टीव्ही आणि फर्निचर यांची मोडतोड केली. ही घटना मंगळवारी दुपारी घडली असून, सिटी चौक पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली आहे.
↧