विठू नामाचा महिमा सर्वानांच मोहवून टाकतो. वारीतील वारकऱ्यांमध्ये अनेकांचा समावेश असतो. पोलिस दलातील कर्मचारी देखील यापासून दूर राहिलेले नाहीत. आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे भरणाऱ्या वैष्णवांच्या मेळ्यासाठी औरंगाबाद पोलिस दलातील अनेक कर्मचारी सहभागी झाले आहेत.
↧